* सोमा घोष

मिनूच्या पालकांना तिला डॉक्टर बनवायचं होतं. पालकांच्या सांगण्यावरून तिने मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली, परंतु तिचा स्कोर चांगला नसल्यामुळे कुठेच अॅडमिशन मिळालं नाही. तिच्या पालकांनी तिला पुन्हा मेडिकल प्रवेशाची तयारी करायला सांगितलं. परंतु मिनूने त्यावेळी नकार दिला आणि आता ती बीएससी फायनलमध्ये आहे आणि चांगले गुण मिळवत आहे. तिला संशोधक बनण्याची इच्छा आहे.

अनेकदा पालकांना काही वेगळं वाटत असतं, तर मुलांची इच्छा काही वेगळी असते. खरंतर मनात नसेल तर कोणत्याही विषयात यश मिळत नाही म्हणून बारावीनंतर करिअर काऊन्सलिंग करायला हवं म्हणजे मुलांची इच्छा समजते. परंतु काही हट्टी पालकांचं उत्तर खूपच वेगळं असतं. उदाहरणार्थ, करिअर काऊन्सलिंग काय आहे? ते करणं का गरजेचं आहे? अगोदर तर आपण कधी केलेलं नाही मग आमची मुलगी अभ्यासात मागे आहे का? आम्ही जाणतो की तिला काय शिकायला हवं. अशा हट्टी पालकांना समजावणं खूपच कठीण जातं.

अर्ली करिअर काऊन्सलिंग गरजेचं

याबाबत गेल्या ३० वर्षांपासून विद्यार्थ्यांचं काऊन्सलिंग करणारे करिअर काऊन्सलर तसेच डायरेक्टर डॉक्टर अजित वरवंडकर, ज्यांना या कामासाठी राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला आहे. ते सांगतात, ‘‘मी मुलांचं काऊन्सलिंग इयत्ता दहावी पासूनच सुरू करतो कारण करिअर प्लॅनिंगची योग्य वेळ इयत्ता दहावी हीच असते.

‘‘दहावीनंतर विद्यार्थी विषयाची निवड करतात, ज्यामध्ये ह्युमिनिटीज, कॉमर्स, सायन्स इत्यादी असतात. जर एखाद्या मुलाला मेडिकल वा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा असेल आणि त्याने कोणता दुसरा विषय घेतला असेल तर त्याला पुढे जाऊन कठीण होतं म्हणून याचं प्लॅनिंग अगोदर पासूनच केल्यास मुलांना योग्य गायडन्स मिळतं.’’

मुलं बारावीत गेल्यावर हे समजायला हवं की त्यांनी आपल्या स्ट्रीमची निवड केली आहे. मोठमोठे करिअर ऑप्शन्स सहा ते सातच असतात. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंट, मेडिसिन, लॉ इत्यादी आहे. परंतु आज भारतात ५ हजार पेक्षा अधिक करिअर ऑप्शन आहेत जे त्यांना माहीत नाहीत, म्हणून मग मुलांनी काळजी करण्याचं कारण नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...