* सुमन बाजपेयी

कोरोना आला आणि एक काळ असा आला की, जीवनाचा वेग कमालीचा मंदावला. भीती, चिंता, भविष्यापेक्षा जास्त वर्तमानाच्या चिंतेने माणसांना ग्रासून टाकले. नोकरी, शिक्षण, काम, फिरणे, मौजमजा, वाटेल तेव्हा घराबाहेर पडणे, एखाद्या मॉलमध्ये खरेदी करणे, हॉटेलमध्ये जेवायला जाणे किंवा काहीही नियोजन न करताच गाडी घेऊन मनाला वाटेल तिथे जाणे, या सर्वांवरच बंधने आली.

पार्टी, मौजमजा, मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा किंवा रात्रीचे फिरायला जाणे, नातेवाईक, परिचितांच्या घरी जाणे, उगाचच रस्त्यावर भटकणे, अशा सगळयांलाच पूर्णविराम लागला.

भलेही आता लॉकडाऊन नाही, पण अजूनही घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा नव्हे तर हजारदा विचार करावा लागतो. गरज असेल तरच पाऊल दरवाजाबाहेर पडते. भीती, तणाव आणि घरात बसून केवळ आभासी जगात जगावे लागत असल्यामुळे सर्वात जास्त दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अशा वेळी विशेष काळजी घेऊन सामाजिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, तो अशा प्रकारे...

लोकांना भेटा

कोरोना संसर्गाच्या या काळात लोक जास्त करून मानसिकदृष्ट्या त्रासले आहेत. शारीरिक आरोग्याची काळजी घेणे जितके गरजेचे आहे तितकंच मानसिक आरोग्यही निरोगी राखणे आवश्यक आहे. कारण याचा परिणाम माणसाच्या सारासार विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि काम करण्याच्या क्षमतेवर होत असतो. जेव्हा तणाव आणि निराशा माणसाला ग्रासून टाकते तेव्हा त्याचा थेट परिणाम नाते आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. जे आधीपासूनच मानसिकदृष्ट्या आजारी होते त्यांना कोरोना संसर्गाच्या या वाढत्या संकट काळात जास्तच समस्यांचा सामना करावा लागत आहे. जे मानसिकदृष्ट्या निरोगी होते त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. घरातल्या चार भिंतीआड कैद होणे आणि घराबाहेरचे सर्व संपर्क तुटणे, हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

व्हिडीओ कॉल करून तुम्ही तुम्हाला वाटेल त्याच्याशी निश्चिंतच बोलू शकता, पण एकत्र बसून आपल्या भावना व्यक्त करण्यात जी मजा येते ती मोबाईल किंवा लॅपटॉपवर बोटं चालवून कशी येईल? अशा वेळी हे गरजेचे असते की, त्रास करून घेण्यापेक्षा स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...