* शकुंतला सिन्हा

पावसाळयाच्या ऋतूत मुलांचे बाहेर जाऊन खेळणे बंद होते आणि ती म्हणतात - रेन रेन गो अवे... अशाच प्रकारे अति उष्मा किंवा हिवाळयाला कंटाळून आपण म्हणतो की, हा ऋतू कधी संपणार? हवामानाचे स्वत:चे नैसर्गिक चक्र असते आणि ते सहसा एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत स्वत:च्या वेळेनुसार येते. मात्र, सध्या वातावरणातील बदलामुळे अवेळी हवामानातही बदल पाहायला मिळतो.

कोणतीही परिस्थिती जसे की, खूप पाऊस किंवा खूप उष्णता किंवा खूप थंडी जास्त काळ राहाते तेव्हा त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे चीडचिड होते, पण हवामानाचा आपल्या मनस्थितीवर खरोखर परिणाम होतो की, हा केवळ मनाचा खेळ आहे? हे जाणून घेण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा ७० च्या उत्तरार्धात आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीस या दोघांमधील संबंध समोर येऊ लागले.

हवामान आणि मनस्थितीमधील संबंध : हे नाते अतिशय गढूळ आहे, ज्याला तुम्ही अस्पष्ट, अंधुक, फिकट किंवा घाणेरडे काहीही म्हणू शकता. विज्ञानानुसार, हवामान आणि मूड किंवा मनस्थितीचा संबंध वादाने वेढलेला आहे आणि दोन्ही प्रकारचे वाद वेगवेगळे असू शकतात. १९८४ मध्ये, शास्त्रज्ञांनी मनस्थिती बदलाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. राग, आनंद, चिंता, आशा, निराशा किंवा आक्रमक वर्तन यासारखे मनस्थितीमधील बदल सूर्यप्रकाश, तापमान, वारा, आर्द्रता, वातावरणाचा दाब इत्यादी घटकांवर अवलंबून असल्याचे अभ्यासात आढळून आले.

अभ्यासात असे दिसून आले की, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रतेचा मनस्थितीवर सर्वात जास्त परिणाम होतो. विशेषत: जेव्हा आर्द्रता वाढते तेव्हा एकाग्रता कमी होते आणि सतत झोपायची इच्छा होते. २००५ च्या अभ्यासात असे दिसून आले की, चांगल्या हवामानात घराबाहेर किंवा इतरत्र वेळ घालवल्याने मनस्थिती आणि स्मरणशक्तीही सुधारते.

बरे आणि वाईट

मूड किंवा मनस्थिती ही वसंत ऋतूमध्ये सर्वोत्तम आणि उन्हाळयात सर्वात वाईट असते. काही शास्त्रज्ञांना मात्र हा अभ्यास मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी २००८ मध्ये वेगळा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता यांचा मनस्थितीवर कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत नाही. तो पडलाच तरी नगण्य असतो. २००५ च्या अभ्यासात नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, चांगल्या हवामानाचा मनस्थितीवर अतिशय माफक सकारात्मक परिणाम होतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...