* इंजी. आशा शर्मा

विनय डॉक्टर आहे आणि त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे सुरू आहे. पण सध्या तो एका वेगळयाच समस्येने त्रासाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने घर बांधण्यासाठी एका सरकारी वसाहतीतील भूखंड खरेदी केला होता. त्यावेळी तेथे फारशी वस्ती नव्हती. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह वडिलोपार्जित घरातच राहत होता. मात्र आता तेथे वस्ती होऊ लागल्याने त्यानेही तेथे घर बांधण्याचा निर्णय घेतला.

नकाशा बनविण्यासाठी विनय सिव्हिल इंजिनीअर म्हणजे स्थापत्य अभियंत्यासह तेथे गेला तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली घरे पाहून त्याची चीडचिड झाली. ती घरे अतिशय अल्प उत्पन्न गटातील लोकांची होती. विनय मनातल्या मनात स्वत:च्या आणि त्यांच्या राहणीमानाची तुलना करू लागला. अशी तुलना करणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते, पण मन काही केल्या मान्य करायला तयार नव्हते.

‘‘आजकाल शेजारीपाजारी जाऊन बसण्याइतका वेळ कोणाकडे आहे? ते त्यांचे कमावून खातील आणि आपण आपले. तुम्ही उगाचच त्रास करून घेत आहात,’’ पत्नीने समजावले.

‘‘ही जागा विकून दुसरी घेणे सोपे काम नाही. शिवाय तुझ्याकडे इतका वेळ कुठे आहे? उगाचच दलालांकडे फेऱ्या माराव्या लागतील. सुनेचे म्हणणे योग्य आहे. याच जागेवर घर बांध,’’ वडिलांनी असा सल्ला दिल्यानंतर विनय काहीशा नाराजीनेच घर बांधण्यासाठी तयार झाला.

घराचे बांधकाम सुरू करून काही दिवसच झाले होते. एके दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या घरांपैकी एका घरातील माणूस तेथे आला आणि म्हणाला, ‘‘बरे झाले, शेजारी एखादा डॉक्टर असेल तर रात्रीअपरात्री उपयोगी पडेल.’’

हे ऐकताच विनय पुन्हा नाराज झाला.

जसजसे घराचे काम पूर्ण होऊ लागले होते तसा विनयचा उत्साह कमी होऊ लागला होता. जेव्हा कधी तो त्याची चारचाकी गाडी तेथील एका झाडाखाली उभी करायचा तेव्हा कितीतरी मुले गाडीच्या अवतीभवती फिरत. काही गाडीला हात लावून बघत. एखादा खोडकर मुलगा आपल्या महागडया गाडीचे नुकसान तर करणार नाही ना, अशी भीती विनयला सतावत असे.

विनयचे मित्र, नातेवाईक जेव्हा त्याचे बांधकाम सुरू असलेले घर पाहाण्यासाठी येत तेव्हा त्याचा शेजार पाहून कुत्सितपणे हसत. काही जण तर ‘चिखलात उमलले कमळ’ अशी तुलना करून टोमणे मारत.

‘‘आपल्या मुलांनाही यांच्यासारख्या सवयी लागू नयेत, एवढीच अपेक्षा आहे,’’

असे एके दिवशी शेजारच्या मुलांना आपापसांत भांडण करताना पाहून पत्नीने काळजीच्या स्वरात म्हटले. हे ऐकून विनयचा उरलासुरला उत्साहही मावळला. त्याने त्याच दिवशी एका दलालाची भेट घेऊन त्याला घर विकायला सांगितले.

जेव्हा खासगी आयुष्यावर होते अतिक्रमण

सानियाची समस्याही काही छोटी नाही. जेव्हा ती पाश्चिमात्य पेहराव करून स्वत:ची चारचाकी गाडी घेऊन सोसायटीतून बाहेर पडते तेव्हा कितीतरी नजरा तिच्यावर खिळल्या जातात. तिच्यासोबत येणाऱ्या मित्रांची माहिती करून घेण्यासाठीही अनेक जण बरेच उत्सुक असतात. अनेकदा तर पार्टी सुरू असताना एखाद्या शेजाऱ्याचा मुलगा काहीतरी कारण सांगून तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे हे घर विकून दुसरे खरेदी करण्याचे प्रयत्न यशस्वी होत नसल्यामुळे आणि दुसरीकडे खासगी आयुष्यावर अशा प्रकारे शेजाऱ्यांचे अतिक्रमण होत असल्यामुळे तिची मनातल्या मनात घुसमट होत आहे.

काय असतात समस्या?

* शेजारी तुमच्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील माणसे राहत असतील तर त्यांना पाहून तुम्हाला भेटायला आलेले मित्र, नातेवाईक नाक मुरडतात. अनेकदा बोलण्याच्या ओघात टोमणेही मारतात.

* शेजारी अशीच मुले राहत असल्यामुळे तुमच्या मुलांनी त्यांच्यासोबत खेळणे आणि खेळताना भांडण होणे स्वाभाविक आहे. अशावेळी एकमेकांचे संस्कार, सवयी आदींचे मुलांकडून अगदी सहजपणे अनुकरण केले जाते.

* असमान राहणीमान असल्यामुळे उच्च उत्पन्न गटातील शेजाऱ्यांच्या घरी होणारी पार्टी, कार्यक्रम इत्यादी अल्प उत्पन्न गटातील शेजाऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरते. कुतूहलातून ते अशा कार्यक्रमांवेळी त्यांच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न करतात. असे वागणे त्यांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण करण्यासारखे ठरते.

* अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जेव्हा मुले आपल्या अन्य मित्रांसह शेजारी राहणाऱ्या मित्रांनाही आमंत्रण देतात तेव्हा विचित्र परिस्थिती निर्माण होते. दोन्हीही उत्पन्न गटांतील मुलांना एकमेकांसोबत मौजमजा करताना संकोचल्यासारखे होते..

कसे निभावून न्याल?

* येथे कोणालाही लहान किंवा मोठे दाखविण्याचा उद्देश अजिबात नाही, पण हे सत्य आहे की प्रत्येक उत्पन्न गटाचे स्वत:चे असे एक राहणीमान असते. त्यामुळे शेजाऱ्याला त्याची सीमारेषा माहीत असणे योग्य ठरते.

* शेजाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू किंवा पैशांचे पाकीट त्यांच्या समोरच उघडून पाहू नका. यामुळे त्यांना संकोचल्यासारखे वाटेल. शिवाय असे चुकीचे न वागण्यातच तुमच्या मनाचा मोठेपणा दिसून येईल.

* मुले शेजारच्या मुलांसोबत खेळत असतील तर त्यांना रोखू नका. वेळेनुसार  मुले त्यांच्याप्रमाणेच मित्रांची योग्य निवड करतात.

उत्पन्न गटानुसार राहणीमानातील असमानता केवळ शेजारीपाजरीच नव्हे तर कुटुंबातही पाहायला मिळते. हे शाश्वत सत्य आहे की, अशा प्रकारची असमानता समाजाचा एक भाग आहे आणि त्याचा स्वीकार करण्यातच शहाणपण आहे. ज्या प्रकारे कौटुंबिक नाती निभावताना गरजेनुसार कधीतरी झुकावेही लागते त्याच प्रकारचा समजूतदारपणा शेजारीपाजारी वावरतानाही दाखवायला हवा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...