काय उपयोग अशा धर्माचा?

* रोचिका अरुण शर्मा

महागडे कपडे आणि दागिने घातलेल्या महिला साजशृंगारासह राजेशाही थाटात पतीसह आलिशान गाडीतून उतरल्या तेव्हा सगळयांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.

त्यांच्या आदरतिथ्यासाठी लोक फुलांचे हार घेऊन सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे होते आणि त्यांना पुढच्या दिशेने घेऊन जात होते. त्यांच्यासाठी महागडे सोफे होते, त्यावर त्या बसल्या.

मागे बसलेल्या लोकांनाही समजले की, त्या नक्कीच मोठया घरच्या आहेत. प्रत्यक्षात आज इथे ज्या पूज्य व्यक्ती प्रवचन देण्यासाठी आल्या आहेत, त्यांच्या उच्चस्तरीय शिष्यांचे ते कुटुंबीय आहेत, ज्यांना येथे विशेष स्थान मिळाले आहे.

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, असे दृश्य सर्वत्र दिसेल. आता वातानुकूलित खोल्यांमध्येही प्रवचने आयोजित केली जातात जिथे वातानुकूलित आलिशान गाडयांमधून येणाऱ्यांची विशेष काळजी घेतली जाते.

सत्संगाचा महिमा

लग्न झाल्यावर नेहा तिच्या सासरी गेली. तिथे लग्नानंतर इष्ट देवतेच्या पूजेची प्रथा होती. त्यासाठी सर्वजण आलिशान गाडीतून गेले. खूप ऊन होते आणि लांबलचक रांगेत उभे राहिल्यानंतर दर्शन मिळत होते. नेहाला वाटले की, आज उन्हात चांगलेच तापायला होईल, पण त्यांना रांग सोडून पुढे पाठवण्यात आले. लगेचच दर्शन घेतल्यानंतर मोठी रक्कम अर्पण करून ते परतले.

काम पटकन झाल्यामुळे सासू-सासरे खूप खुश होते, पण नेहा अस्वस्थ होती. न राहवल्यामुळे तिने आपल्या उच्चपदस्थ, अधिकारी असलेल्या सासूला विचारले, ‘‘आई, आपण देवाच्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा आणि ओळख दाखवून रांगेत उभे न राहाता थेट दर्शन घेतो. अशा धर्माचा काय उपयोग? निदान तिथे तरी सर्वांना समान दर्जा मिळायला हवा ना?’’

‘‘मुली, हे गतजन्मीचे पुण्य आहे, त्यामुळेच आज आपल्याला एवढे नाव, प्रतिष्ठा मिळाली. यात काहीही चुकीचे नाही.’’

नेहाला त्यांचे म्हणणे पटले नाही, पण स्वत:ची पद-प्रतिष्ठा कुरवाळत बसणाऱ्या सासूसमोर गप्प बसणेच तिला समजूतदारपणाचे वाटले.

अशाच प्रकारे सॉफ्टवेअर प्रोफेशनल रिटा दर रविवारी आपल्या गुरूंच्या सत्संगाला जाते. आपल्या आजूबाजूला आणि कार्यालयात या सत्संगाचा महिमा आवर्जून सांगते. लोकांना सत्संगाच्या परिवाराशी जोडण्याचा खूप प्रयत्न करते. गुरूंना स्वत:चा मोठेपणा दाखवता यावा यासाठी ती असे करते.

धर्माचे शस्त्र

कार्यालयात उच्च पदावर असल्यामुळे तिच्या हाताखाली काम करणारे अनेक लोक फक्त तिला राग येऊ नये म्हणून सत्संग परिवारात सहभागी झाले. त्यांना त्या गुरुंबद्दल काहीही देणेघेणे नव्हते, फक्त नोकरीत बढती मिळावी, ही इच्छा त्यांना तिथपर्यंत खेचून घेऊन गेली.

रिटा सुशिक्षित असूनही हे सर्व का करत होती हे समजत नव्हते. कदाचित तिला अंतर्गत काही फायदा मिळत असेल किंवा ही फक्त तिची अंधश्रद्धाळू प्रवृत्ती असेल, मात्र केवळ तिच्या दबावामुळे तिच्या संपर्कात येणारे लोकही यात अडकले गेले.

अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडतात ज्यावरून असे वाटते की, सुशिक्षित समाजावरही जात, धर्म, वर्ण, श्रीमंती यांचा खोलवर प्रभाव पडत चालला आहे, तो जराही डळमळीत झालेला नाही. तर्काचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. श्रीमंतांना आपली संपत्ती टिकवण्यासाठी धर्माचे हत्यार सापडले आहे. उपासना आणि कर्माचे फळ आहे असे सांगून गरिबांचे तोंड बंद ठेवण्याची पद्धतशीर सोय करण्यात आली आहे.

कार्यालयात कोणतेही कर्म नाही

* रितू वर्मा

अंशिका एका एनर्जी बेस्ड कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. ती खूप सोपी आणि नम्र मुलगी होती. ती तिच्या सहकाऱ्यांना जमेल तशी मदत करायची. हळुहळु डिपार्टमेंटच्या छोट्या-मोठ्या सर्व कामांसाठी त्याच्या बॉसला त्याची आठवण येऊ लागली. तिच्या मेहनतीच्या जोरावर अंशिका तिच्या कार्यक्षेत्रात प्रगती करत होती. दुसरीकडे त्याच कार्यालयातील हितसंबंध मेहनतीऐवजी ग्रहमानात अडकले होते. रुची ऑफिसमधल्या प्रत्येक समस्येवर नवसात आणि कड्यांमध्ये उपाय शोधायची.

रुचीला कोणताही नवीन प्रोजेक्ट आला तर ती पंडितजींना न विचारता हो म्हणायची.

रुचीला तिच्या मूर्खपणामुळे ऑफिसमध्ये प्रगती करता आली नाही आणि त्यासाठी तिने शनीच्या अर्धशतकाला जबाबदार धरले. माझी इच्छा आहे की कोणीतरी रुचीला सांगू शकेल की वेळ चांगल्या किंवा वाईट ग्रहांनी बनत नाही तर आपल्या कृतींनी बनते.

दुसरीकडे, एका खाजगी शाळेत शिक्षिका असलेली ज्योती तिच्या गुरुजींची इतकी मोठी भक्त होती की ती त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीला दगडाची पट्टी मानत होती. तिचा प्रत्येक शब्द पाळल्याने तिची नोकरी तर वाचेलच, प्रमोशनही मिळेल, असं ज्योतीला वाटत होतं.

शाळेच्या कामाकडे दुर्लक्ष करून त्याने फक्त पूजेवर लक्ष केंद्रित केले आणि परिणामी निष्काळजीपणामुळे ज्योतीला नोकरी गमवावी लागली.

वरील उदाहरणे वास्तविक जीवनातूनच घेतली आहेत. तरुण जेव्हा उत्साहाने कार्यालयात प्रवेश करतो तेव्हा तो अनेकदा कार्यालयीन राजकारणाचा बळी ठरतो. या राजकारणामुळे ते अनेकदा तणावात राहू लागतात. या तणावाचा सामना करण्याचे 2 मार्ग आहेत, प्रथम तुम्ही समस्येकडे लक्ष द्या आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आणि दुसरे म्हणजे, लोक सहसा काय करतात ते म्हणजे पंडितांच्या मदतीने उपाय शोधणे. त्यासाठी तो हवन, कीर्तन, तंत्रमंत्र यात हजारो खर्च करतो. पण थोडं थंड मनाने बसून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करून चालणार नाही.

कठोर परिश्रमांना ब्रेक नाही : ऑफिसमध्ये असे अनेक कर्मचारी असतील जे नेहमी काम न करण्याची सबब सांगण्यात माहिर असतात. या लोकांच्या घरात नेहमीच एक समस्या असते. हे लोक तंत्रज्ञानाशी परिचित आहेत परंतु त्यांना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आहे. ऑफिसमध्ये मेहनत करणाऱ्यांचीच विश्वासार्हता असते. मेहनतीला पर्याय नाही. आळशी लोक काही दिवस मजा करू शकतात, परंतु पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.

शॉर्टकट नाही : जर तुम्हाला कार्यालयीन कामाची माहिती नसेल तर तुमच्या कनिष्ठ किंवा वरिष्ठांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. कामात काही अडचण आल्यास सहकाऱ्यांची मदत घेण्याऐवजी उपवास किंवा अंगठी घालायला सुरुवात केल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते. असे केल्याने त्यांची समस्या दूर होईल असे त्यांना वाटते. लक्षात ठेवा यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. जितके जास्त काम कराल तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कर्माने काम बनते : समीर त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचा आणि कधीच कोणतेही काम करत नसायचा, पण एखाद्याला प्रमोशन मिळताच समीरने हा सगळा नशिबाचा खेळ आहे, असे सांगून टाळाटाळ केली.

समीरसारख्या लोकांना हे अजिबात माहित नाही की नशीब आपल्या हाताच्या रेषांनी नाही तर आपल्या कृतीने बनते. नशीब स्वतःच काही नाही. आपण जे काही काम करतो, त्याचे फळ आपल्याला मिळतेच मग ते ऑफिस असो वा जीवन.

व्यावसायिक व्हा : आजच्या काळात हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही नम्रता आणि चिकाटीने चालत असाल तर तुम्हाला कोणत्याही उपासनेची गरज भासणार नाही. व्यावसायिकता हा मंत्र आहे जो तुमच्या यशासाठी आवश्यक आहे.

विश्रांती घ्या आणि काम करा : एकदा का आपण काम करायला सुरुवात केली की आपण आपला छंद सोडतो जो योग्य नाही. तुमचे छंद तुम्हाला जिवंत ठेवतात. तुमचे छंद तुम्हाला प्रचंड आनंद आणि उर्जेने भरतील जे तुम्हाला तुमचे ऑफिसचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतील.

तणावावर वर्चस्व गाजवू देऊ नका : कोणतेही नवीन काम येताच तणावग्रस्त होण्याऐवजी ते काम समजून घेण्याचा प्रयत्न करा. तणावातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते काम करणे जे तुम्हाला तणाव देते. कदाचित काहीतरी कठीण असेल, परंतु एकदा तुम्ही हे केले की तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्वत:ला स्वतंत्र वाटेल.

जीवनात कोणतीही अडचण आली तर मंदिर किंवा मशिदीत मदत शोधण्याऐवजी एकदा स्वतःची मदत मागा. स्वत:ला पटवून द्या की तुम्हाला स्वत:ला मदत करायची आहे.

ग्रह, नक्षत्र, चांगला किंवा वाईट काळ फक्त अशा लोकांचा आहे ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही. प्रत्येक अडचणीचा धैर्याने सामना करा. या अडचणी तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेल्या नाहीत, तर तुम्हाला बळकट करण्यासाठी आल्या आहेत.

जीवघेणी ठरतेय अंधश्रद्धा

* पद्मा अग्रवाल

इला पेशाने इंजीनिअर आहे. सकाळी वर्तमानपत्रातील मथळयांवर वरचेवर नजर मारून राशीभविष्य पाहण्यास ती विसरत नाही आणि मग त्यात काय लिहिले आहे त्यावरूनच तिचा मूड तयार होतो किंवा बिघडतो. राशीभविष्यात जर प्रिय व्यक्तिशी तणाव निर्माण होईल, असे असल्यास ती कधी पती तर कधी इतरांवर रागावते. तुमचे ग्रह शुभ परिणाम देणार आहेत, असे लिहिलेले असल्यास दिवसभर आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहात, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याच्याशी जोडत असते.

कुहू काळया रंगाचा गाऊन घालून आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेली होती. सर्वांनी खूपच छान असे म्हणत तिला खुश केले. पण आत्याच्या जावेला तिने परिधान केलेला काळा रंग अजिबात आवडला नाही. ती सर्वांसमोर खोचकपणे बोलली, ‘‘लग्नाला आली आहेस, दुखवटयाला नाही, मग काळा गाऊन का घातलास.’’

कुहूच्या डोळयात पाणी आले. आत्या सर्व सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या जावेच्या डोळयात प्रचंड राग होता.

जीवनावरील संकट

एकविसाव्या शतकात, अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांसाठी एक आव्हान आहे. अंधश्रद्धेमुळे बुराडी कांडात हसत्याखेळत्या ११ लोकांचे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. याआधी महाराष्ट्रातील हसनैन वरेकर कांडात एकाच कुटुंबातील १४ जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते.

अंधश्रद्धेचे मूळ कारण पुजाऱ्यांचा प्रचार आहे, जो आता इंग्रजीत विज्ञानाच्या सोबतीने भविष्याची भीती दाखवत चांगले वर्तमान मिळवून देण्याचा दावा नेत्यांप्रमाणे करत आहे. उद्या काय होईल, कोणालाच माहिती नसते. आपल्या मनाप्रमाणे घडावे यासाठी लोक कोणीही सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागायला तयार होतात.

अंधश्रद्धा ही अज्ञानाची, भीतिची, निराशेची आणि खेदाची बाब आहे की ज्यामुळे सुशिक्षित लोकही वास्तावाकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धेच्या जाळयात अडकतात. अंधश्रद्धेचा प्रसार पुजाऱ्यांपेक्षा त्यांचे भक्तच अधिक करतात.

टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मिडिया ही दोन्ही अंधश्रद्धेची मुळे मजबूत करण्यात गुंतले आहेत. ते अंधश्रद्धा पसरवण्याचे शक्तिशाली माध्यम बनले आहे.

हा संदेश १० लोकांना फॉरवर्ड करा…मनातली इच्छा पूर्ण होईल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या साइट्सवर अशा संदेशांचा पूर आला आहे.

कधी गणपतीने दूध पिण्याची, तर कधी रात्री कुणी वेणी कापत असल्याची बातमी, जगात आपल्या देशाची प्रतिमा मलिन करीत आहे. कधी दिवसानुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याचा आदेश दिला जातो. आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, परंतु महिला करवा चौथला चंद्र पाहण्यासाठी नटूनथटून दिवसभर उपवास करतात.

काही दिवसांपूर्वी वडिलांचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी १३ वर्षांच्या मुलीला ६८ दिवस उपवास करायला लावले. व्यवसायाचे तर माहीत नाही, पण यामुळे मुलीला मात्र जीव गमवावा लागला.

कायदेशीर गुन्हा

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासंदर्भातही आपल्या देशात अंधश्रद्धा आहेत. ग्रहण काळात स्वयंपाक करणे, खाणे, पूजा आदी निषिद्ध मानले जाते. ग्रहणानंतर वाराणसी, हरिद्वार इत्यादी ठिकाणी स्नानासाठी लोकांची गर्दी होते. एलडस हक्सले यांनी अशीच गर्दी बघून सांगितले होते की ‘‘सूर्याला राहूपासून मुक्त करण्यासाठी जितके लोक जमतात, तितक्याच मोठया संख्येने शत्रूच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी भारतीय जमू शकत नाहीत.’’

ही टिप्पणी आपल्यासाठी त्रासदायक असली तरी हे सत्य आहे आणि त्याचे कारण पुजाऱ्यांनी प्रचाराची मर्यादा ओलांडणे हे आहे.

मुलाचा जन्म, लग्न असो, गृहप्रवेश किंवा भूमिपूजन, लोक शुभमुहूर्त काढण्यासाठी पुजाऱ्यांकडे धाव घेतात. पुजारी सर्वात आधी आपली सोय पाहून त्यानंतरच शुभमुहूर्त सांगतात. विशेष धातू किंवा रत्नांची अंगठी घालणं, मंतरलेलं ताईत घालणं, जादूटोणा, घर बनविताना काळी हंडी टांगणं अशा अनेक अंधश्रद्धा पूर्वीप्रमाणेच त्यांची पकड घट्ट करीत आहेत.

टीव्ही वाहिन्यांवरील जाहिराती लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहेत, जसे की गोरे बनविण्याची क्रीम.

अलाहाबाद उच्च न्यायालयानेही आपल्या निकालात असे म्हटले आहे की तंत्रमंत्र, जादूटोणा, ताईत, प्रार्थना आणि धर्मावरील विश्वासाचा अतिरेक कायदेशीर गुन्हा आहे, परंतु कोर्टाचे म्हणणे कोण ऐकतो?

पुजाऱ्यांनी तयार केलेला प्रपंच

अंधश्रद्धा हा देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे. यामुळे लोक आर्थिक आणि सामाजिक शोषणाला बळी पडत आहेत. हे विज्ञान युग आहे. अशावेळी  टीव्हीवरील वाहिन्यांवर ‘नजर सुरक्षा कवच’, ‘सिद्धमाला’, ‘सिद्ध रिंग’, ‘धनप्राप्ती यंत्र’ आदींचा धंदा अंधश्रद्धेच्या नावाखाली चालविला जात आहे.

जादूटोणा, भूतप्रेत, चेटूक, तंत्रमंत्र हे केवळ दुर्बल मेंदूतून जन्माला येते. प्रत्येक घटनेमागे एक कारण असते.

काही अंधश्रद्धांमागे वैज्ञानिक कारणंही दिली जाऊ लागली आहेत, जी सुशिक्षितांना मूर्खाप्रमाणे वागायला भाग पाडतात. तसे तर हा पूर्वनियोजित व्यवसायाचाच एक भाग आहे.

दरवाजावर लिंबूमिरची टांगा, लिंबातील सायट्रिक अॅसिड कीटकनाशकाचे काम करते, जे कीटकांना आत येण्यापासून रोखते.

कुंडली जुळविणे हा फक्त पुजाऱ्यांनी थाटलेला प्रपंच आहे. मंगळ दोष निवारणाचा उपायही अंधश्रद्धाच आहे. फिल्मी जगतातील शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायसारख्या विश्वसुंदरीसह आपला मुलगा अभिषेक बच्चन याचे लग्न लावून देण्यापूर्वी ऐश्वर्याने वडाच्या झाडासोबत फेरे घेणे हे अंधश्रद्धेचेच ज्वलंत उदाहरण आहे.

ही अंधश्रद्धा व्यवसायाचा भाग आहे. जसे पोथी-पुराणात असायचे तसे आता नेट व टीव्हीद्वारे होते. मात्र साधू, पुजाऱ्यांना दान देणे, त्यांचे रक्षण करणे कायम आहे.

धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिकता

एमबीए पदवीधर असलेली ५० वर्षांची अस्खलित इंग्रजी बोलणारी फरजाना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हैदराबादमधील दर्ग्यात राहत आहे.

तिचा ठाम विश्वास आहे की तिचे कुटुंब तिच्यावर काळी जादू करीत आहे. दर्ग्यात राहिल्यामुळे ती या जादूपासून वाचेल.

मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय अंजलीचे एका मुलावर प्रेम होते. पण आईला त्यांचे नाते मान्य नव्हते. त्यासाठी ती तांत्रिकाला शरण गेली.

तांत्रिक प्रत्येक वेळी मनगटावर धागा बांधण्याच्या बदल्यात तिच्या आईकडून ५ हजार रुपये घेत असे. त्याचे म्हणणे होते की तिने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केल्यास भविष्यात तिच्यावर खूप मोठे संकट ओढवेल. या धाग्याच्या प्रभावामुळे ती तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करू शकणार नाही.

काही दिवसांनंतर अंजलीने धागा काढून फेकून दिला व आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केले. आता ती खूप आनंदात आहे.

‘वशीकरण’ वेबसाइट चालविणारे कोणत्याही समस्येचे समाधान करू असा दावा करतात. तेथील तथाकथित ज्योतिषाशी मी फोनवर संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही आधी आमच्या खात्यात पैसे जमा करा, त्यानंतर इ-मेलद्वारे समस्या सांगून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता.’’

मी प्रेसमध्ये काम करते, असे सांगताच त्यांनी लगेच फोन कट केला.

प्रशासनातील लोकच धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिक धोरणांत गुंतले आहेत, त्यामुळे समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया मंदावणार, हे निश्चित आहे.

छळ व हत्या

बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आजही ‘चेटकीण’ या  नावाखाली महिलांचा छळ व हत्या केल्याच्या बातम्या येतच असतात.

रायपूरचे डॉ. दिनेश मिश्र पेशाने नेत्र विशेषज्ज्ञ आहेत. गावकऱ्यांशी संपर्क साधल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की छत्तीसगडमधील काही लोक ज्यांना ओझा असे म्हटले जाते, ते भोळयाभाबडया गावकऱ्यांना आपल्या शब्दांच्या जाळयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यांना फसवितात. त्यांनी सांगितलेकी त्यांच्याकडे सतत तक्रार यायची की गावात एखाद्या महिलेला ‘चेटकीण’ ठरवून तिला छळले जाते. सोबतच तिचे गावातील अन्नपाणी बंद करून तिला समाज आणि गावाबाहेर काढले जाते. यामुळे गावात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण होते.

डॉ. मिश्र यांचे प्रयत्न आणि शिफारशींमुळे झाडणे, जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवून एखाद्याला वाळीत टाकणे याला अपराध ठरविण्यात आले.

डॉ. दिनेश मिश्र अंधश्रद्धेविरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’द्वारे गावागावांत जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे १,३५० सभा घेतल्या आहेत.

त्यांच्याच अथक परिश्रमांमुळे २००५ मध्ये ‘छत्तीसगड जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ तयार करण्यात आला. त्याअंतर्गत अशा प्रकरणांमध्ये ३ वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

२००७ मध्ये त्यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

अंधश्रद्धेरूपी व्यवसायाची भूमी ही राजकीय पाठिब्यांच्या खतामुळे भरभराटीस येते. या दोघांच्या हातमिळवणीमुळे मिळणारा नफा राजकारणी आणि प्रसारमाध्यमे आपापल्या स्वार्थासाठी स्वत:ला हवा तसा वापरतात.

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हा प्रश्न गंभीर झाला आहे की सरकार अंधश्रद्धेविरूद्ध कठोर कायदे का करीत नाही?

विज्ञानाला देवाप्रमाणे सादर करणारे अमेरिका, ब्रिटन हे युरोपीय देश असोत, जादू, तंत्रमंत्राला कुप्रथा म्हणविणारे अरब देश असोत अथवा आपल्याच देशात जादूटोणा, चमत्कार किंवा मनातली इच्छा पूर्ण करणारे असोत, प्रत्येक ठिकाणी अशा लोकांची मोठी जमातच पाहायला मिळते.

ती कॅन्सरसारख्या आजारांना बरे करण्यासोबतच लग्न, प्रेम, व्यवसायात भरभराट, एखाद्याला वश करणे, शत्रूचा नाश करणे इत्यादींसाठी त्यांचे नेटवर्क देशातील प्रत्येक राज्यात, शहर आणि खेडयात चालवत आहे. सोबतच आता हा व्यवसाय ऑनलाइनही करीत आहेत.

तंत्रज्ञान आणि धर्म

* प्रतिनिधी

सध्या तंत्रज्ञानाच्या चालू असलेल्या शिक्षणात खूप पैसा गुंतवला जात आहे आणि याचाच अर्थ असा आहे की 40-50 वर्षांपूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये सिमेंट-विटांनी बनवलेल्या शिक्षणाचा अर्थ आता हरवत चालला आहे. ज्याप्रमाणे नवीन तंत्रज्ञान कारखान्यांतील कामगारांना वाईट पद्धतीने काढून टाकत आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या तरुणांचे भविष्य अधिक अंधकारमय होत आहे.

संगणकावर बसून उच्च शिक्षण घेणारेच आता देश आणि जगावर अधिराज्य गाजवतील, पण हे शिक्षण खूप महागडे आहे आणि सर्वसामान्य घरांना ते शक्य होणार नाही, हे बैजूसारख्या कंपन्यांमध्ये ज्या प्रकारचा पैसा खर्च होत आहे, त्यावरून स्पष्ट होते. परवडते.

यूएसमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की $3000 (सुमारे 18,00,000 लाख रुपये) कमावणाऱ्या 64 कुटुंबांकडे एक स्मार्ट फोन, एकापेक्षा जास्त संगणक वायफाय, ब्रॉडबँड कनेक्शन स्मार्ट टीव्ही आहे. तर $3000 च्या आतील फक्त 16′ कुटुंबांकडे या सुविधा आहेत. याचा अर्थ गरीब पालकांची मुले गरिबीत राहण्यास भाग पडतील कारण ते महागड्या शाळा, महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत आणि महागड्या वस्तू विकत घेऊ शकणार नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना कमी तंत्रज्ञान माहित आहे त्यांच्या पगारात गेल्या काही वर्षात 2-3′ वाढ झाली आहे, तर उच्च तंत्रज्ञान जाणणार्‍यांच्या पगारात 20-25′ वाढ झाली आहे.

भारतात ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे कारण इथे भेदभाव हा जन्म आणि जात यांच्याशीही जोडला जातो. कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये ज्याप्रकारे पूर्ण दिवस जाहिराती घेतल्या जातात, त्यावरून तंत्रज्ञानाचे शिक्षण कुठे जाईल, हे कळत नसून अतांत्रिक शिक्षणालाही महत्त्व आल्याचे स्पष्ट होते.

तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचा मोठा परिणाम महिलांच्या शिक्षणावर होत आहे. त्यांना उच्च पदे मिळणे कठीण जात आहे. कारण शिक्षणाचा सगळा खर्च मुलांवर होत आहे, जो अधिक झाला आहे. परिस्थिती अशी आहे की भारतातील फक्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये, जिथे तंत्रज्ञानाचा नियम नाही, तिथे फक्त 7′ प्रमुख पदे महिलांकडे आहेत आणि यापैकी जास्त पदे अशा संस्थांमध्ये आहेत जिथे फक्त मुलीच शिकत आहेत.

तंत्रज्ञान केवळ गरीब आणि श्रीमंतांमधील भेदच वाढवत नाही, तर ते श्रीमंतांमधील लैंगिक अंतरदेखील वाढवत आहे. तंत्रज्ञानाने समाज आणि जगाला वाचवायचे आहे, परंतु ते सर्व शक्ती काही वाईट लोकांच्या हातात टाकत आहे. श्रीमंत घरातील मुलं महागडं शिक्षण करून उच्च कमावतील आणि त्यांना हव्या त्या मुलीशी लग्न करतील, पण त्या मुलीवरही ते त्यांच्या मनाप्रमाणे राज्य करतील. घर, कपडे, सुटी, गाडी या लोभापायी बायकांची अवस्था दागिन्यांनी लादलेल्या राजांच्या राण्यांसारखी होईल पण राजाच्या डोळ्यात फक्त सुखाच्या बाहुल्या असतील.

या समस्येचे निराकरण करणे सोपे नाही आणि धर्मामुळे, मुली त्यांच्या नशिबावर अवलंबून असलेल्या या परिस्थितीत भारतात किंवा जगात कोठेही लढू शकणार नाहीत. ती टेक्नो स्लेव्ह राहिल आणि टेक्नो स्लेव्ह्सना काम करायला मिळाल्याबद्दल तिला अभिमान वाटेल.

अंधश्रद्धाळू का नाकारतात सत्य

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

कोठे दिखाव्याचे सोंग तर कोठे भिति श्रद्धा तर काही भोंदू बाबांच्या रूढी हे सर्व मिळून तयार होतो आपला समाज. जिथे धर्मांधतेमुळे पंडीत, पुजारी उत्सवपर्वांना विविध प्रकारच्या कर्मकांडाशी जोडून तथ्यांना नाकारत आणि त्यांचे खरे मूळ आनंददायी स्वरूप नष्ट करतात. शुभ घडण्याची लालसा आणि अनिष्ट घडण्याची शंका यामुळेच त्यांची सेवा करण्यासाठी सामान्य जनता विवश होते अन् भयभीत मनाने लोक अंधश्रद्धेच्या चक्रात अडकत जातात. कारण आपल्या धार्मिक ग्रंथातूनही ईश्वराविषयी, धार्मिक कार्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी शिकवण असते. विरोध केल्यास सर्व काही नष्ट होईल.

भग्वत गीता श्लोक १८/५८

अथ चेत्त्वमहंकारान्न श्रीष्यसि विनंक्ष्यारी. अर्थात, जर तू अहंकारामुळे ऐकलं नाहीस तर तुझा पूर्णपणे नाश होईल.

न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां यो भ्यऽसूयति. भग्वत गीता श्लोक १८/६७. अर्थात, हे ज्ञान तू कोणाला सांगितले नाही पाहिजे. त्या व्यक्तीला तर मूळीच नाही जो माझी निंदानालस्ती करतो..

हे सर्व काय आहे

जर देव आहे आणि देव सर्वशक्ति आहे तर हे त्याला सर्वांना सांगण्याची काय आवश्यकता होती? त्यांनी आपले वचन सर्व भाषांत का नाही लिहिली? काम्प्युटर सॉफ्टवेअरप्रमाणे सर्व ज्ञान-विज्ञान त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. मग पत्रांवर, दगडांवर का लिहून घेतले? जे देवता मानत नाहीत त्यांच्यासमोर गीतेतील वचन वाचण्यास का अडवले? उलट हे वचन त्यांच्या कानी पडताच ते पवित्र झाले पाहिजेत. सरळ गोष्ट आहे की ते या गोष्टीचा तर्क विचारतात आणि यांच्याकडे कोणत्याच प्रश्नांचे उत्तर नसते. मग त्यांची पोल खोल होते. त्यांचे सत्य सर्वांसमोर येते. तथ्यांना नाकारणे, तर्काशिवाय कोणतीही गोष्ट मान्य करणे. धर्मभीरू मन येथूनच दुर्बल होते किंवा गैरसमज होण्यास सुरूवात होते असे आपण म्हणू शकतो. या भितिनेच नव-नव्या अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि अंधश्रद्धाळूंची संख्या वाढते.

एक गोष्ट जेव्हा मनात खोलवर रूजली गेली की जर तर्काशिवाय हे करणे चांगले आणि नाही केले तर वाईट होईल. जेव्हा इतरांच्या बाबतीत वाईट होते तसेच आपल्या बाबतीतही होऊ शकते. येथूनच अंधश्रद्धेची मालिका सुरू होते. कधी क्रिकेट मॅच जिंकण्यासाठी, तर कधी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी, कधी निवडणुका जिंकण्यासाठी हवन, पूजा केल्या जातात. जर यामुळे काही होणं शक्य असेल तर बलात्कार, हत्या वा दुर्घटना थांबवण्यासाठी भारतासारख्या देशात कोणतेही हवन का केलं जात नाही, ही विचार करण्यासारखी बाब आहे.

दिखाव्याचे सोंग

मांजर आडवी गेली आणि वाईट घडले तर त्यामुळे आपल्या मनात गैरसमज निर्माण होतो. पुन्हा असेच घडले तर आपला गैरसमज पक्का होतो. मग तिसऱ्यावेळेसही असे घडले तर गैरसमजाचे रूंपांतर अंधश्रद्धेत होते. लोकांच्या मनात भीती एवढी रूजलेली असते की ते आपला मार्ग बदलतात किंवा दुसरे कोणी या रस्त्याने जाईल याची वाट पहात बसणे किंवा पाच पावले मागे जाणे. मनातल्या भितिचे घर एवढे मोठे झाले की कधीकाळी काही चांगलेही घडले असेल याची आठवणच राहिली नाही. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असे करत करत याची माऊथ पब्लिसीटीच करून सगळीकडे ही गोष्ट पसरवली आहे. जेवढी संख्या या धर्मभीरूची वाढली नाही त्याहून अधिक संख्या अंधश्रद्धाळूची वाढलेली आहे. धर्मातील नियम हे व्यक्तिचे मन दुर्बळ होण्यामागील दुसरे कारण समजले जाते. ज्यामुळे लोक श्रद्धेच्या तथ्यांना सरळसरळ नाकारू लागले.

दिखाव्याचे सोंग करणे हे तिसरे कारण आहे. जसे की काही लोक धार्मिक कर्मकांडापासून अलिप्त राहतात. मात्र दर्शवतात की ते खूपच धार्मिक आहेत. अतिशय सच्चे आणि विश्वासू अशी पवित्र आत्मा असलेली व्यक्ती आहेत. ते दान-पुण्याच्या आड गोरखधंदा किंवा काळेधंदे चालवतात. जगाच्या आणि न्याय व्यवस्थेच्या डोळ्यांत धूळ फेकत प्रंचड धन-दौलत, मान-सन्मान, प्रतिष्ठा कमावतात.

परंपरांचा धावा करणे

प्रतिष्ठा पणाला लागल्यावर, जीवनात आणखी काय उरणार? अशी लोकांची धारणा बनलेली आहे. भ्रष्ट नेते, करचोरी करणे, सिने तारका मोठ्या थाटात माध्यमांच्या घोळक्यासह मंदिरात प्रवेश करतात. देवी-देवतांचे दर्शन, मोठ्या प्रमाणात दान करून स्वत:ला धार्मिक, पवित्र आणि स्वच्छ चारित्र्याचे असल्याचे ढोंग करतात. हे सर्व काही डोळे उघडण्यासाठी पुरेसे नाहीए? खरंतर आपण झोपत नाही फक्त डोळे बंद करून असतो. झोपणाऱ्या व्यक्तिला जागं करता येत, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येऊ शकत नाही.

चौथे कारण म्हणजे भोंदूबाबाच्या रूढींचा धावा करणे. आपले पूर्वज, घरातील वृद्ध व्यक्ती ज्या पूर्वापार करत आलेल्या आहेत, त्याचेच डोळे झाकून अनुकरण केलं जातं. असे करण्यातच लोक आपले कर्तव्य मानतात. असे वागण्याला ते मोठ्यांप्रती त्यांचे असलेले प्रेम-आदर दाखवण्याचा मार्ग समजतात. याबाबतीत कोणताही तर्क लावत नाहीत. फक्त अनुकरण करतात. असे करताना सुंतष्टी मिळाली, चांगले वाटले तर हळूहळू विश्वासही बसू लागला. जसे की कुलूप लावून आरामात फिरायला निघून जाणे कारण आता घर सुरक्षित आहे. या कर्मकांडाचे, अंधश्रद्धांचे पालन करून आपले भविष्य सुरक्षित बनत आहे असा अनुभव लोक करू लागतात. थोरामोठ्यांना करताना पाहिले म्हणून त्यांचे अनुकरण काही विचार विनिमय न करता तसेच केले जाते.

पाचवे कारण म्हणजे असाक्षरता आणि अज्ञानता. हेदेखील एक मोठे कारण आहे. आज शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार-प्रचार होत आहे. काही लोकांना का, कसे हे प्रश्न पडू लागले आहेत. व्यक्ती प्रथम त्या गोष्टीचे कारण समजू इच्छितात आणि मग ते मान्य करू इच्छितात. परंतु देशाची संख्या आजही १०० टक्के शिक्षित झालेली नाही. काही लोक मोबाइल आणि गाड्यांचा उपयोग तर करतात, पण भोंदू बाबाच्या चमत्काराच्या आशेने त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या कचाट्यात अडकतात. साई बाबा, आसारामबापूसारखे लोक कोठे आहेत? यांची सत्यता आज कोणापासून लपलेली नाही. जीव धोक्यात घालून, दुर्गम डोंगराळ भागात देवी देवतांचे दर्शन घ्यायला लोक मंदिरात जातात. काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो पण त्यांना विश्वास असतो की शरीराला कष्ट दिले, उपवास केला, दान धर्म केल्यास देवीदेवता प्रसन्न होऊन आपले कल्याण करतात. इच्छा-आंकाक्षा पूर्ण करतात. पण जर यांना कोणताही तर्क का आणि कसे शक्य आहे विचारले तर याचे उत्तर त्यांच्याजवळ नसते.

अतार्किक कहाणी

कोणी अडविले तर नजर लागली किंवा काम सुरू होताच कोणी शिंकले तर वाईट होईल. जर कोठे काणा व्यक्ती दिसल्यास खूप वाईट, डोळा फडफडणे, दिवा विझणे, मांजर आडवी गेली, कुत्र्याचे रडणे इत्यादी कोण जाणे किती गैरसमज पाळले जातात. शिक्षण घेऊन त्यांनी आपलं ज्ञान वाढवलं तर त्यांना सर्व कारणे ज्ञात होतील. जगात असे काहीच नाही ज्याचे कारण नाही, तर्क नाही. आपल्याला माहिती नाही हे आपले अज्ञान आहे.

दिवस-रात्र कसे होतात? माहिती नाही म्हणून काही तरी स्वरचित बनावट गोष्ट बनवली. जसे की राक्षस रोज सूर्याला गिळकृंत करतो किंवा यासारखाच आणखी कल्पनाविलास करतात. आजही जगात केवढ्या कला, विज्ञान लपलेले आहे. आपण त्यादृष्टीने आपला मेंदू वापरला पाहिजे. आपण या बनावट गोष्टींपासून वाचले पाहिजे. त्यासाठी साक्षरतेसह ज्ञानाची जोपसना करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचे सोडून आपण निरर्थक कार्यात व्यस्त राहातो आणि जीवनातील अनमोल वेळ वाया घालवतो. अंधश्रद्धेतच अडकून राहिल्यास, जीवनात संपूर्णत: प्रसन्नही राहू शकणार नाही म्हणूनच प्रत्येकाने साक्षरतेसोबत आपल्या बुद्धीचे बंद दरवाजे उघडून ज्ञानाचा प्रकाश दुरवर पसरवला पाहिजे.

कसं सुरू झालं अंधविश्वासाचं दुष्टचक्र

* डॉ. नीरजा श्रीवास्तव द्य

कुठे दिखाव्याचे सोंग, कुठे भीतिवर श्रद्धा, तर कुठे भाग्यरेषांवर आश्रित, एकूण मिळून हेच आहोत आपण, हाच आपला समाज. जिथे धर्मांवतेमुळे ढोंगी बाबा, पुजारी पुरोहितांद्वारे पर्व, उत्सवांना नानाप्रकारच्या उत्सवांना जोडून, सत्य नाकारत त्यांचे मूलभूत, आनंदी स्वरूप नष्ट केले जात आहे, तर दुसरीकडे शुभ गोष्टींचा मोह आणि अनिष्ट होण्याची भीती या सगळयाचे पालन करण्यास विवश झाल्याने सामान्य माणसांचे भयभीत मन अंधविश्वासाने घेरले गेले, कारण आपले धार्मिक ग्रंथसुद्धा याच गोष्टींची वकिली करतात की देवाशी संबंधित धार्मिक कार्यक्रमांवर कोणतेही प्रश्नचिन्ह लावू नका. जर गोष्टी ऐकल्या नाहीत तर तुम्ही नष्ट व्हाल.

‘…अथचेत्त्वमहंकारात्त् नश्रोष्यसि विनंगक्ष्यसि.’  (भा. गीता श्लोक १८/५८), बस्स गुपचूप पालन करत राहायचे. एखाद्या अधर्मी माणसासमोर बोलायचे नाही…‘…न च मां यो अभ्यसूयति.’  (भा. गीता श्लोक १८/६७) सगळे धर्म सोडून आम्हाला शरण या. आपल्या धर्माकडे आकर्षित होण्याचा  रट्टा मारत रहा की मी सगळया पापातून तुमचा उध्दार करेन.

सर्वधर्मान् परित्यज्य, माम एकं शरणं व्रज:।

अहं त्वां सर्वपापेभ्योमोक्षयिष्यामि मा शुच:॥

(भा. गीता श्लोक १८/६६)

हे सगळे काय आहे? परमेश्वर आहे तो, सर्वशक्तिमान असणारच नं? त्याला सगळयांना सांगायची काय गरज होती. मग त्यांनी आपली ही सगळी वचनं सगळया भाषांमध्ये का नाही लिहिलीत? कम्प्युटर सॉफ्टवेअरसारखे त्यांच्याजवळ तर सगळे ज्ञानविज्ञान कायमचे आहे. पत्र, खडकांवर का लिहिले? जे त्यांचे ऐकत नाहीत त्यांच्या समोर गीतेतील परमेश्वर वचनं वाचण्यास का मनाई केली, ही वचनं कानी पडताच ते पवित्र झाले असते. मग मनाई का केला? अगदी साधी गोष्ट आहे, त्यांना तर्क हवा असतो आणि यांच्याजवळ काही उत्तर नसते आणि त्यांचे बिंग फुटते, सत्य समोर येते. सत्य गोष्टी नाकारणे, कारण जाणून घेतल्याविना कशावरही विश्वास ठेवणे, इथूनच पटवून सांगायला सुरूवात झाली.

या भीतीमुळे नवनवीन अंधविश्वास जन्माला आले आणि अंधश्रद्धाळुंची संख्या वाढीस लागली. एकच गोष्ट मनात  खोलवर रुजली आहे की जर विनाकारण, तर्कांविना असे केल्याने चांगले व न केल्याने वाईट होऊ शकते तर आमच्या आणि इतरांच्या कृतीनेसुद्धा चांगले वाईट घडू शकते. बस्स सुरु झालं आहे अंधविश्वासाचं दुष्टचक्र. कधी क्रिकेट टीमच्या विजयासाठी, तर कधी ऑलिंपिक मेडलसाठी अथवा नेत्याचा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी हवन केले जाते.

दिखाव्याचे ढोंग

मांजर रस्त्यात आडवी गेली यासारखी लहानशी गोष्ट अंधविश्वास बनवली गेली. मनात इतकी भीती बसवली गेली की रस्ताच बदलला अथवा कोणी दुसरे त्या रस्त्यावरून जायची वाट बघण्यातच भले आहे असा विचार केला गेला. यापुढे आणखी काही करून बघायची हिंमतच केली गेली नाही. भीती मनात एवढी ठाण मांडून बसली की कधी लक्षातच आले नाही की चांगलेही घडले होते कधी. आपली भीती दुसऱ्यालाही देत गेले. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तोंडातोंडी सगळीकडे हे पसरवण्यात आलं?

धर्मभिरुची संख्या जितकी वाढते, अंधविश्वास आणि अशा माणसांच्या संख्येतही कितीतरी वाढ होते. म्हणून सर्वप्रथम धर्म, व्यक्तीचे मन, भित्रे मन आणि कमकुवत मन ही प्रमुख कारणं आहेत, ज्याचा परिणाम म्हणून अंधविश्वासी हे कारण दाखवत सत्याच्या तथ्यांची सहजता नाकारू लागलेत.

आणखी एक कारण आहे दिखाव्याच्या ढोंगाप्रमाणे काही जनधार्मिक कर्मकांडांशी संबंधित राहून असे दाखवतात की ते खूपच धार्मिक आहेत, म्हणून जास्त चांगले, खरे आणि विश्वासपात्र एक पवित्र आत्मा आहेत. मग भले ते अन्नदान, दान पुण्य याच्या मागे लपून धंदा वा काळा धंदा मोठ्या प्रमाणावर चालवतात.

भ्रष्ट मोठमोठे नेते, टॅक्स चोरी करणारे, मोठमोठया चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती मोठया ऐटीत आपल्या जाम्यानिम्यानिशी आणि मिडियाच्या झगमगाटासहीत मंदिरात व्हीव्हीआयपी पद्धतीची सुविधा घेत, देवीदेवतांची दर्शन, भरभक्कम दान, चॅरिटी करत स्वत: धार्मिक, पवित्र आणि प्रामाणिक असण्याचे ढोंग करत असतात. हे सगळे डोळे उघडायला पुरेसे नाही का? सत्य तर हे आहे की आपण झोपले नाही आहोत, सगळे जाणूनबुजून डोळे मिटून पडले आहोत. पण झोपण्याचे नाटक करणाऱ्याला नाही.

बाबांचे सत्य उघडे पडले आहे

फसवी फकिरी आणि परंपरेचे रडगाणेसुद्धा या असत्याचे कारण आहे. आपले पूर्वज बनून जे करत आले आहेत, डोळे मिटून फसवे फकीर बनलेले, आपणसुद्धा त्यांचे अनुकरण करत आहोत. असे करणे आपण आपले कर्तव्य मानू लागलो आहोत. त्यांच्या प्रती आदर बाळगण्याचा एक मार्ग समजतो आहे. त्याच्याशी कोणी वाद घालत नाही. बस मान्य करत चाललो आहोत. थोडे समाधान मिळाले, थोडे चांगले वाटू लागले, असे करताकरता विश्वाससुद्धा बसू लागतो. अगदी तसेच जसे कुलूप ठोकून आपण आरामात फिरायला निघून जातो की आता आपले घर सुरक्षित आहे. त्या कर्मकांडांना, अंधविश्वासाला मान्य करून, त्याचे पालन करून आपल्याला आपोआप स्वत:चे भविष्य सुरक्षित वाटू लागते, बस जसे आपण आपल्या घरातील थोरामोठ्यांना बघतो तसेच आपण कोणताही विचार न करता करत जातो.

अशिक्षितता, अज्ञान आणि तर्काला नाकारणेसुद्धा एक मोठे कारण आहे. मान्य आहे आज शिक्षणाचा फारच वेगाने प्रसार होत आहे. काहींच्या डोक्यात काय आणि कसे निर्माण होऊ लागले आहेत. एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीचे आधी कारण जाणू इच्छिते, मगच मान्य करू इच्छिते. परंतु आजही आपल्या देशातील लोकसंख्या १०० टक्के सुशिक्षित होऊ शकली नाही आहे. मोबाईल, गाडीचा वापर करतात पण बाबांच्या चमत्काराच्या आशेने तिकडे जाणे सोडत नाहीत आणि त्याच्या तावडीत फसत जातात. सत्य साई बाबा, आसाराम बाबू यांच्यासारखे लोक कुठे गेले? त्यांचा खरा चेहरा आज लपून राहिला नाही.

अशिक्षितपणा एक मोठे कारण

जगात असे काहीही नाही आहे, ज्याचे कारण नाही, तर्क नाही. माहीत नसेल तर हा आपला अशिक्षितपणा आणि अज्ञानच आहे. दोन अधिक दोन चारच होतील. तीन अधिक एकसुद्धा चारच होतील. जर हे आपल्याला माहीत नसेल तर याला आपण आपले अज्ञानच म्हणायला हवे. रात्र आणि दिवस कसे होतात? माहित नाही तर काहीही काल्पनिक अंदाज लावत बसा, जसे की एक राक्षस रोज सुर्याला गिळतो किंवा कोणत्याही बिनबुडाच्या कल्पना परंतु त्यामागचे कारण…

एक सत्य नेहमी तसेच राहणार आहे. आपल्याला उशिरा कळले. मोबाईल, टीव्ही डिश, गाडी असो वा विमान उडवण्याचे विज्ञान हे आधीही होते, आपल्यालाच उशिरा कळले. आजही न जाणे किती कला, किती विज्ञानजगत लपलेले आहे. आपण त्यात आपला मेंदू खर्च करू इच्छित नाही.

अशिक्षितांचे सोडा, सुशिक्षितांनीसुद्धा आपली बुद्धी अंधविश्वासाने बनवली आहे. त्यांना बुद्धी वापरून काही समजून घ्यायचे नाही आहे. शिक्षण चांगले नाही, घरून दही खाऊन मंदिरात देवाचे दर्शन घेऊन परीक्षा देऊन येतात, याचा परिणाम त्यांचा त्यानाच कळतो की त्यांना एवढेच मिळू शकते.

अंधविश्वासाने घेरलेले असे लोक आनंदीसुद्धा राहू शकत नाही. अशातश्या शिक्षणाच्या साथीने लोकांनी ज्ञानाचा प्रकाश सर्वात आधी आपल्या आत पसरवायला हवा. काही असेल तर वास्तव काय आहे? कसे आहे? का आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. या सगळयाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे, मगच मान्य करायचे आहे. आपला खरा विकास आणि उध्दार तिथूनच सुरु होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें