* सोनिया राणा

बदलत्या ऋतूमध्ये आपण आपल्या चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेची खूप काळजी तर घेतो, पण अनेकदा हे विसरतो की आपल्या व्यक्तिमत्त्वात आपल्या चेहऱ्याचे आणि हातांचे सौंदर्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपले पायही महत्त्वाचे आहेत, ज्यांवर हवामानाचा परिणाम सर्वात आधी होतो. पण आम्ही त्यांना आमच्या टेक केअर लिस्टमध्ये सर्वात शेवटी ठेवतो. याचा परिणाम असा होतो की आपल्या टाचांना भेगा पडतात आणि पाय निर्जीव दिसतात.

आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की तुम्ही तुमच्या पायांची काळजी कशी घेऊ शकता आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे पाय पुन्हा सुंदर होतील.

टाचांना भेगा पडण्याचे कारण

टाचांना भेगा पडण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे हवामानातील बदल, तसेच ऋतूनुसार पायांना योग्य प्रकारे मॉइश्चरायझ न करणे आणि जेव्हा हवामान कोरडे होते तेव्हा ही समस्या अजून वाढते.

पाहिल्यास बहुतेक स्त्रियांना पायाला भेगा पडल्यामुळे त्रास होतो, कारण काम करताना नेहमी त्यांच्या पायांना धूळ-मातीला जास्त सामोरे जावे लागते, तसेच या कारणांमुळेदेखील टाचांना भेगा पडतात :

* बराच वेळ उभे राहणे.

* अनवाणी चालणे.

* खुल्या टाचांचे सँडल घालणे.

* गरम पाण्यात बराच वेळ आंघोळ करणे.

* केमिकलयक्त साबण वापरणे.

* योग्य मापाचे शूज न घालणे.

बदलत्या हवामानामुळे वातावरणातील कमी आर्द्रता हे टाचांना भेगा पडण्याचे एक सामान्य कारण आहे. यासोबतच वाढत्या वयातदेखील टाचांना भेगा पडणे सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा टाचा भेगा पडण्यासह कोरडया होतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्या भेगांमधून रक्तदेखील येऊ लागते, जे खूप वेदनादायक असते.

पायांची काळजी कशी घ्यावी

तुमच्या पायांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे की जसे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून त्यास मॉइश्चरायझ ठेवता त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पायाच्या घोटयांवरील मृत त्वचा प्लुमिक स्टोनने घासून काढून टाकावी. त्यानंतर पायांना चांगला जाडसर लेप बाम किंवा नारळ तेलाने चांगल्या प्रकारे मॉइस्चराइज करावे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...