वर्क फ्रॉम होमचे फायदे आणि नुकसान

* श्रीप्रकाश

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून नोकरी करणे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होमचाच पर्याय अनेक आय टी कंपन्या तसेच अनेक क्षेत्रातील कार्यालयांनी अवलंबला होता. हो, काही कामे अशी असतात की जी घरी बसून केली जाऊ शकतात. तुम्ही जगात कुठेही असा, इंटरनेट आणि वायफायच्या मदतीने ही कामे सहजी पार पाडता येतात. यामुळे काम देणाऱ्या आणि काम करणाऱ्या अशा दोघांचा फायदा आहे. विशेषकरून अशा माता किंवा पिता वा दोघांसाठी जे आपल्या मुलांवर जास्त लक्ष्य देऊ इच्छितात. आधी ही व्यवस्था पश्चिमी विकसित देशांपर्यंतच मर्यादित होती. पण आता आपल्या देशात इंटरनेट आणि वायफायच्या विस्तारामुळे वर्क फ्रॉम होम येथही सहज साध्य आहे.

कोणती कामे घरी बसून शक्य

माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कार्य घरून इंटरनेट आणि वायफायने केले जाऊ शकते. उदाहरणार्थ :

वर्चुअल असिस्टेंट

वर्चुअल असिस्टेंटची आपली कंपनी घरून चालवू शकता किंवा एखाद्या अशा कंपनीसाठी जी आपल्याला दुसऱ्या कंपनीसाठी किंवा क्लाइंटसाठी काम देईल. छोटे व्यावसायिक जे पर्मनंट कर्मचारी ठेवण्यास असमर्थ आहेत, त्यांना अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, जे त्यांच्यासाठी घरून काम करू शकतील.

मेडिकल टंरास्क्रिप्ट

डॉक्टरांचे बोलणे ऐकून त्यांचे उपचार, सूचना आणि औषधांसंबंधित बाबी कंप्युटरवर टाईप कराव्या लागतात. डॉक्टर दुसऱ्या देशाचेही असू शकतात. त्यांचे उच्चारण व्यवस्थित समजून घ्यावे लागतात.

अनुवादक

जर आपण एकापेक्षा अधिक बहुप्रचलित आंतरराष्ट्रीय भाषा जाणत असाल तर जगात अशा बऱ्याच कंपन्या आहेत, ज्या आपल्या देशात बसलेल्या आपल्या ऑडिओ फाईल्स किंवा डॉक्युमेंट्स एखाद्या दुसऱ्या भाषेत अनुवादित करू इच्छित असतील.

वेब डिझाइनर

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळयात जास्त वर्क फ्रॉम होमच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात वर्चुअल असिस्टेंट, वेब डेव्हलपर किंवा डिझाइनर, नवीन कस्टम वेब डिझाइन किंवा त्यांच्या वेबमध्ये बदल, सुधार किंवा अपडेटिंगची गरज पडत असते.

कॉल सेंटर प्रतिनिधी

यातही बऱ्याच संधी आहेत. जेव्हा कधी आपण एखाद्या मोठया कंपनीत कुठले सामान किंवा सेवेची ऑर्डर देत असतो, त्यावेळी दुसऱ्या बाजूने आपले बोलणे ऐकणारा कोण्या मोठया कॉल सेंटरमध्ये नसून त्यांचा कोणी प्रतिनिधी असू शकतो, जो घरूनच काम करत असतो.

सहाय्यक तांत्रिक तज्ज्ञ

कॉल सेंटरला आपले कंप्युटर्स व इतर उपकरणांची देखभाल किंवा त्यांची दुरूस्ती वा आधुनिकिकरणासाठी तांत्रिकी मदतीची गरज असते. याचे निराकरण कधी घरी बसून केले जाऊ शकते. तर कधी ऑनसाईट जावे लागते. जर आपण कंप्युटर, इंटरनेट, मोडेम, वायफ्राय इत्यादींचे माहितगार असाल तर हे काम आपण करू शकता.

ट्रॅव्हल एजेंट

जर आपणास या व्यवसायाची माहिती असेल तर आपण पाहिजे असल्यास हे काम घरून करू शकता.

शिक्षणाचं कार्य

सध्या कोरोनामुळे तुम्ही अनुभवलेच असेल की अनेक शाळांनी ऑनलाइन एज्यूकेशन सुरू केले. त्यामुळे शिक्षकांना आपले कार्य घरातूनच करावे लागत आहे. स्कूल आणि कॉलेजमध्ये असे विद्यार्थीही आहेत, ज्यांना कोच किंवा ट्यूटरची गरज असते. आजकाल तर डिस्टेंस एज्युकेशन किंवा कोरस्पोंडेंस कोर्सचे बरेच चलन चालू आहे, ज्यामुळे या क्षेत्रातही वर्क फ्रॉम होमच्या बऱ्याच संधी आहेत.

लेखक किंवा संपादक

लिहिणे, संपादन किंवा प्रुफरिडींगचे काम विशेषकरून वेबसाठी घरून करू शकतात. जर लिहिण्याची माहिती नसेलही तरी ब्लॉगस्फेयर जॉईन करू शकता. यात मजा ही आहे आणि पैसा ही. दुसऱ्यांच्या ब्लॉगसाइटवर लिहूनही कमाई केली जाऊ शकते.

फ्रेंचाईजी

जर बिझनेसची काही मूलभूत माहिती असेल आणि काही रक्कम गुंतवू शकत असाल तर एखाद्या कंपनी किंवा शिक्षण संस्थेची फ्रेंचाइजी घेऊन घरातून हे काम करू शकता.

बुद्धिबळाचा कोच

जर चेस जाणत असाल तर कंप्युटर आणि इंटरनेटवर स्काइपने घरी बसून मुलांना चेस शिकवू शकता. परदेशात राहणारी अनेक भारतीय मुले चेसची कोचिंग घेऊ इच्छितात. यासाठी प्रति तास चांगली रक्कम मिळते.

वर्क फ्रॉम होमचे फायदे

* आपण मुलांना आणि कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकता, विशेषकरून जेव्हा मुलं लहान असतील तेव्हा हे जास्तफायदेशीर ठरते.

* हा सेवानिवृत्त व्यक्तिंसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत आहे.

* अशा महिला ज्यांच्या पतींच्या बदल्या होत असतात, त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम चांगला पर्याय आहे.

* दिव्यांग त्यांच्या सोयीनुसार आणि क्षमतानुसार घरून काम करू शकतात.

* आपल्याला सकाळी-सकाळी उठून तयार होऊन निश्चित वेळेस ट्रेन किंवा बसने किवा स्वत: ड्राइव्ह करून ऑफिसला जायची गरज नाही. महिलांसाठी वर्क फ्रॉम होम अजून जास्त फायदेशीर आहे. त्यांना रोज मेकअप करायची गरज भासणार नाही. वार्डरोबमध्ये कमी कपडे असून देखील काम भागेल.

* आपण आपल्या कामातून ब्रेक घेऊन घराची इतर कामेही करू शकता.

* जर आपण स्वत: शिस्तबद्ध असाल आणि कुटुंबातील इतर सदस्य आपल्या कामाचे महत्व जाणून असतील, तर आपण हे करू शकतात.

* आपण आपल्या घरचे भोजन खाता. बाहेर काम करताना नेहमी कँटीन किंवा रेस्टारेंटमध्ये खावे लागते, ज्यावर खर्च होत असतो. वर्क फ्रॉम होम केल्याने पैशाच्या बचतीबरोबरच घराचे आरोग्यवर्धक भोजनही मिळते.

* ऑफिस भाडे आणि कर्मचाऱ्यांवर होणारे व इतर खर्च लाईट, एयर कंडिशनर, वाहन भत्ता, दुर्घटना विमा इत्यादींची बचत होते.

* घरातून काम करणाऱ्या उपकरणांवर होणाऱ्या खर्चावर आय करातून सूट घेऊ शकता.

* ऋतुमानाचा त्रास सहन करावा लागत नाही. पाऊस, उन्हाळा किंवा हिवाळा यांचा सामना करावा लागत नाही.

वर्क फ्रॉम होमचे नुकसान

परंतू वर्क फ्रॉम होमचे काही नुकसानही आहेत :

* आपण इतरांशी पुरेसे आणि थेट संवाद साधण्यापासून वंचित राहता.

* टीव्ही, किचन आणि गृहिणी आपले लक्ष्य कामावरून विचलित करू शकतात.

* आपल्या व्यावसायिक पद्धती आणि कौशल्ये योग्यरित्या विकसित होत नाहीत.

* जर आपण वर्क फ्रॉम होममध्ये शिस्तबद्ध राहून काम करत नसाल तर त्यामुळे आपण जास्त सुखासीन होऊ शकता.

* ऑफिसमध्ये काम करताना तेथे कंप्युटर वगैरेमध्ये काही बिगाड झाल्यास लगेच सपोर्ट मिळून जातो, पण वर्क फ्रॉम होममध्ये तसे शक्य नसते.

* स्पर्धेच्या भावनेची कमतरता असते. कुठल्याही व्यवसायात उत्तम प्रदर्शनासाठी स्पर्धा चांगली असते.

* कधी-कधी बॉस हेही समजू शकतो की आपल्याशी घरी कुठल्याही वेळेला संपर्क केला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला नको असलेल्या वेळेला पण बॉसच्या सूचना ऐकाव्या लागतात.

* एकटेपणाचा अनुभव होतो. ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांशी काही व्यक्तिगत चर्चा होत असते पण वर्क फ्रॉम होममध्ये हे शक्य नसते.

* आपण आपल्या शैलीनुसार काम करत असता. आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून काही शिकण्याची संधी मिळत नाही.

ही उपकरणे खूप उपयोगी आहेत

* पूजा भारद्वाज

आजकाल बाजारात स्वयंपाकघरातील अशी विविध उपकरणे उपलब्ध आहेत, जे काम सुलभ करतात आणि आपला वेळ वाचवितात, ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकता. तर या वेळी दिवाळीला उपकरणांची शॉपिंग करण्यापूर्वी या उपकरणांवर एक नजर टाकूया :

स्लो कुकरमध्ये बनते चवदार अन्न

स्लो कुकर हा महिलांसाठी एक वरदान आहे, जो अन्न अतिशय सोयीस्कर पद्धतीने तयार करतो. आजकाल मार्केटमध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल स्लो कूकर उपलब्ध आहेत. आपण एकाच वेळी ट्रिपल स्लो कुकरमध्ये ३ डिशेस बनवू शकता आणि आपला बराच वेळ वाचवू शकता. जर वेळे बाबत म्हणाल तर यात अन्न शिजण्यासाठी सुमारे ४ ते १० तासांचा वेळ लागतो, परंतु या धीम्या प्रक्रियेमुळे अन्नाची चव वाढते. एलपीजीपेक्षा इलेक्ट्रिक स्लो कूकर अधिक सुरक्षित असतात. ते अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहेत की आपण प्रत्येक प्रकारचे अन्न शिजवू शकाल.

स्लो कुकर आपल्या सर्व स्वयंपाकाच्या गरजा पूर्ण करतो. हा व्हर्सेटाइल आहे आणि त्यात बरीच फीचर्स आहेत आणि हा पोर्टेबल आहे. याला हाताळणे खूप सोपे आहे. याला मल्टीफंक्शनल वापरासाठी डिझाइन केलेले आहे, जे हे सूचित करते की त्याची दीर्घकाळ चालण्याची क्षमता आहे आणि त्यात सुमारे ४.५४ लिटरची क्षमता आहे. यास स्टील, एबीएस आणि सिरेमिकपासून बनविलेले आहे. त्यात अॅडजेस्टेबल नॉब असते, ज्यापासून तापमान नियंत्रित केले जाते.

काम सुलभ बनवणारे ज्युसर

ज्युसर हे एक स्वयंपाकघराचे परिपूर्ण उपकरण आहे, परंतु आपल्याकडे कोणत्या प्रकारचे ज्युसर असावे, हे आपण त्याचा किती वापर कराल यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तसे मार्केटमध्ये २ प्रकारचे ज्युसर उपलब्ध आहेत – पहिला सॅन्ट्रिफ्यूगल आणि दुसरा मॅस्टीकेटिंग ज्युसर, ज्यांना कोल्ड प्रेशर आणि स्लो ज्यूसरदेखील म्हटले जाते. या दोघांमधील फरक एवढाच आहे की त्यांची रस काढण्याची पद्धत भिन्न आहे. सॅन्ट्रीफ्यूगल ज्यूसर हा एक खूपच सामान्य ज्युसर आहे आणि तो अधिक परवडणारादेखील आहे, तर मॅस्टीकेटिंग ज्युसर सॅन्ट्रीफ्यूगल ज्युसरपेक्षा अधिक कार्यक्षम आणि महागदेखील आहे. जर आपण स्वत:साठी एक ज्युसर विकत घेऊ इच्छित असाल तर आपल्याला सांगावेसे वाटते की ज्यूसरची रचना जितकी साधी असेल तो तितकाच चांगला असेल, कारण त्याचे फीचर्स जितके अधिक जटिल असतील तितक्याच आपल्याला अधिक अडचणी येतील.

ज्युसर विकत घेताना त्याच्या वेगाकडे विशेष लक्ष द्या, त्याचबरोबर साफसफाईची वेळ, फीडिंग ट्यूब, प्लप कंटेनर, सेफ्टी स्विच, ड्रिप स्टॉप पॉड इत्यादीकडेही लक्ष द्या, जेणेकरुन जेव्हा तुम्ही त्याचा वापर कराल तेव्हा तो तुमचे काम वाढवणार नाही, तर सोपे करेल.

ब्लेडिंग झाली सोपी

हँड ब्लेंडर काही मिनिटांत ब्लेंड, व्हिस्क आणि चर्न करण्याची प्रक्रिया सुलभ करते. जेव्हा आपल्याला स्मूदी, शेक आणि सूप्स बनवायचे असतील तेव्हा हँड ब्लेंडर सर्व प्रथम आठवते, जे आपल्या कार्यास त्वरेने हाताळते. याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते व्हेरिएबल स्पीड कंट्रोलसह आहेत. आपण वेगवेगळया खाद्य पदार्थांचे मिश्रण करत स्विचद्वारे त्याचा वेग सहजपणे नियंत्रित करू शकता. एकीकडे हँड ब्लेंडरची स्टेनलेस स्टील बॉडी त्याचा टिकाऊपणा वाढवते तर दुसरीकडे त्यास गरम आणि कोल्ड फूडचे मिश्रण करण्यासाठी उत्कृष्ट उपकरणदेखील बनवते. यामध्ये ४०० पॉवरपर्यंतची मोटर वापरली जाते, ज्यामुळे चिरणे, मिश्रण करणे आणि कोशिंबीरी बनवणे सोपे होते. त्याचबरोबर लहान असल्यामुळे त्यास ठेवणे देखील सोपे होते.

किटली काही मिनिटांत उकळवते पाणी

ही इलेक्ट्रिक किटली एक अतिशय सोयीस्कर स्वयंपाकघरातील उपकरण आहे आणि तिचे नवनवीन फीचर्ससह वेगवेगळे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आजकाल कॉर्डलेस किटलीचा वापर खूप केला जात आहे, तिच्यासह एक स्वतंत्र बेस युनिट आहे. जर आपणास त्यांच्या क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास तर सरासरी एक किटली १.४ ते १.८ लिटरपर्यंत पाणी सामावू शकते.

या किटल्या सुमारे २.१ किलोवॅट ते २.९ किलोवॅट क्षमतेच्या श्रेणीत येतात, तथापि उच्च वॅट क्षमतेच्या किटल्या अधिक शक्तिशाली असतात आणि पाणी लवकर उकळवतात. तिच्या ३६० डिग्री बेसद्वारे आपण तिला कोणत्याही प्रकारे ठेवू शकता. तिच्यात लपलेल्या कंसिल्ड एलिमेंटमुळे तिला साफ करणेदेखील सोपे आहे. किटलीत कमी पाणी असल्यास तिचा बॉयल प्रोटेक्शन सावधान करतो. काही किटल्या अशाही आहेत, ज्या अॅडजेस्टेबल तापमानासह येत आहेत.

आता लवकर भात शिजवा

राईस कुकर एक असे स्वयंपाकघरातील उपकरण आहे, जे केवळ सोयीस्करच नाही तर सुरक्षित, हलके व पोर्टेबलदेखील आहे. बाजारात तुम्हाला स्टीमर आणि स्टीमरशिवाय राईस कुकर मिळतील, जे तुमच्यासाठी झटापट भात बनवतील. जर आपणास या कुकरच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास तर ते लहान, मध्यम, मोठया आणि जंबो आकारात बाजारात उपलब्ध आहेत. काही राईस कुकरमध्ये नॉनस्टिक आतील भांडेदेखील असतात, ज्यामध्ये तळणेदेखील शक्य होते.

त्यास साफ करणेदेखील सोपे असते. त्यावर पारदर्शक झाकण असते. काहींबरोबरच आपणास एक स्टीमिंग बास्केटदेखील मिळते, जी इडली, बटाटे, मका, भाज्या वाफवायचे काम करते. तसेच, या स्टीमिंग बास्केटचा उपयोग स्ट्रेनर्स/कोलँडर म्हणूनदेखील केला जाऊ शकतो. काहींसोबत मॅटल ट्रे देखील उपलब्ध होतात.

इन्सुलेटेड हँडल हे यामधील सर्वोत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्य आहे, ज्याला धरून आपण कूकर कोणत्याही दिशेने फिरवू शकता. त्याच्या मेनूमध्ये अनेक स्वयंपाकाचे पर्याय उपलब्ध आहेत. एकंदरीत राईस कुकर आपल्यासाठी फायदेशीर सौदा आहे, कारण यामुळे आपला वेळ आणि शक्ती दोन्हीची बचत होते आणि स्वयंपाक करणे सुलभ होते.

फूड प्रोसेसर करी एकाच वेळी बऱ्याच गोष्टी

फूड प्रोसेसर हलकी किचनची कामे करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत. जसे की कापणे, चिरणे, मिश्रण करणे, शुद्ध करणे इ. फूड प्रोसेसरची मोटर इतकी शक्तिशाली असते की ती अशी कामे काही मिनिटांत हाताळू शकते. आपण एखादा फूड प्रोसेसर घेत असाल तर किमान ६०० वॅटची मोटार बसविलेला फूड प्रोसेसरच खरेदी करा. या व्यतिरिक्त त्याच्या क्षमतेवर आणि वजनाकडेही लक्ष द्या, तसेच त्याच्यासोबत येणारे भांडे आणि ब्लेडच्या आकाराकडेही अवश्य लक्ष द्या.सोसाइटी मराठी आर्टिकल

अमावस्येच्या नावावर अंधश्रद्धेचा विळखा

* श्रीमती प्रतिभा अग्निहोत्री

उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या जवळ असलेल्या ५२ कुंडांत वर्षातून दोनदा सोमवती अमावस्या आणि शनिचरी अमावस्या यादिवशी खूप गर्दी असते. इथे अशी अंधश्रद्धा आहे की इथे स्नान केल्याने भूतप्रेत, हडळ, पिशाच या बाधांचा नाश होतो.

१७ मार्च, २०१८ रोजी शनिचरी अमावस्येची मी प्रत्यक्षदर्शी होते. मी इथे फार विचित्र घटना घडताना पाहिल्या. सादर आहे त्यावरचा हा रिपोर्ट.

दृश्य १

एका २५ वर्षीय नवयुवतीला तिचे कुटुंबीय जबरदस्तीने पाण्यात बुडी घ्यायला भाग पाडत होते. त्यांच्यासोबत असलेला तांत्रिक त्यांना मार्गदर्शन करत होता पण ती युवती जोरजोरात ओरडत होती, ‘‘मला सोडा, मी या पाण्यात स्नान करणार नाही. किती घाणेरडा वास येतोय पहा या पाण्यातून. मला काहीही झालेले नाही. मी आजारी आहे… काही भूतप्रेत वगैरे नाही… प्लीज मला सोडा.’’

त्या नवयुवतीचे बोल ऐकून त्यांच्यासोबत आलेला पंडित म्हणाला, ‘‘फारच जबरदस्त आणि वयस्कर हडळीचा हिच्यावर प्रभाव आहे, जराही कमजोर पडू नका. स्नान करायला लावा. त्यानंतर मी सर्वकाही ठीक करीन.’’

पंडिताच्या सांगण्यावरून घरातील मंडळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बुडी मारायला भाग पाडण्यात व्यस्त झाले आणि तांत्रिक आपल्या तंत्रमंत्राच्या पूजेत व्यस्त झाला. घरातील मंडळी दानदक्षिणा तयार करू लागले.

दृश्य २

एका ३० वर्षीय महिलेला तिच्या घरातले लोक महागडया गाडीतून घेऊन येतात. हसतमुख, सर्वसामान्य दिसणाऱ्या त्या महिलेकडे पाहून कोणाला वाटणारही नाही की तिला काही त्रास असेल. परंतु जशी तिने कुंडात बुडी घेतली आणि पाण्यातून बाहेर आली, तेव्हा तिचे संपूर्ण केस मोकळे होते आणि मग ती जोरजोरात ओरडायला लागली.

तिच्याबरोबर आलेला तांत्रिक मोठमोठया मोत्यांच्या माळा परिधान केलेल्या त्या महिलेच्या तोंडावर काळा कपडा टाकून मंत्र म्हणत त्या महिलेचे केस पकडून मोठया आवाजात तिला विचारतो,

‘‘बोल, कोण आहेस तू? का त्रास देत आहेस?’’

‘‘मी याची शेजारीण आहे, जिचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला होता,’’ महिलेच्या आतील भूत उत्तर देते.

‘‘बोल तू का त्रास देत आहेस?’’

‘‘आता त्रास देणार नाही पण मला वचन हवे.’’

‘‘बोल काय?’’

‘‘सासरची माणसे मला चक्की चालवायला लावणार नाहीत, मला शेतावर पिकाची कापणी करायला पाठवणार नाहीत, नवरा माझ्यावर हात उगारणार नाही.’’

‘‘होहो, आम्हाला सर्व गोष्टी मंजूर आहेत. तू फक्त हिचा पिच्छा सोड,’’ सासरची माणसे हात जोडून घाबरलेल्या स्वरात उत्तर देतात.

‘‘बस, यापुढे मी त्रास देणार नाही.’’

यानंतर काही वेळातच ती महिला एका सर्वसामान्य महिलेसारखी वागूबोलू लागते. तांत्रिक आपली तगडी फी वसूल करून तिथून निघून जातो.

दृश्य ३

एका ३५ वर्षीय युवकाला घेऊन काही पुरुष आलेले असतात. त्याला पकडून जबरदस्ती कुंडात बुडी घ्यायला लावत असतात. जसा तो युवक कुंडातून बाहेर येतो जोरजोरात आरडाओरडा आणि विचित्र आवाज काढायला लागतो. तांत्रिक जवळच शेणी जाळून मंत्रोच्चार करत काही गोष्टी आगीत टाकत असतो. युवक तांत्रिकावरच हमला करण्यास सज्ज झालेला असतो. तेव्हा तांत्रिक त्याच्या पाठीवर दांडयाने ३-४ वेळा प्रहार करतो आणि मानगूट पकडून म्हणतो, ‘‘बोल, आता याला त्रास देशील?’’

‘‘मला सोडा. मी आता काहीही करणार नाही.’’

तांत्रिक त्याला सोडून देतो आणि तो युवक हार मानून बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो.

तांत्रिक युवकाच्या कुटुंबीयांना सांगतो, ‘‘तुम्ही एकदम निश्चिंत होऊन घरी जा.’’

हिंदू पाखंडयांचा खुला खेळ

ही तिन्ही दृश्ये सर्वसामान्य जनतेत पसरलेल्या अंधश्रद्धेची साक्षात उदाहरणे आहेत. कशाप्रकारे आम्ही भारतीय काल्पनिक,अविश्वसनीय समजुती आणि कल्पनांवर विश्वास ठेवतो. तांत्रिक आणि भोंदूबाबांद्वारे कशाप्रकारे भोळयाभाबड्या जनतेला आपल्या सापळयात ओढले जाते याचेही साक्षात उदाहरण आहे.

अशा प्रकारच्या तांत्रिकांच्या फसवणुकीचे बळी झालेले माझे एक परिचित आपल्या सोबत घडलेली घटना अशी सांगतात :

‘‘माझी १४ वर्षीय लहान बहीण एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. तिचे हातपाय थरथर कापत होते आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. तोंडातून आवाजही येत होते. काही वेळाने तिच्या तोंडावर पाण्याचे हबकारे मारल्यावर ती ठीकही झाली. पण हे पुन्हा पुन्हा होऊ लागले. एकदा माझ्या गावी राहणाऱ्या मावशीसोबतही असेच झाले होते. मावशीने हा प्रेतात्म्याचा प्रभाव आहे असे सांगितले आणि माझ्या आईवडिलांना अनेकदा तांत्रिकाकडे जायला लावले.

तांत्रिक प्रत्येक वेळी आपली तगडी दक्षिणा घेत असे आणि पुढच्या वेळेस पूर्ण बरी होईल असे आश्वासन देत असे. पण सतत २ वर्षे जाऊनही काहीच परिणाम होत नव्हता. माझ्या बहिणीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होऊ लागली होती. एक दिवस आमच्या लांबच्या नात्यातील एक डॉक्टर आमच्या घरी आली असता ती बहिणीला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेली.

‘‘डॉक्टरांनी आकडी येण्याचा आजार आहे असे निदान केले आणि पुढे बरेच दीर्घ उपचार करून माझी बहीण पूर्णपणे ठीक झाली.’’

वरती सांगितलेल्या दृश्य २ प्रमाणे ग्रामीण महिलांचे जिथे अत्याधिक शोषण केले जाते, त्या या भूताप्रेताचा आपल्या काम न करण्याचे शस्त्र म्हणूनही वापर करतात, कारण सर्वसाधारणपणे त्यांचे सासरच्या मंडळींसमोर काही चालत नाही, पण भूतप्रेतांमुळे त्यांची प्रत्येक गोष्ट सहज स्वीकारली जाते.

तांत्रिक नाही डॉक्टरची गरज

मानसशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ समुपदेशक राकेश डांगी यांच्या मते, ‘‘वास्तविक हे भूतप्रेत नाही, पण माणसाच्या मेंदूत खोलवर रुतून बसलेला हा एक भ्रम आहे. त्यांच्या याच भ्रमाला कुटुंबीयांकडून भूतप्रेत आणि पिशाच अशाप्रकारे प्रस्तुत केले जाते तेव्हा त्या व्यक्तिच्या मनातही मग हीच धारणा निर्माण होते.

‘‘जेव्हा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते अज्ञानापायी तांत्रिक आणि पंडितपुजाऱ्यांकडे जातात, तेव्हा ते आपल्या कमाईसाठी भूतप्रेत बाधा झाली आहे याचे समर्थनच करतात. ज्यामुळे हा समज अधिकच पक्का होतो. खरंतर या प्रकारच्या सर्व व्यक्ती या मानसिक आजारांच्या शिकार असतात. आणि त्यांना कुठल्याही तांत्रिकाची नव्हे तर मनोचिकित्सकाची गरज असते.’’

अमावस्येच्या दिवशी अशाप्रकारची भयानक दृश्ये पाहून माझ्या अंगावर तर काटाच उभा राहिला. सर्वसामान्य जनतेचे अज्ञान आणि अंधश्रद्धा याचा फायदा घेण्यासाठी तांत्रिकांद्वारे रचला गेलेला हा एक असा सापळा आहे, ज्यातून बाहेर पडण्यासाठी माणसाला भ्रमासारखी भावना आपल्या मनातून बाहेर करता आली पाहिजे. आपल्या तर्क शक्तीचा विकास करून स्वस्थ मानसिकता विकसित करावी लागेल नाहीतर अशा प्रकारच्या अमावस्या वर्षानुवर्षे आपला प्रभाव दाखवत राहतील.

जोपर्यंत हिंदू धर्माच्या रक्षणाच्या नावावर त्यातील साऱ्या चुकीच्या धारणांचे विज्ञान संमत प्रयत्न सुरू राहतील, यापासून सुटका मिळणे अशक्य आहे. सध्या मात्र जनतेचा पैसा जोरजबरदस्तीने या अंधश्रद्धेच्या प्रचारावर वाया जात आहे आणि देशाच्या तार्किक विचारसरणीला चिरडले जात आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें