सोमा घोष

अभिनेता टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी कॅसिनोवा हे गाणं त्याच्या  यूट्यूबवर रिलीज केले होते आणि ह्या गाण्याला त्याच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली. नुकताच टायगर या गाण्याचा ध्वनिक व्हर्जन म्हणजेच acoustic version चे टीजर त्याच्या इन्स्टाग्राम वर टाकले.

या गाण्यात टायगरसोबत सिंगर रवीना मेहतानेसुद्धा आपला मधुर आवाज दिला आहे. कॅसिनोवा २ फेब्रुवारी २०२० रोजी टायगरच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)


टायगर श्रॉफ म्हणाला की, "रवीनासारख्या कलाकाराबरोबर काम करणे खूप प्रेरणादायक होते. ती खूप टॅलेंटेड गायक आहे आणि रवीनाने मला गाण्यामध्ये अधिक चांगले होण्यासाठी प्रेरित केले. मला तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे."

गायिका रवीना मेहताने अविस्तेश श्रीवास्तवसोबत यादे या गीतातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर लाकडाऊनमध्ये रवीनाने ऋषी रिच, राहुल जैन, रिषभ कांत यांसोबत तब्बल ४ गाणी रिलीज केली. गायक रवीना मेहता यांना टायगर आणि तिच्या टीमसोबत काम केल्या बद्दलच्या अनुभवाविषयी विचारले असता ती म्हणाली की टायगर माझ्यासाठी प्रेरणास्थान सारखा आहे.  तो त्याच्या कलेत अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अभूतपूर्व आहे. अवितेशने श्रीवास्तवने आमची स्टुडिओमध्ये ओळख करून दिली. माझ्यासाठी हे गाण्याचं शूट म्हणजे खूप सुंदर प्रवास आहे आणि मी प्रेक्षकांसमोर हे गाणं सादर करण्यासाठी उत्सुक आहे. चाहत्यांकडून मिळण्याऱ्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...