* डॉक्टर सुदीप जैन, एमएस एमसीएच (एम्स), डायरेक्टर, स्पाईन सोल्युशन्स इंडिया, नवी दिल्ली
प्रश्न : मी ४५ वर्षीय नोकरदार स्त्री आहे. गेल्या काही दिवसापासून कमरेत वेदना होत आहेत. तपासणी केल्यावर बल्जिंग डिस्क असल्याचं समजलं. यापासून कशी सुटका मिळेल?
उत्तर : बल्जिंग डिक्सच्या उपचारात फिजीओथेरेपी खूप महत्त्वाची आहे. जर यापासून आराम मिळत नसेल तर उपचार आवश्यक होतात. बल्जिंग डिक्समध्ये वर आलेल्या भागाला एंडोस्कोपिंग तंत्रज्ञानाद्वारे काढलं जातं. हे एक मिनीमली इन्वेसिव्ह प्रोसिजर असतं, ज्याला लोकल अॅनेस्थेशिया देऊन केलं जातं. यामध्ये इस्पितळात भरती होण्याची वा बेडरेस्ट करण्याची गरज नसते. काही दिवसातच तुम्ही पूर्णपणे तुमची सामान्य दिनचर्या सुरु करू शकता.
प्रश्न : माझ्या पतींचे एक्सीडेंट झालं होतं. त्यानंतर त्यांना स्लिप डिस्कची समस्या निर्माण झाली. मला जाणून घ्यायचयं की सर्जरी व्यतिरिक्त असे आणखीण कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
उत्तर : स्लिप डिस्कचा उपचार यावर निर्भर अवलंबून असतो की समस्या कोणत्या प्रकारची आहे आणि डिक्समध्ये किती खराबी आली आहे. औषध आणि फिजिओथेरेपीने बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की स्लिप डिस्कच्या ९० टक्के प्रकरणांमध्ये ऑपरेशनची गरज नसते, परंतु १० टक्के प्रकरणांमध्ये सर्जरी करणं गरजेचं होऊन जातं.
प्रश्न : मी ४६ वर्षीय प्राध्यापिका आहे. मला कोविड-१९ मुळे ऑनलाइन क्लासेस आणि झुम मीटिंगसाठी सतत गॅझेट्स वापरामुळे माझ्या कमरेच्या खालच्या भागांमध्ये वेदना होऊ लागल्या आहेत. कधी कधी वेदना सहन करण्या पलीकडे असतात. काय करू?
उत्तर : कोविड-१९ च्या दरम्यान गॅझेट्सच्या अत्याधिक वापरामुळे अनेक लोकांना स्पाईनशी संबंधित समस्या निर्माण झाल्यात. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या अधिक गंभीर होईल. तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवा. फिजिओथेरेपी आणि पेन किलरच्या मदतीने ८० टक्के लोकांना आराम मिळतो. ज्यांची समस्या अधिक गंभीर आहे त्यांच्यासाठी एमआरआय, एक्स-रे आणि इतर तपासण्या केल्या जातात. तपासणी केल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमची समस्या किती गंभीर आहे आणि ती कशी ठीक केली जाऊ शकते.