* ललिता गोयल

पालकांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. कोणत्याही पालकांसाठी त्यांची मुलेच त्यांचे जग असते. मुलांची केवळ उपस्थितीच त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवते. पालक मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात त्यांना नको असतानाही मुलांना घरी एकटे सोडण्याचा कठोर निर्णयसुद्धा घ्यावा लागतो. कबूल आहे की मुलांना घरात एकटे सोडणे ही २१ व्या शतकातील एक गरज आणि आई-वडिलांसाठी एक विवशता बनली आहे, परंतु ही विवशता आपल्या लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्वात आणि वागणुकीत कसा बदल घडवून आणू शकते हे जाणून घेणे कोणत्याही पालकांसाठी आवश्यक आहे.

शेमरॉक अँड शेमफोर्ड ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका मिनल अरोराच्या म्हणण्यानुसार पालकांच्या अनुपस्थितीत एकटेच राहणाऱ्या मुलांच्या वागण्यात खालील समस्या दिसून येतात :

भीतीची प्रवृत्ती

मुलांमध्ये घरी एकटे राहण्यामुळे रिकाम्या घरात सामान्यशा आवाजानेही भीती बाळगण्याची प्रवृत्ती निर्माण होते कारण त्यांना बाह्य जगाचा फार कमी अनुभव असतो. याव्यतिरिक्त जी मुले एकटेच राहतात ती त्यांची भीती पालकांकडे सामायिक करीत नाहीत कारण त्यांची इच्छा नसते की त्यांना अजूनही मुल समझले जावे. बऱ्याच वेळा मुले त्यांच्या पालकांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतीत करू इच्छित नाहीत, म्हणूनच ते आपल्या मनातील गोष्टी लपवतात.

एकटेपणा

घरात एकटया राहणाऱ्या मुलांना त्यांच्या मित्रांना भेटण्याची, कुठल्याही अवांतर कामात भाग घेण्याची किंवा कोणतीही सामाजिक कौशल्ये विकसित करण्याची परवानगी नसते. याचा त्यांच्या सामाजिक जीवनावर परिणाम होतो आणि ते एकाकीपणाला बळी पडतात. अशी मुले आपल्या वस्तू सामायिक करायलासुद्धा शिकत नाहीत. ते स्वकेंद्रित होतात. बाह्य जगापासून दूर राहिल्याने ते स्वार्थी, नेभळट आणि चिडचिडे होतात.

आरोग्यास धोका

घरी राहणारी मुले कोणतीही बाह्य क्रिया करीत नाहीत ज्यामुळे त्यांचे शरीर सक्रिय राहील. परिणामी आळशीपणा वाढतो आणि बहुतेक मुले लठ्ठ होतात. अशा मुलांमध्ये खाणे-पिणे, आरोग्य आणि विकासाशी संबंधित समस्यादेखील दिसून येतात. एकटे राहिल्यामुळे अशी मुले औदासिन्यासदेखील बळी पडतात. त्यांचे रोजचे जीवन विस्कळीत होते. बऱ्याच वेळा वेळेअभावी पालक मुलांचा प्रत्येक आग्रह पूर्ण करतात, ही सवय त्यांना स्वार्थी बनवते आणि ते त्यांचा प्रत्येक आवश्यक, अनावश्यक आग्रह व मागणी पूर्ण करून घेऊ लागतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...