बिग बॉस OTT 2 च्या ओपनिंग एपिसोडमध्ये दिसणार सनी लिओनी !

* सोमा घोष

बहुचर्चित असलेला शो म्हणजे बिग बॉस ! लवकरच बिग बॉस बिग ओटीटी सीझन 2 येणार असून सगळेच यासाठी उत्सुक आहेत. यात एक हटके ट्विस्ट म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये 2 मध्ये सनी लिओनी दिसणार असल्याचा चर्चा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि आता प्रेक्षकांना नेमका प्रश्न पडला की ती स्पर्धक आहे की सनी फक्त लाँच एपिसोडमध्ये दिसणार ?

या मोठ्या बातमीबद्दल सनी लिओनीच्या जवळच्या एका स्रोताने खुलासा केला आहे “सनी लिओन बिग बॉस ओटीटी सेटवर आहे कारण ती लॉन्च एपिसोडला उपस्थित राहणार आहे. ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून लाँचसाठी सनी खास पाहुणी असणार आहे. ”

सनी लिओनी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशामुळे चर्चेत आहे. तिच्या चार्ली या पात्राला जागतिक प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम उल्लेखनीय आहे. सनी अनेक नवे प्रोजेक्टदेखील करणार असल्याचा चर्चा आहेत.

‘‘कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले’’ – अंजली तुषार नान्नजकर

* सोमा घोष

मराठी अभिनेत्री अंजली तुषार नान्नजकर, महाराष्ट्रातील सोलापूरमधील अक्कलकोट या गावातील रहिवासी आहे. तिने नेहमीच आपल्या कुटुंबासह काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. यात पती तुषार नान्नजकर यांनीही तिला साथ दिली. गाव सोडून मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे तिच्यासाठी सोपे नव्हते, पण तिने धीर धरला आणि प्रयत्न करत राहिली. तिने छोटया भूमिकांपासून सुरुवात केली आणि नंतर तिला मुख्य भूमिका मिळाली. आता अंजली पुढील मराठी चित्रपट आणि अल्बममध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. ती काय म्हणाली, हे तिच्याच शब्दात जाणून घेऊया.

तुझ्याबद्दल काय सांगशील?

मी अनेक अल्बम केले आहेत आणि आता मराठी चित्रपटात काम करत आहे. मी अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. माझे वडील सरकारी नोकरी करतात. आई सरपंच आहे. दोघांनी नेहमीच लोककल्याणाची कामे केली. त्यामुळेच मलाही कुणाला तरी मदत करावी असे सतत वाटायचे. सोबतच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायचे होते. मी रंगभूमीवर काम करण्यासाठी मुंबईत आले, कारण माझ्या कुटुंबातील बरेच लोक मराठी इंडस्ट्रीत काम करतात. त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. मी सोलापूरच्या अक्कलकोट गावची आहे. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमध्येच झाले. त्यानंतर मी मुंबईत फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले आणि येथेच राहिले. रंगभूमीवर काम केले आणि माझे हिंदी सुधारून घेतले. सुरुवातीला मी हिंदीतून अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मिळून प्रोडक्शन हाऊस सुरू केले, ज्यामध्ये मी अनेक अल्बम बनवले आहेत आणि पुढे एक मराठी चित्रपटही करत आहे.

तुला कुटुंबाचा किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला कुटुंबाने मला अभिनय करण्यास नकार दिला. फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वांच्याच मनात भीती असते आणि इथे काम मिळणे सोपे नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, पण माझी मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती त्यांनी पाहिली. याशिवाय माझ्या गावातील एक व्यक्ती अभिनेता आहे. तिला पाहूनच मी अभिनय करू लागले, पण माझ्या आईवडिलांना मी अभिनय करावा असे वाटत नव्हते. मी अॅथलीट किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण मला रंगभूमीवर काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी विरोध केला नाही. टीव्हीवरचे माझे काम पाहून लोक माझ्या आईवडिलांकडे माझी स्तुती करू लागले, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. आईवडिलांनी मला खूप मानसिक सहकार्य केले. कधीच हार मानू नकोस, असा सल्ला ते नेहमी देतात. त्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचू शकले.

तू या क्षेत्रात पुढे कशी आलीस?

फॅशन डिझायनर असल्यामुळे हळूहळू मालिकांमधील कपडे डिझाईन करण्याचे काम मी करू लागले. त्यानंतर मी ‘ट्रूकल्चर’ हा माझा ब्रँड सुरू केला, ज्यामध्ये गरीब आणि अपंग स्त्रियांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकून मी त्यांना रोजगार उपलब्ध करून देते. दूरदर्शनवरील ‘कहीं देर ना हो जाए’ ही माझी पहिली मालिका होती. त्यानंतर मी मराठी चित्रपट आणि हिंदी मालिका केल्या. ‘फुलवा’, ‘माता की चौकी’, ‘अगले जनम मोहे बिटिया ना किजो’ इत्यादी अनेक मालिकांमध्ये मी बहीण आणि पत्नीची भूमिका साकारली आहे.

तुला ओळखीमुळे काम मिळणे सोपे झाले का?

हो, थोडे सोपे झाले, कारण मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. यामुळे माझ्यावरही चांगले काम करण्याचा दबाव असतो आणि ही माझ्या कारकिर्दीसाठी चांगली गोष्ट ठरली.

तुला किती संघर्ष करावा लागला?

सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला, कारण इंडस्ट्रीबद्दल प्रत्येकाचा चुकीचा समज आहे. ही इंडस्ट्री चांगली आहे, हे आईवडिलांना मला समजावून सांगावे लागले. मी खूप ऑडिशन दिले. बरेच लोक म्हणायचे की, मी अभिनय करू शकत नाही. मला तेवढी समज नाही, असे सांगून ते मला ही इंडस्ट्री सोडून जायला सांगायचे किंवा मराठी मुलगी असल्यामुळे तुझे हिंदीचे उच्चार चांगले नाहीत इत्यादी अनेक गोष्टी मला ऐकायला मिळायच्या. काही जण मला माझ्यातील उणिवा सुधारण्याचा सल्ला द्यायचे. गावातील लोकही माझ्या आईवडिलांना सांगत की, त्यांनी मला चुकीच्या ठिकाणी पाठवले. मुलगी आहे, तिला नोकरीला पाठवा, तिचे लग्न करा इत्यादी अनेक सल्ले ऐकत मी इथपर्यंत पोहोचले. ३ वर्षे प्रचंड संघर्ष केला. मुलींसोबत रूम शेअर करायचे, दिवसातून एकदाच खायचे. या सगळया गोष्टी मी माझ्या आईवडिलांना कधीच सांगितल्या नाहीत किंवा मी त्यांच्याकडून पैसेही मागितले नाहीत, कारण यामुळे त्यांना माझी काळजी वाटली असती. अनेकदा मला सोलापूरला परत जावेसे वाटायचे, पण नेमके तेव्हाच कामही मिळत होते.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

पहिला ब्रेक मिळताच मला खूप आनंद झाला, कारण मला काम मिळाले होते. कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले होते. मला अभिनेत्री नव्हे तर एक उत्तम कलाकार बनायचे होते. कॅमेऱ्यासमोर गेल्यावर मी खूप घाबरले, कारण माझ्यासमोर प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्र्रन होत्या. पहिली मालिका आणि माझे ते पहिलेच दृश्य होते. त्यांना समजले होते की, मी घाबरले आहे. त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावले आणि कॅमेऱ्याला मित्र मानण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी मला अभिनय नव्हे तर सहजपणे कसे बोलायचे ते सांगितले. यामुळे अभिनय करणे माझ्यासाठी सोपे झाले. लॉकडाऊनच्या काळात लोक काम करायला घाबरत होते, पण त्या काळात मला एका मराठी मालिकेमध्ये मोठे काम करण्याची संधी मिळाली आणि मी घराघरात नावारूपास आले. मी नेहमी अशीच भूमिका निवडली जी छोटी असूनही परिणामकारक ठरेल. नवीन कलाकारांमधील गुण ओळखूनच मी प्रोडक्शन हाऊस सुरू केले, जेणेकरून मी त्यांना संधी देऊ शकेन.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी मालिकांपेक्षा वेब सीरिज बघायला आवडतात आणि त्यात काम करण्याची माझी इच्छा आहे, पण मी अंतर्गत दृश्य करायला तयार नाही. आजकाल कौटुंबिक मालिकाही खूप आवडीने बघितल्या जातात आणि मला त्यात काम करायचे आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत काम करण्याची तसेच रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करण्याची इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी इंडस्ट्री आणि ट्रेंड पाहूनच फॅशन करते. मला विशेष करून जुनी अर्थात रेट्रो फॅशन आवडते. मी शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करते, पण घरी बनवलेलेच पदार्थ खायला मला जास्त आवडतात. प्रवासादरम्यान मी त्या ठिकाणचे पदार्थ नक्की खाऊन बघते.

महाशक्ती मिळाल्यास तुला देशात कोणते बदल घडवून आणायचे आहेत?

स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपले मत सांगण्याचे आणि ते सर्वांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, ही गोष्ट पुढेही कायम ठेवू इच्छिते.

आवडता रंग – लाल.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – द सिक्रेट.

आवडते परफ्यूम – डिओर.

आवडते पर्यटन स्थळ – दुबई, माझे गाव अक्कलकोट.

वेळ मिळाल्यास – गरीब आणि अपंग स्त्रियांना रोजगार मिळवून देणे.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – इतरांना आनंद देणे.

‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून कुस्तीपटूंची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच निरनिराळे विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘तुजं माजं सपान’ ही दैनंदिन मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दोघेही आपल्याला कुस्ती करताना दिसताहेत.

प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेत दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत आणि एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कुस्ती या दोघांना कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांना कशा प्रकारे पाहायला मिळेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे. मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेची मूळ कहाणी ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे. आजवर तिने कुस्तीच्या विश्वात चांगले नाव कमविले आहे. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मालिकेतील व्यक्तिरेखेबरोबरच कुस्ती जोपासणारी प्राजक्ता पाहायला मिळणार आहे. वीरूच्या भूमिकेत आपल्याला संकेत चिकटगावकर हा गुणी अभिनेता पाहायला मिळणार आहे. संकेत हा मूळच्या औरंगाबादजवळील वैजापूर इथला आहे. हे दोन्ही नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड या निर्मिती संस्थेने ह्या मालिकेची निर्मिती केली जात आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिली दैनंदिन मालिका असणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे करण्यात येते आहे.

सोनी मराठी वाहिनी नेहमी आशयघन विषय घेऊन येते ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे  होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळेल. वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशा प्रकारे होते आहे, हे आपल्याला १९ जूनपासून पाहता येणार आहे, आपल्या आवडत्या सोनी मराठी वाहिनीवर. नवी मालिका – ‘तुजं माजं सपान’. १९ जूनपासून, सोम. ते शनि., संध्या. ७ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.

 

परेश रावल यांची पहिल्यांदा एका मराठी कार्यक्रमात हजेरी

* सोमा घोष

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ परेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेत. ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. मागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती. या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे. नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेल. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल

‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका.

‘कोण होणार करोडपती’ विशेष, १० जून, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

“स्कूप” मधून अभिनेत्री करिश्मा तन्नाने घातली प्रेक्षकांना भुरळ ! 

* प्रतिनिधी

सोशल मीडियावर सध्या एका वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे ” स्कूप ” ! या हिट वेब सिरीजने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. उत्कंठावर्धक अभिनय असलेल्या करिश्माची ही सीरिज चर्चेचा विषय ठरते आहे. करिश्मा तन्नाने पत्रकार म्हणून साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घरात करून गेली. प्रतिभावान दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेब सीरिज उत्तम प्रकारे दिग्दर्शित केली आहे. ही मालिका पत्रकारितेच्या गुंतागुंतीचा शोध घेते असताना यातली सगळी पात्र कथा खिळवून ठेवतात. करिश्माने साकारलेलं पात्र जागृती पाठक हा एक चर्चचा विषय ठरला आहे. ” स्कूप” पत्रकारितेच्या प्रवासावर अनोखा प्रकाश टाकतो.

एका प्रतिष्ठित पुरुष पत्रकाराच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांनी तिला गुन्हेगार ठरवले आणि इथून गोष्ट सुरू होते. ” स्कूप” मध्ये असलेली महिला पत्रकार तिच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ उतार आणि पत्रकारिता मधला आव्हानात्मक प्रवास अश्या अनेक गोष्टी यातून बघायला मिळतात.

“स्कूप” मध्ये करिश्माच्या तन्ना हिच्या आकर्षक कामगिरीच जगभरात कौतुक झालं. उत्कृष्ट कथा असलेली स्कूप सध्या सगळ्यांची मन जिंकत आहे.

“स्कूप” नंतर करिश्मा तन्ना मनोरंजन इंडस्ट्रीत आता नवीन काय करणार आहे याचा चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच ती धर्मा प्रॉडक्शनमध्ये दिसल्याने आता करिश्मा नक्की काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

‘जिवाची होतीया काहिली’ मालिकेत अभिनेत्री उषा नाईक भद्राक्काच्या भूमिकेत

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जिवाची होतिया काहिली’ या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पण आता कार्तिकच्या येण्यामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले असून अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे.

आता मालिकेत एन्ट्री होणार आहे भद्राक्काची. भद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्री पाहता येणार आहेत. उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मालिकेतील त्यांच्या वेषभूशेबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल यात काही शंका नाही. भद्राक्का ही रेवथीच्या अप्पांची बहीण आहे. ती कोकटनूरांच्या घरी आल्यानंतर आप्पांचाही  थरकाप उडाला आहे. भद्राक्काच्या येण्याने वाड्यात कोणते नवीन वादळ येणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. रेवथी आणि अर्जुन यांच्या आयुष्यात भद्राक्काच्या येण्याने काय बदल होतील, हे आता पाहता येईल.

मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या  प्रेमकहाणीमध्ये काही नवे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळताहेत का? पाहा,  ‘जिवाची होतिया काहिली’ सोम. ते शनि. संध्या. 7.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

OTT ची राणी : अदिती राव हैदरी

* सोमा घोष

रुपेरी पडद्यावर काही अविस्मरणीय कामगिरी केल्यानंतर, ती सर्व OTT प्लॅटफॉर्मवर- Netflix, Amazon Prime Videos आणि Zee5 वर तिच्या रिलीजच्या चर्चा तर आहेत आणि ती नवनवीन भूमिकाच्या रिलीजसाठी तयार आहे.

सुमित्रा कुमारीचे तिचे पात्र खरोखरच मनोरंजन करणारे होते कारण सुमित्रा आणि अदिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि विविध परिस्थितींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातूनसारखा आहे. अदितीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत तिच्या अभिनयासाठी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि प्रशंसा होत आहे.

संपूर्ण भारतातील स्टार आणि अष्टपैलू अभिनेत्रीचे वर्ष खूप बिजी होते कारण ती विविध भाषा आणि शैलींमध्ये काम करत आहे. अलीकडेच तिने ताज: डिव्हाइड बाय ब्लड या मालिकेत अनारकलीची भूमिका केली होती. ती सध्या संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीसाठी चित्रीकरण करत आहे आणि विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत ‘गांधी टॉक्स’ हा मूकपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.

अनिल कपूरच्या कॅमिओसह जेरेमी रेनरचे पुनरुज्जीवन

* सोमा घोष

अनिल कपूरने ‘द नाईट मॅनेजर’मधील शेली रुंगटा या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि दहशत निर्माण केली. त्याचे पुढचे, Rennervations बद्दल सगळे बोलत आहेत. मालिका 12 एप्रिल 2023 रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे. तिच्या रिलीजपूर्वी, अनिल कपूरने अलीकडे सोशल मीडियावर जेरेमी रेनरला ‘सर्वात कठीण बदला घेणारा’ म्हटले.

 

नुकताच रिलीज झालेला प्रोमो सोशल मीडियावर सर्व स्टार्सना टॅग करत ‘जवळजवळ तिथे आहे’ असे म्हणतो.

https://twitter.com/vaneluna31p/status/1645484623626108928?s=48&t=66adpYptTczxf7-QQFlSGA

मालिका चार ठिकाणी सेट केली आहे: रेनरचे मूळ गाव रेनो; शिकागो; काबो सॅन लुकास, मेक्सिको; आणि अलवर, राजस्थान. प्रत्येक ठिकाणी, रेनर आणि मिलिकिन स्थानिक समुदायांच्या गरजा जाणून घेण्यासाठी बिग ब्रदर्स बिग सिस्टर्स, द BASE शिकागो, उवा जागृती संस्था आणि काबो सॅन लुकासच्या कासा होगरसारख्या संस्थांना भेटतात. त्यानंतर ते “काहीतरी अविश्वसनीय तयार करण्यासाठी जे शिकले त्याचा वापर करतात ज्याचा मोठा प्रभाव पडेल”

अनिल कपूरकडे रणबीर कपूरसोबत अॅनिमल आणि हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर आहे.

अभिनेत्री रूपल नंद नव्या भूमिकेत

* सोमा घोष

नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री रूपल नंद आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेतून रूपल नंद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात रूपलची नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी निरनिराळ्या मालिकांमधून विशेष व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रूपल नेहमीच मग्न असते. आता ती एका नव्या रूपात नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसणार आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबासाठी द्यायला पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. अशाच प्रकारची विशिष्ट व्यक्तिरेखा या मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटणार आहे, ती म्हणजे इन्स्पेक्टर भोसले. आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या आयुष्यातील दुसरी बाजू, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! मालिकेतून उलगडणार आहे. याव्यतिरिक्त अश्विनी कासारही या मालिकेतून पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.

पाहायला विसरू नका नवी मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें