* स्नेहल ठाकूर
एका अहवालानुसार रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपोजच्या दरम्यान झालेले हार्मोनल बदल स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे कारण बनू शकतात. सिनसिनाटी युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच म्हणणं आहे की त्यांनी असा शोध लावला आहे की चरबीचं वितरण कुठे होणार. खरंतर, याला नियंत्रित करण्यात एस्ट्रोजनची मेंदूमध्ये एक गुप्त, खास भूमिका आहे.
मनोविकारतज्ज्ञ असिस्टंट प्रोफेसर डेबरा क्लेगचं संशोधन सांगतं की मेनोपोजनंतर एस्ट्रोजन उत्पत्तीमध्ये कमी, मेंदूच्या एका खास क्षेत्रामध्ये जे अन्नाची ग्रहणता आणि चरबीला ठेवण्याची जागी निर्धारित व त्याला नियंत्रित करतं, त्यावर परिणाम करतं.
खासकरून हायपोथैलेमसचे ते एस्ट्रोजन रिसेप्टर्स, जे मेंदूच्या त्या भागाच्या शरीराचं तापमान, भूक आणि तहानला नियंत्रित करतं, वजन वाढणे व वजनाच्या वितरणामध्ये प्रत्यक्ष भूमिका साकारतं.
क्लेगचं म्हणणं आहे की हा शोध वैज्ञानिक ज्ञानात एक खूप मोठी उपलब्धता आहे. आरोग्यसंबंधी धोक्यांशिवाय आजच्या त्रासाशी संबंधित स्तन व ओवेरियन कॅन्सर आणि कार्डियोवैस्क्यूलर रोग, हृदयाच्या नाड्यांशी संबंधित अलीकडच्या रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाच्या हार्मोन थेरेपीजमध्ये सुधारणा करू शकतात.
आरोग्यासाठी धोकादायक
जेव्हा महिला मेनोपोजचा अनुभव घेतात तेव्हा एस्ट्रोजनची उत्पत्ती कमी होते आणि त्यांचं वजन वाढतं. अनेक महिलांमध्ये मेनोपॉजनंतर चरबी ‘फॅट’जी पूर्वी कुल्ह्याच्या भागामध्ये एकत्रित होत होती, त्याची स्टोरेजच्या जागी जमा होण्याची जागा आता पोट व त्याच्या आजूबाजूला होते जी आरोग्यासाठी वाईट आहे.
क्लेगचं म्हणणं आहे की जेव्हा महिलांमध्ये कुल्हे आणि जांघेच्या भागापेक्षा, जी अपेक्षेपेक्षा जास्त सुरक्षित जागा आहे. चरबीचं ट्रान्सफर त्यांचं उदर, पोटामध्ये होतं तेव्हा जाडेपणाशी संबंधित रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वाढते.
एक रहस्यदेखील आहे
हे एक रहस्य होतं की चरबीचे सेल्स हे निर्णय कसे घेत होते की शरीराच्या कोणत्या जागी ते त्यांचं घर बनवणार आहेत.
क्लेगच्या टीमने पाठीच्या कण्याजवळ, मेंदूच्या आधार स्थळावर हायपोथॅलेमसमध्ये एस्ट्रोजन रिसेप्टर्सना केंद्रित केलं आहे.
अशाच मध्यमवयीन मादी उंदराचा वापर करत तज्ज्ञांनी ते न्यूरोलॉजिकल रिसेप्टर्स जे एस्ट्रोजनच्या सेलमध्ये प्रवेश करू देतात, त्यांना शांत केलं. जेव्हा रिसेप्टर्स आरएनए इंटरफेअरन्स तंत्रज्ञानाद्वारे बंद करण्यात आलं, तेव्हा मादी उंदराचं वजन वाढू लागलं आणि चरबीचं वितरण उदरक्षेत्रामध्ये होऊ लागलं. क्लेगचं म्हणणं आहे की मादी उंदरांच्या मेंदूचे एस्ट्रोजन रिसेप्टर्स बंद केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते, जी मेनोपॉजनंतर महिलांमध्ये ज्याचं हायपोथॅलेमस, जसजसं त्यांच्या शरीराच्या उत्पादनात कमी होत जाईल ते हार्मोन्सने कमी होत जातील.





