कथा * सुवर्णा पाटील

‘‘अरे तन्मय काय सुरू आहे तुझे? किती वाजले बघितले का? आता बंद कर तो मोबाईल आणि झोप आता.’’ आईच्या आवाजाने तन्मय त्याच्या मोबाईलच्या विश्वातून बाहेर आला.

‘‘हो ग आई, झालेच काम, तू झोप ना, तू का जागी आहेस. तुला सकाळी लवकर उठायचे असते ना...तू झोप मी पण झेपतच आहे आता.’’

आई तिच्या खोलीत गेली ही खात्री होताच तन्मयने पुन्हा मोबाईलवर चॅटिंग सुरू केली. उशिरा रात्रीपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करतो म्हणून तुम्ही तन्मयबद्दल गैरसमज करू नका. नामांकित आयआयटी कंपनीत एका चांगल्या पदावर कार्य करणारा तन्मय एक हुशार व तितकाच हँडसम असा युवक आहे. त्याला कॉलेज जीवनापासून मित्र बनवायला खूप आवडते. त्याचे कॉलेजातील मित्रमंडळ पण खूप मोठे होते. पण जॉब लागल्यावर प्रत्येकजण आपल्या वाटेला गेला. आता फक्त भेट होते ती हाय हॅलो पुरतीच. असेच एक दिवशी फेसबुकवर त्याला एक मैत्रीण भेटली...अबोली. तसे व तिने तिच्या प्रोफाइलवर तिचा फोटो ही लावलेला नव्हता. होते फक्त एक अबोलीचे सुंदर फूल...

तन्मयची तिच्याशी छान गट्टीच जमली होती. त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तो तिच्याशी शेअर करायचा. कधी ऑफिसच्या कामामुळे तो अपसेट झालेला असला तरी त्या गोष्टी पण तिच्याशी बोलायचा. अबोली त्याला खूपच छान समजून घ्यायची. जर ती ऑनलाइन नसली तर तो अस्वस्थ व्हायचा. कारण तिच्याशी बोलण्याचे त्याच्याकडे दुसरे माध्यमच नव्हते. एकेदिवशी याच कारणावरून तन्मय अबोलीशी भांडला.

‘‘आपण आता किती छान मित्र झालो आहोत. तुला माझ्यावर विश्वास नाही का? मग तू मला भेटण्याचे का टाळत आहे. मला तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे. तुझ्या डोळ्यांत डोळे मिसळून संवाद साधायचा आहे.’’

‘‘सॉरी तन्मय...हे आपण आधीच ठरवले होते की आपली मैत्री ही नेहमी ऑनलाइनच असेल. आपण एकमेकांना न पाहता मैत्री केली मग आता तू इतका का रागवलेला आहे?’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...