या 15 टिपांनी Diabetes नियंत्रण ठेवा

* प्रतिनिधी

जरी मधुमेह जगभरात पसरला आहे, परंतु आज भारत त्याचा सर्वात मोठा गड आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 21 व्या शतकातील जीवनशैली. पण जर वेळीच त्याकडे लक्ष दिले गेले आणि आहारात सुधारणा झाली तर ते बऱ्याच अंशी नियंत्रणात राहू शकते.

हा उपाय करा

  1. व्यायाम अभ्यास दर्शवतो की व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. परिणामी, उच्च चयापचय आणि मधुमेहाचा धोका कमी असतो.
  2. साखर घेऊ नका तुम्ही कमी साखर, गूळ, मध, कोल्ड्रिंक्स इत्यादी खावे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी पूर्णपणे नियंत्रणात राहील. जास्त साखरयुक्त पदार्थ आणि शर्करायुक्त पेये वापरल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते.
  3. फायबर – रक्तातील साखर शोषण्यात फायबर महत्वाची भूमिका बजावते. म्हणून, आपण गहू, तपकिरी तांदूळ किंवा गव्हाची भाकरी इत्यादी खावी, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होईल, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होईल.
  4. ताजी फळे आणि भाज्या – फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे मिश्रण असते आणि शरीराला सर्व प्रकारचे पोषण प्रदान करते. ताज्या फळांमध्ये जीवनसत्त्वे अ आणि क असतात, जे रक्त आणि हाडांचे आरोग्य राखतात. याशिवाय झिंक, पोटॅशियम, लोह यांचे चांगले मिश्रणही आढळते. पालक, खोभी, कडू, अरबी, खवय्या इत्यादी मधुमेहामध्ये आरोग्य वाढवणारे आहेत. त्यात कॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि मॅग्नेशियम जास्त आहे, जे मधुमेह बरे करते.
  5. ग्रीन टी – दररोज साखरेशिवाय ग्रीन टी प्या कारण त्यात अँटी -ऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि रक्तातील साखरेची पातळी राखतात.
  6. कॉफी जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने हृदयरोग होऊ शकतो, परंतु जर ते कमी प्रमाणात घेतले तर ते रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात राखू शकते.
  7. अन्नाची विशेष काळजी घेणे – थोडा वेळ अन्न न घेतल्याने, हायपोग्लाइसीमिया होण्याची शक्यता खूप वाढते, ज्यामध्ये साखर 70 च्या खाली येते. सुमारे अडीच तासांनी अन्न घेत रहा. दिवसातून तीन वेळा खाण्याऐवजी थोडेसे सहा-सात वेळा खा.
  8. दालचिनी – संशोधन असे सूचित करते की दालचिनी शरीरातील दाह कमी करते आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते. अन्न, चहा किंवा गरम पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून हे प्या.
  9. तणाव कमी करा – ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन दोन्ही तंत्रिकाच्या कार्यावर परिणाम करतात. जेव्हा तणावाच्या काळात एड्रेनालाईन सोडले जाते तेव्हा ते विस्कळीत होते, ज्यामुळे मधुमेहाचा उच्च धोका निर्माण होतो.
  10. उच्च प्रथिनेयुक्त आहार जे लोक मांसाहारी खातात त्यांनी त्यांच्या आहारात लिल मांसाचा समावेश करावा. उच्च प्रथिनेयुक्त आहार खाल्ल्याने शरीर मजबूत राहते कारण मधुमेहाच्या रुग्णांना कर्बोदके आणि जास्त चरबीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
  11. फास्ट फूडला नाही म्हणा – शरीराची वाईट स्थिती फक्त जंक फूड खाण्यामुळे होते. त्यात केवळ मीठच नाही तर तेलाच्या स्वरूपात साखर आणि कर्बोदके देखील असतात. हे सर्व तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.
  12. मीठावर बंदी – मीठाची योग्य मर्यादा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल विसंगतींचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, हे टाइप 2 मधुमेह देखील वाढवू शकते.
  13. भरपूर पाणी प्या – पाणी रक्तातील वाढलेली साखर गोळा करते, ज्यामुळे तुम्ही दररोज 2.5 लिटर पाणी प्यावे. हे तुम्हाला हृदयरोग किंवा मधुमेह देणार नाही.
  14. व्हिनेगर व्हिनेगर रक्तातील सांद्रित साखर स्वतःच विरघळवून हलका करतो. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की जेवणापूर्वी दोन चमचे व्हिनेगर घेतल्याने ग्लुकोजचा प्रवाह कमी होतो.
  15. सोया सोया मधुमेह कमी करण्यासाठी जादुई प्रभाव दाखवते. त्यात असलेले आयसोफ्लेव्होन्स साखरेची पातळी कमी करून शरीराला पोषण देतात.

जेव्हा सणात पीरियड्स सुरू होतात

* पूजा भारद्वाज

सणांच्या आनंदाच्या वातावरणात प्रत्येक जण आनंदाच्या मूडमध्ये असतो, परंतु स्त्रियांचा सणांचा आनंद तेव्हा खराब होतो, जेव्हा त्यांना अशावेळी पीरियड्स सुरू होतात. तेव्हा यादरम्यान येणारा थकवा, कंबर व पोटाच्या वेदना, जास्त ब्लीडिंग व डोकेदुखीसारख्या समस्या त्यांचा सर्व उत्साह कमी करतात व त्या इच्छा असूनही काही करू शकत नाहीत. त्यांची प्रत्येक इच्छा तशीच्या तशीच राहून जाते. घरातल्या इतरांना आनंद साजरा करताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरते. अशात जर त्यांनी या गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांचा सणांचा आनंददेखील कमी होणार नाही :

रहा टेन्शन फ्री

अशा वेळी स्त्रिया स्वत:ला एका मर्यादित व्याप्तीने बांधून घेतात व आजारपणासारखे वाटून घेतात, परंतु हे कोणतेच आजारपण नाही, तर ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे दबून नाही, खुलेपणाने जगा. पीरियडसंबंधी जास्त तणाव घेऊ नका, कारण जास्त तणाव घेणे त्यांच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विचार सकारात्मक ठेवले, तर जास्त चांगले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट आहे की, परिस्थिती कशीही असू द्या, आनंदी राहा. कारण जेव्हा तुम्ही आतून आनंदी रहाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील तेजाची गोष्टच वेगळी असेल.

हॉट वॉटर बॉटलने शेक

पीरियड्सच्या दरम्यान पोटात जर जास्त वेदना असेल, तर तुम्ही गरम पाण्याच्या बाटलीने शेक घेऊ शकता. कारण पीरियड्समध्ये पोटाच्या खालच्या भागात गरम पाण्याच्या बाटलीने शेक घेण्याने गर्भाशयाच्या मांसपेशींना आराम मिळतो व वेदनेपासून आराम होतो.

घ्या स्वच्छतेची विशेष काळजी

पीरियड्सच्या दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्या जेणेकरून तब्येतीवर याचा वाईट परिणाम होऊ नये. यादरम्यान वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याने तुम्ही कित्येक प्रकारच्या आजारांपासून, जसे की यूटीआय व इन्फेक्शनपासून वाचू शकता व यात सगळयात महत्त्वाची भूमिका त्या पॅड वा सॅनिटरी नॅपकिन्सची असते, जे तुम्ही पीरियड्स दरम्यान वापरता. याशिवाय पीरियड्स दरम्यान अँटिबायोटिक साबण वा क्लिंजरने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करा. अंघोळ जरूर करा. कारण यामुळे तुम्ही स्वत:ला फ्रेश वाटेल.

कंफर्ट गरजेचा

आजदेखील अशा कित्येक स्त्रिया आहेत, ज्या पीरियड्सदरम्यान सॅनिटरी पॅड्सच्या जागी अस्वच्छ कपडे, वर्तमानपत्रे, पाने किंवा चुकीच्या पॅडचा वापर करतात, ज्यात त्या स्वत:ला अनकम्फर्टेबल वाटतात व कपडे घाण होण्याच्या भीतीने कुठे जात नाहीत व उत्सवांचा पुष्कळ आनंद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या काळात फक्त पॅड्सचाच वापर करा, जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने जगू शकाल.

योग्य पॅड्स निवडा

पीरियड्सच्या दरम्यान पुष्कळ काळासाठी एकाच पॅडचा वापर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे पॅड कितीही चांगल्या क्लालिटीचे का असेना, कमीतकमी दिवसातून तीन वेळा जरूर बदला. सोबतच पॅडच्या क्वालिटीवरदेखील लक्ष द्या, कारण पुष्कळ स्त्रिया स्वस्तपणाला बळी पडून प्रॉडक्टच्या गुणवत्तेसोबत तडजोड करतात व कमी पैशांमध्ये हीन ब्रँडचे नॅपकिन्स वापरू लागतात, ज्यामुळे त्यांना रॅशेस येतात.

तसे तर बाजारात निरनिराळया कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत, परंतु यांची गोष्टच वेगळी आहे, कारण हे तुम्हाला मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य देते. याशिवाय हे हेवी फ्लोसाठी उपयुक्त आहे व लीकदेखील होत नाही. याला डिस्पोज करणेदेखील खूप सोपे आहे. शिवाय हे पॉकेट फ्रेंडली आहे.

गरजेच्या गोष्टी

* सॅनिटरी नॅपकिन तीन-चार तासांनी बदलत राहा.

* पाळीमध्ये स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही.

* पाळीमध्ये प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

* सुती अंडरवेअर वापरा.

* पाळीमध्ये डीहायड्रेशनची समस्यादेखील होऊ शकते. त्यामुळे जास्त पाणी प्या.

* या काळात तंग कपडे शक्यतो वापरू नका. सैल कपडे घाला.

१० उपाय गर्भावस्थेत अशी घ्या आपली काळजी

* गरिमा पंकज

गर्भावस्थेदरम्यान महिलांना अनेक शारीरिक आणि भावनिक बदलांचा सामना करावा लागतो. अशावेळेस आई आणि जन्म घेणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे की गर्भधारण करण्यापूर्वीच प्लानिंग केली जावी. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेच्या दरम्यान, प्रसूतीच्या कालखंडात आणि प्रसूतीनंतर.

चला जाणून घेऊया चारही अवस्थांदरम्यान आवश्यक दक्षतांविषयी :

गर्भधारणेपूवी

जर आपण माता बनण्याची योजना बनवत असाल तर सगळयात अगोदर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञास भेटावे. यामुळे आपणास निरोगी प्रेगनन्सी प्लॅन करण्यास मदत होईल. गर्भधारण करण्याच्या ३ महिने आधीपासून जो प्री प्रेगनन्सी पिरियड म्हटला जातो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल आणल्याने ना केवळ प्रजनन क्षमता सुधारते तर त्याचबरोबर गर्भावस्थेच्या दरम्यान होणाऱ्या समस्याही कमी होतात आणि प्रसूतीनंतर रिकव्हर होण्यास मदत मिळते.

प्रेगनन्ट होण्याआधी आपल्या मेडिकल हिस्ट्रीविषयी डॉक्टरांशी अवश्य चर्चा करा. खालील गोष्टींवर लक्ष्य द्या :

* आपणास डायबिटीज, थायरॉईड, दमा, किडनी, हार्ट डिसीज इत्यादी तर नाही ना. जर असेल तर प्रेगनन्सीच्या अगोदर त्याला नियंत्रित अवश्य करा.

* गर्भधारणेपूर्वी एचआयव्ही, हेपिटायटिस बी सिफिलिस इत्यादी टेस्ट अवश्य करून घेतल्या पाहिजे, ज्यामुळे प्रेगनन्सी किंवा प्रसूतीच्या वेळेस हे इन्फेकशन बाळात येणार नाही.

* आपण ब्लड टेस्ट करून हे लक्षात घ्या की चिकनपॉक्ससारख्या आजारापासून वाचवणारी लस घेतली आहे किंवा नाही. आपणास या आजारापासून धोका तर नाही ना, कारण असे इन्फेक्शन गर्भात वाढणाऱ्या अर्भकाला नुकसान पोहोचवू शकते.

* आपणास युटरीनं फाइब्रायड्स आणि एंडोमिट्रिओसिसच्या शक्यतेसाठीही तपासणी करून घेतली पाहिजे.

* जर आपल्या कुटुंबात डाउन सिंड्रोम, थैलेसिमियाचा इतिहास राहिला असेल तर याविषयीही डॉक्टरांना सांगावे.

सर्व्हायकल स्मीयर : आठवून पाहा की आपण मागच्या वेळेस सर्व्हायकल स्मीयर टेस्ट कधी करून घेतली होती. जर पुढची टेस्ट येणाऱ्या १ वर्षात करणे बाकी आहे तर ती आत्ताच करून घ्या. स्मीयर तपासणी साधारणपणे गर्भावस्थेत केली जात नाही, कारण गर्भावस्थेमुळे गर्भाशयमुखामध्ये बदल होऊ शकतात आणि योग्य रिपोर्ट येण्यात अडचणी येऊ शकतात.

वजन : जर आपले वजन जास्त असेल आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) २३ किंवा यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टर आपल्याला वजन कमी करण्याचा सल्ला देतील. वजन घटवल्याने आपली गर्भधारण करण्याची शक्यता वाढते आणि आपण आपल्या गर्भावस्थेची निरोगी सुरुवात करू शकता.

जर आपले वजन कमी असेल तर डॉक्टरांशी बीएमआई वाढवायच्या सुरक्षित उपायांविषयी चर्चा करा. जर आपले वजन कमी असेल तर मासिक पाळी अनियमित राहण्याची शक्यता अधिक असते. यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. आपला बीएमआई १८.५ आणि २२.९ च्या मध्ये असायला हवा.

गर्भावस्थेच्या दरम्यान : द इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या गाईडलाईन्सच्या अनुसार प्रेगनन्सीदरम्यान महिलेने आपल्या बीएमआईच्या हिशोबाने वजन वाढवायला हवे. अंडरवेट वुमन अर्थात बीएमआई १८.५ पेक्षा कमी असेल तर तिने १२ ते १८ किलो वजन वाढवायला हवे. नॉर्मल वेट वुमन अर्थात बीएमआई १८.५ ते २५ असेल तर ११ ते १५ किलोपर्यंत वजन वाढवा. महिला ओवर वेट असेल अर्थात २५ ते ३० पर्यंत बीएमआई असेल तर तिने ७ ते ११ किलोपर्यंत वजन वाढवायला हवे. ३० पेक्षा जास्त बीएमआई असल्यास ५ ते ९ किलोपर्यंत वजन वाढवायला हवे.

व्यायाम : व्यायाम हेल्दी लाइफस्टाइलचा महत्वाचा भाग आहे. कुठले कॉम्प्लिकेशन नसतील तर प्रेगनन्सी वुमनला हेल्दी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करत राहिले पाहिजे. कमीतकमी ३० मिनिटांचा साधा व्यायाम अवश्य करावा. आईस हॉकी, किक बॉक्सिंग, रायडींग इत्यादी करू नये.

समतोल आणि पौष्टिक आहार घ्यावा : मॅक्स हॉस्पिटल, शालिमार बाग, दिल्लीचे डॉक्टर एसएन बसू म्हणतात की गर्भावस्थेच्या दरम्यान समतोल आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावे. ज्यामुळे बाळाचा विकास आणि आपल्या शरीरामध्ये होत असलेल्या बदलांसाठी आपले शरीर तयार होऊ शकेल. एक माता बनणाऱ्या महिलेला सामान्यपणे दररोज ३०० अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते.

सप्लिमेंट्स : गर्भावस्थेच्या दरम्यान दररोज कॅल्शियम, फौलेट आणि आयरनच्या निश्चित प्रमाणाची सतत आवश्यकता असते. यांच्या पूर्ततेसाठी सप्लिमेंट्सचे सेवन करणे आवश्यक असते. कॅल्शियम-१२०० एमएल, फौलेट-६०० ते ८०० एमएल, आयरन-२७ एमएल.

प्रत्येक गर्भवती महिलेने गर्भावस्थेच्या दरम्यान १०० एमजीच्या आयर्नच्या १०० गोळयांचे सेवन अवश्य करायला हवे. हे माता आणि बाळ दोघांसाठी आवश्यक आहे.

प्रेगनन्ट महिलेने नेहमी फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुऊन खायला पाहिजे.

पुरेशी झोप घ्या : प्रेगनन्ट महिलांना भरपूर आराम आणि झोपेची आवश्यकता असते. त्यांनी रात्री कमीतकमी ८ तास आणि दिवसा २ तास झोपायला हवे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची लय बिघडून जाते.

शारीरिक रूपाने सक्रिय राहा : गर्भावस्थेच्या दरम्यानही आपली सामान्य दिनचर्या चालू ठेवा. घरातले काम करा. जर नोकरी करत असाल तर ऑफिसला जा. रोज अर्धा तास फिरा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले वर्कआऊट चालू ठेवा. लक्षात घ्या की यादरम्यान दोरीवरून उडी मारू नये आणि कोणतेच असे कार्य करू नये ज्यामुळे शरीराला झटका लागेल.

भावनिक आरोग्याची काळजी घ्या : गर्भावस्थेत भावनिक आरोग्याची काळजी घ्या. मूड स्विंग जास्त होत असेल तर औदासिन्याची शिकार होऊ शकता. जर २ आठवडयापर्यंत ही स्थिती राहिली तर डॉक्टरांशी संपर्क करावा.

प्रसूती : साधारण प्रसूतीमध्ये रिकव्हरी लवकर होते. ७ ते १० दिवसात शरीरामध्ये ऊर्जेची लेव्हल सामान्य होऊन जाते. याउलट साधारणपणे सिझेरियन प्रसूतीनंतर ४ ते ६ आठवड्यांपर्यंत कुठलेही काम न करण्याचा सल्ला दिला जातो. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अधिक शारीरिक मेहनत करू नये.

कोरोनानंतर सांधेदुखीच्या घटना वाढल्या

* मोनिका अग्रवाल

आजकाल सांधेदुखीची वाढती प्रकरणे ही नवीन आणि विलक्षण गोष्ट नाही, परंतु कोरोना युगात तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढली आहे. कोविडमुळे, लोकांचे एकूण आरोग्य धोक्यात आहे कारण या संसर्गामुळे प्रभावित व्यक्ती दीर्घकाळ होम क्वारंटाईन किंवा हॉस्पिटलायझेशनमुळे निष्क्रिय होते. या व्यतिरिक्त, विषाणूच्या दुष्परिणामांमुळे स्नायू आणि सांध्यातील अशक्तपणाची प्रकरणे वाढली आहेत.

डॉ. अखिलेश यादव, वरिष्ठ हिप आणि गुडघा रिप्लेसमेंट सर्जन, गुडघा आणि हिप केअर सेंटर, गाझियाबादच्या मते, कोविड समस्यांसह कौटुंबिक पार्श्वभूमी, वय संबंधित समस्या, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, संधिवातासारखे संक्रमण, ऑस्टियोपोरोसिस आणि दाहक रोग यांसह अनेक कारणे सांधेदुखीची प्रकरणेही वाढत आहेत. जीवनसत्त्वे डी 3 आणि बी 12 सह इतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे सांधे मजबूत करणाऱ्या हाडे आणि गुडग्यांवर वाईट परिणाम होतो.

कोविडनंतरच्या टप्प्यात आधीच कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असलेले लोक सांधेदुखी, सूज, स्नायू आणि सांधे मध्ये कडकपणा, चालण्यास अडचण इत्यादींना बळी पडतात. या समस्येची तीव्रता अल्पवयीन ते अल्पवयीन असताना, अनेक रुग्ण लॉकडाऊन दरम्यान अशा गंभीर आणि वारंवार होणाऱ्या समस्यांच्या तक्रारी घेऊन आले आहेत.

घरातून काम करणेदेखील व्यावसायिकांमध्ये सांधेदुखीचे एक प्रमुख कारण बनत आहे. जरी बहुतेक काम करणारे व्यावसायिक नेहमी घरून काम करण्याचे स्वप्न पाहत असले तरी, चुकीचे बसणे, लॉकडाऊन दरम्यान काम करताना आरामदायक स्थितीत काम करणे यामुळे संयुक्त रोग बराच काळ वाढत आहेत.

सोप्या टीप्स राखतील फिट एंड फाइन

– मोनिका अग्रवाल

तुम्ही तंदुरुस्त राहू इच्छित असाल, तर काही टीप्सचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करता आणि डाएटही कंट्रोल करता. सुरूवात तर एकदम उत्साहाने करता, पण काही वेळाने हा उत्साह धरू लागतो आणि तुम्ही फास्टफूड खायला सुरूवात करता. मग हळु हळु पुर्वपदावर येता, असं तुम्हीच नाही तर प्रत्येक स्त्री करते.

फिट राहण्यासाठी ध्येय ठरवा

तुम्हाला सर्वात आधी ध्येय ठरवावं लागेल की कशाप्रकारे तुम्हाला फिटनेस हवा आहे. यासाठी तुम्ही मोठे नाही तर लहान ध्येय ठेवा. फिटनेस दिवा शिल्पा शेट्टीनुसार फिट राहण्यासाठी स्मार्ट ध्येय निश्चित करा. स्मार्ट ध्येय म्हणजे असा व्यायाम करा की जो सहजतेने करता येईल आणि परिणामही लवकर समोर येईल. सुरूवातीच्या दिवसात थोडं अंतरच पळा जे १५-२० मिनिटातच पूर्ण केलं जाऊ शकेल.

ठरवून जेवण तयार करा

कामाची घाई गडबड असो अन्य आणखीन काही महत्वाचा कार्यक्रम असो वेळेवर खाल्लंच पाहिजे. खाण्याची वेळ टाळू नये वा हलगर्जीपणा करू नये. योजना आखून पूर्ण आठवडयासाठी पोषण तत्वांनी परिपूर्ण असं जेवण बनवा. थोडा वेळ काढून पोषक तत्वांनी युक्त जेवण गरम करून खात जा. घरातून बाहेर जाताना आपलं जेवण आणि पाणी सोबत घेऊन जा.

चांगला जोडीदार निवडा

फिट राहण्यासाठी एका चांगल्या साथीदाराची निवड करा. त्यामुळे तुमच्यात उत्साह संचारेल. दोघं एकमेकांना प्रेरित कराल आणि रोजच्या दिनक्रमात उशीर होणार नाही. शक्य असेल तर एखाद्या व्यायाम शिकविणाऱ्या इंस्ट्रक्टरचा सल्ला घ्या.

मनावर नियंत्रण ठेवा

समजा बर्गर, पिझ्झा, चाट तुमची आवड आहे आणि तुम्ही ते बघून स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर आपला मार्ग बदला. खाण्याची इच्छा झाली, राहावलं नसेल तरी या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याच हाती आहे.

व्यायामाचा आनंद घ्या

फक्त कॅलरी कमी करायची आहे, हा विचार करून व्यायाम करू नका. तुम्हाला जे काम करायला आवडतं जसं की घराची सफाई, बागकाम, नृत्य यासारखी कामं मन लावून करा. आनंद घेत बॅडमिंटन, रश्शीउडया, टेनिस खेळणे वगैरे फिटनेस मेण्टेन करायचे सोपे प्रकार आहेत.

स्वत:ला बदला

जर दररोजच्या आयुष्याला कंटाळला असाल तर काहीतरी नवीन करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. जेव्हा फार कंटाळा येईल, तेव्हा काहीतरी नवीन करा, मग भले ते स्वयंपाक करणं असेल किंवा डांसिंग असेल किंवा इतर काही हलकफुलकं जे तुम्ही ऐन्जॉय कराल.

व्यस्त राहा स्वस्थ रहा

बारीक व्हायचं आहे, हा विचार करुन स्वत:ला त्रास करून घेऊ नका. काहीच न खाणं किंवा शिळं अन्न खाणं योग्य नाही. मनावर नियत्रंण ठेवून हलकंफुलकं आणि पौष्टीक खा. भरपूर पाणी प्या. उपाशी पोटी राहू नका आणि नियमित व्यायाम करा. विश्वास ठेवा तुम्हाला पाहुन आरसाही लाजेल.

उपयुक्त बेकिंग सोडा

– माधुरी गुप्ता

घराच्या स्वच्छतेसाठी आपण बहुतेकदा रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो, जे महागडे तर असतातच पण कधी कधी हातांना चट्टे, अॅलर्जी हेही उद्भवू शकते. अशात तुम्ही कधी विचार केला आहे की सोडा बायकार्बोनेट किती फायदेशीर आहे? याला खाण्याचा सोडा असेही म्हटले जाते. प्रत्येक घरात हा असतोच आणि याचा वापर केक, इडली, ढोकळा इ. बनवण्यासाठी केला जातो. पण घरातील स्वच्छतेसाठीही सोड्याचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, मग आम्ही सांगतो कसा ते :

* टाइल्स स्वच्छ करण्यासाठी एक बादली पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा. याने फरशी पुसल्याने फरशी चमकू लागेल.

* रसायनयुक्त एअर फ्रेशनरऐवजी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. एका छोट्याशा बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात काही थेंब ऐसेंशअल ऑइल घाला व खोलीत ठेवा. रूममध्ये ताजेपणा राहिल. हो, पण दर तीन महिन्यांनी हे बदलणे गरजेचे आहे.

* एखाद्या मऊ कापडावर थोडा बेंकिग सोडा भुरभुरावा व याने मायक्रोवेव्हची स्वच्छता करा. बेकिंग सोड्याने ओव्हनची स्वच्छता करायची असल्यास ओव्हनमध्ये थोडा बेकिंग सोडा घालून पाणी शिंपडावे. रात्रभर ते तसेच राहू द्यावे. सकाळी जरा व्यवस्थित पुसून घ्यावे. मग दुसऱ्या ओल्या फडक्याने पुसावे.

* कपडे धुताना डिटर्जंट पावडरमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा मिसळावा. यामुळे अपेक्षेपेक्षा कपडे अधिक उजळ व स्वच्छ होतील.

* जर बेसीन किंवा सिंक तुंबले असेल तर रात्री अर्धा कप बेकिंग सोड्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळून सिंकमध्ये टाकावे. सकाळी थोडे गरम पाणी घालावे.

* कारपेटवर रात्री बेकिंग सोडा शिंपडून ठेवा. सकाळी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करून घ्या. कारपेटवरची धूळ निघून जाईल.

* किचनमधील स्लॅब, कॅबिनेट, गॅसशेगडी इ. वरून चिकटपणा दूर करण्यासाठी एखाद्या ओल्या कपड्यावर बेकिंग सोडा शिंपडून स्वच्छता करा. सर्व चिकटपणा निघून जाईल.

* हाताला जर कांदा लसणाचा वास येत असेल तर हातावर बेकिंग सोडा रगडा व हात स्वच्छ धुवून घ्या. हाताचा दुर्गंध निघून जाईल.

* समप्रमाणात मीठ आणि बेकिंग सोडा घेऊन मुंग्या लागलेल्या जागी शिंपडावे, मुंग्या निघून जातील.

* फळे व भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना बेकिंग पावडर घातलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवावे. मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

* फुले ताजी राहण्यासाठी फुलदाणीत १ छोटा चमचा बेकिंग सोडा घाला.

* फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा वास येऊ नये म्हणून एका वाटीत बेंकिग सोडा ठेवावा. यामुळे हरतऱ्हेचा दुर्गंध शोषून घेतला जातो.

* एक मोठा चमचा पाण्यात ३ मोठे चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर स्पंजने लावा. मग हलक्या हाताने घासून स्वच्छ करून घ्या. भांडी चमकतील.

* मळलेले कंगवे ब्रश स्वच्छ करण्यासाठी एक कप पाण्यात १ छोटा चमचा बेकिंग सोडा घालून त्यात कंगवे, ब्रश एक तास ठेवावेत. सर्व मळ निघून जाईल. मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.

* खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. मग ती पेस्ट ओल्या कपड्याने काचेवर लावून नंतर कोरड्या फडक्याने धुवून घ्या.

* किचनमधील सिंक चमकवण्यासाठी सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट करून घ्या. ओल्या कपड्याने ही सिंकमध्ये लावून काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा. सिंक चमकू लागेल.

* बोनचायना, पोर्सलीन, मेलामाइनचे कप किंवा भांड्यावरील डाग काढण्यासाठी त्यावर सोडा व पाण्याची पेस्ट बनवून लावा. काही वेळ तसेच ठेवा. नंतर हाताने स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सर्व डाग निघून जातील.

युरिनरी इन्फेक्शनकडे करू नका दुर्लक्ष

– डॉ. अनुभा सिंह,

महिलांच्या बाबतीत मूत्रमार्गाशी संबंधीत समस्या चिंतेचे मोठे कारण ठरू शकतात.

एक समस्या आहे युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) शरीरातील मूत्रमार्ग आयुष्यभर अशा काही जिवाणूंना लघवीच्या पिशवीत जाण्याचा मार्ग देत असतो आणि त्याचमुळे यूटीआय ही समस्या उद्भवते. त्यामुळेच बऱ्याचशा स्त्रियांना आयुष्यात एकदातरी यूटीआयचा सामना करावा लागतो.

खरंतर रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजन संप्रेरकांच्या कमतरतेमुळे संक्रमण तयार करणारे जिवाणू निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. स्त्रियांच्या प्रजनन काळात एस्ट्रोजन हानिकारक जिवाणूंना योनिमार्गात घर बनवण्यापासून थांबवतात. त्यांचा पीएच स्तर कमी ठेवतात आणि त्यासाठी आवश्यक जिवाणूंच्या वाढीसाठी मदत करतात. हेच जिवाणू यूटीआयशी लढतात.

काय आहे युटीआय

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गातील संक्रमणाला सोप्या भाषेत यूटीआय असे म्हणतात. हे खरंतर जिवाणूंचे संक्रमण आहे. मूत्रमार्गाच्या कुठल्याही भागाला हे बाधित करू शकतात. मुख्यत्वे ई-कोलाई नावाच्या जिवाणूंमुळे ही समस्या निर्माण होते. अनेक प्रकारचे जिवाणू बुरशी व परजीवांमुळेही युटीआय समस्या होते. यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जसे की नावावरून स्पष्ट होते की हे आपल्या मूत्र प्रक्रियेचे संक्रमण आहे. या प्रक्रियेचे भाग आहेत किडनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग. यापैकी कुठल्याही भागाला संक्रमण झाले की त्याला यूटीआय असे म्हटले जाते.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच मूत्र संक्रमण ही खूप गंभीर समस्या नाही, पण वेळेवर इलाज न केल्यास या संक्रमणामुळे इतर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

यूटीआयची काही सामान्य कारणे आहेत
मासिक पाळीच्या काळात योनी व गुदमार्गाची स्वच्छता न ठेवल्यास प्रोस्टेस्टची वाढ व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.

मूत्र मार्गात व आसपासच्या भागात असणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात वाढते. ही समस्या स्त्रियांना व पुरुषांना दोघांनाही असते, पण स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मूत्र मार्ग छोटा असतो.

थांवण्याचे उपाय

* शारिरीक स्वच्छतेकडे लक्ष देणे जसे की शारीरिक सबंधांआधी व नंतर लघवी करणे.

* द्रव पदार्थ जास्त प्रमाणात खाणे व जास्त वेळ लघवी थांबवू नये. क्रॅनबरी खाणे किंवा त्याचा रस पिणे. अननसाचा रस पिणे हासुद्धा आजाराला धोके कमी करण्यास मदत करतो.

* पुरेशा प्रमाणात क जीवनसत्त्वाचा आहारात समावेश असल्यास लघवीत जिवाणू उत्पन्न होत नाहीत.

मांड्यांच्या फॅटपासून मुक्ती मिळवा

– डॉ. रेखा व्यास

रूपा तिचे पाय फाकवून चालत होती. असं चालताना तिला खूपच संकोच वाटत होता. आणि त्यातच समोरच्याने हसतहसतच विचारलं की काय झालंय तर मग विचारूच नका. बिचारी काहीच बोलू शकत नसे.

शेफाली चालताचालता एकांत मिळताच मांड्यांमध्ये साडी व पेटीकोट दाबून धरते. असं करुन थोडा वेळ तिला बरं वाटतं परंतु प्रत्येक वेळी तिला हे करता येत नाही, त्यामुळे तिला फार बेचैन वाटतं. तिने याबाबत सांगितलं की कोणतंही काम करताना अनेकदा घासल्या गेलेल्या मांड्याकडेच लक्ष जातं. यामुळे याचा माझ्या कामावरदेखील परिणाम होऊ लागलाय. मूडदेखील अनेकदा बिघडलेला असतो.

सुभाष बाथरूममध्ये जाऊन मांड्यांमध्ये पावडर लावतो. त्याच्यापूर्वी मांड्या सुती कापडाने पुसून घेतो. त्याचं म्हणणं आहे की, यामुळे अनेकदा माझीच मला घृणा वाटू लागते.

अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या व आपल्या आजूबाजूच्या लोकांबाबत घडताना प्रामुख्याने दिसून येतात. त्यांच्या मांड्या घासल्या जातात तेव्हा त्यांचं तन आणि मन दोहोंवरही असा काही परिणाम होतो की जणू काही आजारपण आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मांड्यांच्या या घासण्याकडे दुर्लक्ष केल्यास कधीकधी मोठ्या जखमादेखील होतात. परिस्थिती अधिक गंभीर झाली तर मात्र प्रत्येकाचा यापासून मुक्त होण्याकडे कल दिसून येतो.

कोणती कारणं

स्किन स्पेशालिस्ट डॉ. प्रमिला यांचं म्हणणं आहे की हे लठ्ठपणामुळे होतं. मांड्यावरदेखील चरबी जमा होते. फ्रिक्शन म्हणजेच आपापसांत मांड्या घासल्यामुळे ही स्थिती होते. यासाठी यावर कायमचा उपाय करायला हवा आणि तो म्हणजे अति लठ्ठपणा टाळावा. वजन कमी करायला हवं यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याचा मेळ महत्त्वाचा असतो.

सावित्री मात्र तेवढी लठ्ठदेखील नाहीए आणि तिच्या मांड्यादेखील फारशा घासल्या जात नाहीत तरी तिला या समस्येला का तोंड द्यावं लागतं? या प्रश्नावर डॉ. प्रमिलाने सांगितलं की, कधीकधी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळेदेखील असं होऊ शकतं. शरीराचं वजन जिथे पडायला हवं तिथे न पडता नितंबावरून मांड्यांवर पडतं. मांड्या नरम आणि चरबीयुक्त असल्यामुळे त्या घासू लागतात. तुमचा पोस्चर योग्य प्रकारे ठेवूनदेखील तुम्ही या समस्येपासून मार्ग काढू शकता.

डॉ. पूनम बाली यांनी सांगितलं की, मांड्यांमध्ये फॅट अधिक जमा होत असतं. त्या एकमेकांशी घासल्यामुळे त्वचेचं प्रोटेक्टिव्ह फंक्शन नष्ट होतं. यामुळे रॅशेज येतात तसंच त्वचा काळी पडते. हे सर्व दिसायला वा चांगलं वाटत नाही म्हणून नाही तर यामुळे वेदनादेखील होत असतात. अनेकदा तर लोकांना रडूदेखील कोसळतं. अनेक जण चिंता व तणावग्रस्त होतात. अंघोळीनंतर त्वचा व्यवस्थित कोरडी करून अॅण्टीसेप्टिक पावडर लावल्याने या समस्येपासून सुटका मिळवू शकता. परंतु यावरचा सर्वात योग्य उपाय म्हणजे मांड्यांचं वजन कमी करणं हाच आहे.

जे तरुण आपल्या लुकबाबत साशंक आहेत वा त्यांचा जोडीदार त्यांच्या घासलेल्या मांड्या पाहून काय विचार करेल असा विचार करत असतील तर ते यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्किन लाइट करण्याचं लोशनदेखील वापरू शकतात. स्किन टाइटनिंग क्रीमदेखील खूपच उपयोगी ठरते. परंतु हे सर्व एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय करू नका अन्यथा त्रास कमी होण्याऐवजी वाढू शकेल. म्हणजेच एलर्जी होऊ शकते व इन्फेक्शन अधिक वाढू शकतं.

इंद्रप्रस्थ अपोलो इस्पितळाचे सीनियर कन्सल्टट व डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. देवेंद्र मोहन सांगतात की, मांड्यांच्या आजूबाजूचा भाग खूपच इन्फेक्शन प्रोन भाग आहे. याच्या आजूबाजूला यौनांग, मूत्राशय, मलद्वारे इत्यादी असल्यामुळे इथे संसर्ग सर्वाधिक व लवकर होते. मांड्या घासण्याची समस्या उन्हाळा व पावसाळ्यात सर्वाधिक होते. अशावेळी स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावं. हा भाग कोरडा ठेवावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने अण्टीफंगलचा वापर करावा.

याबाबत रूचिकाने सांगितलं की, मांड्याचे खास व्यायाम करून ती दीड महिन्यातच या समस्येपासून मुक्त झाली.

तर मोहनने सांगितलं की, त्याने पायांचा व्यायाम करून सुरूवातीपासूनच या समस्येवर मात केली. यानंतर व्यायाम सुरू ठेवून मांड्यांबरोबरच शरीराचं वजनदेखील कमी झालं.

घरगुती उपाय

काही घरगुती उपायांचा वापर करूनदेखील या समस्येपासून मुक्ती मिळवता येते.

* रात्री झोपण्यापूर्वी या भागात राईचं तेल वा हळद लावू शकता.

* लिंबामध्ये पाणी मिसळून लावल्यानेदेखील आराम मिळतो. संत्र्याचा रसदेखील वापरू शकता.

* फळांची क्रीमदेखील लावू शकता.

* एलोव्हेराचा रसदेखील रामबाण उपाय आहे.

* नायलॉन वा इतर दुसरे इनरवियर वापरू नका; कारण हे ओलावा शोषून घेत नाही.

डॉ. देवेंद्र मोहन यांनी या समस्येचं अजून एक कारण सांगितलं ते म्हणजे कधीकधी डायबिटीजमुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत हा एक त्वचेचा रोग आहे असं समजू नका. शरीराची आतील तपासणीदेखील करून घ्या. वेळेवरच कोणत्याही आजारापासून मुक्तता मिळविता येते.

जाड मांड्यांमुळे समस्या निर्माण होतात हे लक्षात घेऊन त्या कमी करण्याकडे लक्ष द्या. वेगाने चालून वा याची सवय नाही त्यांनी हळूहळू चालायला सुरुवात करून या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें