Diwali Special: दिवाळी पार्टी मेकअप

* शैलेंद्र सिंह

दिवाळीच्यादिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. अशा परिस्थितीत मेकअपदेखील काही विशेष असावे. वयापेक्षा तरुण दिसण्याची ही वेळ असते म्हणजेच मेकअप असा असावा की चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करेल आणि अधिक चांगला लुक देईल. योग्य मेकअप उत्पादनांचा योग्य प्रकारे वापर केल्यास चेहऱ्याचा तरूण लुक परत येईल आणि आपण वयापेक्षा तरुण दिसू लागाल.

विग्रो मेकअप स्टुडिओची सौंदर्य तज्ज्ञ कविता तिलारा म्हणते, ‘‘मेकअप त्वचा आणि चेहऱ्यानुसार चांगला केला असेल तरच मेकअप चांगला दिसेल. मेकअपचा अर्थ खूप डार्क लिपस्टिक लावणे, पातळ भुवया असणे आणि जाड फाउंडेशन लावणे नसतो. मेकअप चेहऱ्याचे सौंदर्य उजळवण्याच्या आणि उणीवा लपवण्याच्या कलेचे नाव आहे. वयाचा परिणाम प्रथम चेहऱ्यावर दिसून येतो. म्हणून, त्यास मेकअपने कमी करणे योग्य अर्थाने खरे मेकअप आहे असे म्हणतात. उत्सवाचा मेकअप काहीसा असा असावा, जो आपल्याला वेगळा दाखवेल.’’

चला, जाणून घेऊया कविता तिलाराकडून काही खास मेकअप टीप्स :

ब्लशर देई ताजेपणा

ब्लशर केवळ तरुण दिसू इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठीच आवश्यक नाही तर त्या तरुणींकरितादेखील आवश्यक आहे, ज्या वयाने लहान आहेत. ब्लशर ताजेपणाने चेहरा भरतो. यासाठी ब्लशरचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. गालांच्या उठलेल्या हाडांवर ते लावा. ब्रशच्या मदतीने गोल फिरवत केशरचनेकडे नेत हलक्या हाताने लावा. याने कोणतेही पट्टे तयार होणार नाहीत. पीच पिंक सर्वोत्तम रंग आहे. गालांचा टांगता लुक लपविण्यासाठी, गालांच्या हाडांवर पांढरा शिमरी शॅडो वापरा. ग्लो करणारा मेकअप चांगला दिसतो परंतु त्यात गुळगुळीतपणा नसावा.

स्मितहास्य सुंदर बनवणारे ओठ

ओठांची त्वचादेखील वयानुसार बदलते. यामुळे लहान वयात आपल्याला ग्लॅमरस बनवणारा लिपस्टिकचा रंग उतारवयात खराब दिसू लागतो. हिवाळयाच्या हंगामात ओठांवर बनणारा पापुद्रा ओठांची लिपस्टिक खराब करतो.

गुलाबी पेस्टल किंवा पारदर्शक मॉइश्चरायझिंग लिपस्टिक ओठांवर एक वेगळा लुक देईल. ती अधिक डार्क करू नका, फक्त १ कोट लावा. यासह ओठ नैसर्गिक दिसतील. जर ओठ गुलाबी रंगाचे नसतील, ते ताजे दिसत नसतील तर पारदर्शक लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस वापरू नका. गुलाबी रंगाच्या लिपस्टिकवर लिप ग्लॉस वापरणे चांगले राहील.

दिवाळीच्या वेळेस सभोवताली चमकणारे दिवे असतात. अशा वेळी, खालच्या ओठाच्या मध्यभागी असलेल्या पट्टयांमध्ये लिप ग्लॉसची रेघ ओढा. जेव्हा यावर प्रकाश पडेल तेव्हा आपले स्मितहास्य एक वेगळयाच शैलीत दिसेल.

आय मेकअप डोळयांना मादक बनवी

आय मेकअपमध्ये स्मोकी लुक हा नेहमीच हॉट ट्रेड मानला जातो. मेकअपमध्ये काही बदल करून स्मोकी डोळयांना चमकदार बनवले जाऊ शकते. योग्य आय मेकअपसाठी डोळयांच्या वरच्या पापण्या खालच्या पापण्यांपेक्षा नेहमी गडद असाव्यात. यासाठी पातळ टोकाचे आयलाइनर ब्रश वापरा. स्मोकी डोळयांना चमकदार बनवण्यासाठी खालच्या आयलॅशेजवर मोती रंगाच्या ब्रांझ लिपग्लॉसला आयलाइनर ब्रशने लावा. बोटाच्या सहाय्याने डोळयांवर लिप ग्लॉसदेखील लावता येते. याचा काळजीपूर्वक वापर करा. हे डोळयांच्या आत लागता कामा नये.

डोळे अधिक सुंदर दिसतील जेव्हा पापण्यांचे केस दाट असतील. त्यांना दाट दिसण्यासाठी त्यांच्या मुळांपर्यंत मस्करा लावा. मस्करेचा दुसरा कोट खूप हलका असावा. जर आयलॅशेज दाट असतील तर त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही.

खास बनवणारी हेअरस्टाईल

परिपूर्ण मेकअपनंतर, हे खूप महत्वाचे आहे की आपली केशरचनादेखील अशी असावी की ती पाहिल्यावर लोक वाह-वाह करतील, सणानुसार केशरचना बनविणे चांगले. जर आपण दिवसा कोठे तरी जात असाल तर आपले केस बांधा किंवा साधी केशरचना करा. जर तुम्हाला फडफडणाऱ्या केसांनी संध्याकाळच्या पार्टीत जायचे असेल तर केस कंडिशन केलेले असणे आवश्यक आहे. आपण यामध्ये हलकी केशरचनादेखील बनवू शकता. आपणास काही खास दिसावयाचे असल्यास काही काळ केसात रोलर लावा. रोलर काढून टाकल्यानंतर हेयर स्प्रेने केस सेट करा.

पार्टी जबरदस्त आणि विशेष असेल तर केस खुले ठेवू नका. यामुळे आपण लवकर थकल्यासारखे दिसू लागाल. नवीन स्टाईलमध्ये आपले केस सजवा. वेणी, जुडा किंवा हेयर क्लिपच्या सहाय्याने केस बांधा. बांधलेले केस चेहरा सुंदर आणि ताजेतवाने करतात. फ्रेंच प्लेट किंवा फ्रेंच जुडा फेस्टिव्हलमध्ये आपल्याला भिन्न शैलीमध्ये दर्शवेल.

मनाला लुटणारी नखे

जर आपण पार्टीत इतरांपेक्षा वेगळे दिसू इच्छित असाल तर आपण नेल आर्ट वापरू शकता. आपल्या हातावर किती लांब नखे चांगले दिसतात याची काळजी घेतल्यानंतरच नेल आर्ट वापरा. योग्य आकारात नखे आणल्यानंतर आवश्यकतेनुसार आतमध्ये खोटया नखांसह चिकटला जाणारा पदार्थ घ्या. पांढरा नेल पेंट लावल्यानंतर त्यास कोरडे होऊ द्या. यानंतर आपल्याला इच्छित नेल आर्ट डिझाइन लागू करा.

समोरून रुंद असलेली नखे खूप पसंत केले जातात. हे कमी तुटतात. यांचा सपाट लुक चांगला दिसतो. त्यांना आकार द्या आणि समोरून अंडाकृती बनवा. न्यूड नेल्स आपल्याला फॅशनची एक वेगळी शैली देतील. हातांप्रमाणेच पायांच्या नखांनादेखील योग्य काळजी आणि मेकअपची आवश्यकता आहे.

यासाठी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करा. यानंतर नखांवर पारदर्शक नेलपोलिश लावा. आपण आपल्या त्वचेच्या टोनशी जुळणारी नेल पॉलिश वापरल्यास हे चांगले होईल.

सुगंध, जो उन्मत्त करतो

उत्सवाच्या हंगामात हवामान गुलाबी असल्यामुळे घाम कमी येतो. यानंतरही आपल्या सभोवतालच्या लोकांना आपला सुगंध लक्षात आला पाहिजे. यासाठी आपल्या आवडीचा परफ्यूम वापरा.

सणाच्या पार्टीसाठी वुडी किंवा ओरिएंटल सेंट वापरा. हलका सुगंध असणाऱ्या परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकतो. परफ्यूमशिवाय यूडी टॉयलेट आणि यूडी क्लोनदेखील वापरू शकता.

यूडी क्लोनमध्ये आवश्यक तेल ४ टक्के आणि यूडी टॉयलेटमध्ये ८ टक्के असते. ते हलक्या सुगंधात येतात, ज्यामुळे ते २ तास प्रभाव ठेवतात. हे परफ्यूम स्प्रे आणि बाटली दोघांमध्ये येतात. यूडी परफ्यूममध्ये आवश्यक तेल २० टक्क्यांपेक्षा जास्त असते. त्याचा सुगंध ३-४ तासांपर्यंत टिकतो. अत्यावश्यक तेल जास्त असल्यामुळे याची किंमतही जास्त असते. बॉडी परफ्यूम शरीराचे उबदार बिंदू म्हणजे मान आणि मनगटांवर लावावे.

Festival मध्ये हेअर स्टाईलही असावी खास

* भारती तनेजा, डायरेक्टर, एल्प्स क्लिनिक

सणाचे वातावरण आहे आणि त्यात कसे दिसावे, हे आधी ठरवलेच जाते. आपला लुक खास असेल तर तो सणही खास बनून जातो. महिला आपले कपडे आणि दागिन्यांबाबत जागरूक असतात. त्याचप्रमाणे, पेहरावानुसार मेकअप आणि हेअर स्टाईलबाबत खास प्लान करतात. कारण सणांना खास बनविण्यासाठी ड्रेसिंग सेंस आणि मेकअपबरोबरच हेअर स्टाईलचीही महत्त्वाची भूमिका आहे.

मग या सणाच्या काळात आपल्या खास लुकसाठी आपली हेअर स्टाईल कशी असावी, या जाणून घेऊ :

सेंटर पफ विथ स्ट्रीकिंग

सर्वप्रथम प्रेसिंग करून केसांना स्ट्रेट लूक द्या आणि मग समोरच्या मधल्या केसांना घेऊन पफ बनवा. पफच्या चारही बाजूला वेगळया कलरचे हेअर एक्स्टेंशन लावा. हेअर एक्स्टेंशनला केसांमध्ये मर्ज करत एका साइडला ट्विस्टिंग रोल वेणी घाला.

सेंटर वियर फॉल

सर्वप्रथम केसांना प्रेसिंग मशिनच्या मदतीने स्ट्रेट करा. मग साइड पार्टिशन करत समोरच्या केसांतून एका साइडचे फ्रेंच बनवा आणि वेणी मोकळया केसांच्या दिशेने घाला. पेहरावानुसार वेणीला बीड्स किंवा एक्सेसरीज लावा. ही हेअर स्टाईल आपल्याला खूप एलिगंट लुक देईल.

सॉफ्ट कर्ल

केसांचे साइड पार्टिंग करा. मग समोरचे काही केस सोडून मानेपेक्षा उंच पोनी बनवा. सर्व केस कर्लिंग रॉडने कर्ल करा. फ्रंटच्या सोडलेल्या केसांना ट्विस्ट करत बॅक साइडला नेत पिनअप करा. पोनीवर फॅदर किंवा मग आपली आवडती हेअर एक्सेसरीज लावा. हे केस चेहऱ्यावर येऊ नयेत यासाठी साइड पार्टीशन करून कोणताही सुंदरसा क्लिप लावू शकता.

या सर्व हेअर स्टाईल आपल्या लुकमध्ये सुंदर बदल घडवून आणतील. त्याचबरोबर आपले व्यक्तिमत्त्वही खुलून दिसेल.

५ Festive मेकअप लुक्स

* इशिका तनेजा, डायरेक्टर, एल्पस ब्यूटी क्लिनिक

सणावारांच्या दिवसांत एक आगळीच मौज असते. यावेळी मन हर्ष उल्हासाने भरलेले असते. या आनंदात अजून भर तेव्हा पडते, जेव्हा न बोलता एखाद्याचे डोळे बरेच काही सांगून जातात. जेव्हा कोणाला तरी पाहून वाटते की चांदण्या हे सौंदर्य सजवण्यासाठीच आसमंतातून निखळून पडल्या आहेत. काही ओठांवर काही पापण्यांवर येऊन विसावल्या आहेत. हेच ते सौंदर्य आहे, जे इतरांपेक्षा वेगळे उठून दिसते.

जर तुम्हालाही सणांच्या या दिवसांमध्ये इतरांपेक्षा वेगळे दिसायचे असेल तर या, जाणून घेऊया कि फेस्टिव्ह मेकअप लुकची माहिती म्हणजे या सण समारंभांच्या दिवसात तुम्ही मेकअप करून बाहेर पडलात तर लोक तुमच्याकडे पाहातच राहतील.

सॉफ्ट लुक

पारंपारिक सण असो किंवा सणांच्या निमित्ताने असलेली थीम पार्टी, सॉफ्ट गर्लिश लुक प्रत्येकप्रसंगी सुंदर दिसतो. या लुकसाठी तुम्ही लाईट पिंक शेडचा वापर करू शकता.

स्टेप-१ : चेहऱ्यावर सुंदर इफेक्ट दिसून येण्यासाठी सुफलेचा वापर करा आणि गालांवर उठाव येण्यासाठी पिंक ब्लशऑन लावा.

स्टेप-२ : डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी पिंक आय शॅडो लावा आणि लोअर लॅशेजवर काजळ लावून स्मज करा. या ओव्हरऑल लुक कॉन्टस्ट करण्यासाठी ब्लू लायनर लावू शकता. पापण्यांना मसकारा लावून कर्ल करून घ्या.

स्टेप-३ : ओठांना पिंक शेड लिपस्टिक किंवा ग्लॉसचा वापर या पूर्ण मेकअप लुकला एक अनोखा टच देईल.

स्टेप-४ : आपल्या या लुकला हलकासा ट्रेडिशनल टच देण्यासाठी मेस्सी ब्रेड, फ्रेंच ब्रेड किंवा डच ब्रेड बनवू शकता. ब्रेडस् बनवण्यासाठी केसांना कलरफुल रिबीन किंवा एक्सटेन्शन लावून घ्या. स्टायलिश व फॅशनेबल ब्रेडस्मध्ये असे कलरफुल स्टे्रडस् शोषून दिसतील.

लाईट रेडिएंट

चहुकडे रोषणाई आणि उजळून टाकणाऱ्या प्रकाशाबद्दल बोलले जात असेल तर चेहऱ्यावरही याची एक झलक असणे गरजेचे आहे. या लुकमध्ये सर्व काही हलकेफुलके, ग्लॉसी व रेडिएंट दिसून येईल.

स्टेप-१ : परफेक्ट स्किन टोनसाठी लाईट बेस लावा.

स्टेप-२ : ड्रेसला मॅचिंग लाईट शेड डोळ्यांवर लावा व वरून व्हॅसलिनचा हलका टच द्या. लायनरऐवजी मसकाराचा डबल कोट लावा.

स्टेप-३ : चीकबोन्सना हायलाईट करण्यासाठी त्यावर व्हॅसलीन लावून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.

स्टेप-४ : लिपस्टिक लावा आणि वरून लिपबाम लावून त्यांना ग्लॉसी लुक द्या.

स्टेप-५ : केस स्टे्रट करून त्यांना मोकळे सोडू शकता. तुमच्या हेअरस्टाइलमध्ये थोडी स्टाईल अॅड करण्यासाठी समोरून फ्रिंज काढून टेंपररी हेअर चॉकने कलर करा. कारण सध्या कलरफुल फ्रिंजचा टे्रन्ड आहे.

विंग्ड आयलायनर आणि बोल्ड लिप्स

रेट्रो इराच्या अभिनेत्रींची नखरेल अदा या सणांच्या दिवसांत अनुभवायाची असेल तर हा लुक एकदम परफेक्ट आहे.

स्टेप-१ : डोळ्यांवर मेटॅलिक ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन किंवा कॉपर शेडने विंग्ड लायनर लावावे व वॉटर लाईनवर ब्लॅक आय पेन्सिलऐवजी व्हाईट पेन्सिल वापरावे. विंग्ड लायनरची ही खासायित आहे की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्वत:चा लुक लाईट किंवा लाऊड दाखवू शकता.

स्टेप-२ : चेहऱ्यावर क्लिअर लुकसाठी मूज व रोज टिंट दिसण्यासाठी ब्लशऑन जरूर लावा.

स्टेप-३ : बोल्ड लिप्स तुम्हाला आत्मविश्वास देतात. यात तुम्ही रेड, कोरल आणि हॉट पिंकसारखे फॅशनेबल शेड्स लिपस्टिक म्हणून निवडू शकता.

स्टेप-४ : केसांमध्ये फिशटेल किंवा रिवर्स फिशटेल बनवा. चमकत्या रात्रीची चमक केसांवरही येण्यासाठी पर्ल, स्वरोस्की किंवा नगजडीत स्टड्स वेणीच्या मधोमध लावू शकता.

एलिंगट सोशलाईट लुक

एखाद्या विशेष प्रसंगासाठी काहीशा वेगळ्या आणि शानदार मेकअपच्या शोधार्थ असाल तर एलिंगट लुकही तुमच्यासाठी योग्य निवड असेल. हल्ली याच मेकअपवर जास्त फोकस केले जाते.

स्टेप-१ : चेहरा फेसवॉशने धुतल्यानंतर थपथपवून कोरडा करा. मग एसपीएफयुक्त माइश्चरायजर लावा. यानंतर चेहऱ्याच्या रंगानुसार बेस लावा. व्यवस्थित ब्लेंड करा म्हणजे पॅचेस दिसणार नाहीत.

स्टेप-२ : आता डोळ्यांना डिफाईन करण्यासाठी त्यांच्या आतील कोपऱ्यातून लॅशलाईनच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत वन स्ट्रोक आयलायनर लावा. पापण्यांवर एकसारखे कॉपर आयशॅडो लावा. व्यवस्थित ब्लेंड करा. पापण्या अजून आकर्षक आणि दाट दिसाव्यात म्हणून मसाकाराचे परफेक्ट २ कोट लावावेत. मसकारा लावताना खाली पाहा आणि मसकारा ब्रश पापण्यांवर गोल फिरवत लावा. यामुळे प्रत्येक पापणीला मसकारा व्यवस्थित लागेल. एका ठिकाणी जमा होणार नाही.

स्टेप-३ : थोडा ग्लॅम टच देण्यासाठी त्याच शेडचा एक लिप बाम ओठांना लावा. यामुळे लिप कलर बराच वेळपर्यंत टिकून राहतो. हे अतिरिक्त चमक देईल, शिवाय गोल्डन स्पार्कल लिप्ससाठी ब्रोंज शिमर न्यूड लिप ग्लॉस लावावे.

स्टेप-४ : ओठ आकर्षक दिसण्यासाठी स्टॅन्डआऊट लिप बामने जाड आऊटलाइन बनवा. मधला भाग मोकळा ठेवावा. काही सेंकदांनी त्याच शेडने मधली जागा व्यवस्थित भरून घ्या.

स्टेप-५ : हा लुक पूर्ण करण्यासाठी नखांवर वेलव्हेट रोप नेल इॅनमल लावा.

स्टेप-६ : ब्लो ड्राय केल्यानंतर केस टोंगच्या सहाय्याने कर्ल करा. सर्व केस बोटांनी मागच्या दिशेला घेऊन क्लचरने बांधून टाका.

ब्रोंज क्रेज

डोळे आणि गालांवर केला जाणारा मेकअप स्टनिंग लुक देतो.

स्टेप-१ : चेहऱ्यावर बीबी क्रिम लावा आणि ब्लशऑन ऐवजी गालावंर ब्राउंजिंग करा. असे केल्याने तुमचा चेहरा पातळ दिसेल.

स्टेप-२ : ब्रोंज शेडच्या आयशॅडोने डोळ्यांना ब्रोंज टच द्या.

स्टेप-३ : डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यांवर ब्राऊन शेडने कंटूरिंग केल्यानंतर डोळ्यांखाली काजळ स्मज करून लावा. तुमच्या लुकला मॅक्सी लुक देण्यासाठी लायनर व मसकारा जरूर लावा.

स्टेप-४ :  ब्रोंजिंग शेडची लिपस्टिक लावून ओठांना स्टनिंग लुक द्या. केसांना सॉफ्ट कर्ल करवून घ्या. चेहऱ्यावर केस येऊ नये यासाठी साइड पार्टिशन करून एखादा सुंदर क्लिप लावून घ्या.

कलर स्मोकी

खऱ्या आणि फ्लॉलेस लुकसाठी स्मोकी मेकअपची चलती आहे.

स्टेप-१ : तुमच्या स्किनला फ्लॉलेस लुक देण्यासाठी टिंटिड मॉइश्चररायझर लावून घ्या. असे केल्याने स्किन मॉइश्चराईज्ड व स्किनटोन व्यवस्थित दिसून येईल.

स्टेप-२ : गालांवर पीच शेडचे ब्लशऑन लावा. सोबतच चीक्सवर हायलाइट करा.

स्टेप-३ : फॅशन आणि लेटेस्ट मेकअप मंत्रानुसार तुम्ही तुमच्या ड्रेस मॅचिंग कलरला डोळ्यांवर अॅड करून ब्लॅक आणि ग्रे शेडसोबत मर्ज करा. असे केल्याने तुमच्या डोळ्यांवर कलर स्मोकी लुक दिसून येईल.

स्टेप-४ : कारण आय मेकअप डार्क असेल तर अशा चेहऱ्यावर मेकअप बॅलेन्स करण्यासाठी ओठांवर लाईट शेड जसे की बेबी पिंक किंवा लाईट पीच रंगाची लिपस्टिक लावा.

स्टेप-५ : हल्ली मेस्सी लुक इन आहे. त्यामुळे तुम्ही केसांचा मेस्सी साइड लो बन घालू शकता. चेहऱ्यावर मेकअप लुक ऐवजी नॅचुरल लुक आणण्यासाठी बनमधून काही बटा काढाव्यात. असे केल्याने चेहऱ्यावर रिअल लुक दिसून येईल.

Festive Special : न्यूड मेकअप ट्रेंडमध्ये आहे

* आश्मीन मुंजाल

हे आवश्यक नाही की आपण केवळ संपूर्ण मेकअपसह सुंदर दिसाल. तुमचे सौंदर्य कमी मेकअपमध्येही सर्वांना आकर्षित करू शकते. न्यूड मेकअप तुमची त्वचा अगदी टोन ठेवतो, ज्यामुळे चेहरा उजळतो. तटस्थ मेकअप बेस, आपण अधिक सुंदर दिसेल.

गालांचा मेकअप

टोनर आवश्यक आहे :

आपला चेहरा फेस वॉशने धुवा, कॉटन बॉल टोनरमध्ये भिजवा आणि चेहरा पुसून टाका. मेकअप करण्यापूर्वी आवश्यक तेवढे फेस वॉश करावे लागेल, त्यावर टोनर लावणे तितकेच महत्वाचे आहे. टोनर लावल्याने चेहऱ्याचा मेकअप अबाधित राहतो आणि तो पसरत नाही.

फाउंडेशनची निवड :

फाउंडेशन तुमच्या त्वचेच्या टोननुसार निवडले पाहिजे. नेहमी तुमच्या त्वचेशी जुळणारा पाया निवडा. दर 5 वर्षांनी त्वचेचा टोन बदलतो. म्हणजेच, तुमच्या त्वचेच्या टोननुसार तुम्हाला दर 5 वर्षांनी वेगळ्या फाउंडेशनची गरज आहे. त्याचप्रमाणे फाउंडेशन लावल्यानंतर ते ब्रशने समतल केले पाहिजे. जेणेकरून ते त्वचेला एकसमान टोन देते. तुमच्या चेहऱ्याच्या रंगापेक्षा फाउंडेशन शेड फिकट वापरा. यामुळे चेहरा नैसर्गिक दिसेल. यासह, फक्त कॉम्पॅक्ट फाउंडेशनचा रंग वापरा.

नेहमी कन्सीलरकडे लक्ष द्या :

चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ लपवण्यासाठी कन्सीलरचा वापर केला जातो. यासह, हे चेहऱ्यावर दिसणाऱ्या वयाच्या रेषा देखील लपवते. या गोष्टी लपवण्यासाठीच वापरा आणि त्वचेच्या रंगाशी जुळणारा टू वे केक लावा. मान, पाठ, कान आणि कानाच्या मागे शरीराच्या इतर खुल्या भागांवर टू वे केक लावा.

ब्लशर

दिवसा गालांवर गुलाबी ब्लशर वापरू नका. रात्री ते लावा आणि नाकापासून दीड ते दोन इंचाच्या अंतरावर लावा. दिवसाच्या दरम्यान गुलाबी गालांचे सौंदर्य पसरवण्यासाठी, आपण आपल्या त्वचेच्या टोनशी जुळणारा अतिशय हलका ब्लश लावावा. यामुळे मेकअप नैसर्गिक दिसतो.

डोळा मेकअप

आयशॅडो :

गडद रंगाच्या आयशॅडोमुळे दिवसा मेकअप खूप जड होतो, म्हणून नेहमी न्यूड किंवा तटस्थ रंगाचे आयशॅडो लावा. हे नैसर्गिक आणि अभिजातही दिसते. मेकअप नैसर्गिक दिसण्यासाठी, हलके तपकिरी रंगाने डोळे खोलवर सेट करा आणि नैसर्गिक तपकिरी रंगाच्या आयशॅडो लावा. जर तुम्हालाही सुरकुत्याच्या तक्रारी असतील तर क्रीम आयशॅडो वापरणे टाळावे. त्याऐवजी पावडर आयशॅडो वापरा. ते तुमच्यासाठी पुरेसे चांगले असेल. चमकदार आयशॅडो वापरू नका. जर तुम्हाला भुवयांच्या खाली हायलाइट करायचे असेल तर तुम्ही क्रीम रंगाने हायलाइट करू शकता.

आयलाइनर किंवा मस्करा :

सकाळी डोळ्यांच्या वर आणि खाली आयलाइनर किंवा मस्करा न लावण्याचा प्रयत्न करा. आयलाइनर किंवा काजलची पातळ रेषा काढता येते. डोळ्यांच्या खालच्या झाकणावर गडद रंगाची आयलाइनर लावणे टाळा. यामुळे डोळे थकलेले दिसू लागतात. याऐवजी, पांढऱ्या किंवा न्यूड रंगाच्या छटा वापरल्या जाऊ शकतात.

आकार परिभाषित करण्यासाठी, eyeliner ऐवजी eyelash joiner वापरा, कारण ते दृश्यमान देखील नाही आणि डोळ्यांचा आकार देखील हायलाइट करते. डोळ्यांमध्ये काजल लावण्याची खात्री करा. यामुळे डोळे गोंडस आणि कजरी दिसतात. परंतु जर तुमचे पापणी हलके असतील आणि तुम्हाला ते जाड दिसू इच्छित असतील तर पापण्यांना पापणीच्या कर्लरने कर्ल करा. त्यानंतर त्यांच्यावर पारदर्शक मस्कराचा एकच कोट लावा.

भुवया पेन्सिल :

भुवया पेन्सिल किंवा भुवया रंगाने आकारल्या जाऊ शकतात. नेहमी हलक्या रंगाची भुवया पेन्सिल घ्या जी तुमच्या भुवयांच्या रंगापेक्षा हलकी आहे. जर तुम्ही खूप गोरा असाल तर सावली एक सावली अधिक गडद असावी. भुवया पेन्सिल अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. मोम टच पेन्सिल लागू करणे खूप सोपे आहे आणि नैसर्गिक स्वरूप देखील देते.

ओठ मेकअप

जर तुम्हाला तुमची लिपस्टिक दीर्घकाळ टिकू इच्छित असेल तर यासाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी कन्सीलरचा वापर करावा. यानंतर, तुम्हाला लिपस्टिकचा जो रंग लावायचा आहे तो लावा, पण त्यापूर्वी ओठांवर लिप लाइनरची रूपरेषा तयार करा. असे केल्याने ओठ खूप आकर्षक दिसतील आणि लिपस्टिकही दीर्घकाळ टिकेल.

जर ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी असतील तर फक्त त्यांच्यावर पारदर्शक लिप ग्लोस लावा. जर तसे नसेल तर ओठांवर बबलगम गुलाबी, पीच पिंक, लेस पिंक किंवा कॅमिओ पिंक कलर सारख्या अतिशय हलक्या रंगात लिपस्टिक लावा. टिश्यू पेपरने डाग लावा आणि नंतर हलका पारदर्शक लिप ग्लोस लावा. यासह, ओठ नैसर्गिक गुलाबी आणि चमकदार दिसतील.

ऑयली त्वचेसाठी ५ फेस पॅक

* पूजा

ऑयली त्वचा असलेल्या महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांशी लढा द्यावा लागतो. त्वचेवर असलेले अतिरिक्त तेल चेहऱ्याला तेलकट बनवते, ज्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि मुरूम येण्याची भीती असते. पण आता ही भीती घरी बनवलेल्या फेसपॅक, जे घरगुती फेस पॅक या नावाने ओळखले जातात, त्याचा वापर करून नाहीसे केले जाऊ शकतात.

डॉ. दीपाली भारद्वाज, त्वचा रोग विशेषज्ज्ञ म्हणतात की ऑयली त्वचेमुळे त्रस्त अनेक महिला त्यांच्याकडे येतात, ज्यानी निरनिराळे क्रीम्स आणि इतर औषधोपचार घेतले आहेत. पण डॉ. दीपाली यांच्या मते घरगुती उपचारांपेक्षा कोणतीही उत्तम उपाय नाही आहे.

खालील घरगुती  उपायांचा वापर तुम्ही ऑयली त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवायला करू शकता.

1 केळ, मध आणि लिम्बाचा फेसपॅक

केळ तब्येतीसाठी उत्तम असते. शिवाय हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत करते. केळासोबत मध आणि लिंबूसुद्धा अत्यंत गुणकारी असतात. तुम्ही तुमचा फेसपॅक बनवण्यासाठी बस एवढेच करायचे आहे की एक केळ कुस्करून त्यात १ चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर तोवर लावून ठेवा जोवर हे सुकत नाही.

2 पपई व लिंबाचा फेसपॅक

पपई एक असे फळ आहे, जे कुठेही अगदी सहज उपलब्ध असते. ऑयली त्वचेसाठी पपई एक अद्भूत पर्याय आहे. पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी पपई चांगली कुस्करून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि मग साधारण २० मिनिट चेहऱ्याला लावून ठेवल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा.

3 मुलतानी माती आणि गुलाबजल

ऑयली त्वचेसाठी मुलतानी माती एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. ही एकप्रकारची औषधी माती आहे. यात गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरून तेल नाहीसे होते आणि त्वचा मुलायम बनते.

4 कोरफड

कोरफड जशी पोटासाठी फायदेशीर असते तशीच ऑयली त्वचेसाठीसुद्धा खूपच उपयोगी असते. ऑयली त्वचेपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही कोरफडीच्या गरात मध मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा.

5 अंडे

अंडयात प्रथिने, जीवनसत्वे आणि निरनिराळी खनिजे याची मात्रा विपुल प्रमाणात असते, जी त्वचेला संपूर्णत: निरोगी ठेवणायचे काम करते. ऑईली त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी हा फेसपॅक अवश्य वापरून पहा. १ चमचा मधात अंडयातील पांढरा भाग मिसळून चेहऱ्यावर लावा.

जेव्हा कराल सौंदर्यप्रसाधनांचा वापर

* डॉ. सोनल अग्रवा

स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी अनेक काळापासून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत आल्या आहेत. मात्र, पूर्वी ही सौंदर्यप्रसाधने हळद, लिंबू, मेंदी, चंदन, फुले यांपासून तयार केली जात असत. त्यांच्या वापराने कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता, सौंदर्यवर्धनच होत होते. मात्र, आज बहुतेक सौंदर्यप्रसाधनांत अनेक रसायनांचा वापर होतो, ज्यांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो.

याबरोबरच, आज प्रसिद्ध कंपन्यांच्या प्रसाधनांप्रमाणे दिसणारी स्वस्त, नकली प्रसाधने बाजारात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे, काही महिला स्वस्तच्या नादात ब्रँडेड सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याऐवजी, नकली व सामान्य प्रसाधने खरेदी करून स्वत:वर संकट ओढवून घेतात. या डुप्लिकेट सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये खालच्या दर्जाचा आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो.

या, जाणून घेऊ की सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी :

सौंदर्यप्रसाधनांचे संभावित दुष्परिणाम

सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या वेगवेगळया रसायनांच्या प्रभावामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना श्वसन तंत्राची अॅलर्जी होऊ शकते. त्वचेमध्ये लालसरपणा, खाज, फोडया, चकत्या इ. होऊ शकतात. मग अॅलर्जीमुळे सर्दी, डोळयांची जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, एवढेच नव्हे, तर दमाही होऊ शकतो.

अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये कोलतारचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर, हा कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकतो. याच्या दुष्परिणामाने मूत्राशयाचा कॅन्सर, नॉनहॉजकिन लिंफोमा इ.चीही शक्यता वाढते.

काही चेहऱ्यांवर डाग, मुरमे, डाग घालविणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने संवेदनशील त्वचा असणाऱ्यांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांप्रती संवेदनशीलता उत्पन्न झाल्याने फोडया, मुरमे नष्ट होण्याऐवजी आणखी वाढू शकतात.

टाल्कम, डस्टिंग पावडर, कॉम्पॅक्ट इ.चा वापर केल्याने त्वचेची रोमछिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे मुरमे, सुरकुत्या, चकत्या होऊ शकतात. दीर्घ काळापर्यंत याचा वापर केल्याने त्वचेची नैसर्गिक कोमलता नष्ट होते. त्याचप्रमाणे, त्वचा शुष्क, निस्तेज व अनाकर्षक होते.

निकृष्ट प्रतिच्या लिपस्टिक दीर्घकाळ लावल्यास ओठांची श्लेष्मा पापुद्रे आकुंचित होतात. ओठ काळे, निस्तेज होऊन फुटतात. लिपस्टिकमध्ये असलेली रसायने थोडयाशा प्रमाणात शरीरात जातात, त्यामुळे हानिकारक परिणाम होऊ शकतो.

नेलपॉलिशचा जास्त वापर केल्याने, नखांची नैसर्गिक चमक कमी होते. ती कमकुवत, खरखरीत होऊन तुटू शकतात. काही तरुणींना अॅलर्जीमुळे नखांच्या पेरांना फोडया किंवा खाज येऊ शकते.

डोळे हा नाजूक अवयव आहे. काजळ, आयलाइनर, आयशॅडो, मस्कारा, आयलॅशेस, आयब्रो पेन्सिल इ.चा वापर डोळयांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. यांच्यामुळे अॅलर्जी झाल्यास डोळयांना खाज, डोळयांच्या खाली काळी वर्तुळे, त्वचेचा खरखरीतपणा, पापण्यांचे केस कडक होऊन गळणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

टिकलीच्या मागे लावलेल्या अॅडहॅसिव्हमुळे टिकली लावलेल्या ठिकाणी खाज, लालसरपणा, संक्रमण व डाग होऊ शकतात.

सिंदूर व पेन्सिलने लावल्या जाणाऱ्या द्रवरूप गंधामुळेही समस्या निर्माण होतात.

हेअरडाय हासुद्धा रसायनांनी बनलेला असल्यामुळे त्याच्यामुळे अॅलर्जी, केस गळणे, केस लवकर सफेद होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कार्बनिक पदार्थांपासून निर्माण केलेले हेअरडाय दिर्घकाळ वापरल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. केसांना सेट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीम्स, जेल, स्प्रे, लोशन, तेल यामध्ये असलेली रसायने, सुगंधसुद्धा केसांच्या मुळांना कमकुवत करू शकतात, तसेच केस लवकर सफेद होऊ शकतात. त्यांच्यातील नैसर्गिक कोमलता व चमक नष्ट होते.

हेअर रिमूव्हिंग क्रीम, लोशन, साबणही पूर्णपणे दुष्प्रभावरहित किंवा सुरक्षित नसतात. त्यांच्या वापरानेसुद्धा अॅलर्जी, काळपटपणा, रूक्षपणा, डाग इ. समस्या उद्भवतात.

सल्ला

सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना कृत्रिम प्रसाधनांऐवजी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांच्या वापरावर भर द्या. कृत्रिम, मिश्र रसायनांपासून निर्माण केलेल्या कॉस्मॅटिक्स उत्पादनांचा वापर कमीत कमी करा. प्रतिष्ठित कंपन्यांद्वारे तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचाच वापर करा आणि ती विश्वासनीय दुकानांमधूनच खरेदी करा, जेणेकरून योग्य किमतीला योग्य कॉस्मॅटिक मिळेल. कोलतार मिसळलेली कॉस्मॅटिक्स डोळे व पापण्यांवर लावू नका.

शरीराच्या एका भागासाठी बनविलेल्या कॉस्मॅटिक्सचा वापर दुसऱ्या प्रसाधनांच्या जागी उदा. लिपस्टिकचा ब्लशर म्हणून आणि आयशॅडो ओले करून आयलाइनरप्रमाणे वाप करू नका. अन्यथा अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

जर एखाद्या सौंदर्यप्रसाधनाची अॅलर्जी असेल किंवा अन्य काही समस्या असेल तर त्याचा भविष्यात कधीही वापर करू नका. झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करून झोपा.

लक्षात ठेवा की, चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. म्हणून सौंदर्यप्रसाधने केवळ प्रसिद्ध कंपन्यांची किंवा ब्रँडेडच वापरा.

टॉप ५ कलरफुल मस्कारा शेड्स

* पूनम पांडे

आयलाइनर आणि आयशॅडोच नव्हे, तर मार्केटमध्ये यलोपासून ब्लूपर्यंत आणि पिंकपासून ते ग्रीन शेड्सपर्यंत मस्काऱ्याच्या कलेक्शनमध्ये काही कमी नाहीए. अशा वेळी आपणही नेहमी ब्लॅक किंवा ट्रान्सपरन्ट शेड्सचा वापर करून कंटाळला असाल, तर एकदा कलरफुल मस्कारा जरूर ट्राय करा. मस्काऱ्याच्या कलरफुलल शेड्स डोळयांना मोठा आणि ब्राइट लुक देतात. ब्लॅक मस्काऱ्याच्या तुलनेत हे जास्त आकर्षकही दिसतात. अर्थात याची निवड करताना आपल्या त्वचेबरोबरच डोळयांचा रंग नीट लक्षात घ्या.

1 ब्लू मस्कारा

जर आपल्या डोळयांचा रंग ग्रे, ब्राउन किंवा लाइट ग्रीन असेल, तर आपण आपल्या वॅनिटी बॉक्समध्ये ब्लू शेड्सचा मस्कारा ठेवू शकता. मार्केटमध्ये ब्लूच्या अनेक शेड्चा मस्कारा उपलब्ध आहे. उदा. रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, सी ब्लू इ. ब्लूच्या या सर्व शेड्स फेअर कॉम्प्लॅक्शनच्या महिलांनाच नव्हे, तर डार्क आणि मीडीअम कॉम्प्लॅक्शन असलेल्या महिलांनाही सूट करतात. मात्र ब्लू शेड्चा मस्कारा नाइटऐवजी डे पार्टीतच जास्त खुलून दिसतो.

2 ग्रीन मस्कारा

डार्क ब्राउन शेड्सच्या डोळयांना ग्रीन शेड्सचा मस्कारा खूप छान दिसतो. स्किनटोनबाबत बोलायचे झाल्यास ब्लूप्रमाणेच ग्रीन कलरचा मस्काराही डार्क, फेअर, मीडीअम अशा सर्व स्किनटोनवर खुलून दिसतो. आपला ग्रीन मस्कारा अधिक खुलून दिसावा अशी आपली इच्छा असेल तर जेव्हाही ग्रीन कलरचा मस्कारा लावाल, तेव्हा त्यासोबत डार्क कलरचा आयशॅडो किंवा आयलाइनर लावायची चूक करू नका, अन्यथा डार्क शेड्पुढे आपला रंग फिका पडेल.

3 ब्राउन मस्कारा

ब्लॅक रंग वापरल्यानंतर लगेच कलरफुल मस्कारा वापरायला कचरत असाल, तर ब्राउन मस्काऱ्यापासून सुरुवात करा. हा ब्लॅक शेड्पेक्षा थोडा लाइट असतो. मात्र याचा इफेक्ट बराच नॅचरल दिसतो. मीडीअम आणि फेअर कॉम्प्लॅक्शन असलेल्या महिलांबरोबरच ब्राउन डोळयांच्या महिलांवरही ब्राउन शेड्चा मस्कारा खूप सुंदर दिसतो. हा पार्टी, फंक्शनसोबतच नेहमीही वापरता येईल. हा दिवसा किंवा रात्री दोन्ही वेळी छान दिसतो.

4 गोल्डन मस्कारा

जर तुम्हाला एखाद्या नाइट पार्टीचे आकर्षण बनायचे असेल, तर ग्रीन, ब्लू, पर्पल यासारख्या शेड्सचा मस्कारा सोडून गोल्डन शेड्च्या मस्काऱ्याची निवड करू शकता. हा सर्व प्रकारच्या शेड्च्या डोळयांवर खूप खुलून दिसतो. डार्कपासून ते मीडीअम आणि फेअर स्किनटोनच्या महिलांवरही गोल्डन शेड्चा मस्कारा छान दिसतो. म्हणजेच इतर शेड्स ठेवा अथवा नका ठेवू, पण पार्टीच्या आकर्षणाचे केंद्र बनायचे असेल, तर आपल्या वॅनिटी बॉक्समध्ये गोल्डन शेड् मस्काऱ्याला खास जागा जरूर द्या.

5 पर्पल मस्कारा

जर आपले डोळे छोटे आहेत आणि आपल्याला त्यांना मोठे दर्शवायची इच्छा असेल, तर डोळे बंद करून पर्पल शेड्चा मस्कारा आपल्या मेकअप बॉक्समध्ये जरूर ठेवा. हा ग्रीन, ब्राउन आणि ब्लू कलरच्या डोळ्यांवर जास्त सूट करतो. याच्या खास करून तीन शेड्चा जास्त वापर केला जातो. रॉयल पर्पल, प्लम आणि वायोलेट. जर आपला स्किनटोन डार्क असेल, तर पर्पल शेड्चा मस्कारा खरेदी करा. जर फेअर असाल, तर वायोलेट शेड आणि मीडीअम असेल, तर प्लम शेड् निवडू शकता. नाइटऐवजी पर्पल मस्कारा डे पार्टीमध्ये जास्त आकर्षक दिसतो.

ग्रीन कॉफीने करा त्वचेचे लाड

* शैलेंद्र सिंग

सुंदर कांती आपले सौंदर्य द्विगुणित करते. अशावेळी सुंदर दिसण्यासाठी सर्वात आवश्यक असते की त्वचा सुंदर असावी आणि त्वचा सुंदर असणे यावरही अवलंबून असते की तुमचा आहार कसा आहे. अनेक गोष्टी जसे अल्कोहोलचे सेवन त्वचेसाठी वाईट असते. जर भरपूर झोप घेत नसाल तर तेसुद्धा चांगले नाहीए.

पाणी, चहा आणि कॉफीचे त्वचेशी अतिशय जवळचे नाते आहे. यांच्या संतुलित सेवनाने त्वचेवर तेज येते. ग्रीन कॉफीच्या सेवनाने त्वचेची चांगली निगा राखली जाते. अशा वेळी याचे सेवन चांगले असते. यामुळे त्वचा सतेज दिसते.

ग्रीन कॉफी म्हणजे प्रत्यक्षात कॉफिच्या बिया असतात. यांचे एक वैशिष्टय आहे की या बिया भाजलेल्या नसतात. बीन्स भाजल्या तर यातील एका खास केमिकलचे प्रमाण कमी होते, ज्याला कोलोरोजेनिक अॅसिड म्हणतात. म्हणून ग्रीन कॉफी बीन्समध्ये साधारण कॉफीच्या तुलनेत जास्त कोलोरोजेनिक अॅसिड असते. हे अॅसिड तब्येतीसाठी खूप चांगले असते. लोक ग्रीन कॉफीचा वापर लठ्ठपणा कमी करणे, डायबेटीस, उच्च रक्तदाब, अझायमर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढा देण्यासाठी करतात. ग्रीन कॉफी वापरून त्वचेचे लाडही करता येतात. ग्रीन कॉफी अँटीएजिंगमध्ये सहाय्यक असते. त्वचा सुंदर दिसल्याने वाढते वयसुद्धा कळत नाही. ग्रीन कॉफी याबाबतीत सहाय्यक ठरते. याच्या सेवनाने वय वाढवायची प्रक्रिया मंदावते.

ग्रीन कॉफीच्या बीन्सचे कच्चेच सेवन केले जाते. त्यामुळे ग्रीन कॉफीत सामान्य कॉफीच्या तुलनेत कॅफिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ही कितीही वेळा पिता येते. ग्रीन कॉफी त्वचेची निगा राखण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. हे वजन कमी करण्यातही उपयोगी ठरते. ग्रीन कॉफी रंग आणि गुणवत्ता याबाबतीत साधारण कॉफीपेक्षा अगदीच वेगळी असते.

लॅक्मे ब्युटी पार्लर, लखनौच्या अनामिका सिंह राय म्हणतात, ‘‘ग्रीन कॉफीमध्ये असे घटक असतात, जे त्वचेला सुंदर बनवण्यात मदत करतात. त्यामुळे याचे सेवन करणाऱ्यांची त्वचेची काळजी घेण्याची विशेष गरज भासत नाही. ग्रीन कॉफीने वजनसुद्धा वाढत नाही, ज्यामुळे ही आरोग्यासाठीसुद्धा चांगली असते. पण साखर आणि दुधाविना याचे सेवन करणे लाभदायक असते.’’

ग्रीन कॉफीचे फायदे

* ग्रीन कॉफी भूक कमी करण्यासोबतच कॅलरीवरसुद्धा नियंत्रण ठेवते. ही वजन कमी करण्यास सहाय्यक असते.

* ग्रीन कॉफीचे सेवन केल्याने शुगर नियंत्रणात राहते. नियंत्रणात राहते. शुगर अर्थात मधुमेह हा असा एक आजार आहे, जो त्वचेला सर्वात जास्त प्रभावित करतो. ग्रीन कॉफीचे सेवन मधुमेहाला बरे करण्यात मदत करते.

* ग्रीन कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे ना केवळ त्वचा तरुण ठेवण्यात साहाय्य करतात तर ताण आणि नैराश्यापासूनसुद्धा दूर ठेवतात.

* ग्रीन कॉफी मेटॉबोलिझमचा रेट वाढवून शरीराची ऊर्जा वाढवण्यात आणि   पचनयंत्रणा ठेवण्यात मदत करते. यात भाजलेल्या कॉफीपेक्षा जास्त पोषक घटक असतात.

ग्रीन कॉफीचे वापर करण्याच्या योग्य पद्धती

* ग्रीन कॉफी उपाशी पोटी केव्हाही प्या. जेवण घेण्याआधी १-२ तास आधी ग्रीन कॉफीचे सेवन अतिशय लाभदायक असते.

* काही लोक ग्रीन कॉफीमध्ये दूध आणि साखर टाकून पितात. असे करणे टाळा.

* ग्रीन कॉफी मधात मिसळून पिणे लाभदायक असते.

* जेवणानंतर लगेच ग्रीन कॉफी घेणे धोकादायक असते.

* एका दिवसात २-३ कपांपेक्षा जास्त ग्रीन कॉफी पिऊ नका, कारण जास्त कॉफी पिणे त्वचेसाठी चांगले नसते.

स्वयंपाकघरातील सौंदर्य खजिना

* इंजी आशा शर्मा

माझ्या त्वचेमुळे वयाचा अंदाजच लगत नाही, कारण माझ्या साबणात हळद, चंदन आणि मधाचे गुण आहेत. या साबणात एक चतुर्थांश दुध आहे, जे बनवते माझी त्वचा मुलायम. आजीने त्वरित लवंगाचे तेल चोळले होते. काय तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे? क्ले शाम्पूने माझे केस अगदी चमकदार झाले.’’ अशा सगळया प्रकारच्या न जाणो किती जाहिराती आपण रोज वर्तमानपत्र, टीव्ही आणि रेडिओवर पाहात आणि ऐकत असतो. या व्यावसायिक जाहिरातींमध्ये किती सत्य आहे हे तर उत्पादन बनवणारे आणि ते वापरणारेच सांगू शकतील, पण हे निर्विवाद सत्य आहे की सौंदर्याचा खजिना आपल्या स्वयंपाकघरातच लपला आहे.

बाजारात मिळणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमुळे अनेक महिलांना अॅलर्जीची तक्रार असते. ते महागसुद्धा खूप असतात. अशावेळी जेव्हा चांगल्या प्रतीचे पदार्थ वापरल्याचा दावा केला जातो, जे आपल्या स्वयंपाकघरातच असतात, मग का नाही आपण स्वत: या खजिन्याचा वापर करून स्वत:ला सुंदर बनवायचे.

या स्वयंपाकघरात शोधूया सौंदर्य

  • मध चेहऱ्यावर वापरता येते. हे ना केवळ त्वचेची आर्द्रता कायम ठेवते तर चेहऱ्यावरचे डाग नाहीसे करते. यामुळे सनबर्नसुद्धा नाहीसे होते.
  • हळदीचे गुण यामुळेच दिसून येतात की याच्या लेपचा वापर लग्नसमारंभात एक विधी म्हणून केला जातो. हळद त्वचेवर चमक आणते. ही दुधात मिसळून लावल्यास टॅनिंग नाहीसे होते.
  • साखरेला कापलेल्या लिंबावर लावून हाताच्या कोपरांवर आणि गुडघ्यांवर गोलगोल फिरवुन हळू हळू रगडल्याने त्याचा काळपटपणा नाहीसा होतो. हाच प्रयोग हातांना मुलायम बनवायला करू शकता.
  • दुधावरील सायीच्या नियमित वापराने ना केवळ त्वचा मऊ राहते तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांपासून सुटका होते.
  • दही लावल्याने चेहऱ्यावरचे टॅनिंग आणि डाग नाहीसे होतात. यात मेथी पावडर मिसळून लावल्यास केस चमकदार दिसतात. यामुळे केस मजबूत आणि मुलायम होतात.
  • मूठभर मीठ घेऊन त्याने खांद्यांना मालिश केल्यास तेथील त्वचा कोमल होते. आल्याच्या रसात मीठ मिसळून लावल्यास मुरुमांपासून सुटका मिळते.
  • बर्फाच्या वापराने ना केवळ चेहरा तजेलदार होतो तर डोळयाखालील काळी वर्तुळं नाहीशी होतात. बर्फ एका मऊ कापडामध्ये गुंडाळून चेहरा आणि मान यावर हळुवार गोलगोल फिरवा. मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर बर्फ लावल्यास मेकअप जास्त वेळ टिकतो.
  • ग्लिसरीन स्किन केअर औषधांमधील एक मुख्य घटक आहे. हे एक उत्तम मॉइश्चरायझरसुद्धा आहे. हे त्वचेचा रुक्षपणा नाहीसा करते. हे थेट अथवा गुलाबजलात मिसळून वापरले जाऊ शकते.
  • लवंगाचे पाणी घासून लावल्याने मुरूम नाहीसे होतात आणि डागही राहात नाही.
  • वापरलेल्या टी बॅग्ज फ्रिजमध्ये थंड करून डोळयावर ठेवल्यास डोळ्यांवरची सूज आणि थकवा नाहीसा होतो.
  • आवळयाला अमृतफळ म्हणतात. याचा वापर केस काळे, दाट आणि लांब करण्यास होतो. हा केसांचे गळणे आणि अकाली पांढरे होणे यापासून दूर ठेवतो.
  • साबणाऐवजी बेसनाचा वापर केल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.
  • फळं आणि भाज्यांच्या साली यांचा वापरसुद्धा त्वचा मुलायम राखण्याचा एक उत्तम उपाय आहे.
  • बेकिंग सोडयाचा स्क्रबप्रमाणे वापर करता येतो हा अॅक्ने आणि ब्लॅक हेड्सपासून सुटका मिळवून देतो.

बॉडी स्पा प्री ब्राइडल ट्रीटमेंट

* गृहशोभिका टीम

वधूला तिच्या लग्नात सुंदर दिसण्यासाठी अनेक तयारी करावी लागते. जर तिने लग्नापूर्वी काही ब्युटी ट्रीटमेंट घेतली तर लग्नाच्या दिवशी तिचे सौंदर्य वाढते. वधूच्या पूर्व उपचारांमध्ये बॉडी स्पा उपचार विशेष आहे, जे वधूच्या शरीराला सुशोभित करते.

व्हीएलसीसी ग्रुपचे स्पा ट्रेनर आणि व्हीआयपी स्पा थेरपिस्ट कॅवलिन बुपेट अॅनी वधूचे सौंदर्य वाढवण्यासाठी काय करावे हे सांगत आहे, ज्यामुळे तिच्या शरीरात वृद्धी होईल.

बॉडी स्पा

शरीराचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लग्नापूर्वी 2-3 वेळा बॉडी स्पा करू शकता. सर्वप्रथम मध, बदाम आणि तिळाची पेस्ट बनवा. नंतर शरीराला कच्च्या दुधाने स्वच्छ करा आणि तिळाच्या तेलाने 10 मिनिटे मालिश करा. नंतर 5 मिनिटे शरीर झाकून ठेवा. 5 मिनिटांनंतर एक टॉवेल गरम पाण्यात भिजवून हलकेच पिळून घ्या आणि शरीर पुसून पुन्हा शरीर झाकून ठेवा. नंतर तयार बदामाची पेस्ट लावा आणि 5 मिनिटे सोडा. नंतर पुसून मॉइश्चरायझर लावा.

उदर मालिश

ओटीपोटात मसाज करण्यासाठी चुना आणि आले तेल वापरा आणि नेहमी हलका हाताने तळापासून वरपर्यंत मालिश करा. नंतर क्लिअरिंग फाइन पेपर पोटवर 20 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त 50 मिनिटे ठेवा. त्यापेक्षा जास्त काळ घालू नका.

याशिवाय, 10 ते 15 मिनिटांसाठी VLCC चे टमी ट्रॅक क्रीम लावा आणि नंतर क्लिअरिंग फाइन पेपर संपूर्ण पोटात गुंडाळा. ते पोटाला उष्णता देऊन पोटाची चरबी कमी करते. 20 मिनिटांनंतर क्लिअरिंग पेपर काढा. पोटाची त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें