* डॉ. यतीश अग्रवाल
प्रश्न : मी ५३ वर्षांची आहे. बँकेत ऑफिसर आहे. माझ्यावर कामाचा खूप ताण असतो. कदाचित म्हणूनच माझं ब्लडप्रेशर वाढत आहे. माझ्या लक्षात येतयं की गेल्या २-३ वर्षांपासून हिवाळ्यात जास्त वाढतं. घरी मुलं व नवरा माझी थट्टा करतात की असं काही वसंत ऋतुप्रमाणे ब्लडप्रेशर कमी जास्त होत नाही. पण मला भुक लागली की खायची सवय आहे. कृपया मला सांगा की हिवाळ्याचा ब्लडप्रेशर वाढण्यासाठी काही संबंध आहे का? जर असेल तर ते सामान्य ठेवण्यासाठी काय उपाय करावे जेणेकरून माझं आरोग्य मला सुहृढ राखता येईल.
उत्तर : नक्कीच हिवाळ्यात काहीचं ब्लडप्रेशर वाढू शकतं. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कित्येकाचं ब्लडप्रेशर ६-७ ते १० अंकांनी वाढत असतं असं वैद्यकीय संशोधनात (क्लिनिकल संशोधनात) आढळलं आहे. जर ब्लडप्रेशर वाढून १४० अंक सिस्टॉलिक व ९० अंक डायस्टॉविकच्यावर गेलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी.
ब्लडप्रेशर वाढणं हे तब्येतीला हानिकारक आहे. शरीरातील नसांवर अतिरिक्त दबाव पडल्याने हृदय, किडणी, मेंदू व डोळ्यांचा पडदा यावर हळूहळू परीणाम होऊ शकतो.
ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपयुक्त औषधांशिवाय जीवनशैलीत बदल करायची गरज आहे. समतोल आहारत मीठाचा कमी वापर, नियमित व्यायाम व वजनावर नियंत्रण असायला हवं.
जर सकाळी उठल्यावर डोक्याचा मागचा भाग जड वाटत असेल तर ब्लडप्रेशर जास्त आहे असे मानावे व लगेच ब्लडप्रेशर मोजून घ्या. वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी जर तुम्हाला औषधाचा डोस वाढवून दिला तर त्यात चालढकल करू नका. उलट लगेच सुरू करा. कधीकधी एखादं छोटंसं जास्तीचं औषध घ्यावं लागतं.
हिवाळ्यात काही लोकांचं ब्लडप्रेशर वाढतं कारण ते जेवणात अधिक मीठ वापरतात. त्यामुळे दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
ताजी फळं, पालेभाज्या भरपूर खा. शुद्ध दुधाऐवजी स्प्रेटा दुध प्या. जेवणात सॅचुरेटेड फॅट्स कमी करा.