* दीपन्विता राय बॅनर्जी
व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवण्यात फॅशनचं वेगळंच महत्त्व आहे. जुन्या फॅशनमध्ये नव्याचं फ्यूजन आजकाल नवा ट्रेंड आहे, ज्याला इंडोवेस्टर्न आउटफिट नावानं ओळखलं जातं. या इंडोवेस्टर्न फ्यूजन ड्रेसेजला तुम्ही परिधान करू शकता. फॅशनच्या बाबतीत स्वीकारा हा नवा दृष्टीकोन आणि मग बना सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र.
गाउन साडी : साडीला गाउन फॉरमॅटमध्ये पदराबरोबर वापरू शकता. संध्याकाळच्या पार्टीमध्ये ही सुपरस्टायलिश लुक देईल.
स्लिट सिलौटी : हा गाउन आहे, पण धोती सलवार किंवा चुडीदारवरचा अर्धा भाग कापलेला. वरच्या भागात गाउनच्या वरच्या भागात खोलूनदेखील वापरू शकता.
कोरसेट टॉपबरोबर लहेंगा : स्कर्टसारख्या लहेंग्याचा लुक कोरसेट टॉप किंवा ब्लाऊजबरोबर खूपच फॅशनेबल होऊन जातो.
पंत साडी : ही साडी एका विशिष्ठ पद्धतीने नेसली जाते. जर बोहेमियन लुक आवडत असेल तर ही पार्टीमध्ये वापरली जाऊ शकते.
क्रॉप टॉप लहेंगा : प्रिंटेड टॉपबरोबर प्लेन रंगीत लहेंगा वापरा. लहेंग्यात हवं तर घेर जास्त द्या किंवा ए लाइन शिवा, पण मटेरिअल नक्कीच सिल्क बेस्ड असू द्या.
ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी
ड्रेस आकर्षक असेलही पण ज्वेलरी त्यावर मॅचिंग नसेल तर लुकवर फरक पडतो. जा जाणून घेऊया की कोणत्या ड्रेसवर कोणती ज्वेलरी वापरून तुम्ही ग्लॅमरस दिसाल :
* तुम्ही इंडोवेस्टर्न ड्रेसबरोबर वेस्टर्न लुकच इंडियन कुंदन ज्वेलरी सेट मॅच करू शकता, जो संध्याकाळपासून रात्रीपर्यंतच्या पार्टीमध्ये वगैरे घालता येईल.
* डार्क कलरच्या ड्रेसबरोबर डार्क शेडची हेवी एक्सेसरीज घातली जाऊ शकते.
* आपल्या व्यक्तिमत्त्वावर खुलून दिसणारा हलक्या रंगांचा इंडोवेस्टर्न ड्रेससोबत ब्लॅक मेटल किंवा सिल्वर कलरमध्येही एक्सेसरीज वापरू शकता.
* जर तुम्ही ट्यूनिक किंवा कुर्ती व चुडीदार घातला आहे आणि त्याला इंडोवेस्टर्न पॅटर्नमध्ये बदलू इच्छिता, तर कुर्ती आणि चुडिदारबरोबर गळ्यात स्कार्फ किंवा डेनिमच्या ट्यूनिकबरोबर छोटा फ्लोरल स्कार्फ तुम्हाला खूप स्टाइलिश लुक देईल.
* जर प्लाजो किंवा क्रॉप पॅन्ट घालणार असाल तर आईकट ट्यूनिक हाय कॉलरमध्ये फुल स्लीव्हबरोबर वापरा. त्याच्याबरोबर पैसले मोटिफचे इयररिंग्स उठावदार दिसतील.