* संध्या रायचौधरी

अनेक शोधांद्वारे हे सिद्ध झालंय की मोकळेपणाने हसल्याने केवळ व्यक्तीचं आरोग्यच स्वस्थ राहात नाही, तर ती व्यक्ती दीर्घायुषी होते. पण ही हसण्याची मुभा केवळ पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रियांनाही असायला हवी.

भारतीय समाजातील परंपरा आणि सामाजिक टीकेच्या नावाखाली महिलांना मनसोक्तपणे हसण्याची मनाई करणं यावरून लोकांची जुनाट विचारसरणीच दिसून येते. आणि ही मनाई घरातील वयोवृद्ध लोकच करत असतात.

नंदिता आणि तिच्या ३ मैत्रिणी काही गोष्टींवरून खोलीत मोठमोठ्याने हसत होत्या तेव्हा बाहेर तिच्या खोलीत बसलेल्या काकीला ते फार विचित्र वाटलं. मुलींना रागावत ती म्हणाली, ‘‘हे सभ्य मुलींचं लक्षण नाही. मी जेव्हा कॉलेजात शिकवायची, तेव्हा एखाद्या मुलीला असं हसताना पाहून अशी ओरडायची की ती हसणंच विसरून जायची.

हसणं निर्लज्जपणा नाही

स्वत:ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या काकींचे मुलींच्या हसण्याविषयीचे आपले व्यक्त केलेलं जुनाट विचार ऐकून खूपच विचित्र वाटलं. काकी रागाने म्हणाल्या की, आपल्या संस्कारात मुलींनी काही मर्यादा बाळगायला हव्यात. खी...खी... करून हसणं हे निर्लज्जपणाचं लक्षण आहे.

तर मग प्रश्न असा उद्भवतो की, मुलींना मुक्तपणे हसण्याचा अधिकार नाही का?

यामध्ये दुमत नाही की, समाजात दैनंदिन जीवनात मुली किंवा महिला मुक्तपणे हसत नाहीत. मोकळेपणाने हसण्याचं दृश्य एक तर आपण चित्रपटांतून पाहू शकतो किंवा मग जाहिरातीतून. आपल्या खऱ्या जीवनात त्या मोकळेपणाने कधीकधी तेव्हाच असतात, जेव्हा त्या केवळ आपल्या मैत्रिणी किंवा महिलांच्या घोळक्यात असतात आणि जिथे पुरुषांना मज्जाव असतो. ही आपली एक प्राचीन आणि गौरवशाली संस्कृती आहे. आपण संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. पहिलं ज्ञान तर आपण आपल्या मुलींनाच देतो की हे काय मुलांसारखं खिदळता आहात? मुलींना लहानपणापासूनच शिकवलं जातं की हळूहळू हसा. आतमध्ये जाऊन हसा. इतकं मोठ्यानेही हसू नका की तुमच्या हसण्याचा आवाज ऐकून लोक तुमच्याकडे मागे वळून पाहातील.

हसण्यावर बंधन कशाला

पण दुसरीकडे पुरुष कुठेही हसू शकतात. पूर्वी घराची बैठक त्यांच्या हसण्याखेळण्यासाठी असायची, ते हसायचे तेव्हा त्यांच्या हसण्याचा आवाज आतपर्यंत जायचा. पण जर आतमध्ये खोलीत जिथे महिला असायच्या तिथून बाहेर बैठकीपर्यंत त्यांच्या हसण्याचा आवाज आलेला पुरुषांना चालायचा नाही. म्हणूनच असं म्हणता येईल की, मुलींच्या हसण्यावर बंधनं घालणं हा संकुचित मानसिकतेचाच परिणाम आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...