* निलू चोपडा

अनेकदा महिलांना लग्नानंतर स्वत:चं व्यक्तिमत्व, स्वभाव यांना पूर्णपणे बदलावं लागतं. स्त्रीला स्वत:ची अशी ओळखच नाहीए, अशीच समाजात धारणा आहे. लग्नानंतर तर अगदी प्रेमाने तिचं सामाजिक, मानसिक स्वातंत्र्य काढून घेतलं जातं. आणि तिचं स्वातंत्र्य हिसकावून घेणारे हे तिचे स्वत:चेच  आईवडील, सासूसासरे आणि तिचा पती नावाचा प्राणी असतो.

पाठवणीच्या वेळी आईबाबा मुलीला अगदी हुंदके देत समजावतात की मुली हा आता तुझा दुसरा जन्म आहे. सासूसासरे आणि पती यांचं म्हणणं ऐकणं तुझं पहिलं कर्तव्य आहे.

सासरी तर सासूसासरे आणि पती कधी स्पष्टपणे तर कधी आडून सासरच्या चालीरीतीनुसार चालण्याची ताकीद देतात. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय समाजाची हिच तर मोठी समस्या आहे.

पत्नी बुद्धिमान आणि एखाद्या कलेत पारंगत असेल तर सासरची आणि संकुचित मानसिकता असणारा पती तिच्या कलेला मूठमाती देऊन टाकतात. नृत्य पारंगत वा गायन क्षेत्र असेल तर सरळसरळ सांगून टाकलं जातं की इथे हे काही चालणार नाही. कुटुंबाच्या मानमर्यादा यांचे दाखले दिले जातात.

अनेक घरात तर सुनांना नोकरी करण्यासदेखील मनाई केली जाते. मग घरात कितीही तंगी असली तरी चालेल. मात्र घराचा आर्थिक डोलारा घसरु लागताच तिला नोकरी करण्याची मुभा दिली जाते तीदेखील कार्यालयात कोणत्याही पुरुषाशी बोलायचं नाही आणि सगळा पगार पती वा सासूबाईच्या हाती द्यायचा ही खास अट ठेऊनच.

कळसूत्री बाहुलीचं आयुष्य

सुनंदा राष्ट्रीय स्तरावरची टेनिस खेळाडू होती. घरात सगळयांची लाडकी. आयुष्याचा मनमुराद आनंद कसा घ्यायचा हे तिच्याकडून शिकावं. मात्र आयुष्याच्या स्पर्धेत मात्र मागे पडली. वरवरचा सरंजाम पाहून एका अनोळखी ठिकाणी लग्न जमवलं गेलं. पती व सासरे दोघेही उच्चपदस्थ होते. मात्र लग्नाच्या महिनाभरातच कळसूत्री बाहुलीसारखं आयुष्य तिला नाईलाजाने जगावं लागलं. काय घालायचं, कुठे जायचं, किती बोलायचं हे सर्व पती आणि सासरची मंडळी ठरवत होती.

तिच्या वाहिनीने स्वत:चा मोबाईल तिला देऊन ठेवला होता. संधी मिळताच सुनंदाने तिला स्वत:ची व्यथा सांगितली तेव्हा तिच्या वाहिनीला आश्चर्य वाटलं. मात्र जर हे घरी सांगितलं तर सासरची माणसं तिच्या भावाला आणि वडिलांना त्रास देतील या भीतीने ती गप्प राहत होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...