हेअरस्टाइल खास उन्हाळ्याकरता…

* भारती तनेजा

उहाळ्याच्या मोसमात हेअर कट आणि हेअर डू असा असला पाहिजे की सातत्याने केस नीट करावे लागणार नाहीत आणि स्टाइलही अबाधित राहील. या, आपण जाणून घेऊ अशाच काही हेअरस्टाइल्स…

लॉब कट

खूप लहानही नाहीत आणि खूप मोठेही नाहीत. अशा केसांच्या स्टाइलला लॉब कट म्हणतात. ही स्टाइल त्या स्त्रियांकरता खूप खास आहे, ज्या उकाड्यापासून बचावही करू इच्छितात परंतु त्यांना केस अधिक आखूड नको आहेत. अशा स्टाइलला तुम्ही बँग्स वा रोलर्ससह फ्लोट करू शकतात.

एसिमिट्रिक बॉब कट

या कटमुळे तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो. यात मागचे केस लहान आणि पुढचे केस मोठे असतात. अलीकडे या कटमध्ये डाव्या बाजूच्या तुलनेत उजव्या बाजूस मोठे केस ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. तसं बघता या कटसोबत साइडला एक मोठी फ्रिंजही ठेवू शकता.

बॉब वेव्स

शॉर्ट हेअर्सची ही आधुनिक स्टाइल अलीकडच्या काळात पसंत केली जाते. रोमॅण्टिक लुक निर्माण करणाऱ्या वेव्स आता लहान केस ठेवूनही कॅरी करता येतात. या स्टाइलद्वारे तुम्हाला सॉफ्ट लुक आणि कुल फिलिंग मिळेल.

क्रॉप स्टाइल

उकाड्यापासून बचाव करण्यासाठी केस छोटे ठेवू इच्छिता, सोबतच एखादी स्टाइलही कॅरी करायची असेल तर क्रॉप स्टाइल करून पाहा. यात केसांची टोकं ब्रोकन एम स्टाइलमध्ये कापलेली असतात आणि हे मेंटेन करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत नाही.

३ डी मॅजिक

केस मोठे ठेवून कोणतीही स्टाइल कॅरी करू इच्छित असाल तर तुम्हाला ३ डी मॅजिक हेअर कट नक्कीच पसंत पडेल. यामध्ये वरचे केस लहान, खालचे केस मोठे आणि मधले केस सामान्य लेन्थचे कापलेले असतात.

या कटमुळे केस मोठे आणि घनदाट दिसतात. ही स्टाइल तुम्हाला स्मार्ट लुक देते. ३ डी मॅजिक कटची जादू मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही पेहरावांसोबत शोभून दिसते.

साइडलेअर कट

स्वत:ला वेगळ्या लुकमध्ये पाहू इच्छित असाल तर केसांना साइड लेअरिंग स्टाइल देऊ शकता. हा तर एसिमिट्रिकल ढंगात दिसतो. यासाठी कटला वेट ड्रायरद्वारे हलकेच सेट करण्याची गरज असते. परंतु लक्षात घ्या, केस शोभून दिसतील त्याच साइडला सेट करा. साइड लेयरिंग तुम्हाला मॉडर्न आणि चेहऱ्याला यंग लुक देतं. जर केस कलर केले तर हे लेयरिंग खूप स्टायलिश दिसतात.

सॉक बन

मोठे केस कुणाला बरं आवडत नाहीत? परंतु कडकडीत उन्हामुळे व घामामुळे ते सांभाळणं खूप कठीण होऊन बसतं. त्यामुळे या सीझनमध्ये सॉक बन बनवणं क्विक व ईझि आहे. सोबतच ट्रेण्डीसुद्धा आहे. फॅशनबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडच्या काळात बाहेरच्या रॅम्प शोजमध्ये ही स्टाइल खूप हिट आहे. ही स्टाइल बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणतीही अॅक्सेसरी खरेदी करण्याची गरज नाही. केवळ घरी असणाऱ्या जुन्या मोज्यांद्वारे ही स्टाइल बनवता येते. ही स्टाइल खूप रीजनेबल असते, सोबतच केसांमध्ये व्हॉल्यूमही दिसून येतो.

फिशटेल

फिशटेल पाहायला थोडी कठीण वाटते, परंतु ही तुम्ही ५ मिनिटात सहजी बनवू शकता. ही बनवण्यासाठी केस दोन भागांमध्ये विभाजित करा. आता एका साइडचे थोडे केस घ्या, त्यानंतर दुसऱ्या साइडचे घ्या आणि वेणी घाला. अशाप्रकारे खालपर्यंत वेणी बनवा. ही वेणी वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारच्या ड्रेसवर शोभून दिसेल.

स्लीक्ड बॅक पोनी

पोनीटेल बनवण्याचा हा लेटेस्ट पॅटर्न केवळ तुमच्या फॉर्मल आउटफिटवरच नव्हे, तर कॅज्युअलवरही छान शोभून दिसेल. केसांना प्रेसिंग मशिनद्वारे स्ट्रेट लुक द्या आणि त्यानंतर त्यात हलकेच जेल लावा. असं केल्याने लुक स्लीक्ड दिसेल आणि स्टाइलही बराच काळ टिकून राहील. यानंतर क्राउन एरियापासून केस विंचरत केस उचला आणि खालच्या बाजूस कानांपर्यंत टाइट पोनीटेल बांधा.

कॉर्पोरेट बन

आपल्या लुकला कॉर्पोरेट स्टाइल देण्यासाठी हे जरूर आहे की केस एकदम व्यवस्थित बांधलेले असतील, जेणेकरून ते सतत चेहऱ्यावरही येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम कंगव्याने केसाचा गुंता सोडवून जेल लावून ते सेट करून घ्या, जेणेकरून ते सहज चिकटतील. यानंतर साइड पार्टीशन करून पुढून फिंगर कोंब करा आणि सर्व केस मागे घेऊन जात बन बनवा आणि बॉब पिनने व्यवस्थित बांधा.

बनला हलकेच फॅशनेबल टच देण्यासाठी ते स्टायलिश अॅक्सेसरीजद्वारे सजवा वा मग कलरफुल पिनने सेट करा. या स्टाइलमुळे सगळे केस बांधलेले राहातील आणि तुम्ही उकाड्याने त्रासणारही नाही.

पन

हाफ बन हाफ पोनीची ही लेटेस्ट स्टाइल उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या पसंतीस उतरेल. ही स्टाइल ऐकायला जितकी मजेदार आहे, तितकीच करण्यासाठी सोपी आहे, तर मग वाट कसली पाहाता, क्यूट व कूल स्टायलिंगसाठी या उन्हाळ्याच्या मोसमात पन स्टाइल करून पाहा.

रीवर्स वेज

गायिका रिहानासारखे या हेअरस्टाइलमध्ये मागचे केस लहान आणि पुढचे मोठे असतात. ही हेअरस्टाइल करून तुम्ही सडपातळ व तरुण दिसाल.

सेल्फीमुळे वाढली सर्जरीची क्रेज

– एनी अंकिता

आजचे तरुण सेल्फीसाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार असतात. बस्स, सेल्फी चांगली यावी, जेणेकरून सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड करून त्यांना सर्वांची प्रशंसा मिळवता येईल.

मीडियामध्ये जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार, २०१५ साली ओठांच्या सर्जरीचा एक नवीन रेकॉर्ड समोर आला आहे. अमेरिकेत आकर्षक पाउट घेऊन फोटो काढण्यासाठी लोक ओठांची सर्जरी करून घेत आहेत. इथे दर १९ मिनिटाला ओठांची सर्जरी होत आहे. अमेरिकेन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जंसच्या एका सर्वेक्षणातून असं कळलं आहे की, २०१५ मध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये २७, ४९९ लिप इम्प्लांट्स झाले आहेत, जे २०००च्या तुलनेत ४८ टक्के जास्त आहेत. अमेरिकेत प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. दुसऱ्या स्थानी ब्राझिल, तिसऱ्या स्थानी चीन आणि चौथ्या स्थानी भारताचा क्रमांक येतो.

का वाढतंय याचं प्रस्थ

अलीकडे सोशल मीडियामुळे लोक आपल्या सौंदर्याच्या बाबतीत काही जास्तच जागरूक झाले आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण झाली आहे. होय, आता ते जेव्हा सोशल साइट्सवर इतरांचे फोटो बघतात, तेव्हा ते स्वत:लाही तसंच दाखवण्याचा प्रयत्न करू लागतात. अलीकडे भुवया वर करून पाउट बनवून फोटो काढण्याच्या ट्रेण्डचं प्रस्थ सुरू आहे आणि यासाठीच स्त्रिया आकर्षक पाउट लिप्स मिळवण्यासाठी सर्जरी करून घेत आहेत.

खरंतर ओठ खूपच पातळ असतील तर हसताना ते दिसत नाहीत. बऱ्याचदा ओठांचा आकार बरोबर नसतो. वरचा ओठ खूपच पातळ तर खालचा ओठ जाड असतो. कधीकधी एखाद्याच्या ओठांवर एक छोटासा उभार असतो, जो पूर्ण सौंदर्य बिघडवून टाकतो. वाढत्या वयाबरोबर ओठांचे कोपरेही लोंबकळू लागतात, तेदेखील सर्जरी करून सुधारले जाऊ शकतात.

वेगवेगळे उपचार

इंजेक्शनमध्ये आर्टिफिशियल किंवा नैसर्गिक फिलर भरून ओठांमध्ये इंजेक्ट केलं जातं, ज्यामुळे ओठ भरलेले दिसू लागतात. पण हे फक्त काही महिन्यांसाठीच असतं. ही एक अस्थायी पद्धत आहे. स्थायी परिणामासाठी इंम्प्लांट आणि सर्जरीसारखे पर्याय आहेत, ज्यामध्ये वारंवार इंजेक्शनच्या प्रोसेसमधून जावं लागत नाही.

लिप इन्हांसमेंट, फॅट ट्रान्सफर  इंजेक्शन : यामध्ये तुमच्या शरीरातील ज्या भागात जास्त फॅट असतं, तिथून फॅट घेऊन ओठांमध्ये इंजेक्ट केलं जातं, ज्यामुळे ओठ भरलेले आणि जाड दिसू लागतात.

डर्मल ग्राफ्ट सर्जरी : त्वचेच्या खोल थरात जाऊन तिथून वसा काढली जाते आणि ती ओठांच्या कडेला म्हणजे मोस्कोसाच्या आत भरली जाते, ज्यामुळे ओठ भरलेले दिसू लागतात.

लिप इम्प्लांट : ही तोंडाच्या आतमधून केली जाणारी सर्जरी आहे. याचे अनेक नैसर्गिक आणि सिंथेटिक इम्प्लांट पर्याय उपलब्ध आहेत.

बॉलीवूड अभिनेत्रीही मागे नाहीत

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी बॉलीवूडच्या या अभिनेत्रींनीही लिप सर्जरी केली आहे :

अनुष्का शर्मा : अनुष्का शर्माने जेव्हा शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटातून आपल्या चित्रपट करिअरची सुरूवात केली तेव्हा तिचा चेहरा नॅचरल होता. पण २०१२ साली जेव्हा ‘जब तक है जान’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटात अनुष्काचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व दिसून आलं. तिचे ओठ पूर्वीसारखे पातळ नव्हते, त्यामध्ये भरीवपणा आलेला.

राखी सावंत : कायम चर्चेत राहाणाऱ्या राखी सावंतला सर्जरी क्वीन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वत:ला जास्त ग्लॅमरस दाखवण्यासाठी राखीने अनेक प्रकारच्या सर्जरी केल्या आहेत. त्यापैकी एक लिप सर्जरीही आहे.

प्रियंका चोप्रा : प्रियंका ही गोष्ट स्वीकारत नाही की तिने सर्जरी केली आहे, पण तिचे ओठ खोटं बोलत नाहीत. त्यावरून स्पष्ट कळतं की तिने सर्जरी करून घेतली आहे.

कतरीना कैफ : बॉलीवूडची बार्बी डॉल कतरीना कैफ आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिनेही सर्जरी करूनच आपल्या ओठांना भरीवपणा आणला आहे. मात्र ही गोष्ट तिने सर्वांसमोर स्वीकार केली नाहीए. मात्र पातळ लिप्सपासून पाउट लिप्सचा झालेला बदल सर्वांनाच सांगत आहे की तिने लिप सर्जरी केली आहे.

स्त्रियांना हवीय सेल्फी स्माइल

सेल्फी म्हणजे चेहऱ्याचा फोटो, ज्यामध्ये शरीराचा इतर भाग कमीच दिसतो, चेहऱ्यावर जास्त फोकस केला जातो. यामुळेच स्त्रिया आपल्यातील कमतरता लपवण्यासाठी सर्जरीचा आधार घेत आहेत. त्या ओठांना आणि नाकाला योग्य शेप देण्यासाठी सर्जरी करत आहेत. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी सर्जरी करत आहेत. इतकंच नव्हे तर, त्या आपले वाकडेतिकडे दातही चांगले करत आहेत.

समर-स्पेशल समर हेअर प्रॉब्लेम्सला म्हणा बायबाय

* सीमा घोष

उन्हाळयाचा मोसम सुरू होताच केसांची समस्या जास्त त्रास देऊ लागते. अशा वेळेस या मोसमात केसांना अतिरिक्त देखभालीची गरज असते.

याविषयी मुंबईच्या ‘क्युटिस स्किन सोल्युशन’ची त्वचारोग विशेषज्ञ डॉ. अप्रतिम गोयल सांगतात की उन्हाळयाच्या मोसमात केसांचा ओलावा नाहीसा होतो. ते निर्जीव होऊन गळायला लागतात. पण काही गोष्टींची काळजी घेऊन केसांना या मोसमातील समस्यांपासून वाचवले जाऊ शकते.

स्टिकी हेअर प्रॉब्लेमचे निदान

डोक्याच्या त्वचेत चिकटपणामुळे केस चिपचिपे आणि निर्जीव दिसून येतात. यामुळे डोक्याच्या त्वचेवर कोंडा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे केसांचे गळणे सुरु होऊन जाते. अशा स्थितीत या गोष्टी लक्षात असू द्या

* सर्वात अगोदर अशा शँपूची निवड करा, ज्यात मॉइश्चरायजर नसेल.

* प्रत्येक दुसऱ्या दिवशी शँपू करा. ज्यामुळे केसांत तेल साचणार नाही, कारण यामुळे नैसर्गिक रूपात मलासेजिया नावाची बुरशी तयार होते, जी डैंड्रफचे कारण बनते.

* तेलकट केसांसाठी नेहमी थंड पाण्याचा उपयोग करा.

* कंडिशनरचा वापर करू नये.

* जास्त केस विंचरू नये. यामुळे तेलग्रंथी उत्तेजित होतात.

* केस धुतल्यानंतर ते सुकण्याच्या आधी घट्ट बांधू नये. ओल्या केसांमध्ये घाम आल्याने ते तेलकट होऊन जातात.

* प्रोटीनयुक्त आहार घ्या, कारण प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस निर्जीव होतात.

* बाहेर पडण्याआधी केसांना झाकून घ्या.

तेलकट स्कैल्पचा उपचार

स्कैल्पमध्ये बरेच सिबेशन ग्लँड्स बनलेले असतात, ज्यापासून सीबम निघतो, जो केसांसाठी खूप फायद्याचा असतो. हा केसांना निरस आणि निर्जीव होण्यापासून वाचवतो. पण हा अधिक प्रमाणात स्त्रावल्याने केस तेलकट होतात.

या टिप्स अवलंबून या समस्येला दूर करता येईल :

* तेलकट स्कैल्पसाठीही उन्हाळयाच्या मोसमात शँपूचा वापर प्रत्येक दुसऱ्या दिवशी करा.

* जर आपण डेली वर्कआउट किंवा व्यायाम करत असाल तर शँपूचा उपयोग दररोज करा, कारण या मोसमात घामापासून स्कैल्पची रक्षा करणे आवश्यक आहे.

* जर स्कैल्प तेलकट असेल तर कधी-कधी ड्राय शँपूचा स्प्रेपण केसांत करू शकता. हा स्कैल्पच्या ऑईलला शोषून केसांना चिकट होण्यापासून थांबवतो.

* उन्हाळयाच्या मोसमात स्कैल्पवर तेल लावणे बंद करा. कारण जर स्कैल्प तेलकट असेल, तर तेल त्याला अजून जास्त तेलकट बनवू शकतो. या मोसमात अँटी डैंड्रफ शँपू ज्यात अँटी फंगल असेल, त्याचा जास्त वापर करा. ज्यात कीटोकोनाजोल आणि सैलिसिलिक अॅसिड असेल.

केसगळती आणि प्रदूषणपासून रक्षण

डॉ. अप्रतिमच्या म्हणण्यानुसार एका अभ्यासातून दिसून आले की युथ, जे जास्त करून शहरात काम करतात. त्यांना स्कैल्पमध्ये खाज, ऑयली स्कैल्प, डैंड्रफ आणि केसांच्या गळतीची समस्या अधिक भेडसावते. याचे मुख्य कारण सततचे प्रदूषण वाढणे आहे. जर स्कैल्पमध्ये धूळ-माती, निकल, लीड, आर्सेनिक इत्यादी साचले गेले तर केस गळतीची समस्या सुरु होते. या समस्येपासून बचावाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत :

* क्लींजिंग सगळयात चांगला उपाय आहे. यासाठी केसांना अधूनमधून शांपू करून स्चच्छ ठेवा. ऑयली स्कैल्पसाठी अल्टरनेट डे आणि ड्राय किंवा रंगवलेलेल्या केसांसाठी शँपूची फ्रिक्वेन्सी कमी ठेवा. लक्षात ठेवा, या मोसमात स्कैल्प आणि केसांना नेहमी स्वच्छ आणि हेल्दी ठेवा, ज्यामुळे हेअरफॉल कमी होईल.

* या मोसमात केसांची डीप कंडिशनिंग करणे आवश्यक आहे. कारण यामुळे प्रदूषणाने डॅमेज झालेल्या केसांचे ड्राय होणे, तुटणे, गळणे इत्यादी कमी होते. आठवडयातून एकदा डीप कंडिशनिंग जरूर करा.

* केसांना प्रदूषणपासून वाचवण्यासाठी कंडिशनरचा उपयोग करा. ज्यामुळे हा स्कैल्प आणि केसांवर बैरियरचे काम करेल.

घरगुती हेअर मास्क

* एलोवेरा मास्क खूप चांगला हेअर केअर मास्क आहे. याच्या जैलने ड्राय हेअर आणि प्रभावित स्कैल्पचा मसाज करा. २० मिनिटांनंतर कोमट गरम पाण्याने धुऊन माइल्ड शँपू करा.

* २-३ स्ट्राबेरी कुस्करून त्यात २ मोठे चमचे मेयोनेज मिसळून मास्क बनवा व स्कैल्पवर लावा. स्ट्रॉबेरी तेलाचे स्त्रवणे नियमित करते, तर मेयोनेज आर्द्रता देते. हेसुद्धा २० मिनिटे स्कैल्पला धुवून घ्या.

* केळी, मध आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण करून कंडिशनर तयार करा आणि २० मिनिटांपर्यंत लावून ठेवा. नंतर धुऊन घ्या. हा खूप फायद्याचा कंडिशनर आहे.

अशा सलूनमध्ये जाणे टाळा

* रोचिका शर्मा

उद्या सोहाला दरमहा होणाऱ्या तिच्या किट्टी पार्टीला जायचे आहे, म्हणून घरातील कामे पूर्ण करून ती सलूनला निघून गेली. तसे ती दरमहा वॅक्स, हेअर कट, आयब्रोज करते, परंतु यावेळी किट्टी रॅट्रो थीमवर आयोजित केली जात आहे, म्हणूनच तिला ७०-८० च्या दशकातील अभिनेत्रीसारखे काहीसे खास तयार व्हायचे आहे. त्या काळात केशरचनेवर विशेष भर दिला जात असे. म्हणून जेव्हा सलूनमध्ये गेल्यानंतर तिने केशरचनेबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी विविध प्रकारच्या स्टाइल दाखवल्या आणि दुसऱ्या दिवशी येण्याचा वेळ निश्चित केला.

सदस्यता आणि सवलतीचा लोभ

‘‘मॅडम, तुम्ही किट्टी पार्टीची तयारी करतच आहात तर मग आमचा नवीन डायमंड फेशियल का करून घेत नाहीत? एकदा केल्यानेही खूप चमकेल,’’ सलूनमध्ये काम करणारी मुलगी म्हणाली.

‘‘या फेशियलमध्ये काय विशेष आहे?’’ सोहाने विचारले.

‘‘मॅडम, हा टॅन रिमूव्हिंग फेशियल आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅन बरोबरच मृत त्वचादेखील दूर होईल, ज्यामुळे चेहऱ्यावरील डागही कमी होतील. त्यामुळे चेहरा चमकदार होईल. एकदा करून तर पहा.’’

‘‘या फेशियलचा दर काय आहे?’’

‘‘मॅडम काही खास नाही, फक्त रू. २,२००.’’

‘‘हे तर खूप महाग आहे?’’

‘‘मॅडम, आपल्याकडे सलूनची सदस्यता आहे का?’’

‘‘नाही, पण का?’’

‘‘मॅडम, तुम्ही सदस्यत्व घ्या. आम्ही सदस्यांना सवलत देतो. जेव्हा-जेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबातील एखादा सदस्य आमच्याकडून सेवा घेईल तेव्हा आम्ही त्याला सूट देऊ आणि आजच्या फेशियलमध्येही तुम्हाला २० टक्के सवलत मिळेल.’’

सोहा काय करावे या पेचात पडली होती. तेवढयात समोरच्या आरशामध्ये तिने चेहरा पाहिला. मुरुमं दिवसेंदिवस वाढतच होते, म्हणून तिने विचारले, ‘‘या फेशियलमुळे हे डागसुद्धा कमी होतील का?’’

‘‘हो मॅम, पण त्यांना काढून टाकण्यासाठी तुम्हाला ३-४ सेटिंग्स घ्याव्या लागतील, कारण डाग जुने आहेत.’’

स्वत:ला सुंदर दिसण्यासाठी फेशियल करून घेण्यास सोहाने सहमती दर्शविली.

एक तासानंतर जेव्हा तिने तिचा चेहरा पाहिला तेव्हा ती खरोखरच चमकली होती.

पण विचार करण्यासारखी बाब म्हणजे मुरुमं कधी फेशियलने जाऊ शकतात का?

होय, तात्पुरता फरक नक्कीच येईल, कारण चेहऱ्याच्या मालिशद्वारे रक्त परिसंचरणात वाढ झाल्याने चेहऱ्याची साफसफाई होऊन जाते. परंतु मृत त्वचा काढून टाकल्यामुळे, मुरूमंयुक्त त्वचा अतिनील किरणांसाठी पूर्वीपेक्षा अधिक एक्सपोज झाली. म्हणूनच सोहा तिच्या त्वचेच्या मुरुमांच्या उपचारांसाठी त्वचारोग तज्ज्ञांकडे गेली असती तर बरे झाले असते.

नवीन उत्पादनांचा वापर आणि खर्च

याचप्रमाणे नेहादेखील एक दिवस सलूनमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने सांगितले की ती बिकिनीची शेव करून-करून अस्वस्थ झाली आहे, मासिक कालावधीत तर विशेषकरून समस्या होते. नंतर जेव्हा केस पुन्हा येऊ लागतात तेव्हा ते खूप दाट असतात, जे टोचू लागतात. आता अशा ठिकाणीवारंवार स्क्रॅच करायला चांगले वाटत नाही. मग सलूनमध्ये काम करणारी मुलगी म्हणाली मॅडम, बिकीनी वॅक्स करा. संपूर्ण महिना आराम वाटेल.

एकदा नेहा कचरली, मग विचार केला की प्रयत्न करण्यात काही नुकसान होणार नाही. मग जेव्हा सलूनमधील मुलीने विचारले मॅडम वॅक्स कोणता, नॉर्मल की मग फ्लेवर्ड, तेव्हा नेहा म्हणाली की फक्त नॉर्मलच करा.

यावर मुलीने म्हटले की ती फक्त फ्लेवर्ड वॅक्सच करेल, कारण यामुळे सहजपणे बिकिनीचे केस निघतात.

आता नेहा पहिल्यांदाच बिकिनी वॅक्स घेत असल्याने म्हणाली ठीक आहे, पण जेव्हा बिल पाहिले तेव्हा ते २ हजार रुपये होते. सामान्य वॅक्सपेक्षा दुप्पट. अरेरे, तिच्या तोंडातून निघाले.

जेव्हा नेहाने घरी येऊन आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली की वॅक्स ते वॅक्स आहे, त्याचे काम केसांवर चिकटणे आहे. जेणेकरून त्यावर वॅक्सिंग स्ट्रिप चिकटवून केस ओढले जातील. त्यात फ्लेवरने काय फरक पडेल? पैसे कमविण्याचा हा मार्ग आहे.

डोळे दिपवणाऱ्या ऑफरी

नवीन वर्षात सूट किंवा दिवाळी निमित्त हे नवीन पॅकेज अशा अनेक बहाण्यांनी सलून काही ना काही ऑफर देतात. या पॅकेजेसमध्ये वॅक्स, आयब्रो, मॅनीक्योर, पेडीक्योर, हेअर कट इ. सह केसांचा रंग मुक्त.

अशा पॅकेजसमध्ये केसांच्या रंगाचे पैसे आधीपासूनच जोडलेले असतात. मग जर रंगीबेरंगी केस एकदा तुम्हाला अनुकूल ठरलेत, इतर लोकांनी तुमची स्तुती केली, तर आपण दरमहा त्यांचे ग्राहक बनता. एकंदरीत, सलूनने नफा कमावला आणि आपणही आनंदी असता. परंतु यामध्ये आपण हे विसरता की केसांच्या रंगात रसायने असतात, ज्यामुळे आपल्या केसांचे नुकसान होते.

रंगीत केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते, जे आपण करू शकत नाही. आता जेव्हा आपले केस खराब होतात, तेव्हा आपण पुन्हा सलूनवाल्याला विचारता, ‘‘मी काय करावे, माझे केस गळत आहेत आणि केस रफदेखील झाले आहेत.’’

मग ते त्यांच्या सलूनमध्ये ठेवलेल्या बऱ्याच मोठया कंपन्यांची उत्पादने वापरण्यास सांगतात. त्यांचे कमिशन निश्चित असते. एकंदरीत, सलूनवाल्यांचा फायदा आणि आपले बुद्ध बनणे.

पॅकेजांची भरमार आणि आपण बांधले जाणे

याचप्रमाणे, आजकाल सलूनमध्ये आणखी एक नवीन पॅकेज तयार आहे. जर आपण आमच्या सेवांवर ३ महिने सतत ३ हजार रुपये खर्च केले तर आपल्या केसांचा कट चौथ्या महिन्यासाठी विनामूल्य आहे. आता ग्राहक दरमहा दीड किंवा दोन हजार सलूनमध्ये खर्च करतो, परंतु त्या मोफत हेअर कटसाठी तो दरमहा जादा सेवा घेऊन ३ हजार खर्च घेतो. तो विचार करतो की हे ३ हजार सेवेचे आहेत. नंतर हेअर कट मोफत आहे. येथे हे समजण्याचा प्रयत्न करा की जगात काहीही मोफत नसते. आपल्याला कुठेतरी किंमत मोजावीच लागते. अशाप्रकारे, प्रत्येक ग्राहकांकडून 3 हजार मिळविल्यानंतर त्यांचे उत्पन्न निश्चित होते आणि आपण तेथे ४-५ महिन्यांसाठी जाणारच, कारण आपल्याला विनामूल्य हेअर कट जो करायचा आहे.

आपण पैसे देऊन त्या एकाच सलूनमध्ये बांधले जाता. आपल्याला त्यांचे काम जरी आवडत असले किंवा नसले तरीही इतरत्र जाण्याचा विचारही करू शकत नाही.

पॅकेजची आगाऊ रक्कम

त्याचप्रकारे, निहारिकाने एक पॅकेज घेतले जे दोन दिवसात पूर्ण करायचे होते. पहिल्या दिवशी तिने केस रंगवले. तिला टाळूमध्ये खूप खाज येऊ लागली. घरी पोहोचताच तिच्या डोक्यावर लाललाल पुरळ उठली. त्यांच्यामुळेच तिला डॉक्टरकडे जावे लागले. हे कळले की तिच्या केसांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगामुळे तिच्या डोक्यात एलर्जीची प्रतिक्रिया उद्भवली आहे. तिला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी ती सलूनमध्ये जाऊन म्हणाली की तिचे पॅकेजचे पैसे परत करावे, ती तेथून कोणतीही सेवा घेऊ इच्छित नाही. पण सलूनवाले पैसे परत देण्यास तयार नव्हते.

ते म्हणाले की मॅडम ऑनलाइन सिस्टममध्ये हे सर्व पूर्वीच दिले गेलेले असते. आपण पॅकेज घेतला आणि त्यासाठी पैसे दिले, आता आपल्याला सेवा घ्याव्या लागतील. जर आपणास अर्ध्या सेवा घेतल्यानंतर सोडायचे असेल तर आमचा दोष काय? आणि आपल्याला कोणत्या उत्पादनापासून एलर्जी आहे हे देखील आपण सांगितले नाही. या उत्पादनाद्वारे अन्य कोणत्याही ग्राहकांचे नुकसान झाले नाही. आपण अशी तक्रार येथे आणणारी पहिलीच महिला आहात.

मग काय, निहारिका स्वत:चे चिमणीएवढे तोंड करून घरी परतली.

बनावट उत्पादनांची ओळख

आजकाल सर्व मोठया ब्रँडचे बनावट प्रॉडक्ट्स बाजारात विकले जात आहेत. अगदी बनावट वस्तूंची विक्रीही ऑनलाइन केली जात आहे. हीच बनावट उत्पादने बऱ्याच सलूनमध्ये वापरली जातात. ग्राहकांना याची कल्पना नसते आणि तेथे मोठी किंमत देऊन ते सेवा घेतात, तर सलूनवाल्यांना कमी किंमतीत ते बनावट उत्पादने मिळतात. सलूनला यातून बरेच पैसे मिळतात.

आता मुद्दा हा आहे की ग्राहक या बनावट उत्पादनांना कसे ओळखू शकेल? तर सर्वप्रथम, जेव्हा ग्राहक सलूनमध्ये सेवा घेतो, तेव्हा वापरलेल्या उत्पादनांच्या पॅकिंगची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि बॅच नंबर पहा, कारण बाजारात रिपॅकिंग केलेले उत्पादने उपलब्ध असतात म्हणजेच पॅकिंग मटेरियल अस्सल असते आणि त्यामध्ये भरलेला माल बनावट असतो. आपण वापरलेल्या मूळ उत्पादनांच्या रिक्त बाटल्या, डबे रद्दीवाल्याला विकून टाकतो किंवा कचऱ्यामध्ये टाकतो. या बाटल्या आणि बॉक्स बनावट वस्तूंच्या पॅकिंगमध्ये वापरले जातात. बनावट उत्पादनांच्या वापरामुळे जळजळदेखील उद्भवू शकते, हे देखील ते बनावट असल्याचा पुरावा आहे.

सलूनमध्ये विक्री होणारी उत्पादने

त्याचप्रमाणे एकदा निहारिका केस कापण्यासाठी मोठया सलूनमध्ये गेली आणि बरोबर मुलीलाही घेऊन गेली. तिथे केस कापण्यापूर्वी केस धुणे आवश्यक असते. सलूनच्या स्टाफने केस धुऊन हेअर कट केला आणि बिलिंगच्यावेळी म्हणाली, ‘‘मॅडम, तुमच्या मुलीचे केस खूप रफ झाले आहेत. केस कापताना मला कंघी घ्यायलाही त्रास होत होता. तुम्ही त्यासाठी आमच्या सलूनमध्ये ठेवलेली उत्पादने का वापरत नाहीत? हे पहा …’’ असं म्हणत तिने आपल्या सलूनच्या शोकेसमधील बरीच महागडी उत्पादने दाखवली.

आपल्याकडून पैसे काढण्याची ही युक्ती असल्याचे निहारिकाला समजले. म्हणून, उत्पादने पाहिल्यानंतर तिने सांगितले की मी नंतर विचार करेन. पण कर्मचाऱ्याला पुढे ढकलणे कुठे सोपे होते. ते उत्पादन विकल्यानंतर तिला कमिशन मिळणार होते, म्हणून ती म्हणाली की ‘‘मॅडम ऑर्गेनिक उत्पादने आहेत. यामुळे आपल्या मुलीचे केस चांगले राहतील, नाहीतर खूप वाईट होतील.’’

निहारिका त्यांच्या जाळ्यात अडकायला तयार नव्हती, म्हणून ती म्हणाली, ‘‘मी घरी तिचे केस धुण्यासाठी आवळा, रीठा, शिकाखाईचा वापर करते आणि त्यामुळे मी खूप समाधानी आहे.’’

त्याचप्रमाणे, जेव्हा सत्या केस कापण्यासाठी गेली, तेव्हा केस धुताच तिच्या केसांना मेहंदीचा सुगंध येऊ लागला, कारण ती मेहंदी वापरत असे. सलूनची स्टाफ केस कापताना तिला म्हणाली की मॅडम तुमच्या केसांपासून वास येत आहे. मेहंदीऐवजी केसांचा रंग का वापरत नाहीत?

स्टाफचे म्हणणे ऐकून सत्या म्हणाली, ‘‘तुम्ही ज्याला वास बोलत आहात, आम्हाला तो सुगंध वाटतो, आपण केस कापा, त्याशिवाय काहीही करु नका.’’

ब्रायडल मेकअपचा ट्रेडिशनल ढंग

* ललिता गोयल

प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं की तिने आपल्या विवाहप्रसंगी सर्वात सुंदर अन् खास दिसावं. तिचा मेकअप ग्लोइंग, नॅचरल आणि लाँगलास्टिंग असावा असं तिला वाटत असतं.

दिल्ली प्रेस भवनमध्ये आयोजित मीटिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट गर्वित खुरानाने ब्रायडलचा ट्रेडिशनल लुकचा मेकअप शिकवण्यासोबत टीका सेटिंग, हेअरस्टाइल व साडी ड्रेपिंगसुद्धा शिकवलं. येथे ट्रेडिशनल लुकच्या मेकअपचं तंत्र जाणून घेऊया…

्रेडिशनल ब्रायडल लुक

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचं व्यवस्थित क्लिंजिंग करा. त्यानंतर एक अंडरबेस लावा जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकून राहिल. गर्वितने ट्रेडिशनल ब्राइडच्या मेकअपमध्ये एक प्रकारच्या पॅनकेक (लस्टर पॅनकेक)चा वापर केला. त्याने मेकअपच्या सुरुवातीला प्रायमर लावलं. त्यानंतर बेस लावला. मग टीएल पावडर लावली. त्यानंतर पॅनकेक लावला. चेहऱ्यावरील डागव्रण लपवण्यासाठी कन्सीलरचाही वापर केला.

गर्वितने सांगितलं की अलीकडे ब्रायडल मेकअपमध्ये शिमर लुक ट्रेण्डमध्ये आहे, त्यामुळे जर एखाद्या नववधूची इच्छा असेल तर ती आपल्या मेकअप आर्टिस्टला शिमर फाउंडेशनचा वापर करायलाही सांगू शकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही शाइनिंग पावडर लावणार असाल, तर लूज पावडरचा वापर करू नका; कारण यामुळे फाउंडेशनची चमक फिकी पडेल. फेसकटिंग व कंटूरिंगच्या माध्यमातून सामान्य चेहरासुद्धा नीटसा कोरीव दिसू लागतो.

हायलाइटरच्या मदतीने चेहऱ्यावरील आकर्षक भाग हायलाइट करा. ब्लशरमध्ये हलक्या शेडचा जसं की पिंक, पीच रंगाचा वापर करा.

डोळे : कोणत्याही वधूच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप खूप महत्त्वपूर्ण ठरतो. डोळ्यांवर आयशॅडो लावण्यापूर्वी आयलिडवर आयवॅक्स लावा. यामुळे आयशॅडो दीर्घकाळ टिकेल. अशाचप्रकारे लोअर आयलिडवर आयशॅडो आयसिलरसोबत लावा, मग ते पसरणार नाही. काजळ पेन्सिलने डोळे हायलाइट करा. काजळ लावल्यानंतर आयलायनर लावा. त्यानंतर मसकारा लावा. मसकारा आतील लॅशेजवर हलक्या रंगाचा आणि बाहेरच्या बाजूला थोड्या गडद रंगाचा वापरा. बाहेरच्या बाजूला थोडा अधिक गडद करा आणि भुवयांकडे थोडा हलका ठेवा. डोळे जर लहान असतील, तर ते मोठे दाखवण्यासाठी पापण्यांच्या बाहेरील कडेवर वरच्या बाजूस हलक्या रंगाची पावडर शॅडो छोट्या ब्लशरच्या मदतीने लावा. क्रीमजवळ गडद रंगाच्या शॅडोचा उपयोग करा परंतु नाकाकडे डोळ्यांच्या आतील भागावर कोणताही रंग वापरू नका. नाहीतर लहान डोळे अधिक लहान दिसतील. कडांवर शॅडो लावण्यासाठी ब्रशचा वापर करा.

ओठ : अलीकडे ग्लॉसी ओठांची फॅशन आहे. यासाठी आधी ओठांना लिपलायनरच्या सहाय्याने आकार द्या. मग ड्रेसला मॅच करणारी लिपस्टिक लावा. लिपस्टिक ब्रशने लावा. यानंतर लिपग्लॉस लावा. लक्षात घ्या की लिपस्टिकचा रंग ब्रायडल ड्रेसहून १वा २ नंबर गडद असावा.

बिंदी : बिंदी ट्रेडिशनल ब्रायडल मेकअपचा महत्त्वपूर्ण हिस्सा ठरते. ब्रायडल बिंदीची निवड चेहऱ्यानुसार करा. जर चेहरा गोल असेल तर लांबट बिंदीची निवड करा आणि लांबट असेल तर गोल बिंदीची आणि जर चौकोनी असेल तर डिझायनर बिंदी लावा.

हेअरस्टाइल : नववधूचा मेकअप खास असेल तर हेअरस्टाइलही डिफरण्ट व एलिगंट असली पाहिजे. ब्राइडला स्टायलिश हेअरस्टाइल देण्यासाठी सर्वप्रथम इयर टु इयर केसांचा एक भाग बनवा. मागच्या केसांचा एक पोनी बनवा. इयर टु इयर भागातून एक रेडियल सेक्शन घ्या आणि क्राउन एरियामध्ये आर्टिफिशिअल बन लावून पिनने सेट करा. मग रेडियल सेक्शनच्या केसांची एकेक बट घेऊन बॅककौंबिंग करून स्प्रे करा. या केसांचा उंच पफ बनवा आणि पिनने व्यवस्थित सेट करा. दोन्ही बाजूंच्या केसांमध्येही स्प्रे करून पोनी वरच्या बाजूला सेट करा.

आता पोनीवर आर्टिफिशिअल लांबट वेणी बनवा. पोनीवर गोल आर्टिफिशिअल मोठा बन लावा. आर्टिफिशिअल केसांमधून १-१ बट घेऊन बनच्यावर पिनने सेट करा. मग त्या केसांची नॉट बनवून बनवरच बॉब पिनने सेट करा. अशीच एक वेणी ३ नॉट अंबाड्यामध्ये गोलाकार तर दुसरीकडेही तशीच नॉट लावा. आता अंबाड्याच्या साइडला आणखीन एक वेणी लावा. अखेरीस केस बीड्सद्वारे अॅक्सेसराइज करा. पुढे समोरच्या बाजूलाही अॅक्सेसराइज करा.

मांगटीका सेटिंग

नववधूचा शृंगार मांगटीक्याविना अपूर्ण भासतो. नववधूच्या साजशृंगारातील हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा मानला जातो. सध्या चांदबाली स्टाइल व स्टोन पेंडेंट मांगटीका चलनात आहे. सेंटर पार्टिंग हेअरस्टाइल व सिंपल ब्रायडल बन हेअरस्टाइलसोबत मांगटीका नववधूचं सौंदर्य खुलवतो. जर कुणी ब्राइड मुगल लुक क्रिएट करू इच्छित असेल तर ते झुमर स्टाइल वा शैंडलियर स्टाइल मांगटीका लावू शकता.

मांगटिक्यासोबत अपडू, हेअर हाफ अप आणि साइड बॅगसारखी हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. या हेअरस्टाइलसोबत कपाळावर चमकणारा मांगटीका अतिशय आकर्षक दिसतो. गोल चेहऱ्याच्या तरुणींनी फ्रंट पफ हेअरस्टाइलसह मांगटीका कॅरी केला पाहिजे. दीपिका पादुकोण व आलिया भट्टसारख्या अभिनेत्री तर मोकळ्या केसांसोबतही टीका कॅरी करत आहेत आणि तरुणी त्यांची स्टाइल फॉलो करतात. जर नववधूचा चेहरा चौकोनी असेल तर ती झुमर स्टाइल टीका कॅरी करू शकते.

जर नववधूचं फोरहेड लहान असेल तर तिने लहान आकाराचा मांगटीका वापरावा. लक्षात घ्या की मांगटीका हेवी असेल तर नथ हलकी वापरा आणि जर मांगटीका हलका असेल तर नथ ठसठशीत वापरा. यामुळ लुक बॅलन्स दिसतो.

समर-स्पेशल : सनबर्नपासून करा बचाव

* मोनिका

लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरी आहोत. पण अत्यावश्यक वा जरूरीच्या कामांसाठी आपल्याला घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी उन्हाळयाच्या या मोसमात उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्वचा भाजली किंवा होरपळली जाते, ज्याला सनबर्न म्हटले जाते. शरीरावर लाल डाग पडणे, त्वचा काळवंडणे ही सनबर्नची लक्षणे आहेत.

नुकसानदायक प्रभाव

सूर्यातून निघणारी अल्ट्राव्हॉयलेट किरणे जशी आपल्या त्वचेला फायदा पोहोचवतात तशीच त्यांच्यापासून त्वचेला हानीसुद्धा पोहोचते. यांपासून शरीराला व्हिटॅमिन डी तर मिळतेच, परंतु जेव्हा ही किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडतात, तेव्हा त्वचेला जळजळ जाणवते. सकाळी १० वाजेपर्यंतचे आणि संध्याकाळी ५ वाजल्यानंतरची किरणे शरीरासाठी फायद्याची असतात.

त्वचारोग विशेषज्ज्ञ डॉक्टर मलिक यांचे म्हणणे आहे, ‘‘सावळ्या वा गडद रंगाच्या त्वचेमध्ये मैलानिन जास्त प्रमाणात पाहिले जाते, ज्यामुळे त्यांच्या त्वचेवर या किरणांचा प्रभाव कमी पडतो. मैलानिनचे प्रमाण कमी असल्याने गोऱ्या त्वचेवर यांचा प्रभाव लवकर पडतो. जेव्हा ही किरणे त्वचेवर पडतात, तेव्हा मैलानिनला बर्न करतात, ज्यामुळे त्वचेवर लाल पुटकळया दिसून येतात.

त्वचेची रक्षा

* जर आपण जास्त वेळपर्यंत उन्हाच्या संपर्कात राहात असाल तर सनस्क्रिनचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा सनस्क्रिन ३० एसपीएफ पेक्षा कमी असू नये.

* डॉक्टर मलिकच्या मते सनस्क्रिन बाहेर पडण्यापूर्वी २० मिनिट अगोदर लावावे.

* जर तुम्ही सनस्क्रिन लावल्यानंतर लगेच घरातून बाहेर निघालात तर हे आपल्या त्वचेसाठी नुकसान पोहोचवते. दिवसा बाहेर न पडण्याचा प्रयत्न करा.

* त्वचेला कोरडे राहू देऊ नका. अंघोळीनंतर मॉइश्चराइजर अवश्य लावावे. जर तुम्हाला वाटले की आपली त्वचा भाजते आहे तर लगेच त्या जागेवर थंड पाणी किंवा बर्फ लावावे.

सनबर्न कसे हटवावे

सनबर्नला हटवण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत. जर तुम्हाला सनबर्न कमी प्रमाणात झाले असेल तर ते थोडयाच दिवसांत बरे होईल. यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपायांचा जरूर अवलंब करा :

बटाटयाचा ज्यूस : कच्च्या बटाटयाचा ज्यूस सनबर्नसाठी खूप लाभदायक ठरतो. यामुळे त्वचेवर हरवलेली चमक पुन्हा परत येते. याशिवाय बटाटयाचा ज्यूस त्वचेची सूज, जळजळ आणि लाल डाग यामध्येही खूप आराम पोहोचवतो. याचा उपयोग करण्यासाठी बटाटयाला सोलून घ्या. नंतर त्याला पिळून घ्या.

पुदीन्याची पाने : पुदिन्याची पानेही सनबर्न घालवण्यासाठी फायद्याची असतात. यामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण आढळतात, जे त्वचेचे पोषण करून पिगमेंटेशनची समस्या सोडवतात. पुदिन्याच्या पानांच्या उपयोगाने त्वचेला गारवा मिळतो. ही पाने त्वचेला मॉइश्चराइझर देण्याचेही काम करतात.

अॅप्पल साइडर विनेगर : अॅप्पल साइडर विनेगर आरोग्यासाठी फायद्याचे असते. याचा उपयोग सनबर्नचे डाग घालवण्यासाठीही केला जातो. हे त्वचेवर पडलेल्या डागांना दूर करून त्वचेला स्वच्छ करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावते. याचा उपयोग करण्यासाठी तुम्ही एक चमचा व्हिनेगर पाण्यात मिसळून सनबर्नवर लावावे. ५ ते १० मिनिटांपर्यंत लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

दही : दह्याचे सेवन उन्हाळयाच्या मोसमात जास्त प्रमाणात करायला हवे. कारण यामुळे शरीर व त्वचा दोहोंना गारवा मिळतो. दही एका औषधाप्रमाणे काम करते. यात आढळून येणारे प्रोबायोटिक्स आणि एंजाइम चेहऱ्याची लाली कमी करून त्वचेला स्वच्छ करतात. एका वाटीत दही घेऊन सनबर्नच्या जागी लावून घ्यावे. जवळ-जवळ १० ते १५ मिनिटानंतर धुऊन घ्यावे. असे केल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडतात आणि त्वचा स्वच्छ होऊन उजळते आणि सनबर्नमध्येही बराच आराम मिळतो.

मुलतानी माती : सनबर्नमुळे त्वचा काळी पडते. अशा स्थितीत मुलतानी मातीचा उपयोग केल्यास त्वचेत उजळपणा येतो. मुलतानी मातीत नारळाचे पाणी आणि साखर मिसळून पेस्ट तयार करून घ्या. आता या पेस्टला त्वचेवर लावून तोपर्यंत लावून ठेवा जोपर्यंत ती पूर्णपणे सुकून जात नाही. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.

समर-स्पेशल सनशाइन मेकअप : बनवी समर दीवा

– गुंजन गौड

मैत्रिणींनो, डे आउट असो किंवा इव्हनिंग पार्टी, सनशाइन मेकअप प्रत्येक कारणासाठी अगदी उत्तम आहे. असा लुक शिमरी असला तरी या उन्हाळ्यासाठी एकदम कूल आहे, तर जुन्या लुकला करा बायबाय आणि उन्हाळ्यासाठी काही शेड्सचे प्रयोग करून या उन्हाळ्याशी दोस्ती करूया.

सर्वप्रथम बेसपासून सुरूवात करू. या मोसमात पावडरयुक्त बेसचा वापर करा. यामुळे घाम कमी येईल आणि मेकअप दीर्घकाळ टिकेल. यासाठी तुम्ही गोल्डन टिंटयुक्त शिमरी पॅन केकचा वापर करू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर मॅट आणि शिमरी लुक दिसून येईल.

उन्हाळ्यातील चीकचीक, घाम, गरमी यामुळे आपल्याला साधा आणि नो मेकअप लुक जास्त आवडतो. पण रात्रीसाठी चेहऱ्यावर चमक आली तर काय हरकत आहे?

दीर्घकाळ मेकअप टिकण्यासाठी

डोळ्यांच्या मेकअपसाठी पिवळ्या रंगाची शायनी आयशॅडो डोळ्यांच्या आतून कॉर्नरला लावा. मध्ये आणि बाहेरच्या टोकाला ज्यूसी, ग्लॉसी ऑरेन्ज शेड लावा. आय मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी आयशॅडो लावण्याआधी डोळ्यांवर आयप्रायमरदेखील लावू शकता. यामुळे मेकअप जास्त काळ टिकेल आणि आयशॅडोचे रंगदेखील उभारून येतील.

आता डोळ्याला परफेक्ट फिनिशीन देण्यासाठी बारीक आयलायनर लावा अणि पापण्यांना मसकारा लावा. ओठांना सूर्याचा इफेक्ट देण्यासाठी ऑरेन्ज लिपशेडचा वापर करा.

नक्कीच हा संध्याकाळसाठीचा सनसेट लुक आहे, पण उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम येणं साहजिकच आहे. त्यामुळे फक्त वॉटरप्रूफ उत्पादनं आणि वॉटर रेजिस्टंट उत्पादनंच वापरा.

याव्यतिरिक्त आठवड्यातून दोनदा स्क्रब करू शकता. त्यासाठी जाडसर वाटलेली मसूर डाळ, ऑरेन्ज पील पावडर, मुलतानी माती आणि जवाचे पीठ कच्या दुधात एकत्र करून लावा. या हर्बल स्क्रबमध्ये ऑरेन्ज पीलच्या ऐवजी मोसंबी किंवा लिंबाच्या सुक्या सालीदेखील वापरू शकता.

जर घाम जास्त येत असेल तर रूमाल किंवा टिशू पेपरने टिपून घ्या. यासोबतच टू वे केक जवळ असू द्या. गरज पडल्यास थोड्या थोड्या वेळाने टचअप करत राहा. हल्ली बाजारात बऱ्याच प्रकारचे रिफ्रेशिंग स्प्रे मिळतात, जे अगदी थोड्या वेळात ताजंतवानं करतात. जर तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप केला असेल तर अशा स्प्रेचा वापर करू शकता. हा स्प्रे चेहऱ्यावर मारून सुकू द्या. तुम्हाला अगदी ताजंतवानं आणि रिफ्रेशिंग वाटेल.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

सनशाइन मेकअप टिप्स वापरून तुम्ही समर दीवा नक्कीच दिसू शकता, पण या रखरखीत उन्हात गळणाऱ्या घामामुळे मेकअप वाचणं थोडं कठीणच. म्हणूनच या काही टिप्स आहेत, ज्यामुळे तुम्ही मेकअप जास्त काळ टिकवू शकता.

* या दिवसांत चेहरा धुण्यासाठी डीप पोर फेस वॉशचा वापर करा. यामुळे त्वचा मुळातून स्वच्छ होईल.

* दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे टोनिंग. यामुळे त्वचेची छिद्र बंद होतात. त्यामुळे घाम कमी येतो. टोनिंगसाठी एस्ट्रिजेंट उत्तम पर्याय आहे. अल्कोहोलयुक्त एस्ट्रिजेंटमुळे थंड आणि फ्रेश वाटतंच आणि त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो. छिद्र कमी करण्यासाठी चेहऱ्यावर कोल्ड कंप्रेशनदेखील करू शकता. म्हणजेच एका मऊ मलमलच्या कपड्यात बर्फाचे तुकडे घेऊन चेहऱ्यावर मसाज करू शकता. त्यामुळे छिद्र बंद होतात.

* उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते असं काहींना वाटतं. त्यामुळे कधीकधी स्त्रिया मॉश्चरायझर वापरत नाहीत. पण या तेलाव्यतिरिक्त त्वचेला ओलाव्याची गरज असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी चेहऱ्यावर जेल बेस्ड मॉश्चरायझर लावू शकता. याव्यतिरिक्त त्वचेचा पोत सुधारण्यासाठी कोरफड जेलदेखील लावू शकता. यामुळे त्वचा ताजीतवानी होऊन त्वचा उजळ व चकचकीत दिसेल. तसेच हे त्वचेचं उन्हापासून रक्षण करेल.

* मोसम कोणताही असो, सूर्याची हानिकारक किरणं त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे त्वचेचं रक्षण करण्यासाठी एसपीए आणि पीएयुक्त सनस्क्रीन लोशन वापरणं गरजेचं आहे. यामुळे तुमचे युवीए आणि यूव्हीबी या दोन्हींपासून रक्षण होतं. मेकअप करण्याआधी कमीत कमी दहा मिनिटं आधी सनस्क्रीन लावा; कारण सनस्क्रीन लावल्यावर घाम यायला सुरुवात होते. अशावेळी टिशू पेपरने दाबून घाम पुसा, जेणेकरून सनस्क्रीन त्वचेत मिसळून जाईल.

* चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी फेसपॅकचा वापर करू शकता. त्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडर व अर्धा चमचा कॅलमाइन पावडरमध्ये टोमॅटोचा गर व मध घालून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. हा पॅक वापरल्यामुळे रोमछिद्र बंद होतात आणि घामही येत नाही.

समरमेकअपचे ९ ट्रेंड

* नीलेश्वरी बसक, ब्युटी एक्सपर्ट

असे काही नवीन समर मेकअप ट्रेंड्स आले आहेत, ज्यांना महिला इच्छा असूनही विरोध करू शकणार नाहीत. चला तर मग त्या समर मेकअप ट्रेंड्सविषयी जाणून घेऊ या :

  1. आयशॅडो मेकअप : उन्हाळयाच्या मोसमात महिला हेवी मेकअप टाळतात, विशेषकरून डोळयांचा. यावर्षी जो शॅडो मेकअप ट्रेंडमध्ये आहे, तो आपल्याला सुपर कूल आणि लाइट मेकअपचा अनुभव देईल. यात आपण शिमरी गोल्ड शेडच्याबरोबर पिंक लायनरचा उपयोग करून आपल्या लुकला सुपर कूल बनवू शकता.
  2. हाइलाइटर मेकअप : जर आपण एक्सपरिमेंट करणे पसंत करता तर आपण या समर सीजनमध्ये रेनबो हायलाइटर कॅरी करू शकता. होलोग्राफीक हूज हायलाइटरची विशेषता ही असते की हा उन्हात आल्यावर वेगळया रंगात हायलाइट होतो. जर आपण ब्लू कलरचा हायलाइटर अप्लाय केला असेल तर तो उन्हात जांभळ्या रंगात बदलून जातो.
  3. लिपस्टिक समर ट्रेंड : लिप्सला परफेक्ट कलर करून आपल्या कंटाळवाण्या दिवसाला रॉकिंग बनवू शकता. आता ट्रेंडबद्दल बोलायंच झालं तर २०२०च्या अशा काही खूप सुंदर लिपस्टिक शेड्स आहेत, ज्या आपल्याला बॉसी लुक देतील.
  4. आयलायनर मेकअप : आयलायनर आपल्या लुकला रिडिफाइन करण्यास मदत करतो. क्लासिक विंगला तर सर्वांनी खूप पसंद केले, परंतु आता हा विंग अपडेट होऊन ग्राफिक आर्टमध्ये आला आहे, ज्यात आपण २ लेयरबरोबर आयलायनरचा वापर करू शकता. उन्हाळा एक असा मोसम आहे, ज्यात आपण आयलायनरबरोबर हा एक्सपेरिमेंट करू शकता. येलो, पिंक, ब्लू इत्यादी या समरसाठी परफेक्ट आयलायनर आहेत.
  5. रंगांशी खेळा : हळू-हळू महिला न्यूट्रल रंगांनी कंटाळताहेत आणि त्या आता काही नवीन करू इच्छित आहेत. यासाठी आपण रंगांबरोबर खेळणे सुरु करा. आम्ही सांगतो आहोत की आपल्याला कशाप्रकारे यांना फॉलो करायचे आहे. जर आपणास न्यूड लिप ग्लॉस आणि ब्रॉन्ज आईजबरोबर सिंपल लूक हवा असेल तर टरक्विश आयलायनर किंवा रेड आयशॅडोचा टच आपल्या लुकसाठी परफेक्ट असेल.
  6. मल्टिपल कॉन्ट्रास्टिंग कलर : जसे एक कलाकार आपल्या पेंटिंगमध्ये अनेक रंग भरत असतो. अगदी त्याचप्रकारे आपणसुद्धा मल्टिपल कलरचा उपयोग करून काही क्रिएटिव्ह करू शकता. मागच्या काही वर्षांमध्ये न्यूड आणि करडा रंग चलनात राहिला आहे आणि यावेळेस नवीन ट्रेंड फक्त बोल्ड आणि ब्राइट पॉपी कलर्सचा आहे अर्थात आपण गुलाबी, वांगी वा जांभळा आणि पिवळया रंगाचा उपयोग करू शकता.
  7. बोल्ड अँड ब्राइट आईज : एका फ्रेश व न्यूट्रल चेहऱ्यावर ब्राइट आणि पॉपी रंग बरेच उठून दिसतात. आणि हेच या वर्षी ट्रेंडमध्ये होणार आहे. न्यूड लिपस्टिकबरोबर व्हाईट हायलाइटर आणि पॉपी कलरचा आय मेकअप खूपच ऐटदार दिसेल.
  8. कलर ब्लॉक्ड आयलायनर : आपण आपल्या क्लासिक कॅट आय लुकला एक लेवल वरती करू पाहत असाल तर आपल्याला फक्त हे करावे लागेल की कोणत्याही २ आवडच्या रंगांचे आयलायनर लावायचे. डोळयांच्यावरती अगोदर एका रंगाचा स्ट्रोक लावा, नंतर त्यावर दुसऱ्या रंगाचा. कॅट आयलायनरला अधिक रेखीव बनवण्यासाठी नेहमी ओल्या आयलाइनरचा उपयोग करा.
  9. मेटॅलिक लुक : मागच्या वर्षीही मेटॅलिक आय ट्रेंड बराच चलनात राहिला आहे आणि या वर्षीही अधिक लोकप्रिय होतोय. बोल्ड लुकसाठी शिमरिंग सफायर, डस्की ब्राँज आणि ग्लिटरचा उपयोग करा.

बिझी मॉमसाठी ब्युटी टीप्स

* पारूल, पूजा

जर तुम्ही एक बिझी मॉम असाल तर तुमच्यासाठी ब्युटी रुटीन व्यवस्थित ठेवणे कठीण असेल. वेळ कमी असल्यामुळे तुम्ही तुमच्या देखभालीतील छोटयातील छोटया गोष्टीकडेही दुर्लक्ष करत असाल. पण डायरेक्ट ऑफ ऐल्प्स ब्युटी अँड अकॅडमीच्या डॉ. भारती तनेजा तुम्हाला अशा क्विक ब्युटी टीप्स सांगत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये वापरून प्रत्येक सकाळी खूप जास्त वेळ न देताही तुमचे सौंदर्य पूर्वीसारखे चिरतरूण राखू शकाल.

स्किन केअर रुटीन

शुद्ध तूप : शुद्ध तूप कुठल्याही प्रकारच्या त्वचेवर चमत्कार घडवू शकते. तुम्ही सकाळी पराठे किंवा चपाती बनवताना बोटावर तुपाचा छोटा ड्रॉप घेऊन डोळयांभोवती लावा. असे केल्यामुळे डोळयांभोवती सुरकुत्यांसारख्या बारीक रेषा तयार होणार नाहीत.

लेमन स्लाइस : सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करा आणि त्यानंतर लिंबाची साले फेकण्याऐवजी ती हातांचे कोपरे, नखांच्या आजूबाजूला घासा. हे एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे आणि शरीराला काळे होण्यापासून रोखते. ते नखांनाही मजबूत बनवण्यासाठी प्रभावी आहे.

शुद्ध खोबरेल तेल : स्वयंपाकघरात खाण्यायोग्य शुद्ध खोबरेल तेलाची एक बाटली नक्की ठेवा आणि दररोज दोन चमचे घ्या. हे अँटीऑक्सिडंटयुक्त असते. यामुळे सुरकुत्या, ब्रेकआउट्स, पिगमेंटेशन रोखता येते व त्वचा मुलायम होते.

बेसन पॅक : बेसनात थोडीशी हळदीची पावडर व कच्चे दूध मिसळा. हे अंघोळीपूर्वी चेहरा व शरीराला लावा. उन्हाळयात या पॅकमध्ये एका लिंबाचा रस व हिवाळयात एक मोठा चमचा साय घालून लावू शकता. याच्या वापरामुळे मृत त्वचा निघून जाईल व तुम्हाला फ्रेश वाटेल.

हेअर केअर रुटीन

अंडे : सकाळी नाश्त्याला जर अंडे बनत असेल तर तुम्ही आठवडयातून एकदा एका ग्लासात एक अंडे फेटून ते केसांना लावायला विसरू नका. हे तुम्ही काम करता करताही करू शकता. यामुळे तुमचे केस घनदाट व मुलायम होतील.

शुद्ध खोबरेल तेल : शुद्ध खोबरेल तेल सर्वात चांगल्या आणि प्रभावी हेअर सिरमपैकी एक आहे. याने केसांना मालिश करा आणि रात्रभर केस तसेच ठेवा. सकाळी धुवून टाका. यामुळे  तुमचे केस खूपच मुलायम दिसू लागतील.

मेकअप केअर रुटीन

मल्टीटास्किंग प्रोडक्ट खरेदी करा : एक मल्टीटास्किंग प्रोडक्ट वापरल्यामुळे वेळ वाचतो. यासाठी तुम्ही काही उच्च दर्जाचे प्रोडक्ट खरेदी करा, जे वापरण्यासाठी आणि मल्टिपर्पज युजसाठीही सोपे असतात.

मल्टीटास्किंग ब्यूटी प्रोडक्ट हे बीबी किंवा सीसी क्रीम असते, जे एक सनस्क्रीन, मॉइश्चरायजर आणि फाउंडेशनच्या रुपात वापरता येते. तुम्ही तुमचा चेहरा धुवून सीसी क्रीम लावून ब्लश, आयलायनर, लिपग्लॉस आणि पावडरचा वापर करू शकता.

वेळ कमी असल्यास शीर, लाईट कलर्स : तुमच्याकडे भरपूर वेळ असल्यास मेकअपसाठी गडद, चमकदार रंग वापरा, पण वेळ कमी असल्यास सौम्य रंग वापरा. सौम्य रंग तुम्ही हलक्या हातांनी लावू शकता.

योग्य टूल वापरा : ब्यूटी टूल्स स्वस्त नसतात, पण तुम्ही जर ते नीट हाताळल्यास दीर्घ काळ टिकतात. उच्च दर्जाचे मेकअप ब्रश खरेदी करा, जे वापरण्यास सोपे असते आणि तुम्ही नक्कीच वेळ वाचवू शकाल.

पावडर फाउंडेशन आहे उत्तम : तुम्ही मेकअप करता, तेव्हा सर्वात आधी बेस बनवण्यासाठी फाउंडेशन वापरत असाल, पण क्रीम बेस्ड फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी वेळ लागतो. सोबतच संध्याकाळ होताच चेहरा तेलकट दिसू लागतो. म्हणूनच कमी वेळेत चांगला लुक हवा असेल तर पावडर फाउंडेशन वापरणे योग्य ठरेल.

ब्लश एक काम अनेक : हा मेकअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. ब्लश केल्यानंतर संपूर्ण चेहरा ताजातवाना आणि चमकदार होतो, शिवाय हे लावायला जास्त वेळही लागत नाही. ब्लशसाठी तुम्ही गुलाबी किंवा पीच कलरची निवड करू शकता.

आयलायनर, आयलॅशेज, आयब्रोज : हे केलेत म्हणजे तुमचा मेकअप पूर्ण झाला. आयलायनरसाठी तुम्ही पेन्सिल आयलायनर किंवा जेल लायनर वापरू शकता. प्रत्यक्षात कमी वेळेसाठी पेन्सिल आयलायनर जास्त योग्य आहे, कारण हे सुकवण्याची कटकट नसते. आयलॅशेजवर मस्करा लावल्यानंतर तुमच्या पापण्या मोठया आणि खूप सुंदर दिसू लागतात. तुम्हाला हव्या तितक्या तुमच्या पापण्या घनदाट नसतील तर त्यासाठी आयब्रो पेन्सिलचा वापरा करा. यासाठी तुम्ही तपकिरी किंवा काळया रंगाची आयब्रो पेन्सिल वापरू शकता.

लिपग्लॉस, लिपबाम आणि लिपस्टिक : मेकअप याशिवाय अपूर्ण आहे. लिपस्टिक लावताच चेहरा चमकतो. नॅचरल लुक हवा असल्यास तुम्ही लिपग्लॉस लावू शकता. हे बाजारात मोठया रेंजमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते खरेदी करू शकता. हे लावणेही अतिशय सोपे आहे. क्विक मेकअपसाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे आणि याच्या वापरामुळे ओठ केवळ गुलाबीच दिसत नाहीत तर मुलायमही राहतात.

९ महत्त्वाच्या टीप्स

* तुमच्याकडे मेकअपसाठी वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळेतही चांगला मेकअप करू शकता. तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही तुमच्या स्कीनटोननुसार बीबी किंवा सीसी क्रीम लावू शकता. डोळयांखाली काळी वर्तुळे असतील तर फक्त लायनर वापरा.

* मेकअप करण्यापूर्वी मेकअपचे सर्व सामान एकत्र ठेवा, जेणेकरून मेकअप करताना शोधाशोध करावी लागणार नाही आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही.

* मेकअप सौंदर्यात भर घालतो, परंतु मेकअपनंतर त्वचेची विशेष काळजी घेणेही गरजेचे आहे. म्हणून झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. असे केल्यामुळे तुमचा सकाळचा वेळ वाचेल.

* दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी तुम्ही सिरमसोबत कैफीन वापरू शकता.

* डोळयांच्या आसपासचा भाग आकर्षक बनवण्यासाठी आयब्रोज शेपमध्ये ठेवा.

* रिफ्रेश लुकसाठी डोळयांच्या कॉर्नरला आयशॅडो वापरू शकता.

* तुम्ही खूपच घाईत असाल तर आयब्रोज पेन्सिल, मस्करा आणि लिपग्लॉसचा वापर करून १० मिनिटांपेक्षाही कमी वेळेत आकर्षक लुक मिळवू शकता.

* तुम्ही पटकन मेकअप करून वेळ वाचवू इच्छित असाल तर ब्लश, ब्रोंजर आणि आयशॅडो वापरू शकता.

* वाटल्यास तुम्ही केवळ आयलायनर आणि ब्राइट कलरची लिपस्टिकही वापरू शकता.

वॅक्सिंगचे नवीन उपाय

– गरिमा पंकज

त्वचेला सुंदर, कोमल आणि केशविरहित बनवण्यासाठी वॅक्सिंगपेक्षा उत्तम कुठचाच पर्याय नसतो. वॅक्सिंग केल्याने केवळ नको असलेले केसच काढले जात नाही तर टॅनिंगसारखी समस्याही दूर होते. वॅक्सिंग केल्यानंतर सामान्यपणे दोन आठवडे तरी त्वचा मऊमुलायम राहाते. शिवाय जे केस पुन्हा उगवतात तेही बारीक आणि मऊमुलायम उगवतात. नियमित वॅक्सिंग केल्याने ३-४ आठवडे केस येत नाहीत. हूळहळू केसांची वाढही कमी होत जाते.

एल्प्स ब्यूटी क्लीनिकची डायरेक्टर भारती तनेजा सांगते की वॅक्स अनेक प्रकारचे   असतात :

सॉफ्ट वॅक्स म्हणजे रेग्युलर वॅक्स

हे सर्वात जास्त कॉमन आणि वापरले जाणारे वॅक्स आहे, जे मध किंवा साखरेच्या द्रावणापासून तयार केलं जातं. हेअर रिमूव्ह करण्याबरोबरच हे टॅनिंगही रिमूव्ह करतं आणि सोबतच त्वचेला मऊ आणि गुळगुळीत बनवतं.

चॉकलेट वॅक्स

या वॅक्समुळे त्वचेचे पोर्स मोठे होतात, ज्यामुळे केस सहज उपटले जातात आणि जास्त वेदनाही होत नाही. त्याचबरोबर चॉकलेटच्या आतमध्ये सूदिंग घटक आढळतात जे बॉडीला रिलॅक्स करतात. कोको पावडर बेस्ड या वॅक्समुळे केस पूर्णपणे रिमूव्ह होतात आणि त्वचा मऊ आणि कोमल दिसू लागते. हे वॅक्स केल्याने लाल चट्टे उठण्याची शक्यताही राहात नाही. हे वॅक्स संवेदनशील त्वचेसाठीही चांगली ठरते. त्याचबरोबर चॉकलेटचा अरोमा खूपच आकर्षक असतो जो आपल्याला एका विशिष्ट आनंदाची जाणीव करून देतं.

अॅलोव्हेरा वॅक्स

अलोव्हेराच्या गरापासून तयार केलेलं हे वॅक्स त्वचेला नरीश करण्याबरोबरच रिझविनेटही करतं. हे शरीराचे संवेदनशील भाग जसं की अंडरआर्म्स आणि बिकिनी पार्टसाठी फार चांगलं असतं.

ब्राजीलियन वॅक्स

हादेखील हार्ड वॅक्सचाच एक प्रकार आहे, जे विशेष करून बिकिनी एरियासाठीच बनवलं गेलं आहे. याने सगळीकडे नको असलेले केस जसं की पुढचे, मागचे, आजूबाजूचे आणि मधले रिमूव्ह केले जाऊ शकतात. वॅक्सिंगची वेदना कमी करण्यासाठी हे वॅक्स लवकर लवकर करणं गरजेचं असतं.

लिपोसोल्यूबल वॅक्स

हे वॅक्स ऑइल बेस्ड असतं. केसांच्या मुळांवर तर याची ग्रिप चांगली असतेच, पण त्याचबरोबर हे स्किनवरही डेलिकेट होतं. हे वॅक्स वापरण्यापूर्वी त्वचेवर तेल लावलं जातं आणि केस रिमूव्ह करण्यासाठी लहान लहान स्ट्रिप्स यूज केल्या जातात. हे वॅक्स जास्त गरम झाले तरी त्वचेला काही अपाय होत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा

स्किन लेझर क्लीनिकचे डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर मुनीस पाल सांगतात की वॅक्सिंग करण्यापूर्वी आणि नंतर काही सावधगिरी बाळगणं फार जरुरी आहे. वॅक्सिंग करतेवेळी त्वचा होरपळू शकते, लाल होऊ शकते, त्वचेवर संसर्ग होऊ शकतो. जिथे वॅक्सिंग केलं आहे तिथे वेदना होणं, त्वचा जळजळणं, त्वचेचा रंग बदलणं, पापुद्रे निघणं, त्वचेचं टेक्स्चर बदलणं, खाज येणं यांसारख्या समस्याही उद्भवतात.

चेहऱ्यावर वॅक्सिंग

चेहऱ्यावर अत्याधिक लव असणं काही स्त्रियांसाठी फार मोठी समस्या असते. काही पार्लर्समध्ये यापासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंग करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते चेहऱ्यावर वॅक्सिंग करणं अपायकारक ठरू शकतं. चेहऱ्याची त्वचा अतिशय मऊ असते, त्यामुळे त्यावर वेळेआधीच सुरकुत्या पडू लागतात. जर केस जाड असतील तर लेझर हेअर रिमूव्हल सर्वश्रेष्ठ पर्याय आहे. तुम्ही ब्लीचिंगचा पर्यायही निवडू शकता. वॅक्सिंगमुळे हेअर फॉलिकल्सला खूप अपाय होतो, ज्यामुळे संक्रमण आणि सूज येऊ शकते. यामुळे डागही पडू शकतात, ज्यावर उपचार करणं कठीण असतं.

वॅक्सिंग करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :

* वॅक्सिंग करणाऱ्यांचे हात अगदी स्वच्छ असावेत.

* ज्या भागाचं वॅक्सिंग करायचं आहे तो भागही अगदी स्वच्छ असावा.

* वॅक्सिंग एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये जाऊनच करावं.

* वॅक्स आणि पट्टया चांगल्या ब्रॅण्डच्या असाव्यात.

* वॅक्सिंग करायच्या एक दिवसाआधी त्वचेचं स्क्रबिंग करून घ्या. यामुळे मृतत्वचा निघून जाते, ज्यामुळे हेअर फॉलिकल्स बंद होतात, ज्याच्यामुळे हेअर इनग्रोनची समस्या होऊ शकते.

वॅक्सिंगनंतर

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लाल होऊ शकते आणि त्यावर रॅशेज उठू शकतात, जे काही तासांनी आपोआपच निघून जातात. हे हिस्टामिन रिअॅक्शनमुळे होत असतं; कारण वॅक्सिंग केसांना मुळापासून काढून टाकतं. त्यामुळे तो भाग स्वच्छ आणि बॅक्टेरियामुक्त ठेवणं फार गरजेचं असतं.

* वॅक्सिंग केल्यानंतर २४ तास तरी उन्हात जाऊ नका.

* १२ तास सनबाथिंग करू नका.

* २४ तास क्लोरीनयुक्त स्विमिंग पुलामध्ये स्विमिंग करू नका.

* स्पा आणि सोनाबाथही घेऊ नका. कोणतंही सुवासिक क्रीम लावू नका. नाहीतर जळजळ होऊ शकते.

* त्वचेवरील बॅक्टेरियाचा विकास थांबवण्यासाठी टीट्रीयुक्त प्रसाधन लावा.

* जर वॅक्सिंगनंतर त्वचा लाल झाली असेल तर अर्ध्या वाटी मलईविरहित दुधामध्ये अर्धी वाटी थंड पाणी मिसळा. यामध्ये पेपर टॉवेल भिजवा आणि तो त्वचेवर ठेवा, दीड दोन तासांनी ही प्रक्रिया तोवर करा जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही. दुधामध्ये आढळणारं लॅक्टिक अॅसिड त्वचेला आराम देतं.

* इनग्रोन हेअर ग्रोथ थांबवण्यासाठी वॅक्सच्या जागी ताबडतोब बर्फ लावा. त्याने त्वचेची रंध्रं बंद होतील आणि बॅक्टेरियाचा प्रवेश थांबेल. काही वेळाने वॅक्स केलेला भाग सॅलिसिलिक अॅसिडयुक्त क्लींजरने धुऊन घ्या.

* जर वॅक्सिंग केल्यानंतर जळजळ होत असेल तर अॅलोव्हेरायुक्त क्रीम लावा. लक्षात ठेवा, यामध्ये अल्कोहोल नसावं. जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचाही वापर करू शकता.

* वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही लगेचच जिमला जाऊ नका. कारण यामुळे गुळगुळीत त्वचेवर बॅक्टेरिया पसरण्याची भीती जास्त असते.

* वॅक्सिंग केल्यानंतर काही तास घट्ट कपडे घालू नका. कारण यामुळे त्वचा घासून जळजळ होऊ शकते.

काळजी घ्या

* कोणत्याही समारंभाला जाण्याच्या अगदी आधी वॅक्सिंग करू नका. कारण तुम्हाला हा अंदाज नसतो की तुमची त्वचा वॅक्सिंग केल्यानंतर काय प्रतिसाद देणार?

* तुम्ही जर वॅक्सिंग करत असाल तर अधूनमधून शेव करू नका. त्याने केस कडक होतात आणि वॅक्सिंग करायला अडचण येते. ज्यांना त्वचेची एखादी समस्या असेल जसं की एक्द्ब्रिमा, कापलेली त्वचा किंवा जखम, त्यांनी वॅक्सिंगपासून लांबच राहावं.

* जर वॅक्सिंग केल्यानंतर २४ तासांपर्यंत त्वचेमध्ये जळजळ किंवा वेदना होत असेल तर ताबडतोब त्वचारोग तज्ज्ञांना दाखवा.

लेर तंत्रज्ञान

डॉक्टर मुनीस पाल सांगतात की तुम्हाला जर आपला चेहरा किंवा शरीरावरील नको असलेल्या केसांपासून सुटका हवी असेल तर वॅक्सिंग किंवा लेझरचा पर्याय निवडा. कारण यामध्ये त्वचा शेविंगच्या तुलनेत जास्त काळ मऊ राहाते.

लेझर नंतरही काही स्त्रियांमध्ये पुन्हा केसांची वाढ होते. पण प्रत्येकामध्ये केसांच्या विकासाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. लेझर ट्रीटमेंटनंतर जे केस येतात ते पातळ, मऊ आणि फिकट रंगाचे असतात. म्हणूनच लेझर ट्रीटमेण्ट नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्याचा सर्वात चांगला पर्याय समजला जातो. लेझर उपचाराच्या किती सिटिंग्ज घ्याव्या लागतील आणि त्यावर किती खर्च येईल हे शरीराच्या कोणत्या भागावरील त्वचेचे केस काढायचे आहेत आणि तिथे केसांची किती वाढ आहे त्यावर अवलंबून असतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें