मान्सून स्पेशल : रिमझिम पावसाळ्यातील मेकअप रूल्स

– शैलेंद्र सिंह

वॉटरप्रूफ मेकअपची सगळयात विशेष गोष्ट म्हणजे पाणीही याचे काही बिघडवू शकत नाही. लग्नात आणि पार्टीमध्ये कॅमेऱ्यासमोर किंवा प्रखर लाइट्ससमोर उष्णतेमुळे मेकअप विस्कटू लागतो.

अशावेळीही वॉटरप्रूफ मेकअप खूप चांगला असतो. रेनडान्स, स्विमिंग पूल आणि समुद्र किनाऱ्यावर उन्हाळयाच्या सुट्टीची मजा घेतानाही वॉटरप्रूफ मेकअपची कमाल दिसून येते.

आहे तरी काय वॉटरप्रूफ मेकअप

बॉबी सलूनच्या स्किन, हेयर आणि ब्युटी एक्सपर्ट बॉबी श्रीवास्तवचे म्हणणे आहे, ‘‘घाम आल्यावर मेकअप ओला होऊन त्वचेच्या रोमछिद्रामध्ये जातो, ज्यामुळे मेकअप बेरंग दिसू लागतो. मेकअप रोमछिद्रांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू नये हीच काळजी वॉटरप्रूफ मेकअपमध्ये घेतली जाते. त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करून केला गेलेला मेकअपच वॉटरप्रूफ मेकअप म्हणून ओळखला जातो. रोमछिद्रांना २ प्रकारे बंद केले जाते. पहिला नैसर्गिक वॉटरप्रूफ आणि दुसरा प्रकार प्रॉडक्ट वॉटरप्रूफचा असतो. नैसर्गिक वॉटरप्रूफ पद्धतीत त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करण्यासाठी थंड टॉवेलचा उपयोग केला जातो. ज्याप्रकारे वाफ घेतल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडली जातात, त्याचप्रकारे थंड टॉवेल ठेवल्याने रोमछिद्र बंद होऊन जातात. यासाठी बर्फाचा उपयोग केला जाऊ शकतो. यानंतर केलेला मेकअप घामाने पुसत नाही.’’

वॉटरप्रूफ मेकअपची वाढती मागणीला बघून मेकअप प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट बनवणे सुरु केले. या प्रॉडक्टमध्ये अशा काही घटकांचा समावेश केलेला असतो, जे मेकअप करताना त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करतात. वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्समध्ये क्रीम, लिपस्टिक, फेसबेस, रुब, मस्कारा, काजळ यासारख्या अनेक वस्तू आता बाजारात मिळू लागल्या आहेत.

वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टस सिलिकॉनचा उपयोग करून बनवले जातात. यात वापरलेले डायनोथिकॉन ऑइल त्वचेला चमकदार बनवते. हे वाटरप्रूफ मेकअपला सहजपणे पसरण्यास मदत करते. जेथे वॉटरप्रूफ मेकअपचे एवढे सगळे फायदे आहेत तेथे काही दोषही आहेत. ज्यांना जाणून घेणे आवश्यक आहे. वॉटरप्रूफ मेकअप हटवण्यासाठी पाण्याचा उपयोग पर्याप्त नाही तर बेबी ऑइल किंवा सिलिकॉन ऑइलचाही उपयोग करावा लागतो. याचा वापर त्वचेवर वाईट प्रभाव टाकतो. यासाठी वॉटरप्रूफ मेकअपचा उपयोग विशेष प्रसंगीच करावा. रोज याचा वापर करू नये.

मेकअप टीप्स

ब्युटी एक्सपर्ट बॉबी श्रीवास्तव सांगत आहेत काही विशेष टीप्स :

* या मोसमात मेकअप करताना डार्क शेडचा वापर कधीच करू नये. फाउंडेशनही लाईटच लावावे. मुरुमे किंवा डागांना लपवण्यासाठी वॉटरबेस्ड फाऊंडेशनचा वापर करावा. जर याने चमक जास्त येत असल्यास पावडरच्या ऐवजी ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.

* आपल्या गालांना गुलाबी दाखवण्यासाठी लाईट ब्लशरचा वापर करा. थोडीशी शिमर पावडर डोळयांच्या अवती-भोवती लावून त्यांना आकर्षक बनवू शकता. ओठांवर लिपकलर लावल्यानंतर चमकवण्यासाठी हलका लिपग्लॉस लावावे. लॅक्मे मेकअप प्रॉडक्ट्समध्ये अशाप्रकारचे सगळे सामान मिळते.

* मस्कारा दिवसभर टिकून राहण्यासाठी पापण्यांच्या केसांवर मस्कारा लावावा. असं केल्याने तो पसरत नाही.

* संध्याकाळच्या पार्टीचे मेकअप करतांना नैसर्गिक मेकअपच करावा. संध्याकाळी ऊन नसते. त्यामुळे चेहऱ्यावर शिमरचा वापर करू शकता. जर तुम्ही उन्हात निघत असाल तर एसपीएफ-१५ युक्त सनक्रीम किंवा लोशनचा वापर जरूर करावा. यामुळे त्वचेवर सनबर्नचा प्रभाव कमी होतो.

* स्विमिंग पूलमध्ये जाण्याअगोदर आणि नंतर किटाणूनाशक साबणाने अंघोळ अवश्य करावी.

* या ऋतूत पूर्ण शरीराची डीप क्लिंजिंग करावी. आठवड्यात १ वेळा बॉडी मसाज करावा, आणि एकदा स्टीमबाथ घ्यावी. स्टीम घेतांना पाण्यात हलके बॉडी ऑइल मिसळून घ्यावे.

* बाथटबमध्ये पाणी भरून त्याच्यात मिनरल सॉल्ट मिसळावे. १०-१५ मिनिटे त्यात राहावे. मग बघा, त्वचेत चमक अवश्य येईल.

* जेव्हा पण कडक उन्हातून परताल, थंड पाण्यात पातळ सुती कपडा बुडवून, पिळून घ्यावा आणि मग त्याला उन्हाने प्रभावित जागेवर थोडया-थोडया वेळेसाठी ठेवावे.

* एका टबमध्ये पाणी भरून मीठ सिळून हात आणि पायांना १० मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा. यामुळे मृत त्वचा कोमल होईल. यानंतर रगडून सहजपणे सोडवले जाऊ शकते. यानंतर मॉइश्चराइजर लावावे. पायांना दोन मिनिटे गरम पाण्यात आणि दोन मिनिटे थंड पाण्यात आळीपाळीने बुडवावे.

हेयर केयर टिप्स

* जर केस छोटे असतील तर हलके कर्ल करू शकता. केस मिडिअम साईजचे असतील किंवा मोठे असतील तर त्यांना बांधलेली हेयर स्टाईल देण्याचा प्रयत्न करा. केस मोकळे ठेवायचे असतील तर त्या हिशोबाने कापलेले असावेत. आजकाल केसांना कलर करण्याचा ट्रेंडही चालू आहे. जर कलर करायचे असतील तर ब्लौन्ड हेयर किंवा नॅच्युरल ब्राऊन कलर करावा.

* केसांमध्ये नियमितपणे चांगल्या प्रकारच्या कंडिशनरचा उपयोग अवश्य करा. यामुळे केस चमकदार आणि कोमल होतात. कंडिशनर लावायची सगळयात चांगली पद्धती ही असते की केसांच्या वरच्या भागापासून खालपर्यंत लावावे.

* केसांना चमकदार बनवण्यासाठी नैसर्गिक मेंदीचा वापर करावा. यामुळे केसांना कमकुवत होण्यापासून वाचवले जाऊ शकते.

मान्सून स्पेशल : तुमचे घर पावसाळ्यासाठी तयार आहे का?

* पूजा

पावसाची रिमझिम, ओल्या मातीचा मृदगंध आणि हिरवेगार गवत डोळयांचे पारणे फेडते आणि मनाला मोहून घेते. पण यासोबतच रस्त्यांवर खड्डयांमध्ये साचलेले पाणी चिखल आणि घाण आजारांनासुद्धा आमंत्रण देत असते. अशावेळी घर स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते, कारण घर एक अशी जागा आहे, जिथे आपण सर्वात जास्त वेळ घालवतो आणि सहज बॅक्टेरियांच्या संपर्कात येऊन आजारी पडू शकतो, जर तुम्ही या ऋतूत आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून पावसाचा पुरेपूर आनंद उपभोगू पाहात असाल तर या स्वच्छतेच्या टिप्सवर अवश्य लक्ष ठेवा :

अँटीबॅक्टेरिअल टाईल्स

घराला बॅक्टेरियापासून दूर ठेवायचे असेल तर अँटीबॅक्टेरियल टाईल्स लावून घ्या. या टाईल्स अँटीबॅक्टेरिअल टक्नोलॉजी वापरून बनवलेल्या असतात. या टाईल्स किटाणू नष्ट करतात व तुम्हाला किटाणूमुक्त वातावरण देतात.

जोडे बाहेर काढा

रस्त्यांवर असलेले चिखल शूज आणि चपलांवर लागून घरात येतात म्हणजे नकळत तुम्ही घाण आणि बॅक्टेरियासुद्धा आपल्यासोबत घेऊन येता. म्हणून हेच बरे की आपला शू रॅक घराच्या बाहेर ठेवा आणि तिथेच जोडे काढा आणि घाला. असे केल्याने घर अगदी साफ आणि किटाणूमुक्त राहील.

व्हेंटिलेशन अत्यंत आवश्यक

घरात असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण कमी करण्यात व्हेंटीलेशन खूप महत्वाची भूमिका बजावते. घरात असलेल्या आर्द्रतेपासून दूर राहण्यासाठी योग्य व्हेंटीलेटर वा ह्युमिडीफायरमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा वातावरण निरभ्र असेल तेव्हा घराच्या खिडक्या उघडया ठेवा. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश आत येऊ द्या. असे केल्याने घरात किटाणूंची वाढ होणार नाही.

योग्य पडद्यांची निवड करा

वर्षा ऋतूत वजनदार आणि जाड पडद्यांची निवड चुकूनही करू नका, कारण या ऋतूत पडदे धुणे आणि नंतर सुकवणे अतिश वैतागवाणे असते. याशिवाय जाड पडदे लावल्याने खोलीत दमटपणाचा स्तर वाढतो, त्यामुळे पावसाळयात हलके आणि पारदर्शक पडदे वापरा, कारण हे लावल्याने जसा खोलीत आपला खाजगीपणा कायम राहतो तसाच सूर्यप्रकाशही सहज येतो. या पडद्यांमुळे खोलीत अतिशय हलकेपणा जाणवतो.

फर्निचर भिंतींपासून दूर ठेवा

वर्षा ऋतूमध्ये फर्निचर भिंतींपासून, खिडक्यांपासून आणि दारापासून दूर ठेवलेले बरे, कारण भिंतींना ओलं लागल्यास फर्निचर खराब होऊ शकते. म्हणून फर्निचर भिंतीलगत ठेवू नका, उलट २-३ इंच दूरच ठेवा. याशिवाय फर्निचर वेळोवेळी कोरडया कपडयाने पुसत राहा, वाटल्यास फर्निचर हलवून पहा. असे केल्याने फर्निचरसुद्धा सुरक्षित राहील आणि पावसाळयातील बॅक्टेरियासुद्धा घरात उत्पन्न होणार नाही.

लाकडाचे फर्निचर तेल लावून ठेवा वा वॅक्स करा

तुम्ही साधारणत: पाहिले असेल की पावसाळयात अनेकदा लाकडाच्या सामानावर ओलावा येतो, ज्यामुळे लाकडाच्या फटी आणि दरवाजे उघडत नाहीत, म्हणून यांना तेल किंवा वॅक्स लावा, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही.

दुरुस्ती करणे टाळा

या ऋतूत घराची कोणतीही दुरुस्ती अथवा पेंट करणे टाळा. कारण हवामानामुळे वातावरणात असलेला जास्त दमटपणा तुमचे काम बिघडवू शकते. या ऋतूत पेंट करवून घेतल्यास, तो लगेच सुकणार नाही आणि त्रास होईल तो वेगळाच.

मेणबत्ती पेटवा

पावसाळयात घरात एक विचित्र वास पसरलेला असतो. जो सहन करणे कठीण असते. म्हणून हा वास येऊ नये म्हणून घरात सुंगधित मेणबत्ती लावा, जेणेकरून घरातील वातावरण आनंदी राहील. मेणबत्ती कॉफीटेबल वा साईड टेबलवर ठेवा. संध्याकाळ होताच लावा आणि छान सुगंधाचा आनंद घ्या.

कलर थेरपी करते कमाल

पाऊस पडून गेल्यावर तापमानात घट येते. थोडा गारवा येतो. अशावेळी नक्कीच तुम्हाला आपल्या घरात थोडा उष्मांक हवा असे वाटू लागेल. यासाठी तुम्ही घरात उजळ रंगांचे कुशन्स आणि पांघरूण वापरा आणि या मोसमाचा आनंद घ्या.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यात घाला ही पादत्राणे

* पूजा भारद्वाज

पादत्राणे ऋतूनुसार बदलायला हवीत. हीच गोष्ट लक्षात घेत आम्ही तुम्हाला मान्सूनमधील पादत्राणांच्या फॅशनबाबत सांगत आहोत.

हो जर हिवाळा आणि उन्हाळ्यात फॅशनमध्ये बदल घडतो तर पावसाळयात का नाही? मान्सून काळात बाजारात फॅशनचे हजारो पर्याय मिळतील, जे तुमच्या फॅशनची शोभा वाढवतील.

फुटवेअर डिझायनर रेखा कपूर यांचे असे मत आहे की बाजार रंगीत फ्लिप फ्लॉप, फ्लोटर्स, रेन बूट्स आणि प्लास्टिक चप्पल्सने खचाखच भरला आहे. हे सर्व लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या सर्व रंगात उपलब्ध आहेत. याशिवाय फ्लॉवर  प्रिंट्स  व इतर डिझाइन्समध्येसुद्धा हे मिळतात, जे तुम्हाला एखादा फंकी आणि हॅपनिंग लुक देतील आणि मान्सून काळात तुम्ही वेगळेच दिसाल.

असे निवडा

पावसाळयात आपल्या पादत्राणांची निवड विचार करून करायला हवी. या दिवसात बूट अजिबात घालू नये, कारण पावसाळयात बूट ओले झाल्यास फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूत प्लास्टिकच्या चपला घालणे पायांसाठी अधिक सुरक्षित असते.

दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये चपलांचे दुकान चालवणारा महेंद्र सांगतो की अलीकडे म्युल्सनासुद्धा खूप मागणी आहे, जे एक प्रकारचे बॅकलेस शूज असतात. हा फ्लिप फ्लॉपचा स्टायलिश पर्याय आहे. हे घालणे आणि काढणे अत्यंत सोपे आहे. याची किंमत १५० ते २०० च्या आसपास असते, जी तरुणांच्या खिशाला महाग वाटत नाही.

पादत्राणांची निगा राखणेसुद्धा आहे गरजेचे

तज्ज्ञांचे मत आहे की मान्सून काळात प्लास्टिक चपलांचा सेल जास्त असतो. आणि यावेळी गम बूट्सचे खास कलेक्शन बाजारात उपलब्ध आहे. पावसाळयात पादत्राणांची खास निगा ठेवणे आवश्यक असते.

प्लास्टिक सँडल्स : प्लास्टिक जोडे अथवा चपला खराब झाल्यास सहज ब्रशने स्वच्छ करता येतात.

रबराचे बूट : रबराचे जोडे वा चपला घालणार असाल तर वापरल्यानंतर लगेच ते पंख्याखाली वाळवा कारण ओल्या रबरातून लगेच दुर्गंधी येण्यास सुरूवात होते आणि पादत्राणे लवकर खराब होतात.

स्पोर्ट्स शूज : जर तुम्ही स्पोर्ट्स शूज घातले असतील, तर लगेच लेस काढून हे शूज उलट बाजूने ठेवा. जर तुम्ही ताबडतोब वाळायला ठेवाल तर शूज खराब होणार नाहीत.

कपाटात ठेवू नका : जोवर तुमचे शूज चांगले खणखणीत वाळत नाहीत तोवर ते कपाटात बंद करून ठेवू नका. नाहीतर ते खराब होतील आणि त्यावर फंगस चढण्याची शक्यता असते.

उन्हात ठेवा : जोडे खराब होऊ नये म्हणून त्यांना उन्हात ठेवा. यामुळे आत वाढत असलेले बॅक्टेरिया नाहीसे होतील.

लेदर टाळा : मान्सून काळात लेदरचे शूज आणि चपला घालू नका. जर वापरणे अतिशय आवश्यक असेल तर त्यांना आधी वॅक्सचे पॉलिश करा. वॅक्स लावल्याने शूजवर सुरक्षेचा पातळ थर निर्माण होतो.

मान्सून स्पेशल : साजश्रृंगार पावसाळ्यातील

* प्रतिनिधी

पावसाळयाच्या दिवसांत जास्त मेकअप करणे जोखमीचे असते. कारण या दिवसांत मेकअप खराब होण्याची भीती असते. म्हणूनच पावसाळयाच्या दिवसांत हलका आणि वॉटरप्रूफ मेकअप केला पाहिजे. चेहऱ्यावर वॉटरप्रूफ फाउंडेशन, न दिसणारी लिपस्टिक आणि वॉटरप्रूफ आयलायनर इ. चा वापर केला पाहिजे. असे प्रॉडक्टच पावसाळयाच्या दिवसांत आवश्यक असतात. इथे आम्ही काही मेकअप टिप्स सांगत आहोत, ज्या पावसाळयाच्या दिवसांत मेकअप करताना आपल्याला उपयोगी ठरू शकतील.

चेहऱ्यावरील ऑइल स्वच्छ करा

सर्वप्रथम आपला चेहरा पाण्याने चांगल्याप्रकारे धुवा आणि ५-१० मिनिटे चेहऱ्याला आइस क्युब लावा. त्यामुळे चेहऱ्याचे तेल निघून जाईल आणि मेकअप दीर्घकाळ टिकेल.

ऑयली आणि ड्राय त्वचेसाठी

ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी बर्फाने मालीश केल्यानंतर टोनरचा वापर करून पाहा. त्यामुळे त्वचेत ओलावा येईल. शिवाय ज्यांची त्वचा ऑयली आहे, त्या अॅस्ट्रिजंटचा वापर करू शकतात.

बेस तयार करा

मेकअपचा बेस तयार करण्यासाठी फाउंडेशनचा वापर करू नका.

डोळयांसाठी

डोळयांना हलकासा आयलायनर लावा, त्यावर हलका ब्राउन, पिंक किंवा पेस्टल रंगाच्या आयशॅडोचा वापर करा. त्यानंतर वॉटरप्रूफ मस्कारा लावा.

ओठांसाठी

ओठांवर सॉफ्ट मॅटी लिपस्टिक लावा. अशाप्रकारची लिपस्टिकच पावसाळी मोसमात उत्तम ठरते. मात्र ओठांवर शाइन आणण्यासाठी तुम्ही पिंक ग्लॉसचा वापरही करू शकता.

वॉटरप्रूफ मॉइश्चरायजर लावा

पावसाळयाच्या दिवसांत वॉटरप्रूफ मॉइश्चरायजर लावणे टाळू नका. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर हलका मेकअपच करा.

आपली हेअरस्टाईल सहजसोपी असावी

जर पावसाळयाच्या दिवसांत जास्त स्टायलिश हेअरस्टाईल ठेवाल, तर केस भिजल्यानंतर ते सोडविणे मुश्कील होऊ शकते किंवा केस तुटण्याची सर्वात जास्त भीती असते. पावसाळयात बँड किंवा लेअर हेअर स्टाईलला प्राधान्य द्या.

चमकदार ज्वेलरी टाळा

पावसाळयाच्या दिवसांत चमकदार ज्वेलरी शक्यतो टाळा. स्टोन ज्वेलरीचा जास्त वापर करा. हलके दागिने पावसाळयात आरामदायक असतात.

लाइट मेकअप करा

आपणाला जर सर्वांत उठून दिसायचे असेल, तर लाइट मेकअप आणि लाइट शेड्सचा वापर करा. उदा. पिंक, ब्राउन किंवा पिच रंगांचा.

आयब्रो पेन्सिलचा वापर टाळा

पावसाळयाच्या दिवसांत आपले आयब्रो नेहमी सेट ठेवा आणि आयब्रो पोन्सिलचा वापर चुकूनही करू नका. या दिवसांत पेन्सिलचा रंग ओघळण्याची शक्यता असते.

केस रोज धुवा

या दिवसांत आपले केस नियमितपणे धुवा, तसेच कोंडयापासून संरक्षणासाठी नियमितपणे मालीशही करा. केसांची देखभाल करा. पावसाळयाच्या दिवसांत केसांना एक्स्ट्रा केअरची आवश्यकता असते.

कॉटनचे कपडे वापरा

पावसाळयाच्या दिवसांत जीन्सचा वापर करू नका. हलके कॉटनचे कपडे वापरा. उदा. कॅप्री, कॉटन पँट किंवा थ्री फोर्थ इ.

सफेद कपडे टाळा

या दिवसांत सफेद कपडे वापरणे टाळा. कारण सफेद कपडे लवकर खराब होतात. म्हणून डार्क रंगाचे कपडे वापरा.

सँडल किंवा चप्पल वापरा

या दिवसांत लेदरचे शूज व सँडल वापरणे टाळा. हलके आणि मजबूत सँडल व चप्पल वापरा. शक्य असेल, तर स्नीकर्सच वापरा.

मान्सून स्पेशल : मादकता प्रदान करणाऱ्या शॉर्ट्स

* प्रतिनिधी

पावसाळा असो की उन्हाळा, शॉर्ट्स नेहमीच हॉट व मादक लुक प्रदान करतात. मात्र, परफेक्ट लुक मिळविण्यासाठी आवश्यक आहे, योग्य शॉर्ट्सची निवड. आपली शारीरिक ठेवण लक्षात घेऊन, योग्य शॉर्ट्सची निवड कशी करावी ते आपण इथे जाणून घेऊ, फॅशन डिझायनर नेहा चोप्रा यांच्याकडून :

स्ट्रेट बॉडी शेप

स्ट्रेट बॉडी शेपमध्ये कमनीयता कमी असल्याने, अशा तरुणींनी शरीराच्या खालील भागाला हेवी लुक मिळेल, अशी शॉर्ट्स परिधान केली पाहिजे. उदा. बलून शेप शॉर्ट्स यांच्यासाठी उत्तम ठरतील. त्यामुळे लोअर बॉडीला हेवी लुक मिळेल.

* फ्रंट पॉकेट, प्लीट्स, नॉट किंवा बेल्टवाल्या शॉर्ट्सही यांच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

* वेगळी प्रिंट किंवा टेक्स्चर असलेल्या शॉर्ट्सही वापरून पाहू शकता.

* अशा प्रकारच्या शॉर्ट्ससोबत ऑफ शोल्डर, बोटनेक, व्हाइट व्ही किंवा यू नेक असलेले टॉप खुलून दिसतील.

* कमरेजवळ बेल्ट, नॉट, चेन यासारख्या एक्सेसरीजचा वापर करा, जेणेकरून शरीराच्या खालील भागाला हेवी लुक मिळेल.

पेअर बॉडी शेप

अशा महिलांच्या शरीराचा खालील भाग वरील भागापेक्षा जास्त हेवी असतो. त्यामुळे त्यांच्या मांडया आणि कटीभाग जाड दिसू लागतो. म्हणून अशा तरुणींनी :

* हाय वेस्ट किंवा स्लीम फिटेड शॉर्ट्स परिधान केल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचे पाय उंच दिसतील.

* ए लाइन शॉर्ट्सही वापरू शकता, ती हेवी मांडयांना लपवू शकते.

* जर मांडया जास्त जाड दिसत असतील, तर शक्यतो शॉर्ट्स वापरणं टाळलेलंच बरं. त्याऐवजी मिड लेंथ शॉर्ट्सचा वापर करा.

* नॉट्सवाल्या शॉर्ट्स टाळा.

* शरीराला बॅलन्स लुक देण्यासाठी शॉर्ट्ससोबत लाँग टॉप्स परिधान करा.

आर ग्लास बॉडी शेप

जर तुमचा बॉडी शेप आर ग्लास असेल, तर आपली बस्ट लाइन व हिप्सचा भाग दोन्ही हेवी असल्याने, बॉडीला बॅलन्स लुक मिळतो.

* या तरुणी हर प्रकारच्या शॉर्ट्स वापरू शकतात. मिड वेस्ट, हाय वेस्ट, लो वेस्ट इ.

* जर तुमचं पोट सडपातळ असेल, तर शॉर्ट्ससोबत क्रॉप टॉप खुलून दिसेल, तसेच त्यामुळे तुम्हाला हॉट लुक मिळेल. जर मांडया जास्त हेवी असतील तर मात्र मिड किंवा गुडघ्यापर्यंत शॉर्ट्स वापरा.

* शॉर्ट्ससोबत हेवी किंवा प्रिंटेड टॉप वापरण्याऐवजी, हलके टीशर्ट वापरा.

* जर शॉर्ट्ससोबत बेल्ट वापरण्याची इच्छा असेल, तर स्किनी बेल्टची निवड करा.

* मादक लुक मिळविण्यासाठी शॉर्ट्ससोबत स्लिव्हलेस किंवा स्पॅगेटी टॉपचा वापर करा.

ओव्हल बॉडी शेप

यामध्ये बस्ट लाइनपासून थाइजपर्यंतचा भाग हेवी असतो. म्हणून अशा तरुणींनी यांच्या हेवी शरीराला सडपातळ दर्शविणाऱ्या शॉर्ट्स खरेदी केल्या पाहिजेत.

* त्या शॉर्ट, मीडियम, लाँग कोणत्याही लेंथच्या शॉर्ट्स वापरू शकतात.

* प्रिंटेड, रंगीबेरंगी शॉर्ट्सऐवजी एकाच रंगाची प्लेन शॉर्ट्स वापरावी. त्यामुळे शरीराच्या खालील भागाला सडपातळ लुक मिळेल.

* पॉकेट, प्लीट्स, नॉट असलेली शॉर्ट्स वापरण्याची चूक कधीही करू नका. त्यामुळे लोअर बॉडी पार्ट हेवी दिसू लागेल.

* शॉर्ट्ससोबत व्ही नेक लाइन असलेला टॉप सुंदर दिसेल.

अॅप्पल बॉडी शेप

अॅप्पल बॉडी शेप असलेल्या महिलांचा शरीराचा वरील भाग, पोटाचा भाग लोअर बॉडी पार्टपेक्षा जास्त हेवी असतो. अशा वेळी शॉर्ट्स खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्या :

* हाय वेस्टच्या शॉर्ट (कमी लांबीच्या) शॉर्ट्स यांच्यासाठी उत्तम ठरू शकतात.

* शॉर्ट्ससोबत मफिन टॉप्स वापरा. त्यामुळे पोट सहजपणे लपविता येईल.

* बॅक पॉकेट शॉर्ट्ससुद्धा यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मात्र, फिटेड शॉर्ट्स किंवा बेल्ट असलेल्या शॉर्ट्स वापरण्याची चूक करू नका.

* शॉर्ट्ससोबत सैल टॉप मुळीच वापरू नका.

कमी उंचीच्या तरुणींसाठी शॉर्ट्स

तसे पाहिलं तर कमी उंचीच्या म्हणजेच बुटक्या तरुणी शॉर्ट्स वापरणं टाळतात. त्यांना वाटतं की, शॉर्ट्स घातल्यास त्या आणखी बुटक्या दिसतील. मात्र लक्षात घ्या, काही गोष्टींची काळजी घेतली, तर कमी उंचीच्या तरुणीही शॉर्ट्स वापरू शकता. या तरुणींनी कमी लेंथ असलेल्या शॉर्ट्स वापरल्यास, त्यांचे पाय उंच दिसतील. अशा प्रकारे त्या आपली शॉर्ट्स वापरण्याची इच्छा पूर्ण करू शकतात.

मान्सून स्पेशल : पावसातही चमकेल केशसंभार

* एस. घोष

पावसाळयात केसांवर सतत पाणी पडल्याने ते चिकट होणे, त्यांचा गुंता होणं व गळणं यांसारख्या समस्या नेहमीच्याच झाल्या आहेत. अर्थात, हा मोसम कुठल्याही प्रकारच्या केसांसाठी त्रासदायकच असतो. मात्र, तेलकट केसांसाठी या समस्या जास्त क्लिष्ट बनतात. तेलकट केसांमध्ये वातावरणातील धूळमाती, प्रदूषण चटकन आकर्षित होत असल्याने, असे केस वेगाने गळू लागतात. याबाबत केशतज्ज्ञ कांता मोटवानी सांगतात की, पावसाळयाच्या दिवसांत केस ओले होतात. पावसाचं प्रदूषणयुक्त व अॅसिडमिश्रित पाणी केसांना नुकसान पोहोचवितं. म्हणून पावसात भिजल्यानंतर लगेच केस स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. त्यामुळे केसांना होणारा धोका कमी होईल.

या मोसमात कोणत्याही प्रकारचं हेअर जेल आणि हेअर स्टायलिंग प्रसाधनाचा वापर करू नका. या दिवसांत रसायनविरहित नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करणं उपयुक्त ठरतं. सतत केसांना कंडिशनर व शाम्पू लावल्याने डोक्याच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस रुक्ष होऊन गळू लागतात.

केशतज्ज्ञ असगर साबू सांगतात की, निरोगी केसांसाठी नेहमीचे तेच-तेच हेअर रूटीन सोडून खालील नवीन रूटीनचा अवलंब करा :

  • तुम्ही जर रोज शाम्पू करत असाल, तर सौम्य शाम्पूचा वापर करा. मात्र, केसांना सतत शाम्पू करण्याने केसांचं नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे कोंडयाची समस्या निर्माण होऊ शकते. पावसाळयात केस ओले व चिकट होत असल्याने, आठवडयातून केवळ दोन ते तीन वेळा शाम्पू करा. तोही केवळ केसांच्या मुळाशी लावून केस धुवा.
  • सौम्य कॅरॉटिनयुक्त शाम्पू या मोसमात लाभदायक ठरतो. त्यामुळे केस स्वच्छ, चमकदार व निरोगी राहातात. कॅरॉटिन केसांना पोषण देतं. त्यामुळे त्यांचा गुंता होत नाही. याबरोबरच केसांना कंडिशनिंग करून सिरम लावणे फायदेशीर असतं.
  • शाम्पूनंतर केसांना मास्क लावणं आवश्यक आहे. जर तुमचे केस फिजी असतील, तर अँटीफिजी मास्कचा वापर करा. मात्र, मास्क जास्त वेळ केसांवर लावून ठेवू नका, अन्यथा केस अधिक तेलकट होतील. हा मास्क केवळ ५ ते ७ मिनिटं लावून ठेवणं पुरेसं असतो.
  • पावसाळयात केसांना तेल लावणं आवश्यक असतं. खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलामध्ये केसांना पोषण देण्याची क्षमता असते. आठवडयातून एक ते दोन वेळा केसांना शाम्पू करण्यापूर्वी, ही तेलं कोमट करून बोटांनी केसांच्या मुळाशी हलके मालीश करा. आपल्या वेळानुसार, पाच मिनिटांपासून ते अर्धा तास केसांना चांगलं मालीश केल्यानंतर टॉवेलने डोकं झाकून घ्या. शाम्पू केल्यानंतर ड्रायरने केस वरवर सुकवा. त्यामुळे केस चमकदार दिसतील.
  • केस ओले असतील, तर ते मुळीच बांधू नका. मोठया दातांच्या कंगव्याने ते व्यवस्थित विंचरा. निरोगी केस मिळविण्यासाठी जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. तुम्ही शाकाहारी असाल, तर हिरव्या भाज्या, बिन्स होलग्रेन्स, लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स इ. चे सेवन करू शकता. मात्र, तुम्ही जर मांसाहारी असाल, तर मासे, अंडी यांचे सेवन जास्त प्रमाणात करू शकता. तुम्ही जर कामकाजी असाल, तर या दिवसांत आपल्यासोबत एक टॉवेल अवश्य ठेवा. जेणेकरून केस ओले झाल्यास ते टॉवेलने चांगल्याप्रकारे कोरडे करता येतील. काही वेळा छान हेअरकट करून केसांना आकर्षक लुक द्या.
  • पावसाळयात केसांना प्रोटीन ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. अंडे, मध व दही यांचा पॅक केसांसाठी लाभदायक प्रोटीन पॅक आहे. कृती जाणून घ्या :
  • दोन अंडयांच्या घोळात दोन मोठे चमचे दही मिसळा. अर्ध्या लिंबाचा रस आणि मधाचे काही थेंब टाकून चांगल्याप्रकारे एकजीव करा व नंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन टाका.
  • कोमट पाण्यात दोन मोठे चमचे व्हिनेगर मिसळून केसांना लावल्याने, केसांना चमक येते व केस सुळसुळीत होतात.
  • वसाच्या दिवसांत छत्री घ्यायला विसरू नका, जेणेकरून केसांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होईल व त्यांचे सौंदर्य अबाधित राहील.

कलर केलेल्या केसांची काळजी

  • केस ओले असल्यास बाहेर जाणं टाळा. कारण त्या वेळी केसांची रंध्रं उघडलेली असतात. बाहेरील वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक मिनरल्स उदा. सल्फेट, फॉस्फरस, पोटॅशियम व सोडियम ओलाव्यात मिसळतात. त्यामुळे केस कमजोर तर होतातच, पण केसांच्या रंगाला धोका पोहोचू शकतो. केस धुतल्यानंतर केसांना सिरम जरूर लावा. त्यामुळे केसांची उघडलेली रंध्रं बंद होतील. त्याचबरोबर, केस मऊ व चमकदारही होतील. शिवाय सीरमच्या वापराने कलरला शाइनही येईल.
  • आपल्याला गॉर्जिअस लुक मिळविण्यासाठी केसांना कलर करायची इच्छा असेल किंवा केसांचा कलर बदलायचा असेल, तर जरा थांबा; कारण पावसाळी मोसमात कलर लवकर उडून जाण्याची भीती असते. केसांना नरिशमेंट देण्यासाठी आठवडयातून एकदा हेअर मास्कही लावू शकता. यासाठी कडुलिंबाची पानं सुकवून पावडर करा. त्यात मेयोनीज व अंडे मिसळून केसांना लावा आणि काही तासांनंतर धुऊन टाका. या पॅकमधील कडुलिंबाचे अँटिसेप्टिक गुण आपल्या केसांचं कोणत्याही इन्फेक्शनपासून संरक्षण करतील. अंडयातील प्रोटीनमुळे केसांना मजबुती मिळेल. त्याचबरोबर, कलरही जास्त दिवस टिकून राहील, तर मेयोनीजमुळे केसांना कलरफुल चमक मिळेल.
  • तुम्ही केलेला कलर स्टायलिश दिसावा, असं वाटत असेल, तर तुम्ही वेण्याही घालू शकता. स्टायलिश व फॅशनेबल ब्रँड्समधील कलरफुल बटा खूप सुंदर दिसतील. त्याचबरोबर, तुम्ही केसांचा मॅसी साइड लो बनही बनवू शकता. चेहऱ्याला मेकअप लुकपेक्षा, नैसर्गिक लुक मिळविण्यासाठी काही बटा जरूर काढा. त्यामुळे चेहऱ्याला बनावटी लुक न मिळता, खरा लुक मिळेल.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें