* प्रतिनिधी
सोलो ट्रिप, नवीन ठिकाणांचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तींना भेटणे, रात्री उशिरा कॅबमध्ये प्रवास करणे हे सर्व महिलांसाठी असुरक्षित समजले जाते. जगाचा आर्थिक विकास झपाटयाने होत आहे आणि त्यासोबतच सर्व वयोगटातील आणि लिंगांच्या लोकांसाठी हिंसाचाराच्या घटनाही वेगाने वाढत आहेत, मात्र अधिकाधिक हिंसाचाराला महिलाच बळी पडत आहेत. या धोक्यामुळे घरातील सदस्यांकडून त्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर ठिकाणी एकटे जाण्यापासून रोखले जाते. काही वेळा महत्त्वाचे काम असले तरीही त्यांना बाहेर जाता येत नाही. यामुळे त्यांची पुढे जाणारी पावले जिथल्या तिथे थबकतात. काही वेळा ते त्यांच्या शिक्षणाच्या किंवा कामाच्या अधिकाराचा पूर्ण वापर करण्यापासून वंचित राहतात. आपल्या शहरांमध्ये निर्भयासारख्या घटना वारंवार ऐकायला मिळतात. त्यामुळेच सूर्यास्तानंतर प्रवास करणे बहुतेक महिलांसाठी धोक्याचे ठरते. मुलांचेही असेच असते. पालकांना त्यांच्या सुरक्षेची चिंता असते.
सुरक्षा गरजेची
भारतामध्ये सुरक्षा हा प्राधान्याचा विषय आहे. मग ती सार्वजनिक वाहतूक असो, रस्ते, कामाचे ठिकाण किंवा घर असो. सुरक्षेची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्याच्या आणि त्यांचा प्रवास त्रासमुक्त गतिशील होण्याच्या उद्देशाने, त्यांना प्रियजनांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळण्याच्या उद्देशाने आघाडीचे जागतिक व्यासपीठ, टूकॉलरने एक वैयक्तिक सुरक्षा अॅप गार्जियंस सादर केले आहे. लोकांना त्यांच्या डिजिटल जीवनात सुरक्षित ठेवण्यासाठी टूकॉलरची निर्मिती केल्यानंतर आता ही स्वीडिश कंपनी गार्जियंससोबत वास्तविक जीवनात सुरक्षिततेसाठीची त्यांची वचनबद्धता सिद्ध करत आहे.
गार्जियंस आहे तुमचा सुरक्षारक्षक
गार्जियंस अँड्रॉइडवर उपलब्ध आहे आणि ते गूगल प्ले स्टोअर, अॅप्पल स्टोअर किंवा मोफत डाऊनलोड करता येते. याचे सर्व फीचर्स मोफत आहेत आणि यात कुठलीही जाहिरात किंवा सशुल्क सदस्यत्व नाही. हे अॅप आणि त्याचे सर्व फीचर्स कायमच निशुल्क म्हणजे मोफत असतील - ही वैयक्तिक सुरक्षेसाठीची टूकॉलरची वचनबद्धता आहे.
तुमच्या संपर्क यादीतील विश्वासाहार्य लोकांना स्वत:चा गार्जियन निवडता येतो आणि तुम्ही कुठे आहात हे पाहण्यासाठी सक्षम बनवले जाते. कुठलीही चुकीची घटना घडली तरी तुम्ही स्वत:च्या सुरक्षेबाबत बिनधास्त राहू शकता. आजच्या काळात सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत आणि ते गार्जियंससारख्या अॅपच्या मदतीने सुरक्षेचे प्रभावशाली साधन बनू शकतात. मार्च २०२१ मध्ये हे अॅप पहिल्यांदा लॉन्च करण्यात आले, मात्र यात सातत्याने नवीन फीचर्स जोडले जात आहेत. या अॅपची वाढती लोकप्रियता ही त्याच्या डाऊनलोडसच्या वाढत्या संख्येवरून (वर्तमानात १० लाखांहून जास्त) सहज लक्षात येते. मागील काही आठवडयांमध्ये यात नव्याने जोडले गेलेले काही फीचर्स आहेत.