* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिली' ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पण आता कार्तिकच्या येण्यामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले असून अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे.

आता मालिकेत एन्ट्री होणार आहे भद्राक्काची. भद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्री पाहता येणार आहेत. उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मालिकेतील त्यांच्या वेषभूशेबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल यात काही शंका नाही. भद्राक्का ही रेवथीच्या अप्पांची बहीण आहे. ती कोकटनूरांच्या घरी आल्यानंतर आप्पांचाही  थरकाप उडाला आहे. भद्राक्काच्या येण्याने वाड्यात कोणते नवीन वादळ येणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. रेवथी आणि अर्जुन यांच्या आयुष्यात भद्राक्काच्या येण्याने काय बदल होतील, हे आता पाहता येईल.

मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या  प्रेमकहाणीमध्ये काही नवे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळताहेत का? पाहा,  'जिवाची होतिया काहिली' सोम. ते शनि. संध्या. 7.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...