झंप्पीचे ७ फायदे

* गरिमा

सुंदरशा  झंप्पीत नाती बदलण्याची क्षमता असते. ही गोष्ट वेगळी आहे की या मागे एखादे कटकारस्थान अथवा राजकारण नसावे. बऱ्याच काळापूर्वी राहुल गांधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची झंप्पी खूप चर्चेत होती. संसदेच्या मान्सून सत्रात अविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधी यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना जादूची झंप्पी दिली. राहुलने भाषणानंतर अचानक मोदींच्या आसनाजवळ जात त्याची गळाभेट घेतली. हे वेगळे की या घटनेचे नंतर राजकारण होऊ लागले.

दोन्ही नेत्याच्या या झंप्पीने २०१३ मधील एका पार्टीत शाहरुख आणि सलमान यांच्या झंप्पीची आठवण करून दिली. या झंप्पीने चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि सर्वांना आवडणारा सलमान खान यांच्यातील ५ वर्षापूर्वीचा कडवटपणा नाहीसा केला होता.

तुम्ही जेव्हा एखाद्याची गळाभेट घेता, तेव्हा समोरच्याला आपुलकी आणि कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचा संदेश देत असता. तुम्ही दोघे या एकमेकांच्या जवळ आले आहात असे तुम्हाला जाणवते. यामुळे नाते तर दृढ होतेच शिवाय इतर अनेक प्रकारचे फायदेही असतात.

फक्त मिठी मारणे किंवा गळाभेट घेणे हे पुरेसे नाही. अमेरिकेत अनोळखी लोकांना भेटल्यावरही हसून ‘तुम्ही कसे आहात’ असे विचारण्यात येते. अशा लहानसहान गोष्टींमधून चागली भावना निर्माण होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरते. आजच्या जगात प्रत्येक माणूस व्यस्त आणि त्रासलेला आहे. पण अशा लहानसहान प्रयत्नांनी थोडसा दिलासा मिळतो.

या, जाणून घेऊ की शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी गळाभेट घेणे किती आवश्यक आहे :

ताण कमी होतो : जेव्हा एखादा मित्र वा परिवारातील सदस्य एखाद्या दु:खातून जात असेल तर त्याला मिठी मारा. अशाप्रकारे एखाद्याचा स्पर्श करत धीर देण्याने त्या व्यक्तीवर असलेला ताण कमी होतो.

आजारांपासून सुरक्षित राहणे : ४० वयाने  मोठे असलेल्या माणसांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये संशोधकांना असे आढळले की अशा व्यक्ती ज्यांना उत्तम सपोर्ट सिस्टीम होती ते कमी आजारी पडले. एवढेच नाही अशा व्यक्ती आजारी पडल्या तरीही त्यांना कमी त्रास झाला.

हृदयाचा निरोगीपणा : गळाभेट घेणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगले असते. एका अभ्यासात संशोधकांनी २०० माणसांच्या एका समूहाला दोन भागात विभाजित केले. पहिल्या समूहात रोमँटीक जोडीदार होते, ज्यांनी आधी १० मिनिटे एकमेकांचे हात धरले आणि नंतर २० सेकंद बसून राहिले. असे आढळले की पहिल्या समूहातील लोकांच्या रक्तदाबाची पातळी आणि हार्ट रेट दुसऱ्या समूहापेक्षा जास्त कमी आढळले. एक उत्तम नाते तुमच्या निरोगी आरोग्यासाठीसुद्धा आवश्यक आहे.

भीती कमी होणे : वैज्ञानिकांना असे आढळले की एखाद्या आपल्या माणसाचा प्रेमाच्या स्पर्शची जाणीव कमी मानसिक बळ असणाऱ्या व्यक्तींच्या मनात चिंता आणि भीतीची भावना कमी करते. वयस्कर माणसंच नाही, एखाद्या मूल मानवा टेडीबेअरसारख्या वस्तूचीसुद्धा गळाभेट खूपच प्रभावशाली असते.

संवादाचे माध्यम : बहुतांश संवाद अथवा संभाषण करून किंवा चेहऱ्यावरील हावभावाने व्यक्त होतात. पण गळाभेट घेणे संवाद साधण्याचा असा एक मार्ग आहे जो प्रत्येक व्यक्तीला कळतो. या कृतीमुळे आपण समोरच्या व्यक्तीला अशी जाणीव करून देतो की तो एकटा नाही आहे, आपण त्याच्या पाठीशी आहोत.

आत्मसन्मान वाढवतो : लहानपणी आईवडिलांचे आपल्याला कुशीत घेणे आपल्या हेच सांगायचे की आपण त्यांच्यासाठी किती महत्वाचे आणि आवडते आहोत. अशा प्रकारे जेव्हा मित्र आणि नातेवाईक किंवा जोडीदार गळाभेट घेतो तेव्हासुद्धा आपल्या मनाला दिलासा मिळतो. आपल्याला आपण म्हत्वाचे असल्याची जाणीव होते. आपला आत्मविश्वास वाढतो.

चांगल्या प्रकारे जगण्यासाठी दिवसातून कमीतकमी ४ वेळा तरी मिठी मारणे आवश्यक असते. चांगल्या वाढीसाठी दिवसभरातून १२ वेळा मिठी मारणे गरजेचे आहे. भारतातील मोठया शहरांमध्ये आणि इतर मोठया देशांमध्ये जसे अमेरिका वगैरेमध्ये लोकांना या जाणिवेपासून वंचित राहावे लागते. ते व्यस्त आयुष्य जगत असतात. वेगळे आणि एकटे राहतात, जेव्हा की जितके आपण इतरांची गळाभेट घेणे शिकू तितकाच आपल्या जास्त आनंद आणि आरोग्य प्राप्त होईल.

हे स्वयंपाकघर अतिशय सुविधायुक्त आहे

* पारुल भटनागर

प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की तिच्या घराचे स्वयंपाकघर तिच्या इच्छेनुसार पद्धतशीरपणे बनविले जावे. यासाठी मॉड्यूलर किंवा स्टायलिश किचनपेक्षा काहीही चांगले नाही, कारण यामुळे स्वयंपाकघर आकर्षक आणि स्टायलिश दिसते आणि तसेच ते अशा प्रकारे डिझाइन केले जाते की भले जागा कमी असो की जास्त गोष्टी सहज ठेवता येतात.

मॉड्यूलर किचनची विशेष गोष्ट म्हणजे ते सोयीस्कर आहे. जेव्हा तुम्ही हात पुढे करताच साहित्य आणि भांडी उपलब्ध होतात तेव्हा स्वयंपाक करणे किती मजेदार असेल याची कल्पना करा. अन्यथा सहसा असे घडते की मसाल्याच्या डब्यामध्ये तोच डबा तळाशी असतो ज्याची तातडीने गरज असते आणि त्याच वेळी पॅनमध्ये शिजत असलेल्या भाज्या तो डबा मिळविण्याच्या गडबडीत जळून जातात.

चला, मॉड्यूलर किचनच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया :

भांडी ठेवण्याची पद्धत बदलली

पूर्वी स्वयंपाकघराची रचना अत्यंत सोप्या पद्धतीने करण्यात येत असे, ज्यात भांडी ठेवण्यासाठी स्टीलचे रॅक लावण्यात येत असत, जे चांगले दिसत नव्हते आणि परत सामानही समोरच दिसून येत असे, पण आता स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मखाली भांडयांच्या आकारानुसार, त्यांच्या वापरानुसार सोयीस्कर रॅक बनवले जातात. वेगवेगळया प्रकारच्या भांडीसाठी त्यांच्यानुसार जागा असते. या रॅकची फिनिशिंग इतकी अप्रतिम असते की प्रत्येक पाहुण्यांसमोर त्यांना प्रदर्शित करावेसे वाटते.

अधिक कामाची जागा

मॉड्यूलर किचनमध्ये जास्त जागा मिळाल्यानंतर कामाची जागाही चांगली असते. यामध्ये बाटली रॅक, प्लेट होल्डर, कटलरी कंपार्टमेंट, गारबेज होल्डर इत्यादी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र जागा असते, ज्यामुळे वस्तू इकडे-तिकडे विखुरल्या जात नाहीत आणि वेळेवर सापडतात.

आजकाल गृहिणींनी इंटरनेट आणि मासिकांद्वारे फ्यूजन, भाजलेल्या आणि तळलेल्या पाककृती बनवण्याचे नव-नवीन मार्ग शिकण्या-वाचण्यास सुरुवात केली आहे. नवीन पाककृती बनवण्यासाठी स्वयंपाकघरात नवीन उपकरणे ठेवण्याचा ट्रेंडही वाढत आहे.

कुकटॉपने पाककला शैली बदलली

ज्याप्रमाणे पुरुष कार्यालयामध्ये आपले वर्क स्टेशन सोयीस्कर आणि आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नात असतात, त्याचप्रमाणे गृहिणी तिच्या कामाचे स्थान म्हणजेच स्वयंपाकघरदेखील आधुनिक बनवू इच्छिते. आजकाल मल्टीबर्नर कुकटॉप खूप ट्रेंडमध्ये आहेत. यांची कोटिंग इतकी अप्रतिम असते की एकदा साफ केल्यानेही ती चमकते. पारंपारिक स्टीलच्या कुकटॉपवर स्वयंपाक केल्यानंतर ते स्वच्छ करणेदेखील गृहिणीसाठी कुठल्या कामापेक्षा कमी नसते.

देखरेख करणे सोपे

एक स्टाइलिश स्वयंपाकघर दिसण्यास तर चांगले वाटतेच शिवाय ते देखरेख करणे देखील खूप सोपे आहे, कारण हलकी कॅबिनेट आणि काउंटर अतिशय गुळगुळीत असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचत नाही.

आकार आणि रंग पर्यायदेखील भरपूर. बऱ्याचदा जेव्हापण आपण मॉड्युलर किचन बनवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की त्याचा आराखडा आपल्या किचनला शोभेल की नाही. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे विशेषत: लहान स्वयंपाकघर लक्षात घेऊनच डिझाइन केले जाते. यामध्ये स्वयंपाकघरात उंच युनिट, कॅबिनेट, ड्रॉवर इत्यादी बनवले जातात, ज्यात सामान सहज सेट होते. ते विखुरलेले राहत नाही.

तसेच यात अनेक रंग पर्याय आणि डिझाईन्सदेखील असतात, जसे की साधे आणि रंगीबेरंगी किंवा अगदी प्रिंट्सचेदेखील असतात आणि जर तुम्हाला याच्या बाह्य पृष्ठभागावर मॅट किंवा चमकदार स्पर्श हवा असेल तर तोदेखील तुमच्या आवडीवरच अवलंबून आहे.

पतीचे कार्यालयात आणि मुलांचे शाळेत जाण्यापूर्वी आणि नंतर गृहिणी तिचा बहुतेक वेळ स्वयंपाकघरात घालवते. अशा परिस्थितीत या जागेला म्हणजे आपल्या कार्य केंद्राला आधुनिक आणि सोयीस्कर अवश्य बनवा.

निसर्गाच्या नियमांवर धार्मिक रंग कसे आले

* नसीम अंसारी कोचर

आपण कधी पाहिले आहे काय की मुंग्यानी त्यांच्या आवडत्या देवांची मंदिरे बांधली? मुर्ती बनवली आणि पूजा केली, किंवा मशिदी बांधल्या आणि प्रार्थना केल्या? मुंग्या आणि वाळविंच्या वारुळामध्ये, मधमाश्यांच्या पोळयामध्ये एखादी खोली देवासाठीही असते का? आपण कधीही माकडांना उपवास करतांना किंवा उत्सव साजरे करतांना पाहिले आहे काय? अंडी घालण्यासाठी पक्षी किती कार्यक्षमतेने आणि स्वेच्छेने सुंदर-सुंदर घरटे बनवतात, परंतु या घरटयांमध्ये ते देवासारख्या कोणत्याही गोष्टीसाठी उपासनास्थान बनवत नाहीत? देवासारख्या गोष्टीचे भय मानवाशिवाय पृथ्वीवर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला नाही. देवाची भीती हजारो वर्षांपासून मानवजातीच्या मनात सतत भरवली जात आहे.

या पृथ्वीवर जवळपास ८७ लाख प्राण्यांच्या वेगवेगळया जाती आहेत, या लक्ष्यावधी प्राण्यांपैकी एक मनुष्यदेखील आहे. हे लक्ष्यावधी जीव एकमेकांपेक्षा भिन्न आकाराचे-वर्तुणूकीचे आहेत, परंतु त्यांच्यात एक गोष्ट समान आहे की त्या प्रत्येकामध्ये दोन जाती आहेत, एक नर आणि एक मादी. निसर्गाने या दोन जातींना समान कार्य दिले आहे की ते एकमेकांवर प्रेम आणि सहवासाद्वारे त्यांच्या प्रजातीला पुढे वाढवत राहावेत आणि पृथ्वीवर जीवन चालवत राहावेत.

जीवशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर आढळणाऱ्या लक्ष्यावधी प्राण्यांचे जीवनचक्र जाणून घेण्यासाठी बरेच शोध, संशोधन आणि प्रयोग केले आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला त्याच्या संशोधनात असे आढळले नाही की मानव वगळता या पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्याने देवासारख्या शक्तीवर विश्वास ठेवला असेल.

देवाच्या सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, त्याच्या नावावर धर्मांची स्थापना केली गेली. धर्माच्या नावाखाली मंदिरे, मशिदी, शिवालय, गुरुद्वार, चर्च बनवले गेलेत. यांमध्ये पूजा, भक्ती, नमाज, प्रार्थना यासारख्या गोष्टी सुरू झाल्या. या गोष्टी करण्यासाठी महंत, पुजारी, मौलवी, पाद्री, पोप यांना येथे बसवले गेले आणि त्यानंतर हेच लोक धर्म आणि ईश्वराची भीती दाखवून संपूर्ण मानवजातीला आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागले. अल्ला म्हणतो की पाच वेळा नमाज वाचा नाहीतर तुम्ही नरकात जाल. देव म्हणतो की दररोज सकाळी स्नान करून उपासना करा अन्यथा नरक प्राप्त होईल, यासारख्या हजारो तर्कविहीन गोष्टी मानवी जगात पसरवल्या गेल्या. हिंसाचाराद्वारे त्यांची भीती मनात भरवली गेली. स्वयंघोषित धर्माचे कंत्राटदार एवढे शक्तिशाली झाले आहेत की त्यांना हे प्रश्न कोणी विचारण्याची हिंमतच केली नाही की देव कधी आला? तो कसा आला? कुठून आला? तो कसा दिसतो? सर्व गोष्टी फक्त तुम्हालाच का सांगून गेला, सर्वांसमोर येऊन का सांगितल्या नाहीत?

मानवजातीने स्वत:घोषित धार्मिक आचार्यांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला, त्यांनी जसे सांगितले तसे केले. धर्माचार्यांनी अनेक नियम तयार केले. असे जगा, असे जगू नका, हे खा, ते खाऊ नका, असे कपडे परिधान करा, असे कपडे घालू नका, येथे जा, तेथे जाऊ नका, याच्याशी प्रेम करा, त्याच्याशी करू नका, हा आपला आहे, तो परका आहे, आपल्या माणसावर प्रेम करा, इतरांचा द्वेष करा. धार्मिक आचार्यांनी मानवजातीला या पृथ्वीवर भयंकर युद्धात झाकले आहे यात शंका नाही. कोणत्याही धर्माची मुळे शोधा, त्या धर्माचा उदय लढाईतूनच झाला आहे, हजारो वर्षांपासून धर्माच्या नावाखाली भयंकर लढाई चालू आहे. आजही पृथ्वीच्या वेगवेगळया भागात अशा लढाया चालू आहेत. यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू हे हजारो वर्षापासून धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली लढवले जात आहेत.

आपण या पृथ्वीवर असणाऱ्या इतर कोणत्याही सजीव प्राण्याला धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली भांडतांना पाहिले आहे का? ते भांडत नाहीत, कारण हे दोन शब्द (देव आणि धर्म) त्यांच्यासाठी अस्तित्त्वात नाहीत, ते निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमांवर आनंदाने, प्रेमळपणे, आयुष्य पुढे सरकवत जगत आहेत.

पुरुषापेक्षा शारीरिक दृष्टया दुर्बल असलेल्या स्त्रीवर धर्माने सर्वात जास्त अत्याचार आणि दडपशाही केली आहे. जर तिने तिच्यावर लादलेले नियम पाळण्यास नकार दिला तर तिच्या नवऱ्याला तिचा छळ करण्यास उद्युक्त केले गेले. त्याला सांगण्यात आले की हे तुझ्या बायकोकडून करवून घे नाहीतर देव तुला शिक्षा करेल. तू नरकात जाशील. आणि पुरुष त्याच्या प्रियशीचा छळ करू लागला. त्या महिलेवर अत्याचार करू लागला, जी त्याच्या मदतीने या पृथ्वीवर मानवी जीवनाची उन्नती करण्याची जबाबदारी निभावते.

वेश्याव्यवसाय ही धर्माची देणगी आहे

निसर्गाने पुरुष आणि स्त्रीला हे स्वातंत्र्य दिले होते की तरुण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार जोडीदाराची निवड करावी, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत आणि सृष्टीच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. धर्माने मानवजातीला वेगवेगळया मंडळात बांधले. हिंदू मंडळ, मुस्लिम मंडळ, ख्रिश्चन मंडळ, पारशी, जैन इत्यादी. या मंडळामध्येही अनेक मंडळ तयार केली गेली आहेत. माणूस विभक्त होत गेला.

प्रत्येक परिघावर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्माचार्यांनी वीरांची किंवा राजांची निवड केली आणि त्यांना सर्व अधिकारांनी सुसज्ज केले. या अधिकारांपैकी एक म्हणजे स्त्रीचा आनंद लुटणे, धार्मिक लोकांनी लैंगिक समानतेचा नैसर्गिक कायदा नाकारला आणि पुरुषाला स्त्रीच्या वरचा दर्जा दिला.

धर्माचार्यानी राजांना आणि वीरांना समजावून सांगितले की स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे. रंगमहालामध्ये, अंत:पुरामध्ये या उपभोगाच्या वस्तू जबरदस्तीने गोळा केल्या जाऊ लागल्या. एक-एक राजाजवळ शेकडो राण्या होऊ लागल्या. नवाबांच्या अंत:पुरामध्ये सेविका जमू लागल्या. या बहाण्याने धर्माचार्यांनी त्यांच्या भोगविलासाचे सामानदेखील गोळा केले.

देवदासी प्रथा सुरू झाली. स्त्री नगरवधू बनली. इच्छा नसताना सर्वांसमोर नाचवली जाऊ लागली. प्रत्येकाने तिचा जबरदस्तीने उपभोग केला. देवदासींचा छळ एक प्रथा बनली. कालांतराने महिला कलावंतीण, वेश्या म्हणून वाडयां/खोल्यांमध्ये डांबली गेली आणि आता हॉटेलमध्ये वेश्या किंवा बार नर्तकीच्या रूपात दिसते. महिलेच्या या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? फक्त धर्म.

विधवापण ही धर्माची देणगी आहे

पुरुष जोडीदाराच्या मृत्यूनंतर धर्मगुरूंनी धर्म आणि देवाची भीती दाखवून महिलेला दुसरा जोडीदार निवडण्यास बंदी घातली. पुरुष कोणत्याही कारणास्तव मरण पावला असेल, यासाठी महिलेला दोषी ठरविण्यात आले. तिला शिक्षा देण्यात आली. तिच्याकडून कपडे हिसकावले गेले. केस काढून टाकले गेले. शृंगारावर बंदी घालण्यात आली.

तिला तुरूंगाप्रमाणे तिच्याच घरात राहायला भाग पाडले गेले. तिला उघडया जमिनीवर झोपायला विवश केलं. ज्याने इच्छा केली तिच्यावर बलात्कार केला. तिला नीरस-कोरडे अन्न दिले गेले. स्त्रीच्या इच्छेविरूद्ध ही सर्व हिंसक कृत्ये धर्मगुरुंनी देवाची भीती दाखवून पुरुष समाजाकडून करवून घेतली. विधवेला वेश्या बनविण्यातही ते मागे राहिले नाहीत.

या पृथ्वीवरील कोणत्याही इतर प्राण्याच्या जीवनात असे होतांना पाहिले गेले आहे काय? काही कारणास्तव नराच्या मृत्यूनंतर, मादी इतर नराबरोबर प्रेमक्रीडा करत सृष्टीच्या नियमाला गतिशील ठेवते. मादीच्या मृत्यूनंतर पुरुषही असेच करतो. त्रास देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तेथे फक्त प्रेम असते.

सती आणि जौहर प्रथा धर्माच्या देणगी आहेत

धर्माचार्यांनी सर्वप्रथम त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी लढाया करविल्या. त्यात लाखो माणसे मारली गेली. लूटमार झाली, विजयी राजे आणि त्यांच्या सैन्याने हरवलेल्या राजांच्या आणि त्यांच्या कुळातील स्त्रियांवर अत्याचार केले. सैनिकांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. त्यांना ठार मारले, त्यांना दासी बनवून नेले. धर्माचार्यांनी या कृत्याचे कौतुक केले. यास योग्य कृत्य म्हणून सांगितले. या कृत्यावर कोणत्याही धर्माचार्यांनी कधी बोट ठेवले नाही. छळ, शोषण, अत्याचार आणि कैदी बनविणे जाण्याच्या भीतीने महिलांनी आपल्या राजाच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी सती व जौहरचा मार्ग स्वीकारला. धर्माचार्यांनी या कृतीलाही योग्य ठरविले. महिलांनी आपल्या पुरुष सैनिकांच्या प्रेतांबरोबर स्वत:ला जाळून संपवण्यास सुरूवात केली. एकत्रितपणे गोळा होऊन आगीत उडी मारून जौहर करु लागली.

जरा विचार करा की त्यांनी किती त्रास सहन केला असेल. जर आपले बोट जळले, फोड आले तर ते खूप दुखवते आणि त्या संपूर्ण शरीरासह अग्नीत जळत राहिल्या, कोणत्याही धर्माचार्याला त्यांची वेदना जाणवत नव्हती, ही त्या काळातील सर्वात पवित्र धार्मिक कृती असल्याचे म्हटले जाते.

बालविवाहदेखील धर्माचीच देणगी

धर्माच्या कंत्राटदारांनी आपापल्या धर्मांची व्याप्ती निश्चित केली आणि त्यांनी स्त्री-पुरुषांच्या इच्छा-अनिच्छेला नियंत्रित केले. पुरुष आणि स्त्रियांनी त्यांचा धर्म सोडून इतरांच्या धर्मात प्रवेश करू नये. इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपला जोडीदार बनवू नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालविवाह प्रथा सुरू केली गेली. नवजात बालकांचेदेखील विवाहसोहळे सुरू केले गेले जेणेकरुन तरुण झाल्यानंतर, ते त्यांच्या पसंतीनुसार किंवा आवडीनुसार त्यांच्या प्रेमाचे जोडीदार निवडू नयेत.

बुरखा प्रथेच्या मुळाशी धर्म

आपण कधीही एखाद्या सिंहिनीला तिचा चेहरा लपवत फिरत असल्याचे पाहिले आहे किंवा मादी कबुतराला बुरखा ओढलेले पाहिले आहे? जर निसर्गाचा असा हेतू असता की स्त्री जातीने आपले तोंड पुरुषापासून लपवावे तर त्याने सर्व प्राण्यांसाठी काही ना काही व्यवस्था केली असती. भले पानांचा पदर राहिला असता, पंखांचा मुखवटा राहिला असता तरी मादी पक्षीने त्यातून आपले तोंड लपवले असते. परंतु हे कोठेही दिसत नाही. असे केवळ मानवी जगातच दिसून येते की स्त्री बुरखा घालण्यास विवश आहे. तोंड आणि शरीर लपविण्यासाठी तिला भाग पाडले जाते, का? कारण धर्माचार्यांनी असे म्हटले आहे की जर स्त्रीने पुरुषापासून बुरखा केला नाही तर हे पाप आहे, ती नरकात जाईल.

नुकतीच भारताचे क्रेंद्रशासित राज्य अंदमान येथे एक घटना घडली. अंदमानच्या सेंटिनेल बेटात ६० हजार वर्ष जुनी एक प्राचीन आदिवासी जमात राहते. निसर्गाच्या नियमांचे पालन करत तेथील स्त्री-पुरुष आजही या पृथ्वीच्या इतर प्राण्यांसारखेच जीवन जगतात. तेथे धर्म, देव, धार्मिक कट्टरता, कपडे, दागदागिने यासारख्या गोष्टींसाठी स्थान नाही. तेथे स्त्री-पुरुष एकसारखेच कपडयांविना जंगलात फिरत असतात. शिकार करून त्यांना त्यांचे भोजन मिळते आणि मोकळेपणाने सहवास करून ते आपले आयुष्य जगतात.

तेथे पुरुष आणि स्त्रिया समान आहेत. तेथे कोणीही मोठे किंवा लहान नाही. या बेटावर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी आहे. पण ख्रिस्ती धर्माच्या एका अनुयायाने त्यांच्या आयुष्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हेतू हा होता की त्यांच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार करणे. आपल्या तर्कहीन गोष्टींमध्ये अडकवून देवाचा आणि धर्माचा धाक त्यांच्यात बसवू शकेल.

त्याने फुटबॉल, मेडिकल किट इत्यादी वस्तूदेखील आपल्याबरोबर त्यांना मोहात पाडण्यासाठी नेल्या, जसे ख्रिस्ती मिशनरी सहसा आपला धर्म पसरवण्यासाठी करतात. जॉन एलन चाऊ नावाच्या या अमेरिकन नागरिकाने या बेटावर पोहोचून आदिवासींशी संपर्क साधला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आदिवासींना त्याचा घृणास्पद हेतू कळला. जॉन एलन चाऊ घेरला गेला आणि त्यांच्या बाणांनी घायाळ झाला.

या एका घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की ज्यांना निसर्गाचे नियम समजतात ते आजही ते नियम बदलू इच्छित नाहीत, परंतु धर्म आणि देव यासारख्या तर्कविहीन गोष्टी निर्माण करणारे निसर्गाचे नियम पायदळी तुडवून चुकले आहेत, त्यांचे मूळ रूप एवढे खालावले आहे की पुन्हा त्यात सुधार होण्यासाठी एखाद्या प्रलयाचीच प्रतीक्षा करावी लागेल. मानवांमध्ये बुद्धिमत्तेचा विकास हा पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे, परंतु विध्वंसक कार्यात याचा अधिक उपयोग केला गेला आहे. याउलट, जर आपण स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या संदर्भात निसर्गाचे नियम अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे परिणाम बरेच चांगले राहीले असते.

मातृत्व किंवा करिअर

* पारुल भटनागर

शुभ्राला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला कारण की ती गर्भवती होती आणि डॉक्टरांनीही तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. असं असलं तरी, काही कंपन्यांना गर्भवती महिलांना नोकरीवर ठेवण्यास आवडत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, यापुढे त्या नोकरीकडे पूर्ण लक्ष देण्यास सक्षम राहणार नाहीत, तथापि त्यांना आपल्या घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे माहित असते. तरीही त्यांचे कौटुंबिक नियोजन हे त्यांच्या कारकीर्दीत अडथळा ठरते. हीच भीती त्यांना कुटुंब नियोजनाबद्दल विचार करू देत नाही.

सर्वेक्षण काय म्हणते

लंडन बिझिनेस स्कूलने केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार, ७० टक्के महिला आपल्या करिअरच्या ब्रेकमुळे काळजीत आहेत. त्यांच्यासाठी करिअर ब्रेक घेणे म्हणजे सहसा प्रसूती रजेसाठी वेळ काढून घेणे किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून मागे हटणे आहे.

गेल्या वर्षी लेबर पार्टीच्या संशोधनानुसार, ५० हजाराहून अधिक महिलांना प्रसूती रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

कंपन्या मोठया प्रतिभा गमावतात

आज केवळ पुरुषच नाही तर स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात झेंडा फडकवित आहेत. तिने आपल्या प्रतिभेने हे सिद्ध केले आहे की ती एकटयाने सर्व काही करू शकते. त्यांनी आपली घरापर्यंत मर्यादीत असलेली प्रतिमा बदलली आहे. चला, अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे :

इंदिरा नुई, पेप्सीको कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला आहे.

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने भारतातील सर्वोत्कृष्ट बँक रिटेल पुरस्कार जिंकला आहे. तसे आजकाल चंदा कोचर अनेक घोटाळयांमध्ये आरोपी आहे.

मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राहिल्या आहेत, त्यासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा परिस्थितीत जर आपण स्त्रियांना कमी लेखले असते तर त्या देशात नाव कसे कमवू शकल्या असत्या?

महिलांची विचारसरणी बदलली आहे

पूर्वी, जेथे महिला घराच्या चार भिंतींपर्यंतच मर्यादीत राहत असत आणि घरा-घरातील पुरुषच कुटुंबासाठी जबाबदार असत, परंतु आता वेळ आणि परिस्थिती बदलल्यामुळे महिलांनीही घराच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरवात केली आहे. आता त्याही कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून चालण्यास सुरवात केली आहे, आता त्यांचे लक्ष करियर बनवण्याकडे जास्त आहे.

कुटुंब नियोजनात विलंब

आजच्या महिलेस आपली उच्च पात्रता घरापर्यंतच मर्यादित ठेवणे मुळीच मान्य नाही. तिला पात्र झाल्यावरच लग्न करणे आवडते. कोणत्याही गोष्टीसाठी कोणासमोर गरजू बनणे तिला आवडत नाही. ती तिचा विचार करते आणि आपल्या योग्य जोडीदार शोधते तेव्हाच ती लग्न करते जेणेकरून कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आडवी येऊ नये.

लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कुटुंब नियोजनाबद्दल विचार करण्याविषयी दबाव वाढू लागतो. पण आजची पिढी यास उशीर करण्यातच समजदारी मानते, विशेषत: कार्यरत महिला. कौटुंबिक नियोजनामुळे त्या नोकरी गमवू इच्छित नाहीत. या भीतीने, त्या यास उशीर करतात.

जास्त पैसे कमविण्याची इच्छा देखील योग्य नाही

दिल्लीच्या केशव पुरम भागात राहणारी प्रीती आयटी क्षेत्रात काम करते. तिचा नवरादेखील याच व्यवसायात आहे. त्यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. आता जेव्हा त्यांना वाटले की त्यांची लाईफ सेटल झाली आहे, तेव्हा त्यांनी मुलं जन्मास घालण्याबद्दल विचार केला. पण त्यांना यश मिळालं नाही. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना हे समजले की वय जास्त झाल्याने आणि इतर कारणांमुळे त्यांना आई होण्यास समस्या येत आहे. आता केव्हा ती आई बनू शकेल, याचा विचार करून-करून तिचे आयुष्य तणावग्रस्त झाले आहे.

वर्क ऐट होमचा पर्यायदेखील

जर आपल्याला असे वाटत असेल की नोकरी म्हणजे फक्त ऑफिसमध्ये जाऊन काम करणे असते, तर असे नाही आहे. आपण घरी काम करूनदेखील जॉब सुरू ठेवू शकता.

आज इंटरनेटच्या जगात नोकऱ्यांची कमतरता नाही. फक्त मनात काहीतरी करण्याची उत्कटता होणे आणि आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आपल्या कारकीर्दीला ब्रेक लागण्यापासून थांबवू शकता आणि याचा कौटुंबिक नियोजनावरही परिणाम होणार नाही. घरातून स्वतंत्रपणे काम करू शकता, टिफिन सिस्टम, शिकवणी घेणे, भाषांतर कार्य, ब्लॉगिंग इ.

तर आता असे समजू नका की लग्न केल्याने आणि मूल जन्मास घातल्याने तुमच्या कारकीर्दिला ब्रेक लागेल.

लोक काय म्हणतील

* रिता गुप्ता

शिक्षण संपवून सिल्कीला नोकरी सुरू करण्यास केवळ ७-८ महिने झाले असतील की आजूबाजूच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी तिचे जगणे महाग करून टाकले. कुटुंबात किंवा शेजारीपाजारी राहणाऱ्यांमध्ये कुठे एखादे लग्न किंवा एखादा गेटटुगेदर असेल तर तिला पाहून प्रश्नांचा पूर ओढवला जात असे.

‘‘अगं सिल्की, शिक्षण पूर्ण झाले? कुठे काम करत आहेस? किती पॅकेज मिळते?’’

‘‘आणि मला सांग आजकाल काय चालले आहे’’ सिल्की या प्रश्नावर खूप घाबरायची, कारण तिला पुढचा प्रश्न माहित असायचा.

‘‘मग तू कधी लग्न करणार आहेस? कोणी शोधून ठेवला असेल तर सांग आम्हाला?’’

लाजून दांत दाखविणाऱ्या कोणत्याही काकू, आत्या किंवा मावशीची आपुलकी दर्शविणाऱ्या या प्रश्नामुळे सिल्कीला खूप त्रास होई, परिणामी, तिने हळूहळू या कौटुंबिक समारंभांपासून स्वत:ला अलग केले.

‘‘अहो, ज्याच्या लग्नाला / वाढदिवसाला / आला आहात त्याविषयी बोला, प्लेटभरून जेवण करा. माझी साडी का बनवू लागता?’’ सिल्की कुरकुरत असे.

तिच्या आईचीही अशीच परिस्थिती होती. जेव्हा-जेव्हा फ्लॅटच्या महिलांची मंडळी जमायची, तिला पाहताच प्रत्येकजणी जणू मॅरेज ब्युरो उघडत असे, ‘‘माझा मुलगा सिल्कीपेक्षा ३ वर्ष लहान आहे, म्हणजे सिल्कीचे वय, इतके झाले आहे.’’

एक म्हणत असे.

‘‘अहो, या वयात आमची २ मुलं होती,’’ दुसरी अभिमानाने म्हणायची.

‘‘बघ, तू आता मुलगा शोधणे सुरु करायला हवे,’’ तिसरी समजावण्याच्या स्वरात म्हणायची.

‘‘कोणाबरोबर काही चक्कर तर नाही, कोणत्या जाती/धर्माचा आहे? बाई, हल्ली मुली आधीच कुणाला तरी पसंद करून घेतात. चांगले आहे ना तुला हुंडा नाही द्यावा लागणार,’’ दोन मुलांची आई अनिता शांत स्वरात म्हणते जणू काही मुली त्यांच्या भोळयाभाबडया मुलांच्या शिकारीसाठीच शिकत आहेत.

‘‘आत्ताच, सिल्कीचा पुढे शिकण्याचा मानस आहे, एकाद वर्ष नोकरी करून ती आधी शिकेन…’’ सिल्कीची आई रडवेल्या आवाजात म्हणाली.

‘‘पहा, आधी लग्न करा, नंतर शिक्षण चालू राहील,’’ एकीने म्हटले.

‘‘वेळेवर लग्न करणे अधिक महत्वाचे आहे, अन्यथा आपण नंतर शोधत रहाल,’’ दुसरी घाबरवण्याची कोणतीही कसर सोडत नाही.

‘‘जर माझी मुलगी असती तर मी कधीच तिचे हात पिवळे करून समाधानी झाले असते. मी तर नक्कीच माझ्या मुलाचे २५ वर्षांपूर्वीच लग्न लावून देईल, नाहीतर आजकालच्या या मुली खूप चलाख असतात… कोण जाणे, त्याला आपल्या जाळयात अडकवेन,’’ दोन मुलांची आनंदी आई उपदेश देई.

सिल्कीच्या आईकडून अजून ऐकवले जात नसे. तेथून निघण्याशिवाय पर्याय नसतो. पण मनात संशयाचे बीज फुटू लागते की मुलीला अधिक शिकवणे खरोखरच चुकीचे ठरेल काय किंवा जास्त वयात लग्न करण्यात खरोखरच समस्या येईल काय?

पाय खेचण्यात पुढे

हेच ते ४ लोक असतात, ज्यांच्या भीतीने किंवा असे म्हणूया याच ४ लोकांना खूष करण्यासाठी किती निर्णय घेतले जातात. याच ४ लोकांच्या गोष्टी ऐकून एखाद्या मुलीचे वेळेपूर्वीच लग्न लावून दिले जाते किंवा नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. हे लोक मुलांपेक्षा जास्त इतरांच्या मुलींमध्ये स्वारस्य घेतात. याच ४ लोकांना आनंदी ठेवण्यासाठी कधीकधी रात्री उशिरा आल्याने ओरड होते तर कधीकधी एखादा ड्रेस घालण्यास मनाई केली जाते.

काही महिन्यांतच लग्न उरकवून तिची आई एक दिवस पुन्हा त्यांच्यासोबत बसली होती की मागून कुजबुज ऐकू आली.

‘‘सिल्कीच्या लग्नात किती दुरावस्था होती,’’ एक आवाज.

‘‘मला तर गोड डिश मिळालीच नाही. जर आपण व्यवस्था करू शकत नसलो तर इतक्या लोकांना का बोलावावं,’’ आणखी एक कुजबूज.

‘‘मुलाला पाहिले. मला तर जास्त वयाचा वाटत होता,’’ तिसरी चुगली.

सिल्कीची आई विचार करीत होती, तिने तिच्या मुलीचे लग्न त्यांच्या सल्लयानुसार लावले तिचे कौतुक करतील. पण इथे तर वेगळाच रेकार्डर कानात वाजत होता. आतून चिढत पण बाहेरून स्मितहास्य करत ती मागे फिरली. म्हणाली, ‘‘बहिण, तुमचा मुलगा कसा आहे? काल त्याला बाजारात पाहिले. कुणी मुलगी त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस बसली होती.’’

‘‘अरे…तो…हो…मुलगा सांगत होता की त्याच्या कार्यालयातीलच कुणी मुलगी आहे, जी बळजबरीने त्याच्या गळयात पडून राहते,’’ परंतु या उडत्या बातमीने मुलाच्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडू लागला होता. आता तिचे नाक ४ लोकांसमोर जे कापले जात होते.

आता संभाषण सिल्कीच्या लग्नावरून दुसरीकडे सरकले.

फक्त खेद
जिथे ४ लोक भेटणार तेथे ४ गोष्टी होणारच. देश-परदेश, राज्यावरून चर्चेचा विषय होत- होत स्वत:भोवतीच टिकाव धरू लागतो. मुख्यत: त्यांवर जे उपस्थित नसतात. मग इतरांच्या बाबतीत मोडता घालणे हे नेहमीच एक आवडते मनोरंजन असते. केवळ या गोष्टींसाठी महिलांना जबाबदार धरू नये. पुरुषही गप्पा मारण्याची समान सामाजिक जबाबदारी तेवढयाच कठोरपणे निभवतात.

आपण सिल्कीबद्दल बोलत आहोत. सिल्कीच्या आईला असे वाटले की तिने मुलीचे लग्न केले आहे. तिला पुढे शिकू दिले नाही. आता तिच्याशी ४ लोक आनंदी असतील आणि ती ४ लोकांमध्ये एक उदाहरण बनेल. पण दुर्दैवाने, असे काहीही घडले नाही, उलट वर्ष-दीड वर्ष उलटताच तेच लोक तिला पुन्हा प्रश्नांच्या गोत्यात उभे करू लागले.

‘‘तिच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत? ती केव्हा चांगली बातमी सांगणार आहे?’’ दुसरीच्या उत्सुकतेचा अंत नव्हता.

‘‘अहो, ती नुकतीच एका नवीन नोकरीत सामील झाली आहे. तिला प्रथम काही दिवस स्थिर-स्थावर होऊ देत,’’ सिल्कीच्या आईने समजावले.

‘‘योग्य वेळी मुले झाली पाहिजेत अन्यथा आजीवन पश्चात्ताप करावा लागेल. ठाऊक नाही, हे लोक कोण-कोणती औषधे खातात नंतर गर्भधारणा करण्यास अक्षम होतात,’’ ४ मुलांच्या आईने आपले मत विनामूल्य व्यक्त करण्यास सुरवात केली.

आता ती हुशार होत चालली होती, म्हणून ४ लोकांची कंपनी तिला आवडू लागली. ४ लोकांबरोबर बसून तीही इतरांना ज्ञानाच्या गोष्टी शिकवू लागली. खरं म्हणजे आता ती जेव्हा न मागता कोणालाही विनामूल्य सल्ला द्यायची तेव्हा तिला अद्वितीय आनंद वाटायचा. ४ लोकांसह एखाद्या ५ व्याला लाजिरवाणे करणे, त्याला बेइज्जत करणे यासारख्या स्वर्गीय आनंदाचा रस घेऊ लागली.

वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप
आता सिल्कीची आईसुद्धा विचार करत नाही की एखाद्याला वारंवार छेडणे की तिच्या मुलाचे/मुलीचे लग्न का होत नाही अशाने एखाद्यावर काय परिणाम होईल. इतरांकडून सुवार्ता ऐकण्यास आतुर तिचे मन आता एक क्षणही विचार करत नाही की ठाऊक नाही कुठल्या कारणाने एखादी स्त्री आई का होऊ शकत नाही. आपल्या सभोवतालच्या छोटया-छोटया गोष्टीदेखील जाणून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ती एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करीत आहे याचा तिला अजिबात संकोच होत नाही. आपली मुले भले फेल होत असतील परंतु स्पर्धात्मक परीक्षेत इतरांच्या मुलांचा काय परिणाम आला, ही उत्सुकता ती ४ लोकांसह अवश्य व्यक्त करते.

सिल्कीच्या आईला हळूहळू हे कळलेच नाही की ती देखील त्या ४ लोकांमध्ये सामील झाली आहे, ज्यांना लोक टाळू इच्छितात, ज्यांचे शब्द गंभीरपणे घेतले जात नाहीत आणि ज्यांचे कामच आहे काही ना काहीतरी बोलत राहणे. ज्या रसिक व्यक्तींना कठीणाईने समजावले जाऊ शकते अशा प्रकारच्या त्यांच्या आचरणास लोक फक्त ऐकतात पण आपल्या मनाचेच करतात.

कुणी उपरोधक पाहिल्यास काय करावे

* पूजा पाठक

क्षिप्राच्या घरी किट्टी पार्टी चालू होती. अचानक घडयाळावर दृष्टी पडताच रागिनी उठून चालू लागली.

‘‘अगं, अजून तर फक्त ५ वाजले आहेत, ६ वाजता निघून जा,’’ क्षिप्राने विनवणी करत तिचा हात धरला.

‘‘माफ करा. मला उद्या सकाळी ऑफिसला जावं लागेल. आता मी तुझ्यासारखी गृहिणी तर नाही आहे की आरामात आयुष्य जगू शकेन. मला घराचे -बाहेरचे दोघेही पाहावे लागते.’’ रागिणी सौम्य कटाक्ष करत म्हणाली. आपुलकीने पकडलेल्या हाताची पकड सैल झाली. क्षिप्रा तोंडावर काहीच बोलली नाही, परंतु या एका व्यंग्यामुळे दोन मैत्रिणींमधील मैत्रीत एक अदृश्य भिंत तयार झाली.

उपरोक्त परिस्थितीतही किट्टी पार्टी दरम्यान क्षिप्राच्या घराच्या थाटामाटाबद्दल होणारी स्तुती रागिनी सहज पचवू शकली नाही आणि इच्छा नसूनही तिच्या तोंडून क्षिप्रासाठी अपमानजनक गोष्ट निघाली. ज्याने केवळ पार्टीचे वातावरणच त्रासदायक बनले नाही तर दोन मैत्रीणींमध्ये विवादासही जन्म दिला.

या मानसिकतेचे कारण काय आहे

अखेर, व्यंग्य करण्यामागे एखाद्याचा हेतू काय असू शकतो. खरं तर जेव्हा आपण एखाद्याला वरिष्ठ पाहता तेव्हा आपल्या मनात एक नैसर्गिक उत्सुकता निर्माण होते की तो आपल्यापेक्षा वरचढ का आहे? फक्त येथे, सकारात्मक विचारांची व्यक्ती ही गोष्ट प्रशंसेच्या रूपात घेते आणि समोरच्या माणसाची प्रशंसा करते. तो त्याच्या कलागुणातून किंवा प्रतिभेवरुन शिकण्याचा प्रयत्न करतो. तर वाईट भावनेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल हेवा, द्वेष आणि मत्सर वाटतो.

या प्रकारचे लोक खरोखर आजारी मानसिकतेचे गुलाम असतात. त्यांना इतरांचे सौंदर्य, प्रतिभा, आनंद किंवा यश आवडत नाही. जेव्हा त्यांना आपल्या या भावनेवर आळा घालता येत नाही, तेव्हा त्यांच्या तोंडातून व्यंग बाहेर येते, जे समोरच्या व्यक्तीचा अप्रत्यक्ष रूपाने अपमान करण्यासाठी असते.

कधीकधी हे व्यंग सूड उगवण्याच्या भावनेखाली केली जातात किंवा कदाचित आपली खुन्नस काढण्यासाठीदेखील. तथापि, ही वाक्ये अशा प्रकारे उच्चारली जातात की जेणेकरून त्यांच्यावर सरळ-सरळ कुठला आरोप लागू नये आणि वेळ आल्यावर ते असे सांगून स्वत:चा बचावही करू शकतील की मी तर असेच म्हटले होते.

यापासून वाचण्याचे मार्ग

अखेर असे काय करावे की सापही मरावा आणि काठीही मोडू नये. म्हणजेच, त्याला आरसाही दाखवावा आणि स्वत:ही दुखी होऊ नये, चला जाणून घेऊया :

* या गोष्टीला फारसे प्राधान्य देऊ नका आणि त्यावेळी असा विचार करून शांत रहा की आपल्यावर टोमणे मारणे ही त्याची दुर्बलता आहे. हो, नंतर योग्य वेळ पाहून त्याच्या मनात आपल्याबद्दल बसलेली घाण दूर करण्याचा प्रयत्न करा.

* त्याची जी काही विशेषता आपल्याला आवडत असेल तिची उघडपणे स्तुती करा, जेणेकरून त्याला स्वत:च्या कृतीची लाज वाटेल आणि तो तुमच्याबद्दल दुहेरी आदराने भरुन जाईल.

* त्याला स्पष्ट शब्दांत अशी कोणती गोष्ट न बोलण्यासाठी अवश्य सांगा. अशाने तो सावध होईल.
तेव्हा हा निर्णय व्यक्ती किंवा परिस्थिती पाहून आपल्याला स्वत:ला घ्यावा लागेल की एखाद्याकडून व्यंग केले गेल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी. आपण फक्त हे निश्चित केले पाहिजे की आपण कोणाच्या टोमण्याबद्दल मनापासून दुखावणार नाहीत, आणि ना स्वत: एखाद्यावर विनाकारण वैयक्तिक आक्षेप घ्याल किंवा टिप्पणी कराल.

बालगोपाळांच्या कपड्यांची काळजी

* गरिमा पंकज

आईवडील जेव्हा आपल्या छोटयाशा बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन येतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर नसतो. बाळाच्या जन्माआधीच छोटया, सुंदर, रंगीबेरंगी कपडयांनी घर भरून जाते. पण त्यांची खरेदी करताना आणि बाळाचे कपडे धुताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खूपच गरजेचे असते, कारण कपडयांवरच बाळाचे आरोग्य आणि सुरक्षा अवलंबून असते.

कपडे खरेदी करताना सावधान

कापड : लहान मुलांसाठी नेहमी मऊ, आरामदायक कपडे खरेदी करा. ते सहज धुता येतील असे हवे. बाळाच्या त्वचेचे नुकसान होणार नाही, असेच कापड हवे. मुलांसाठी सुती कपडे सर्वात चांगले असतात, पण लक्षात ठेवा की सुती कपडे धुतल्यावर थोडे आकसतात.

लांबी-रुंदी : मुलांचे कपडे ३ महिन्यांच्या फरकाने तयार केलेले असतात. ०-३ महिने, ३-६ महिने, ६-९ महिने आणि ९-१२ महिने अशा प्रकारे शिवलेले असतात. मुलांना खूप मोठे कपडे घालू नका. ते सतत गळा आणि डोक्यावर येतात. यामुळे श्वास कोंडण्याची भीती असते.

सुरक्षा : बी एल कपूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नवजात बाळांचे सल्लागार, तज्ज्ञ डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, लहान मुलांसाठी नेहमी साधे कपडे खरेदी करावेत. फॅन्सी, वजनदार कपडे विकत घेणे टाळा. ज्याला बटन, रिबीन, गोंडा नसेल, असे कपडे खरेदी करू नका. मुले बटण गिळू शकतात, ते त्यांच्या घशात अडकू शकते. ज्याला ओढायच्या दोऱ्या असतील, असे कपडेही खरेदी करू नका. त्या दोऱ्या कशात तरी अडकून ताणल्या जाऊ शकतात.

आरामदायी : असे कपडे खरेदी करा, जे मुलाला सहज घालता येतील, जेणेकरून कपडे बदलताना त्रास होणार नाही. पुढून उघडता येणारे सैल कपडे चांगले असतात. असे कपडे खरेदी करा जे स्ट्रेचेबल म्हणजे ताणले जातात. ते मुलाला घालणे आणि काढणे सोपे असते. ज्याला चैन असेल असे कपडे खरेदी करू नका.

कपडे धुण्याच्या टिप्स

डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. म्हणूनच त्यांचे कपडे धुताना कपडे धुण्याची साधी पावडर वापरू नका. रंगीत आणि सुवासिक पावडर तर अजिबात वापरू नका. लोकरीचे कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी सौम्य पावडर वापरणे जास्त चांगले असते. मुलांचे कपडे खूप वेळा पाण्यातून काढा, जेणेकरून पावडर किंवा साबण पूर्णपणे निघून जाईल. मुलाची त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली पावडरच वापरा.

मुलांचे कपडे लहान आणि मऊ असतात. म्हणूनच ते वॉशिंग मशीनऐवजी हाताने धुणे जास्त चांगले असते. मशीनमध्ये धुणार असाल तर ड्रायर वापरू नका. मोकळया जागेवर, ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात कपडे सुकवा. तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरणार असाल तर खास मुलांसाठी असणाऱ्या सॉफ्टनरचाच वापर करा.

कपडे धुण्याच्या अन्य टिप्स

त्वचा किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये यासाठी मुलांचे कपडे कसे स्वच्छ ठेवायचे, हे माहिती करून घेऊया :

* कपडयांवर लावलेले लेबल नीट वाचा. लेबलवर मुलांच्या कपडयांसाठी ज्या सूचना असतील त्यांचे पालन करा.

* बरेचसे कपडे जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. म्हणूनच कपडे धुताना जास्त गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा.

* रंग, कापड आणि लागलेले डाग पाहून त्यानुसार मुलांचे कपडे वेगवेगळे धुवायला ठेवा. एकसारखे असलेले कपडे एकत्र धुवा. यामुळे कपडे धुणे सोपे होईल आणि ते सुरक्षितही राहतील.

* मुलांच्या कपडयांवर डाग लागले असतील तर बेबी फ्रेंडली सौम्य पावडर लावून हलक्या हातांनी चोळून कपडे धुवा. यामुळे डाग हलका होईल. त्यानंतर व्यवस्थित पाणी वापरून कपडे नीट धुवा.

* मुलांचे कपडे किटाणूमुक्त ठेवण्यासाठी काही महिला कपडे अँटीसेफ्टिक सोल्यूशनमध्ये भिजवतात. हे चुकीचे आहे. यामुळे मुलाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

* कपडे लादीवर ठेवून चोळण्याऐवजी हात किंवा मशीनच्या झाकणावर ठेवून धुवा.

* मुलाचे कपडे घरातील इतरांच्या कपडयांसोबत धुवू नका. बऱ्याचदा मोठयांचे कपडे जास्त मळलेले असतात. सर्व कपडे एकत्र धुतल्यामुळे त्यांच्यातील किटाणू मुलाच्या कपडयांमध्ये जाऊ शकतात.

* कपडे सुकल्यावर ते नीट इस्त्री करा, जेणेकरून उरलेले किटाणूही मरून जातील.

* कपडे नीट घडी करून कव्हरमध्ये किंवा कॉटनच्या कपडयात गुंडाळून ठेवा.

जबाबदारी तुमची छंद आमचे

* ऋतू वर्मा

अतुल एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर होता. महानगरातील राहणीमानाच्या तऱ्हा इतक्या महाग होत्या की त्याला इच्छा असूनही काही बचत करता येत नव्हती. जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी आग्रह धरायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकच इच्छा होती की त्याची पत्नीदेखील आर्थिकदृष्टया स्वावलंबी असावी जेणेकरून पुढील आयुष्य सुरळीत चालू शकेल. बघता बघता शोध संपला आणि प्रीती त्याच्या प्रेमाच्या नात्यात बांधली गेली.

प्रीती आल्यावर घर-गृहस्थीचा खर्चही वाढला, पण प्रीतीने घरखर्च किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खर्च वाटून घेण्यात अजिबात रस दाखवला नाही, परिणामी वाढलेले अनेक खर्च अतुलच्या डोक्यावर आले.

अतुलने प्रीतीला घर-गृहस्थीत हातभार लावण्यास सांगितल्यावर ती रडू लागली. म्हणाली, ‘‘बायकोच्या कमाईवर गृहस्थीचा गाडा चालवणारा तू कसा पुरुष आहेस?’’ प्रितीच्या या वागण्याने अतुलला धक्काच बसला.

पल्लवी आणि सौरभच्या घरचीही अशीच परिस्थिती होती. कर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च ही सगळी जबाबदारी

सौरभची होती, इतकेच काय तर कधी-कधी जर इतर काही खर्च अजून आला तर सौरभला मित्रांकडे कर्ज मागावे लागत असे, पण याचा पल्लवीवर काहीही परिणाम होत नसे. प्रत्येक बायकोचा दृष्टिकोन असाच असेल असे नाही. नितीन आणि ऋचाच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळीच आहे.

ऋचाच्या नोकरीच्या जोरावर नितीनने पैसे उलट-सुलट व्यवसायात गुंतवले आणि मग ठणठण गोपाल. असे अनेकवेळा घडले. मग ऋचाला वाटू लागले की लग्नानंतर नवऱ्याला बळ देण्यासाठी नोकरी करणे ही तिची सर्वात मोठी चूक होती.

दोघांच्या कमाईवरच गाडी चालणार

आता काळ बदलला आहे आणि जगण्याची पद्धतही बदलली आहे. ती पूर्वीच्या काळाची गोष्ट होती जेव्हा नवरा नोकरी करायचा आणि बायको घर आणि मुलं सांभाळायची. आता महानगरांमध्ये महागाईच्या राक्षसाने इतके भयंकर रूप धारण केले आहे की २ जणांच्या कमाई शिवाय घर-गृहस्थीचा गाडा ओढणे अशक्य आहे.

जबाबदारी अशी वाटून घ्या

तुम्ही आणि तुमचा नवरा दोघेही नोकरी करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा :

* घर तुम्हा दोघांचे आहे, त्यामुळे जबाबदारी समान वाटून घ्या. संपूर्ण महिन्याचे बजेट बनवा आणि समान योगदान द्या, तुमच्या कमाईवर तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पगाराची वारंवार धमकी देऊन तुमच्या पतीला कमीपणाची जाणीव करून देऊ नका, घराप्रती त्यांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती तुमचीही आहे.

* ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे छंद पूर्ण करता, त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदारालाही छंद असतात. पगाराचा किती भाग हा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करायचा आणि किती भाग इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च करायचा हे तुम्ही दोघांनी परस्पर संमतीने ठरविले जाण्याची आवश्यकता आहे.

* आजच्या काळाची मागणी आहे की पती-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकताही असावी, अनेक वेळा पत्नी पतीला आपल्या पगाराबाबत चुकीची माहिती देते असेही दिसून येते. यामागचे मुख्य कारण हे असते की जर पत्नीने आपल्या पगारातून घर चालवले तर पती त्याची सर्व कमाई मित्रांवर किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर उधळेल, जे प्रत्येकवेळी योग्यही नसते.

* अनेक वेळा असेही पाहायला मिळते की पत्नी तिच्या मैत्रिणींचे बघून तिच्या पगाराच्या बाबतीत असुरक्षित राहते, भविष्यासाठी आपला पगार वाचवून ठेवावा असे तिला वाटते. कारण नवऱ्याचा काही भरवसा नसतो, पण जर नवराही असाच विचार करू लागला तर तुम्ही काय कराल? जर नात्यात विश्वासच नसेल तर अशा वैवाहिक जीवनाचा काही उपयोग नाही.

* तुम्ही आजच्या स्त्री आहात जी कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. मग जबाबदाऱ्यांना खंबीरपणे सामोरे जा, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आधीपासूनच तुमच्या जीवनसाथीबद्दल कोणतेही गृहितक बांधू नका

* तुमचा नवरा कंजूष असो वा शाही खर्च करणारा, पण तुम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यात हे ठरवून घ्या की तुम्ही दोघेही पगाराची किती टक्के बचत करणार.

चला खेळण्यांच्या ट्रेनमध्ये मजा करूया

* गृहशोभिका टीम

कधी सुंदर मैदानातील घनदाट जंगलातून, कधी बोगदे आणि चहाच्या बागांमधून जाणारा टॉय ट्रेनचा प्रवास आजही लोकांना खूप भुरळ घालतो. जर तुम्ही कुटुंबासह अशाच सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर जागतिक वारसामध्ये समाविष्ट असलेल्या शिमला, उटी, माथेरान, दार्जिलिंग या टॉय ट्रेनपेक्षा चांगली काय असू शकते?

कालका-शिमला टॉय ट्रेन

हिमाचल प्रदेशातील सुंदर दरी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. पण कालका-शिमला टॉय ट्रेनबद्दल काही औरच आहे. 2008 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. कालका शिमला रेल्वेचा प्रवास ९ नोव्हेंबर १९०३ रोजी सुरू झाला. कालका नंतर, शिवालिक टेकड्यांमधून वळण घेत असलेली ट्रेन शिमला, सुमारे 2076 मीटर उंचीवर असलेल्या सुंदर हिल स्टेशनला पोहोचते. हे 2 फूट 6 इंच नॅरोगेज लेनवर चालते.

या रेल्वे मार्गात 103 बोगदे आणि 861 पूल आहेत. या मार्गावर सुमारे ९१९ वळणे आहेत. काही वळणे अगदी तीक्ष्ण आहेत, जिथे ट्रेन 48 अंशाच्या कोनात वळते. शिमला रेल्वे स्टेशनबद्दल बोलायचे झाले तर ते एक छोटेसे पण सुंदर स्टेशन आहे. इथे प्लॅटफॉर्म सरळ नसून किंचित फिरवलेला आहे. इथून एका बाजूला शिमला शहराचे सुंदर नजारे आणि दुसऱ्या बाजूला दऱ्या आणि टेकड्या दिसतात.

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (टॉय ट्रेन) ला डिसेंबर 1999 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. हे न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग दरम्यान धावते. यामधील अंतर सुमारे 78 किलोमीटर आहे. या दोन स्थानकांमध्ये सुमारे 13 स्थानके आहेत. हा संपूर्ण प्रवास सुमारे आठ तासांचा आहे, पण हा आठ तासांचा रोमांचक प्रवास तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. ट्रेनमधून दिसणारी दृश्ये अप्रतिम आहेत. तसे, जोपर्यंत तुम्ही या ट्रेनमधून प्रवास करत नाही तोपर्यंत तुमचा दार्जिलिंगचा प्रवास अपूर्ण समजला जाईल.

शहराच्या मध्यभागातून जाणारी ही ट्रेन डोंगरात वसलेल्या छोट्या गावातून, हिरव्यागार जंगलातून, चहाच्या बागांमधून फिरते. त्याचा वेगही खूप कमी आहे. कमाल वेग 20 किमी प्रति तास आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धावत जाऊन ट्रेनही पकडू शकता. या मार्गावरील स्थानकेही आपल्याला ब्रिटिशकालीन आठवण करून देतात.

दार्जिलिंगच्या थोडं आधी घूम स्टेशन आहे, जे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. हे सुमारे 7407 फूट उंचीवर वसलेले आहे. इथून पुढे बटासिया वळण येते. येथे हुतात्मा स्मारक आहे. येथून संपूर्ण दार्जिलिंगचे सुंदर दृश्य दिसते. हे 1879 ते 1881 दरम्यान बांधले गेले. टेकड्यांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दार्जिलिंगमध्ये पर्यटकांसाठी खूप काही आहे. दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरात तुम्ही हॅपी व्हॅली टी इस्टेट, बोटॅनिकल गार्डन, बटासिया लूप, वॉर मेमोरियल, केबल कार, गोम्पा, हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट म्युझियम इत्यादी पाहू शकता.

निलगिरी माउंटन रेल्वे

दार्जिलिंग हिमालयन रेल्वेप्रमाणे, निलगिरी माउंटन रेल्वेदेखील जागतिक वारसा स्थळ आहे. ‘दिल से’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘चल छैयां-छैयां’ हे गाणे या टॉय ट्रेनमध्ये चित्रित करण्यात आले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मेट्टुपलायम – उटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन ही भारतातील सर्वात धीमी ट्रेन आहे. ते ताशी 16 किलोमीटर वेगाने प्रवास करते. काही ठिकाणी त्याचा वेग ताशी 10 किलोमीटरपर्यंत जातो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आरामात उतरून थोडा वेळ फिरू शकता, परत येऊन त्यात बसू शकता. मेट्टुपलायम ते उटी दरम्यानच्या निलगिरी माउंटन ट्रेनमधून प्रवास करण्याचा थरार काही औरच आहे. यादरम्यान सुमारे 10 रेल्वे स्थानके येतात.

मेट्टुपालयम नंतर उगमंडलम हा टॉय ट्रेनच्या प्रवासाचा शेवटचा थांबा आहे. जेव्हा ही टॉय ट्रेन हिरव्यागार जंगलातून उटीला पोहोचते तेव्हा तुम्ही 2200 मीटरपेक्षा जास्त उंचीवर पोहोचलात. मेट्टुपालयम ते उदगमंडलम म्हणजेच उटी हा प्रवास सुमारे ४६ किलोमीटरचा आहे. हा प्रवास सुमारे पाच तासांत पूर्ण होतो. जर आपण इतिहासाबद्दल बोललो तर, 1891 मध्ये मेट्टुपलायम ते उटीला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग बांधण्याचे काम सुरू झाले. पर्वत कापून बनवलेल्या या रेल्वे मार्गावर 1899 मध्ये मेट्टुपलायम ते कन्नूर अशी ट्रेन सुरू झाली. जून 1908 हा मार्ग उदगमंडलम म्हणजेच उटीपर्यंत वाढवण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये हा रेल्वे मार्ग दक्षिण रेल्वेचा भाग झाला. आजही या टॉय ट्रेनचा सुखद प्रवास सुरूच आहे.

नरेल-माथेरान टॉय ट्रेन

माथेरान हे महाराष्ट्रातील एक लहान पण विलक्षण हिल स्टेशन आहे. ते सुमारे 2650 फूट उंचीवर आहे. नरेल ते माथेरान दरम्यान टॉय ट्रेनमधून हिल टॉपचा प्रवास खूपच रोमांचक आहे. या रेल्वे मार्गावर सुमारे 121 छोटे पूल आणि सुमारे 221 वळणे आहेत. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 20 किलोमीटरपेक्षा जास्त नाही. सुमारे 803 मीटर उंचीवर माथेरान हे या मार्गावरील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. हा रेल्वे वारशाचा अप्रतिम नमुना आहे.

माथेरान रेल्वे 1907 मध्ये सुरू झाली. पावसाळ्यात खबरदारी म्हणून हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. पण जेव्हा हवामान चांगले असते तेव्हा ट्रेन चालवली जाते. माथेरानचे नैसर्गिक दृश्य नेहमीच बॉलिवूडच्या निर्मात्यांना आकर्षित करते.

धार्मिक कट्टरवाद माणुसकी धोक्यात

* शाहनवाज

आपण एखाद्यावर नाराज असलो तर ती नाराजी व्यक्त करतो. वेगवेगळया प्रकारे मनातील नाराजीला वाट मोकळी करून देतो. एखाद्यावर नाराज झाल्यास काही लोक त्याच्याशी बोलणे बंद करतात. काही जण बोलतात, पण त्यांचा स्वर नाराजीचा असतो. काही लोक त्या व्यक्तीच्या समोर त्याला भलेबुरे ऐकवून आपल्या मनावरील ओझे कमी करतात. आधुनिक समाजातही लोकांना एकमेकांचे विचार पटतात किंवा पटतही नाहीत, पण ज्या लोकांना धार्मिक कट्टरतावादाच्या आजाराने ग्रासलेले असते ते नाराज झाल्यास आपल्याला स्वत:ला त्यांच्यापासून कसे वाचवता येईल, याचा विचार आपल्याला करावाच लागेल.

होय, कारण धार्मिक कट्टरतावादाचा आजार बळावलेले लोक तुमच्यावर नाराज झाले, रागावले किंवा तुमचे विचार त्यांना पटेनासे झाले तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात. पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना याचे सर्वात ताजे उदाहरण आहे. कुठल्याही धर्माचे कट्टरपंथी हे मानसिक आजारामुळे वेडयाच्या रुग्णालयात दाखल असलेल्या लोकांपेक्षाही समाजासाठी जास्त धोकादायक असतात.

हल्ल्याचे संपूर्ण प्रकरण

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी असे काही घडले ज्याची चर्चा संपूर्ण जगात सुरू आहे. एका १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेतील इतिहासाच्या शिक्षकावर हल्ला केला, कारण इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी वर्गात फ्रीडम ऑफ एक्स्प्रेस म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्याशी संबंधित एक कार्टून अर्थात व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे इस्लाम धर्माला मानणारा हा विद्यार्थी नाराज झाला होता.

१८ वर्षीय या तरुणाने कॉम्प्लेक्स सो होनरी नावाच्या एका शाळेजवळ सॅम्युअल पॅटी या शिक्षकांवर हल्ला केला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाला चहूबाजूंनी घेरले. त्यावेळी खिशातले पिस्तूल काढून तरुण पोलिसांना धमकावू लागला. अखेर पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला.

व्यंगचित्रावरून यापूर्वीही वाद

शार्ली हेब्दो यांनी २००५ मध्ये डेन्मार्कच्या एका वृत्तपत्रात धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावादी विचारधारेवर प्रहार करत पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. ते प्रकाशित होताच संपूर्ण जगभरात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ मध्ये शार्ली हेब्दो या व्यंगचित्र पत्रिकेत ते व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आणि पुन्हा गोंधळ उडाला.

काही इस्लामी बंदुकधाऱ्यांनी २०१५ मध्ये फ्रान्सच्या शार्ली हेब्दोच्या कार्यालयातील संपादकीय विभागावर हल्ला केला. यात १२ जणांना जीव गमवावा लागला. जीव गमावणाऱ्यांमध्ये ५ व्यंगचित्रकार, १ अर्थशास्त्रज्ञ, २ संपादक, १ साफसफाई करणारा, १ पाहुणा आणि २ पोलीस होते. याशिवाय ११ जण गंभीर जखमी झाले. हल्ल्यावेळी हल्लेखोर धार्मिक घोषणा देत होते. ‘आम्ही पैगंबरांचा बदला घेतला’ असे आसुरी आनंदाने बोलत होते.

या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास असणारे विद्यार्थी आणि अन्य लोकांनी मिळून ‘मीही शार्ली’ असा नारा देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बळकट केला.

लोकांची सहनशीलता संपत चालली आहे

ही घटना शार्ली हेब्दो यांनी काढलेल्या व्यंगचित्राची होती, पण आपणही आपल्या जीवनात अशा अनेक लोकांना भेटतो जे टीका सहन करू शकत नाहीत. जे अपल्याला सर्वात जास्त जवळचे असतात त्यांच्यावर केलेली टीका बऱ्याचदा लोक सहन करू शकत नाहीत.

धार्मिक लोक सर्वसाधारणपणे लोकांचे प्रश्न टाळतात, कारण त्यांना आपल्या धर्माबद्दल संपूर्ण ज्ञान नसते. असे सखोल ज्ञान कदाचित मशिदीत बसलेल्या मौलवींना किंवा मंदिरात बसलेल्या एखाद्या पूजाऱ्यालाही नसते. डोळे बंद करून ते फक्त त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात जी त्यांना कोणीतरी धर्माच्या नावावर शिकवली किंवा समजावलेली असते.

माझ्या शालेय जीवनातीळ विज्ञानाचे एक शिक्षक त्यांच्या हातातील सर्व बोटांमध्ये अंगठया घालायचे आणि त्यांच्या गळयात रुद्र्राक्षाची एक मोठी माळ असायची. एके दिवशी शाळेत सामाजिक विज्ञान शिकवणाऱ्या एका नव्या शिक्षकांसोबत त्यांचा वाद झाला. त्यांच्या हातातली सर्व बोटांमध्ये अंगठया पाहून नवीन शिक्षकांनी फक्त एवढेच विचारले होते की, या अंगठया तुम्ही आवड म्हणून घालता की, एखाद्या बाबा-बुवाने त्या तुम्हाला घालायला सांगितल्या आहेत?

त्यांचा हा प्रश्न ऐकून विज्ञानाचे शिक्षक प्रचंड चिडले. शब्दाला शब्द भिडला आणि रागाच्या भरात विज्ञानाच्या शिक्षकांनी नवीन शिक्षकांवर हात उगारला. .

तरीही लोकांच्या मानगुटीवरून रुढीवादी समाजाचे भूत अजूनही उतरलेले नाही. मग तो कुठल्याही देशाचा आणि कुठल्याही धर्माचा धार्मिक कट्टरतावादी का असेना, त्याच्यासाठी तोच पूर्वीचा, धर्माला कायदा मानणारा समाज अजूनही सर्वोत्तम आहे. म्हणूनच तो त्याच्या धर्माविरोधात उठणारा प्रत्येक आवाज बंद करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार असतो.

हेच कारण आहे की, लोकांना कुठल्याही प्रकारच्या वादात पडायचे नसते. त्यांना टीका करायची नसते किंवा अशा वादाचा त्यांना कुठलाही अर्थ लावायचा नसतो. पॅरिसमध्ये इतिहासाच्या शिक्षकांसोबत घडलेली घटना हेच सांगते की, लोक खूपच असहनशील झाले आहेत. ते तर्कवितर्काना पटेल असे उत्तर द्यायचे सोडून थेट लोकांवर हल्ला करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात.

खरंच धर्म इतका कमकुवत आहे?

पॅरिसमध्ये सॅम्युअल पॅटी यांच्यासोबत घडलेल्या घटनेतून असे निदर्शनास येते की, आधुनिक आणि प्रगत देशांमध्येही धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावाद कायम आहे. पॅरिसमध्ये घडलेल्या घटनेचे आपण नव्याने पुनरावलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की, सॅम्युअल पॅटी वर्गातील मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्यावर काढलेले व्यंगचित्रच तर दाखवत होते.

जर यात कुठल्याही व्यक्तीला काही आक्षेप होता तर पॅटी यांनाही त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. पण हल्लेखोरांनी याबाबत कुठलाही सारासार विचार न करता सॅम्युअल पॅटी यांना जीवानिशी मारले.

अखेर असे काय झाले होते की, हल्लेखोरांनी हिंसेचा आधार घेतला? धर्मावर टीका केल्यामुळे धर्माचे अस्तित्व धुळीत मिसळते का? स्वत:वर करण्यात आलेली टीका सहन करू न शकण्याइतका लोकांचा देव कमकुवत आहे का? जर खरंच लोकांचा देव कमकुवत असेल तर मग लोक अशा कमकुवत देवाला पूजतातच का?

फ्रान्स जगातील एक असा देश आहे जिथल्या लोकसंख्येतील प्रत्येक पाचवी व्यक्ती पूर्णपणे नास्तिक असते. याचा अर्थ फ्रान्स एक असा देश आहे जिथे लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहातात. ती समजू घेण्यासाठी चर्चा करतात. सारासार विचार करतात.

धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी एकच उपचार

धर्माला मानणारा प्रत्येक व्यक्ती कट्टरपंथीच असतो, असे मुळीच नसते. खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्ती स्वत:ला सर्वात जास्त समजूतदार समजत असतो आणि दुसऱ्या कोणाचे काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. धार्मिक कट्टरतावादाची मुळे तोपर्यंत समाजातून मुळापासून उपटून फेकता येणार नाहीत जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी शिक्षण अनिवार्य केले जात नाही.

फक्त शिक्षण अनिवार्य करून ही समस्या संपुष्टात येईल, याचीही हमी देता येणार नाही. आपली शिक्षण व्यवस्था वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असणेही तितकेच गरजेचे असते. अशा शिक्षण व्यवस्थेत शिक्षकही असेच हवेत जे वैज्ञानिक विचारधारेला मानणारे प्रगतीशील असतील. आपल्या विज्ञानाच्या शिक्षकांप्रमाणे नसतील जे व्यवसायाने विज्ञान शिकवत असले तरी स्वत:च्या आयुष्यात मात्र ज्यांचा विज्ञानाशी काडीचाही संबंध नसतो.

आपल्या सरकारने असा आदर्श समाजात प्रस्थापित करायला हवा जो तर्काशी सुसंगत, विज्ञानवादी असेल. अंधश्रद्धेला मूठमाती देणारा असेल. मात्र आपण भारताला नजरेसमोर ठेवून असा विचार करतो तेव्हा तो विचार खूपच चुकीचा वाटू शकतो, कारण इथले सरकारच अंधश्रद्धा पसरवण्यात पारंगत आहे.

म्हणूनच आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी. आपण सुशिक्षित, समजूतदार समाज (लोकांचा समूह) म्हणून एक पाऊल पुढे टाकून कमीत कमी आपल्या जीवनात पसरलेल्या अंधश्रद्धेला तरी निर्बंध घालू शकतो. पॅरिसमध्ये कट्टरतावाद्यांनी केलेली सॅम्युअल पॅटी यांच्या मृत्यूची व्याख्या ही मानवतेच्या इतिहासातील सर्वात किळसवाणे कृत्य म्हणून करायला हवी. इतकेच नव्हे तर समाजात पुन्हा कधीच असे घडू नये म्हणून आपल्याला आजपासूनच कट्टरपंथाविरोधात आवाज उठवण्याची सुरुवात करायला हवी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें