सावळ्या त्वचेसोबत मिळवा कॉन्फिडंट लुक

* गरिमा

जरी एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचे मोजमाप गोऱ्या रंगावरून केले जात असले, तरी आजच्या युगात रंगापेक्षा फॅशन, स्मार्टनेस, आत्मविश्वास आणि मेकअपची शैली यांना जास्त महत्व दिले जाते. जर तुमच्या त्वचेचा पोत सावळेपणाकडे झाकणारा असेल, तर तुम्ही आपले अन्य पैलू सक्षम करा. सावळया रंगांबाबत आपल्या मनातील वैषम्य दूर करा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्या.

बना स्मार्ट आणि कॉन्फिडंट

धीट बना : आपल्या व्यक्तिमत्वात धीटपणा आणि स्मार्टनेस आणा. कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना माघार घेऊ नका. आव्हानं स्वीकारा. कोपऱ्यात लपलेली दबलेली मुलगी बनण्यापेक्षा नेहमी पुढे येऊन नेतृत्व करायला तयार राहा. कोणी तुम्हाला पुढे या आणि हे करा असे म्हणणार नाही. स्वत:ची पात्रता आपली आपणच सिद्ध करावी लागेल जेणेकरून प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लोक तुमच्याकडेच पाहतील.

नजरेला नजर भिडवून बोला : कोणाशीही बोलताना नजरेला नजर भिडवून बोला. इकडे तिकडे बघत बोलणाऱ्यांवर कोणी विश्वास ठेवत नाही आणि खाली नजर खिळवणारे नेहमी मागे पडतात. संपूर्ण आत्मविश्वासाने नजर समोर ठेवून बोलायचा सराव करा.

दुसऱ्याशी आपली तुलना करू नका : दुसऱ्याशी आपली तुलना करण्याची सवय असेल, तुमचा विश्वास डळमळू शकतो. समोरचा तुमच्यापेक्षा हुशार आहे असा विचार करण्याऐवजी आपल्यातील गुणवत्तेचा विचार करा. स्वत:ला कधीच कमी समजू नका. यशस्वी होणारच असा विश्वास बाळगून काम करता राहा.

भीतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा : घाबरत राहण्यापेक्षा ज्या गोष्टीची भीती वाटते ती पुन्हा पुन्हा करून भीतिला पळवून लावणे आवश्यक आहे. काही लोकांना स्टेजवर जायची भीती वाटते, काहींना पोहण्याची, काहींना उंचीची, काहींना एकटा प्रवास करण्याची तर काहींना प्रेझेंटेशन देण्याची भीती वाटते. तुम्ही तुमच्या भीतिवर विजय मिळवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही बोल्ड आणि कॉन्फिडंट दिसाल.

आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा : जीवनाने सगळयांनाच काहीतरी खास देऊ केले आहे. कोणी सुंदर असते, कोणी छान गाते, कोणाची तार्किक क्षमता चांगली असते, कोणी नृत्य छान करते, तर कोणी छान लिहिते. तुमचा रंग सावळा आहे असा न्यूनगंड मनात येऊ देण्यापेक्षा आपल्यातील अन्य गुणांना आकार द्या. जी गुणवत्ता तुमच्यात आहे ती इतर कोणात असू शकत नाही. आपला स्मार्टनेस, क्षमता आणि चांगली वागणूक यामुळे तुम्ही इतरांच्या नजरेत भरता.

मनातून सुंदरतेचा अनुभव करा : तुम्ही सुंदर आणि स्मार्ट तेव्हाच दिसाल जेव्हा सुंदरता अनुभवाल. मनात दु:ख, न्यूनगंड, संताप, मत्सर अशा भावना वरचढ ठरतील तर त्या चेहऱ्यावर दिसून येतील, कारण मनस्थितीचा संबंध त्वचेच्या तेजाशी असतो. जर सावळी त्वचा चमकदार आणि निरोगी असेल तर ती गोऱ्या पण मुरमांनी भरलेल्या त्वचेपेक्षा जास्त छान दिसते.

भूतकाळातील स्मृती आठवा : तुम्हाला जीवनात जेव्हा केव्हा यश मिळाले होते, ते क्षण आठवून मनात नेहमी उत्साह, सकारात्मकता आणि स्फूर्ती कायम ठेवा. आपल्या आत नेहमी आत्मविश्वासाचा दिवा तेवत ठेवा.

अशा दिसा स्टायलिश

कपडे परिधान करण्याचे तारतम्य : व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवण्यात वेशभूषेचे महत्वाचे योगदान असते. कपडयाचा रंग, पॅटर्न, फॅब्रिक आणि स्टाईल अशी असावी जी तुमच्यावर शोभेल आणि स्मार्ट लुक देईल. स्वत:साठी कपडे निवडताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष ठेवा. जसे चमकदार रंगाचा वापर करू नका. पिवळा, नारिंगी, नियॉन यासारखे रंग टाळा. असे भडक रंग सावळया रंगावर चांगले दिसत नाही. फिकट आणि त्वचेच्या टोनशी जुळणारे रंग तुमच्यावर जास्त खुलून दिसतील. तुम्ही प्लम, ब्राऊन, फिकट गुलाबी, लाल यासारखे रंग वापरून पाहू  शकता.

फॉर्मल लुकबाबत म्हणायचे झाले तर बेज कलरचा साधा आखूड ड्रेस परिधान करू शकता, ज्यावर थोडेफार प्रिंट केले असेल. अशा आखूड ड्रेससोबत हाय हिल्स, सुंदर घडयाळ आणि कोट परिधान करुन तुम्ही ऑफिस लुक कॅरी करू शकता. सेल्मन पिंक कलरचे प्रॉपर फॉर्मल आऊटफिट खूपच सुंदर दिसेल.

सावळया सौंदर्यासाठी ड्रेसिंग स्टाईल

फॅशन डिझायनर, अशिमा शर्मा यांच्या मते जर तुम्ही सावळ्या रंगाच्या असाल तर तुम्ही या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या :

* तुम्ही डेनिमचे कपडे वापरा. जसे डेनिम जीन्स, प्लाझो, डेनिम शर्ट इत्यादी. हे सगळे कॉम्बो सुंदर दिसतील.

* तुम्ही तुमच्या ड्रेसच्या फॅब्रिकसोबत निरनिराळे कॉम्बिनेशन्स करूनही सुरेख लुक मिळवू शकता. जर तुम्ही एक काळया रंगाचा आखूड ड्रेस परिधान केला आहे आणि त्यात नेट, सिफॉन यासाखे कापड असेल हे तुमच्या लुकचे सौंदर्य वाढवण्यात मदत करेल.

* ब्लिंगी गोल्ड तुमच्यासाठी अतिशय सुंदर ठरू शकेल. जर तुम्हाला गाउन परिधान करायला आवडत असेल तर लाल रंगाचा फ्लोर लेन्थ गाउन परिधान करू शकता. ऑफ शोल्डर, शोल्डरलेस, सिंगल शोल्डर गाऊन तुमच्यावर छान शोभतील. यावर आपले केस स्ट्रेट ठेवा.

* जर फॉर्मल्सबाबत बोलायचे झाले तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्ही ऑफिसमध्ये घालून जाऊ शकता. हाय वेस्ट जीन्स तुम्ही सॉलिड ट्विस्ट टॉप सोबत वापरू शकता. अशाप्रकारच्या लुकसाठी तुम्ही तुमचे केस बांधून ठेवा.

* पेन्सिल स्कर्टसोबत फिकट मिंट कलरचा रूफल स्ट्रिप्ड टॉप वापरा. केस मोकळे ठेवा.

कसा असावा सावळया मुलीचा मेकअप

सुंदर दिसण्यासाठी सगळयात आवश्यक आहे निरोगी त्वचा ना की गोरा रंग. चमकत्या त्वचेसाठी तुमची जीवनशैली आणि आहार, उत्तम आरोग्य, पुरेशी झोप आणि मन:शांती आवश्यक आहे. जर त्वचा निसर्गत: चमकदार असेल तर कमीतकमी मेकअप करूनही तुम्ही आकर्षक दिसू शकता.

सादर आहे, अश्मीन मुंजालयांच्या सावळया कांतीसाठी काही मेकअप टीप्स :

* सर्वात आधी याकडे लक्ष द्या की तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले केस तर नाही ना. आयब्रोज,  अप्पर लीप, लोअर लीप, फोरहेड, चिकबोन यावरचे केस  काढून टाका. आवश्यक असेल तर ते  कन्सिल करा, जेणेकरून तुमचा लुक खुलून येईल .

* आता मेकअप सुरु करा. त्वचेच्या टोनसोबत त्वचेचा पोत लक्षात घ्या. एका चांगल्या प्रायमरने सुरुवात करा. जर त्वचेवर शुष्कता, दाग अथवा अनइवन्नेस असेल, तर ब्युटी बामचा वापर करू शकता.

* प्रायमरनंतर फाउंडेशन लावा. त्वचेचा प्रकार आणि आवश्यकतेनुसार फाउंडेशन ग्लॉसी, जेलबेस्ड, एचडी अथवा सिलिकॉन घ्या. फाउंडेशन समान टोनचेच घ्या. सावळ्या त्वचेवर थोडे जरी गोऱ्या त्वचेचे फाउंडेशन वापरले तर त्वचा चोक्ड होते आणि पांढरी वाटू लागते.

* कटुरिंगसुद्धा सावळया त्वचेच्या मेकअपमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते. तुमच्या चेहऱ्यावरील उंचवटे हायलाईट करा आणि छिद्र असतील तर ती भरा.  यामुळे त्वचा समान आणि आकर्षक दिसू लागते

* बेस, फाउंडेशन, कटूरिंग आणि ब्लशऑननंतर ओठाचा मेकअप करा. सावळया त्वचेच्या ओठांच्या मेकअपसाठी ब्राऊन, मरून, रेड आणि चेरी रेड यासारखे अर्थी कलर्स अथवा कोरल कलर्सचा वापर करा.

* डोळयांच्या मेकअपकडे जास्त लक्ष द्या, कारण सुंदर डोळे सावळया मुलींना आणखी आकर्षक लुक देतात. स्मोकी डोळयांकरिता काळा रंग वापरू नका, उलट वाईन स्मोक, ब्राऊन स्मोक, ग्रे स्मोक यासारखे पर्याय आणि कोरल रंग वापरून पहा. नकली पापण्यासुद्धा सुंदर भारतीय लुकसाठी वापरून बघू शकता.

असा असावा नववधूचा श्रुंगार

* गरिमा पंकज

आपल्या लग्नात प्रत्येकीलाच सुंदर दिसावं वाटतं आणि सुंदरता वाढविण्यामध्ये वस्त्र आणि अलंकारांसह मेकअपचंदेखील तितकंच मोठं योगदान असतं. वेगवेगळ्या भागात मेकअपच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात.

‘गृहशोभिके’च्या फेब सेमिनारमध्ये मेकअप आर्टिस्ट शिवानी गौडने इंडियन आणि पाकिस्तानी ब्रायडल मेकअपच्या टीप्स दिल्या :

इंडियन ब्रायडल मेकअप

आय मेकअप : मेकअपची सुरूवात डोळ्यांपासून करावी, कारण चेहऱ्याचं पहिलं आकर्षण डोळेच असतात. डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यासाठी सर्वप्रथम हलकी लाइन ड्रॉ करा आणि मग तीला ब्लेन्ड करा. लाइट कलरने सुरूवात करून डार्क कलरकडे जा आणि तो ब्लेन्ड करत जा. आउटर कॉर्नर्सला थोडा स्मोकी लुक देण्यासाठी डार्क ब्राऊन कलरचा वापर करू शकता.

ब्रायडल मेकअपमध्ये गोल्डन ग्लिटरचा वापर चांगला वाटतो. पण तुम्ही अन्य कोणताही आवडीचा रंग वापरू शकता. आता मसकारा लावून आर्टिफिशिअल आईलॅशेज लावा. त्यामुळे डोळे मोठे दिसतात. मग डोळ्यांच्या कडांना काजळ लावून थोडंसं स्मज करून घ्या. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील.

बेस तयार करा : प्रथम त्वचेला मॉइश्चराइज करा. त्वचा ऑयली असेल तर जास्त मॉइश्चराइझरचा वापर करू नका. जरूरी असेल तर ऑईल फ्री मॉइश्चरायझर लावा. मग प्रायमर लावा. त्यानंतर इफेक्टेड भागावर कंसील लावा. डाग अजिबात दिसणार नाहीत. आता लिक्किड क्रिम बेस्ड फाऊंडेशन चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावा. यानंतर ट्रान्सल्यूशन पावडर लावा. जेणेकरून काजळ पसरणार नाही आणि मेकअप अधिक काळापर्यंत टिकून राहिल. आता फेस कंटूरिंग करा जेणेकरून चेहऱ्याला सुंदर शेप देता येईल आणि फिचर्स उठून दिसतील. मग ब्लशर अप्लाय करा आणि त्यानंतर पीकबोन्स एरियावर हाईलाइट करा.

लिप मेकअप : प्रथम आपल्या ओठांवर लिपबाम लावून ते मुलायम बनवा. त्यानंतर लिप पेन्सिलने शेप द्या आणि त्याच रंगाची लिपस्टिक लावा. मेकअपनंतर फिक्सिंग स्प्रे वापरा, जेणेकरून मेकअप अधिक काळपर्यंत टिकून राहिल.

पाकिस्तानी ब्रायडल मेकअप

पाकिस्तानी ब्रायडल मेकअपमध्ये काही गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व इंडियन ब्रायडल मेकअपसारखीच पद्धत असते. पाकिस्तानी ब्रायडल मेकअपमध्ये या गोष्टींची काळजी घ्या.

* पाकिस्तानी ब्रायडल मेकअप दरम्यान लायनर जाड लावलं जातं.

* यात कट एन्ड क्रीज आय मेकअप असतो.

* हेवी आयलॅशेजचा वापर केला जातो.

* डोळ्यांवर ग्लिटर आणि पिगमेंट्सचा वापर होतो.

* फेस कंटूरिंग थोडी जास्त गडद असते.

* हेअरस्टायलिंगही हेवी असते. हाय पफ बनवला जातो. मोठमोठ्या स्टफिंग आणि एक्सटेंशन्सचा वापर होतो.

हेअर बन

हेअर स्टायलिस्ट सिल्की बालीने एक सुंदर हेअर बन बनवायची पद्धत सांगितली. आधी केसात हेअरमूज लावा. याने सिल्की स्मूद केस थोडे रफ होतील आणि त्यांची पकड सोप्या पद्धतीने होईल. यानंतर केसांना क्रिपिंग मशीनने क्रिप करा, जेणेकरून केसांत वॉल्यूम येईल.

आता पुन्हा ‘ए टु ए’ सेक्शन काढा आणि क्राऊन एरियातल्या केसांना बॅक कोंब करून पफ बनवा. मागील केसांना एकत्र करून पोनी बांधा. पोनीमध्ये कर्ल्स करा. आता एक राऊंड स्टफिंग लावा आणि कर्ल केलेल्या केसांना थोडं डिझाईन करून स्टफिंग कव्हर करा. आता फ्रंट सेक्शन स्टार्ट करा. सेंटर पार्टींग करा. मग अनेक पातळ सेक्शन घेऊन चांगल्या प्रकारे बॅक कोंब करा. आपल्या फेसनुसार फॉल देऊन पिन लावा. एक्सेसरीज लावून आणखीन जास्त आकर्षक बनवू शकता.

मार्च ते डिसेंबर ब्यूटीकॅलेंडर

* भारती तनेजा

प्रयेक महिन्यात आजूबाजूच्या मोसमात थोडा-फार बदल जरूर होतो. अशावेळी आपला लुक परफेक्ट राखणे, हे एक आव्हान असते. सादर आहे, महिन्यानुसार ब्यूटी कॅलेंडर, जे आपले लुक वर्षभर आकर्षक राखेल :

मार्च

रंगांच्या सणाची मजा आपल्या त्वचेलाही देण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करा. त्याचबरोबर त्वचेचं ऑइल व मेकअपच्या कोटने संरक्षण करा. त्यामुळे त्वचेला रंग चिकटणार नाही आणि अंघोळ करताना रंग सहजपणे साफ करता येईल.

एप्रिल

स्लिव्हलेस आउटफिटसोबत स्वत:ला कंफर्टेबल फील करण्यासाठी आपण पल्सड लाइट ट्रीटमेंट करू शकता. हे शरीरावरील अनावश्यक केसांपासून कायमची सुटका करून देणारे सोपे व उपयुक्त तंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा-पुन्हा वॅक्स करण्याच्या संकटांपासून मुक्ती मिळेल. एप्रिल हा कडक उन्हाचा महिना आहे. म्हणून स्वत:ला सुरक्षेची छत्री म्हणजेच सनस्क्रीन लोशनच्या कोटने कव्हर करा.

मे

चिपचिप्या गरमीच्या या मोसमात आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी पेस्टल कलर्सचा वापर करा. जर खूप काळापासून शॉर्ट केसांची इच्छा अपूर्ण राहिली असेल, तर या महिन्यात आपण आपली इच्छा पूर्ण करू शकता.

जून

व्हॅकेशनच्या काळात सगळा वेळ मेकअपमध्ये जाऊ नये म्हणून परमनंट मेकअपचे तंत्र स्विकारा. डोळयांना सुंदर बनविण्यासाठी परमनंट आयब्रोज, परमनंट आयलाइनर आणि परमनंट काजळ उपलब्ध आहे, तर ओठांना सेक्सी लुक देण्यासाठी लिपलायनर व लिपस्टिकही. ल्यूकोडर्माचे पॅचेस लपविण्यासाठी परमनंट कलरिंगचे ऑप्शनही उपलब्ध आहेत. याबरोबरच नेल्ससाठीही सेमीपरमनंट सोल्युशनसारखे नेल एक्सटेंशन आणि नेलआर्टसारखे तंत्र उपलब्ध आहे. असा मेकअप करून तुम्ही ट्रीपचा आपला किंमती वेळ वाचवू शकता.

जुलै

हा काळ कॉलेजचा असतो. शाळेतून पास झालेल्या विद्यार्थिनी कॉलेजच्या हवेत श्वास घ्यायला सुरुवात करतात. या फेजमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी स्ट्रीक्स कलर करू शकता. गर्लिश लुकसाठी कलरफुल लायनरचा वापर करू शकता.

ऑगस्ट

ओल्या मोसमात नेहमी फ्रेश दिसण्यासाठी सकाळ-संध्याकाळ एरोमॅटिक स्नान करू शकता. पावसात भिजल्यानंतर केस तसेच ठेवू नका. तर त्यांना एखाद्या चांगल्या शॉम्पूने वॉश करा. जेणेकरून ते चिकट होणार नाहीत आणि कोंडयाचा धोकाही राहणार नाही. दिवसातून कमीत कमी २-३ वेळा चेहरा स्किन टोनरच्या मदतीने स्वच्छ करा. त्यामुळे ऑइल कमी होईल व चेहऱ्याचा टवटवीतपणा टिकून राहील.

सप्टेंबर

लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या तरुणींनी या महिन्यापासून एखाद्या चांगल्या ब्यूटी क्लिनिकमधून प्रीब्रायडल ट्रीटमेंट सुरू करू शकता.

ऑक्टोबर

दिव्यांनी सजलेल्या सणाच्या काळात आकर्षक दिसण्यासाठी ट्रेडिशनल लुक स्विकारू शकता. याबरोबरच, कार्ड पार्टीमध्ये सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनण्यासाठी डोळयांनां स्मोकी मेकअप आणि नेल्सवर ३डी नेलआर्ट जरूर करा.

नोव्हेंबर

लग्नाच्या आठवणी सुंदर बनविण्यासाठी एअरब्रश मेकअपची निवड करा. हा खूप हलका आणि स्मूद असून यामुळे त्वचा नितळ व डागरहित दिसते. या तंत्रात एअरगनच्या माध्यमातून मेकअप केला जातो.

डिसेंबर

ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी काहीतरी कलरफुल निवडा. त्याचबरोबर चमकत्या त्वचेसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बॉडी पॉलिशिंग करा.

ओठांना रंगू द्या

* सोमा घोष

लिपस्टिकविना मेकअप केव्हाही अपुरा वाटतो. तरुण असो वा वृद्ध लिपस्टिकमुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर तेज येतं. अलीकडे तर सर्वांनाच याची क्रेझ आहे. म्हणूनच सौंदर्यप्रसाधनं बनवणाऱ्या कंपन्या अलीकडे सतत नवनवीन रंगांच्या लिपस्टिक्स बाजारात आणत आहेत. पण तुम्ही जर योग्य प्रकारे लिपस्टिक लावली नाही तर तुमचं सौंदर्य वाढण्याऐवजी आणखीन कमी होईल. काही स्त्रियांच्या लिपस्टिकचा प्रभाव त्यांच्या दातांवरही दिसून येतो, जो दिसायला खराब दिसतो. त्याचबरोबर लिपस्टिक आपला पेहराव आणि प्रसंगानुसार निवडणंही विशेष ठरतं.

मग या जाणून घेऊया काही टिप्स :

मेबलिन न्यूयॉर्कची मेकअप आर्टिस्ट एल्टन जे. फर्नांडिस लिपस्टिक लावण्याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देत आहे, ज्यामुळे नक्कीच तुमचं सौंदर्य आणखीन वाढेल.

* एक इअरबड घेऊन तो मेकअप रिमूव्हरमध्ये घालून त्याच्या मदतीने आधी आपले ओठ स्वच्छ करून घ्या. जर तुम्हाला डार्क लिपस्टिकनंतर फिकट रंग लावायचा असेल तर ओठांवरील आधीचा रंग पूर्णपणे जाणं गरजेचं आहे. गडद रंग ओठांबाहेर जातो, म्हणून तो स्वच्छ करून मग फिकट रंग लावावा.

* लिपस्टिक लावताना ती तुमच्या कपड्यांना लागू नये याची काळजी घ्या. अलीकडे ओंब्रे फॅशनमध्ये आहे. तुम्ही जर तरुण आणि प्लेफुल असाल तर २ किंवा ३ रंगांची लिपस्टिक लेअरमध्ये लावा. ही कोणत्याही रंगाच्या कपड्यांसोबत चांगली दिसते. तुम्ही जर ग्लॉसी रेड लिपस्टिक लावली असेल तर ती पसरू नये म्हणून सावध राहा. त्याचा एक थर लावल्यानंतर जरा वेळेसाठी सोडून द्या. मग दुसरा थर लावा. त्याने लिपस्टिक बराच वेळ टिकून राहील. लिपस्टिक ओठांच्या मधोमध लावायला सुरू करून कोपऱ्यांपर्यंत न्या.

* लिपस्टिक लावल्यानंतरही इयरबडने आजूबाजूला पसरलेली लिपस्टिक स्वच्छ करून घ्या.

* कोणत्या मोसमात कोणत्या रंगाची लिपस्टिक लावावी, हे तुमच्या मूडवर अवलंबून आहे. तसंही दिवसा फिकट आणि रात्री डार्क कलर्स जास्त चांगले दिसतात. अलीकडे बराच वेळ टिकून राहाणारी लिपस्टिकही बाजारात मिळते, ज्याला वारंवार टचअप करण्याचीही गरज नसते. कायम ब्रॅण्डेड लिपस्टिकच वापरा.

* तरुणींना बहुतकरून गडद रंगाची लिपस्टिकच शोभून दिसते. लिपस्टिकसोबत तुम्ही लिप लायनरही लावू शकता.

* लिपस्टिक लावण्यापूर्वी टिंटेड बाम लावा. मग लिपस्टिक लावा. त्याने रंग जास्त फ्रेश दिसेल. लिपस्टिक लावल्यानंतर ओठांना चांगल्याप्रकारे स्मच करा, जेणेकरून बाम चांगल्याप्रकारे ओठांवर पसरेल.

* तुम्ही ब्रशनेही लिपस्टिक लावू शकता. याने लिपस्टिक पसरणार नाही. दोन रंगाच्या मिश्रणाने तयार झालेला रंगही फार आकर्षक असतो.

* अलीकडे मॅट फिनिश लिपस्टिकही खूप प्रचलित आहे. तुम्ही ही पटकन् लावू शकता. मात्र ही लावण्यापूर्वी आपल्या ओठांना मॉश्चरायइज जरूर करा.

* जास्त प्रमाणात लिपस्टिक लागल्यास ब्लॉटिंग पेपर किंवा टिश्यू पेपरने ती सुकवा.

* जर लिपस्टिक जास्तच पसरत असेल तर ट्रान्सलूशन पावडरचा वापर करून ती तुम्ही सुकवू शकता.

शिका स्वत:च मेकअप करायला

*  सौरव कश्यप, मेकअप आर्टिस्ट, नवी दिल्ली

योग्य मेकअपसाठी त्वचेच्या रंगानुसार योग्य रंगाच्या कॉस्मेटिकची निवड करा. हे कॉस्मेट्क्सि कशाप्रकारे वापरावेत जेणेकरून तुमचे सौंदर्य अधिक खुलून येईल हे जाणून घेण्यासाठी या काही खास टीप्स :

मेकअप करण्याच्या स्टेप्स

प्रायमर, कंसीलर, फाउंडेशन, कंटूरिंग, हायलायटिंग, पापण्यांना कर्ल करणे, आयशॅडो, मस्कारा, आयब्रोज, गाल, ओठ.

वॉटरप्रूफ मेकअप

गरमीच्या दिवसांत अशाप्रकारे मेकअप केला पाहिजे की घाम आणि काहिलीमुळे तो खराब होता कामा नये. या मोसमात वॉटरप्रूफ मेकअप करणेच योग्य असते. तो केवळ तुमच्या चेहऱ्यावर अधिक काळ टिकूच राहणार नाही तर यामुळे तुम्ही फ्रेश आणि प्रेजेंटेबलही दिसाल.

कसा कराल वॉटरप्रूफ मेकअप

वॉटरप्रूफ मेकअप हा रुक्ष त्वचेवर अधिक काळ टिकून राहतो, कारण अशी त्वचा तेल शोषून घेते. मात्र तेलकट त्वचेवर तुम्ही कितीही मेकअप करा, तो ३-४ तासांपेक्षा जास्त काळ राहत नाही. उन्हाळ्यात रुक्ष त्वचेवर वॉटरप्रूफ मेकअप केल्यास काहीच प्रॉब्लेम होत नाही, पण जर त्वचा तेलकट असेल तर मेकअप करताना या काही खास गोष्टींकडे लक्ष देणे जरुरी असते :

* जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मेकअप करण्याआधी त्वचेवर हीट आणि स्वेटिंग कमी करण्यासाठी बर्फ लावून घ्या.

* फाउंडेशनचा वापर कमीतकमी करा. यामुळे स्वेटिंग कमी होईल आणि मेकअपही जास्त काळ टिकून राहील.

* गरमीत फाउंडेशनऐवजी पॅन केक लावा.

* लिपस्टिक आणि आयशॅडोसाठी न्यूड शेड्सचा वापर करा. यामुळे मेकअप अधिक काळ टिकून राहील.

पार्टीसाठी मेकअप टीप्स

पार्टीसाठी फक्त ड्रेसच नाहीतर मेकअपकडेही लक्ष द्यावे लागते. पार्टीत जाताना घाईघाईत कसातरी मेकअप उरकू नका. एक मेकअप प्रॉडक्ट सुकल्यावरच दुसरे लावले पाहिजे. मेकअप करताना सर्वप्रथम प्रायमर लावला जातो. यामुळे चेहऱ्यावरचे डाग लपवले जातात. चेहऱ्यावर काही खळगे वगैरे असल्यास ते भरले जातात. मेकअपमध्ये शाइन आणि त्वचेवर ग्लो येतो.

प्रायमरनंतर कंसीलर लावावा. यामुळे चेहऱ्यातील सर्व उणीवा झाकता येतात. मेकअपला एक वेगळाच खुमार आणण्याकरता चेहऱ्यावर प्रिक्सी डस्ट स्प्रिंकल करा. भुवया आणि गालांवर अधिक स्प्रिंकल करा. मेकअप पूर्ण झाल्यावरही वेळोवेळी त्याचे टचअप करत राहा.

ऑफिससाठी मेकअप टिप्स

काही महिलांना ऑफिसमध्ये मेकअप करून जाणे पसंत नसते तर काहीजणी जरा जास्तच मेकअप करून येतात. खरंतर ऑफिसमध्ये हलकासा मेकअप करून गेल्यामुळे एकतर तुम्ही आकर्षक तर दिसालच, पण ट्रेंडीही वाटाल. सादर आहेत काही टीप्स :

* औपचारिक वातावरणात नेहमी लाइट मेकअप करावा.

* जास्त भडक लिपस्टिक लावू नका.

* आयशॅडो लावू नका, काजळ किंवा आयलाइनर लावा.

* ग्लिटर्स किंवा स्पार्कल्सचा वापर करू नका.

* चेहऱ्यावरचे डाग लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करा.

लेटेस्ट ट्रेंड आहे हाय डेफिनेशन मेकअप

आजकाल हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांची चलती आहे. ज्याच्या नजरेतून चेहऱ्यावरच्या छोटया छोटया डिटेल्स जसं की सूक्ष्म रेषा, सुरकुत्या, डाग इ. लपवणे शक्य नसते. त्यामुळे हाय डेफिनेशन मेकअप म्हणजेच एचडी मेकअप करणे पसंत करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

केवळ सेलिब्रिटीजच नाही तर सर्वसाधारण महिलाही हा मेकअप करणे पसंत करू लागल्या आहेत. मार्केटमध्ये सर्व नामंकित ब्रँड्सचे एचडी मेकअप उपलब्ध आहेत. ज्यात माइका, सिलिकॉन, क्रिस्टल्स किंवा क्वार्ट्झ यापैकी काहीतरी असतेच. हे कण त्वचेच्या सोबत वरच्या स्तरावर जमतात आणि लाइटला  अतिशय सूक्ष्म किरणांच्या स्वरूपात पसरवतात. काही एचडी मेकअपमध्ये मॅटिफाईंग एजंट्स असतात, जे तेलकट त्वचेतील चमक रोखतात आणि त्वचेच्या ग्लेयरपासून रक्षण करतात. जर तुमची त्वचा स्वच्छ असेल तर लिक्विड फाउंडेशनचा वापर करा आणि जर स्किन खराब असेल तर मॅटचा वापर करा. कारण हा थोडा जाड स्तर तयार करतो.

वाढत्या वयातील मुलींना द्या सौंदर्यमंत्र

* अनुराधा गुप्ता

पार्टीवरून घरी परतल्यावर सोनम जेव्हा तिच्या बेडरूममध्ये घुसली, तेव्हा तिथलं दृश्य पाहून ती चकितच झाली. ड्रेसिंग टेबलवर कॉस्मेटिकचं सामान विखुरलेलं होतं आणि तिची १३ वर्षांची मुलगी आलिया नटूनथटून स्वत:ला आरशात न्याहाळत होती. संतापलेली सोनम आलियाच्या गालावर चापट मारत म्हणाली की या मुलांनी वापरायच्या गोष्टी नाहीत.

हे दृश्य होतं पूर्वीच्या काळातील आईंचं. परंतु अलीकडच्या आया मात्र अशा नाहीएत. त्या स्वत: तर मेकअप करतातच, वर आपल्या मुलीलादेखील कॉस्मेटिकचा वापर करण्यास रोखत नाहीत. खासकरून मुलगी टीनएजर असेल तर अजिबातच नाही. आपल्या आईला मेकअप करताना पाहून त्यांनादेखील या गोष्टी वापराव्या वाटतात.

याबाबत कॉस्मेटोलॉजिस्ट व माइंड थेरपिस्ट अवलीन खोकर सांगतात, ‘‘अलीकडे शाळांमध्ये अनेक अॅक्टिव्हिटीज होत असतात आणि यामध्ये मुलांना सजण्यास तसंच प्रेंझेटेबल दाखविण्यासाठी मेकअपचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त अलीकडे टीव्ही सीरियल्स आणि चित्रपटांमध्येदेखील कमी वयाच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स दिसत असतात. १३ ते १६ दरम्यानचं वय असं असतं, जेव्हा मुली आपल्या लुकवर जरा अधिकच लक्ष देतात. हे वय सिनेतारका आणि मॉडेल्सना जरा अधिकच प्रभावित करतं.

‘‘सिनेमा वा सीरियलमध्ये कोणता नवीन लुक आलाय तो स्वीकारण्याबाबत आईदेखील आपल्या मुलीला रोखू शकत नाही; कारण ती स्वत:देखील तो लुक करून पाहाते. अशावेळी मुलीला वाटतं की जर आई करत असेल तर मीदेखील करू शकते. फक्त हीच बाब आईने आपल्या मुलींना समजावून सांगायला हवी की आई जे कोणतं प्रॉडक्ट वापरतेय ते तिची मुलगी वापरू शकतेच असं नाही; कारण तिची त्वचा अजून केमिकल्सचा हार्डनेस सहन करण्यालायक बनलेली नाही.’’

आईलादेखील माहीत असायला हवं की तिच्या मुलीच्या त्वचेवर कोणती उत्पादनं वापरता येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या त्वचेवर कोणतंही उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या इनग्रीडिएंजेट्वर लक्ष द्यायला हवं. उत्पादनं जर डर्मेटोलॉजिस्टद्वारे अप्रूव्ड असतील, सल्फेटिक अॅसिड आणि मिंट एजेंट असतील, तरच ती उत्पादनं तुमच्या मुलीच्या त्वचेवर वापरा. ज्या प्रॉडक्ट्समध्ये पॅराबीन, पॅथॉलेट्स ट्रिक्लोसन, पर्कोलेटसारखी तत्त्वं असतील, तर कधीच मुलांना वापरायला देऊ नका; कारण ही त्वचेला ड्राय करतात आणि अॅक्नेची समस्या वाढवितात.

फेअरनेस क्रीमविषयीचे गैरसमज

या वयातील मुलींमध्ये खासकरून सावळ्या मुलींमध्ये फेअरनेस क्रीमची खूपच क्रेझ असते. बाजारातदेखील फेअरनेस क्रीमचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की कोणा एकाची निवड करणं कठीण होऊन बसतं. अशावेळी डोळे झाकून आणि ब्रॅण्डच्या भरवशावर क्रीम खरेदी करणं आणि ते वापरण्याशिवाय कोणताही पर्याय राहात नाही. परंतु याबाबत अवलीनचं ऐकलं तर स्किन कलर मेलानिनने बनतो. हा नैसर्गिक असतो. यामुळे चेहरा उजळतो पण कोणतीही क्रीम डस्की स्किनला फेअर बनवू शकत नाही. हे फक्त कॉस्मेटिक सर्जरीनेच शक्य आहे, जे या वयातील मुलींनी अजिबात करता कामा नये. त्वचेचा रंग उजळविण्यासाठी मात्र आयांनी आपल्या मुलींना या टिप्स नक्कीच द्यायला हव्यात :

* उन्हात जाताना वा जात नसाल तर दिवसातून दररोज ३ वेळा चेहरा स्वच्छ करून सनस्क्रीन आवर्जून लावा. खरं म्हणजे, जेव्हा त्वचा सूर्याच्या संपर्कात येते, तेव्हा त्यामध्ये मेलानिन बनू लागतं, ज्यामुळे त्वचेचा रंग फिका पडू लागतो. सनस्क्रीन त्वचेसाठी सुरक्षाकवचाचं काम करतं. हे त्वचेत मेलानिन बनण्यापासून रोखतं, सकाळी शाळेत जाताना मुलीला आवर्जून सनस्क्रीन लावायला सांगा. लक्षात ठेवा की कॉस्मेटिक ब्रॅण्ड्सचं सनस्क्रीन घेण्याऐवजी मेडिटिड सनस्क्रीन मुलीसाठी निवडा. कॉस्मेस्यूटिकल सनस्क्रीन वापरू नका. जेव्हा मुलगी घरी येईल तेव्हादेखील तिला सनस्क्रीन लावायला सांगा; कारण ट्यूबलाइट आणि बल्बमध्येदेखील अल्ट्राव्हायलेट किरणं असतात, जी त्वचेत मेलानिन बनविते.

* अनेकदा आया मुलीचा रंग उजळविण्यासाठी वर्तमानपत्रं आणि टीव्हीवर येणाऱ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींना भुलून महागड्या क्रीम्स विकत घेतात, परंतु त्याचा परिणाम मुलीच्या त्वचेवर दिसत नाही. त्यामुळे वारंवार क्रीम्स बदलण्याऐवजी योग्य म्हणजे जी कोणतीही क्रीम विकत घ्याल त्यावरच्या पॅकवर लिहिलेले इनग्रीडिएंट्स वाचा. खरंतर, ब्लीच एजेंट, हायड्रोक्यानिक आणि कोजिक अॅसिड असणाऱ्या फेअरनेस क्रीम घेण्याऐवजी लायकोरिस, नियासिनेमाइड आणि एलोवेरोयुक्त फेअरनेस क्रीम्स विकत घ्या. या चेहऱ्याचा रंग फेअर करतात.

त्वचेचा टेक्स्चर ओळखा

या वयाच्या जवळजवळ सर्वच मुलींची मासिकपाळी सुरू झालेली असते. यामुळे त्यांच्यात हार्मोनल बदलदेखील होतात, ज्याचा परिणाम त्वचेवरदेखील होतो.

द स्किन सेंटरचे डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर वरुण कतियाल सांगतात, ‘‘त्वचेचा टेक्स्चर ४ प्रकारचा असतो-ऑयली, नॉर्मल, कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह. तुम्हाला जर तुमच्या मुलीचा स्किन टेक्स्चर ओळखायचा असेल तर सकाळी जेव्हा ती झोपून उठेल तेव्हा तिच्या चेहऱ्याचा टी झोन आणि यू झोनवर एक टिश्यू पेपर लावा आणि पाहा की कुठे अधिक तेल आहे. जर टी आणि यू दोन्ही झोनवर तेल असेल तर त्वचा तेलकट आहे. जर टीवर तेल आहे आणि यूवर नाही, तर त्वचेचं टेक्स्चर कॉम्बिनेशन आहे.

‘‘बाजारात प्रत्येक त्वचेनुसार प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. तरीदेखील प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे लिहिलेलं असतं की प्रॉडक्ट कॉमेडोजेनिक आहेत वा नॉन कॉमेडोजेनिक आहे. मुलीला कधीही कॉमेडोजेनिक प्रॉडक्टचा वापर करू देऊ नका; कारण यामुळे त्वचेची छिद्रं ब्लॉक होतात, त्यामुळे मुरुमं होण्याचा धोका निर्माण होतो.’’

सुगंधी उत्पादनं नुकसानकारक

या वयातील मुलं रंग आणि सुवासाकडे अधिक आकर्षित होतात; खासकरून मुली. त्यांचा असा समज असतो की रंग आणि सुगंधाच्या प्रभावामुळे त्यांची त्वचा सुंदर होईल. खरंतर हे नुकसानदायक आहे. एक आईच आपल्या मुलीला हे समजावू शकते की हे वय त्वचेला व्यवस्थित स्वच्छ करण्याचं आहे, आर्टिफिशियल लुक देण्याचं नाही.

याबाबत एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर अमित बांगिया सांगतात, ‘‘बाजारात अनेक उत्पादनं आहेत आणि त्यावर लिहिलेलं असतं की हे उत्पादन एलोव्हेरो, रोजमेरी, जस्मिन वा मग कोकोनटयुक्त आहे. सोबतच या उत्पादनातून तसाच सुगंधदेखील येत असतो. परंतु खरंतर सुवासिक उत्पादनांमध्ये फक्त इसेन्स आणि केमिकलबरोबरच काहीच नसतं. एवढंच नाही तर ही फ्रेगरन्सची उत्पादनं तुमच्या मुलीच्या एस्ट्रोजन हार्मोनलादेखील प्रभावित करतात ज्यामुळे ती चिडचिडी होऊ शकते आणि तिचं वजनदेखील वाढू शकतं. त्वचेवर जो परिणाम होईल तो वेगळाच. म्हणूनच बाजारातील उपलब्ध ऑर्गेनिक उत्पादनांचाच वापर तुमच्या मुलीच्या त्वचेवर करा.’’

तर डोळे राहातील आरोग्यदायी व सुंदर

– डॉ. अनामिका प्रकाश श्रीवास्तव

डोळे शरीराचा नाजूक आणि गरजेचा भाग आहे. याबाबत थोडासा निष्काळजीपणा गंभीर रूप घेऊ शकतो. यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक रोग होऊ शकतात, कायमचा आंधळेपणा येऊ शकतो. डोळ्यांमध्ये खूपच लहान रक्तवाहिन्या असतात, यांना दुखापत झाल्यास अनेकदा रक्तदेखील येतं आणि डोळे लाल होतात. तसंही डोळे लाल होण्याची अनेक कारणं असू शकतात. कंजक्टिवायटिस, एक्यूट आयराइडोसाक्लायटिस, एक्यूट कंजसटिव्ह ग्लूकोमा, स्क्लेरायटिस रिफ्रेक्टिव्ह दोष, डोळ्यांत काही जाणं वा दुखापत होणं इत्यादी.

डोळ्यात काही गेल्यास

डोळ्यात काही गेल्यास डोळा चोळू नका. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवा. डोळ्यात एखादा कण गेल्यास तो स्वच्छ कापूस वा रूमालाने काढा. त्यानंतरदेखील त्रास झाला, तर नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या. डोळ्यातील छोट्याशा दुखापतीकडेदेखील दुर्लक्ष करू नका. परंतु नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या.

डोळ्यांची निगा

संसर्गित व्यक्तिच्या संपर्कात राहू नका. त्याच्याशी हस्तांदोलन करू नका आणि त्याचा टॉवेल, रूमाल यांचा वापर करू नका.

अधिक धूळमातीच्या जागी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा. स्विमिंग पूल व एखाद्या सार्वजनिक जागी अंघोळीनंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. झोपून वाचू नका. सूर्य आणि प्रखर प्रकाश इत्यादी सरळ पाहू नका. कारण यामुळे डोळ्यांवर दबाव पडतो.

डोळे आणि आपला आहार

डोळ्यांचं आरोग्य आणि सौंदर्य कायम राखण्यात आहाराची महत्त्वाची भूमिका आहे. जी लोक खूप वेळ, अधिक उशिरापर्यंत खूप अधिक वा कमी प्रकाशात काम करतात, त्यांनी आपल्या डोळ्यांची खास काळजी घ्यायला हवी.

विटामिन ए सतेज डोळ्यांसाठी खूपच गरजेचं आहे आणि आपल्या आहारात त्याचा समावेश करायला हवा. हे सर्व दूध, दही, अंडी, हिरव्या पालेभाज्या, गाजर, आंबा, पपया. संत्र, टरबूज इत्यादीमध्ये आढळतं. डोळ्यांसाठी विटामिन बीदेखील खूपच गरजेचं आहे, जे डाळी, केळी टोमॅटो, हिरव्या भाज्यांमध्ये आढळतं. आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी एका साधारण व्यक्तिमध्ये १० हजार यूनिट विटामिन दररोज घ्यायला हवेत.

डोळ्यांच्या सौंदर्यासाठी व्यायाम

  • तुमचे डोळे उघडा आणि बंद करा. थोडा आराम दिल्यानंतर डोळे पुन्हा उघडा. ही क्रिया कमीत कमी ५ वेळा करा.
  • डोकं न हलवता डोळे डाव्या बाजूने फिरवा आणि जेवढं पाहाता येईल तेवढं पाहा. त्यानंतर डोळे समोर आणा. आता डोळे उजव्या बाजूने फिरवा आणि जेवढं पाहाता येईल तेवढं पाहा. ही क्रिया १० वेळा करा.
  • डोकं स्थिर ठेवून शक्य होईल तेवढं वर पाहा. त्यानंतर खाली पाहा. ही क्रिया १० वेळा करा.
  • एखादं रोपटं समोर ठेवून थोडा वेळ नजर स्थिर ठेवून त्याकडे पाहात राहा. थोड्या वेळानंतर रोपट्याच्या पानांवर नजर फिरवा. ही क्रिया कमीत कमी १० मिनिटं दररोज करा.

स्लिमिंग मेकअपने चेहरा दिसतो स्लिम व आकर्षक

* प्रिती जैन

करीना कपूर, विद्या बालन, कतरिना कैफ, अँजेलिना जोली, अमिषा पटेल, सोनाक्षी सिन्हा, प्रिती झिंटा, जरीन खान, समीरा रेड्डी अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्या सुंदर शरीराबरोबरच रेखीव चेहऱ्याच्या सौंदर्यवती आहेत. पण तुम्ही कधी हे पाहिले आहे की त्यांचा चेहरा त्यांच्या सडपातळ देहापेक्षा किती वजनदार आहे? नाही ना? कारण त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य तुम्हाला वेड लावतं आणि त्याचं कारण आहे, स्लिमिंग मेकअप पद्धती, ज्यामध्ये कुठल्याही महागड्या सर्जरीशिवाय तुम्ही तुमचा चेहरा बारीक व सुंदर भासवू शकता.

परफेक्ट आइज

स्लिमिंग मेकअप पद्धतीमध्ये प्रामुख्याने चेहरा रेखीव केला जातो. जसे, जर तुमचे गाल गरगरीत असतील तर ते कमी दाखवण्यासाठी डोळ्यांचा मेकअप असा करावा ज्याने लहान डोळे मोठे दिसतील. यासाठी काही टीप्स वापरून पाहा :

* आर्टिफिशिअल आयलॅशेज वापरा. त्यासोबत नॅचरल लॅशेज एकत्रित करून मस्काराची डबल कोटिंग करा.

* आऊटर कॉर्नरवर लायनर स्मज करून लावा.

* ब्लॅक काजल ऐवजी व्हाइट पेन्सिलचा वापर करा.

* लायनर लावतेवेळी वरील पापणीवर लायनरची जाड रेघ आणि खालील पापणीवर पातळ रेघ ओढावी.

* कॅट आइज लुक तयार करा. पण जास्त काळा रंग वापरू नये तर ब्लॅक शेडला शेडिंग म्हणून वापरावं.

* डोळे मोठे दाखवण्यासाठी कलर ब्लास्ट किंवा कॉन्टॅ्रस्ट लायनरचा वापरसुद्धा करू शकता. हे बाजारात सहजतेने उपलब्ध आहे.

* लोअर लॅशेजवर ट्रान्सपरंट मस्कारा लावावा.

* डोळे बोल्ड दिसण्यासाठी कलर कॉन्टक्ट लेंसचा वापर करा.

* आयशेडचे २-३ रंग मॅच करून आय मेकअप केल्याने डोळे जास्त उठून दिसतात.

ज्यूसी लिप्स

स्लिमिंग मेकअप पद्धतीमध्ये गोबरे गाल कमी दाखवण्यासाठी ओठांना उठाव दिला जातो. मेकअप आर्टिस्ट स्लिमिंग मेकअप पद्धतींचा वापर करून स्किनटोननुसार अशा सेन्शुअल लिपस्टिक शेडचा उपयोग करतात, जी ओठांचे सौंदर्य अधिक वाढवते.

* लिपस्टिक नेहमी ओठांच्या कोपऱ्यापासून मधल्या भागात लावा.

* लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर हलकेसे लिपग्लॉस किंवा हायग्लॉस जरूर लावावे.

* लिपस्टिक लावल्यानंतर मॅट इफेक्टसाठी टिशू पेपर ठेवून ओठांवर पावडर लावा.

* ग्लॅमर लुकसाठी रेग्युलर लिपस्टिकमध्ये गोल्ड पिगमेंट मिक्स करा.

* मॅक क्रेमस्टिक लिप लायनरने ओठांना सेन्सुअल लुक द्या. यामध्ये पुन्हा पुन्हा टचअप करण्याची गरज भासत नाही.
* डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी ओठांवर लिपबाम लावून टूथब्रशने जेन्टली रबिंग करा. यामुळे ओठांची डेड स्किन रिमूव्ह होऊन ओठ मॉइश्चराईज होतील.

* फनलविंग लुकसाठी रूबी रेड, प्लम, पिंक, स्पॅनिश पिंक, पीच इ.ची निवड करा.

* नाइट पार्टीमध्ये डार्क कलरची लिपस्टिक लावावी.

* लिपस्टिक पॉलिशड, मॅटी, फोमी, निओन इ, असावी. पण स्किनटोननुसारच लावावी.

फेस बेस मेकअप

स्लिमिंग मेकअप पद्धतींमध्ये फेस कंटूरिंगचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. कंटूरिंगद्वारे तुमचे चीकबोन्स, व जॉलाइन उठावदार दिसते. गोबरे गाल, डबल चीन, मोठे नाक आणि पफी आइज असे प्रॉब्लेमही कव्हर करू शकता. यासाठी तुम्ही स्किन शेडहून २-३ डार्क शेड फाऊंडेशनचा वापर कंटूरिंग करण्यासाठी वापरू शकता. तसेच फाऊंडेशन स्किनहून २-३ लाइट शेडची निवड हायलायटिंगसाठी करा.

हायलायटिंग एरिआ

बेसिकली टी झोन (कपाळामध्ये, नाकामधील ब्रीज लाईन व चिन सेंटरमध्ये) आणि अंडर आय एरिआला हायलायटिंग पॉइंट म्हटले जाते.

डार्क शेंडिग एरिआ

आउटर पोर्शन फेस चीक बोन्सपासून आतल्या दिशेने नेक लाइन शेडिंग पाँइंट आहे, जिथे डार्क फाउंडेशनशेडचा वापर करा. लक्षात ठेवा नॅचुरल लुकसाठी ब्लेडिंग जरूर करा.

ब्लशर पद्धत

एकाच ब्लशर पॅलेटमधील ३ रंगांचे ब्लशटोन घ्या. डार्क शेडचे ब्लशर चीकबोन्सच्या खालच्या दिशेने लावावे. मग ब्लेन्ड करा. मिडिअम शेड चीकबोन्समध्ये आणि डार्क शेड मधल्या भागात ब्लेन्ड करा. परफेक्ट ब्लशर टोनसाठी लाइटशेड ब्लशर पुन्हा चीकबोन्सवर लावून ब्लेन्ड करा.

परफेक्ट आयब्रो

आयब्रोजनेसुद्धा चेहरा बारीक दिसू शकतो. यासाठी आयब्रोला आर्च शेपमध्ये करून घ्या. यामुळे डोळे जास्त मोठे आणि उठावदार दिसतील आणि चेहरा स्लिम दिसेल. आयब्रोज डिफाइन करण्यासाठी हायलायटर लावून बोटाने ब्लेन्ड करा. आयब्रो शेप थिक व लाँगलेन्थ बनवा.

बेस्ट हेअर कट-हेअरस्टाईल

मिडिअम लेन्थ हेअर विथ साइड बॅग्स कटची निवड करा किंवा मिक्स लाँग लेन्थ लेअर किंवा फेअर कटिंगची निवड करा. ज्यामुळे चेहरा स्लिम दिसतो. पण केस जर लहान असतील तर शार्प बॉब विथ स्टे्रट पाँइंटने न्यू कट देता येऊ शकतो. ज्यामुळे सौंदर्य उठून दिसेल. याशिवाय बोल्ड बँग्स, सिल्क विथ स्टे्रट कट, मल्टीलेअर्स, ए लाईन स्टे्रट कट, हाय बन विथ बॅग्स, वॉटर फॉल ट्व्सिट विथ कर्ल्स, हाफ अपडू फंकीबन, ओपन हेअरस्टाईल विथ कर्ल्स, टाइट कर्ल विथ फ्रिंज्स, साइट स्विस्ट कर्ल, वन साईड बँग्स, हाय पफ विथ लूज पोनीटेल, लूज फंकी ब्रोकन कर्ल्स, लेअर कर्ल विथ टेक्चर इ. हेअर कट व हेअरस्टाइल चेहऱ्याला स्लिम आणि तुम्हाला हॉट, गॉर्जिअस व आकर्षक लुक देऊ शकेल.

सुंदर दिसण्याचे २० मंत्र

* सोमा घोष

  1. सौंदर्य ही एक मानसिक अवस्था आहे, जी आतून येते. जर तुम्ही विचार केला की आपण सुंदर आहोत तर तुम्ही नेहमीच सुंदर दिसाल. जसा तुम्ही स्वत:बाबत विचार कराल तशाच तुम्ही दिसाल. जर तुम्ही स्वत:ला स्वर्गातील परी समजत असाल तर तुम्ही स्वत:ला नक्की तसेच अनुभवाल.
  2. सकारात्मक मानसिकतेने सौंदर्य उजळते. गोरा रंग अथवा पिंगट केस याने कोणीच सुंदर दिसू शकत नाही. स्मिता पाटीलचे सौंदर्य आजच्या सगळया अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे. सुंदर दिसण्यासाठी गोरे असणे आवश्यक नाही.
  3. 3. साधे राहूनही सौंदर्य दिसते, कमी आणि लाईट मेकअपमध्येसुद्धा अनेक अभिनेत्री सुंदर दिसतात. अनेकदा सामान्य मेकअपमुळे तुमचे नाकडोळे उठून दिसतात. मेकअपपूर्वी आपल्या त्वचेला तयार करण्यासाठी प्रायमर लावायला विसरू नका, यामुळे मेकअप करणे सोपे जाते.
  4. 4. याशिवाय मेडिटेशन आणि योगा केल्यानेही सौंदर्यवृद्धी होते, कारण जितकी एखादी व्यक्ती तणावमुक्त असेल तेवढी तिची त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी वाटेल.
  5. सुंदर दिसण्यासाठी सध्याच्या काळात योग्य ग्रुमींग आवश्यक आहे. यात तुमच्या आयब्रोचा योग्य आकार, हेअरकट, फिगर योग्य असणे वगैरे सामील असते, कारण कोणत्याही कामात योग्य प्रेझेंटेबल महिलेलाच चांगली नोकरी मिळते. जर तिचे केस लांब असतील तर तिने आपल्या चेहऱ्यानुसार योग्य हेअरकट करण्याचा प्रयत्न करावा.
  6. याशिवाय हेअर कलर तुमचे वय आणि रंगानुरूप असावा.
  7. सौंदर्यासाठी तुमची त्वचा निरोगी असणे आवश्यक आहे आणि यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही शांत राहाता, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. जर त्वचेवर डाग अथवा पिगमेंटेशनची समस्या असेल तर मेकअपने तुम्ही ते लपवू शकत नाही.
  8. जास्त हायपर झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. शरीरात अनेक समस्या जाणवू लागतात, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. म्हणून वेळोवेळी स्वत:ला डिटॉक्स करण्यासाठी कारल्याचा रस प्यावा किंवा चेहऱ्याला बर्फ लावू शकता. सब्जा घातलेले पाणी प्यायल्याने त्वचा उजळते.
  9. व्हिटॅमिनयुक्त उत्पादने चेहऱ्यासाठी वापरल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा ताजीतवानी वाटते.
  10. चेहऱ्याच्या आकारानुसार मेकअप करा. जर चेहरा रुंद असेल, तर चेहऱ्याला कटुरिंग करणे आवश्यक असते. शाईन अजिबात लावू नका. शाईन लावल्याने चेहरा गुटगुटीत वाटेल. ज्यांचा चेहरा गुटगुटीत आहे अशांनी जास्त ब्लशऑन न लावता आपला चेहरा क्लीन ठेवला पाहिजे. अशा फेसकटसाठी केसांच्या काही बटा चेहऱ्यावर आणाव्या, जेणेकरून चेहऱ्याचे कटुरिंग होईल. याशिवाय लिपस्टिकसुद्धा हलक्या रंगांचा लावणे योग्य ठरेल.
  11. अशा आकाराच्या महिलांना आपल्या डोळयांना व्यवस्थित शेप द्यायला हवा, ज्यात लायनर, मस्कारा लावणे आवश्यक आहे.
  12. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग असतील, त्यांनी बी बी आणि सी सी क्रीम वापरून पाहावे, ज्यामुळे डाग फिकट होतील.
  13. लिपस्टिकबाबत बोलायचे झाले तर नोकरदार महिलांसाठी मॅट फिनिश लिपस्टिक योग्य ठरते, या अलीकडे ट्रेंडमध्येही आहेत. ग्लॉसी लिपस्टिक जास्त करून ओठांवर पसरते, म्हणून त्याचा वापर टाळा.
  14. दिवसा ग्लॉस लिपस्टिक लावणे टाळावे. मॅट फिनिशिंग असलेल्या लाँग लास्टिंग लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहे, त्यांचा वापर करावा.
  15. नेहमी स्किन टोनच्या हिशोबाने लिपस्टिक लावावा. डस्की स्किन टोन असलेल्यांना मरून, पिची अथवा ऑरेंज शेड चांगली दिसते. त्यांच्यावर गुलाबी लिपस्टिक खूपच वाईट दिसते. ब्लशऑनसुद्धा गुलाबी न लावता पिची असावे.
  16. गोऱ्या स्किन टोन वर गुलाबी लिपस्टिक आणि गुलाबी ब्लशऑन खूपच छान दिसते. अशा स्किन टोनवर गडद रंगाची लिपस्टिक लावल्यास चेहरा हार्श वाटतो.
  17. सावळया किंवा डस्की रंगावर ब्राऊन आय लायनर खूप छान दिसते.
  18. पिची क्रीम लिपस्टिक तुम्ही कोणत्याही वेळी किंवा मूडमध्ये लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येते. याशिवाय लाल रंगाची लिपस्टिक कोणालाही कोणत्याही वेळी सूट करते.
  19. दिवसा चमकणारे आयशॅडो खूप भयानक वाटतात. मॅट अथवा क्रेयॉन पेन्सिल टाईप आयशॅडो कोणतीही स्त्री लावू शकते, हे लावून थोडे स्मच केल्यास चेहरा सुंदर दिसतो, सॉफ्ट पिची कलर दिवसा नेहमी छान दिसतो. सध्या आय लायनरपेक्षा आय शॅडो लावण्याचा ट्रेंड आहे. मस्कारा आणि आयशॅडो डोळयांसाठी पुरेसे असतात. याने चेहरा नेहमी नाजूक वाटतो.
  20. म्यॅच्युअर महिलांनी कधीच चमकणारी आयशॅडो लावू नये, यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू लागतात. मॅट फिनिश नेहमी छान दिसते. तरुण मुलींसाठी क्रिमी मेकअप जास्त चांगले असते. यामुळे चेहऱ्यावर निरागसता दिसते.

याशिवाय ओजस संदेश देते की स्वत:ला नेहमी तरूण आणि ताजेतवाने ठेवा, मेकअप कमीतकमी करा,    नेहमी खुश राहा, प्रेमाने वागा आणि सर्वांना प्रेम वाटा.

स्टायलिश केसांद्वारे स्मार्ट लुक

* गरिमा पंकज

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक वेशभूषा आणि मोहक अदांसोबतच केस स्टायलिश आणि निरोगी दिसणेही गरजेचे आहे. दिल्ली प्रेसमध्ये आयोजित फेबच्या कार्यक्रमात हेअर आणि केमिकल आर्टिस्ट नाजिम अली यांनी अॅडव्हान्स हेअर कटिंग, थ्री डी हायलायटिंग, केरोटिन स्मूथनिंग ट्रीटमेंट, टेंपररी रोलर सेटिंग आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

दिल्लीस्थित गांधी नगरातील ‘साहिबसाहिबा ब्यूटी सलून’चे मालक नाजिम अली यांनी भारतात पहिल्यांदा फायर हेअरकट लोकप्रिय केला. फायर हेअरकट एक नवीन ट्रेंड आहे जो मुले आणि तरुणाईला आकर्षित करतो. यात वॅक्सशिवाय जेल, स्प्रेद्वारे केसांना फंकी लुक दिला जातो.

अॅडव्हान्स हेअरकट

अॅडव्हान्स हेअरकट अनेक प्रकारचे असतात. जसे की डायमंड कट, लाँग हेअरकट, ग्रॅज्युएशन कट इत्यादी. यात कानापासून कानापर्यंत केसांचे चार भाग करून त्यांना मल्टिलेअर दिले जातात. त्यानंतर टेक्स्चरायजिंग केले जाते. यामुळे पातळ केसही भारदस्त दिसू लागतात आणि बाऊन्सी होतात.

थ्री डी हायलायटिंग

यात सर्वप्रथम केसांना प्रीलाईट करतात. त्यानंतर त्यात थ्री डी (लाल, हिरवा, निळा असे तीन वेगवेगळे रंग) घेऊन हायलायटिंग केले जाते. यामुळे केस स्टायलिश आणि आकर्षक दिसू लागतात.

केरॅटिन स्मूदिंग ट्रीटमेंट

या उपचार पद्धतीत सर्वात आधी केसांना शाम्पू करतात. त्यानंतर केस ८० टक्यांपर्यंत सुकवतात. मग केसांवर सेक्शन टू सेक्शन ट्रीटमेंट अप्लाय करून ४५ मिनिटे केस तसेच ठेवतात. त्यानंतर १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. मग फाईनफाईन म्हणजे केसांचे बारीक बारीक सेक्शन घेऊन आयरनिंग केले जाते. त्यानंतर ग्राहकाला दोन दिवसांनी बोलावून शाम्पू करून कंडिशनर आणि मास्क लावले जाते. त्यानंतर कोल्ड ड्रायरने सुकवून सीरम लावतात. हे केसांना ३० टक्क्यांपर्यंत स्ट्रेट करते, तसेच केस रिपेअर करण्याचेही काम करते.

खबरदारी : एखाद्या चांगल्या कंपनीचा शाम्पू आणि कंडिशनरचाच वापर करा, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत केस सरळ ठेवता येतील.

ओलाफ्लेक्स

यात कलर रिबॉण्डिंग केलेल्या केसांना ट्रीटमेंट देऊन त्यांना मुलायम आणि सिल्की बनवले जाते.

टेंपररी रोलर सेटिंग

सर्वात आधी केसांना हेअर स्प्रे करतात. त्यानंतर त्याचे सेक्शननुसार रोलर लावतात. यामुळे सरळ केस कुरळे आणि जाडसर दिसू लागतात.

थ्री डी बेबी लाँग ब्रँड हेयरडू

या हेअरस्टाइलची सुरुवात पुढे पफ काढून केली जाते. त्यानंतर केसांमधून थ्री डी लेयर काढून काही केस फ्रंट स्टायलिंगसाठी वापरले जातात. मागील उरलेल्या केसांमधून एक एक करून लेयर काढून त्याला कर्व म्हणजे वक्राकार आकार देतात. ते एकावर एक अशाप्रकारे सजवून तुम्ही आकर्षक हेयरडू बनवू शकता.

शेवटी तुमच्या आवडीची हेअर अॅक्सेसरीज किंवा हेअर ज्वेलरी वापरून तुम्ही त्याला अधिकच सुंदर बनवू शकता. कर्वच्या मधोमध रिकाम्या ठिकाणी अॅक्सेसरीज लावून ते अधिक मनमोहक बनवू शकता.

पॅटर्न हाय बन विथ रोजेस

सर्वप्रथम केसांच्या मध्यभागापासून दोन भाग करून पुढचे केस सोडून देतात. नंतर मागील भागातील केस डोक्यावर घेऊन उंच पोनी बांधतात. त्या पोनीचे चार भाग करून एक क्रॉस म्हणजे फुल्लीचा आकार देतात. त्यानंतर त्या पोनीवर एक मोठा डोनट आणि एक छोटा डोनट बनवून पिनअप करतात. त्यानंतर चार भागातील एक भाग घेऊन रोज म्हणजे गुलाबाचा आकार तयार करतात. त्यानंतर त्यात एक कर्व म्हणजे वक्राकार वळण घेऊन यू आकार देतात आणि त्या भागाला रोजखाली घेऊन जातात. हीच पद्धत उर्वरित तीन भागांसाठी वापरतात.

पुढच्या केसांचे काटयाच्या मदतीने तीन भाग घेऊन थ्री डी लेअरिंग काढून क्लिपच्या मदतीने त्याला आकार देतात. अशाप्रकारे तुम्हाला मिळतो मनाजोगता हेअरडू.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें