* गरिमा पंकज
आपल्या जीवनशैलीचा आणि सवयींचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. चला, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निधी धवनकडून अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्यातील काही अवलंबून आणि काही सोडून तुम्ही तंदुरुस्तही व्हाल आणि आनंदीदेखील रहाल :
जॉगिंग आणि व्यायाम
दररोज व्यायामाने आणि धावण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर पडतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. व्यायाम करणे आणि धावण्याने शरीराचे स्नायू भरीव आणि मजबूत बनतात. यामुळे त्वचेत घट्टपणा येतो, ज्यामुळे सुरकुत्यांची समस्या उद्भवत नाही.
कोमट पाण्याचा एक पेला
शरीरात ऊर्जा पातळी राखण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा. हे पिण्याने शरीराचा चयापचय दर वाढतो आणि शरीरात संपूर्ण दिवस ताजेपणा कायम राहतो. अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्याने अन्न सहज पचते.
ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी
ग्रीन टीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थांचे उत्सर्जन करतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबीदेखील कमी करतात. त्याचप्रमाणे, नॉन-शुगर ब्लॅक कॉफीमध्ये नगण्य कॅलरी असतात, तर कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात.
फिरणे
हे आवश्यक नाही की आपण सकाळी चालाल तरच आपल्याला फायदे मिळतील. चालणे हा एक असा व्यायाम आहे, जो दिवसा कोणत्याही वेळी केला जाऊ शकतो. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास चालण्याने अन्न सहज पचते.
खाण्याची एक वेळ
खाण्यासाठी एक वेळ ठरवा आणि त्यानंतर त्याचे अनुसरण करा. सकाळी ८-९ च्या दरम्यान नाश्ता करा, दुपारी १-२ च्या दरम्यान लंच आणि सायंकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान डिनर. मधल्या लांब गॅपमुळे तुम्हाला स्वत:ला भूक जाणवेल. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्यात अंतर जास्त असल्यामुळे आपण संध्याकाळी ४-५ दरम्यान थोडा हलका नाश्ता घेऊ शकता.
७-८ तास झोप
आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप खूप महत्वाची आहे. जे लोक रात्री १० वाजता झोपतात आणि ६ वाजता उठतात त्यांना दिवसभर ताजेपणा जाणवतो, तसेच तणाव आणि चिंतेच्या समस्यादेखील अशा लोकांमध्ये कमी पाहायला मिळतात.