* श्रीप्रकाश
वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून नोकरी करणे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होमचाच पर्याय अनेक आय टी कंपन्या तसेच अनेक क्षेत्रातील कार्यालयांनी अवलंबला होता. हो, काही कामे अशी असतात की जी घरी बसून केली जाऊ शकतात. तुम्ही जगात कुठेही असा, इंटरनेट आणि वायफायच्या मदतीने ही कामे सहजी पार पाडता येतात. यामुळे काम देणाऱ्या आणि काम करणाऱ्या अशा दोघांचा फायदा आहे. विशेषकरून अशा माता किंवा पिता वा दोघांसाठी जे आपल्या मुलांवर जास्त लक्ष्य देऊ इच्छितात. आधी ही व्यवस्था पश्चिमी विकसित देशांपर्यंतच मर्यादित होती. पण आता आपल्या देशात इंटरनेट आणि वायफायच्या विस्तारामुळे वर्क फ्रॉम होम येथही सहज साध्य आहे.
कोणती कामे घरी बसून शक्य
माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कार्य घरून इंटरनेट आणि वायफायने केले जाऊ शकते. उदाहरणार्थ :
वर्चुअल असिस्टेंट
वर्चुअल असिस्टेंटची आपली कंपनी घरून चालवू शकता किंवा एखाद्या अशा कंपनीसाठी जी आपल्याला दुसऱ्या कंपनीसाठी किंवा क्लाइंटसाठी काम देईल. छोटे व्यावसायिक जे पर्मनंट कर्मचारी ठेवण्यास असमर्थ आहेत, त्यांना अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, जे त्यांच्यासाठी घरून काम करू शकतील.
मेडिकल टंरास्क्रिप्ट
डॉक्टरांचे बोलणे ऐकून त्यांचे उपचार, सूचना आणि औषधांसंबंधित बाबी कंप्युटरवर टाईप कराव्या लागतात. डॉक्टर दुसऱ्या देशाचेही असू शकतात. त्यांचे उच्चारण व्यवस्थित समजून घ्यावे लागतात.
अनुवादक
जर आपण एकापेक्षा अधिक बहुप्रचलित आंतरराष्ट्रीय भाषा जाणत असाल तर जगात अशा बऱ्याच कंपन्या आहेत, ज्या आपल्या देशात बसलेल्या आपल्या ऑडिओ फाईल्स किंवा डॉक्युमेंट्स एखाद्या दुसऱ्या भाषेत अनुवादित करू इच्छित असतील.
वेब डिझाइनर
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळयात जास्त वर्क फ्रॉम होमच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात वर्चुअल असिस्टेंट, वेब डेव्हलपर किंवा डिझाइनर, नवीन कस्टम वेब डिझाइन किंवा त्यांच्या वेबमध्ये बदल, सुधार किंवा अपडेटिंगची गरज पडत असते.
कॉल सेंटर प्रतिनिधी
यातही बऱ्याच संधी आहेत. जेव्हा कधी आपण एखाद्या मोठया कंपनीत कुठले सामान किंवा सेवेची ऑर्डर देत असतो, त्यावेळी दुसऱ्या बाजूने आपले बोलणे ऐकणारा कोण्या मोठया कॉल सेंटरमध्ये नसून त्यांचा कोणी प्रतिनिधी असू शकतो, जो घरूनच काम करत असतो.