* प्रज्ञा पांडेय मनु
है तुझे भी इजाजत कर ले तू भी मुहब्बत....’ हे गाणं सुरू होतं आणि मी विचार करू लागली की प्रेम करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते का? प्रेमाबद्दल तर असं म्हटलं जातं की ही ती आग आहे जी न लावता लागते आणि न विझवता विझते. तर जर ही आग कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत लागली असेल तर त्या स्त्री वा पुरुषाने काय करावं.
आता काय फरक पडतो की तो विवाहित आहे का अविवाहित. जर वैवाहिक आयुष्य खूपच कंटाळवाणं आहे. बस आयुष्य असंच चाललं आहे. जबाबदारीचं ओझं मनात नसतानादेखील वाहण्याला आयुष्य म्हटलं जात नाही.
तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक मतभेद आहेत वा मन जुळत नाहीये आणि तुम्ही मुलं आणि कुटुंबीयांसाठी समाजात एकत्र आहात. मनात कोणतीही आशा वा तरंग नाहीये, तर अशावेळी तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल, ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन व्यक्त करता वा तो दोन प्रेमाचे शब्द बोलतो आणि मग त्या शब्दांची जादुने तुम्हाला दिवसभर मोहविते, तुम्ही गुणगुणत राहता, आरसा पाहून स्वत:ला सजवता तर यामध्ये काय वाईट आहे? माझ्या मते तर काहीच चुकीचं नाहीये.
स्वत:चं समाधान गरजेचं
तुम्ही तुमच्या तनामनाचे समाधान करू शकता आणि इश्क मोहब्बत तर प्रत्येक काळात झालं होतं, होत आहे आणि पुढेदेखील होणार. हे खरं आहे की वैवाहिक आयुष्यात एखादा परपुरुषाशी प्रेम होता कामा नये परंतु जर वय वैवाहिक आयुष्यात आपापसात प्रेम नसेल आणि जर बाहेर कोणाशी प्रेम जमलं तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये.
हा निसर्गाचा नियम आहे की जी जमीन उजाड असते निसर्ग त्याला त्याच्या हिशोबाने रान, गवताने भरतो म्हणजेच वैवाहिक लोकांचं प्रेमरूपी मन रिकामी कुंडी रहायला नको, परंतु जर रिकामी वा ते उजाडलेलं असेल तर निसर्ग त्यामध्ये त्याच्या हिशोबाने एखादी वनस्पती उगवतं. हा नियम शाश्वत आहे.





