समुद्रकिनारी सेक्स, धोकाच धोका

– एनी अंकिता

दृश्य १ : मुंबईच्या वांद्रे स्थित बँडस्टँडवर एका दगडामागे प्रियकर प्रेयसी एकमेकांच्या मिठीत सामावलेत. प्रियकर कधी प्रेयसीला चुंबन देतोय तर कधी तिच्या टीशर्टमध्ये आपला हात टाकतोय.

दृश्य २ : संध्याकाळच्यावेळी गोराई बीचवर प्रेमीयुगुल एकमेकांसोबत खूप एन्जॉय करत आहेत. कुठे प्रियकर आपल्या प्रेयसीची उत्तेजना शांत करत आहे, तर कुठे प्रेयसी प्रियकराला खूश करू शकत नाहीए.

मुंबईच्या या बीचेसप्रमाणे महाराष्ट्रात असे अनेक सागरकिनारे आहेत जिथे नेहमीच प्रेमीयुगुलांची गर्दी असते. कारण तिथे ना कोणी डिस्टर्ब करणारं असतं आणि ना ही एकमेकांसोबत वेळ घालविण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तासन्तास ते एकमेकांसोबत मस्ती करू शकतात. ते फिरताफिरता एक सुरक्षित जागा शोधू शकतात. बस मग काय, आजूबाजूची पर्वा न करता ते सुरू होतात. या बीचेसवर एकमेकांच्या बाहुपाशात सामावणं, चुंबन घेणं तर सामान्य बाब आहे. ते खडकांच्या मागे सेक्स करायलादेखील घाबरत नाही. ते हादेखील विचार करत नाहीत की या सेक्सी गोष्टी त्यांना संकटात टाकू शकतात. ते फक्त तारुण्याच्या नशेत बुडालेले असतात.

खरं म्हणजे, तरुण विचार करतात की प्रेयसीसोबत सेक्स करण्याची ही उत्तम जागा आहे. इथे ना पालक येणार आणि ना ही पकडले जाणार; कारण आजूबाजूची युगुलदेखील त्यांच्याप्रमाणेच असतात. मात्र, अशाप्रकारे समुद्रकिनारी खुलेआम सेक्स करणं तुमच्या आणि तुमच्या पार्टनरसाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्ही अडचणीत सापडण्याबरोबरच तुमचं करिअरदेखील खराब होऊ शकतं.

खर्च कमी, अडचणी जास्त

अनेक तरुण विचार करतात की जर फुकटात होत असेल तर कशाला पैसे खर्च करायचे आणि यामुळे ते अंधार पडू लागताच समुद्रकिनारी जाणं पसंत करतात. तिथे त्यांना खर्चदेखील करावा लागत नाही आणि खडकांच्या मागे खूप मजादेखील मारता येते.

परंतु तुम्हाला माहिती नाही की या एन्जॉमेंटच्या बदल्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचादेखील सामना करावा लागू शकतो, जसं कोणीतरी हळूच तुमचा व्हीडिओ बनवून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर शेअर करू शकतो. एकदा तुमचा व्हीडिओ शेअर झाल्यानंतर तो सगळीकडे व्हायरल होईल. नंतर तुमच्या हातात काहीच राहाणार नाही. या जागी एकमेकांसोबत मस्ती करताना अनेकदा तुम्ही सावधगिरी बाळगणंदेखील विसरून जाता. चुकून तुमच्या जीन्सचं बटण तुटू शकतं, कपडे फाटू शकतात, तुम्हा दोघांना तिथे तुमचा एखादा मित्र ओळखू शकतो. मग भलेही तोदेखील जे तुम्ही करायला आलात तेच तो करायला आलेला का असेना. परंतु तुम्हा दोघांव्यतिरिक्त जर तिसऱ्याला याबद्दल समजलं तर तुमच्या मनात कायमचीच भीती लागून राहिल.

एक्सच भेटणं म्हणजे सर्वकाही संपलंच

कदाचित असंदेखील होऊ शकतं जिथे तुम्ही गेला आहात तिथे तुमचा एक्स बॉयफ्रेण्डदेखील भेटू शकतो आणि तेव्हा त्याने तुम्हाला तिथे दुसऱ्या कोणासोबत पाहिलं तर त्याला प्रचंड संताप येऊ शकतो. तसंच जर त्याने तुमच्या प्रियकराला खोटं सांगितलं की तुम्ही पूर्वी त्याच्यासोबतदेखील असंच केलं होतं आणि जेव्हा मन भरलं तेव्हा त्याला सोडून दिलं होतं आणि मी हे सर्व यासाठी सांगतोय की तूदेखील सांभाळून राहा, कदाचित एक्सच्या या बोलण्यामुळे तुमचा प्रियकर तुमच्याशी भांडण करू शकतो वा तुमच्यावर संशयदेखील घेऊ शकतो.

लुटमारीची भीती

कदाचित तुम्ही विचार करत असाल की समुद्रकिनारी जाल तिथे हिंडाफिराल आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी सेक्सची मजा घ्याल. नंतर घरी परत याल तेव्हा कोणाला काही समजणारदेखील नाही. परंतु तुम्ही जेव्हा एकमेकांमध्ये व्यस्त होता तेव्हा बाजूने कोणीतरी तुमचा फोन चोरी करू शकतो. तुमच्या प्रेयसीने जर सोनं घातलं असेल तर कोणीतरी चाकू वा रिव्हॉल्वर दाखवून लुटू शकतो. सुनसान जागी लुटमारीच्या घटना होतच असतात म्हणून जेव्हा एकांताच्या ठिकाणी जाल तेव्हा सोनं वा मौल्यवान वस्तू सोबत नेऊ नका.

रोगराईची भीती

इथे सेक्स करणं तुमच्यासाठीदेखील धोकादायक ठरू शकतं; कारण तुम्ही एकमेकांसोबत एखादा कोपरा पकडून बसलेले असताना समजा तिथे तुम्हाला एखाद्या किड्याने वा प्राण्याने चावा घेतला तर पुरेवाट लागू शकते. तुम्ही मजा माराल, परंतु यानंतर आजारीदेखील पडाल त्याच काय. आता तर तसंही डेंग्यू, चिकनगुनिया वेगाने पसरत चालले आहेत, अनेकदा प्रियकर व प्रेयसी सेफ्टी मेजर्स सोबत ठेवत नाहीत. बस्स, सेक्स करण्यात गुंग होतात. जर प्रेयसीला एखादा आजार असेल तर प्रियकरालादेखील होऊ शकतो. अशाचप्रकारे प्रियकर एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर तो प्रेयसीलादेखील होऊ शकतो.

पोलिसांची धाड

विचार करा, तुम्ही समुद्रकिनारी प्रेयसीच्या मिठीत आहात आणि तिथे पोलिसांची धाड पडली, तर तुम्ही अडचणीत फसाल आणि ही गोष्ट जेव्हा तुमच्या कुटुंबियांना समजेल तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर उभेदेखील राहू शकणार नाही.

अपमानित होण्याची भीती

कधीतरी असंदेखील होऊ शकतं की तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत फिरत आहात आणि प्रेयसीचं सौंदर्य पाहून तुम्ही तुमचं नियंत्रण हरवून बसलात आणि गप्पा मारतामारता तिला जवळच्या बीचवर घेऊन गेलात, जिथे पूर्वी तुम्ही कधी गेला नसाल आणि त्या परिसराची तुम्हाला कोणतीही माहिती नसेल, परंतु तरीदेखील तुम्ही एखादा कोपरा पकडून एन्जॉय करू लागता. असंदेखील होऊ शकतं की तिथे जेष्ठ नागरिक फिरायला येत असतील. ते तुम्हा दोघांना अशा परिस्थितीत पाहून काही बोल सुनावू शकतात वा तुमच्याबद्दल गार्डकडे तक्रार करू शकतात आणि गार्ड सर्वांसमोर तुम्हा दोघांना बाहेर काढू शकतो.

अंधारात सेक्स करणं पडेल महाग

प्रेमीयुगलं समुद्रकिनारी अंधार होण्याची अधीरतेने वाट पाहातात; कारण लवकरच अंधार पडावा म्हणजे उजेडात जी मजा मिळू शकली नाही, ती त्यांना अंधारात मिळावी. दिवसा प्रेयसी संकोच करते, मात्र अंधार पडताच तीदेखील मजा मारण्यात कोणतीही कसर सोडत नाही. परंतु अंधारात सेक्स करणं धोकादायक तर आहे, परंतु स्वत:हून अडचणीत पडण्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही विचार करत असाल की अंधारात सेक्स करून भरपूर मजा कराल आणि कोणाला समजणारदेखील नाही, तर जरा सांभाळून राहा. तसंही हे वयच असं आहे की ज्यामध्ये स्वत:वर नियंत्रण ठेवणं कठीण असतं. आपण वाहावत जातो. जर असं असेल तर तुम्ही अशा जागांची निवड करा जी हरप्रकारे सुरक्षित असेल, जिथे ना पकडले जाण्याची भीती असेल आणि ना ही ब्लॅकमेलिंगची भीती.

तरुणतरुणींमध्ये सेक्स होणं स्वाभाविक आहे; कारण हे वयच असं असतं जिथे स्वत:च्या भावनांवर अंकुश राखणं कठीण होतं. परंतु सेक्ससाठी अशा जागांची निवड करा जिथे कोणत्याही प्रकारचा धोका नसेल आणि हा, पुरेशी काळजी घ्या अन्यथा तुम्ही अडचणीत पडू शकता.

जेव्हा घ्याल हेल्थ पॉलिसी

* पारुल भटनागर

अनेकदा लोक हेल्थ पॉलिसी घेताना महत्वाच्या गोष्टींकडे कानाडोळा करतात. हेल्थ पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे, याबाबत सांगत आहेत मल्टी हेल्थ कंपन्यांचे एजंट शैलेंद्र.

पॉलिसी घेताना तुलना अवश्य करा

हेल्थ इंश्युरन्स निवडण्याआधी तुम्ही ३-४ कंपन्यांच्या योजना पडताळून पहा. लक्षात ठेवा ज्या योजनेत खूप जास्त अटी आहेत, ती खरेदी करणे टाळा. हेल्थ पॉलिसीतील प्रत्येक क्लॉज बारकाईने वाचा.

क्लेम प्रोसेस सोपी असावी

जेव्हाकेव्हा पॉलिसी घेणार असाल तेव्हा क्लेम प्रोसेस अवश्य विचारा. जसे क्लेमचे अप्रुव्हल किती तासात मिळेल, पॅनलमध्ये किती हॉस्पिटल्स येतात आणि जर पॅनेलबाहेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर किती दिवसात खर्चाची भरपाई होईल. ही सर्व माहिती त्यांच्या साईटवर जाऊनसुद्धा तुम्हाला मिळेल. साधारणत: ३ ते ९ तासात क्लेमसाठी मंजुरी मिळते आणि २० ते २५ दिवसात खर्चाची भरपाई मिळते. म्हणून सोप्या सहजपणे कार्यान्वित होणाऱ्या पॉलिसीची निवड करणेच योग्य ठरेल.

आपल्या गरजा समजून घ्या

जेव्हा पॉलिसी घेण्याबाबत विचार कराल, तेव्हा आपल्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घ्या. कुटुंबातील सदस्यांची संख्या व वय खास करून लक्षात घेणं जरूरीचं ठरतं. जर तरुण कुटुंब असेल तर बेसिक ५ लाखांची पॉलिसी घेऊ शकता, ज्यात  पालक आणि २ मुलं समाविष्ट असतात. याचा प्रीमियम रु. १६, ८४० च्या आसपास असतो. यासोबत अनेक कंपन्या अतिरिक्त १५० टक्क्यांची रिफिल रक्कमही देतात. म्हणजे जर तुम्ही ५ लाखांची पॉलिसी घेतली आहे तर तुम्ही रू. ३ ते ७ लाख ५० हजाराचा फायदा मिळवू शकता. पण जर कुटुंबात आईवडील असतील तर मोठ्या फ्लोटर कव्हरची पॉलिसी घ्यावी, जेणेकरून मोठे आजार झाल्यास तुमच्या खिशावर भार पडणार नाही. शिवाय पॉलिसीचा प्रिमियम भरणंही शक्य झालं पाहिजे.

काय माहीत असणे आवश्यक आहे

विचारा की पहिल्या दिवसापासून अॅक्सिडेंटल डॅमेज कव्हर अंतर्भूत आहे अथवा नाही, हंगामी आजार केव्हापासून अंतर्भूत होतील, पॉलिसी घेतल्यावर किती दिवसांनी गंभीर आजार समाविष्ट केले जातील. काही कंपन्या सुरूवातीपासूनच पूर्वनियोजित ऑपरेशन जसे स्टोन, गालब्लॅडर इत्यादी ऑपरेशन समाविष्ट करतात. म्हणून या गोष्टींची संपूर्ण माहिती आधीच मिळवा.

आयुष्यभर नुतनीकरण

तुम्ही अशी पॉलिसी घ्या, जी आयुष्यभर नुतनीकरणाची सुविधा देते, कारण एखाद्याला माहीत नसते की तो केव्हा आजारी पडणार आहे. अशावेळी योग्य पॉलिसीची निवड जीवनभर सुरक्षा प्रदान करेल.

मोफत वैद्यकीय तपासणी

अशी पॉलिसी घ्या, ज्यात मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा असेल. काही कंपन्यांचे आपले डायग्नोस्टिक सेन्टर व पॅनल हॉस्पिटल असतात. तिथेच तपासणी केली गेली तर काही कंपन्या ही सुविधा देतात की तुम्ही बाहेरून तपासणी करून खर्चाची भरपाई करू शकता.

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन

ऑपरेशन करण्यापूर्वी व नंतर डॉक्टरला दाखवण्याच्या आणि तपासण्या करण्याच्या नावावरसुद्धा हजारो रुपये खर्च होतात. पॉलिसी घेताना विचारून घ्या की प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनची सुविधा आहे की नाही. यामुळे तुम्हाला आयुष्यभराची सुविधा मिळेल.

अटींच्या बंधनात अडकू नका

काही कंपन्यांच्या पॉलिसीत हे स्पष्ट केलेले असते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास खोलीचे भाडे ठराविक रकमेपेक्षा जास्त मिळणार नाही. जर पॉलिसीमध्ये अशी एखादी अट असेल तर पॉलिसी घेऊ नका, कारण तुम्हाला हे माहीत नसते की कोणत्या आजाराच्या स्थितिमध्ये तुम्हाला यासाठी किती रक्कम चुकवावी लागेल.

जुने आजार लपवू नका

विमा कंपन्यांना असे वाटते की आजार व सवयींविषयी ग्राहकाकडून प्रत्येक गोष्ट स्पष्ट व्हावी जसे जीवनपद्धती कशी आहे, मेडिकल हिस्ट्री इत्यादी जेणेकरून कंपनीला तुम्हाला विम्याची रक्कम देण्यात काही अडचण येणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आजारांची व्यवस्थित माहिती द्यायला हवी, भले थोडा जास्त प्रीमियम द्यावा लागला तरी चालेल.

महिलांसाठी पॉलिसीची गरज

भवितव्य आणि करिअरप्रति महिलांमध्ये जागरूकता वाढली आहे. नोकरदार महिला गुंतवणूक आणि वेगवेगळया इंश्युरन्स पॉलिसीची गरज समजून घेऊन काळाप्रमाणे आवश्यक पावलं उचलत आहेत.अधिकांश घरांमध्ये गृहिणीच संसार चालवण्यासाठी घरखर्चाचा हिशोब ठेवतात. अशावेळी घरातील एखाद्या सदस्याला अचानक एखाद्या आजाराने ग्रासले किंवा ती स्वत: गरोदर असेल तर बजेट कोसळणे स्वाभाविक आहे.

अशावेळी हेल्थ इंश्युरन्स खूप उपयोगी पडते. अलीकडेच एका सर्वेमध्ये ही गोष्ट समोर आली की अधिकांश भारतीय गृहिणी आपल्या नियमित आरोग्य तपासण्या करत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची समस्या आक्राळविक्राळ रूप घेतात आणि मग हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. ब्रेस्ट कॅन्सर, यूटरस कॅन्सर वगैरे महिलांमध्ये सर्वसाधारण समस्या आहेत. हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी मॅटर्नल हेल्थसोबत या सर्व समस्यांच्या उपचारावर होणारा खर्चही कव्हर करते.

महिलांसाठी हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे प्रमुख फायदे हे आहेत.

आर्थिक मजबूती : आजारावर होणारा खर्च जेव्हा वाचेल तेव्हा स्वाभाविक आहे की तुमचे बजेट मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मुलांसोबत स्वत:साठीसुद्धा उत्तम भवितव्य प्लॉन करू शकाल.

गंभीर आजार : बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वात जास्त महिलाच प्रभावित होत आहेत. ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, व्हजायनल कॅन्सर अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांच्या उपचारासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. हेल्थ इंश्युरन्स अशावेळी तुमचा आर्थिक आधार बनून भार कमी करतो.

मॅटर्निटीवर होणारा खर्च : प्रसूतीदरम्यान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याव्यतिरिक्त   प्रसुतीपूर्व व नंतरच्या खर्चाचे बिल जरा जास्तच होते, जे मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट बिघडवायला कारणीभूत ठरते. अशात हेल्थ इंश्युरन्स घेताना मॅटर्निटी कव्हर आहे अथवा नाही याबाबत संपूर्ण माहिती घ्या, जेणेकरून आई होण्याच्या  भावनेचा तुम्ही मुक्तपणे आनंद लुटू शकाल.

टॅक्स बेनिफिट : नोकरदार महिला असाल तर हेल्थ इंश्युरन्सचे टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळतील आणि जर गृहिणी असाल तर तुमच्या पतिला. म्हणून जर तुम्ही हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी घेतली तर तुमचे बजेट तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने आखण्यात तुम्हाला सहाय्यता मिळेल. म्हणून सारासार विचार करून आणि आपल्या गरजा लक्षात घेऊन हेल्थ इंन्शरन्स पॉलिसी अवश्य घ्या.

लव, लाइफ आणि रोमांच येथे घेता येईल सर्व मजा

* गृहशोभिका टीम

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहर  ‘हार्बर सिटी’, ‘सिटी ऑफ डेस्टिनी’ इत्यादी नावानेही ओळखले जाते. अलीकडेच येथे पहिले आंतरराष्ट्रीय यॉट म्हणजे नौकांच्या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या अप्रतिम अविष्काराची येथे कमतरता नाही. जसे की, समुद्र किनाऱ्यांसोबतच सुंदर पर्वतरांगा, काचेसारखे चमकणारे समुद्राचे पाणी आणि जवळच असलेले हिरवेगार डोंगर.

येथे आल्यावर असे वाटेल की, एखाद्या चित्रकाराने अतिशय सवडीने निसर्गाच्या विशाल पटलावर रंगीबेरंगी चित्रे रेखाटली आहेत. विशाखापट्टणम शहर कोरोमांडल किनारपट्टीवर (दक्षिण-पूर्व किनारपट्टी) वसले आहे. कोरोमंडल किनाऱ्यावरून येथे वेगवेगळया दंतकथा प्रचलित आहेत. असे म्हणतात की, खरा शब्द कोरोमंडल नाही तर चोल-मंडलम होता. येथे चोल राजाचे साम्राज्य होते आणि या मंडलला तमिळ भाषेत चोल-मंडलम म्हणायचे. पण हा शब्द फ्रान्स, पोर्तुगालहून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी बोलायला कठीण होता, म्हणून ते चोल-मंडलला कोरोमंडल असे म्हणू लागले. तेव्हापासून हा किनारा कोरोमंडल नावानेही ओळखला जाऊ लागला.

स्वच्छतेत अग्रस्थानी

शहराचा संबंध गौतम बुद्धांशीही असल्याचे पाहायला मिळते. येथून १५ मीटर अंतरावर तोटलकोंडा नाव असलेल्या ठिकाणी २५०० वर्षे जुने एका बौद्ध मठाचे अवशेष सापडले आहेत. या मठाचा संबंध बौद्ध धर्माच्या महायान संप्रदायाशी असल्याचे मानले जाते. कधीकाळी हे शहर कोळी बांधवांचे गाव होते असे म्हणतात. आता येथे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न कमांडचे केंद्र आहे.

मच्छीमारांच्या आदिवासी जीवनातील साधेपणा आणि भारतीय नौदलाचा रुतबा या शहराला वेगळेपण मिळवून देतो. हे एक शांत आणि खूपच स्वच्छ शहर आहे. गेल्या वर्षी एका सर्वेक्षणात या शहरातील रेल्वे स्थानकाला देशातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून गौरवण्यात आले होते. हे देशाच्या इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छतेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

बंगालच्या खाडी किनाऱ्यावर स्थित विशाखापट्टणम येथे अनेक बीच म्हणजे चौपाट्या असल्यामुळे ते लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. किनाऱ्याला लागूनच बीच रोडही आहे, ज्याच्या पूर्वेला बीच आणि पश्चिमेला सुंदर इमारतींच्या रांगा आहेत. याच इमारतींच्यामध्ये ‘रामकृष्ण मिशन भवन’ आहे.

याच भवनाच्या नावावरून याला रामकृष्ण बीच असे नाव पडले. बीच रोडला येथील महानगरपालिकेने खूपच सुंदर प्रकारे सुसज्ज केले आहे. रस्त्याच्या कडेला तयार केलेली छोटी छोटी उद्याने आणि ठिकठिकाणी लावलेल्या मूर्ती इथला जिवंतपणा अधिकच जागवतात. उल्लेखनीय म्हणजे येथे सकाळी सात वाजण्यापूर्वी वाहतुकीवर निर्बंध आहेत कारण, येथे मोठया संख्येने स्थानिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. पहाटेच्या पहिल्या किरणापासूनच येथे जाग असते. हा देशाचा दक्षिण पूर्व किनारा असल्यामुळे येथून सूर्योदय पाहणे खूपच विलोभनीय असते. येथे समुद्र किनारी सोनेरी वाळूवर पडणारी सूर्याची किरणे खूपच सुंदर दिसतात. त्यामुळे बीच रोड या शहरासाठी एक प्रकारे सुत्रधाराची भूमिका पार पाडतो आणि कितीतरी प्रमुख आकर्षणांना आपल्या सोबत बांधून ठेवतो. याच्या आधारावर चालताना तुम्ही आयएनएस कुरसुरा पाणबुडी, एअरफोर्स संग्रहालय, मत्स्यदर्शिनी, फिशिंग डॉक, आंध्रप्रदेश टुरिझम बोर्डद्वारे संचलित बोटिंग पॉइंट आणि भीमली बीच इत्यादी येथील मुख्य आकर्षण पाहू शकता. हे सर्व एका सुंदर माळेत गुंफल्यासारखे भासतील.

सर्वात अनोखी हार्बर सिटी

विशाखापट्टणम एका छोटया खाडीवर वसलेले असल्यामुळे याला हार्बर सिटी असेही म्हणतात. व्यापाराच्या दृष्टीने हे देशातील चौथे सर्वात मोठे बंदर आहे. एके काळी व्यापाऱ्यांसाठी हार्बर सिटी विशाखापट्टणम ही कोलकाता बंदरापेक्षाही जास्त आकर्षक होती. येथे जहाज बनविण्याचा कारखानाही आहे. विशाखापट्टणम बंदर सर्वात मोठे, नैसर्गिक बंदर आहे. मोक्याचे ठिकाण म्हणूनही हे शहर खूपच महत्त्वपूर्ण आहे. या शहराशी खूप चांगली ओळख असलेले कौशिक मुखर्जी सांगतात, ‘‘दुसऱ्या महायुद्धावेळी या बंदराचे महत्त्व इतके होते की ब्रिटिश आर्मीने याच्या सुरक्षेसाठी येथे पिलबॉक्स बनवले.

पिलबॉक्स ही एक प्रकारची काँक्रीटची संरचना असते ज्याच्या आत मशीनगन ठेवतात. १९३३ मध्ये हे बंदर व्यापारासाठी खुले करण्यात आले. विशाखापट्टणम बंदरात १७० मीटर लांबीची जहाजेही थांबू शकतात. तुम्ही जर समुद्राच्या खळाळत्या लाटांसोबत दोन हात करू इच्छित असाल तर येथील ऋषीकोंडा बीच अॅडव्हेंचर प्रेमींसाठी पर्वणी आहे. हे शहरापासून सुमारे ८ किलोमीटर दूर आहे. येथे कयाकिंग, स्कुबा डायविंगसारख्या वॉटरस्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येतो. प्रोफेशनल ट्रेनरच्या देखरेखीखालीच सर्व अॅक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. येथे अनेक रेस्टॉरंट आहेत, जिथे तुम्ही तुमचा थकवा दूर करू शकता. ऋषीकोंडा बीच आंध्र प्रदेशातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. पर्यटकांची खूप गर्दी होत नसल्याने अजूनही हे स्वच्छ आहे.’’

पहिला आंतरराष्ट्रीय नौका उत्सव

अनेक महिन्यांची मेहनत आणि नौदलाच्या नियमांच्या अधीन राहून विशाखापट्टणमच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर गेल्या महिन्यात देशातील पहिला आंतरराष्ट्रीय नौका (बोटी) उत्सव साजरा करण्यात आला. याच्या सोबतच येथे पदार्पण झाले ते वॉटर स्पोर्ट्सच्या एका नव्या परंपरेचे. बीच असलेले हे शहर आता नौका पर्यटनासाठीही ओळखले जाऊ लागेल.

नौकांची सफर

सफेद आलिशान नौका जेव्हा विस्तीर्ण समुद्रात हेलकावे घेत पुढे जाऊ लागते तेव्हा पर्यटकांमधील थ्रिलिंग पाहण्यासारखे असते. येथे विविध आकाराच्या बोटी उपलब्ध आहेत. तुम्ही मोठया नौकेत या लक्झरीचा आनंद घेऊ शकता किंवा वैयक्तिक अनुभव घेण्यासाठी छोटया बोटीतूनही जाऊ शकता. छोटया बोटीत एक केबिन असते. येथे तुमच्या प्रत्येक सुविधेकडे लक्ष दिले जाते. तुम्ही या नौकेतून फिशिंगची मजाही लुटू शकता. नौकेत बसताच तुमची डोळयाची पापणी लवते न लवते तोच किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात पुढे जाता आणि मागे राहतो तो विशाखापट्टणमचा सिटीस्केप. सजलेल्या इमारतींच्या रांगा आणि त्यांच्या मागे असलेल्या टेकडया हात हलवून तुमच्याकडे कौतुकाने पाहत असल्याचा भास होतो. सुट्टीच्या काळात नौकेवर लुटलेली ही मजा तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरेल.

कुरसुरा पाणबुडी आहे शान

बीच रोडवर मोठया दिमाखात उभी असलेली कुरसुरा पाणबुडी विशाखापट्टणमची शान आणि ओळख आहे. या पाणबुडीला तत्कालीन सोव्हिएत संघातून मागविण्यात आले होते. फणिराजजी ने १५ वर्षे या पाणबुडीवर तैनात होते आणि त्याकाळी या पाणबुडीच्या क्युरेटरची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी सांगितले, ‘‘ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या पाणबुडी शाखेचा पाया होती. ३१ वर्षे केलेल्या गौरवशाली सेवेदरम्यान या पाणबुडीने ७३,५०० समुद्री मैलाचे अंतर पार पाडत नौदलाच्या जवळजवळ सर्वच कार्यात सहभाग घेतला. ‘आयएनएस कुरसुरा’ने १९७१च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. या पाणबुडीने प्रवासाद्वारे व दुसऱ्या देशात ध्वज दर्शन अभियान राबवून सभ्यता आणि सौहार्दाचा प्रचार केला होता.’’

२७ फेब्रुवारी, २००१ रोजी पाणबुडी डिसमिस करण्यात आली. म्हणजे तिला सेवेतून निवृत्त करण्यात आले. त्यानंतर कुरसुरा पाणबुडीला आर. के. समुद्र किनाऱ्यावर विशाखापट्टणमस्थित एका पाणबुडी संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले. याचे उद्घाटन ९ ऑगस्ट, २००२ रोजी करण्यात आले आणि २४ ऑगस्ट, २००२ रोजी नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले. पाणबुडीवर ७५ लोकांची ड्युटी असायची. समुद्रातून या पणाबुडीला इथपर्यंत आणण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. लोकांना पाणबुडीच्या प्रवासाची माहिती व्हावी यासाठी तिचे मॉडेल म्हणजे प्रतिकृतीद्वारे खोल समुद्रातील तिच्या वास्तविक जीवनाचे दर्शन करून देण्यात आले आहे. आज भलेही भारत पाणबुडी निर्मितीत स्वावलंबी झाला असेल पण पाणबुडीच्या इतिहासात कुरसुराचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहे.

एअरक्राफ्ट म्युझियम

कुरसुरा पाणबुडी म्युझियम समोरच एअरक्राफ्ट म्युझियम आहे. विशाखापट्टणम शहर विकास प्राधिकरणाने सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून हे अनोखे संग्रहालय तयार केले आहे. याचे उद्घाटन गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते. या संग्रहालयात तुम्ही टी यू १४२ या विमानाच्या आत जाऊनही पाहू शकता. या संग्रहालयात बऱ्याच गॅलरी आहेत, जिथे प्रतिकृतींच्या सहाय्याने भारतीय हवाई दलाचे कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. नागरिकांना खास करून मुलांना हे म्युझियम आकर्षित करते. याच्या बाहेर अल्फाबेट लावण्यात आले आहेत. ज्याच्यासोबत सेल्फी घेण्याची क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळते.

जेव्हा डेटवर लफंगे टपकतील

– मोनिका गुप्ता

आपल्या देशात प्रेमात पडणे तितके कठीण नाही, जितके प्रेम निभावण्यासाठी प्रियकर-प्रेयसीचे एकमेकांना भेटणे. शहरांमध्ये तर प्रेमी युगुलांनी भेटण्यासाठी ठिकाण ठरविणे हे महासंकट असते. शाळा किंवा नोकरीच्या ठिकाणी भेटल्यास लैला-मजनूचा टॅग लागतो. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करायचे ठरविले तर लफंगे, मवाली त्रास देतात.

केवळ बोलण्यापुरते अशा भेटींसाठी मॉल सुरक्षित असतात, पण तिथे कोणीतरी ओळखीचे दिसण्याची भीती असते किंवा तेथील सीसीटीव्हीत अडकण्याची शक्यता असते. अशा परिस्थितित प्रेमी जीव एखाद्या पार्कमध्ये प्रेमाच्या गुजगोष्टी करण्याचा विचार करतात, शिवाय पार्कसारख्या ठिकाणी जाणे खिशालाही परवडणारे असते. इतर ठिकाणी अनावश्यक खर्च वाढण्याची भीती आहे. पण पार्कमध्ये टपोरी, लफंग्यांपासून बचाव करणे फारच कठीण होऊन जाते.

पूर्वी प्रेमीयुगूल एकमेकांना भेटण्यासाठी आसुसलेले असत, पण आज ज्यांना आपण पाहतो ते कुठेही उघडपणे प्रेमात हरवलेले दिसतात. काहीजण पार्कमध्ये, काही किल्ल्यात लपूनछपून प्रेम करताना दिसतात. पण त्यांना लुबडण्यासाठी लुटारूही आसपासच फिरत असतात.

लुटारू कोणीही असू शकतात. कुणी पोलीस किंवा मग तृतीयपंथी. त्यांची बरीच रूपे असतात, जी ओळखणे सोपे नाही.

अशाच काही लुटारूंनी रिया आणि सुमितला लुटले. रिया आणि सुमित बऱ्याचदा रविवारी एकाच गार्डनमध्ये भेटत असत, पण त्यांना माहीत नव्हते की ते कोणाच्यातरी नजरेचे शिकार ठरत आहेत.

रिया आणि सुमित जेव्हा कधी गार्डनमध्ये येत, तेव्हा त्यांची जागा ठरलेली असायची. ते ठरलेल्याच बाकडयावर येऊन बसत. तासन्तास एकमेकांसोबत बसून रोमँटिक गप्पा मारत. त्या रविवारीही दोघे त्याच बाकावर येऊन बसले. गप्पांच्या ओघात कधी संध्याकाळ झाली ते त्यांना कळलेदेखील नाही. रिया घरी जाण्यासाठी घाई करू लागली, पण सोनेरी संध्याकाळ पाहून सुमित अधिकच रोमँटिक झाला. रिया त्याला नकार देऊ शकली नाही आणि दोघेही आणखी थोडा वेळ तेथे थांबले.

अंधार पडला होता. रिया सुमितला म्हणाली, ‘‘सुमित, आता आपण निघायला हवे. खूपच अंधार झाला आहे.’’

जाण्यापूर्वी, दोघेही एकमेकांना मिठी मारणार इतक्यात दोन पोलीस त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने सुमितची कॉलर पकडून मारू लागला. रियाचीही छेड काढण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत नेमके काय घडतेय, हे रिया आणि सुमितला समजतच नव्हते.

पोलिसांनी रियाची सोन्याची अंगठी, गळयातील चेन आणि सुमितचे एटीएम कार्ड, रोख रक्कम सर्व हिसकावून घेतले. सोबतच पुन्हा या पार्कमध्ये दिसल्यास किंवा घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकीही दिली.

त्यावेळी रिया आणि सुमित घाबरले होते. त्यामुळे निमुटपणे तेथून निघून गेले. मात्र दोघांच्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले होते. पोलीस असे का वागतील, फार तर ते ओरडतील, समजावतील. पण इथे तर त्यांनी आपल्याला लुबाडले. मग त्यांनी पोलीस ठाण्यात जायचे ठरविले.

पोलीस ठाण्यात दोघांनी घडलेला प्रकार सांगितला. सर्व हकिकत ऐकल्यावर पोलिसांचे म्हणणे होते की ते दोघे पोलीस नव्हतेच. हे ऐकून रिया आणि सुमित एकमेकांकडे बघतच राहिले. दोघांनाही आश्चर्य वाटले. मनोमन त्यांना असा प्रश्न भेडसावत होता की जर ते पोलीस नव्हते तर मग कोण होते ?

इन्स्पेक्टरने रिया आणि सुमितला समजावत सांगितले की हे लोक वेषांतर करून वेगवेगळया ग्रुपमध्ये विभागले जातात. त्यांचे काम असते लोकांना लुबाडणे. ते जास्त करून पोलीस किंवा तृतीयपंथी बनून लुटतात. म्हणून अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हीही प्रेमीयुगूल असाल आणि अशाच प्रकारे पार्कसारख्या ठिकाणी जात असाल तर तेथे लुबाडणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या :

* फिरताना वेळेची मर्यादा पाळा.

* अशा ठिकाणी दागिने किंवा गरजेपेक्षा जास्त पैसे स्वत:जवळ ठेवू नका.

* स्वत:जवळ पेपर स्प्रे ठेवा.

* सामसूम ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबू नका.

* तुम्ही एकाच ठिकाणी परत परत जात असाल तर साधेपणानेच जा.

* महिला हेल्पलाईन क्रमांक स्वत:जवळ ठेवा.

* फोनचे लोकेशन ऑन ठेवा.

* असे वागू नका की ज्यामुळे कोणी तुमच्याकडे आकर्षित होईल.

आजच्या काळात लूटमार हा धंदा बनला आहे. आपण अनेकदा पाहतो की तृतीयपंथी अशा ठिकाणी जास्त करून दिसतात, जिथे प्रेमीयुगुलांचा वावर असतो. शिवाय यात बरेचसे तृतीयपंथी नसतातच. तृतीयपंथींच्या वेशात सामान्य लोक लूटमार करू लागले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी आपल्या पार्टनरसोबत अंतर ठेवूनच बसा, जेणेकरून कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकणार नाही.

वर्दीचा रुबाबच असा असतो की कुणीही त्याला घाबरतो. अशा वेळी तोतया पोलीस कसा ओळखायचा, हा मुद्दा गंभीर आहे. यासंदर्भात पोलीस कर्मचारी रविंदर सिंह यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे तोतया पोलिसाला ओळखणे सोपे होईल

* तोतया पोलिसाच्या गणवेशावर त्याच्या नावाचा बॅच नसतो.

* नीट पाहिल्यास लक्षात येईल की पोलिसांचे बूट वेगळे असतात. त्याचा रंग तपकिरी असतो आणि तोतया पोलीस हे विसरतात. कुठलेही बूट घालतात. अशावेळी तुम्हाला त्यांना सहज ओळखता येईल.

* त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनही तुम्ही त्यांना ओळखू शकाल. कोणताच पोलीस कर्मचारी छोटया छोटया कारणांसाठी तुमच्यावर हात उगारणार नाही.

* त्यांचे केस वेगळयाप्रकारे कापलेले असतात.

* खरा पोलीस तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. तो नम्रपणेच वागेल.

आकर्षण आहे की प्रेम

* पूनम अहमद

३० वर्षीय अमित एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर आहेत. युवावस्थेतील पहिल्या आकर्षणाबाबत बोलताना त्यांनी हसत सांगितले, ‘‘मी दहावीत होतो. ती माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान होती. ती शाळेतल्या मुलींमध्ये खूपच लोकप्रिय होती आणि मीसुद्धा तिचा चाहता होतो. आज मला आठवत नाही की मला तिच्याबद्दल इतके आकर्षण का होते, मी तिची एक झलक पाहण्यासाठी धावतपळत शाळेत जात असे. एका नृत्य स्पर्धेत मला तिच्यासोबत नृत्य करायचे होते. मी खूपच खूश होतो. ही माझ्या पहिल्या रोमान्सची सुरुवात होती. जसे की त्या वयातील नाते टिकत नाही, आमचेही नाते लवकरच संपले. मला असे वाटायचे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु मला आश्चर्य वाटले कारण महिन्याभरातच माझ्या मनातून तिचा विचार निघून गेला होता. मी समजून गेलो की हे इन्फॅच्युएशन म्हणजे विरुद्धलिंगी आकर्षण होते.’’

तज्ज्ञांच्या मते, इन्फॅच्युएशन हे अत्यंत तीव्र पण थोडया काळासाठीचे प्रशंसक भाव असतात. याला आकर्षण, आसक्ति किंवा क्रश असेही म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक अंशू जैन यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला त्या व्यक्तिसोबत राहण्याची तीव्र इच्छा होती. त्या व्यक्तिमुळे तुमचे विचार, झोप, दिनक्रम आणि खाण्याच्या सवयींवरही परिणाम होतो.’’

इन्फॅच्युएशन ब्रेन केमिस्ट्रीत जागा निर्माण करते. जिथे पुरुष सडपातळ, स्मार्ट महिलांकडे तर, महिला उच्चपदस्थ किंवा उच्चशिक्षित पुरुषांकडे आकर्षित होऊ शकतात. आधुनिक नात्यात बरेच बदल झाले आहेत. अंशूचे म्हणणे आहे की इन्फॅच्युएशनमध्ये अनेकदा आपल्याला वाटते की आपण प्रेमात पडलो आहोत, पण असे काहीच नसते. ते सहजपणे अगदी कधीही संपू शकते.

कसे ओळखावे

इन्फॅच्युएशन ओळखण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेतज्ज्ञ काय टीप्स देतात, हे जाणून घेऊया :

२७ वर्षीय देविका शर्मा सांगतात की, ‘‘कॉलेजमध्ये एका अतिशय हुशार आणि सर्जनशील व्यक्तीबाबत मला खूपच आकर्षण वाटू लागले. मला त्याच्याशी संबंध ठेवण्याची इच्छा होती. मग अचानक तो माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला. मला त्याच्याशी बोलण्याची जसजशी संधी मिळत गेली तसे माझ्या लक्षात आले की मला वाटत होते तसे त्यांच्यात  काहीच नव्हते. त्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला काहीच वाटेनासे झाले. आमच्यात काहीही साम्य नव्हते. माझ्या मनात त्याच्याबद्दल ज्या भावना होत्या, त्या रातोरात नाहीशा ?ाल्या. खरंतर त्याने मला संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्याच्यातील मा?ा इंटरेस्ट संपला होता.’’

सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या मते, ‘‘आपल्या मेंदूत असलेल्या काही प्लेजर सेंटरमधून डोपामाइनचे जास्त प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे मनातील आकर्षणाप्रति असीम प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. त्याचवेळी सेरोटोनिनची पातळी, जी चांगल्या भावनांसाठी जबाबदार असते, ती कमी होऊ लागते. परिणामी, आपल्या भावनांमध्ये बरेच चढउतार दिसून येतात. प्रिय व्यक्ती जी काही प्रतिक्रिया देत असते, त्यानुसार मूड बदलू लागतो.’’

काय करावे

जेव्हा तुम्हाला एखाद्याबाबत आकर्षण वाटते तेव्हा तो खरोखरच कसा आहे, हे जाणून न घेताच तुम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वातील फक्त एखाद्याच भागाकडे पाहात असता. डॉक्टर रवी यांचं म्हणणं आहे, ‘‘आकर्षणाला प्रोत्साहन देऊ नका, आसक्तीमधून थोडेसे बाहेर पडा. यामुळे विरुद्ध लिंगी आकर्षणामागील योग्य तर्क तुमच्या लक्षात येईल.’’

प्रिय वाटणाऱ्या या व्यक्तींच्या नकारात्मक बाबीही तपासून पाहा. यांच्यातील उणीवांचा विचार करा. इव्हेंट मॅनेजर जयेश सांगतात, ‘‘शाळेत असताना मी माझ्या वर्गातील सर्वात सुंदर मुलीकडे आकर्षित झालो. मी तिच्या बाजूच्याच बाकावर काही दिवस बसत होतो. तिच्याशी बोलण्याची हिंमत जास्त करू    शकत नव्हतो. पण तिच्याकडे मी ओढला जात होतो.

‘‘एके दिवशी मी तिला मनातले सांगितले. तेव्हा मला समजले की तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे आणि योग्य वेळ येताच ती त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळी मला एक धडा मिळाला की आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून दूर जाण्यासाठी शक्य तितका वेळ मित्र आणि कुटुंबासह घालवायला हवा. यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील प्रिय व्यक्तिची ओढ सतावत नाही किंवा तिची आठवण काढायला जास्त वेळ मिळत नाही.’’

डॉक्टर अखिल श्रॉफ सांगतात, ‘‘तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची वाढलेली पातळी तुमच्या मन:स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यासाठी भरपूर व्यायाम करा.’’

जेव्हा एखाद्या प्रति इन्फॅच्युएशन, जाणवते, तेव्हा त्या व्यक्तिला कृती आणि त्याच्या शब्दांकडे खूप लक्ष देतो. वारंवार त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलकडे पाहतो. मानसोपचारतज्ज्ञ पवन गोस्वामी सांगतात, ‘‘अशा वेळी त्या व्यक्तिपासून शारीरिक आणि वर्चुअली अंतर ठेवा. स्वत:ला त्या व्यकितपासून दूर ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.’’

४० वर्षीय स्वाती भटनागर आपला अनुभव शेअर करताना सांगतात, ‘‘जेव्हा मी २८ वर्षांची होते तेव्हा माझ्या हँडसम कलीगच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नसे. कामात लक्ष लागत नव्हते. मी लवकर ऑफिसला जायचे आणि त्याच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधायचे. मग एके दिवशी मला समजले की ज्याच्याबद्दल मला ओढ वाटतेय, तो विवाहित आहे. माझे हृदय दुखावले गेले. तेव्हा लक्षात आले की केवळ मीच त्याच्याकडे आकर्षित झाले होते.’’

तज्ज्ञ सांगतात की, भलेही तुम्हाला ज्याच्याबद्दल आकर्षण आहे तोही तुमच्याच प्रमाणे त्याच्या भावना व्यक्त करेल, पण त्याच्याशी प्रामाणिकपणा दाखवणे गरजेचे आहे. दोघांनीही या नात्यातील एकमेकांच्या उणीवा आणि चांगल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

डॉ. पवन यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘स्वत:च्या आत्मसन्मानाची काळजी घ्या. स्वत:वर प्रेम करा, स्वत:बद्दल चांगले वाटण्याचा अनुभव घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.’’

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता देशमुख सांगतात, ‘‘जर तुम्ही दुसऱ्याबद्दल योग्य जास्तच विचार करत असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असाल तर स्वत:च्या विचारांवर गांभीर्याने लक्ष द्या. नोंदवही तयार करा. आपला उद्देश स्पष्टपणे लिहा. काहीसा असा दिनक्रम तयार करा की तुम्हाला या अनैच्छिक आकर्षणाबाबत विचार करायला वेळच मिळणार नाही.’’

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी काही गोष्टी मागे सोडून जाणेच चांगले असते. प्रेमाच्या मागे धावू नका, तर स्वत:ला असे बनवा जेणेकरून लोकांनाच तुमच्याजवळ यावेसे वाटेल.

तुम्हीही जर कोणासाठी असाच अनुभव घेत असाल तर निश्चितच आकर्षणाच्या जाळयात अडकले आहात.

* तुम्ही त्याचाच विचार करता आणि स्वतऱ्च्या कामावर लक्ष देणे तुमच्यासाठी कठीण होते.

* संपर्काचे कोणतेही साधन जसे की व्हॉट्सअॅप, इमेल असो किंवा फोन, त्या व्यक्तिशी संपर्क होताच तुम्ही उत्साहित आणि उत्तेजित होता.

* तुमची एनर्जी लेव्हल अतिशय वाढते. ना तुम्हाला झोप हवी असते ना जेवण.

* तुम्हाला तो परफेक्ट वाटतो. त्याच्यात काहीच कमतरता जाणवत नाही.

* त्याच्याजवळ राहणाऱ्यांबाबत तुम्हाला असूया वाटते.

* अपेक्षित असलेला प्रतिसाद त्याच्याकडून न मिळाल्यास तुम्हाला असुरक्षित वाटते. टेंशन येते.

* तुम्ही अस्वस्थ होता आणि कोणतीही रिस्क घ्यायला तयार असता.

फळबागेचा हंगाम आला आहे

* मोनिका अग्रवाल

बागकाम करणे प्रत्येकालाच आवडते. मग हा छंद स्वत:च पूर्ण करा किंवा माळी ठेऊन. पण बागकाम करण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ तर द्यावाच लागतो. रंगीबेरंगी फुलांनी संपूर्ण बाग सजवण्यासाठी आपल्याला झाडे, वनस्पती आणि कुंडया यांची काळजी तर घ्यावीच लागेल. असे नाही की फक्त ४-५ रोपे लावलेली आहेत आणि संपूर्ण बाग सजली आहे किंवा कुंडयांत फक्त पाणी भरून दिले आणि बागकाम पूर्ण झाले.

रोपे लावल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणेदेखील आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास त्यात खते आणि कीटकनाशकेही वापरली जातात. कुंडयांचा वापर, कोणत्या प्रकारचे बियाणे पेरले पाहिजे, किती सूर्यप्रकाश दाखवायचा आहे, रोपासाठी कोणते तापमान आवश्यक आहे? किती पाणी, किती खत देणे आवश्यक आहे? या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काहीशी अशी :

हवामान : पावसाळयात गुलमेहंदी, गुमफरीना, नवरंग, मुरगकेश इत्यादी वनस्पती लावता येतील. तसेच हिवाळयाच्या हंगामात वनफूल, पितुनिया, डेलिया, झेंडू, गुलदाऊदी इत्यादींची लागवड करता येईल. याखेरीज बारमाही फुलांची रोपे जसे जास्वंद, रातराणी, बोगनविलिया यांचीदेखील लागवड करता येते. आपण बरेच रोपे लावणे आवश्यक नाही. आपण तेवढेच रोपे लावावित, जेवढयांची काळजी सहज घेता येऊ शकेल.

जर आपल्याला फक्त फुलांची रोपे लावायची असतील तर आपण पितुनिया, साल्व्हिया, स्वीट विलियम, स्वीट एलिसम, चीनी मॉट, जिनिआ, रोझमेरी, गमफरीना, सूर्यफूल आणि डेलियासारखे पर्याय निवडू शकता आणि जर बाग सजलेल्या वनस्पतींनी सजवायची असेल तर कोलियस इंबेशन इत्यादी उत्तम आहेत.

मनिप्लांट, क्रोटॉन, कॅक्टस आणि ड्रायझिनसारख्या काही वनस्पती घरातील वनस्पती आहेत म्हणजेच आपण या वनस्पती सावलीत, खोलीत कोठेही लावू शकतो.

या सर्वांमध्ये, मनिप्लांट एक शोधण्यास सुलभ आणि नेहमी हिरवी असणारी वनस्पती आहे. तिच्या हिरव्या पानांवरील हलके हिरवे पांढरे डाग सुंदर दिसतात. कॅक्टस ही अशीच आणखी एक घरातील वनस्पती आहे. या काटेरी झाडांचीही काळजी घ्यावी लागते. यांची लागवड करतांना कडुलिंबाची खळी, शेणखत आणि वाळू हे समान प्रमाणात मातीमध्ये मिसळावे. पाणी फारच कमी द्यावे लागते. दर वर्षी झाड कुंडीतून काढावे आणि सडलेली मुळे तोडावीत आणि पुन्हा ते कुंडीत लावावे. जोरदार उन्हात किंवा मुसळधार पावसात झाडे सावलीतच ठेवणे चांगले असते. त्यांच्या वेळेनुसार त्यांना फुले येतात, ज्यांचे सौंदर्य पाहतच राहावेसे वाटते.

झेंडू : वर्षातून ३ वेळा झेंडूची लागवड करता येते. नोव्हेंबर, जानेवारी आणि मे-जूनमध्ये. हे कीटकांपासून संरक्षित असते. यात अनेक प्रकार आहेत. जसे हजारा, मेरी गोल्ड, बनारसी किंवा जाफराणी जे फारच लहान फुले देतात. जर आपण याची फुले सुकवून ठेवली तर आपण पुढच्या हंगामासाठी वनस्पती तयार करू शकता. सुकलेले फूल बियाण्यासाठी तयार होते.

जास्वंद : दुसरे फूल जास्वंदाचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये याची लागवड केली पाहिजे. जास्वंद अनेक रंगांचे असते. जसे की लाल, गडद लाल, गुलाबी, जांभळा, निळा इ. त्यात वेळोवेळी खत घालावे. नियमित सिंचनदेखील आवश्यक आहे.

सूर्यफूल : सूर्यफूल एक सुंदर वनस्पती आहे. त्याचे अनेक आकार आहेत. मोठे सूर्यफूल कोबीच्या फुलापेक्षा मोठे असते. त्याच्या बियांपासून तेलदेखील काढले जाते. लहान सूर्यफूल भरपूर पिवळी फुले देतात. एप्रिलमध्ये याची लागवड करावी. हे बागेची शान वाढवते.

जिनिआ : आणखी एक सुंदर दिसणारी वनस्पती म्हणजे जिनिआ. ती ३ प्रकारात उपलब्ध आहे. मोठया फुलांची, लहान झाडांची आणि कम अगेन प्रकाराची. लहान प्रकाराला पर्शियन कारपेट म्हणतात. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये याची लागवड करावी, जेणेकरून ते पावसाळयातील कीटकांपासून वाचू शकेल.

तुळशी : ही बहुतेक प्रत्येक घरात आढळते. तिचे रामा तुळशी, श्यामा तुळशी आणि बन तुळशी असे तीन प्रकार आहेत. वर्षाच्या कोणत्याहीवेळी हीची लागवड करता येते. रामा आणि श्यामा बहुतेक घरांच्या अंगणात आढळते. ही एक औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. ही वनस्पती वातावरण शुद्ध ठेवते. हीची पाने चघळल्यामुळे बरेच आजार टाळता येतात.

डेलिया : डेलिया, क्यारीत आणि कुंडीत अशा दोन्ही ठिकाणी वाढवले जाऊ शकते. यास वाढण्यास पूर्णपणे मोकळया जागेची आवश्यकता असते, जेथे कमीतकमी ४ ते ६ तास सूर्यप्रकाश येत असावा.

रोपांच्या लागवडीची पद्धत

रोपांची लागवड करण्याची उत्तम पद्धत म्हणजे रोपे कटिंगद्वारे तयार करणे. जुन्या वनस्पतींच्या फांद्याच्या वरच्या भागापासून ८ सेमी लांबीचे कटिंग कापून घ्या. यांना जाड वाळूत २ इंच अंतरावर दीड इंच खोलवर लावा. लागवड केल्यावर, ३ दिवस कटिंग लावलेल्या कुंडया सावलीच्या जागी ठेवा. १५ दिवसानंतर, त्यांच्यामधून मुळे बाहेर येतील. त्यानंतरच ते १० ते १२ इंचाच्या कुंडयात लावावेत. ही झाडे अधिक सूर्यप्रकाश किंवा पाण्याने कोमजतात, याची विशेष काळजी घ्या.

एखाद्या कुंडीत जर रोपाची लागवड करायची असेल तर तिच्यात ३ भाग माती आणि १ भाग शेणखताने भरा. वरचा भाग कमीतकमी १ ते दीड इंच रिक्त असावा जेणेकरून पाण्यासाठी जागा असेल. एका कुंडीत एकच रोप लावा. रोपे लावल्यानंतर ताबडतोब पाणी दिले पाहिजे आणि जर क्यारीत लागवड केली असेल तर ४०-५० सें.मी. अंतरावर लावा. क्यारिला १० ते १२ इंच खोल खणून घ्या. यानंतर, १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, १०० ग्रॅम सल्फेट पोटॅशियम, २५ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति चौरस मीटर क्षेत्रानुसार द्या. तसेच, फुलांना चमक देण्यासाठी, १० लिटर पाण्यात १ चमचे मॅग्नेशियम सल्फेट मिसळून उभ्या पीकांवर फवारणी करावी.

क्यारियां दगड गोटयांविरहित असाव्यात. त्यांच्या मातीत ५ किलो प्रति चौरस मीटरनुसार शेणखत अवश्य टाकावे (३ भाग माती + १ भाग शेण खत + २५ ग्रॅम यूरिया + ५ ग्रॅम डीएपी + २५ ग्रॅम हाडांचे खत + वाळू).

जर तुम्हाला कुंडयांमध्ये डेलिया वाढवायचे असतील तर किमान १२ ते १४ इंचाच्या कुंड्या अवश्य घ्या. कुंड्यात समान प्रमाणात माती आणि शेणखत भरा. हे लक्षात ठेवा की कुंडयाचा वरचा भाग कमीतकमी दोन ते अडीच इंच रिक्त असेल जेणेकरून कुंडयांमध्ये पाण्यासाठी जागा मिळेल.

उन्हाळयात आठवडयातून २ वेळा पाणी देणे आवश्यक आहे. हिवाळयाच्या हंगामात, वनस्पतींना ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

स्पर्म डोनर्समुळे बसतोय ठकवणुकीवर आळा

* बीरेंद्र बरियार ज्योति

स्पर्म डोनरच्या वाढत्या प्रभावाने भंपक डॉक्टर्स आणि तांत्रिकांच्या ठकवणुकीच्या धंद्याला जोरदार फटका बसला आहे. मुलाला जन्म न देऊ शकणाऱ्यांबाबत पुरुषांच्या नावाला काळिमा, पुरुषी ताकदीचा अभाव आणि न जाणे नको त्या अफवा पसरवून हे अपत्यहीन लोकांना फशी पाडत असतात.

स्पर्म डोनरमुळे आई बनण्याचं सुख प्राप्त केलेली पाटणाची एक महिला सांगते की संततीप्राप्तीसाठी तिने आणि तिच्या पतीने पाटणा, दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, वगैरेंच्या डझनभर भंपक सेक्स स्पेशालिस्टकडून उपचार करून घेतले परंतु अपत्य झालं नाही. चार वर्षं त्या लोकांकडून उपचार करवून जवळपास ४ लाख रुपये खर्च केल्यानंतरही संततीप्राप्तीचं स्वप्नं पूर्ण झालं नाही. जेव्हा पाटणा येथून एका नातलगाने इनफर्टीलिटी क्लीनिकविषयी सांगितलं तेव्हा तिथे उपचार घेतल्यावर त्यांना मुलगा झाला.

वाढली मागणी

स्पर्म डोनर्सचा प्रभाव वाढल्याने हळूहळू का असेना परंतु ढोंगी बाबाबुवा, मांत्रिक आणि तांत्रिकांची दुकानं बंद होऊ लागली आहेत. समाजात गेल्या काही वर्षांपासून स्पर्म डोनर्सची मागणी वाढत आहे आणि संततीच्या अपेक्षेने लोक स्पर्म डोनर्सची सेवा घेऊ लागले आहेत. डोनर्स बक्कळ कमाई करण्यासोबतच अनेक अपत्यहीन लोकांच्या घरात पाळणा हलवण्यास कारणीभूत ठरले आहेत. अनेक लोक स्पर्म डोनेशनला घाणेरडा धंदा म्हणत दूषणं देतात, तर अनेक लोक याला आजच्या काळाची मागणी सांगत यांचं कौतुक करत आहेत. पुरुषांमध्ये प्रजननक्षमतेच्या अभावाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये स्पर्म डोनर अनेक घरांमध्ये पुरुषांच्या नपुंसकत्वावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत आणि अनेक संसार मोडण्यापासून वाचवत आहेत. सोबतच बाळाच्या आकांक्षेपायी अनेक लोकांना भंपक डॉक्टर्स, बाबाबुवा आणि तांत्रिकांच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचवत आहेत.

इनफर्टीलिटी क्लीनिक आणि डॉक्टरांच्या माध्यमातून स्पर्म डोनेशनच्या कार्यात शेकडो तरुण सहभागी आहेत, जे शिक्षण आणि कोचिंगसोबत स्पर्म डोनरचं कामही करत आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू यांसारख्या शहरातून निघून आज अनेक डोनर छोट्या शहरात पोहोचले आहेत.

पाटणाच्या एका मोठ्या इनफर्टीलिटी क्लीनिकच्या डॉक्टरांनुसार पाटणासारख्या शहरात जवळपास शंभराहून जास्त स्पर्म डोनर काम करत आहेत, जे सर्व कायदेशीररित्या स्पर्म बॅँक वा इनफर्टीलिटी सेंटरद्वारे रजिस्टर्ड आहेत. या सर्व व्यवहारात अतिशय गुप्तता बाळगली जाते. स्पर्म घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला एकमेकांविषयी काहीच माहीत नसतं. स्पर्म देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं.

अपत्यहीनांसाठी फायदेशीर

स्त्रियांमध्ये वांझपणा आणि पुरुषांमध्ये प्रजननक्षमता नसूनही अशी दाम्पत्य संततीप्राप्तीचं सुख अनुभवू शकतात. इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर हिमांशू राय सांगतात की ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या नगण्य असेल वा मग ते खूप महागडे उपचार करण्यास सक्षम नसतील तर अशा स्थितीत डोनर स्पर्मद्वारे महिलांना गर्भधारणा करवून घेता येईल. यामुळेच आज डोनर स्पर्मची मागणी खूप वाढली आहे. दुसरीकडे भाड्याने गर्भ (सरोगेट मदर) घेऊन पुरुषांच्या शुक्राणूद्वारे गर्भधारणा करून संततीसुख प्राप्त करता येतं.

पुरुषांमध्ये प्रजननक्षमता कमी असण्याची अनेक सारी कारणं आहेत. डॉ. सोनिया मलिक सांगतात की आजच्या धावपळीच्या जीवनात पुरुषांमधील प्रजननक्षमता कमी होऊ लागली आहे. आजार, व्यसनाधिनता, कामाचा तणाव, अनियमित आहार, तंग कपडे आणि वाढतं प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे प्रजननक्षमता कमी होऊ शकते. दुसरीकडे मोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या अधिक वापरानेही पुरुषांची प्रजननक्षमता कमी होत आहे. यांच्या अति वापरामुळे ऑक्सीडेंटिव्ह स्टे्रस वाढतो आणि ऑक्सिजनची कमतरता भासते, ज्यामुळे डीएनए डॅमेज होते. यामुळे स्पर्म काउंट कमी होतो आणि शुक्राणूंमध्ये अडथळा येतो. हे सर्व टाळून वा कमीत कमी वापर करून आणि नियमित व्यायाम करून पुरुष आपली प्रजननक्षमता कायम राखू शकतात.

सुरक्षित व गोपनीय

इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट २० ते २६ वर्षांच्याच तरुणांचे स्पर्म घेतात, ज्यामध्ये बहुतेक इंजिनीअरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी असतात. इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट सांगतात की, प्रत्येकाचे स्पर्म घेतले जातातच असं नाही. केवळ विद्यार्थ्यांचेच स्पर्म घेतले जातात आणि त्यातही १०-१२ जणांची स्पर्म टेस्ट केल्यानंतर अवघ्या १-२ जणांचेच स्पर्म पूर्णपणे अस्सल आढळून येतात. डोनेशनसाठी आता युवकांना बोलावण्याची गरज भासत नाही. आपले स्पर्म डोनेट केलेले विद्यार्थीच इतर विद्यार्थ्यांना पाठवतात.

पाटणामध्ये जवळपास ८०० स्पर्म सॅम्पल विकले जातात. स्पर्म देणारे इंजिनीअरिंग वा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना रू. ४ ते ५ हजार रुपये मिळतात, याउलट सामान्य विद्यार्थ्याला प्रति डोनेशन रु. १ ते दीड हजार दिले जातात. कोणत्याही एका डोनरकडून महिन्याला ४-५ वेळाच डोनेशन घेतलं जातं.

डॉक्टरांचं मत आहे की वयस्क आणि नोकरपेशे लोक खूप तणावात असतात वा दीर्घ काळापासून कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या अधीन असतात, ज्यामुळे त्यांचे स्पर्म उपयुक्त नसतात.

इनफर्टीलिटी क्लीनिकचे संचालक सांगतात की स्पर्म डोनेशनच्या कामात पूर्णपणे गोपनीयता बाळगली जाते. डोनरला हे सांगितलं जात नाही की त्याचा स्पर्म कुणाला दिला जाईल आणि स्पर्म घेणाऱ्यालाही हे सांगितलं जात नाही की त्याला कुणाचा स्पर्म देण्यात आला आहे. आता तर रक्तगट जुळल्यावरच स्पर्म दिला जातो जेणेकरून पुढे अडचण येऊ नये.

सोपी व्हावी संततीप्राप्ती

महिला डॉक्टर जगदीश्वरी मिश्रा सांगतात की, विवाहानंतर जेव्हा मूल होत नाही, तेव्हा बहुतेकदा दोष स्त्रियांच्या माथी मारला जातो. पुरुष स्वत:ची चाचणी करून घेत नाहीत आणि दुसरं नंतर तिसरं लग्न करत जातात. हे थांबवण्याची गरज आहे. अशिक्षित वर्ग स्त्रियांना मूल न झाल्यास बाबाबुवा, मांत्रिकतांत्रिकाकडे घेऊन जातो, परंतु  त्यानंतरही मूल होत नाही तेव्हा डॉक्टरांकडे नेतात. बहुतांशी प्रकरणांत चाचणी केल्यास दिसून येतं की स्त्रीमध्ये समस्या नसते तर तिच्या पतीमध्येच शारीरिक कमतरता आहे. तेव्हा डॉक्टरांनी पत्नीसोबत तिच्या पतीचीही चाचणी केली पाहिजे आणि कुणामध्ये कमतरता आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. आज वैद्यकशास्त्र आणि उपचार इतके विकसित झाले आहेत की कोणतंही दाम्पत्य संततीसुखापासून वंचित राहू शकत नाही.

डॉक्टर दिवाकर तेजस्वी सांगतात की स्पर्म डोनेशनचा वाढता प्रभाव समाजासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अपत्यहीन पतिपत्नी मुलाच्या आकांक्षेपायी विनाकारण भटकत बसत नाहीत, शिवाय ते फसवणुकीला बळी पडण्यापासून बचावतात. जर डोनर स्पर्मविषयी उत्तम पद्धतीने जागरूकता मोहीम राबवण्यात आली, तर यामुळे संपूर्ण समाजाचं भलं होऊ शकतं.

पेमेंट एप्स गृहिणींसाठी सोपा मार्ग

– शैलेंद्र सिंह

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट अॅपमध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

विचारपूर्वक वापरा क्रेडिट कार्ड

* प्रतिनिधी 

पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर तर क्रेडिट कार्ड अधिकच महत्त्वाचं झालंय.

खरंतर याचं एक वास्तव म्हणजे क्रेडिट कार्डने खरेदी करतेवेळी थोडीशी लालूच वाढते आणि तेव्हा स्वत:वर नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसतं. अशावेळी थोडासा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही एकाचवेळी क्रेडिट कार्डचं सर्व लिमिट संपवाल आणि हप्ते भरताना तुम्ही अडचणीत याल वा गरजेला खर्च न करण्याची पाळी येईल.

क्रेडिट कार्ड फायद्याची वस्तू आहे. तर जाणून घेऊया, अशा ६ टिप्स, ज्या उत्तम खरेदीसोबतच क्रेडिट कार्ड हुशारीने वापरण्याची योग्य पद्धतही माहीत करून देतील :

  • क्रेडिट कार्डने खरेदी करतेवेळी प्रत्येक वेळी तुम्ही रिवॉर्ड पॉईंटस कमावता. अनेकदा १००-२५०च्या खरेदीवर तुम्हाला १ पॉईंट मिळतो. मात्र हे वेगवेगळे कार्ड आणि बँकेवर अवलंबून असतं. यासाठी चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जमविलेल्या पॉइंट्सबाबत अपडेट राहा आणि शॉपिंगचं पेमेंट करताना हेदेखील वापरा. अशाप्रकारे तुमची खास बचत होऊ शकते.
  • क्रेडिट कार्डने खरेदी केल्यानंतर तुमच्या मोबादल्यामध्ये सर्व पेमेंट डिटेल्स आणि इन्स्टॉलमेण्टचे रिमाइंडर लावा, यामुळे ड्यू डेटपूर्वीच तुम्हाला हे क्लीअर करायचंय याची आठवण राहील. तसंच नंतर तुमच्यावर व्याजाचं ओझं राहाणार नाही. लक्षात असू द्या की, जोपर्यंत तुम्ही पहिलं पेमेंट चुकतं करत नाही तोपर्यंत अधिक खरेदी करू नका.
  • विनाकारण खर्च करू नका. कधीही बंपर ऑफर्स वा सेल पाहून याचा सर्व फायदा आताच घ्यावा असं अजिबात करू नका. लक्षात ठेवा की, कंपन्या आणि ब्राण्ड्स अनेकदा कोणती ना कोणती ऑफर घेऊन येतच असतात. अशावेळी घाई करू नका. अन्यथा व्याजासोबत याचं अधिक ओझं तुमच्या पाकिटावर पडू शकतं.
  • बजेटपेक्षा थोडा कमी खर्च करण्याचं टार्गेट बनवा. जर तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट १ लाख असेल तर ८० हजारात तुमचं शॉपिंग आटपा. असं केल्याने गरजेच्यावेळी तुम्ही या वाचविलेल्या क्रेडिटचा वापर करू शकता.
  • दर महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्डची स्टेटमेण्ट बारकाईने चेक करण्याची सवय लावा. अजून एक उत्तम पद्धत म्हणजे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या सामानाचं बिल नेहमी पेमेंट क्लिअर होईपर्यंत सांभाळून ठेवा. यामुळे तुम्ही सहजपणे स्टेटमेंटसोबत बिल व्हेरीफाय करू शकाल की कुठे एखादा अधिक चार्ज तर नाही लावलाय ना आणि कुठे गडबड तर नाही ना.
  • याव्यतिरिक्त सायबर सिक्योरिटीदेखील एक मोठा मुद्दा आहे. कधीही तुमच्या क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक आणि सिक्योरिटी कोड कोणालाही देऊ नका. यामध्ये तुमच्याच पैशाची सुरक्षा आहे.

ऑफिसमध्ये बोल्डनेस योग्य की अयोग्य

– पूनम पांडे

‘‘बघ बघ सरांनी बेल वाजवली. आता डीप नेकचा टॉप आणि मिनी स्कर्ट घातलेली टीना केबिनमध्ये जाईल आणि डोळे गरागरा फिरवत सरांशी अशाप्रकारे बोलेल की ते एकटक तिच्याकडे पाहत राहतील. अहो, सर कधी आम्हालाही बोलवत जा. आम्हाला काय काटे लागले आहेत? तुम्ही म्हणत असाल तर आम्हीही उद्यापासून शॉर्टस् घालून येतो.’’

‘‘गप्प बस, वेडी कुठली. आपण एवढे आखूड कपडे कधी घालू शकत नाही, मग भले आपल्याला नोकरी का सोडावी लागू नये.’’

‘‘मग आपण असच चरफडत बसायचं का, स्वत:च्या नखरेलपणावर बॉसला नाचवणाऱ्या टीनाला पाहून?’’

ऑफिसमध्ये सोनम आणि सुमनचे बोलणे ऐकून स्टाफमधील सर्व लोक मंदमंद हसत होते. पण टीना बाहेर येताच सर्व शांत झाले आणि टीना सर्वांकडे अशी पाहत होती जसे मनातल्या मनात गात असावी. ‘ये दुनिया… ये दुनिया… पितल दी, बेबी डॉल सोने दी….बेबी डॉल में सोने दी..’ आणि यावर स्टाफ जणू म्हणतोय उपहासाने ‘चार दिन कि चांदनी फिर अंधेरी रात…’

अनेक ऑफिसमध्ये हीच स्थिती

ही अवस्था फक्त सोनम आणि सुमन यांच्याच ऑफिसची नाही उलट अशा अनेक ऑफिसची आहे जिथे सेक्शुअली अट्रॅक्टीव्ह असणाऱ्या मुलींचेच चालते. ज्या त्यांच्या बोल्डनेसने बॉसला स्वत:च्या मुठीत ठेवतात. याचे परिणाम मात्र दुसऱ्या मुलींना भोगावे लागतात. अशा बोल्ड मुलींमुळे स्टाफमधील इतर मुलींना कशाप्रकारे मानसिक व आर्थिक त्रासाला तोंड द्यावे लागते जाणून घेऊ.

फक्त आम्हालाच ओरडा पडतो

अशाप्रकारच्या मुलींनी कुठलीही चूक करू दे, बॉस त्यांना लगेच ओरडत नाही. उलट ज्याची चूक नाही त्यांना ओरडून आपला राग शांत करतात. अॅड एजन्सीमध्ये काम करणारी शशिकला यादव सांगते, ‘‘माझ्याबरोबर असे अनेकदा घडले आहे कि माझ्या हॉट कलिगच्या चुकीवरून बॉस तिला ओरडायचे सोडून मलाच केबिनमध्ये बोलावून ओरडत असत. सुरुवातीला तर मी काही बोलले नाही, पण नंतर वाटले तिच्या चुकीची शिक्षा मला का म्हणून? नंतर मी पुराव्यानिशी जाऊ लागले. यामुळे मग बॉस ना नाइलाजाने तिला बोलावून ओरडावे लागे. अभिनय जरी असला तरी ते पाहून मला आनंद होत असे.’’

हॉट असतात, पण टॅलेंडेड नाही

इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीत कार्यरत असणारी प्रिती सांगते, ‘‘मला त्यावेळी खूप वाईट वाटते, जेव्हा सिनियॉरीटी आणि टॅलेंट पाहता बॉसबरोबर मिटींगला जाण्याचा हक्क माझा असतो. पण बॉस नवीन क्लाएंटला भेटायला जाताना नेहमी माझ्या हॉट कलिगला घेऊन जातात. राग तर तेव्हा अनावर होतो जेव्हा मिटींगवरून आल्यानंतर जे काम करायचे असते ते मात्र माझ्या माथी मारले जाते. हे सागून की तुम्ही तिच्यापेक्षा खूप सिनिअर आहात म्हणून हे काम तुम्ही करा तेव्हा असे मनापासून वाटते असे म्हणावे की हे तर तुम्हालाही माहिती आहे की हिला काहीच येत नाही, हिच्यापेक्षा तर टॅलेंटेड तर मी आहे म्हणून तुम्ही हे काम मला सोपवत आहात.’’

वेगाने होणारी पगारवाढ

अशा मुली जेव्हा ऑफिसमध्ये काम सुरु करतात, तेव्हा आधीच आपला हॉटलुक दाखवून घसघसशीत पॅकेज पदरात पाडून घेतात आणि जसेजसे त्या कंपनीत जुन्या होत जातात, त्यांचा सॅलरी ग्राफसुद्धा बराच वाढलेला असतो. हल्लीच पीआर एजन्सी जॉईन करणार असेलेली निशा सिंह सांगते ‘‘मी माझी जुनी कंपनी सोडली, कारण तिथे ४ वर्षे काम केल्यानंतर माझा पगार ६ हजाराने वाढला तर माझ्या कलीगचा पगार २ वर्षांतच ६ हजाराने वाढला, जेव्हा की मी तिच्यापेक्षा जास्त काम करत होते आणि टॅलेंटसुद्धा होते.’’ एखाद्या कंपनीकडून असे वागले जाणे हे सामान्य मुलींचे आर्थिक शोषण नाही तर अजून काय आहे?

बॉसची असते मेहेरनजर

बोलणे सुटीचे असो किंवा प्रमोशनचे ऐकल्यानंतर बॉसच्या भुवया उंचावल्या जातात पण बोल्ड असणाऱ्या मुलींकडून जेव्हा सुट्टयांची मागणी होते, तेव्हा त्यांची सुट्टी मात्र बॉस किंवा एचआरकडून ताबडतोब मंजूर केली जाते. हे कारणच आहे कि बॉसची यांच्यावर जास्तच मेहेरनजर असते. अशा मुलींना प्रमोशनसाठी स्वत:ला सिद्ध करावे लागत नाही. याउलट इतर मुलींना मेहनत केल्यावरही त्यांना त्यांच्या हक्काचे पद मिळत नाही. प्रमोशन तर दूरच.

इतरजण ही करतात लांगूनचालन

बॉस जर म्हणत असेल की सूर्य पश्चिमेला उगवतो तर कर्मचारीसुद्धा हेच खरे मानतात. अशात बॉसशी जवळीक असल्याने अशा मुलींचे पाय कधीच जमिनीवर नसतात. अशावेळी शिपाई पासून ते इतर कुठल्याही स्टाफमधील लोकांना गरज भासली की ते बोलायला लागतात. सामान्य स्टाफ व खास मुलीने काही काम सांगितले तर शिपाईसुद्धा आधी त्या खास मुलीचे कामच ऐकतात. कारण तिच्याशी वाकडे घेवून त्याला बॉसच्या नजरेत वाईट ठरायचे नसते.

बोल्ड मुलींनी काळजी घ्यावी

ऑफिसमधील बोल्ड मुलींच्या बाबतीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही की त्या जे काही करतात आणि वागतात ते फक्त काही दिवसांचे असते. चार दिवसांचा झगमगाट असतो. पण हा झगमगाट त्यांच्यासाठी कायमचा अंधार ही ठरू शकतो. कुठल्या-कुठल्या समस्यांना त्यांना सामोरे जायला लागू शकते हे जाणून घेऊ.

काही काळचा गमागाट

आज तुमच्यामागे वेडयासारखा फिरणारा बॉस नेहमीच तसा राहील असे नाही. तुमचे तारुण्य ओसरू लागले की तुम्ही बॉसच्या नजरेपासूनही दूर जाऊ लागाल. तो तुमच्या आयुष्याचा जोडीदार नाही, जो तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. असेही होऊ शकते की ऑफिसमध्ये जर तुमच्यापेक्षाही सुंदर मुलगी आली तर तुम्हाला सोडून तिच्या मागे जाईल.

बदनामी सहन करावी लागेल

बॉसच्या वरदहस्तामुळे आर्थिक प्रगतीसोबत प्रमोशनही मिळू शकेल. पण बॉसच्या या मेहरबानीमुळे तुमच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतात. हल्लीच्या महागाईच्या काळात तुमच्या बॉसचं तुमच्यावर हजारो रुपये का उडवणं हा ऑफिसमध्ये गॉसिपचा विषय बनू शकतो.

सेक्स सिम्बॉल बनून राहाल

तुमच्या अशा वागणुकीमुळे तुम्ही बनता बॉस आणि ऑफिस स्टाफच्या नजरेतही निवळ सेक्स सिम्बॉल बनून राहाल. शक्यता आहे की ऑफिस स्टाफ तुमच्याकडे बॉसची रखेल म्हणून पाहील.

कामासोबत कामलीलासुद्धा

सर्वात मोठे आणि कटू सत्य म्हणजे जर बॉस तुमच्या अदांवर भाळला असेल तर त्याला तुमच्याकडून काम करून तर हवे असेलच शिवाय कामक्रिडा करण्याचाही त्याचा मानस असेल. मग तुम्ही हा विचार कराल की फक्त कामक्रिडा करून तुमची सुटका होईल व तुम्हाला ऑफिसचे काम करावे लागणार नाही तर ते चुकीचे आहे. कारण तुम्हाला तिथे काम करायलाच ठेवले आहे.

वैयक्तिक आयुषात वाढतील अडचणी

जर तुम्ही ऑफिसात तुमच्या तारुण्याचा गैरवापर करत असाल तर होऊ शकते की तुम्ही इतके बदनाम व्हाल जाता की तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. हे विसरू नका कि जग खूप छोटे आहे. तुमचे हे वागणे तुमच्या जोडीदाराला कळले तर तुमचे लग्न होणे धोक्यात येईल.

ऑफिसमध्ये प्रेझेंनटेबल दिसणे काही वाईट नाही उलट ही चांगली सवय आहे. पण बोल्ड किंवा हॉट बनण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका अन्यथा, बदनामी व खोटया प्रगतीशिवाय तुमच्या हाती काही येणार नाही. कष्टाने केलेली प्रगती आणि सन्मान तुम्हाला समाधान मिळवून देईल आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाचा जगता येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें