* रेशम सेठी, आर्किटेक्ट, ग्रे इंक स्टुडिओ

गृहसजावटीमध्ये आजकाल मिनिमलिस्टिक डिझाइन हा सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. तुम्ही तुमचा इंटिरिअर थीम काहीही ठेवा, तुमची पसंती मिनिमलिस्टिक डिझाइनला असेल तर तुमचे घर ट्रेंडी दिसेल. यात सर्व गोष्टी कमीतकमी ठेवल्या जातात, मग तो रंग असो, फर्निचर असो वा डिझायनर पीस असो. मिनिमलिस्टिक डिझाइनमध्ये खोल्या थोडया मोकळया, परंतु शोभिवंत दिसतात. बहुसंख्य लोकांना याबरोबरच घराला सफेद रंग देणे आवडते. जरी इतर रंग निवडले गेले, तरी त्याचा टोन म्युटेड ठेवला जातो. मिनिमलिस्टिक डिझाइन पॅटर्न आणि निओ क्लासिकल थीम डिझाइन सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे, ज्यात आधुनिक आणि शास्त्रीय वास्तुकलेचा मिलाफ दिसून येतो.

झुंबर

पूर्वी राजामहाराजांच्या आणि श्रीमंतांच्या राजवाडयांमध्ये आणि हवेल्यांमध्येच झुंबरांचा वापर केला जात होता, परंतु २१व्या शतकात झुंबर हा गृहसजावटीत एक महत्त्वाचा घटक बनला आहे.

याची दोन मुख्य कारणे आहेत - पहिले म्हणजे लोक आपले घर सजवण्यासाठी पैसे खर्च करण्यास तयार असतात, दुसरे म्हणजे आता बाजारामध्ये पारंपरिक झुबंरांबरोबर नवीन डिझाइनचे झुंबर उपलब्ध आहेत. हे झुंबर निओ क्लासिक होम डेकोरसह घराला लुक देतात.

पेंटिंग

आजकाल इंटिरिअर पेंटिंगमध्ये सफेद, पिस्ता ग्रीन, फिकट राखाडी, गडद हिरवा, सॉफ्ट क्ले, फिकट निळा, मस्टर्ड, मिस्ट (पेस्टल ब्लू आणि ग्रीन यांचे मिश्रण), मशरूम कलर, हिरवा वगैरे रंगांचा ट्रेंड सुरू आहे.

तसे, बोल्ड रंगदेखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये चैतन्य यावे असे वाटत असेल तर बोल्ड रंगांची निवड करण्यास अजिबात संकोच करू नका. बोल्ड रंग खोल्यांना डेप्थ आणि टेक्सचर देतात. तसे आजकाल इंटिरिअर पेंटिंगमध्ये काळा रंगदेखील ट्रेंडमध्ये आहे, परंतु या बोल्ड रंगांचा टोन म्यूट ठेवला जातो. आजकाल ग्लास, सॅटिन, एग शेल, मॅट टेक्सचरचा ट्रेंड आहे.

इनडोअर व्हर्टिकल गार्डन

इनडोअर व्हर्टिकल गार्डनदेखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. आज असे गार्डन लावणे खूप सोपे झाले आहे. ते तुमच्या घराच्या भिंतींना एक वेगळा लुक आणि टेक्सचर देते. ते आकर्षक तर दिसतेच, पण थर्मल इन्सुलेटर म्हणूनही काम करते. ते उन्हाळयात खोली थंड आणि हिवाळयात उबदार ठेवते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...