* मेनका गांधी

मुंबईच्या एका व्यसनमुक्ति केंद्राला पाहून समजून येतं की तिथे समाजातील कोणत्या वर्गाचे लोक येतात. इथे श्रीमंत लोकांच्या तरुण मुलांची संख्या अधिक आहे, ज्यांच्याजवळ पैसा तर खूप आहे, परंतु आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. ठरलेल्या रूटीननुसार ही मुलं महिन्यातून दोनदा परदेशात फिरायला जातात, खातातपितात, सिनेमे बघतात.

या व्यसनमुक्ति केंद्राला पाहून असं वाटतं की इथे अशा प्रकारची प्रकरणं वारंवार येत असणार. मी व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका अशा तरुणाला ओळखते, जो या केंद्रात तिसऱ्यांदा आलाय. इथे येणाऱ्या लोकांच्या दु:खाचं कारण म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणं, लहानपणी त्यांच्यासोबत वाईट वर्तण होणं वा पैशाच्या बळावर वाया जाणं अशा अनेक गोष्टी आहेत. याचं कारण म्हणजे अनेकदा मानसिक आरोग्य मेंदूमध्ये फिरणाऱ्या रसायनांच्या गडबडीमुळे बिघडत जातं.

पाळीव प्राणी होऊ शकतात सहाय्यक : अलीकडे अशाप्रकारचे प्रयोग करून पाहिले जात आहेत की कुत्रे या तरुणांना बरे होण्यात मदत करू शकतात का? जे या व्यसनमुक्ति केंद्रात उपचार करून घेत आहेत.

या शोधाच्या संशोधक लिंडसे एल्सवर्थ या वॉशिंग्टन स्टेट महाविद्यालयात संशोधनाच्या विद्यार्थी आहेत. या स्पोकन ह्यूमन सोसायटीतून एक्सेल्सिअर यूथ सेंटरमध्ये कुत्रे घेऊन आल्या. या सेंटरमध्ये उपचार करवून घेणारे सर्व तरुण होते. एक्सलसिअरच्या दररोजच्या मनोरंजनाच्या वेळी इथल्या काही तरुणांनी व्हिडिओ गेम्सपासून ते बास्केटबॉल खेळून आपला वेळ व्यतीत केला. काही तरुणांनी कुत्र्याची स्वच्छता केली, त्यांना जेवण भरवून व त्यांच्यासोबत खेळून आपला वेळ व्यतीत केला. अशाप्रकारच्या क्रिया सुरू करण्यापूर्वी आणि समाप्त केल्यानंतर तरुणांचं एका प्रक्रियेद्वारे मूल्यांकन केलं जातं. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ १ ते ५ पर्यंतच्या स्केलवर तरुणांच्या ६० प्रतिक्रियांचं मुल्यांकन करतात आणि त्यांच्या भावनांना समजण्याचा प्रयत्न करतात.

ज्या तरुणांनी कुत्र्यांसोबत वेळ व्यतीत केला होता, त्यांनी आपल्यामध्ये आनंद, सतर्कता आणि शांतीचा छानसा अनुभव केला. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या तरुणांनी ‘उत्साहित,’ ‘उर्जावान’, ‘आनंदी’सारख्या शब्दांचा वापर केला. त्यापैकी काही तरुण जे एखादा अपघात वा धक्क्यानंतरच्या तणावातून जात होते, त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा पहायला मिळाल्या.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...