* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात. परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.

जसे मला आपले आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :

जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...