* गरिमा
सुंदरशा झंप्पीत नाती बदलण्याची क्षमता असते. ही गोष्ट वेगळी आहे की या मागे एखादे कटकारस्थान अथवा राजकारण नसावे. बऱ्याच काळापूर्वी राहुल गांधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची झंप्पी खूप चर्चेत होती. संसदेच्या मान्सून सत्रात अविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधी यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना जादूची झंप्पी दिली. राहुलने भाषणानंतर अचानक मोदींच्या आसनाजवळ जात त्याची गळाभेट घेतली. हे वेगळे की या घटनेचे नंतर राजकारण होऊ लागले.
दोन्ही नेत्याच्या या झंप्पीने २०१३ मधील एका पार्टीत शाहरुख आणि सलमान यांच्या झंप्पीची आठवण करून दिली. या झंप्पीने चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि सर्वांना आवडणारा सलमान खान यांच्यातील ५ वर्षापूर्वीचा कडवटपणा नाहीसा केला होता.
तुम्ही जेव्हा एखाद्याची गळाभेट घेता, तेव्हा समोरच्याला आपुलकी आणि कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचा संदेश देत असता. तुम्ही दोघे या एकमेकांच्या जवळ आले आहात असे तुम्हाला जाणवते. यामुळे नाते तर दृढ होतेच शिवाय इतर अनेक प्रकारचे फायदेही असतात.
फक्त मिठी मारणे किंवा गळाभेट घेणे हे पुरेसे नाही. अमेरिकेत अनोळखी लोकांना भेटल्यावरही हसून ‘तुम्ही कसे आहात’ असे विचारण्यात येते. अशा लहानसहान गोष्टींमधून चागली भावना निर्माण होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरते. आजच्या जगात प्रत्येक माणूस व्यस्त आणि त्रासलेला आहे. पण अशा लहानसहान प्रयत्नांनी थोडसा दिलासा मिळतो.
या, जाणून घेऊ की शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी गळाभेट घेणे किती आवश्यक आहे :
ताण कमी होतो : जेव्हा एखादा मित्र वा परिवारातील सदस्य एखाद्या दु:खातून जात असेल तर त्याला मिठी मारा. अशाप्रकारे एखाद्याचा स्पर्श करत धीर देण्याने त्या व्यक्तीवर असलेला ताण कमी होतो.
आजारांपासून सुरक्षित राहणे : ४० वयाने मोठे असलेल्या माणसांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये संशोधकांना असे आढळले की अशा व्यक्ती ज्यांना उत्तम सपोर्ट सिस्टीम होती ते कमी आजारी पडले. एवढेच नाही अशा व्यक्ती आजारी पडल्या तरीही त्यांना कमी त्रास झाला.