* उमेशकुमार सिंग
जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल किंवा तुम्हाला उचकी येत असल्यासारखे वाटत असेल तर ही काही सामान्य बाब नाही. हा एक प्रकारचा आजार आहे, जो लाखो माणसांपैकी कोणा एकाला होऊ शकतो. राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ चित्रपट आला होता. यामध्येही या आजाराचा उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटात राणी मुखर्जीला हा आजार आहे. यामध्ये सतत उचक्या येत राहतात.
या आजाराला टॉरेट्स सिंड्रोम म्हणतात, ज्यामध्ये मज्जासंस्था प्रभावित होते. यामध्ये व्यक्तीला अचानक उचकी येण्यास सुरुवात होते आणि हे सतत होत राहते. कधी काही काळासाठी तर कधी दीर्घकाळासाठी. सामान्य उचकीमध्ये १ किंवा दोनदा उचकी येते, परंतु या आजारात सतत उचकी येते आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते.
टॉरेट सिंड्रोम काय असते
गुरुग्राम येथील अग्निम ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस आर्टेमिस हॉस्पिटल’चे न्यूरोलॉजी विभागाचे डायरेक्टर डॉ. सुमित सिंग म्हणतात की टॉरेट्स हा एक प्रकारचा मेंदूसंबंधित आजार आहे. यामध्ये कोणत्याही वयस्क व्यक्तीस किंवा मुलाला उचकी येऊ लागते. हा आजार दोन प्रकारे प्रभावित होऊ शकतो, एकतर वातावरणामुळे किंवा मग अनुवांशिक कारणांमुळे. बहुतेक प्रकरणांमध्ये हा आजार १८ वर्षे वयाच्या आधी हल्ला करतो.
या आजाराची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे हा बहुतेक पुरुषांमध्ये आढळतो, जो आयुष्यभर चालू राहतो.
आजाराची लक्षणे
टिक्स : या आजाराचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे उचकी, जी कधीही अचानक येऊ शकते आणि तिचा आवाज खूप मोठा ही असू शकतो. अशा परिस्थितीत या आजारामुळे समाजात काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हा आजार २ भागात विभागला जाऊ शकतो :
साधे टिक्स : या प्रकारच्या टिक्समध्ये अल्पकाळासाठी उचक्या येतात, ज्यामध्ये आवाजदेखील कमी असतो आणि डोक्यावर, खांद्यावर किंवा मानेवर दाब पडतो आणि यात अचानक हालचाल होऊ लागते.
कॉम्प्लेक्स टिक्स : या प्रकारच्या उचकीमध्ये सतत उचक्या येत राहतात आणि यात कधीकधी चेहऱ्यावरील हावभावदेखील बदलतात जसे पक्षाघाताच्या वेळी होते. यासोबतच उचकीचा आवाजही खूप मोठा असतो.