* ललिता गोयल
प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं की तिने आपल्या विवाहप्रसंगी सर्वात सुंदर अन् खास दिसावं. तिचा मेकअप ग्लोइंग, नॅचरल आणि लाँगलास्टिंग असावा असं तिला वाटत असतं.
दिल्ली प्रेस भवनमध्ये आयोजित मीटिंगमध्ये मेकअप आर्टिस्ट गर्वित खुरानाने ब्रायडलचा ट्रेडिशनल लुकचा मेकअप शिकवण्यासोबत टीका सेटिंग, हेअरस्टाइल व साडी ड्रेपिंगसुद्धा शिकवलं. येथे ट्रेडिशनल लुकच्या मेकअपचं तंत्र जाणून घेऊया...
ट्रेडिशनल ब्रायडल लुक
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचं व्यवस्थित क्लिंजिंग करा. त्यानंतर एक अंडरबेस लावा जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकून राहिल. गर्वितने ट्रेडिशनल ब्राइडच्या मेकअपमध्ये एक प्रकारच्या पॅनकेक (लस्टर पॅनकेक)चा वापर केला. त्याने मेकअपच्या सुरुवातीला प्रायमर लावलं. त्यानंतर बेस लावला. मग टीएल पावडर लावली. त्यानंतर पॅनकेक लावला. चेहऱ्यावरील डागव्रण लपवण्यासाठी कन्सीलरचाही वापर केला.
गर्वितने सांगितलं की अलीकडे ब्रायडल मेकअपमध्ये शिमर लुक ट्रेण्डमध्ये आहे, त्यामुळे जर एखाद्या नववधूची इच्छा असेल तर ती आपल्या मेकअप आर्टिस्टला शिमर फाउंडेशनचा वापर करायलाही सांगू शकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही शाइनिंग पावडर लावणार असाल, तर लूज पावडरचा वापर करू नका; कारण यामुळे फाउंडेशनची चमक फिकी पडेल. फेसकटिंग व कंटूरिंगच्या माध्यमातून सामान्य चेहरासुद्धा नीटसा कोरीव दिसू लागतो.
हायलाइटरच्या मदतीने चेहऱ्यावरील आकर्षक भाग हायलाइट करा. ब्लशरमध्ये हलक्या शेडचा जसं की पिंक, पीच रंगाचा वापर करा.
डोळे : कोणत्याही वधूच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप खूप महत्त्वपूर्ण ठरतो. डोळ्यांवर आयशॅडो लावण्यापूर्वी आयलिडवर आयवॅक्स लावा. यामुळे आयशॅडो दीर्घकाळ टिकेल. अशाचप्रकारे लोअर आयलिडवर आयशॅडो आयसिलरसोबत लावा, मग ते पसरणार नाही. काजळ पेन्सिलने डोळे हायलाइट करा. काजळ लावल्यानंतर आयलायनर लावा. त्यानंतर मसकारा लावा. मसकारा आतील लॅशेजवर हलक्या रंगाचा आणि बाहेरच्या बाजूला थोड्या गडद रंगाचा वापरा. बाहेरच्या बाजूला थोडा अधिक गडद करा आणि भुवयांकडे थोडा हलका ठेवा. डोळे जर लहान असतील, तर ते मोठे दाखवण्यासाठी पापण्यांच्या बाहेरील कडेवर वरच्या बाजूस हलक्या रंगाची पावडर शॅडो छोट्या ब्लशरच्या मदतीने लावा. क्रीमजवळ गडद रंगाच्या शॅडोचा उपयोग करा परंतु नाकाकडे डोळ्यांच्या आतील भागावर कोणताही रंग वापरू नका. नाहीतर लहान डोळे अधिक लहान दिसतील. कडांवर शॅडो लावण्यासाठी ब्रशचा वापर करा.