तर नेहमी रहाल फिट अँड फाईन

* शोभा कटारे

तरुण राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल आणि आहार, झोप आणि झोपण्याच्या वेळातील बदल, व्यायाम जसं की फेरपटका मारणं, धावणं इत्यादी.

जर तुम्ही आपल्या दिनचर्येत बदल करून या सर्व सवयी लावल्या, तर नक्कीच तुम्ही निरोगी आणि ऊर्जेने भरलेले असाल आणि स्वत:ला तरुण झाल्यासारखं वाटेल.

चला तर जाणून घेऊया या सवयी स्वीकारून तुम्ही स्वत:ला दीर्घकाळपर्यंत निरोगी आणि तरुण कसे ठेवू शकता :

रुटीन लाईफ गरजेचं : बदलती लाइफस्टाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुरेशी झोप न घेणं एक समस्या बनत चालली आहे. अलीकडे आपण सर्वजण दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या वेळी फ्री असतो आणि तेव्हा आपण आपला मोबाईल घेऊन बसतो व आपलं खानपिणं सर्व कामे टीव्ही पाहतच करतो आणि अनेकदा अनावश्यक आणि जंक फूड इत्यादी जास्तच खातो. अशावेळी वेळ केव्हा निघून जाते आपल्याला समजत नाही आणि मग आपल्याला झोपायला उशीर होतो आणि मग सकाळी लवकर उठताना त्रास होतो. ज्यामुळे आपण आपल्याला स्वत:लाच फ्रेश वाटत नाही. याचा प्रभाव आपल्या आरोग्यावरदेखील पडतो म्हणून स्वत:ला कायम ताजतवानं ठेवण्यासाठी वेळेत झोप आणि उठण्याची सवय लावा.

जर तुम्ही या दिनचर्येचा स्वीकार केला तर शरीरावर अनुकूल फायदे दिसतात :

* चांगल्या झोपेमुळे इम्युनिटी बूस्ट होते, ज्यामुळे आपलं शरीर आजाराशी लढण्यास सक्षम होतं आणि आपण लवकर आजारी पडत नाही.

* एका संशोधनात असं देखील आढळलं आहे की चांगली झोप शरीराला रिपेअर, रिजनरेट आणि रिकव्हर करण्यात खूप मदत करते.

* ७-८ तासाची झोप आपल्या मनाला ताजतवानं ठेवते, ज्यामुळे आपली स्मरण आणि विचार करण्याची शक्ती वाढते. आपण कामे योग्य प्रकारे करू शकतो.

* यामुळे आपली कार्यक्षमतादेखील वाढते म्हणजेच आपण कामे वेगाने करू शकतो.

* मानसिक आरोग्य चांगलं राहतं. कमीत कमी सात आठ तासाची चांगली झोप आपल्याला अनेक आजार जसं की लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाबापासून दूर ठेवते.

नियमित शारीरिक व्यायाम : नियमित शारीरिक व्यायाम आपल्या वाढत्या वयाच्या गतीला मंद करून  आपल्याला अधिक काळपर्यंत तरुण ठेवण्यात मदत करतो. चांगलं आरोग्य आणि तरुण राहण्यासाठी आपण दररोज सकाळी अर्धा वा एक तास शारीरिक व्यायाम करणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही स्वत:साठी एक एक्सरसाइज वा व्यायामाची निवड करा, जो करण्यात तुम्हाला मजा येईल.

तुम्ही तुमचा नियमित व्यायाम जसं की वेगाने धावणे, वेगाने चालणं इत्यादी करू शकता. जर तुम्हाला हे करायला आवडत नसेल तर तुम्ही झुंबा व एरोबिक्स वा डान्सचादेखील समावेश करू शकता. तुम्ही जिम वा कोणत्याही इतर फिटनेस क्लासचा भागदेखील बनू शकता.

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

* नियमितरित्या व्यायाम केल्यामुळे मेटाबोलिझम वाढतो तसंच आपल्या कॅलरीज वेगाने कमी होतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. नियमित व्यायाम आपल्या मास पेशींना निरोगी ठेवतं आणि शरीरात रक्ताभिसरणदेखील योग्य बनवतं. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता, सोबतच मेंदूला रक्ताचा व्यवस्थित सप्लाय मिळाल्यामुळेदेखील सक्रियरित्या कार्य करतं तसंच नवीन ब्रेन सेल्स बनण्यातदेखील मदत मिळते.

* नियमित व्यायाम तणावाला कमी करतो तसंच ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यात मदत करतं.

* नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं. यामुळे हृदय उत्तम राहतं आणि आपण अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेऊ शकतो. यामुळे व्यक्तीला हार्ट अटॅक आणि रुदयाशी संबंधित इतर आजार होण्याच्या धोका कमी खूपच कमी होतो.

समतोल आहार का?

हे जाणून घेणे गरजेचे आहे की जीवित राहण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी समतोल आहाराचे सेवन करणे गरजेचे असण्याबरोबरच, समतोल आहारामध्ये असलेली पौष्टिक तत्व आपल्या शरीरात पोषण स्तर बनवून ठेवतो, यामुळे आपण निरोगी राहतो.

समतोल आहाराकडे ठेवा लक्ष

* सकाळचा नाश्ता करायलाच हवा.

* झोपण्यापूर्वी एक तास अगोदर जेवण करण्याची सवय लावा.

* रात्री कमीत कमी व हलका आहार घ्या.

समतोल आहाराचे फायदे

* रोगप्रतिरोधक क्षमता का वाढवतं.

* पाचनशक्तीला मजबूत बनवतं तसंच आरोग्य चांगलं राखतं.

* आपल्या मासपेशी, दात, हाडे इत्यादींना मजबूत बनवतं.

* व्यक्तीची कार्यक्षमता बनवून ठेवण्यात तसंच त्याचा मूडलादेखील योग्य बनवून ठेवतं.

* मेंदूला निरोगी बनवतं.

* वजन वाढण्यापासून रोखतं.

सीजनल आणि लोकल फूड का खावं

लोकल आणि सीजनल फळ तसंच भाज्या तिथलं तापमान, जल आणि वायुनुसार तसंच यामध्ये कमीत कमी किटकनाशकं व रासायनिक पदार्थांच्या उपयोगाने उगवल्या जातात आणि त्यानुसारच आपलं शरीर परिपूर्ण होतं म्हणून हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक असतं. यासोबतच या स्वस्त असतात. म्हणून प्रयत्न करा की नेहमी भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा. यासोबतच इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्या आहारात हळद, लसूण, लिंबू, गुळवेल, तुळस, आवळा, विटामिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.

आपलं लक्ष केंद्रित करा

अनेक लोकं शरीराला सुदौल व वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला खूप जोश दाखवतात, परंतु काही दिवसानंतर त्यांना हे करण्यात त्रास होऊ लागतो आणि हळूहळू त्यांचा जोश थंड पडू लागतो आणि ते आपल्या लक्षापासून भटकू लागतात.

यापासून वाचण्यासाठी गरजेचं आहे की थोडासा धीर धरा. जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये वारंवार अयशस्वी होतो आणि जास्त वेळ लागू लागतो तेव्हा आपण ते काम मध्येच सोडून देतो. यासाठी खरं तर आपल्याला धैर्याची गरज असते.

* आपलं धैर्य आपल्या एकाग्रतेला वाढवतं. आपल्या लक्षापासून भटकू देत नाही.

* आपल्यावरती निराशा हावी होऊ देत नाही.

* आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो.

* आपलं धैर्यच आपल्याला योग्य प्रकारे आणि योग्य वेळी करण्यासाठी प्रेरित करतं.

* धैर्य आपल्याला शिकवतं यशस्वी होण्याचा धडा कारण यामुळे प्रत्येक कामात यश मिळणं शक्य आहे. तरुण बनणं आणि कायम चिर तरुण राहणं एका दिवसाचं काम नाहीए. यासाठी आपल्याला निरंतर प्रयत्न करावे लागतात आणि स्वत:ला काही नियमांमध्ये बांधून ठेवावं लागतं. म्हणून जर तुम्हाला चिर तरुण राहायचं असेल तर तुमच्या दिनचर्येत बदल करा आणि त्यांचं नियमितपणे पालन करा. याचे परिणाम तुम्हाला काही महिन्यातच दिसून येतील. कारण धैर्याशिवाय यश मिळणं कठीण आहे.

डिटॉक्सीफिकेशन

आपली त्वचा खूपच नाजूक आणि संवेदनशील असते तसंच पर्यावरणाचा याच्यावर सरळ प्रभाव पडतो. यासाठी याला निरोगी, स्वच्छ आणि चमकदार आणि चिरतरुण ठेवण्यासाठी अतिरिक्त देखभालीची गरज असते. यासाठी आपण अनेक लोशन, क्रीम इत्यादीचा वापर करतो. परंतु आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल करत नाही. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण रहात नाही आणि आपल्या त्वचेवरती सुरकुत्या येऊ लागतात.

या त्रासापासून वाचण्यासाठी त्वचेला डिटॉक्सिफाय करणं गरजेचं आहे. निरोगी राहणं आणि दिसण्यासाठी शरीराला फक्त बाहेरूनच नाही तर आतील घाणदेखील दूर करणे गरजेचे आहे. शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करणं, पोषण देणं आणि आराम पोहोचवणं याला डिटॉक्सिफिकेशन म्हटलं जातं.

जर तुम्हाला नेहमी सुस्त वाटत असेल व अचानक तुमच्या चेहऱ्यावरती मुरूम पुटकळया येत असतील वा तुमच्या पचनशक्तीमध्ये काहीतरी गडबड असल्याचं वाटत असेल तर तुमचं शरीर विषाक्त झालेलं आहे. तुमच्या शरीराला गरज आहे ती डिटॉक्सिफिकेशनची म्हणजेच तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी आणि तरुण ठेवू शकाल आणि शरीर बाहेरूनच नाहीतर आतील घाणींपासूनदेखील दूर करू शकाल. चीरतरुण राहणं आणि दिसण्यासाठी चेहऱ्याची चमक गरजेची असते. फक्त यासाठी तुम्हाला याच्या देखभालीची गरज असते.

वाढत्या वयातही असे दिसाल तरूण

* गरिमा पंकज

तुम्ही तुमचे वय वाढण्यापासून रोखू शकत नाही, पण वाढत्या वयाचे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकता. तरुण आणि सक्रिय राहाण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

आहार

आपण काय आणि कसे खातो याचा थेट संबंध आरोग्याशी, व्यक्तिमत्त्वाशी आणि आपल्या सक्रिय राहाण्यावर होत असतो. म्हणूनच आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

काय खावे

* सुका मेवा, कडधान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे यांसारखे भरपूर अँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ खा. अँटिऑक्सिडंट्स हे शरीरातील जीवाणू-किटाणूविरोधात लढून वृद्धत्वाच्या खुणा कमी करतात. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच रोगाशी लढण्याची क्षमता मजबूत करून संसर्गापासून रक्षण करतात.

* वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होऊ लागते. यासाठी दिवसातून किमान १ कप ग्रीन टी प्यायल्यास स्मरणशक्ती चांगली राहाते.

* ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स जसे की मासे, सुका मेवा, ऑलिव्ह ऑइल इत्यादींनी समृद्ध असलेले पदार्थ खा. ओमेगा-३ तुम्हाला तरुण आणि सुंदर ठेवते.

* क जीवनसत्त्व शरीरासाठी नैसर्गिक बोटॉक्ससारखे कार्य करते. यामुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहातात आणि त्यावर पुरळ उठत नाही. यासाठी संत्री, हंगामी फळे, कोबी इत्यादींचे सेवन करा.

* काही गोड खावेसे वाटल्यास डार्क चॉकलेट खा. यामध्ये फ्लॅव्हनॉल भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य निरोगी राखण्यास मदत होते.

* तरुण आणि सक्रिय राहाण्यासाठी जास्त खाणे टाळा. भूकेच्या फक्त ८० टक्के खा.

काय खाऊ नये

* रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ खाऊ नका. यामुळे कंबरेचा घेर वाढतो. प्रमाणापेक्षा मोठया आकाराची फळे, रस, साखर, गहू इत्यादींचे सेवन कमी करा.

* सोयाबीन, मका आणि कॅनोला तेलाचे सेवन टाळा, कारण त्यात पॉली सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. या ऐवजी ब्राऊन राइस आणि ऑलिव्ह ऑइलचे सेवन करा.

* लाल मांस, चीज, फॅटी दूध आणि मलईमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. यामुळे धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

* मैद्यापासून बनवलेला पांढरा ब्रेड, पास्ता, पिझ्झा इत्यादी कमी प्रमाणात खा.

कॅलरीजच्या सेवनावर ठेवा लक्ष

लठ्ठपणा आणि कॅलरीजचे सेवन यांचा परस्परसंबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने आरोग्यावर परिणाम होईलच, सोबतच शारीरिक हालचालीही मंदावतील आणि वयही जास्त दिसू लागेल.

जीवनशैलीत बदल

दैनंदिन सवयींमध्ये छोटेसे बदल करून तुम्ही दीर्घकाळ तरूण आणि सक्रिय राहू शकता :

* आपले मन नेहमी गुंतवून ठेवा. काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुमचे मन सक्रिय राहील आणि तुम्ही मानसिकदृष्टया तरुण राहाल.

* काही हार्मोन्स वृद्धत्व रोखण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, थायरॉईड, कोर्टिसोल आणि डीएचई एजिंगच्या प्रक्रियेत ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तुमच्या हार्मोनल पातळीवर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्ही वृद्धत्वाशी संबंधित लक्षणांपासून दूर राहू शकाल.

* तुम्ही प्रत्येक गोष्टींकडे कसे पाहता हा महत्त्वाचा घटक तुम्हाला तरुण आणि सुंदर ठेवण्यास मदत करतो. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पाहा. स्वत:ला आनंदी आणि उत्साही ठेवा.

त्वचेला ठेवा तरूण आणि सुरक्षित

उन्हात बाहेर जाण्याने त्वचा काळवंडते. या काळया भागांवर पटकन चट्टे पडतात. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन अवश्य वापरा.

त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी, त्वचेनुसार नॉनटॉक्सिक मॉइश्चरायझर्स निवडा. ते विशेषत: झोपण्यापूर्वी लावा.

चेहऱ्याचा व्यायाम

चेहऱ्याच्या स्नायूंसाठी व्यायाम केल्याने चेहऱ्याला सुरकुत्यांपासून संरक्षण मिळते. कपाळाला मुरुमांपासून वाचवण्यासाठी, आपले दोन्ही हात कपाळावर ठेवा आणि केसांची रेषा आणि भुवया यांच्यामध्ये बोटे पसरवा. बोटांनी कपाळावर हलका दाब देऊन बोटे हळूहळू बाहेरच्या दिशेने सरकवा.

चेहऱ्यासाठी आहेत काही चांगले व्यायाम

गाल वर करणे (चीक लिफ्ट) : ओठ हलके बंद करा आणि गाल डोळयांकडे खेचण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ओठांचे बाह्य कोपरे रुंद स्मिताने वर करा. असे १० सेकंद करा. हसणे हा गालांसाठी चांगला व्यायाम आहे.

फिश फेस : हा गाल आणि जबडयासाठी चांगला व्यायाम आहे. याने तुमचे ओठ योग्य आकारात येतात. आपले ओठ हलके बंद करा. गाल शक्य तितक्या आत खेचा. या आसनात हसण्याचा प्रयत्न करा.

कठपुतळीसारखा चेहरा (पपेट फेस) : हा व्यायाम संपूर्ण चेहऱ्यासाठी उपयक्त ठरतो. यामुळे गालांचे स्नायू सैल न होता मजबूत होतात. बोटांचे टोक गालावर ठेवून स्मित करा. गाल वरच्या दिशेने खेचा आणि स्मितहास्याच्या या मुद्रेत ३० सेकंद राहा.

तरूण दिसण्यासाठी मेकअप टीप्स

– पूनम पांडे

४० शी पार करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेकअप करायचाच नाही. या वयातदेखील तुम्ही मेकअपच्या योग्य शेड्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण दिसू शकता. ४०+ स्त्रियांनी यंग आणि फ्रेश लुकसाठी त्यांच्या व्हॅनिटी बॉक्समध्ये काय ठेवायचं हे जाणून घेण्यासाठी आम्ही मेकअप आर्टिस्ट मनीष केरकर यांच्याशी बोलणं केलं.

कॉन्फिडन्स वाढवतो मेकअप

मान्य आहे की मेकअप चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतो, परंतु हेदेखील एक सत्य आहे की मेकअप केल्याने आत्मविश्वासदेखील द्विगुणीत होतो. जेव्हा तुम्ही कुठे नटून थटून जाता आणि लोक तुमची स्तुती करतात तेव्हा आपोआप तुमची बॉडी लँग्वेज बदलते कारण त्यावेळी स्वत:ला आत्मविश्वास येतो. म्हणून जेव्हादेखील घराबाहेर पडाल मेकअप करायला विसरू नका.

मेकअपपासून दुरावा का

अनेकदा एकल स्त्रिया खासकरून घटस्फोटिता वा विधवा मेकअप करत नाहीत, उलट त्यांनी असं अजिबात करता कामा नये. डार्क करू नका, परंतु मेकअपच्या लाईट शेड्सने तुमचं सौंदर्यदेखील वाढू शकतं. अशा प्रॉडक्ट्सना मेकअप बॉक्समध्ये खास जागा द्या. फाउंडेशन ऐवजी बीबी वा सीसी क्रीम लावा. यामुळे तुम्हाला नॅचरल लुक मिळेल. ओठांवर लिपबाम लावा. आय मेकअपसाठी काजळचा वापर करू शकता. हे विसरू नका की गर्दीमध्ये तुम्ही उठून दिसण्यासाठी प्रेसेंटेबल दिसणं गरजेचं आहे.

मॉइश्चराय

वाढत्या वयासोबत त्वचादेखील कोरडी होते. अशावेळी त्वचेला गरज असते ती एक्स्ट्रा मॉइश्चरायझरची, जी त्वचेतील ओलावा कमी  करू शकेल. त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी दिवसा आणि रात्री दोन्हीवेळी मॉइश्चरायझर लावून चेहऱ्याला मॉइश्चराइझ करा. यामुळे त्वचा मऊ मुलायम होईल आणि ग्लोदेखील करेल.

अँटीएजिंग क्रीम

चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या लपविण्यासाठी अँटीएजिंग क्रीमचा वापर करा. यामुळे त्वचा टाईट होईल. तुम्ही हवं असल्यास बाजारात उपलब्ध सीसी क्रीमदेखील वापरू शकता. यामध्ये मॉइश्चरायझर, अँटीएजिंग क्रीम, सनस्क्रीम इत्यादींचे खास गुण असतात. ज्यामुळे तुम्हाला फाउंडेशन, सन स्क्रीन, अँटीएजिंग क्रीम इत्यादी वेगवेगळया लावण्याची गरज पडत नाही.

बेस मेकअप

* बेस मेकअपसाठी फेस पावडर वापरू नका. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसून येतात.

* परफेक्ट बेससाठी मॅट फिनिशचं लिक्विड फाउंडेशन वापरा.

* जर तुम्हाला कन्सिलर वापरायचं असेल तर फाउंडेशनऐवजी कन्सिलरदेखील लिक्विड बेस्ड विकत घ्या.

फाउंडेशन

* यंग लुकसाठी मॉइश्चरायझर युक्त फाउंडेशन विकत घ्या. हे कोरडया त्वचेला मुलायमपणा देतं.

* त्वचेला शायनी इफेक्ट देण्यासाठी हलक्या पिवळया शेडचं फाउंडेशन लावा.

* पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची चूक करू नका. हे फक्त चेहऱ्यावर उभारलेल्या फाईन लाइन्स, रेडनेस, ब्राऊन स्पॉट इत्यादी लपविण्यासाठीच वापर करा.

* थिक फाउंडेशनच्या वापराने तुमच्या फाईनलाईन्स दिसू शकतात. त्यामुळे लाईट वेट फाउंडेशन विकत घ्या.

मानेचा मेकअप

* हे वयात फक्त बेस मेकअपने काम चालणार नाही, परफेक्ट लुकसाठी तुमच्या मानेचा मेकअपदेखील करणे गरजेचे आहे.

* बेस मेकअपप्रमाणे मानेच्या मेकअपसाठीदेखील मान आणि बस्ट एरिया, जर तुम्ही डीप नेकचा ड्रेस घालणार असाल तर फाउंडेशन लावा.

आय मेकअप

* आयशॅडो लावण्यापूर्वी प्रायमर लावून आय मेकअपला परफेक्ट बेस द्या. यामुळे फाईन लाईन्स दिसू शकणार नाहीत.

* प्रायमरप्रमाणे परफेक्ट बेससाठी कन्सिलरदेखील लावू शकता, परंतु हे डोळयाच्या चाहूबाजूनी नाही तर फक्त डोळयाच्या खालच्या भागावर लावा म्हणजे डार्क सर्कल्स लपून जातील.

* चांगल्या परिणामासाठी कन्सिलरमध्ये थोडीशी आयक्रीम मिक्स करून अप्लाय करा.

आय शॅडो

* डार्क आय मेकअप करू नका. यामुळे तुमचं वय अधिक दिसून येईल.

* मॅट फिनिशच क्रीम बेस्ड आय शॅडो वापरा.

* फुल शिमर शेडऐवजी शॅम्पन आय शॅडो लावा. हे तुम्हालाच यंग लुक देईल.

* पूर्ण पापण्यांवर आय शॅडोचा कोणतंही डार्क कलर लावू नका. होय, डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन लावू शकता.

* ब्राईट आयशॅडोचा वापर करू नका यामुळे सुरकुत्या दिसून येतील.

ब्लॅक आयलाइनर

* ब्लॅक आयलाइनरऐवजी तुमच्या व्हॅनिटी बॉक्समध्ये डीप ब्राऊन शेडचं आयलाइनर ठेवा.

* लिक्विड आयलायनरचा वापर तुमच्या आय मेकअपला हेवी लुक देऊ शकतो. म्हणून लॅक्मेचं पेन्सिल आयलाइनर विकत घ्या. यामुळे सॉफ्ट लुक मिळेल.

* नॅचरल लुकसाठी आयलाइनर फक्त डोळयांच्या वरच्या आयलीडवर लावा. खालच्या आयलीडवर लावू नका. लायनरने पापण्याच्या कोपऱ्यात आणून वरच्या दिशेने लावा. यामुळे डोळे मोठे आणि आकर्षक दिसून येतील.

करर्ली आयलॅशेज

* वाढत्या वयाबरोबरच आयलॅशेज कमी होतात म्हणून मस्कारा लावून आईलॅशेजला कर्ल करायला विसरू नका.

* डिफरंट लुकसाठी ब्लॅक वा ब्राऊनऐवजी ग्रे रंगाचा मस्कारा लावा.

* ट्रान्सपरंट मस्कारा लावूनदेखील आयलॅशेज कर्ल करू शकता.

* कलरफुल वा ब्राईट शेड्सचा मस्कारा लावू नका.

लिपस्टिक

* ओठांची त्वचा खूप नाजूक असल्यामुळे ती लवकर कोरडी दिसून येते. ती मुलायम बनवण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर व्यासलीन लावा.

* जर लीपला शेप देण्यासाठी लीप लायनरचा वापर करत असाल तर लक्षात ठेवा की यासाठी लाइनरची शेड लिपस्टिकच्या एक शेड लाईट असावी.

* नैसर्गिक आणि डीप शेड लिपस्टिकऐवजी दोन्हीच्या मधली शेड  निवडा.

* मॅटऐवजी क्रिमी लिपस्टिक विकत घ्या. ही ओठांना सॉफ्ट टच देईल.

* लिपस्टिकसाठी ब्राऊन, बर्गंडीसारख्या डार्क शेड निवडू नका. लाईट शेड्सना महत्व द्या.

चीक मेकअप

* वाढत्या वयाबरोबरच चेहऱ्याचं फॅट कमी होतं. अशावेळी चीक बोनला हायलाईट करून तुम्ही आकर्षक लुक मिळवू शकता.

* चिक्ससाठी पावडर नाही, तर क्रीम बेस्ड मॅट ब्लशरचा वापर करा.

* पीच, पिंकसारखे ब्लशर तुम्हाला यंग लुक देऊ शकतात.

हायलाईटरने लपवा सुरकुत्या

मेकअप पूर्ण झाल्यानंतरदेखील जर सुरकुत्या दिसत असतील तर त्याला लपविण्यासाठी हायलाईटरचा वापर करा, परंतु हे पूर्ण चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नका, फक्त तिथेच लावा जिथे सुरकुत्या दिसत आहेत. जर तुम्ही सावळया असाल तर शॅम्पन शेड आणि गोऱ्या असाल तर गोल्डन बेज कलरचं हायलाईटर विकत घ्या.

प्रत्येक दिवशी दिसा सुंदर

* पारूल भटनागर

ऋतुजाचा देहबांधा अगदी परफेक्ट होता, परंतु त्वचा तितकी चार्मिग नव्हती. ती विचार करायची की बाजारात येणारं प्रत्येक महागडं उत्पादन मी आपल्या त्वचेसाठी वापरते, तरीसुद्धा माझी त्वचा तरूण व चमकदार का बरं दिसत नाही. मग याविषयी तिने आपल्या मैत्रिणींशी शिखाशी संवाद साधला, तेव्हा तिने सांगितले की आपण आपल्या त्वचेचं सौंदर्य केवळ महागड्या क्रिम्सच्या वापराशी जोडून बघतो, याउलट त्वचेचं सौंदर्य हे दररोज योग्य देखभाल केल्याने उजळतं.

जर तुम्हीही आपली त्वचा सुंदर बनवू पाहत असाल तर या टीप्सचा जरूर अवंलब करा.

स्किन टाइप व क्लिंजिंग

जाहिराती पाहून उत्पादनं खरेदी करण्याचं वेड महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं, याउलट ती खरेदी करण्यापूर्वी आपण आपली स्किन टाइप लक्षात घ्यायला हवा, कारण स्किन टाइप जाणून न घेता उत्पादनाचा वापर केल्यास योग्य परिणाम साधता येणार नाही. त्यामुळे स्किन टाइप जाणून घेणं जरूरी आहे.

जर तुमची त्वचा रफ असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा कोरडी आहे आणि अशा त्वचेवर सुगंधित क्लिंजरचा चुकूनही वापर करू नये. सॉफ्ट क्लिंजरचाच वापर करावा. तेलकट त्वचेमध्ये मोठ्या रोमछिद्रांसह त्वचेवर तेलकटपणाही दिसून येतो. यामुळे ऑइलफ्री फेसवॉशचा वापर करा.

संवदेनशील त्वचेची समस्या ही असते की काहीही ट्राय केल्यास जळजळ व लालसरपणा त्वचेवर दिसू लागतो. यासाठी माइल्ड क्लिंजर वापरावे व त्वचा टॉवेलने घासू नये. नाहीतर त्वचा लाल होऊ शकते. नॉर्मल स्किन क्लीअर असते, ज्यावर साधारणपणे प्रत्येक प्रकारचं ब्रँडेड उत्पादन ट्राय करता येतं. म्हणजे क्लिंजिंगच्या वापराने घाम, तेलकटपणा व मलीनताही दूर करता येते.

टोनिंग

कधीकधी क्लिजिंगनंतरही त्वचेमध्ये थोडाफार मळ राहून जातो, जो टोनरच्या मदतीने स्वच्छ करता येतो. यासाठी कापूस टोनरमध्ये बुडवून चेहऱ्यावर लावावा. हा एस्क्ट्रा क्लिंजिंग इफेक्ट तुमच्या त्वचेमध्ये मॉइश्चर कायम राखण्याचं काम करतो. म्हणून क्लिंजिंगनंतर टोनिंग करायला विसरू नका.

एक्सफॉलिएशनद्वारे मृत पेशी काढा

दररोज लाखो स्किन सेल्स बनतात, पण कधीकधी हे सेल्स त्वचेच्या थरावर बनतात, जे हटवण्याची गरज भासते. एक्सफॉलिएट प्रक्रियेने मृत त्वचा पेशी काढता येतात. यामुळे अॅक्ने, ब्लॅकहेड्सच्या समस्येपासूनही सुटका होते. उत्तम परिणामांसाठी ही प्रक्रिया टोनिंगनंतर आणि मॉइश्चरायझिंगपूर्वी केली पाहिजे.

पौष्टिक भोजन व पुरेशी झो

तुम्ही आपल्या डाएटमध्ये फळं, डाळी व भाज्या अधिकाधिक समावेशित करा. चिकन, अंडी, मासे वगैरेंचंही सेवन करा. पूर्ण झोप घेऊन रूक्ष त्वचा, काळी वर्तुळंसारख्या समस्यांपासून दूर राहा. अशाप्रकारे दररोज आपल्या त्वचेची देखभाल केल्यास आपले सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

मॉइश्चरायझिं

प्रत्येक त्वचेला सुदृढ राखण्यासाठी आर्द्रतेची गरज असते. बदलत्या मोसमासह त्वचेची गरजही बदलत राहते. अशावेळी त्वचेला प्रत्येक मोसमात वेगवेगळ्या प्रकारच्या मॉइश्चराझारने मॉइश्चराइज करण्याची गरज असते, कारण रूक्ष त्वचेमुळे खाजेची समस्या निर्माण होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही केवळ ऑइल फ्री मॉइश्चरायझरच वापरा. यामुळे रोमछिद्र ब्लॉक न झाल्याने अॅक्ने वगैरेची समस्याही निर्माण होणार नाही.

सनस्क्रिनपासून अतिरिक्त देखभाल

सुर्याची अल्ट्राव्हॉयलेट किरणं आपल्या त्वचेला डॅमेज करू लागतात. अशावेळी सनस्क्रिनपासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी २५-३० एसपीएफचे सनस्क्रिन वापरावे. असा विचार करू नये की हे केवळ उन्हाळ्याच्या दिवसातच वापरले पाहिजे, याउलट हे थंडीच्या मोसमातही वापरावे कारण त्वचेची देखभाल प्रत्येक मोसमात जरूरी आहे.

पायांची काळजी

जर तुमच्या पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील किंवा नखं स्वच्छ नसतील तर कितीही सुंदर फुटवेअर असो, तुमच्यावर ते शोभून दिसणार नाहीत. महिन्यातून कमीत कमी २ वेळा मॅनीक्योर व पॅडिक्योर जरूर करावे.

याव्यतिरिक्त जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिंबाने पायाचे पंजे व नखं स्वच्छ करावी आणि रात्री झोपण्यापूर्वी फिट केअर क्रिमचा वापर जरूर करावा.

रहा नेहमीच युवायुवा

* गरिमा पंकज

तुम्ही तुमचे वय वाढणे तर थांबवू शकत नाही, मात्र वाढणाऱ्या वयाच्या प्रभावाला तर जरूर कमी करू शकता. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सीनियर डायटिशिअन निधी धवन यांच्या मते आपण काय खातो आणि कसे खातो याच्याशी आपले आरोग्य आणि सक्रियता यांचा थेट संबंध असतो.

काय खाल

* अँटीऑक्सिडंट्स पदार्थ जसे सुका मेवा, अख्खे धान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे खा. अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची   लक्षणे कमी करतात. हे इम्यून सिस्टीम मजबूत करून इन्फेक्शन पासूनही   वाचवतात.

* दिवसातून कमीतकमी एक कप ग्रीन टी प्यायल्याने वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती चांगली राहते.

* ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट्सयक्त भरपूर पदार्थ जसे मासे, सुके मेवे, ऑलिव्ह ऑइल वापरा. ओमेगा ३ तुम्हाला तरुण आणि सुंदर    राखते.

* व्हिटॅमिन सी शरीरासाठी नॅचरल बोटॉक्स समान काम करते. यामुळे स्किन टिशूज हेल्दी राहतात आणि त्यावर सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी संत्री, मोसंबी, पानकोबी इ. खा.

* जर काही गोड खावेसे वाटले तर डार्क चॉकलेट खा. यात भरपूर फ्लॅवेनॉल असते. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

* दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही जरूर घ्या. यात कॅल्शियम असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराचा प्रतिबंध करता येतो.

* तरुण आणि सक्रिय दिसू इच्छिता तर ओव्हर इटिंग टाळा. तुम्हाला जितकी भूक आहे त्याच्या ८० टक्केच खा.

काय खाऊ नका

* असे पदार्थ ज्यांच्यामुळे रक्तातील साखर वाढते जसे गोड फळे, ज्यूस, साखर कमी खा.

* सोयाबीन, कॉर्न, कॅनोला ऑइल टाळा, कारण यांत पॉलीसॅच्युरेटेड मेद जास्त प्रमाणात असते. ऑलिव्ह ऑइल वापरा.

* रेड मीट, पनीर, फुल फॅट दूध, आणि क्रीम यांत अत्यधिक मात्रेत सॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होऊ शकतात.

* सफेद ब्रेड, पास्ता, पिझ्झा इ. कमी खावे.

डॉ. निधी म्हणतात, ‘‘लठ्ठपणा आणि कॅलरी इनटेक यांच्यात थेट संबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने न केवळ आरोग्य बिघडते तर शारीरिक सक्रियतासुद्धा कमी होते.’’

जीवनशैलीतील बदल

जेपी हॉस्पिटल, नोएडा येथील डॉ. करुणा चतुर्वेदी यांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये छोटे छोटे बदल केल्यास आपण दीर्घ काळापर्यंत तरुण आणि सक्रिय राहू शकतो :

* आपले मन नेहमी व्यस्त ठेवा. काहीतरी नवीन शिकत रहा म्हणजे आपला मेंदू सक्रिय राहील.

* आपल्या हार्मोन्सच्या स्तरावर नियंत्रण ठेवा जेणेकरून तुम्ही एजिंगच्या लक्षणांपासून दूर रहाल.

* कमीतकमी ६-७ तास जरूर झोपा. जेव्हा तुम्ही झोप घेत असता तेव्हा त्वचेच्या कोशिका आपली झिज भरून काढत असतात. यामुळे त्वचेच्या सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दूर होतात.

* तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता हेही महत्त्वाचे असते. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पहा. स्वत:ला खुश आणि मोटिव्हेटेड ठेवा.

त्वचेला तरुण आणि सुरक्षित ठेवा

* उन्हात गेल्याने त्वचा काळवंडते आणि काळया झालेल्या भागावर सुरकुत्या लवकर पडतात. म्हणून बाहेर जाण्याआधी सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेला स्वस्थ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार नॉन टॉक्सिक मॉइश्चरायझर निवडा. झोपण्याआधी तो जरूर लावा.

फेशिअल एक्सरसाइ

चेहऱ्याच्या पेशींना दिलेल्या मसाजमुळे चेहऱ्याचे सुरकुत्यांपासून रक्षण होते. आपल्या कपाळावरील सुरकुत्या रोखण्यासाठी आपले दोन्ही हात कपाळावर ठेवा आणि बोटांना हेअरलाइन आणि भुवयांच्यामध्ये पसरवून हळूहळू हलकासा दाब देत बोटे बाहेरच्या दिशेने सरकवा.

काही फेशिअल एक्सरसाइ

चीकू लिफ्ट : आपले ओठ हलकेसे बंद करा आणि गालांना डोळयांनी बंद करा आणि गालांना डोळयांच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. रुंद अशा स्मितासह आपल्या ओठांचे बाहेरील कोन उचला. काही वेळ याच मुद्रेत रहा. स्मित करणे हा गालांसाठी चांगला व्यायाम आहे.

फिश फेस : हा गालांसाठी आणि जबडयासाठी उत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमचे ओठ योग्य शेपमध्ये येतात. हलकेसे ओठ बंद करा. गाल जितके शक्य होतील तितके आत खेचण्याचा प्रयत्न करा. याच मुद्रेत हसण्याचा प्रयत्न करा आणि १५ सेकंद याच अवस्थेत रहा. असे ५ वेळा करा.

पपेट फेस : हा व्यायाम पूर्ण चेहऱ्यासाठी आहे. यामुळे गालांच्या पेशी मजबूत होऊन त्या सैल पडत नाहीत. आपल्या बोटांची पेरे गालांवर ठेवा आणि स्मित करा. गाल वरच्या दिशेने खेचा आणि स्मित मुद्रेत काही वेळ रहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें