* नीरा कुमार
रेडी टू कुक स्नॅक्स व जेवणाचे चलन आजकाल खूप वाढले आहे. ब्रेकफास्ट, स्नॅक्स किंवा कोणत्याही वेळी खाता येणाऱ्या स्नॅक्सची चर्चा करायची झाली जसे की इडली, डोसा, वडा, उपमा, ढोकळा, पकौडी, ठेपला इत्यादींचे सील्ड पॅकेट बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. पॅकेटवर लिहिलेल्या सूचनेनुसार पाणी किंवा दही मिसळावे आणि मनपसंत स्नॅक्स बनवावे.
अशाचप्रकारे पोरिज वगैरे बनवण्यासाठी ओट्स, कॉर्नफ्लेक्स, म्यूसली इत्यादीमध्ये दूध घाला आणि झटपट तयार.
सांगायचे तात्पर्य हे आहे की बाजारात मुख्यत्वे दोन प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत, एक ते ज्यात दूध किंवा दही मिसळून काही मिनिटे शिजवले की तयार होतात. तर दुसरे ते ज्यात दूध वगैरे मिसळा आणि खाण्यासाठी तयार. या, जाणून घेऊया, या दोन्ही प्रकारच्या पदार्थांची पौष्टिकता कशी वाढवायची :
मुंग भजीचे पीठ, थालीपीठ : तसं तर नावानुसार मुंग भजीपिठामध्ये कांदा, बटाटा टाकून भजी बनवतात. पण अशा भाज्या जशा पालक, फणस इत्यादी ज्या घरात खाल्ल्या जात नाहीत. त्यांनाही यात टाकून पकोडे बनवावे, वडे बनवावे, भजीच्या पिठापासून धिरडे बनवावे. अनेक भाज्यांना बारीक कापून किंवा ग्राइंड करून या पिठात घोळवावे. वरून कोथंबीर टाकावी. किसलेले पनीर टाकावे. झाले चवदार व पौष्टिक धिरडे तयार.
जर फ्राईड भजी किंवा वडे खायचे नसतील तर आप्पे बनवून घ्या. खूप कमी तेलात आप्पे तयार होतील.
अशाचप्रकारे थालीपिठामध्ये किसलेला भोपळा, शिमला मिरची, बारीक कापलेली पुदिना पाने, पालक इत्यादी मिक्स करून ठेपले बनवून घ्या.
ओट्स : आजकाल लोक आरोग्याप्रति खूप जागरूक झाले आहेत. म्हणून ओट्सचा वापर खूप वाढला आहे. पण बहुतेक लोक ओट्स दुधात टाकूनच खातात.
पौष्टिकता अशी वाढवा : दूध टाकण्याआधी ओट्सला हलकेसे भाजून घ्यावे. छोट्या-छोट्या क्युबमध्ये कापून हंगामी फळ टाकावी. वरून डाळींबाच्या दाण्यांनी सजवावे. साखरेच्या ऐवजी मध टाकावे. आयर्नने परिपूर्ण मधाबरोबरच फळेही टाकल्याने ओट्सची पौष्टिकता कित्येक पटींनी वाढते.