* गरिमा पंकज
अलीकडच्या काळात कोव्हिड -१९ मुळे मुलांच्या शाळा बंद आहेत आणि त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. इकडे नोकरदार महिलांना स्वत:च्या ऑफिसची कामेदेखील घरीच करावी लागताहेत. पूर्वी महिला मुलांना शाळेत वा खेळायला पाठवून आरामात आपापली कामे करत असत, मात्र आता मुलं सतत घरीच असतात. यामुळे नोकरदार महिलांना स्वत:च्या कामाबरोबरच मुलांच्या ऑनलाईन क्लासेसवर लक्ष ठेवणं तेवढं सहजसोपं राहीलेल नाहीए. ना त्या स्वत:च काम सोडू शकत ना मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकत. यामुळे त्या द्विधा मनस्थितीत अडकल्या आहेत.
चला तर जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी :
* सर्वात मोठं आव्हान म्हणजे आईने स्वत:च्या ऑफिसचं काम करायचं की मुलांचा ऑनलाईन अभ्यास व्यवस्थित चालला आहे की नाही याकडे लक्ष द्यायचं.
* अनेकदा मुलं अभ्यासाऐवजी दुसऱ्या साईट्स चालू करून त्याच पाहत बसतात. ती लॅपटॉप वा फोनवर चुकीच्या गोष्टी पाहू शकतात. त्यांचं मन एकाग्र होत नाही आणि अनेकदा ती ऑनलाईन क्लास बुडवून वा क्लास संपवून गेम्स खेळू लागतात.
* ऑनलाईन वर्गाच्या दरम्यान मुलांच्या डोळयांवरदेखील परिणाम होतो. प्रकाशयोजना व्यवस्थित नसेल वा वर्ग अधिक वेळ चालत असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो.
* मुलांचे क्लासेस आणि घरातील कामाबरोबरच स्वत:च्या ऑफिसची कामे करणं खूपच आव्हानात्मक काम आहे.
यासंदर्भात किंडरपासच्या फाउंडर शिरीन सुलताना यांच्याशी याबाबत विस्ताराने चर्चा झाली. त्यांनी सुचविलेले काही खास उपाय खालीलप्रमाणे :
मुलांचं मन अभ्यासात एकाग्र होण्यासाठी
मुलांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये यासाठी पॅरेंटिंग कन्ट्रोल फीचर्सचा वापर करायला हवं. तुम्ही लॅपटॉप वा मोबाईलच्या सेटिंगमध्ये काही बदल करून मुलांच्या चुकीच्या साईट्स पाहण्यावर तसंच गेम्स यावर नियंत्रण ठेवू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला ज्या साईट्स वा गेम्सपासून मुलांना दूर ठेवाworking women time management for kids studiesयचंय त्या ब्लॉक करून ठेवा. सर्चइंजिन म्हणजेच गुगल, बिंग इत्यादींचे प्रेडिक्टिव्ह टेस्ट ऑप्शन बंद करा. यामुळे यामध्ये सर्च करतेवेळी ऑटो सेशनच फिचर चालू होणार नाही आणि मुलं सर्च करतेवेळी दुसरं काही पाहू शकणार नाहीत. मुलांचं लहान वय पाहता तुम्ही गुगल ऐवजी मुलांना सर्च इंजिनचा वापर करायला शिकवा. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये कोणतंही चुकीचं कन्टेन्ट नसतं.