* नसीम अंसारी कोचर

नवीन वर्षात प्रत्येकालाच काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते, विशेषत: गृहिणी त्यांच्या घराच्या सजावटीबद्दल खूपच विचार करतात. नवीन वर्षात काय करायचे, काय बदलायचे, जेणेकरून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात नवीनतेची भावना जागृत होईल? नवीन वर्षात अशी कोणती नवीन गोष्ट आणावी, जी पाहून सर्वच कौतुक करतील? सर्वात महत्त्वाचा असतो ती घरातील ड्रॉईंग रूम अर्थात दिवाणखाना, जिथे बाहेरून आलेले आणि पतीचे मित्र वगैरे येऊन बसतात.

दिवाणखान्याच्या लुकवरून गृहिणीची आवड, शैली आणि सर्जनशीलतेचा अंदाज त्यांना लावता येतो. त्यामुळेच नवीन वर्षात नवा सोफा, नवे पडदे, नवीन कार्पेट खरेदी करून दिवानखान्याचा लुक बदलण्यासाठी बहुतेक महिला उत्सुक असतात आणि त्यासाठी इंटिरिअर डेकोरेटर्सचीही मदत घेतात. या सर्वांत त्यांचा बराच पैसा खर्च होतो.

पण, यावेळी आम्ही तुम्हाला नवीन वर्षासाठी तुमच्या घरात बदल करण्यासाठी जी माहिती देत आहोत, त्यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच, शिवाय घराचा लुकही अशा प्रकारे बदलेल की लोक तुमची विचारसरणी आणि कलात्मकतेचे तोंड भरून कौतुक करतील. यासोबतच तुमच्या घराचा हा नवा लुक तुमच्या प्रियजनांमधली नातीही घट्ट करेल, एकमेकांमधील जवळीकता वाढेल, चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा नवीन प्रकार :

खोलीची शोभा

सहसा, मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्गाच्या घरात प्रवेश करताच, एखाद्याला सुंदर फर्निचर, पडदे, शोपीस इत्यादींनी सजलेला दिवाणखाना दिसतो. बंगल्यात किंवा घरातही दिवाणखाना उत्तम सोफा सेट आणि मध्यवर्ती टेबल अशा प्रकारे सजवला जातो. खिडक्या आणि दरवाज्यांवर सुंदर पडदे, बाजूच्या टेबलावरील शोपीस, फुलांच्या कुंडया किंवा इनडोअर प्लांट्स खोलीचे सौंदर्य वाढवतात.

आजकाल, टू बीएचके आणि थ्री बीएचके फ्लॅटमध्ये, समोर ड्रॉइंग रूम म्हणजेच दिवाणखाना आणि मागच्या बाजूला डायनिंग रूम म्हणजेच जेवणाची खोली तयार करण्यासाठी एका मोठया हॉलचे विभाजन केले जाते. काही ठिकाणी दोन भागांमध्ये पातळ पडदा लावला जातो. काही ठिकाणी अशा पडद्याची गरज भासत नाही. ड्रॉइंग रूम आणि डायनिंग रूम एकाच हॉलमध्ये असतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...