महिलांनी फोन हाताळताना दाखवावा स्मार्टनेस

* पारूल भटनागर

जोडीदार चार महिन्यापासून बिजनेस टूरवर गेला होता, यामुळे त्याची पत्नी रिताला खूप कंटाळा आला होता. त्याचबरोबर तिच्या शारीरिक गरजादेखील पूर्ण होत नव्हत्या. तेवढयात तिची मैत्रीण नेहाने तिला काही अशा साईट्स पाहण्याचा सल्ला दिला, ज्या पाहून तिला समाधान मिळू शकेल आणि झालं देखील असंच, आता दररोज ती त्या साईटवर जाऊ लागली. परंतु तिची चूक झाली की तिने काही लिंक उघडल्या होत्या की तिने त्या हिस्ट्री डिलीट केली नाही आणि नाही डाऊनलोड केलेले फोटो फोनमधून काढले. अशावेळी जेव्हा तिचा जोडीदार परत आला तेव्हा त्याने काही सर्च करण्यासाठी तिचा फोन उचलला तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटलं. तिने खरं कारण सांगूनदेखील त्याने काहीच ऐकलं नाही आणि दोघांमध्ये भांडणं सुरू झालं. त्याने रीताला वाईट ठरवलं. रिताच्या छोटयाशा चुकीमुळे त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला.

असं केवळ स्त्रियाच नाही करत, तर पुरुषदेखील करतात. उलट अशा प्रकारे गोष्टी पाहण्यांमध्ये पुरुष महिलांपेक्षा अधिक पुढे आहेत. परंतु त्यांना अधिक तांत्रिक माहिती असल्यामुळे ते वाचतात. ते घराबाहेर पडतेवेळी आपल्या काही गरजेच्या गोष्टी विसरू शकतात परंतु फोन कधीच नाही. म्हणून तर एक जुनी म्हण आहे जी त्यांच्याबाबत खूप प्रसिद्ध झाली आहे- एक विवाहित पुरुष सर्वकाही विसरू शकतो परंतु घरी मोबाईल नाही. मग अशावेळी तुम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुरुषांच्या मागे का राहावे.

जाणून घ्या, कसे तुम्ही स्वत:च्या फोनचा स्मार्टली वापर करू शकता

फोन नाही अॅप्सला करा लॉक

पुरुष खूपच हुशार असतात मग भलेही ते कायम त्यांचा फोन लॉक करून ठेवत असतील, परंतु स्वत:च्या जोडीदाराचा फोन त्यांना मोकळया पुस्तकांप्रमाणेच हवा असतो. जेव्हा ते उघडलतील तेव्हा कोणत्याही पासवर्डचा अडसर असता कामा नये. अशावेळी तुम्ही थोडा समजूतदारपणा दाखवा. भलेही त्यामध्ये अशा काही वाईट गोष्टी नसतील, तरीदेखील तुमचा फोन अॅप्स लॉक करून ठेवावा. यासाठी तुम्हाला साधारणपणे प्रत्येक अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करून त्या अॅपला लॉक करावं. यामुळे फायदा असा होईल की तुमचा जोडीदार तुमच्याशिवाय तुमचा फोन खोलू शकणार नाही. यामुळे तुम्हाला त्यातील तंत्रज्ञानाची माहिती तर मिळेल आणि तुम्ही निश्चिंतदेखील रहाल.

फोन का लॉक करू नये

अनेक लोकांची सवय असते की ते त्यांचा फोन लॉक करून ठेवतात कारण कोणी त्यांच्या मागे फोन उघडू नये. फोन लॉक करणं योग्य नाही आहे. कारण जर तुम्ही कुठेही जाते वेळी अपघात झाला वा कुठे जर तुमचा फोन विसरला तर फोन लॉक असल्यामुळे कोणीही तुमच्या कुटुंबियांना कळवू शकणार नाही.

क्लाऊडवर सेव्ह करा डाटा

एप्पल डिवाइसमध्ये आय क्लाऊड सुविधा असते, तर अँड्रॉईड स्मार्ट फोनमध्ये गुगल ड्राईव्ह अगोदरच इनबिल्ट असतो. याला क्लाऊड स्टोरेज म्हणतात. मोबाईलवर जो डेटा आपण सेव करतो त्याला डिजिटल माध्यम म्हणतात. परंतु जो डेटा आपण आय क्लाउड वा गुगल ड्राइव्हवर सेव करतो त्याला वर्चुअल माध्यम म्हणतात. यामध्ये डेटा तुमच्या फोनच्या लोकल ड्राइव्हमध्ये सेव्ह न होता दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हवर सेव होतो. यामध्ये तुमच्या फोनची मेमरीदेखील जास्त भरत नाही आणि तुमचा डेटादेखील स्टोर होतो, ज्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा, हवे तिथे खोलून पाहू शकता आणि तुम्हाला हवं त्याला पाठवू शकता. यामध्ये तुमचे फोटो, फाइल्स, व्हिडिओ काहीही सेव्ह करून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्डची गरज असते आणि इंटरनेटदेखील गरजेचं असतं.

हिस्ट्री डिलीट करण्याची सवय ठेवा

अनेकदा कार्यालयामध्ये जेव्हा आपण कोणाचा कम्प्युटर वापरतो तेव्हा त्यामधून कोणी पाहू नये की आपण काय सर्च केलं आहे यासाठी हिस्ट्री आवर्जून डिलीट करतो. कारण जेव्हादेखील तुम्ही गुगलवर काही देखील सर्च कराल तेव्हा हिस्ट्री आवर्जून डिलीट करा. यामुळे जर कोणी तुमचा फोन वापरला तर कोणाला हे  समजणार नाही की तुम्ही काय सर्च केलं आहे.

यासाठी जेव्हा तुम्ही गुगल पेज ओपन करता तेव्हा वरच्या दिशेने व खालच्या बाजूला डॉट्स बनलेले  असतात, ते तुम्ही क्लिक करा. तुम्हाला यामध्ये हिस्टरी ऑप्शन दिसेल. नंतर त्यावर क्लिक करून तुम्ही क्लियर ब्राऊजिंग डेटा वर क्लिक करा. यामुळे तुम्हाला लास्ट अवर ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला जो डेटा डिलीट करायचा आहे तो करू शकतो.

एडल्ट साइट्स सबस्क्राईब करू नका

आज अनेक असे अॅप्स आहेत जे एडल्ट कंटेंट देतात. सोबतच तुम्हाला नेटवरदेखील अशा प्रकारचं अनेक साहित्य पाहायला मिळेल. असा वेळी जेव्हादेखील तुम्ही या साईट्सवर व्हिजिट्स कराल तेव्हा चुकूनदेखील सबस्क्राईब करू नका. कारण या बहाण्याने तुमची वैयक्तिक माहिती, इमेल आयडी, फोन नंबर त्यांच्यापर्यंत जातो, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

अलाव ऑप्शन ओके करू नका

आपण शॉपिंग साइट्सवर विजिट करू वा अन्य कोणत्याही साइट्सवर, जेव्हादेखील आपण त्या साईट्स वरती जातो तेव्हा नोटिफिकेशनसाठी अलावू वा आणि डिसएग्रीचा ऑप्शन येतो, तेव्हा तुम्ही कधीही अलावूच्या ऑप्शनवर क्लिक करू नका. कारण यामुळे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने नोटिफिकेशन यायला सुरुवात होते, ज्या तुम्हाला त्रासदायक ठरतात त्याबरोबरच यावर कोणाचही लक्ष जाऊ शकतं.

फोनमध्ये काहीही डाऊनलोड करू नका

अनेकदा आपल्याला सवय असते की आपण ज्यादेखील साईट्स खोलतो तेव्हा आपल्याला छान वाटतं आणि आपण त्या आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करून ठेवतो. तुम्हाला तुमची ही सवय सोडायला हवी, कारण यामुळे तुमच्या फोनच्या मेमरीवर परिणाम होण्याबरोबरच अनेकदा अशा अनेक गोष्टीदेखील सेव होतात ज्यामुळे फोन हॅन्ग होण्याचीदेखील शक्यता असते.

व्हाट्सअपला करा लॉक

व्हाट्सअप अलीकडे सर्वात जास्त चॅटिंग करण्यासाठीचं प्रचलित अॅप आहे. तुम्ही तो लॉक करून ठेवा. यामुळे तुमच्या चॅटिंग बॉक्सला तुमच्या संमतीशिवाय कोणीही खोलू शकणार नाही. यासाठी तुम्ही व्हाट्सअप ओपन करा नंतर वरच्या दिशेने डॉट्सवर क्लिक करून अकाउंटमध्ये प्रायव्हसीला क्लिक करा. यामध्ये तुम्ही लॉक ऑप्शन निवडू शकता आणि तुम्ही यामध्ये चॅटवर जाऊन तुमची चॅट हिस्ट्री डिलीट वा बॅकअपदेखील घेऊ शकता.

कसं कराल अँड्रॉइड फोनमध्ये फोटो हाइड

काही क्षण असे असतात जे आपल्याला आपल्या फोनमध्ये कैद करून ठेवायचे असतात. परंतु कोणी अनाहूतपणे आम्ही तुमचे फोटो खोलून पाहिले तर तुम्हाला लाजिरवाणं वाटू शकतं. अशा वेळी तुमच्याजवळ ऑप्शन असतो की तुमचे सर्व फोटो हाईड करून ठेवू शकता आणि जेव्हादेखील तुम्हाला वाटेल तेव्हा खोलून पाहू शकता.

यासाठी तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये ज्या फोटोला तुम्हाला हाईड करायचं असेल त्यावर क्लिक करा. नंतर वरच्या दिशेने दिसणाऱ्या डॉटस्वर क्लिक करून कम्प्रेसवर क्लिक  करा. आता फाइल नेम, फाईल लोकेशन ज्यामध्ये तुम्हाला फाइल कुठे सेव्ह करायचे आहे तिथे टाकून पासवर्ड सेट करा आणि सेव्ह करुन ठेवा.

या गोष्टींचीदेखील काळजी घ्या

* शॉपिंग साइट्सवर कधीही तुमचं कार्ड सेव्ह करून ठेवू नका.

* पासवर्ड कधीही फोनमध्ये सेव्ह करू नका.

* बँक डिटेल्स फोनमध्ये ठेवू नका.

* नेट बँकिंग कायम स्वत:च्या मोबाईलमधूनच करा.

* सामानाची यादी बनवून फोनमध्ये सेव्ह करून ठेवू शकता.

* तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन फोनमध्ये सेव्ह करू नका.

* गरजेचा डेटा पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवा.

प्रेम, शारीरिक बांध्याचा शत्रू का आहे

* नसीम अन्सारी

बरेचदा कुठल्या न कुठल्या महिलेला असे बोलतांना पाहिले जाते की लग्नाआधी ती सडपातळ, चपळ होती, पण लग्नानंतर ती लठ्ठ झाली. हे खरं आहे की बहुतेक स्त्रिया विवाहानंतर लठ्ठ होतात. एवढेच नाही तर एखाद्याशी नजरानजर झाली आणि प्रेमाचा रोग लागला तरीही वजन वाढू लागते. अशाप्रकारे एखाद्याच्या प्रेमात पडणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु जर प्रेम केल्याने वजन वाढण्यास सुरूवात झाली तर ते त्या मुलींसाठी चिंतेचे कारण बनते, ज्या त्यांच्या फिगरविषयी खूप सावधगिरी घेतात.

ऑस्ट्रेलियाच्या ‘सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी’च्या एका अभ्यासानुसार, जेव्हा लोक एखाद्यासोबत नात्यामध्ये असतात किंवा एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे वजन वाढू लागते. संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात १५ हजाराहून अधिक लोकांना समाविष्ट केले. यामध्ये त्यांनी वेगवेगळया जीवनशैलीचे एकेरी आणि जोडपी दोन्ही प्रकारचे लोक सामील केले आणि त्यानंतर पुरुष आणि स्त्रियांच्या बॉडी मास इंडेक्सची तुलना करुन निकाल जाहीर केला.

संशोधनादरम्यान असे दिसून आले की जेव्हा लोक नात्यामध्ये गुंततात तेव्हा त्यांचा लठ्ठपणा वाढू लागतो कारण त्यांच्यामध्ये जोडीदाराला प्रभावित करण्याची भावना जवळजवळ संपुष्टात येते आणि शरीराचा बांधा राखण्याकडे ते अधिक लक्ष देत नाहीत.

संशोधनात सामील झालेल्या बऱ्याच लोकांनी हे कबूल केले की लग्नानंतर किंवा नात्यात गुंतल्यानंतर ते व्यायाम करणे, जॉगिंग करणे किंवा इतर शारीरिक हालचालींवर कमी लक्ष देऊ लागले होते. त्यांचे अधिकतर लक्ष जोडीदारासह फिरणे, मौज-मजा करणे आणि वेगवेगळया प्रकारच्या पदार्थांचा आनंद लुटणे यात व्यतीत झाले, ज्यामुळे त्यांचे वजन वाढत गेले. वैवाहिक जीवनातून आनंदी, समाधानी आणि सुरक्षित वाटणाऱ्या जोडप्यांचे वजन वाढण्याची अधिक शक्यता असते, कारण त्यांच्या मनावर इतर कुणाला आकर्षित करण्याचा दबाव नसतो.

वजन वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रेमसंबंधात असलेले लोक व्यायामासाठी जिममध्ये जाण्यापेक्षा आपल्या जोडीदारासमवेत घरी जास्त वेळ घालवणे पसंत करतात. ही बदललेली जीवनशैलीदेखील वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

याशिवाय जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा ते खूप आनंदी असतात आणि जर संबंध नवीन असेल तर हा आनंद दुप्पट होतो. आपणास सांगू इच्छिते, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन ऑक्सीटोसिन आणि डोपामाइन निघतात, हे हॅपी हार्मोन चॉकलेटस, वाइन आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढवतात, जे वजन वाढवण्याचे कार्य करतात.

झोपेचा अभाव

लग्नानंतर मुलींचे झोपेचे स्वरूप बदलते. बऱ्याच वेळा त्यांना पुरेशी झोप मिळत नाही, जे वजन वाढण्याचे एक कारण बनते. लग्नानंतर आपले घर सोडल्यावर इतर कोणत्याही ठिकाणी जुळवून घेणे सर्वात कठीण काम आहे. नवीन घराशी जुळवून घेण्यात काहीसा तणाव तर असतोच, ज्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे वजनावर होतो.

आश्चर्यकारक डिश

लग्नानंतर भारतीय महिला पाककलेत खूप प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचे जोडीदार आणि कुटुंबातील इतर सदस्य खूष होतील आणि तिची प्रशंसा करतील. जेव्हा दररोज विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात तेव्हा वजन वाढणे स्वाभाविक आहे. हॅपी मॅरेजपासूनच वजन वाढते असे नाही, कधीकधी जरी वैवाहिक जीवन सुखी नसेल तरी दोन्ही पती-पत्नीचे वजन वाढू लागते आणि त्याचे कारण स्वयंपाकघरात बनणारे विविध उच्च कॅलरीयुक्त पदार्थ आहेत.

हार्मोन्समध्ये बदल

जेव्हा मुलगी वैवाहिक जीवनात प्रवेश करते तेव्हा तिच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. लैंगिक जीवनात सक्रिय राहणे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. जोडीदाराशी शारीरिक निकटता, शरीरात आनंदी हार्मोन्स म्हणजेच ऑक्सिटोसिन आणि डोपामाइनचा स्त्राव वाढवते, ज्यामुळे शरीराच्या रचनेत थोडा-फार बदल होतो.

महिला ज्याच्याशी प्रेम करतात त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्यांची कंबर आणि नितंबाची रुंदी वाढते. सहसा असे दिसून येते की सेक्सनंतर भूकदेखील वाढते. या व्यतिरिक्त आपण गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळयादेखील वापरण्यास सुरवात करता. जे आपल्या लठ्ठपणाचे कारण बनते. पतीबरोबरच्या शारीरिक संबंधामुळे हार्मोन्समध्ये आलेल्या बदलांचा परिणाम अवयवांवर स्पष्टपणे दिसून येतो. विशेषत: स्तनावर, कंबरेवर आणि नितंबांवर.

लग्नानंतर मुलींचे नितंब त्यांच्या सामान्य आकारापासून वाढत जाऊन किंचित मोठे होतात. हे नैसर्गिकपणे होणेदेखील आवश्यक आहे, कारण शारीरिक संबंधानंतर गर्भधारणेची प्रक्रिया होते. स्वाभाविकच मोठे नितंब असलेल्या स्त्रियांना प्रसुतिदरम्यान जास्त वेदना होत नाहीत आणि त्या आरामात बाळाला जन्म देतात, तर लहान नितंब असलेल्या सडपातळ स्त्रियांना असह्य वेदनेला सामोरे जावे लागते.

कमी खावे, दु:ख पचवावे

सडपातळ राहण्यासाठी एक म्हण प्रसिद्ध आहे की कमी खावे, दु:ख पचवावे. वास्तविक, शरीराला सडपातळ ठेवण्यासाठी नेहमी भुकेपेक्षा थोडे कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. दुसरे चिंतेचे वर्णन चितेसमान यासाठी केले गेले आहे कारण त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

चिंताग्रस्त व्यक्तीला कमी भूक लागते, ज्यामुळे तो लठ्ठ बनत नाही. जेव्हा आपण एकटे, अविवाहित असतो, दु:खी राहतो, आपला कोणी प्रियकर किंवा जोडीदार नसतो तेव्हा आपण एकाकीपणाच्या भावनेने संघर्ष करत असतो. हाच विचार करत असतो की असं कोणीतरी असतं, ज्याला आपण आपलं माणूस म्हटलो असतो. या दु:खाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून एकटा माणूस बऱ्याचदा सडपातळ असतो.

प्रेमात पडल्यानंतर आपण ना केवळ आनंदी असतो, हिंडत-फिरत असतो तर आपल्याजोडीदाराबरोबर पिझ्झा, बर्गर, नॉन-वेज, आईस्क्रीम, चॉकलेट यासारख्या गोष्टी देखील खात-पित असतो. लग्नानंतर मुली पतीसमवेत राहून बाहेर जेवण घेणे पसंत करतात. हनिमूनच्या वेळीही बाहेरचे भोजन खातात. जे उच्च कॅलरीचे असते. हे सर्व प्रेमाचे दुष्परिणाम आहेत, जे आपला शारीरिक बांधा खराब करतात. म्हणून प्रेम करा, भरभरून करा, परंतु आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि व्यायाम करण्यासदेखील विसरू नका.

बर्फाळ चहा प्रत्येक घोटात ताजेपणा

* प्राची भारद्वाज

मितालीच्या घरी तिच्या मैत्रिणी आल्या तेव्हा सर्वांचे स्वागत करत तिने नम्रपणे विचारले, ‘‘चहा घेणार की शीतपेय?’’

‘‘चहाची इतकी सवय आहे की, चहाशिवाय राहवत नाही आणि इतके गरम होतेय की, चहा पिण्याची इच्छा होत नाही.’’

त्यांच्या या उत्तरावर मितालीकडे पर्याय होता. ती सर्वांसाठी फ्रूटीच्या चवीचा बर्फ घातलेला चहा घेऊन आली. मग काय? त्यांच्या गप्पांची मैफल रंगली.

आईस्ड टीची सुरुवात १९०४ मध्ये मिसुरी (अमेरिका) येथील सेंट लुईस वर्ल्ड फेअर येथे झाली. जेव्हा घामाघूम करणाऱ्या ऊन्हापासून वाचवण्यासाठी एका चहाच्या बाग मालकाने चहाच्या पानांना बर्फाच्या पाईपमधून काढून थंड केले होते.

आईस्ड टीमधील ग्रीन अॅप्पल आणि पीचसारख्या चवीचा चहा सर्वांनाच माहीत आहे. आता तर बाजारात फ्रूटी, आंबा, पुदिना, तुळस, अशा विविध चवींचा चहा उपलब्ध आहे.

चहाच का?

चहा हे एक आरोग्यदायी पेय आहे, ज्यात मोठया प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. चहा आपली प्रतिकारशक्ती वाढवते. सोबतच शरीरातील मेटाबॉलिज्म अर्थात चयापचय सुधारण्यास मदत करते. चहा प्यायल्याने शरीरात नव्या ऊर्जेचा संचार होतो.

आवड ज्याची-त्याची

इंडिगो डेलिकॅटेसनच्या जयदीप मुखर्जी यांना बर्फाच्या चहात हर्ब्स घालायला आवडते तर मिंगल चहाचे मालक अमित आनंद यांना संत्र्याच्या आणि पुदिन्याच्या चवीची ग्रीन टी आवडते. संत्र्यातील भरपूर प्रमाणात असलेले सी जीवनसत्त्व तर पुदिन्यातील गारवा आणि तजेला गरमी पळवून लावतो.

हैदराबादच्या मुकेश शर्मा यांना लेमन आणि लॅव्हेंडर, गवती चहा आणि मध, ब्लॅक बेरी, तुळस अशा चवी आवडतात. गरजेनुसार सोडा, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि १ चमचा मध मिसळून चव आणखी वाढवता येते.

बर्फ घातलेल्या चहाची सर्वोत्तम कृती

सर्वात आधी एका भांडयात ९-१० कप पाणी उकळा. ते व्यवस्थित उकळल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर यात ७-८ टी बॅग्स घाला. तुम्हाला चहा साधा हवा की कडक हवा, हे ठरवून त्यानुसार टी बॅग्सचे प्रमाण ठरवा. त्या ९-१० मिनिटे पाण्यातच ठेवा. त्यानंतर त्या बाहेर काढून मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर चहा बर्फाने भरलेल्या ग्लासात ओतून प्यायला द्या.

योग्य पद्धत

तुम्हाला जर बर्फ घातलेली अप्रतिम चहा बनवायची असेल तर तुमच्याकडे उत्तम चहा पावडर असायला हवी. तुम्हाला जर चहा सजवून द्यायची असेल तर त्यासाठी साहित्य तयार ठेवा. चहाला उकळवण्यासाठी आणि आवडीनुसार गोड बनवण्यासाठीची सामग्रीही तयार ठेवा. मग काय? तुम्ही मॉकटेल बनवू शकता किंवा कॉकटेल.

आम्ही तुम्हाला आणखी काही चांगल्या कृती सांगतो :

घामाघूम करणाऱ्या ऋतूत व्हॅनिला आईस्ड टी हे ताजेपणा मिळवून देणारे पेय आहे. खासकरून तेव्हा ज्यावेळी तुम्ही यात लिंबाचे काही थेंब घालता. अशी चहा बनवणे अगदी सोपे आहे. कमी प्रमाणात चहा पावडर घ्या आणि ती पाण्यात उकळवा. त्यात आवडीनुसार साखर घाला. थंड झाल्यावर यात व्हॅनिला इसेन्सचे २ थेंब, लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. हे मिश्रण काचेच्या ग्लासात ओता. भरपूर बर्फ घाला.

फ्रूट टी बनवण्यासाठी ऋतूमानानुसार उपलब्ध असलेली फळे जसे की, आंबा, सफरचंद, द्राक्षे, काकडी, टरबूज इत्यादींचे तुकडे करून घ्या. पाणी उकळून झाल्यावर गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात टी बॅग्स घालून पाणी थंड होऊ द्या. जवळपास अर्ध्या तासानंतर हे मिश्रण मोठया काचेच्या भांडयात ओता. त्यात कापलेली फळे घाला. आवडीनुसार साखर किंवा मध घाला. फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. त्यानंतर बर्फ घालून प्यायला द्या.

फ्रूट टी बनवण्यासाठी तुम्ही रसदार फळे जसे की, जांभूळ, स्ट्रॉबेरी घालू शकता.

जिंजर म्हणजे आले आणि मधाच्या चहासाठी आल्याचे तुकडे पाण्यात उकळवा. त्यानंतर त्यात थोडे मध घाला. आता यात टी बॅग घालून मिश्रण थंड होऊ द्या. यामुळे तुम्हाला तजेला मिळेल. शिवाय हे मिश्रण तुमच्यासाठी अँटीऑक्सिडंटचे काम करेल. बर्फ घातलेली ही चहा शरीरासोबतच मन आणि मेंदूलाही शांत ठेवेल.

ऑरेंज आईस्ड टी बनवण्यासाठी आईस्ड टी बनवून त्यात थोडा संत्र्याचा रस घाला. याची चव अप्रतिम लागते, शिवाय उन्हाळयातील आळस घालवायलाही मदत होईल. तुम्ही यात चवीनुसार साखर आणि पुदिन्याची पाने घालू शकता.

ग्रीन आईस्ड टी बनवण्यासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या बॅग्स लागतील. तुम्ही ग्रीन टी गरमागरम प्या किंवा थंड, ती आरोग्यदायी असते. फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी बॅग्स या आईस्ड टीमध्ये घालून त्यात मध, लिंबाचा रस घालू शकता. तुळस, पुदिन्याची पाने वापरून तुम्ही हा कप सजवू शकता.

थाई आईस्ड टीसाठी २ चमचे नारळाचा रस आणि १ चमचा कंडेन्स मिल्क आईस्ड टीमध्ये घाला.

होम शेफ मालिनी साहनी असा सल्ला देतात की, कॉकटेल बनवण्यासाठी तुम्ही यात नारळाचा रस किंवा स्माईस्ड रमही घालू शकता. अमित आनंद यांनी सांगितले की, आईस्ड टीमध्ये तुम्ही २ चमचे बर्बन व्हिस्कीसह १ चमचा मेपल सिरपही घालू शकता. ती संत्र्याच्या फोडीनी सजवून प्यायला द्या.

कशी कराल घरबसल्या जास्त कमाई

– पारुल भटनागर   

असे म्हणतात की, प्रत्येक संकट एक नवी संधी घेऊन येते. कोरोना हेही एक मोठे संकट होते. परंतु, हाच कोरोना काळ संकटासोबत बऱ्याच संधी घेऊन आला आहे. विशेष करून अशा प्रकारचे व्यवसाय आणि कामांसाठी ही संधी आहे जे शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. डिजिटल उत्पादने ही व्हर्चुअल म्हणजे आभासी जगाची गरज आहेत, कारण कोरोना काळात ज्या प्रकारे लोक एकमेकांपासून दूर होऊन घरात बंद झाले, तिथे सॉफ्टवेअर, आयटी, ऑनलाइन डिलिव्हरी, व्हर्चुअल शिक्षण, अॅप्लिकेशन या सर्वांची मागणी वाढली आहे. झुम एका रात्रीत करोडपती अॅप्लिकेशन झाले आहे. इतरही अनेक अॅप्लिकेशन अशीच चांगली स्थिती आहे.

या संकट काळात शिकवणीचा व्यवसायही जोरात सुरू आहे. तसे तर कोरोना काळापूर्वीही तो चांगला सुरू होता, मात्र शाळा, महाविद्यालये बंद झाल्यानंतर हा व्यवसाय अधिक जोमाने सुरू आहे. म्हणूनच जर तुम्ही घरात बसून असाल, तुम्हाला नोकरी नसेल किंवा व्यवसाय ठप्प झाला असेल तर तुम्ही तुमच्यातील कलागुण ओळखून त्याचा व्यवसायाच्या रूपात वापर करू शकता. ते कसे, हे माहिती करून घेऊया :

घरबसल्या शिका केक बनवायला

घरात कोणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस किंवा बारसं असो, प्रत्येक शुभ प्रसंगी केक कापला जातो. कोरोना काळाने हा व्यवसाय जोमाने वाढवण्याचे काम केले आहे. बाजारातून केक विकत घेण्याची भीती लोकांना वाटत आहे. त्याऐवजी ते एखाद्या ओळखीच्या माणसाकडून किंवा घरातच केक बनवू लागले आहेत. म्हणूनच जर तुमच्याकडे केक बनवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही हे कौशल्य स्वत:पुरते मर्यादित ठेवू नका. ते इतरांनाही शिकवून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

यासंदर्भात मेराकी होम बेकरीच्या दीप्ती जांगडा सांगतात की, त्यांना केक बनवायला आवडते आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या या कलेला चांगला वाव मिळाला आहे. त्या साधे तसेच कस्टमाईज्ड डिझाईनचे केक बनवतात. ज्याला जसा केक हवा असतो ती वस्तू किंवा चित्रासारखाच हुबेहूब केक बनवण्याची कला त्यांच्या अंगी आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या कलेला लोकांचे चांगले प्रोत्साहन मिळत आहे. ज्यामुळे त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे, शिवाय हे त्यांच्या उत्पन्नाचे चांगले माध्यम झाले आहे, जे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहे.

त्यांनी सांगितले की, साधा केक शिकण्यासाठी रू १,५०० पासून ते रू २,००० पर्यंत तर डिझायनर केक बनवणे शिकवण्यासाठी रू ३,००० पासून ते रू ५,००० पर्यंत खर्च येतो. सांगायचे तात्पर्य असे की, जर तुमच्या अंगी कौशल्य असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन प्रशिक्षण देऊन कमाई करू शकता, शिवाय यातून जो आनंद तुम्हाला मिळेल तो अनमोल असेल. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्यातील कलागुण ओळखून त्याचा वापर करून घेणे गरजेचे आहे.

नृत्याची शिकवणी

नृत्य ही लोकांची पूर्वापार चालत आलेली आवड आहे, ज्यामुळे आजही त्याला बरीच मागणी असते. लग्न असो किंवा लग्नाची हळद, पार्टी किंवा स्नेहसंमेलन असो, प्रत्येक ठिकाणी नृत्य केले जातेच. नाचता येत नसल्यामुळे हसे होऊ नये म्हणून नृत्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. हौशी लोक नाच शिकण्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात. जर तुम्हाला एखादे विशिष्ट प्रकारचे नृत्य जसे की, हिपहॉप, बॅले, पारंपरिक नृत्य, शास्त्रीय नृत्य चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही याचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन स्वत:मधील कौशल्य वाढवण्यासोबतच या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. कारण तुम्ही घरूनच हे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू करणार असल्यामुळे त्यासाठी विशेष काहीच गुंतवणूक करावी लागणार नाही.

व्यक्तिमत्त्व विकास

मोठी माणसे असोत किंवा मुले, कोरोनाने सर्वांनाच घरात बसवून ठेवले. त्यामुळे घरातील वातावरण कंटाळवाणे झाले आहे. प्रत्येकाला काहीतरी बदल हवा आहे. अशा वेळी तुमच्यामध्ये जर व्यक्तिमत्त्व विकासाचे  कौशल्य असेल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण या मोकळया वेळेचा फायदा घेऊन मुलांना सर्व काही शिकवण्याची इच्छा प्रत्येक पालकाला आहे. ज्यामुळे अभ्यासासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होईल. त्यामुळेच तुम्ही तुमच्यातील कौशल्याच्या बळावर या काळात ऑनलाईन व्यक्तिमत्त्व विकासाचे शिकवणी वर्ग सुरू करा. मुलांसोबत पालकांनाही शिकायची इच्छा असेल तर सवलत मिळेल, अशी ऑफरही तुम्ही देऊ शकता. सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या शिकवणीला बरीच मागणी आहे. तुम्हाला ३-४ लोक मिळाले तरी तुम्ही महिन्याला रू १२,००० ते रू १५,००० पर्यंत कमवू शकता. फक्त तुमच्यातील कौशल्याचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

कोडिंगची शिकवणी

तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:ची ओळख निर्माण करायची असेल तर कोडिंगशी नाते जोडावेच लागेल, हे मुलांना माहिती आहे. कारण आजच्या युगात तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे आयटी शिक्षकांना चांगली संधी आहे, सोबतच मुलांनाही या माध्यमातून नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे, जे त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवण्यास मदत करेल. कोडिंग प्रोग्रामिंग ही एक भाषा आहे जिच्या मदतीने तुम्ही अॅप्स, वेबसाईट्स, सॉफ्टवेअर बनवू शकता. कोरोनानंतर कोडिंगची मागणी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही आयटी म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाशी जोडले गेले असाल अणि तुमच्याकडे कोडिंगचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेऊन चांगली कमाई करू शकता. यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल, शिवाय तुम्ही चांगले पैसेही कमवू शकाल.

करियरबाबत समुपदेशन

दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा किंवा बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडून आपली कारकीर्द किंवा करियर घडवावे, हे न समजल्याने बरीच मुले गोंधळून जातात. प्रत्यक्षात त्यांच्यावर इतर हुशार मुलांचे तसेच पालकांच्या अपेक्षांचेही दडपण असते. त्यामुळेच ते त्यांच्यातील क्षमता ओळखू शकत नाहीत आणि चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे पुढे पश्चातापाची वेळ येते. अशा परिस्थितीत करियरबाबत काऊन्सलिंग म्हणजेच समुपदेशन मुलांसाठी खूपच उपयोगाचे ठरते. त्यांच्याशी बोलून, त्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांना नेमकी अडचण कुठे येते, हे ओळखून त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायला हवे, यासाठीची मदत करिअर काऊन्सलिंगद्वारे केली जाते. यामुळे त्यांना करिअरबाबत निर्णय घेण्यास मदत होते, शिवाय योग्य करिअर निवडल्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त यश मिळवण्याची शक्यता अधिक वाढते.

करियरबाबतच्या समुपदेशनाचे महत्त्व कोरोना काळात अधिक वाढले आहे, कारण या काळात जणू मुलांचे करियर पणाला लागले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात करियरबाबत निर्माण झालेला संशय समुपदेशनातूनच दूर केला जाऊ शकतो. यासाठी पैसेही चांगले मिळतात. जसे की, तुम्ही २ तास मुलांचे समुपदेशन केले तर तुम्ही एका मुलाकडून कमीत कमी रू २,००० ते रू ३,००० शुल्क घेऊ शकता. तुमच्यात कौशल्य असेल आणि तुम्ही मुलांसह पालकांना चांगले मार्गदर्शन करू शकत असाल तर तुम्ही ऑनलाईन करिअर क्लासेस सुरू करून चांगली कमाई करू शकता.

फिटनेसबाबत प्रशिक्षण

आजकाल बहुतांश लोक स्वत:च्या आरोग्याबाबत जास्त सजग झाले आहेत. म्हणूनच तर त्यांच्या नेहमीच्या वागण्या-बोलण्यात झुंबा, एरोबिक्स, जिम इत्यादी ऐकायला मिळते. इतकेच नाही तर यासाठी ते दरमहा हजारो रूपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत. हे योग्यच आहे, कारण जर तुम्ही निरोगी असाल तरच जीवनाचा खऱ्या अर्थी आनंद घेऊ शकता. परंतु, कोरोनाने फिटनेसला काहीसा ब्रेक लावला आहे. आता लोक जिम व अन्य प्रकारचे व्यायाम करण्यासाठी एखाद्या प्रशिक्षकाकडे जाऊन शिकणे योग्य समजत नाहीत. अशा वेळी त्यांची गरज आणि तुमच्याकडील कौशल्य तुमच्या कमाईचे माध्यम ठरू शकते. तुम्ही झुम, मीटसारख्या अॅपच्या मदतीने त्यांना घरबसल्या फिटनेसचे प्रशिक्षण देऊ शकता. आजच्या काळात तुमच्याकडील हे कौशल्य खूपच उपयोगाचे ठरेल, कारण आता लोक आपल्या आरोग्याशी तडजोड करू इच्छित नाहीत. दिवस, तास किंवा अभ्यासक्रमाच्या आधारे तुम्ही शुल्क आकारून चांगली कमाई करू शकता.

यासंदर्भात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे हेल्थ अँड फिटनेस सल्लागार हरिश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फिटनेसबाबत प्रशिक्षण देण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर यासाठी व्यक्तीमागे तुम्हाला स्टँडर्ड अभ्यासक्रमासाठी तासाला रू ५०० ते रू ८०० कमावता येतील. अभ्यासक्रमाच्या प्रकारानुसार तुम्ही शुल्क आकारून स्वत:चे उत्पन्न वाढवू शकता.

प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण

शिकवणीचा बाजार नेहमीच बहरलेला असतो. मात्र आता कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणीची मागणी अधिक वाढली आहे, कारण अभ्यासात खंड पडावा असे पालकांना आणि मुलांनाही वाटत नाही. अशा परिस्थितीत जॉईंट इंटरन्स एझिम असो किंवा ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग किंवा बँकिंग सेक्टर इत्यादींसाठीची इंटरन्स एझिम असो. त्यात अपयश पदरी पडू नये यासाठी मुले ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन या इंटरन्स एझिमची म्हणजे प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळेच तुम्ही जर यापैकी एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देऊ शकत असाल आणि जर याचे चांगले ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देऊन घरबसल्या तासिकेच्या हिशोबानुसार चांगली कमाई करू शकता.

व्यावसायिक प्रशिक्षण

कोरोनामुळे तुम्हाला नोकरी गमवावी लागली असेल किंवा नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याची तुमची इच्छा असेल, पण कोणता व्यवसाय करावा, ज्यामुळे स्वत:चा चांगला फायदा होईल आणि ग्राहकांशीही ओळख होईल, हेच जर तुम्हाला समजत नसेल तर यासाठी तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागेल. यामुळे व्यवसायाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली लहानात लहान गोष्टही तुम्हाला प्रशिक्षकाकडून शिकून घेता येईल. जर तुम्हाला व्यवसाय आणि बाजाराबाबत चांगले ज्ञान असेल आणि बाजाराची सध्याची मागणी काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तो कोणता व्यवसाय करायला सक्षम आहे, हे तुम्ही अचूक ओळखू शकत असाल तर तुम्ही व्यवसायाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन स्वत:चे उत्पन्न वाढवण्यासोबतच लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतही करू शकता.

विषयानुरूप प्रशिक्षण

कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरी बसून काम करण्याची संस्कृती वाढली आहे. अशा वेळी जर पतीपत्नी दोघेही नोकरदार असतील तर ते मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. शाळेचे ऑनलाईन वर्गही नावापुरतेच आहेत. त्यामुळेच मुलांना अतिरिक्त शिकवणीची गरज भासू लागली आहे. तुम्ही जर एखाद्या विषयाचे तज्ज्ञ असाल तर त्या विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकता. या माध्यमातून कमी वेळेत तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. तुम्ही एखाद्या मुलाला किंवा दोन अथवा त्याहून अधिक मुलांनाही एकत्र ऑनलाईन शिकवू शकता.

रहा नेहमीच युवायुवा

* गरिमा पंकज

तुम्ही तुमचे वय वाढणे तर थांबवू शकत नाही, मात्र वाढणाऱ्या वयाच्या प्रभावाला तर जरूर कमी करू शकता. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सीनियर डायटिशिअन निधी धवन यांच्या मते आपण काय खातो आणि कसे खातो याच्याशी आपले आरोग्य आणि सक्रियता यांचा थेट संबंध असतो.

काय खाल

* अँटीऑक्सिडंट्स पदार्थ जसे सुका मेवा, अख्खे धान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे खा. अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची   लक्षणे कमी करतात. हे इम्यून सिस्टीम मजबूत करून इन्फेक्शन पासूनही   वाचवतात.

* दिवसातून कमीतकमी एक कप ग्रीन टी प्यायल्याने वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती चांगली राहते.

* ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट्सयक्त भरपूर पदार्थ जसे मासे, सुके मेवे, ऑलिव्ह ऑइल वापरा. ओमेगा ३ तुम्हाला तरुण आणि सुंदर    राखते.

* व्हिटॅमिन सी शरीरासाठी नॅचरल बोटॉक्स समान काम करते. यामुळे स्किन टिशूज हेल्दी राहतात आणि त्यावर सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी संत्री, मोसंबी, पानकोबी इ. खा.

* जर काही गोड खावेसे वाटले तर डार्क चॉकलेट खा. यात भरपूर फ्लॅवेनॉल असते. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

* दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही जरूर घ्या. यात कॅल्शियम असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराचा प्रतिबंध करता येतो.

* तरुण आणि सक्रिय दिसू इच्छिता तर ओव्हर इटिंग टाळा. तुम्हाला जितकी भूक आहे त्याच्या ८० टक्केच खा.

काय खाऊ नका

* असे पदार्थ ज्यांच्यामुळे रक्तातील साखर वाढते जसे गोड फळे, ज्यूस, साखर कमी खा.

* सोयाबीन, कॉर्न, कॅनोला ऑइल टाळा, कारण यांत पॉलीसॅच्युरेटेड मेद जास्त प्रमाणात असते. ऑलिव्ह ऑइल वापरा.

* रेड मीट, पनीर, फुल फॅट दूध, आणि क्रीम यांत अत्यधिक मात्रेत सॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होऊ शकतात.

* सफेद ब्रेड, पास्ता, पिझ्झा इ. कमी खावे.

डॉ. निधी म्हणतात, ‘‘लठ्ठपणा आणि कॅलरी इनटेक यांच्यात थेट संबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने न केवळ आरोग्य बिघडते तर शारीरिक सक्रियतासुद्धा कमी होते.’’

जीवनशैलीतील बदल

जेपी हॉस्पिटल, नोएडा येथील डॉ. करुणा चतुर्वेदी यांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये छोटे छोटे बदल केल्यास आपण दीर्घ काळापर्यंत तरुण आणि सक्रिय राहू शकतो :

* आपले मन नेहमी व्यस्त ठेवा. काहीतरी नवीन शिकत रहा म्हणजे आपला मेंदू सक्रिय राहील.

* आपल्या हार्मोन्सच्या स्तरावर नियंत्रण ठेवा जेणेकरून तुम्ही एजिंगच्या लक्षणांपासून दूर रहाल.

* कमीतकमी ६-७ तास जरूर झोपा. जेव्हा तुम्ही झोप घेत असता तेव्हा त्वचेच्या कोशिका आपली झिज भरून काढत असतात. यामुळे त्वचेच्या सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दूर होतात.

* तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता हेही महत्त्वाचे असते. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पहा. स्वत:ला खुश आणि मोटिव्हेटेड ठेवा.

त्वचेला तरुण आणि सुरक्षित ठेवा

* उन्हात गेल्याने त्वचा काळवंडते आणि काळया झालेल्या भागावर सुरकुत्या लवकर पडतात. म्हणून बाहेर जाण्याआधी सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेला स्वस्थ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार नॉन टॉक्सिक मॉइश्चरायझर निवडा. झोपण्याआधी तो जरूर लावा.

फेशिअल एक्सरसाइ

चेहऱ्याच्या पेशींना दिलेल्या मसाजमुळे चेहऱ्याचे सुरकुत्यांपासून रक्षण होते. आपल्या कपाळावरील सुरकुत्या रोखण्यासाठी आपले दोन्ही हात कपाळावर ठेवा आणि बोटांना हेअरलाइन आणि भुवयांच्यामध्ये पसरवून हळूहळू हलकासा दाब देत बोटे बाहेरच्या दिशेने सरकवा.

काही फेशिअल एक्सरसाइ

चीकू लिफ्ट : आपले ओठ हलकेसे बंद करा आणि गालांना डोळयांनी बंद करा आणि गालांना डोळयांच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. रुंद अशा स्मितासह आपल्या ओठांचे बाहेरील कोन उचला. काही वेळ याच मुद्रेत रहा. स्मित करणे हा गालांसाठी चांगला व्यायाम आहे.

फिश फेस : हा गालांसाठी आणि जबडयासाठी उत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमचे ओठ योग्य शेपमध्ये येतात. हलकेसे ओठ बंद करा. गाल जितके शक्य होतील तितके आत खेचण्याचा प्रयत्न करा. याच मुद्रेत हसण्याचा प्रयत्न करा आणि १५ सेकंद याच अवस्थेत रहा. असे ५ वेळा करा.

पपेट फेस : हा व्यायाम पूर्ण चेहऱ्यासाठी आहे. यामुळे गालांच्या पेशी मजबूत होऊन त्या सैल पडत नाहीत. आपल्या बोटांची पेरे गालांवर ठेवा आणि स्मित करा. गाल वरच्या दिशेने खेचा आणि स्मित मुद्रेत काही वेळ रहा.

Summer Special : एसी घ्यायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

* गृहशोभिका टीम

तुमची जीवनशैली बदलत असताना एसी (एअर कंडिशनर) ही गरज बनत आहे. एअर कंडिशनर ही आता उन्हाळ्याच्या हंगामात एक गरज बनली आहे आणि काही लोकांसाठी वेळोवेळी, त्यांच्या जीवन स्थितीची मागणी आहे.

आजकाल जगभरातील सर्व लहान-मोठ्या कंपन्या त्याचे उत्पादन करत आहेत. विंडो आणि स्प्लिटनंतर आता पोर्टेबल एसीही बाजारात उपलब्ध आहेत, पण आता कोणता एसी घ्यायचा हा मोठा गोंधळ आहे? एसीची क्षमता किती आहे? आणि तुमच्यासाठी कोणता प्रकार चांगला असेल?

तुम्हीही या प्रश्नांमध्ये गोंधळलेले असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही उत्तरे आहेत. काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्यासाठी योग्य एसी निवडू शकता –

आकार किंवा क्षमता

एसी खरेदी करताना सर्वात मोठा गोंधळ त्याच्या आकाराचा किंवा क्षमतेचा असतो. खोली, हॉल किंवा एसी कुठे बसवायचा आहे यावर ते थेट अवलंबून असते. कारण मोठ्या खोलीत किंवा ठिकाणी असलेला छोटा एसी काही तास वीज वापरल्यानंतरही विशेष प्रभावी ठरत नाही.

तसे, चौरस फुटांच्या बाबतीत, जर तुमच्या खोलीचा मजला 90Sqft पेक्षा लहान असेल, तर तुमच्यासाठी 0.8 टन AC पुरेसे आहे. तर 90- 120Sqft जागेसाठी, 1.0 टन AC खरेदी करणे, 120-180Sqft जागेसाठी, 1.5 टन AC आणि 180Sqft पेक्षा मोठ्या जागेसाठी, 2.0 टन AC खरेदी करणे योग्य ठरेल.

वीज वापर

एसी खरेदी करण्यासाठी, दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा एसी किती वीज वापरतो हे पाहणे, कारण तुम्हाला महिन्याच्या शेवटी बिल भरावे लागेल. चांगली गोष्ट म्हणजे आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला विजेची बचत करण्यासाठी स्टार रेटिंग दिलेली आहे. स्टार रेटिंग जितके जास्त तितकी उत्पादनाची किंमत जास्त. परंतु एसी खरेदी करण्यासाठी किमान तीन स्टार रेटिंग असलेले उत्पादन घेणे योग्य ठरेल.

खिडकी, स्प्लिट किंवा पोर्टेबल एसी

विंडो : एसीच्या तिन्ही प्रकारांचे स्वतःचे गुण आहेत. विंडो एसी इतर दोन प्रकारांपेक्षा थोडा स्वस्त आहे. पण यात आवाज जरा जास्त आहे. हे एकल खोल्या आणि लहान खोल्यांसाठी योग्य आहे. सहज स्थापित होते. पण सौंदर्याच्या बाबतीत स्प्लिट एसीच्या तुलनेत मागे आहे.

स्प्लिट : यामध्ये त्याचे घटक बाहेर कुठेही बसवण्याची सोय आहे. उच्च हवेच्या प्रवाहामुळे, ते मोठ्या खोल्यांसाठी योग्य आहे. घटक बाहेर स्थापित केला आहे, त्यामुळे चालत असताना आवाज नाही. दिसायलाही सुंदर आहे. पण विंडो एसीच्या तुलनेत ते थोडे महाग आहे. हे फक्त एक मोठी खोली किंवा हॉल थंड करू शकते. हे दोन भागांमध्ये केले जाते, ज्यामध्ये एक भाग खोलीच्या बाहेर किंवा कमाल मर्यादेवर स्थापित केला जातो आणि दुसरा खोलीच्या आत असतो. म्हणजेच, ते एका खोलीत किंवा ठिकाणी निश्चित केले पाहिजे. जागा बदलण्याची सोय नाही.

पोर्टेबल : पोर्टेबल एसीदेखील आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्य म्हणजे ते गरजेनुसार खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा हॉलच्या कोणत्याही भागात ठेवता येते. इंस्टॉलेशनची कोणतीही अडचण नाही. तुम्ही ते स्वतःही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू शकता.

फिल्टर, एअर फ्लो, स्विंग

तुम्ही त्याच्या हवेत श्वास घेता या अर्थानेही चांगल्या एसीची निवड महत्त्वाची आहे. म्हणजेच एसीमध्ये चांगले फिल्टर असणे आवश्यक आहे. तुमचा एसी खोली किती काळ थंड करू शकतो हे हवेचा प्रवाह ठरवते. एसीमध्ये कूलिंग स्पीड सेट करण्याची सुविधा असणे महत्त्वाचे आहे. कमीत कमी दोन पंख्यांची गती असावी, जी तुम्ही तुमच्यानुसार चालू करू शकता. स्प्लिट आणि पोर्टेबल एसीमध्ये स्विंगची सुविधा आहे.

आता हे फीचर काही विंडो एसीमध्ये देखील येऊ लागले आहे, जरी ते थोडे महाग आहे. एसींनाही वेळोवेळी सर्व्हिसिंग आवश्यक असते. हे केवळ तुमचा एसी वर्षानुवर्षे टिकतो म्हणून नाही तर तुमचा एसी स्वच्छ असल्यामुळे आणि त्यातून शुद्ध हवा मिळते म्हणूनही हे महत्त्वाचे आहे.

इतर महत्त्वाच्या गोष्टी

अनेक एसीमध्ये टायमरचीही सुविधा असते. हे अलार्मसारखे वैशिष्ट्य आहे, जे सेट केल्यावर ते एका निश्चित वेळी चालू होते आणि ठराविक वेळी बंद होते. यामुळे तुमचा वीज वापर कमी होतो आणि खोली जास्त थंड होत नाही. यासाठी अनेक एसीमध्ये सेन्सरदेखील असतात जे खोलीचे तापमान मोजतात.

व्होल्टेज स्टॅबिलायझर

सामान्यतः एसीसोबतच व्होल्टेज स्टॅबिलायझर घेण्याचा सल्ला दिला जातो. हे खरे आणि आवश्यकही आहे. जर तुमचा AC 0.5-0.8 टन असेल तर 2KVA स्टॅबिलायझर त्याच्यासोबत योग्य असेल. 1.0 टन ते 1.2 टन क्षमतेच्या AC साठी 3KVA, 1.2-1.6 टन क्षमतेच्या AC साठी 4KVA, 2.0-2.5 टनासाठी 5KVA आणि 3 टनपेक्षा जास्त क्षमतेच्या AC साठी 6KVA दंड असेल

Summer Special : एसी घ्यायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

* गृहशोभिका टीम

तुमची जीवनशैली बदलत असताना एसी (एअर कंडिशनर) ही गरज बनत आहे. एअर कंडिशनर ही आता उन्हाळ्याच्या हंगामात एक गरज बनली आहे आणि काही लोकांसाठी वेळोवेळी, त्यांच्या जीवन स्थितीची मागणी आहे.

आजकाल जगभरातील सर्व लहान-मोठ्या कंपन्या त्याचे उत्पादन करत आहेत. विंडो आणि स्प्लिटनंतर आता पोर्टेबल एसीही बाजारात उपलब्ध आहेत, पण आता कोणता एसी घ्यायचा हा मोठा गोंधळ आहे? एसीची क्षमता किती आहे? आणि तुमच्यासाठी कोणता प्रकार चांगला असेल?

तुम्हीही या प्रश्नांमध्ये गोंधळलेले असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही उत्तरे आहेत. काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्यासाठी योग्य एसी निवडू शकता –

आकार किंवा क्षमता

एसी खरेदी करताना सर्वात मोठा गोंधळ त्याच्या आकाराचा किंवा क्षमतेचा असतो. खोली, हॉल किंवा एसी कुठे बसवायचा आहे यावर ते थेट अवलंबून असते. कारण मोठ्या खोलीत किंवा ठिकाणी असलेला छोटा एसी काही तास वीज वापरल्यानंतरही विशेष प्रभावी ठरत नाही.

तसे, चौरस फुटांच्या बाबतीत, जर तुमच्या खोलीचा मजला 90Sqft पेक्षा लहान असेल, तर तुमच्यासाठी 0.8 टन AC पुरेसे आहे. तर 90- 120Sqft जागेसाठी, 1.0 टन AC खरेदी करणे, 120-180Sqft जागेसाठी, 1.5 टन AC आणि 180Sqft पेक्षा मोठ्या जागेसाठी, 2.0 टन AC खरेदी करणे योग्य ठरेल.

वीज वापर

एसी खरेदी करण्यासाठी, दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा एसी किती वीज वापरतो हे पाहणे, कारण तुम्हाला महिन्याच्या शेवटी बिल भरावे लागेल. चांगली गोष्ट म्हणजे आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला विजेची बचत करण्यासाठी स्टार रेटिंग दिलेली आहे. स्टार रेटिंग जितके जास्त तितकी उत्पादनाची किंमत जास्त. परंतु एसी खरेदी करण्यासाठी किमान तीन स्टार रेटिंग असलेले उत्पादन घेणे योग्य ठरेल.

खिडकी, स्प्लिट किंवा पोर्टेबल एसी

विंडो : एसीच्या तिन्ही प्रकारांचे स्वतःचे गुण आहेत. विंडो एसी इतर दोन प्रकारांपेक्षा थोडा स्वस्त आहे. पण यात आवाज जरा जास्त आहे. हे एकल खोल्या आणि लहान खोल्यांसाठी योग्य आहे. सहज स्थापित होते. पण सौंदर्याच्या बाबतीत स्प्लिट एसीच्या तुलनेत मागे आहे.

स्प्लिट : यामध्ये त्याचे घटक बाहेर कुठेही बसवण्याची सोय आहे. उच्च हवेच्या प्रवाहामुळे, ते मोठ्या खोल्यांसाठी योग्य आहे. घटक बाहेर स्थापित केला आहे, त्यामुळे चालत असताना आवाज नाही. दिसायलाही सुंदर आहे. पण विंडो एसीच्या तुलनेत ते थोडे महाग आहे. हे फक्त एक मोठी खोली किंवा हॉल थंड करू शकते. हे दोन भागांमध्ये केले जाते, ज्यामध्ये एक भाग खोलीच्या बाहेर किंवा कमाल मर्यादेवर स्थापित केला जातो आणि दुसरा खोलीच्या आत असतो. म्हणजेच, ते एका खोलीत किंवा ठिकाणी निश्चित केले पाहिजे. जागा बदलण्याची सोय नाही.

पोर्टेबल : पोर्टेबल एसीदेखील आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्य म्हणजे ते गरजेनुसार खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा हॉलच्या कोणत्याही भागात ठेवता येते. इंस्टॉलेशनची कोणतीही अडचण नाही. तुम्ही ते स्वतःही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू शकता.

फिल्टर, एअर फ्लो, स्विंग

तुम्ही त्याच्या हवेत श्वास घेता या अर्थानेही चांगल्या एसीची निवड महत्त्वाची आहे. म्हणजेच एसीमध्ये चांगले फिल्टर असणे आवश्यक आहे. तुमचा एसी खोली किती काळ थंड करू शकतो हे हवेचा प्रवाह ठरवते. एसीमध्ये कूलिंग स्पीड सेट करण्याची सुविधा असणे महत्त्वाचे आहे. कमीत कमी दोन पंख्यांची गती असावी, जी तुम्ही तुमच्यानुसार चालू करू शकता. स्प्लिट आणि पोर्टेबल एसीमध्ये स्विंगची सुविधा आहे.

आता हे फीचर काही विंडो एसीमध्ये देखील येऊ लागले आहे, जरी ते थोडे महाग आहे. एसींनाही वेळोवेळी सर्व्हिसिंग आवश्यक असते. हे केवळ तुमचा एसी वर्षानुवर्षे टिकतो म्हणून नाही तर तुमचा एसी स्वच्छ असल्यामुळे आणि त्यातून शुद्ध हवा मिळते म्हणूनही हे महत्त्वाचे आहे.

इतर महत्त्वाच्या गोष्टी

अनेक एसीमध्ये टायमरचीही सुविधा असते. हे अलार्मसारखे वैशिष्ट्य आहे, जे सेट केल्यावर ते एका निश्चित वेळी चालू होते आणि ठराविक वेळी बंद होते. यामुळे तुमचा वीज वापर कमी होतो आणि खोली जास्त थंड होत नाही. यासाठी अनेक एसीमध्ये सेन्सरदेखील असतात जे खोलीचे तापमान मोजतात.

व्होल्टेज स्टॅबिलायझर

सामान्यतः एसीसोबतच व्होल्टेज स्टॅबिलायझर घेण्याचा सल्ला दिला जातो. हे खरे आणि आवश्यकही आहे. जर तुमचा AC 0.5-0.8 टन असेल तर 2KVA स्टॅबिलायझर त्याच्यासोबत योग्य असेल. 1.0 टन ते 1.2 टन क्षमतेच्या AC साठी 3KVA, 1.2-1.6 टन क्षमतेच्या AC साठी 4KVA, 2.0-2.5 टनासाठी 5KVA आणि 3 टनपेक्षा जास्त क्षमतेच्या AC साठी 6KVA दंड असेल

विणकामभरतकाम कौशल्याने करा व्यवसाय

* गरिमा पंकज

कोरोनामुळे आगामी काळात सोशल डिस्टंसिंग कायम राहणार आहे. याच कारणामुळे वर्क फ्रॉम होम आणि घरगुती व्यवसायात वेगाने वाढ होतेय. यामध्ये कसलाच संशय नाहीए की घरच्या घरी सामान बनवणं आणि ते विकून पैसे कमावणं एक खूपच चांगली बाब आहे. घरबसल्या तुम्ही तुमचा छंद, कला वा तुमच्या आवडीलादेखील व्यवसायात बदलू शकता. विणकामभरतकाम या अशा कला आहेत, ज्यामुळे घरबसल्या मिळकतीचा उत्तम मार्ग होऊ शकतो.

हातात कला असेल तर

याकाळात तसंही लोकांचे व्यवसाय बंद होत आहेत. अशावेळी विणकाम, शिवणकाम आणि भरतकाम काही असे व्यवसाय आहेत, जे तुम्ही आतादेखील सुरु करू शकता. यासाठी अधिक पैशाचीदेखील गरज नाहीए. तुमच्याजवळ जर कला असेल तर तर तुम्ही थोडा पैसा लावूनदेखील सहजपणे हा व्यवसाय सुरु करून पुढे जाऊ शकता. तुम्ही छोटया गावात असा वा मोठया शहरात तुमच्या हातात कला असेल तर हा व्यवसाय वाढण्यास कोणीच रोखू शकत नाही.

तुम्ही घरबसल्या मुलं आणि मोठयांसाठी कपडे शिवू शकता. विविध डिझाईनचे सुंदर स्वेटर बनवू शकता. तसंही कोरोना काळात बाहेरून जेवढया कमी वस्तू खरेदी कराल तेवढं योग्यच आहे. तुम्ही घरी विणलेले स्वेटर मुलांनी घातले तर तुम्हाला त्यांनी योग्य पेहराव घातल्याचं समाधान तरी मिळेल. हाताने बनविलेले असल्यामुळे यामध्ये वेगळंच आकर्षण असेल.

मुलांच्या कपडयांना कायमच खूप मागणी असते. तुम्ही सहजपणे घरच्या घरी मुलांचे सुंदर पेहराव बनवू शकता. अलीकडे अशा प्रकारची कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पुढे वाढू शकतात. पोस्ट कोरोना काळात अशाप्रकारे घरातूनच तुम्ही तुमचा छान बिझनेस चालवू शकता.

व्यायामदेखील आहे

अशा प्रकारे विविध कपडे जसं की टेबलक्लॉथ, बेडशीट, ड्रेसेस इत्यादीवर कशिदा काढून तुम्ही त्यांना छान लुक देऊ शकता. तुम्ही घरच्या घरी स्वत:चा भरतकामाचा व्यवसाय सुरु करू शकता. विणकामभरतकामाची कला तुम्हाला विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासूनदेखील वाचविते. विणकामभरतकाम केल्यामुळे बोटे व हात सक्रिय राहतात आणि सांध्याचे आजार होत नाहीत. विणकामभरतकाम केल्यामुळे मनदेखील सक्रिय राहतं, कारण यामुळे दोन्ही हातांबरोबरच डोकंदेखील एकत्रित काम करतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते.

महत्वाचं म्हणजे कला कोणतीही असो ती तुम्हाला रिलॅक्स ठेवते. कोरोना काळ खूपच समस्यानीं भरलेला आहे आणि अशा वेळी विणकामभरतकामसारखी कामं अर्थाजनाबरोबरच तुमचा तणाव कमी करण्यातदेखील मदतनीस ठरू शकतो.

पैशांचं व्यवस्थापन आयुष्याच्या आनंदाची चावी

* धीरज कुमार

आभाचे पती आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. तिच्या पतींचा कार अपघात झाला. अचानकपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये सर्वात अगोदर पैशाची गरज लागली. तिने पैसे तसे कधी स्वत:जवळ ठेवलेच नव्हते. सर्व गरजेचं सामान पतीच आणत असत. पैसा पतीच्या बँक खात्यामध्ये होते. तेच सर्व व्यवहार करत होते. परंतु त्यांच्या ऑपरेशनसाठी गरज लागली तेव्हा स्वत: जवळ पैसे असूनदेखील अनेक नातेवाईकांच्या पुढे हात पसरावे लागले.

आभा स्वत:च्या पतीवर एवढी अवलंबून असायची की पतीचा एटीएम कार्डचा पिन क्रमांकदेखील तिला माहीत नव्हता. त्या दिवसात जेव्हा पैशाची खरोखरंच गरज होती,  तेव्हा फोन करून नातेवाईकांना विनंती करून हात पसरावे लागले होते. कसबसं करून पैशांची व्यवस्था झाली आणि त्यानंतर पतींचे ऑपरेशन झालं.

मेहुल सरकारी कंपनीत कंम्प्यूटर इंजिनियर (आऊटसोर्सिंग) या पदावर कार्यरत होते. जवळजवळ ८ वर्षे नोकरी करत होता. अचानक तपासणी केल्यानंतर समजलं की पत्नीला कॅन्सर झाला आहे. घाईगडबडीत पत्नीला इस्पितळात दाखल करावं लागलं. नोकरीच्या दरम्यान कधी बचतीबद्दल विचारच केला नव्हता. जेव्हादेखील पगार मिळत असे पत्नी,  मुलं,  भाऊ,  भाचे आणि आपल्या आई-वडिलांवर मोकळया हाताने पैसे उधळले होते. तसं त्यांचं आयुष्य खूपच समाधानी होतं. जेव्हा पत्नीला कॅन्सरच्या आजाराबद्दल समजलं,  तेव्हा पैसे जुळविण्यात हातपाय कापू लागले. अनेक मित्रांकडून उधार घ्यावे लागले,  काही मित्रांनी उधार देण्यास नकार दिला. जवळच्या नातेवाईकांकडून उधार पैसे घेऊन उपचार करण्यात आले. परंतु पैसे काही वेळेवर जुळवता न आल्यामुळे पत्नीला चांगल्या इस्पितळात उपचार करू शकले नाही. शेवटी तो काही त्यांच्या पत्नीला वाचवू शकला नाही.

मेहुलला या गोष्टीची कायमच रुखरुख लागून राहिली की त्याने मिळालेल्या पगारातून कधी बचतीचा विचारच केला नव्हता. तो व्यवस्थित बचत करू शकला असता. त्याच्याजवळ स्वत:च्या बचतीचे पैसे असते तर पत्नीला चांगल्या इस्पितळात आणि योग्यवेळी उपचार करू शकला असता.

मेहुलला महिन्याला पगारा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नव्हती. अगदी त्याचा पीएफदेखील कापला जात नव्हता. त्यामुळे कर्जदेखील मिळू शकत नव्हतं, कारण कंपनी महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त कोणतीही इतर सुविधा देत नव्हती. तो भविष्याच्या चिंतापासून दूर राहिला आणि कधी कल्पनादेखील केली नव्हती की भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आजदेखील अशा प्रकारची अनेक जोडपी आहेत, जी आपल्या नकारात्मक स्थितीकडे कानडोळा करून मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचं व्यवस्थापन करत नाही आहेत. ते कधी विपरीत परिस्थितीबद्दल विचारच करत नाहीत. ते विचारच करत नाहीत की आयुष्यात एकसारखं कधीच काही चालत नाही. आयुष्यात कधीही उतार-चढाव येऊ शकतात. अशा या काळासाठी तयार राहायला हवं. आपण आयुष्य तर बदलू शकत नाही परंतु सावधानता नक्कीच बाळगू शकतो. पैशाची भविष्यासाठी योग्य व्यवस्था तसेच त्यांच अगोदरच प्लॅनिंग करून जीवन सरळ बनवू शकतो.

आपल्या पार्टनरला आर्थिक माहिती नक्की द्या

पती असो वा पत्नी जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपल्या साथीदाराला घरची आर्थिक माहिती नक्की द्या. काही चेक एकमेकांसाठी सहीदेखील करून ठेवायला हवे. एकमेकांच्या एटीएमच्या पिन इत्यादीची माहिती पती-पत्नीना नक्कीच असायला हवी. फक्त पतीपत्नीच नाही तर आपल्या मोठया होणाऱ्या मुलांनादेखील याची माहिती द्यायला हवी,  म्हणजे कोणत्याही संकटाच्या दिवसात मुलं येतील त्या संकटाचा सामना सहजपणे करू शकतील. अशा प्रकारे परिवारातील सर्व सदस्यांनी तयार राहायला हवं. शक्य असल्यास पतीपत्नी व मुलांचे जॉइंट अकाउंटदेखील उघडायला हवं,  म्हणजे गरज लागल्यास कोणीही पैसे काढू शकतात.

बचतीची सवय ठेवा

तुम्ही भलेही कितीही कमावत असाल व खर्च करत असाल, तर तेदेखील कमी पडू शकतं. परंतु जर तुम्हाला बचत करायची असेल तर थोडयाशा कमाईतदेखील बचत करता येऊ शकते. थोडे थोडे पैसे साठवून भविष्यासाठी जमा करता येतात. माणसाला आपल्या भविष्याबद्दल काहीच माहिती नसतं, की ते पुढे काय होईल. संकटं काही सांगून येत नाही ती अचानकपणे येतात. म्हणून जसं तुमचं इन्कम आहे तशीच बचत असायला हवी. बचत भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी,  घर बनविण्यासाठी, भविष्यात मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी,  मुलांचं लग्न करण्यासाठी अगोदरपासूनच विचारपूर्वक करायला हवी. या व्यतिरिक्त काही पैसे आकस्मिक खर्चासाठीदेखील ठेवायला हवेत. बचतीची अजूनदेखील अनेक कारणं असू शकतात.

जीवन विमा आवश्यकता

तुम्ही नोकरदार आहात, गृहिणी आहात, शिक्षक आहात वा तुम्ही एखाद्या पदावर कार्यरत असाल तेव्हा तुमचा जीवन विमा नक्कीच काढा. जीवन विमा आयुष्याच्यासोबत आणि आयुष्याच्यानंतरदेखील तुमच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा देतं. जर तुमच्या दरवाजावर विमा विकणारी व्यक्ती आली तर त्यांना फालतू समजून टाळू नका, उलट त्यांच्याजवळ तुमच्या ऐपतीनुसार विमा घेण्याबद्दल बोलणं करा. विमा हा तुम्ही नसताना तुमच्या आश्रित कुटुंबाला सुरक्षा प्रदान करतं. एवढंच नाही तर  आता अनेक प्रकारचे विमादेखील उपलब्ध आहेत. जसं घर, गाडी, आरोग्य इत्यादींसाठी तुमच्या गरज आणि सुविधेनुसार नक्कीच घ्यायला हवं.

तुमच्या गरजा थोडया कमी ठेवा

घरातील जेष्ठ जेव्हा सांगतात की मोकळया हाताने पैसे खर्च करु नका. भविष्यासाठी थोडी बचत करत जा. आताच्या तरुणांना हे आवडत नाही. परंतु त्यांचं असं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे. भविष्यासाठी पैसे साठवणं खूपच गरजेचे आहे. तुम्ही व्यापारी असा वा नोकरदार व्यक्ती, तुमचा व्यापार वा तुमची नोकरी ज्या दिवशी सुरू होते त्याच दिवसापासून बचतीचादेखील विचार करायला हवा. तुमच्या गरजांना थोडी आवर घाला. तुमच्याकडे जर दोन-चार चांगले कपडे असतील तर विनाकारण डझनभर कपडे ठेवल्याने काय फायदा. जर १-२ खोल्याच्या भाडयाच्या घरात तुमचं चालू शकतं तर उगाच दिखाव्यासाठी मोठा फ्लॅट घेऊन समाजात तुम्ही काय दिखावा करणार आहात.

इन्वेस्टमेंट गरजेची आहे

आजकाल अनेक कंपन्या इन्वेस्टमेंटसाठी काम करत आहेत. शेअर मार्केट, इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड, ईपीएफ, नॅशनल पेन्शन सिस्टम, रियल इस्टेट, गोल्ड इत्यादींमध्ये इन्वेस्टमेंट तुमच्या सुविधानुसार केली जाऊ शकते. इन्वेस्टमेंटमध्ये चांगला परतवा मिळतो. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून योग्य माहिती घ्यायला हवी. इन्व्हेस्टमेंट अशी असायला हवी की बचत इत्यादीवर त्याचा कोणताही परिणाम होता कामा नये.

तुमच्या गरजा प्राथमिकता द्या

शेवटी  एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपली जशी गरज आहे त्यानुसार बचत आणि खरेदीसाठी प्राथमिकता द्यायला हवी. जर तुम्ही भाडयाने राहात असाल तर गरजेचं आहे की तुम्ही फ्लॅट घेण्याबाबत विचार करा. जर नोकरी व बिझनेससाठी येण्या जाण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही कार खरेदी करण्याबद्दल विचार करत असाल तर घर आणि काम ज्याची पहिली गरज आहे त्यालाच प्राथमिकता द्यायला हवी. समजा मुलाचं लग्न करायचं आहे आणि घरदेखील घ्यायचं असेल तर अगोदर मुला-मुलींचे लग्न करण्याला प्राथमिकता द्यायला हवी. घर बनविणे या गोष्टी नंतर होतील. प्राथमिकता आपल्या गरजेनुसार व्हायला हवी.

फायनान्शियल अॅडव्हायरचा सल्ला

इन्शुरन्स अॅडव्हायझर राजेश कुमार सिंह सांगतात की मनी मॅनेजमेंट खूपच हुशारीने करायला हवं. यामध्ये लहान मोठी चूकदेखील खूप मोठे नुकसान करू शकते. दुसरीकडे हुशारीने पैशाची बचत होईल आणि तेदेखील योग्य जागी इन्वेस्टमेंट केलं तर चांगला लाभदेखील मिळू शकेल. मनी मॅनेजमेंटमध्ये खूपच हुशारीची गरज असते. योग्य प्रकारे केलेलं मनी मॅनेजमेंट कुटुंब आणि स्वत:च्या आयुष्याला आर्थिक सुरक्षेची हमी देतं. मनी मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक सल्लागाराची मदत नक्कीच घ्यायला हवी. मनी मॅनेजमेंट खूपच विचारपूर्वक करायला हवं, म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हे सुखद भविष्यासाठी खूपच गरजेचं आहे. जर याचं प्लॅनिंग योग्यप्रकारे केलं तर भविष्याची आधारशीला मजबूत राहील. कुटुंब तसेच स्वत:चे भविष्य सुरक्षित राहील.

प्रवास स्मार्ट आणि सुरक्षित करा

* गृहशोभिका टीम

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल, तर त्यासोबतच तुम्ही स्मार्ट प्रवासी असणे आवश्यक आहे, म्हणून आज आम्ही तुमचा प्रवास स्मार्ट आणि सुरक्षित कसा बनवू शकतो याबद्दल बोलणार आहोत.

स्मार्ट पॅकिंग – पॅकिंग करताना हे लक्षात ठेवा की खूप हलके रंगाचे आणि सहज घाण होणारे कपडे कधीही घेऊ नका, यामुळे तुम्हाला कपडे पुन्हा पुन्हा धुण्याच्या समस्येपासून वाचता येईल. याशिवाय असे काही कपडे सोबत ठेवा जे तुम्ही मिक्सिंग आणि मॅचिंग करून घालू शकता. यामुळे तुम्ही कोणतेही कष्ट न करता स्टायलिश दिसाल आणि तुम्हाला जास्त कपडे घेऊन जाण्याचीही गरज भासणार नाही.

लहान सामान – आपण जिथे जातो तिथे खरेदी करतो आणि स्मृतीचिन्ह म्हणून नक्कीच काहीतरी आणतो, त्यामुळे कमी सामान घेऊन घर सोडले तर बरे होईल जेणेकरून थोडी जास्त खरेदी केली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तुमच्या वस्तूंबाबत समस्या.

औषधे – अनेक वेळा असे घडते की थकवा, हवामान किंवा खाण्याच्या सवयी बदलणे, अपचन, लूज मोशन, सर्दी-ताप यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर खबरदारी म्हणून काही औषधे आधीच सोबत ठेवावीत.

पैसा प्रवासादरम्यान, हे लक्षात ठेवा की कधीही जास्त रोख किंवा मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करू नका आणि तुम्ही तुमचा डेव्हिड, क्रेडिट देखील सुरक्षित ठेवा. याशिवाय कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नका हे लक्षात ठेवा.

तुम्ही कुठेही जात असाल, शक्य तितकी माहिती तुमच्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें