* पारुल भटनागर
जगभरात इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वामुळे त्रस्त असलेल्या लोकांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात १० ते १५ टक्के विवाहित जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या भेडसावत आहे. भारतातील ३० लाख वंध्य जोडप्यांपैकी ३ लाख जोडपी दरवर्षी वंध्यत्वाचे उपचार घेतात. शहरी भागात ही संख्या खूप मोठी आहे. तेथे, प्रत्येक ६ जोडप्यांपैकी १ जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहे आणि त्याच्या उपचारांबद्दल खूप जागरूक आहे. मुळात प्रत्येक समस्येवर उपचार केला जाऊ शकतो. म्हणूनच तर आशा सोडून दिलेली जोडपीही आई-वडील बनू शकतात.
वंध्यत्व म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वंध्यत्व हा प्रजनन प्रणालीशी संबंधित आजार आहे. वंध्यत्व हा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा एखादे जोडपे वर्षभरापेक्षा जास्त काळ मुलासाठी प्रयत्न करत असते, पण तरीही गर्भधारणा होण्यास त्रास होतो. वंध्यत्वाचा दोष केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही असतो.
बऱ्याचदा स्त्रियांमध्ये ही समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे फेलोपियन ट्यूब ब्लॉक होणे, अंड्यांचे उत्पादन न होणे, अंड्यांचा दर्जा खराब असणे, थायरॉईड, गर्भधारणेच्या हार्मोन्सचे असंतुलन, पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम इत्यादी. त्यामुळे आई बनण्यात अडचणी येतात.
दुसरीकडे, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, त्यांची गुणवत्ता चांगली नसणे आणि त्यांची गतिशीलता कमी असणे म्हणजे ते सक्रियपणे काम करू न शकणे अशा समस्या असतात. यामुळे जोडीदाराला गर्भधारणेत समस्या येते, पण निराश होऊन नाही तर वंध्यत्वावर उपचार करून तुमची समस्या दूर होईल.
यावर उपचार काय?
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी प्रयत्न : सर्वसामान्यपणे किंवा उपचाराने वंध्यत्व दूर करायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी डॉक्टर तुमचे मासिक पाळी चक्र सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुमचे हार्मोन्स नीट होतील आणि तुम्हाला गर्भधारणेत कोणतीही अडचण येणार नाही. सोबतच तुमचा ओवुल्येशन पिरेड शोधून काढणे सोपे होईल. पौष्टिक खाणे आणि औषधोपचाराने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
हार्मोन्सचे संतुलन नीट करणे : गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स जसे की, एफएसएच, जे अंडाशयात अंड्यांना मोठे होण्यास मदत करते, ज्यामुळे एस्ट्रोजेनचे उत्पादन वाढते आणि ते शरिरातील एफएसएचच्या वाढीचे संकेत देते. यामुळे ओव्युलेशन नीट होण्यासह गर्भधारणा होणे सोपे होते. अशावेळी आययूआय म्हणजे इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन आणि औषधांच्या माध्यमातून याला नीट केले जाते. यात पौष्टिक खाण्याची सवय उपयुक्त ठरते.