- पूनम पांडे
‘‘बघ बघ सरांनी बेल वाजवली. आता डीप नेकचा टॉप आणि मिनी स्कर्ट घातलेली टीना केबिनमध्ये जाईल आणि डोळे गरागरा फिरवत सरांशी अशाप्रकारे बोलेल की ते एकटक तिच्याकडे पाहत राहतील. अहो, सर कधी आम्हालाही बोलवत जा. आम्हाला काय काटे लागले आहेत? तुम्ही म्हणत असाल तर आम्हीही उद्यापासून शॉर्टस् घालून येतो.’’
‘‘गप्प बस, वेडी कुठली. आपण एवढे आखूड कपडे कधी घालू शकत नाही, मग भले आपल्याला नोकरी का सोडावी लागू नये.’’
‘‘मग आपण असच चरफडत बसायचं का, स्वत:च्या नखरेलपणावर बॉसला नाचवणाऱ्या टीनाला पाहून?’’
ऑफिसमध्ये सोनम आणि सुमनचे बोलणे ऐकून स्टाफमधील सर्व लोक मंदमंद हसत होते. पण टीना बाहेर येताच सर्व शांत झाले आणि टीना सर्वांकडे अशी पाहत होती जसे मनातल्या मनात गात असावी. ‘ये दुनिया... ये दुनिया... पितल दी, बेबी डॉल सोने दी....बेबी डॉल में सोने दी..’ आणि यावर स्टाफ जणू म्हणतोय उपहासाने ‘चार दिन कि चांदनी फिर अंधेरी रात...’
अनेक ऑफिसमध्ये हीच स्थिती
ही अवस्था फक्त सोनम आणि सुमन यांच्याच ऑफिसची नाही उलट अशा अनेक ऑफिसची आहे जिथे सेक्शुअली अट्रॅक्टीव्ह असणाऱ्या मुलींचेच चालते. ज्या त्यांच्या बोल्डनेसने बॉसला स्वत:च्या मुठीत ठेवतात. याचे परिणाम मात्र दुसऱ्या मुलींना भोगावे लागतात. अशा बोल्ड मुलींमुळे स्टाफमधील इतर मुलींना कशाप्रकारे मानसिक व आर्थिक त्रासाला तोंड द्यावे लागते जाणून घेऊ.
फक्त आम्हालाच ओरडा पडतो
अशाप्रकारच्या मुलींनी कुठलीही चूक करू दे, बॉस त्यांना लगेच ओरडत नाही. उलट ज्याची चूक नाही त्यांना ओरडून आपला राग शांत करतात. अॅड एजन्सीमध्ये काम करणारी शशिकला यादव सांगते, ‘‘माझ्याबरोबर असे अनेकदा घडले आहे कि माझ्या हॉट कलिगच्या चुकीवरून बॉस तिला ओरडायचे सोडून मलाच केबिनमध्ये बोलावून ओरडत असत. सुरुवातीला तर मी काही बोलले नाही, पण नंतर वाटले तिच्या चुकीची शिक्षा मला का म्हणून? नंतर मी पुराव्यानिशी जाऊ लागले. यामुळे मग बॉस ना नाइलाजाने तिला बोलावून ओरडावे लागे. अभिनय जरी असला तरी ते पाहून मला आनंद होत असे.’’