* पाककृती सहकार्य : अनुपमा गुप्ता
- बेसन बदाम बर्फी
साहित्य
* १ कप बेसन
* अर्धा कप बदाम पूड
* पाऊण कप साखर
* अर्धा कप पाणी
* २ मोठे चमचे तूप
* सजावटीसाठी बदाम.
कृती
कढईत तूप गरम करून बेसन भाजा. नंतर त्यात बदाम पूड घालून परता. दोन-तीन मिनिटांनंतर गॅसवरून उतरवा. एका कढईत साखर व पाण्याचा एक तारी पाक बनवा. यात बदाम व बेसन मिसळा. दोन-तीन मिनिटे परतून घट्ट करा. एका थाळीत हलकेसे तूप लावून कापलेल्या बदाम आणि सजवून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून आवडीच्या आकारात कट करून सर्व्ह करा.
2. मैद्याची बर्फी
साहित्य
* अर्धा लिटर दूध
* ६ मोठे चमचे साखर
* ३ मोठे चमचे मैदा
* २ छोटे चमचे तूप
* थोडासा कापलेला सुकामेवा सजावटीसाठी.
कृती
मैद्यात तूप घालून हलका सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत परता. कढईत दूध घालून उकळायला ठेवा. दूध घट्ट झाल्यानंतर मैदा घालून मिसळत शिजवा. त्यानंतर साखर घालून ६ ते ७ मिनिटे हलवा व गॅस बंद करा. एका प्लेटमध्ये तूप लावून मिश्रण त्यात ओता व पसरवा. काजू व बदामाने सजवा. थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.
3. रवा रोल
साहित्य
* अर्धा कप दूध
* १ मोठा चमचा साखर
* ३ चमचे खवा
* २ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क.
कृती
कढईत दूध गरम करून त्यात रवा घाला व घट्ट होईपर्यंत शिजवा. याचे गोळे बनवून प्लास्टिकच्या दोन पदरांमध्ये पातळ लाटा. दीड इंच रुंद पट्टी कापा. खवा व कंडेन्स्ड मिल्क मिसळा. रव्याच्या पट्टीच्यावर खवा व कंडेन्स्ड मिल्कचे मिश्रण लावा. एकसारखे रोल करून फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करा.
4. चोको ब्रेड पेढा
साहित्य
* ४ ब्रेड स्लाईसेस
* २ मोठे चमचे वितळलेले चॉकलेट
* ५ छोटे चमचे कंडेन्स्ड मिल्क
* २ मोठे चमचे किसलेला नारळ.
कृती
ब्रेड मिक्सरमध्ये घालून चुरा करून घ्या. एका कढईत तूप घालून ब्रेडचा चुरा परतून घ्या. आता यात कंडेन्स्ड मिल्क व वितळलेले चॉकलेट घालून पेढे बनवून त्यांना नारळात घोळवून थंड करून सर्व्ह करा.