अभिनेता टायगर श्रॉफच्या कॅसिनोवा गाण्यात झळकणार गायिका रवीना मेहता

सोमा घोष

अभिनेता टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी कॅसिनोवा हे गाणं त्याच्या  यूट्यूबवर रिलीज केले होते आणि ह्या गाण्याला त्याच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली. नुकताच टायगर या गाण्याचा ध्वनिक व्हर्जन म्हणजेच acoustic version चे टीजर त्याच्या इन्स्टाग्राम वर टाकले.

या गाण्यात टायगरसोबत सिंगर रवीना मेहतानेसुद्धा आपला मधुर आवाज दिला आहे. कॅसिनोवा २ फेब्रुवारी २०२० रोजी टायगरच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)


टायगर श्रॉफ म्हणाला की, “रवीनासारख्या कलाकाराबरोबर काम करणे खूप प्रेरणादायक होते. ती खूप टॅलेंटेड गायक आहे आणि रवीनाने मला गाण्यामध्ये अधिक चांगले होण्यासाठी प्रेरित केले. मला तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे.”

गायिका रवीना मेहताने अविस्तेश श्रीवास्तवसोबत यादे या गीतातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर लाकडाऊनमध्ये रवीनाने ऋषी रिच, राहुल जैन, रिषभ कांत यांसोबत तब्बल ४ गाणी रिलीज केली. गायक रवीना मेहता यांना टायगर आणि तिच्या टीमसोबत काम केल्या बद्दलच्या अनुभवाविषयी विचारले असता ती म्हणाली की टायगर माझ्यासाठी प्रेरणास्थान सारखा आहे.  तो त्याच्या कलेत अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अभूतपूर्व आहे. अवितेशने श्रीवास्तवने आमची स्टुडिओमध्ये ओळख करून दिली. माझ्यासाठी हे गाण्याचं शूट म्हणजे खूप सुंदर प्रवास आहे आणि मी प्रेक्षकांसमोर हे गाणं सादर करण्यासाठी उत्सुक आहे. चाहत्यांकडून मिळण्याऱ्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते आहे.

नव्या वर्षात सर्व काही नॉर्मल होण्याची आशा करते – उर्मिला कोठारे

* सोमा घोष

मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेली अभिनेत्री उर्मिला कोठारे मुंबईची आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यात प्रथम त्यांना साथ दिली त्यांची आई नीलिमा कानेटकर आणि आता पती आदिनाथ कोठारे यांनी. पती आणि सासरकडचे फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. पती आदिनाथ चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक आहेत. उर्मिला एक कथक डान्सर आहे. मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ आणि ‘शुभमंगल सावधान’ त्यांच्या गाजलेल्या फिल्म आहेत, ज्यात त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. आता त्या विवाहित आहेत आणि एक मुलगी जिजा कोठारेची आईदेखील आहेत. त्या आपल्या कामात आणि कुटुंबात कसा ताळमेळ बसवतात, चला जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याच तोंडून…

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. मी लहानपणापासूनच कथ्थक डान्सर होते आणि त्या दरम्यान हावभाव करणे चांगले वाटायचे. माझ्या गुरु स्वर्गीय आशाताई जोगळेकर आहेत. तिथूनच मला लक्षात आले की मला अभिनयाची आवड आहे. त्या दरम्यान मला एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी विचारले गेले आणि मी त्यासाठी आपला पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर मी एक मराठी मालिका ‘तुझ्या विना’साठी ऑडिशन दिले आणि ती माझी पहिली सिरियल होती, ज्यात मी वर्षा उसगावकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. ती सर्वांना फार आवडली आणि पुढे काम मिळू लागले.

तुला कुटुंबाचे किती सहकार्य मिळाले?

माझ्या आईवडिलांचा खूप पाठिंबा होता. आईमुळे मी अभिनय क्षेत्रात येऊ शकले, कारण तिने माझ्या पोर्टफोलिओचा एक फोटो महाराष्ट्र टाइम्सच्या मॉडेल वॉचेस कॉलमसाठी पाठवला होता. त्यात माझ्या फोटोसोबत ईमेल एड्रेसदेखील होता. त्यामुळे पुष्कळ लोकांच्या ऑफर मिळाल्या आणि मी काम सुरू करू शकले. त्यावेळी मी ग्रॅज्युएशन करीत होते. शूटिंग शिक्षण संपल्यानंतर सुरू झाले.

डान्सर असण्याचा अॅक्टींगसाठी तुला काही फायदा झाला का?

मी क्लासिकल डान्सर आहे. त्यात अभिनयाचे प्रशिक्षण मिळते. नृत्यात मूक अभिनय असतो, पण भाव पुष्कळ असतो. अशाप्रकारे मी नकळतच अभिनयाचे ट्रेनिंग डान्सच्या माध्यमातून घेतले होते. त्यामुळे मला कोणतीही भूमिका समजण्यास सोपे गेले.

अभिनयात येण्यामुळे नृत्य मागे पडले याचा तुला पश्चाताप आहे का?

माझे नृत्य सुटू नये यासाठी मी मुंबईच्या कांदिवलीत डान्स इन्स्टिट्यूट गेल्या पाच वर्षांपासून सुरू केले आहे. त्यात मी डान्स शिकवते आणि परफॉर्मन्सदेखील करते सोबतच दुसऱ्या बाजूला एक्टिंगदेखील करते.

तुम्ही तुमच्या पतीना कसे भेटलात?

मी प्रथम मराठी फिल्म ‘शुभ मंगल सावधान’ ही केली होती. यात माझी प्रमुख भूमिका होती. याचे दिग्दर्शक महेश कोठारे, ते आता माझे सासरे आहेत. त्यांच्यासाठी अभिनय करीत होते. त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आपल्या वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक होते. तिथेच आमची ओळख झाली. याशिवाय माझे या फिल्मसाठी ऑडिशन घेतले गेले नव्हते. मी जेव्हा दिग्दर्शक आदिनाथ कोठारेना भेटायला आपल्या शो रीलसोबत गेले, तेव्हा त्यांनी ते पाहिले आणि आपल्या वडिलांकडे मला या भूमिकेसाठी फ्रीज करण्यास म्हटले. अशाप्रकारे त्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर सात वर्षांनी माझे लग्न आदिनाथशी झाले. माझी मुलगी जिजा कोठारे आता तीन वर्षांची आहे.

तू कुटुंबासोबत कामाचा ताळमेळ कसा बसवते?

मी एकत्र कुटुंबात राहते, त्यामुळे काम करणे खूप सोपे जाते. मुलीची जबाबदारी कुटुंबातील सर्वांनी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या मुलीला घरी सोडल्यानेदेखील मला काही काळजी राहत नाही, कारण कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य तिच्यासोबत नेहमी असतो. याशिवाय योग्य सवयीदेखील मुले जॉइंट फॅमिलीमध्ये चांगल्या पद्धतीने शिकतात. मलादेखील सासू-सासरे कोणत्याही कामापासून रोखत नाहीत. उलट त्यांना अभिमान वाटतो.

तू तुझ्या या प्रवासाकडे कशी बघते? एखाद्या गोष्टीची खंत आहे का?

अजून तरी संतुष्ट नाहीए आणि आणखी चांगल्या पटकथा, दिग्दर्शक आणि लोकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. कोणताच कलाकार कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. मी स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये काम करू इच्छिते.

तुला हिंदी चित्रपटांमध्ये येण्याची इच्छा आहे का?

मी हिंदी चित्रपट केले नाहीत. हिंदी जाहिरातींमध्ये काम केले आहे. याशिवाय दोन हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. चांगली पटकथा आणि बॅनर असेल तर मी हिंदी चित्रपट अवश्य करेन.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मी फॅशनेबल आहे. मला ठाऊक आहे की मला कोणत्या प्रकारचे ड्रेस शोभतात. मी ट्रेंड एक्सपेरिमेंट करत नाही. जे माझ्यावर चांगले दिसेल तेच घालते. मी एनाविला, अनामिका खन्ना इत्यादींचे पोशाख फॉलो करते. मी खूप फूडी आहे. सर्व प्रकारचे खाणे मला आवडते. मी जेवण चांगले बनवते आणि खातेदेखील. मला सीफूड खूप आवडते. तंदुरी क्रेब माझी फेवरेट डिश आहे.

तुला रिकाम्या वेळात काय करायला आवडते?

माझी मुलगी लहान आहे आणि वेळदेखील मिळतो, अशावेळी मी रियाज आणि वर्कआउटसाठी वेळ काढते.

कोव्हिड-१९ च्या काळात काम करणे कितपत कठीण आहे?

काम सुरू झाले आहे. शूटिंग नॉर्मली होत आहे, परंतु काळजी प्रत्येक ठिकाणी घेतली जात आहे. मी आता कित्येक जाहिरातींमध्ये काम केले आहे. पुढे एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे.

तुम्ही फिटनेस फ्रिक आहात. काय मेसेज देऊ इच्छिता?

फिट असणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या खाण्या-पिण्यावर आणि वर्क आऊटवर नेहमी लक्ष द्यायला हवे, जेणेकरून ते निरोगी राहतील. स्त्रियांनी विशेष करून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे त्या स्वत:वर खूप कमी लक्ष देतात.

नव्या वर्षाचे स्वागत तू कसे करू इच्छिते?

माझी इच्छा आहे की सर्व काही नॉर्मल व्हावे. माझ्या मुलीची शाळा सुरू व्हावी, कारण मी तिच्याकडून ऑनलाईन शिक्षण करून घेऊ इच्छित नाही. सगळयांचे आयुष्य नॉर्मल सुरू व्हावे, ज्यामुळे सगळे काही पूर्वीसारखे होईल.

आवडता रंग – पांढरा

आवडता पोशाख – इंडियन – साडी

आवडते पुस्तक – सिक्रेट

पर्यटन स्थळ – भारतात हिमालय,

परदेशात आफ्रिका

आवडता परफ्युम – एली साबचा क्लासिक

नकारात्मकता दूर करण्याचे उपाय – सकारात्मक विचार

जीवनाची आदर्श तत्वे – प्रामाणिकपणा

सामाजिक काम – स्त्रियांना सशक्त करण्याच्या दिशेने.

कसे रूळावर येईल बेहाल बॉलीवूड

सीमा ठाकुर

चित्रपट सृष्टीवरही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. बॉलीवूड असो किंवा प्रादेशिक सिनेमा, सर्वांनाच कोरोनाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. इंड्रस्टीतील सर्व विभाग आणि प्रोडक्शनचे काम जसे की, कास्टिंग, लोकेशन शोधणे, टेक स्काऊटिंग, कॉस्च्युम फिटिंग, वॉर्डरोब, हेअर आणि मेकअप आर्ट, साऊंड आणि कॅमेरा, केटरिंग, एडिटिंग, साऊंड आणि व्हॉईस ओव्हरसारखी सर्व कामे ठप्प आहेत. ती करणाऱ्यांच्या हातात कोणतेही काम नाही आणि कमाईचे साधनही नाही.

तज्ज्ञांच्या मते, सिनेमागृह बंद पडणे, शूटिंग थांबणे, प्रमोशनल इव्हेंट न झाल्यामुळे  आणि मुलाखतीही मिळत नसल्याने टीव्ही आणि चित्रपटसृष्टीला आगामी काळात मोठा तोटा सहन करावा लागेल.

हे नुकसान किती मोठे असेल याची अचूक आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही, परंतु असा अंदाज आहे की, इंडस्ट्रीचे सुमारे १०० ते ३० कोटींचे नुकसान होऊ शकते.

बंद पडली आहेत सिनेमागृह

सुमारे ९,५०० सिनेमागृह बंद करण्यात आली आहेत आणि येत्या काही आठवडयात  ती सुरू होण्याची शक्यता नाही. दरवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत १,२०० चित्रपटांची निर्मिती होते. हे चित्रपट मल्टिप्लेक्सद्वारे कमाई करतात, जे लॉकडाऊनमध्ये बंद आहेत.

मार्चमध्ये सर्वप्रथम रिलायन्स एन्टरटेन्मेंटने रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर ‘संदीप और पिंकी फरार’, ‘हाथी मेरे साथी’सह ८३ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

‘बागी’ हा चित्रपट ३ मार्च रोजी प्रदर्शित झाला, पण त्याची तिकिटे विकली गेली नाहीत. यामागचे कारण भारतातील कोरोनाचा वाढता संसर्ग हे होते.

याचप्रमाणे इरफान खान आणि राधिका मदान यांचा ‘अंग्रेजी मीडियम’ बॉक्स ऑफिसऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला. प्रादेशिक चित्रपटही प्रदर्शित करण्यात आले नाहीत.

ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वोत्तम पर्याय नाही

चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने आणि चित्रपटगृहे बंद असल्यामुळे चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीजचे शूटिंग थांबविण्यात आले होते, जे लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद झाले. ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की, अमेझॅन प्राइम, नेटफ्लिक्सवर काही चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु ओटीटीपर्यंत पोहोचणे प्रत्येक चित्रपटाला शक्य नाही. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म प्रत्येक मोठा चित्रपट खरेदी करू शकत नाही.

लोकप्रिय तेलगू चित्रपटाचे निर्माता एस. के. एन यांनी सांगितले की, सुमारे एक हजार खुर्च्यांची क्षमता असणाऱ्या चित्रपटगृहांचे दरमहा दहा लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म मोठया शर्यतीत पळणाऱ्या घोडयांप्रमाणे उपयुक्त ठरतील की नाही, याबाबत एस. के. एन. यांना खात्री नाही. त्यांनी सांगितले, ‘‘मला वाटत नाही की ओटीटी प्लॅटफॉर्म असे चित्रपट विकत घेतील जे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले नाहीत. कारण चित्रपटगृहात कोणता चित्रपट हिट ठरेल आणि कोणता फ्लॉप होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, ओटीटी फक्त तेच चित्रपट विकत घेऊ इच्छितात जे आधीपासूनच हिट आहेत.’’

सध्या मनोरंजन क्षेत्रात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मच असे आहे जे फायद्यात आहे. लॉकडाऊनच्या काळात  लोकप्रिय शो आणि चित्रपट पुन्हा पाहणे बरेच जण पसंत करीत आहेत, यामुळे या प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांची संख्या वाढली आहे.

२०१९ मध्ये या इंडस्ट्रीने १७,३०० कोटींची कमाई केली. यावरून २०२० मध्ये हा प्लॅटफॉम कमाईची किती रेकॉर्ड मोडीत काढेल याचा अंदाज लावता येईल.

चित्रपटगृहात बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होणे आणि त्यांना लोकप्रियता मिळणे याला महत्त्व आहे, हे जगजाहीर आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे घडणे अवघड आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म पाच कोटींचा चित्रपट विकत घेऊ शकतील पण १०० कोटींचा चित्रपट विकत घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही. म्हणूनच बॉलिवूडचे चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

या चित्रपटांच्या कमाईचा मोठा हिस्सा दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह भारतातील १० महानगरांमधून येतो जी सध्या कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचे भविष्य  अंधकारमय आहे.

कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट

प्रसिद्ध तारेतारका सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या नजेसमोर राहत आहेत. कुणाला आपला एसी खराब झाल्याची काळजी वाटत आहे तर कुणी भांडी घासणे हेदेखील कामच आहे, असे दाखवून स्वत:ला वेगळया रुपात सादर करीत आहेत. पण, पडद्यामागे काम करणाऱ्यांसाठी हा बेरोजगारी आणि उपासमारीचा काळ आहे.

चित्रपटाचे शुटिंग आणि संबंधित सर्व कामे बंद असल्याचा तितकासा दुष्परिणाम मोठे बॅनर आणि कलाकारांवर जाणवत नसला तरी तो पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणात जाणवत आहे. क्रु मेंबर्स, रोजंदारी आणि छोटया प्रोजेक्टमधून पैसे कमावणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.

दोन वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, कोरोना संकटामुळे बॉलिवूडचे काम ठप्प झाल्यामुळे या इंडस्ट्रीशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या जोडल्या गेलेल्या सुमारे १० लाख लोकांचे नुकसान झाले. अनेकांच्या हाताला काम नाही. बॉलिवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ३५,००० कामगारांचे सर्वात जास्त हाल झाले.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीनटाने या कामगारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन बॉलीवूडच्या तारेतारकांना केले. त्याला प्रतिसाद देत रोहित शेट्टी, सलमान खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, विद्या बालन हे रेशन तसेच आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले.

नवीन कलाकार, फ्रीलान्सर फोटोग्राफरही असुरक्षित

मुंबई महानगरी आहे आणि येथे देशातील विविध भागातून तरुणाई आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. पण भाडयाच्या घरात राहणाऱ्या तरुणांनाही घरी परत जावे लागले आहे. ते सर्व छोटया-मोठया  प्रोजेक्टमध्ये काम करून कसेबसे उदरनिर्वाह करीत होते. पण कामच नसल्याने आईवडिलांवर विसंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

साधारणपणे दिवसाला ११,००० ते २०,००० रुपये कमावणाऱ्या या फ्रीलान्स फोटोग्राफर्सचे मिळकतीचे मार्ग बंद झाले आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी, अभिनेता हृतिक रोशन यांनी त्यांच्यासाठी आर्थिक मदत दिली आहे.

अशी सावरेल फिल्म इंडस्ट्री

लॉकडाउन उघडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीला व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणावी लागेल. पण हे तितकेसे सोपे नाही. चित्रपट निर्मात्यांना प्री-प्रोडक्शनचे काम खूपच काळजीपूर्वक पूर्ण करावे लागेल.

प्रोडक्शन सुरू करण्यासाठी प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने ‘बॅक टू अॅक्शन’ हा अहवाल जारी केला आहे. यात व आणि ऑफ स्टेज, प्री आणि पोस्ट प्रोडक्शन अशा सर्व विभागांसाठी निर्देश जारी केले आहेत. यातील काही प्रमुख सूचना पुढील प्रमाणे :

* लॉकडाऊन उघडल्यानंतर सुरुवातीचे ३ महिने सेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जाईल. त्याने सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असेल. शक्य असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’चे पालन करणे गरजेचे असेल. सोबतच मोजकेच स्टार कास्ट, क्रू मेंबर आणि शक्यतो बाहेरच्या लोकेशनवर शूटिंग कमी करण्यावर भर देणे आवश्यक असेल. सेटवर मेडिकल टीम असणे बंधनकारक असेल.

* सेटवर प्रत्येकाला दर थोडया वेळाने हात धुवावे लागतील. ट्रिपल लेयर मास्क लावूनच ठेवावा लागेल. प्रत्येकाला ३ मीटर अंतर ठेवणे या नियमाचे पालन करावे लागेल. हस्तांदोलन, गळाभेट, किसिंग टाळावे लागेल.

* सेटवरील प्रत्येक क्रू मेंबर आणि स्टाफला त्यांचे आरोग्य उत्तम असल्यासंदर्भातील अर्ज भरावा लागेल. कुठल्याही प्रोजेक्टवर स्वाक्षरी करण्यापूर्वी  आपल्या आरोग्याबबात सर्व माहिती द्यावी लागेल.

* शूटिंगच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीची उपस्थिती नोंदविली जाईल. शूटिंगच्या ४५ मिनिटे आधी सेटवर पोहोचावे लागेल, जेणेकरुन त्यांना कोरोना संसर्ग टाळण्याचे उपाय सांगितले जातील आणि हा नवीन  दिनक्रम त्यांच्यासाठी नेहमीची सवय बनेल.

* जे घरुन काम करु शकतात त्यांना घरुनच काम करावे लागेल. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा एखादा आजार असलेल्याने घरुनच काम करणे बंधनकारक असेल.

आता पहावे हे लागेल की, ही परिस्थिती आणखी किती काळ टिकणार आहे. सर्वांचा प्रयत्न हाच आहे की, काम लवकरात लवकर रुळावर यायाला हवे आणि त्याने वेग पकडला पाहिजे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें