* पारूल भटनागर

बदलता दिनक्रम, वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे हर्नियाचा आजार मोठया प्रमाणावर पसरत आहे. जेव्हा शरीराचा एखादा भाग वर येतो, सहनशीलतेपलीकडे तसेच अधूनमधून अचानक खूप दुखत असेल तर ही हर्नियाची सामान्य लक्षणे आहेत. योग्यवेळी उपचार न घेतल्यास हे अधिकच गंभीर होते. म्हणूनच तुम्हालाही स्वत:मध्ये अशी लक्षणे जाणवत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा, जेणेकरून परिस्थिती गंभीर होणार नाही.

चला, ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे डायरेक्टर सर्जन डॉ. वेद प्रकाश यांच्याकडून याबाबत सविस्तर जाणून घेऊया :

हर्निया म्हणजे काय?

हर्निया सर्वसाधारपणे तेव्हा होतो जेव्हा मांसपेशींनी तयार झालेली पेरिटोनियम नावाची भिंत कमजोर होते. यामुळे पोटाच्या आतील भाग नियोजित ठिकाणी न राहता वर आल्यासारखा दिसू लागतो. या स्थितीला हर्निया असे म्हणतात.

हर्नियाचे किती प्रकार आहेत?

फीमोरल हर्निया : हा हर्निया सर्वसाधारणपणे महिलांना आणि त्यातही विशेषकरून गरोदर तसेच जाड महिलांना होतो. हा तेव्हा होतो जेव्हा धमन्यांच्या वरील जांघेत घेऊन जाणाऱ्या नलिकेत आतडी प्रवेश करतात.

इसेंन्शिअल हर्निया : पोटाची शस्त्रक्रिया झालेल्या भागावर जास्त दाब पडल्यामुळे मांसपेशी खूपच जास्त ताणल्या जातात. यामुळे तो भाग वर येतो.

नाभी हर्निया : यात पोटातील सर्वात कमजोर मांसपेशी नाभी किंवा बेंबीच्या माध्यमातून वर येतात. हा हर्निया सर्वसाधारणपणे जाड महिला तसेच ज्या महिलांना जास्त मुले होतात त्यांना होतो कारण, सतत शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांच्या मांसपेशी कमजोर होतात.

इंगुइनल हर्निया : इंगुइनल हर्नियात आतडी पोटातून बाहेरच्या दिशेने वर येतात किंवा पोट आणि जांघेच्यामधील भाग हा इंगुइनल नलिकेत असतो. त्या भागातील कमजोरीमुळे अशा प्रकारचा हर्निया होतो.

हर्निया सर्वात जास्त महिलांनाच का होतो :

महिलांना ऐब्डोमिनल म्हणजे उदरातील हर्निया होणे खूपच सामान्य गोष्ट आहे. कारण गरोदरपणात अंतर्गत ओटीपोटातील स्नायू ताणले जातात. शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणी हर्निया होण्याची शक्यता सर्वात जास्त असते कारण, ती जागा सर्वात जास्त ताणली जाते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...