गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट

* कुमुद कुमार

मुकुलने गर्लफ्रेंड जूहीला वाढदिवसानिमित्त जे मनगटावरील घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, ते तिला काही आवडलं नव्हतं. त्याबाबत जूहीने त्याच्याकडे वर्षभर तक्रार केली होती.

मुकुलने विचार केला होता की यावेळी तो जूहीला छान भेटवस्तू देऊन तिची बोलती बंद करेल. त्याने जूहीशी बोलता बोलता जाणून घेतलं होतं की तिला कोणता आणि कोणत्या कंपनीचा मोबाइल आवडतो.

जेव्हा मोबाइल शॉपमध्ये मुकुलने त्या मोबाइलची किंमत जाणून घेतली, तेव्हा तो विचारात पडला. २५ हजार रुपयांचा मोबाइल, एवढा महागडा मोबाइल अखेरीस तो जूहीला तिच्या वाढदिवसाला कसा भेट देऊ शकणार होता? तो निराश होऊन घरी परतला.

मुकुलचे वडील दिवाणचंद्र एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. मुकुलला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी एका महागड्या शाळेत त्याचं अॅडमिशन केलं होतं. महागडी फी आणि महागडे शिक्षण. दिवाणचंद्रला यासाठी ओव्हरटाइम करावा लागत होता. नेहमीच ते उशिरा घरी परतत असत.

मुकुल या गोष्टीचा फायदा घेऊ लागला होता. साध्या भोळ्या आईला तर तो कस्पटासमान समजत असे. अभ्यासाचा काहीही बहाणा करून तो घरातून बाहेर पडत असे, जूही आणि मित्रांसोबत मौजमजा करत असे.

जूही एका मोठ्या बिझनेस मॅनची मुलगी होती. तिच्या वडिलांना व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच शहराबाहेर जावे लागत होते. जूही या गोष्टीचा खूप फायदा उठवत असे. तीसुद्धा स्वच्छंद वृत्तीची झाली होती. मोठ्या कुटुंबातील मुलगी असल्याकारणाने तिला महागड्या आणि आकर्षक वस्तू आवडत असत.

मुकुलचा जीव संकटात सापडला होता. जूहीला स्वस्त वस्तू भेट म्हणून देऊ शकत नव्हता आणि महागडी वस्तू खरेदी करणे त्याच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. आता तो काय करणार? याच विचारात तो गर्क राहत असे.

एके दिवशी मुकुलचा मित्र राकेश त्याला आपल्यासोबत मोबाइल शॉपमध्ये घेऊन गेला. त्याने तिथे एक महागडा मोबाइल खरेदी केला, त्याची किंमत ३५ हजार होती.

मुकुलने जेव्हा त्याला या महागड्या मोबाइलबाबत विचारलं की त्याने तो कोणासाठी खरेदी केला आहे? तेव्हा हे जाणून त्याला आश्चर्य वाटलं की एवढा महागडा मोबाइल राकेशने आपली गर्लफ्रेंड सारिकासाठी खरेदी केला होता. मग मुकुलने आपली उत्सुकता शमवण्यासाठी विचारलं, ‘‘एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्याची काय आवश्यकता होती?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, या मॉडर्न आणि सुंदर मुली महागड्या आणि आकर्षक वस्तूंवरच भाळतात. त्यांना जेवढ्या महागड्या भेटवस्तू द्याल, त्या तेवढ्याच अधिक खूश होतात. महागड्या भेटवस्तूद्वारेच त्या समोरच्याचीच प्रतिष्ठा जोखतात. चमकूगिरीवर मरतात या मुली, चमकूगिरीवर.’’

‘‘पण राकेश, तुझ्याकडे एवढी महागडी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले? तुझे आई-बाबा तर यासाठी तुला एवढे पैसे देणार नाहीत?’’

‘‘अरे मित्रा मुकुल, ही सर्व आतली गोष्ट आहे. गर्लफ्रेंडला खूश ठेवण्यासाठी खूप काही करावं लागतं.’’

आता मुकुल या ‘खूप काही’मध्ये गुरफटला. त्याने राकेशला याबाबत विचारलंही. परंतु राकेशने हे सांगून त्याला टाळलं की या ‘खूप काही’चा अर्थ त्याला तेव्हाच कळेल, जेव्हा तो त्याच्या इतर मित्रांशी मैत्री करेल.

रात्रभर मुकुल राकेशबाबत विचार करत राहिला. त्याला जूहीला खूश करण्याचा एक मार्ग राकेशच्या मैत्रीतून दिसत होता. एक महागडे गिफ्ट देऊन त्याला कोणत्याही परिस्थितित जूहीला खूश करायची इच्छा होती.

शेवटी त्याने निर्णय घेतला की तो राकेश आणि त्याच्या मित्रांच्या संगतीत राहील आणि ‘खूप काही’ करेल.

राकेशने मुकुलला विश्वासात घेऊन चोरी करण्याचे कौशल्य शिकवले. सायकल आणि बाइक चोरणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. भंगार बाजारात कोणाकडे सामान विकायचे आहे, राकेश चांगल्याप्रकारे अशा चोर दुकानदारांशी परिचित होता. चेन स्नॅचिंगचे कामही राकेशच्या ग्रुपला माहित होते. याकामीही ते चांगलेच तज्ज्ञ होते.

मुकुलही लवकरच चोरी करायला, खिसा कापयला आणि सोनसाखळी खेचायला चांगल्याप्रकारे शिकला होता. जूहीला खूश करण्यात आता त्याला काही अडचण येणार नव्हती. यावेळी त्याने जूहीला केवळ महागडा मोबाइलच गिफ्ट दिला नाही तर पंचतारांकित हॉटेलमध्ये तिला बर्थडे पार्टीही दिली. जूहीला मुकुलसारखा बॉयफ्रेंड मिळाल्याने धन्य वाटत होते. मुकुल तर तिच्या स्वप्नातील राजकुमार बनला.

एके दिवशी राकेशने मुकुलसोबत मिळून चेन स्नॅचिंगची योजना बनवली. राकेश अनेक दिवसांपासून दिल्लीच्या मॉडेल टाउन गल्लीची रेकी करत होता. त्याने जाणून घेतलं की संध्याकाळच्या वेळी कोणकोणत्या महिला रोज डेअरीवरून दूध आणतात आणि कोणत्या महिला भाजी मंडईतून भाजी घेऊन परततात. त्यांचे लक्ष्य कमलादेवी होती. ती एकटीच जात-येत असे. तिच्या गळ्यात चमकणारी सोन्याची चेन त्यांचा मोह वाढवत होती.

राकेशने सर्व गोष्टी मुकुलला चांगल्याप्रकारे समजावल्या होत्या. चेनवर झडप घालून हिसकावणं एवढं काही कठीण काम नव्हतं, जेवढं त्यानंतर मोटारसायकलवर बसून पळणं होतं. चेनवर ?ाडप घालण्याचं काम मुकुलला मिळालं आणि मोटारसायकलवर ड्रायव्हिंग करण्याचं काम राकेशने स्वत:कडे घेतलं.

योजनेनुसार मुकुलने अगदी चलाखीने आपलं काम पार पाडलं. चेनवर झडप घातली, कमलादेवीला धक्का देऊन खाली पाडलं, जेणेकरून तिला उठायला उशीर होईल आणि या दरम्यान ते पळून जातील.

चेन काढून घेऊन मुकुल पापणी लवते न लवते तोच राकेशच्या मोटारसायकलवर येऊन बसला. राकेशने मोटारसायकल वेगाने पळवली, परंतु एक भटकं डुक्कर त्यांच्या मोटारसायकलपुढे आलं. डुक्कर तर पळाला, परंतु त्यांच्या मोटारसायकलचे संतुलन बिघडलं आणि दोघे मोटारसायकलसहित खाली कोसळले.

तोपर्यंत कमलादेवीचा आरडाओरडा ऐकून गल्लीतील लोक त्यांच्यामागे धावले. ते मोटारसायकलवरून पडताच, गर्दीने त्यांना पकडलं. गर्दीने त्यांना खूप मारलं.

इतक्यात गर्दीतून एक महिला पुढे आली. तिला मुकुलचा चेहरा ओळखीचा वाटला. तिने मुकुलला लक्षपूर्वक पाहिलं आणि विचारलं, ‘‘तू दिवाणचंद्रचा मुलगा मुकुल आहेस ना?’’

मुकुल रडत म्हणाला, ‘‘हो काकी.’’

त्या महिलेने मुकुलच्या जोरदार थोबाडीत लगावत म्हटलं, ‘‘शी, तुला लाज वाटत नाही, एवढ्या मेहनती आणि इज्जतदार वडिलांचा मुलगा असून असे नीच काम करतोस.’’

मुकुलच्या डोळ्यांतून सतत पाणी वाहू लागले. ती महिला दुसरी कोणी नाही, मुकुलच्या वडिलांसोबत प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत सहाय्यक प्रबंधक सुशीलादेवी होती. ती मुकुलचे बाबा दिवाणचंद्रना चांगल्याप्रकारे ओळखत होती. तिला हेही माहीत होतं की मुकुलच्या शिक्षणासाठी मुकुलचे वडील कसे अहोरात्र झटत होते.

सुशीलादेवीने मुकुलच्या वडिलांना फोन केला आणि गल्लीतील लोकांना सर्व हकिकत सांगत त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यापासून रोखलं. जेव्हा गल्लीतील सर्व लोकांना हकिकत कळली, तेव्हा ते चकीत झाले की कसे एका प्रतिष्ठित विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या गर्लफ्रेंडना खूश करण्यासाठी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे काम करू लागले आहेत.

लवकरच मुकुल आणि राकेशचे आईवडील घटनास्थळी पोहोचले. त्यांची नजर लाजेने खाली झुकली होती. मुकुल आणि राकेश तर आपल्या आईवडिलांशी नजरही मिळवू शकत नव्हते. मुकुल आपल्या आईवडिलांच्या पायावर लोळण घेत म्हणाला, ‘‘आई… बाबा… मला माफ करा. अशी चूक पुन्हा करणार नाही.’’

‘‘मुकुल, मला तुझा किती अभिमान वाटत होता, पण तू हे काय केलंस तुला माहीत नाहीए. तू माझा आयुष्यभर मिळवलेला मानसन्मान व इज्जत एका क्षणात धुळीला मिळवलीस, जी कधी पुन्हा मिळू शकत नाही,’’ मुकुलचे बाबा म्हणाले.

हे ऐकताच सर्वांचे डोळे ओलावले. सर्व प्रत्यक्ष पाहत होते की, संततीचं एक कृत्य कशाप्रकारे आईवडिलांची मान खाली करायला लावतं.

सुशीलादेवी प्रकरण कसंतरी सावरून घेत गर्दीतून त्यांना आपल्या घरी घेऊन गेली. कमलादेवीलाही त्यांनी आपल्या घरी बोलावलं.

मुकुल आणि राकेशने कमलादेवीचींही माफी मागितली आणि भविष्यात असे कृत्य न करण्याचे वचन दिले.

मुकुल आणि त्याच्या आईवडिलांना त्या रात्री झोप आली नाही. मुकुलने प्रायश्चित्त करत सर्व सत्य हकिकत आईवडिलांच्या कानावर घातली. तेव्हा त्याचे बाबा म्हणाले, ‘‘बाळा, तू वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचला आहेस, जिथे तू माझा मुलगा नाहीस, तर मित्रासमान आहेस. तू मेहनत कर, तुला जूहीच काय, तिच्यापेक्षा चांगली जोडीदार मिळेल, पण आधी शिक्षण घेऊन योग्यता तरी कमाव. चोर बनून तुला जूहीही मिळणार नाही.’’

बाबांचं बोलणं खरं ठरलं. जूहीला जेव्हा मुकुलच्या कृत्याबाबत कळलं, तेव्हा तिने मुकुलला ‘चोर’ बोलून त्याच्याशी असलेले संबंध तोडले. त्याने दिलेल्या भेटवस्तूही तिने त्याला परत केल्या. मुकुलचा चेहरा पडला.

आता मुकुलला योग्य धडा मिळाला होता. त्याला आता आईवडीलच खरे मित्र वाटत होते. त्याला आता कळून चुकलं होतं की भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शक कोण होऊ शकतात, तो आता मन लावून अभ्यास करू लागला. त्याला दाखवून द्यायचं होतं की तो ‘चोर’ नाही, आपल्या आईवडिलांचा लायक मुलगा आहे.

तर समजून जा तोच तुमचा जिवलग आहे

– गरिमा

जिवलग किंवा साथिदार हा तुमचा मित्र, नातेवाईक किंवा शिक्षक कोणीही असू शकेल, ज्याच्यासोबत मनापासून आणि दृढपणे जोडले गेल्याचे तुम्ही अनुभवत असाल. तो तुमच्यापुढे आव्हान निर्माण करतो, तुम्हाला प्रेरणा देतो, आधार देतो आणि सतत तुमच्या विचारात असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेमके काय हवे, याची जाणीव तो तुम्हाला करून देतो. तुम्ही त्याच्यासोबत शरीर, मन आणि भावनेनेही जोडले गेलेले असता.

तोच तुमचा जिवलग आहे, हे कसे ओळखाल

ज्याचा सहवास लाभताच मनाला खोलवर समाधान मिळते : अशी व्यक्ती जिच्यासोबत तुम्हाला सहजता आणि सुरक्षितता जाणवते. ज्याच्यासोबत असल्याने तुम्हाला आनंद मिळतो. तो येताच तुमच्यातील अस्वस्थता दूर होते आणि कुठल्याही कामात तुमचे मन रमू लागते, तर मग समजून जा की तोच तुमचा जिवलग आहे.

खूप काळ एकमेकांना ओळखत आहोत असे वाटते : पहिल्या भेटीत तो तुम्हाला अनोळखी भासत नाही. त्याच्याशी बोलताना तुम्ही नर्व्हस होत नाही. याच्याशी आपण कुठलीही गोष्ट शेअर करू शकतो असे तुम्हाला वाटते. शिवाय तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकाल असे मनापासून तेव्हाच वाटते, जेव्हा तुम्ही तुमच्या जिवलगास भेटता.

तो हाच आहे ज्याच्या शोधात आजवर होते : भले तुमचे वय कितीही असो किंवा अनेकांबद्दल तुम्हाला यापूर्वी आकर्षण वाटले असेल. अगदी तुम्ही विवाहित का असेना, जीवनात एक वळण असेही येते जेव्हा एखाद्याला भेटल्यानंतर तुम्हाला असे वाटू लागते की बस्स हा तोच आहे, ज्याला मन शोधत होते. त्याच्यासोबत तुम्ही जीवनात स्थैर्य अनुभवता आणि तुम्ही त्याच्यापासून कधीच वेगळे नव्हता, असे तुम्हाला अगदी अंत:करणापासून वाटते.

त्याच्यासोबत प्रत्येक समस्येचा सामना समर्थपणे करता येईल असे वाटते : अशी व्यक्ती जी केवळ जवळ असल्यानेच तुम्हाला तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यासारखे वाटते. आव्हानांचा सामना करायला आणि संकटांना हरवायला तुम्ही उभे व्हाल, तेव्हा वाटेल जसे की ती व्यक्ती गडद अंधारात प्रकाशाच्या रुपात तुमच्यासोबत आहे, तर अशावेळी समजून जा तोच तुमचा जिवलग आहे.

सुरक्षित वाटते : एखाद्या व्यक्तिकडे तुम्ही स्वत:हून ओढले जात असाल, जणू काही चुंबकीय शक्ती तुमच्या दोघांमध्ये आहे असे तुम्हाला वाटते. शिवाय तो सोबत असताना तुम्ही सर्व प्रकारे सुरक्षित आहात असे वाटते तर समजून जा तोच तुमचा जिवलग आहे.

गरजेचे नाही की तो सुंदरच असावा : खऱ्या प्रेमाचा अर्थ केवळ शारीरिक आकर्षण नाही तर मनाने आणि भावनेनेही एकमेकांशी जोडले जाणे असते. तुम्ही त्याच्या डोळयांत तुम्हाला आणि तुमच्या डोळयांत त्याला पाहू शकत असाल तर समजून जा तोच तुमचे प्रेम आहे, जिवलग आहे. जिथे तुम्ही एकमेकांपासून वेगळे नसून एकच आहात, असा अनुभव तुम्ही घेत असाल. कारण जिथे ‘तू’ आणि ‘मी’ अशी भावना असते तिथे ओढ तर असते. पण जिवलगासोबत तुमचे नाते अतुट राहाते.

काही मिळविण्याची इच्छा नसते : त्याला भेटल्यानंतर काही मिळविण्याची इच्छाच उरत नाही. तुम्हाला त्याच्याकडून काहीही नको असते, पण तरीही तोच तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा असेल. तुम्ही नि:शब्द असूनही तासन्तास त्याच्यासोबत वेळ व्यतित करू शकता. त्याला फक्त बघत राहू शकता, त्याच्याजवळ राहू शकता किंवा दूर राहूनही त्याला अनुभवू शकता तर समजून जा की तोच तुमचा जिवलग आहे.

नात्यात जेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात

– सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही.गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

लिव्ह इन रिलेशन, जेव्हा होईल ब्रेकअप

* आरती प्रियदर्शिनी

राखी काही दिवसांपासून खूपच तणावात दिसत होती. ऑफिसमधील कामात तिचे लक्ष लागत नव्हते. तिचे पद जबाबदारीचे होते. अशावेळी बॉसने तिच्यावर चिडणे स्वाभाविक होते.

तिची सहकारी नीलिमाला याचे वाईट वाटले. एक दिवस जेवणाच्या सुट्टीत तिने राखीच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि राखीने मन मोकळे केले.

‘‘नीलिमा, मी आणि मिहीर वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. लग्नासाठी मी आईवडिलांनाही तयार केले होते. मात्र आता तो या नात्याला कंटाळला आहे. त्याला स्पेस हवीय. काही आठवडयांपासून आम्ही एकाच छताखाली पण अनोळखी असल्यासारखे राहतोय. तीन दिवसांपासून तर तो मला भेटलाही नाही. मेसेज नाही, कॉल नाही, रिप्लायच देत नाही,’’ असे सांगून ती ढसाढसा रडू लागली.

नीलिमाने तिला मनमोकळेपणे रडू दिले. त्यानंतर स्वत:च्या घरी घेऊन गेली. नीलिमा आईवडील आणि भाऊ-वहिनीसोबत राहत होती. राखीला एका कुटुंबाचा भावनिक आधार मिळाला आणि मैत्रिणीचा पाठिंबा. यामुळे तिचे मनोबल वाढले आणि ती पुढील आयुष्य हसतमुखाने जगू शकली.

राखीसारख्या कितीतरी मुलींना सहजीवन किंवा लिव्ह इन रिलेशनशिपने  मोहजालात अडकवले आहे, यातून बाहेर पडताना त्या पूर्णपणे कोलमडून जातात आणि हाती लागतो तो केवळ हताशपणा, मानसिक निराशा.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिली होती, तेव्हा तरुणाई आनंदित झाली. जणू मोकळे आकाश आणि स्वच्छंद विहारासाठी त्यांना सोनेरी पंख गवसले होते. परंतु आता या नात्यातील स्वच्छंदीपणा अनेकांना घायाळ करत आहे. यात महिला, मुली अधिक आहेत.

नॅन्सीसोबत तर खूपच वाईट घडले. प्रकाशसोबतच्या ६ महिनांच्या सहजीवनानंतर अचानक एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. या दु:खातून ती कशीबशी बाहेर पडत नाही तोच आपण आई होणार असून गर्भपाताची वेळही निघून गेल्याचे तिला समजते. हताशपणे ती आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलते आणि मागे सोडून जाते ते आपले दु:खी कुटुंब व त्यांची अनमोल स्वप्नं जी कधीकाळी त्यांनी नॅन्सीसाठी पाहिली होती.

महानगरात अशी कितीतरी उदाहरणं दिसतील. आता प्रश्न असा आहे की लग्नसंस्था हे बंधन आणि लिव्ह इन स्वातंत्र्य आहे तर मुलींना इतका त्रास का सहन करावा लागतोय? याचे उत्तर आहे समाजाची दुतोंडी मानसिकता.

भारतीय महिलांसाठी सामाजिक आणि भावनात्मक स्तरावरही संबंध तोडणे अजूनही सोपे नाही. पुरुष असे संबंध तोडून लग्नही करतात आणि समाज ते स्वीकारतेही, पण तोच समाज महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवतो.

अशा परिस्थितीत आपण काही गोष्टींचे पालन करून सुखी जीवन जगू शकतो. लिव्ह इनचे नाते तुटल्यानंतर पळपुटेपणा पत्करण्यापेक्षा हा आपला अनुभव समजून त्यातून धडा घ्या. हे खरे आहे की महिलांसाठी जोडीदाराचा सहवास विसरणे आणि भविष्यातील संघर्षाचा सामना करणे सोपे नाही. परंतु जीवन प्रवाही आहे. म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे ती या नात्याशी जोडल्या गेलेल्या काही पैलूंचा सारासार विचार करण्याची.

स्वत:ला कामात गुंतवून ठेवा : तुम्ही नोकरी करत असाल तर स्वत:ला कामात गुंतवून ठेवणे थोडेसे सोपे आहे. आपल्या कामावरील टार्गेटवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराला आपलेसे कसे करावे, याचा सतत विचार करू नका कारण त्याने पूर्ण मानसिक तयारीनिशीच तुम्हाला सोडून दिले आहे. त्यामुळे तो परत येणार नाही.

नोकरी न करणाऱ्या मुलींनी जास्तीतजास्त वेळ कुटुंबासोबत घालवावा. स्वत:मधील एखाद्या कलेला विकसीत करा. ती सर्व कामे करा जी यापूर्वी वेळ कमी असल्यामुळे तुम्ही करू शकला नाहीत. कधीतरी आपल्या भावनांना कागदावर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करा. मनातील वेदना काहीशी कमी होईल.

लोक तर बोलणारच : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेताना तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असेल. लोग काय म्हणतील, याची पर्वा केली नसेल. मग आताही तसेच करा. शांतपणे त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आपली बाजू मांडण्याचा किंवा आपणच कसे बरोबर आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही.

न्यूनगंड बाळगू नका : तुम्ही केवळ मैत्रीच्या एका नात्यापासून वेगळे झाला आहात. तेव्हा स्वत:ला घटस्फोटीत समजू नका. तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही. यौनशुचितेच्या तराजूवरही स्वत:ला तोलू नका. शारीरिक संबंध ठेवणे एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याचा न्यूनगंड बाळगू नका. जोडीदारासोबत घालवलेल्या सुखद क्षणांनाच जीवनात स्थान द्या. त्याच्याबद्दल मनात द्वेष नसावा. समोरासमोर आल्यानंतरही ओरडू नका, टोमणे मारू नका तर मैत्रीपूर्ण वागा.

कायदा तुमच्यासोबत आहे : तुम्ही दीर्घ काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल आणि तुम्हाला मूल असेल आणि तरीही तुमचा जोडीदार तुमच्या मर्जीशिवाय तुम्हाला सोडू इच्छित असेल तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये असा निकाल दिला आहे की लिव्ह इनमुळे जन्माला आलेले मूल अनावरस समजता येणार नाही. तुम्ही सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी देण्याची याचिका दाखल करू शकता. कारण दीर्घ काळपर्यंत लिव्ह इनच्या नात्यात राहिल्याने तुम्हाला कायदेशीरपणे पत्नीचा दर्जा मिळतो.

जोडीदाराने मारहाण किंवा जबरदस्ती केल्यासही तुम्ही न्यायालयात घरगुती हिंसा कायद्याअंतर्गत न्याय आणि उदरनिवार्हासाठी पोटगी मागू शकता. किंवा हिंदू अॅडॉप्शन अँड मेंटनन्स अॅक्टच्या कलम १८ अंतर्गतही याचिका दाखल करू शकता.

भावी जीवनसाथीपासून काही लपवू नका : तुटलेल्या नात्याच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी लग्न चांगला पर्याय आहे. पण लग्नापूर्वी भावी जीवनसाथीला आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबत नक्की सांगा. सोबतच त्याला असा विश्वास द्या की तुम्ही जुने नाते नव्या नात्याआड येऊ देणार नाही.

पुरुषांनीही लक्ष द्या : सहजीवनातून वेगळे होण्याचा परिणाम सर्वाधिक मुलींनाच सहन करावा लागतो हे मान्य, पण संवेदनशील पुरुषांवरही याचा परिणाम होतो हे नाकारता येणार नाही.

जयंतच्या पार्टनरने त्याला सोडल्यानंतर त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. खूप समस्यांचा सामना केल्यानंतर तो यातून सुटू शकला.

दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांत पोलिसांना बलात्काराऐवजी विश्वासघाताचा (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) खटला दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पुरुषांनाही न्याय मिळेल.

उत्तम जोडीदार कसा असेल

* निशा रॉय

आजच्या काळात एका विश्वासू जोडीदाराची साथ मिळणे याचा अर्थ आहे की तुम्ही अतिशय नशीबवान आहात, कारण असा जोडीदार मिळणे विरळाच आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. जर तुम्हाला विश्वासू जोडीदार मिळाला असेल तर तुम्ही त्याचा विश्वास कायम राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो नेहमी तुमच्यासोबत राहिल. एका खऱ्या बॉयफ्रेंडचा अर्थ आहे की तो तुमची काळजी घेईल, या जाणून घेऊ की एखादा विशेष जोडीदार असल्यास तुमचे जीवन कसे आनंदी होते ते.

जो तुमची काळजी घेईल

जर तुमचा बॉयफ्रेंड चांगला आणि विश्वासू असेल तर तो तुमच्याबाबत नक्की विचार करेल आणि तुमची काळजी घेईल. जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला स्पेशल वागणूक देईल. तो तुमच्या भावनांचा विचार करेल, तुमच्या आईवडिलां व्यक्तिरिक्त फक्त तुमचा जोडीदारच तुम्हाला अशी जाणीव करून देतो की तुम्ही सगळयात वेगळया आहात. जोडीदारासोबत असताना तुम्हाला वाटेल की जणू तुमच्या आसपास असे कोणी आहे की ज्याच्या सहवासाने तुम्हाला कशाचीही काळजी करायची गरज नाही.

तो तुम्ही खास आहात याची जाणीव करून देतो

एक चांगला जोडीदार तुम्हाला नेहमी खुश ठेवायचा किंवा तुम्ही कायम आनंदी राहावं यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक लहानसहान प्रसंगात तुम्हाला सरप्राईज देऊन खुश करतो. मग भले तो तुमच्यापासून दूर असो की तुमच्या जवळ असो. तो कायम तुमच्यासाठी असे काही करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तुम्ही खास आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

तुमच्या प्रत्येक दु:खात तो तुमच्या पाठीशी असेल

एक सच्चा जोडीदार नेहमी तुमचा ताण,   दु:ख आणि चिंता दूर करण्याचा आणि तुमची ओंजळ कायम सुखाने भरलेले राहिल असा प्रयत्न करतो. तुमच्या दु:खातसुद्धा तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे दु:ख विसरून जाल. मग यासाठी तो तुम्हाला एखादा जोक ऐकवतो किंवा तुम्हाला मिठी मारतो. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तेव्हा तुमचा आधार बनून तुमच्यासोबत उभा राहिल. त्याच्यासोबत असताना तुम्ही प्रत्येक दु:ख आणि काळजी विसरता.

तुमच्याकडे विशेष लक्ष देतो

एक चांगला जोडीदार तुमच्यासोबत नेहमी असे काही क्षण व्यतित प्रयत्न करतो, जे तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरतील. नेहमी तुम्हाला उत्तोमत्तम ठिकाणी फिरायला नेऊन तुम्हाला खास जाणीव करून देतो.

यासोबतच भविष्याबाबतसुद्धा विचार करेल

एक चांगला आणि विश्वासू जोडीदार नेहमी भविष्याबाबत योजना आखेल. प्रत्येक अशा गोष्टीशी संघर्ष करेल, जी तुम्हाला त्याच्यापासून वेगळे करायचा प्रयत्न करत करेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें