फेसलिफ्ट कुठल्याही वयात दिसा तरूण

* डॉ. कुलदीप सिंह

वाढते वय आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे चेहऱ्याच्या त्वचेच्या ऊती सैल होऊ लागतात. हळूहळू नाक आणि तोंडाभोवती सुरकुत्या आणि बारीक रेषा तयार होऊ लागल्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो.

अलिकडच्या काही वर्षांत कॉस्मेटिक अँटीएजिंग प्रक्रिया अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. काही स्त्रिया त्यांच्या चेहऱ्याची त्वचा सुधारण्यासाठी इंजेक्शन्स आणि डर्मल फिलरसारख्या कमी आक्रमक तंत्रांचा वापर करतात.

या प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात उपयुक्त आहेत, पण काही स्त्रिया फेसलिफ्ट शस्त्रक्रियेसारख्या चेहऱ्याच्या कायाकल्प शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात.

कोण करू शकतो

ज्या महिलांच्या चेहऱ्याच्या त्वचेत वाढत्या वयासोबत वरील लक्षणे दिसून येतात, त्या हे करू शकतात. या शस्त्रक्रियेसाठी खालील काही नियम महत्त्वचे ठरतात.

* निरोगी, ज्यांना कोणताही आजार नाही.

* जे धूम्रपान करत नाहीत किंवा मद्यपान करत नाहीत.

फेसलिफ्ट सर्जरीचे फायदे

* हे चेहऱ्याच्या स्नायूंना घट्ट करते आणि त्वचा घट्ट करते.

* जबडा आणि मानेचा आकार सुधारतो.

* पुरुषांसाठीही हे फायदेशीर आहे.

* शस्त्रक्रियेमुळे झालेले चट्टे लपवले जातात.

* नैसर्गिक दिसणारे परिणाम, जे त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवतात.

फेसलिफ्ट शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम

प्रत्येक शस्त्रक्रियेत काही धोके किंवा साईड इफेक्ट्स असतात. याचप्रमाणे फेसलिफ्ट शस्त्रक्रियेचेही काही धोके असू शकतात :

* अॅनेस्थेसियाची चुकीची रिअॅक्शन.

* रक्तस्त्राव होणे.

* संसर्ग.

* रक्ताची गुठळी.

* वेदना.

* दीर्घकाळ जळजळ.

* जखमा भरण्यात अडचण.

योग्य काळजी, औषधे किंवा शस्त्रक्रिया करून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. परंतु, काही कायमस्वरूपी आणि दुर्मिळ गुंतागुंत होऊ शकते, जसे   की :

* हिमेटोमा.

* जखमांचे व्रण.

* नसांना इजा होणे.

* छेद केलेल्या ठिकाणचे केस जाणे.

* त्वचेचे नुकसान.

काही आजार आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयीमुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. खालील कारणांमुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात :

* जर रुग्ण रक्त पातळ होण्याची औषधे किंवा पूरक औषधे घेत असेल तर ही औषधे रक्त पातळ करतात. याचा परिणाम ब्लड कोटिंगच्या क्षमतेवर होतो आणि शस्त्रक्रियेनंतर हिमेटोमा म्हणजे रक्ताची गुठळी होण्याची शक्यता वाढते.

इतर आजार : जर रुग्णाला मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजार असतील तर जखम भरण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी हिमेटोमा किंवा हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते.

* धुम्रपान करणे जीवघेणे ठरू शकते. तुम्ही धुम्रपान करत असाल तर शस्त्रक्रियेपूर्वी २ आठवडेआधी धुम्रपान बंद करा आणि शस्त्रक्रियेनंतचेही २ आठवडे धूम्रपान करू नका.

वजन कमी-जास्त होणे : जर तुमचे वजन कमी-जास्त होत असेल तर याचा परिणाम शस्त्रक्रियेनंतर चेहऱ्याच्या ठेवणीवर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर कदाचित तुम्हाला अपेक्षित असलेला परिणाम दिसून येणार नाही.

प्रक्रियेआधी आणि प्रक्रियेदरम्यान

कॉस्मेटिक सर्जन असा सल्ला देतात की, एखाद्या चांगल्या रुग्णालयातच ही संपूर्ण प्रक्रिया करावी. शस्त्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रुग्णाला सर्वसाधारण अॅनेस्थिसिया म्हणजे भूल दिली जाते.

त्वचा घट्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ऊती, स्नायूंमधील चरबीत सुधारणा करून ती योग्य प्रकारे पसरवली जाते. चेहऱ्यावर नव्याने बनवलेल्या कंटूरवर त्वचेला रिड्रेप करून ती सुधारली जाते. त्यानंतर अतिरिक्त त्वचा काढून टाकून जखम शिवली जाते किंवा त्यावर टेप लावली जाते. अशा शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला कमीत कमी एक रात्र रुग्णालयात काढावी लागते.

फेसलिफ्ट शस्त्रक्रियेसाठी २-३ तास लागतात. जर यासोबत ओवरस्किन कॉस्मेटिक प्रक्रियाही करायची असेल तर जास्त वेळ लागू शकतो.

प्रक्रियेनंतर फेसलिफ्टनंतर खालील लक्षणे दिसू शकतात :

* थोडयाशा वेदना, या वेदना होऊ नयेत म्हणून औषधे दिली जातात.

* जखम गळू लागणे.

* सूज.

* जखम.

* शस्त्रक्रिया झालेला भाग सुन्न पडणे.

जर खालील लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या :

चेहरा किंवा मानेच्या एका बाजूला खूप जास्त वेदना होणे, हा त्रास २४ तासांपर्यंत राहू शकतो.

* धाप लागणे.

* छातीत दुखणे.

* हृदयाचे ठोके अनियमित होणे.

शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांपर्यंत डॉक्टर तुम्हाला खालील काही पथ्ये पाळायला सांगू शकतात :

* डोके उंच भागावर ठेवून आराम करणे.

* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वेदना कमी होण्यासाठी औषधे घेणे.

* चेहऱ्यावर थंडावा देणारे पॅक लावणे. यामुळे वेदना आणि सुजेपासून आराम मिळेल.

शस्त्रक्रियेनंतर पुढील २ महिने फॉलोअप घेणे गरजेचे असते. यादरम्यान बँडेज निघणे, टाके काढणे, जखमेवर लक्ष देणे, इत्यादी केले जाते.

शस्त्रक्रियेनंतर स्वत:ची काळजी

शस्त्रक्रियेनंतर खालील सूचनांचे पालन करा, जेणेकरून त्रास कमी होऊन गुंतागुंत टाळता येईल :

* सर्जनच्या सल्ल्यानुसार जखमेची काळजी घेणे.

* जखमेवर आलेले सालपट काढण्याचा प्रयत्न न करणे.

* पुढून उघडता येतील असे कपडे घालणे, जेणेकरून तुम्हाला डोक्यावरून कपडे घालावे लागणार नाहीत.

* जखमेच्या आजूबाजूला जास्त दाब पडणार नाही याची काळजी घेणे. जास्त हालचाल करू नये.

* मेकअपचा वापर करू नये.

* साबण, शाम्पूचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसारच करणे.

* अवजड व्यायाम करू नये.

* कमीत कमी ६ ते ८ आठवडे उन्हाच्या थेट संपर्कात न येणे. एसपीएम ५० किंवा यापेक्षा अधिक मात्रेच्या सनस्क्रीनचा वापर करणे.

* कमीत कमी ६ आठवडयांपर्यंत कलर, ब्लिच किंवा हेअरपर्मिंग करू नये.

नेहमी रहाल तरूण अणि सुंदर

* पारुल भटनागर

कोरोना काळात आपण विशेषत: तरुणाईने त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले की, आता आपण घरीच आहोत, कुठेही जात नाही, कोणाला भेटत नाही, तर मग त्वचेची काळजी घेतली नाही तरी काय फरक पडणार? पण त्यांची हीच विचारसरणी त्यांची त्वचा खराब करण्याचे काम करते, हे त्यांना माहीत नसते.

फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिल्टरची मदत घेऊन स्वत:ला सुंदर दाखवून इतरांकडून ते स्वत:चे कौतुक करून घेतात, पण वास्तव यापेक्षा खूपच वेगळे असते. म्हणूनच जर तुम्हाला कायम नैसर्गिकरित्या तरुण आणि सुंदर त्वचा मिळवायची असेल, तर आधीच सावध व्हा, अन्यथा तारुण्यातच तुमची त्वचा वयाच्या ६० वर्षांसारखी दिसू लागेल. चला तर मग, स्वत:ला तरुण कसे ठेवायचे ते जाणून घेऊया :

सुरकुत्यांची समस्या कधी निर्माण होते?

वयाच्या २० व्या वर्षी, त्वचा तारुण्यात असते. त्वचेवर समस्या कमी आणि चेहऱ्यावर चमक, तेज तसेच आकर्षकपणा जास्त असतो. मात्र या वयात त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यास बारीक रेषांसोबतच चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात.

जेव्हा आपल्या त्वचेच्या वरच्या थराला आधार देणाऱ्या कोलेजन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांचा थर कमी होऊ लागतो तेव्हा त्वचेवर सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचा आर्द्र्रता आणि सौंदर्य गमावते. म्हणूनच सुरकुत्यांपासून दूर राहण्यासाठी त्वचेच्या काळजीसोबतच पौष्टिक खाण्याची सवय स्वत:ला लावून घ्या.

तणावाला ठेवा स्वत:पासून दूर

सध्या घर असो किंवा नोकरी, सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. काहींना या महामारीत आपल्या माणसांना गमावल्याचे दु:ख आहे. कोणाला भविष्याची चिंता आहे तर कोणाला नोकरी जाण्याची भीती आहे. खासकरून तरुणवर्ग जास्त काळजीत आहे आणि हीच काळजी त्यांचे आरोग्य बिघडवत आहे.

आपल्या शरीरात कार्टीसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन असते. आपण सतत चिंतेत राहिल्यास त्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे चेहऱ्यावर पुळया, सुरकुत्या येतात. मेटाबॉलिज्म असंतुलित होऊ लागते. त्यामुळे वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच शक्य तेवढा सकारात्मक विचार करून तणावापासून दूर राहा, अन्यथा हा तणाव तुमच्या चेहऱ्यावरील चमक नाहीशी करेल.

घरगुती उपायही प्रभावी

वेळेआधीच म्हातारे दिसावे, असे कोणालाच वाटत नाही. त्यामुळेच घरगुती उपचार केल्यास हे उपाय थोडयाच दिवसांत सुरकुत्या दूर करून त्वचेवरील हरवलेले तारुण्य तुम्हाला पुन्हा मिळवून देतील.

* दररोज अॅलोवेरा जेलने त्वचेची मालिश केल्यास चेहरा चमकू लागेल. त्वचेवर कोलेजन वाढल्यामुळे त्वचा हायड्रेड राहील. सोबतच सुरकुत्याही कमी होतील.

* केळे आरोग्यासाठी चांगले असते, सोबतच ते त्वचेचे रुपडे पालटते. यामागचे कारण म्हणजे त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते, शिवाय ते नैसर्गिकरित्या डिटॉक्स करून चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करते. त्यासाठी तुम्ही केळयाची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवा. काही आठवडयांतच तुम्हाला फरक दिसेल.

* खोबरेल तेलात मॉइश्चराइज आणि हायड्रेड करणारी तत्त्वे असल्यामुळे ते त्वचेची लवचिकता वाढवून त्वचा मुलायम बनवते. त्यासाठी तुम्ही दररोज रात्री खोबरेल तेलाने मालिश करून सकाळी चेहरा धुवा. यामुळे हळूहळू सुरकुत्या कमी होऊन चेहरा उजळेल.

* ऑर्गन ऑइल सौम्य असल्यामुळे त्वचेमध्ये सहज शोषले जाते. सोबतच यात फॅटी अॅसिड आणि ई जीवनसत्त्व असल्यामुळे ते सुरकुत्या दूर ठेवते. त्यासाठी तुम्ही रात्री चेहऱ्यावर ऑर्गन ऑइल लावून मालिश करा. महिन्याभरात तुम्हाला फरक जाणवू लागेल.

काही खास सवयी ज्या सुरकुत्यांपासून ठेवतील दूर

तुम्ही बाहेर जात नसला तरी दररोज सीटीएम म्हणजे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करायलाच हवे. यामुळे त्वचेवर जमा झालेली अस्वछता दूर होऊन त्वचेवरील पीएचची नैसर्गिक पातळी टिकून राहते. ती त्वचेला तरुण ठेवण्याचे काम करते.

अनेकदा असा विचार केला जातो की, घराबाहेर जायचे नसल्यामुळे सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. प्रत्यक्षात असा विचार करणे चुकीचे आहे, कारण आपण स्मार्ट डिव्हाइसमधून येणारा निळा प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट किरण यांच्या संपर्कात येतोच. त्यामुळे कोलेजन, इलास्टिक टिश्यूवर आघात होतो आणि वयापूर्वीच त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. म्हणूनच सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेची जळजळ करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा, कारण यामुळे त्वचेवरील नैसर्गिक मॉइश्चर आणि चमक गायब होते. सुरकुत्यांची समस्या निर्माण होते.

* मेकअप व्यवस्थित काढल्यानंतरच झोपा, अन्यथा मेकअपमध्ये वापरली जाणारी नैसर्गिक द्रव्ये वय होण्याआधीच सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

* तळलेल्या पदार्थांऐवजी पौष्टिक आहार घ्या. यामुळे तुमची त्वचा अंतर्बाह्य उजळेल.

* शक्य तेवढे साखरेचे प्रमाण कमी करा, कारण रक्तातील साखर वाढल्यामुळे  सुरकुत्या येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.

संवेदनशील त्वचेची काळजी कशी घ्यावी

* गृहशोभिका टीम

ऍलर्जीमुळे तुमच्या त्वचेत काही बदल झाले आहेत का? जसे की त्वचेवर लाल-लालसर रॅशेस दिसणे, खाज सुटणे किंवा खाजवण्याची इच्छा होणे किंवा ओरखडे येणे. हे सर्व त्वचेच्या संवेदनशीलतेचे लक्षणं आहेत.

तथापि, असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या त्वचेचा प्रकार काय आहे हे माहित नाही. संवेदनशील किंवा सामान्य. तर प्रथम जाणून घेऊया कोणती चिन्हे आहेत ज्यामुळे आपल्या त्वचेची संवेदनशीलता जाणवते.

संवेदनशील त्वचेची सुरुवातीची चिन्हे :

 1. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगनंतर त्वचेला कोरडेपणा किंवा जळजळ आणि खाज सुटणे.
 2. चेहरा धुतल्यानंतर ताणल्यासारखे वाटणे.
 3. त्वचा अचानक जास्त लाल होते आणि पुरळ बाहेर येतात.
 4. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर लवकरच दिसून येतो.
 5. कोणत्याही बाह्य कारणाशिवाय त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे.
 6. काही आंघोळीचे आणि कापडी साबणदेखील आहेत ज्यांच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ होते.
 7. अकाली सुरकुत्या.

त्यामुळे खालील कारणांमुळे त्वचा संवेदनशील असते :

 

 1. घाण आणि प्रदूषण.
 2. कडक पाणी.
 3. अपुरी स्वच्छता.
 4. भ्रष्ट जीवनशैली.
 5. हार्मोन्स.
 6. ताण.
 7. आहार आणि त्वचेची आर्द्रता.
 8. हानिकारक त्वचा काळजी उत्पादने.
 9. कपडे आणि दागिने.
 10. घराची स्वच्छता.

यानंतर तुमची त्वचा संवेदनशील आहे की नाही हे तुम्हाला समजले असेल. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला तुमच्या त्वचेची अशी काळजी घ्यावी लागेल.

 1. तुमच्या त्वचेसाठी कॉस्मेटिकची चाचणी केल्यानंतरच वापरा.
 2. धूळ, माती आणि रसायनांपासून त्वचेचे संरक्षण करा.
 3. थंडीत नेहमी मऊ लोकरीचे स्वेटर घाला. सिंथेटिक लोकर त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
 4. सौंदर्य उत्पादन खरेदी करताना, ते संवेदनशील त्वचेसाठी असेल तरच लेबल तपासा.
 5. हर्बल आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादने वापरा.
 6. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावा.
 7. केसांना कंघी करण्यासाठी कठोर केसांचा ब्रश वापरू नका.
 8. मजबूत परफ्यूमसह साबण किंवा डिटर्जंट वापरणे टाळा.
 9. परफ्यूम किंवा आफ्टर शेव लोशन खरेदी करताना, ते तुमच्या त्वचेवर फवारून त्याची चाचणी करा. जर त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेला खाज सुटू शकते.

चेहऱ्यावरून कळू नये वय

* ज्योती गुप्ता

वयदेखील आपल्या चेहऱ्यावर परिणाम करते, वाढत्या वयामुळे बारिक रेषा, सैलपणा, डोळयाभोवती सुरकुत्या येतात.

चुकीचे उत्पादन

आजची आधुनिक स्त्री, मग ती नोकरी करत असेल किंवा गृहिणी असेल, स्वत:ला सुंदर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. जेव्हा वयाचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर दिसू लागतो, तेव्हा ती अँटीएजिंग क्रीम खरेदी करण्याचा विचार करते. पण जेव्हा ती स्टोअरमध्ये जाते, तेव्हा बरेच पर्याय पाहून ती गोंधळून जाते. तिचा मेंदू काम करणे थांबवतो.

असे आपल्याबरोबरही होऊ नये यासाठी या टीप्सवर विचार केल्यास आपण सहजपणे स्वत:साठी अँटीएजिंग क्रीम खरेदी करू शकता, जी आपल्यासाठी अगदी योग्य असेल.

त्वचेच्या प्रकारानुसार अँटीएजिंग क्रीम

तेलकट : अशा प्रकारच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर येत नाहीत, परंतू मुरुमांचा त्रास जास्त होतो. म्हणून क्रीम निवडताना लक्षात ठेवा की ते वापरल्यावर तुमची त्वचा तेलकट होऊ नये.

सामान्य : अशा प्रकारच्या त्वचेच्या स्त्रियांना जास्त त्रास होत नाही. उत्पादन निवडताना त्यांना जास्त विचार करण्याची गरज पडत नाही, परंतु चुकीचं मलम वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

संवेदनशील : या त्वचेसाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही उत्पादनाचे दुष्परिणाम लवकर होतात.

कोरडी : कोरडया त्वचेवर सुरकुत्यांचा प्रभाव त्वरित होतो. म्हणूनच अशी त्वचा असलेल्या स्त्रियांना अँटीएजिंग क्रीम निवडताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

चेहऱ्याची समस्या : अँटीएजिंग क्रीम घेण्यापूर्वी प्रथम आपल्या चेहऱ्याची समस्या ओळखा, काय महत्वाचे आहे? सुरकुत्या पडताहेत किंवा चेहऱ्याचा घट्टपणा कमी होत आहे? मग आपल्यासाठी आवश्यक असलेली क्रीम घ्या.

तज्ज्ञांचे मत आवश्यक आहे : अँटीएजिंग क्रीम निवडण्यापूर्वी त्वचेच्या तज्ञ्जांचे मत घ्यावे, जेणेकरून ते आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून आपल्यासाठी योग्य उत्पादन निवडण्यात मदत करतील. अशाप्रकारे आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून वाचाल.

क्रीम वापरण्यापूर्वी

बऱ्याच कंपन्यांचा असा दावा असतो की त्यांची अँटीएजिंग क्रीम वापरल्याने रातोरात बदल होईल, त्वचा खूपच तरुण होईल, परंतू हे खरे नाही. क्रीमचा प्रभाव दिसण्यासाठी कमीतकमी एक महिना लागतो.

महागडया क्रीम : बऱ्याच स्त्रिया असा विचार करतात की क्रीम जितकी जास्त महाग असेल तितकी अधिक प्रभावी असेल, परंतू तसे नसते. केवळ आपल्या त्वचेची समस्या ओळखल्यानंतरच एखादे उत्पादन निवडा.

मल्टी टास्किंग क्रीम : बऱ्याच महिलांना असे वाटते की अँटीएजिंग क्रीम लावल्याने त्यांच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील. जसे की डार्क सर्कल्स, डाग, मुरुमेही नाहीए. ही क्रीम फक्त सुरकुत्या रोखण्यासाठीच कार्य करते.

7 टिप्स : अंघोळ करताना चुका करू नका

* गृहशोभिकी टीम

सर्वसाधारणपणे आंघोळ करायला कोणाला आवडत नाही आणि विशेषतः उन्हाळ्यात आंघोळ करायची तर काय बोलावं? पण जर तुम्हीही अंघोळ करताना अशा चुका करत असाल तर सावधान, कारण अंघोळ करताना होणाऱ्या या छोट्या चुका तुम्हाला भारी पडू शकतात!

निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि उन्हाळ्याच्या हंगामात माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे घाम, ज्यामुळे तुम्हाला फक्त अस्वस्थ वाटत नाही तर तुम्ही आजारीदेखील बनवता. त्यामुळे अनेकांना दिवसातून अनेक वेळा आंघोळ करण्याची सवय लागते.

आंघोळ शरीराच्या स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाची असली तरी काही गोष्टींची काळजी घेतल्यास आंघोळीदरम्यान होणाऱ्या चुका टाळता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहोत ज्या अंघोळ करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

 1. सामान्यतः काही लोकांना लांब आंघोळ करायला आवडते, परंतु तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ते तुमच्या त्वचेसाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे.
 2. जास्त वेळ पाण्यात राहिल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे अंघोळ करताना 10 मिनिटांपेक्षा जास्त पाण्यात राहू नका.
 3. एवढेच नाही तर तुम्ही आंघोळीच्या वेळी कोणाचे स्क्रबर म्हणजेच लोफा वापरत असाल तर सावध राहा कारण दुसऱ्याचे स्क्रबर वापरणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
 4. जर तुमचे स्क्रबर खूप जुने किंवा गलिच्छ झाले असेल, तर ते ताबडतोब बदलून टाका कारण दीर्घकालीन वापरामुळे स्क्रबरमध्ये बॅक्टेरिया आणि जंतू निर्माण होतात.
 5. त्याचबरोबर साबण किंवा शाम्पूने आंघोळ करताना हे लक्षात ठेवा की शॅम्पू किंवा साबण शरीरावर नीट सुटला आहे की नाही, कारण अनेक वेळा अशा गोष्टी त्वचेच्या छिद्रांमध्ये राहतात, ज्यामुळे नंतर मुरुम किंवा पुरळ उठतात.
 6. त्यामुळे काही लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळत असला तरी जास्त गरम पाण्याने त्वचेचे थेट नुकसान होते.
 7. आम्ही तुम्हाला सांगतो की यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल नाहीसे होते. त्यामुळे कधी कधी खाज आणि कोरडेपणा येतो. म्हणून, फक्त कोमट पाणी वापरा किंवा ते इतके गरम असेल की त्वचेला कोणतीही हानी होणार नाही.

वाढत्या वयातही दिसा तरूण

* अनुराधा गुप्ता

आपल्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायला कोणाला नाही आवडत? महिलांबाबत बोलायचं झालं तर त्या आपलं वय लपवण्यासाठी काहीही ट्राय करायला मागेपुढे पाहात नाहीत.

म्हणूनच कॉस्मेटीक इंडस्ट्रीने वाढत्या वयावर नियंत्रण ठेवणारी बरीच उत्पादनं बाजारात आणली आहेत. यामुळे चेहऱ्यावरच्या वयाच्या खुणा लपवण्यासाठी महिलांना मदत होते. पण ही उत्पादनं वापरण्यापूर्वी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे, नाहीतर या उत्पादनांचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

कॉस्मेटोलॉजिस्ट अवलीन खोखर म्हणतात, ‘‘सौंदर्य प्रसाधनं सौंदर्य वाढवण्यासाठी असतात. यांच्या वापराने चेहऱ्यावरची कमतरता भरून काढली जाऊ शकते. पण ती कमतरता आणि त्यासाठी असलेलं योग्य उत्पादन यांचं योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे, नाहीतर वय कमी दिसण्यापेक्षा जास्त दिसू लागेल.’’

त्वचेला मेकअपसाठी करा तयार

अवलीनच्या म्हणण्यानुसार त्वचेवर कोणतंही सौंदर्य प्रसाधन लावण्यापूर्वी त्याचा प्रकार जाणून घ्या. कारण त्वचेला अनुरूप निवड केल्यास योग्य लुक मिळतो. बाजारात ड्राय, ऑयली आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध आहेत. योग्य निवडीसह त्वचेला मेकअपसाठी तयार करणंही महत्त्वाचं आहे. त्वचा स्वच्छ केली नाही तर धुलीकण त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून राहतात आणि मेकअपच्या थरामुळे छिद्र बंद होतात. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मेकअपच्या आधी त्वचेचं क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग नक्की करा. यामुळे मेकअपमध्ये स्मूदनेस येतो.

कंसीलरचा वापर टाळा

कंसीलरचा उपयोग काळे डाग लपवण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर काळे डाग असणाऱ्या भागातच कंसीलर लावलं जातं. पण काही महिला हे पूर्ण चेहऱ्यावर लावतात. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ठळक होतात. अवलीनच्या म्हणण्यानुसार कंसीलर जाडसर असतं आणि थोडं लावल्यानंतरही परिणाम दिसू लागतो. जास्त लावल्यामुळे चेहऱ्यावर ओरखडे दिसतात. काही महिला काळी वर्तुळं लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करता. पण हे चुकीचं आहे. डोळ्यांखाली कंसीलर फक्त इनर कॉर्नरवरच लावावं. अधिक प्रमाणात कंसीलर लावल्यास डोळे चमकदार दिसतात जेणेकरून कळून येतं की डोळ्यांवर कंसीलर लावलं आहे.

जास्त फाउंडेशन लावू नका

फाउंडेशनची निवड आपल्या स्किन टाइपप्रमाणे करा. उदाहरणार्थ : नॉर्मल त्वचा असणाऱ्या महिला मिनरल बेस्ड किंवा मॉइश्चराइजरयुक्त फाउंडेशन वापरू शकतात. तर कोरड्या त्वचेसाठी हायडे्रटिंग फाउंडेशन योग्य ठरेल. सेम स्किन टोनचं फाउंडेशनच घ्या. नाहीतर त्वचा ग्रे दिसू लागेल. ऑयली त्वचेसाठी पावडर डबल फाउंडेशन वापरा. हे त्वचेला मेटीफाय करतं.

फाउंडेशनच्या योग्य निवडीसह त्याचा योग्य वापरही आवश्यक आहे. काही महिला संपूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. हे चुकीचं आहे. फाउंडेशन चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत म्हणजे थोडंसं फाउंडेशन बोटावर घेऊन डॅब करत योग्यप्रकारे चेहऱ्यावर लावावं. यामुळे वयानुसार त्वचेमध्ये झालेलं डिस्कलरेशन निघून जातं.

कॉम्पॅक्टने द्या फिनिशिंग

बऱ्याच महिला फाऊंडेशननंतर कॉम्पॅक्ट पावडर लावत नाहीत. अवलीन याला मेकअप ब्लंडर म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की कॉम्पॅक्ट पावडर मेकअपला फिनिशिंग देतं. पण याचाही अतिवापर करू नये. त्यामुळे ओरखडे उठतात.

याची निवडही काळजीपूर्वक करावी. मुख्य म्हणजे स्किनकलर टोनप्रमाणेच शेड निवडा. आपल्या स्किन टाइपचाही विचार करा. उदारणार्थ, ऑयली त्वचेसाठी ऑइल कंट्रोल मॅट फिनिशिंग कॉम्पॅक्ट पावडर तर कोरड्या त्वचेसाठी क्रिमी कॉम्पॅक्ट घ्या. यामुळे त्वचा निरोगी दिसते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी इमोलिएंट ऑइल आणि वॅक्सयुक्त कॉम्पॅक्ट सर्वात चांगला पर्याय आहे.

आय मेकअप काळजीपूर्वक करा

तरूण दिसण्यासाठी आय मेकअप योग्यप्रकारे करणं आवश्यक आहे. बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की डोळ्यांना गडद मेकअप केल्याने तरूण दिसता येतं. पण अवलीनचं म्हणणं आहे की एशियन स्कीन आणि रस्ट कलरमुळे वय कमी दिसतं. आयशेड्समध्ये हेच रंग वापरावेत. क्रिमी ऑयशेड्समुळे निवडू नका. यामुळे डोळ्यांच्या चुण्या लपल्या जात नाहीत. आयशेड्सह आयलायनरही ब्राउन निवडा.

काजळ आणि मस्काराशिवाय डोळ्यांचा मेकअप अपूर्ण असतो. काजळामुळे डोळे   उठून दिसतात. सध्या स्मजप्रूफ काजळ फॅशनमध्ये आहे. त्यामुळे आपल्यासाठी हेच काजळ निवडा. मस्कारा निवडतानाही काळजी घ्या. वाढत्या वयानुसार पापण्यांचे केस गळू लागतात. चुकीचा मस्कारा लावल्याने गळती वाढू शकते. पण हायडे्रटिंग मस्कारामुळे पापण्यांचे केस मजबूत होतात. मस्काराची योग्य निवड आणि योग्य वापर केल्यानेच तरूण दिसता येते. म्हणून मस्कारा नेहमी अपर आणि लोअर लॅशेजवर लावा. यामुळे डोळ्यांना छान लुक मिळतो.

लिपस्टिकच्या ब्राइट शेड निवडा

शास्त्रीयदृष्ट्या ब्राइट शेडमुळे कोणतीही गोष्ट छोटी दिसते. पण ओठांच्या बाबतीत उलट परिणाम दिसतो. डार्क शेड्समुळे ओठ मोठे दिसतात. आपल्या वयापेक्षा तरूण दिसायचं असेल तर न्यूड आणि ग्लॉसी लिपस्टिक निवडा. लिपलायनवर लिपस्टिकच्या शेडशी मॅच होईल याची काळजी घ्या. फाटलेल्या ओठांवर लिपस्टिक लावू नका. ओठ फाटले असतील तर पेट्रोलिअम जेली लावून स्मूद करा.

अशाप्रकारे मेकअपचे बारकावे माहीत असतील तर तुम्ही वाढत्या वयातही तरूण दिसू शकता.

उन्हाळ्यात बाळाची अशी करा देखभाल

* डॉ. कृष्ण याद

नवजात बालकासाठी उन्हाळ्याचा मोसम खूप असह्य असतो; कारण प्रथमच ते या वातावरणाचा सामना करत असतं. मोठ्याने ओक्साबोक्शी रडणं, खूप घाम येणं, केस ओले होणं, गाल लाल होणं आणि वेगाने श्वासोच्छ्वास घेणं यांसारखी लक्षणं या गोष्टींचे संकेत असतात की मुलं अति उकाड्याने त्रासलेली आहेत.

ओवर हीटिंग उन्हाळ्यात डायरियाला थेट कारणीभूत ठरतं, जे अनेक नवजात शिशूंसाठी घातकही ठरू शकतं.

उन्हापासून बचाव

उन्हाळ्याच्या मोसमात बाळाला उन्हाच्या प्रखर किरणांपासून दूर ठेवावं. ६ महिन्यांहून कमी वयाच्या बाळाच्या त्वचेमध्ये सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षा करणारा मेलानिन हा घटक खूप कमी असतो, जो त्वचा, डोळे आणि केसांना रंग प्रदान करतो. मेलानिनच्या अभावामुळे सूर्याची किरणं बाळाच्या त्वचेतील पेशींना कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकतात.

तेलमालीश करा

बाळाला योग्य तेलमालीश केल्यास बाळाचे टिश्यू आणि मांसपेशी खुलतात आणि यामुळे त्याचा उत्तम विकास होतो. बाळाच्या नाजूक त्वचेला सर्वात चांगल्याप्रकारे सूट करणाऱ्या तेलाची निवड जशी आवश्यक आहे तशीच ही बाबही लक्षात घेणं जरुरी आहे की यामुळे चिकचिकीतपणा जाणवणार नाही, तेलाऐवजी मसाजिंग लोशन आणि क्रीमही वापरता येईल. अंघोळ घालताना ते व्यवस्थित बाळाच्या शरीरावरून स्वच्छ होईल हे बघा. कारण तेल बाळाच्या स्वेदग्रंथीचं कार्य रोखू शकते.

टबमध्ये अंघोळ घालणं

उकाड्यापासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे अंघोळ करणं. तसं बघता प्रत्येक वेळेस अंघोळ घालण्याऐवजी बाळाला ओल्या कपडाने पुसून घ्यावं. परंतु जेव्हा बाळ उकाड्याने अस्वस्थ होत असेल, तेव्हा त्याला पाण्याने भरलेल्या टबमध्ये अंघोळ घालावी, यात पाण्याचं तापमान कोमट असलं पाहिजे.

टाल्कम पावडर

टबमध्ये अंघोळ घातल्यानंतर मुलांच्या शरीरावर टाल्कम पावडर लावणं चांगलं मानलं जातं. जेथे काही मुलांचं घामोळे कमी करण्यात टाल्कम पावडर उपयुक्त ठरते, तेथे काही वेळा याचा त्रासही होऊ शकतो. तेव्हा आपल्या तळहातावर थोडी पावडर घेऊन बाळाच्या त्वचेवर लावावी, त्याच्यावर पावडर फवारू नये.

नियंत्रित तापमान

बाळाच्या खोलीला दिवसा थंड राखण्यासाठी पडदे लावून खोलीत अंधार करा. पंखा सुरू ठेवा. मुलांना एअरकंडिशनरच्या थेट संपर्कात कधी ठेवू नका; कारण यामुळे बाळाला सर्दीपडसंसुद्धा होऊ शकतं.

उपयुक्त पोशाख

आई बहुतेकदा द्विधा मन:स्थितीत असते की बाळाला कोणते कपडे घालावेत. असा समज आहे की नवजात शिशूला खूप गरम कपड्यांमध्ये ठेवलं पाहिजे. कारण गर्भाच्या तुलनेत बाहेरचं तापमान आतल्या तापमानाहून थंड असतं. परंतु उन्हाळ्याच्या मोसमात त्यांच्या उबदार कपड्यांची संख्या कमी करून त्यांना कमी कपड्यांमध्ये ठेवू शकता. त्यांना सुती सैलसर कपडे घालावेत जेणेकरून त्यांच्या त्वचेला हवेचा स्पर्श होईल आणि त्यांना आरामदेह वाटेल. सुती कपडे मुलांसाठी फायदेशीर असतात आणि हे घामसुद्धा शोषून घेतात. बाळाचं उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना त्याला हॅट जरूर घालावी.

मदर्स डे स्पेशल : ९ ब्युटी गिफ्ट्स मदर्स डे बनवा संस्मरणीय

* भारती तनेजा, ब्यूटी एक्स्पर्ट

आपला उजळलेला चेहरा आणि इतरांनी केलेले सौंदर्याचे कौतुक आवडणार नाही, अशी महिला असूच शकत नाही. नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, आपण चांगले दिसावे यासाठी सर्वच सजग असतात.

म्हणूनच या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईचे सौंदर्य परत मिळवून देण्यासाठी या ब्युटी गिफ्ट्स देऊन तिला खुश करू शकता :

क्ले मास्क / कोलोजन मास्क : सध्या क्ले मास्क खूपच फेमस आहे. हा तुमच्या आईच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेऊन घाण आणि मृत त्वचा काढून टाकेल. सोबतच ते रक्तप्रवाह वाढवून त्वचेला कोमल बनवेल. कोलोजन मास्क त्वचेचा सैलसरपणा दूर करतो. शिवाय वाढत्या वयाच्या खुणा दिसण्यापासून त्वचेचे रक्षण करते. तुमची आई हा मास्क कुठल्याही चांगल्या कॉस्मॅटिक क्लिनिकमध्ये जाऊन लावू शकते. या मास्कचा वापर लेझरसोबत केल्यास परिणाम जास्त चांगला होतो. लेझरमुळे मृत त्वचेला नवसंजीवनी मिळते. सोबतच मास्कमध्ये ९५ टक्के कोलोजन असल्यामुळे त्वचेला पोषक द्र्व्ये मिळतात. डोळयांभोवतालची काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालवण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठला चांगला उपाय असूच शकत नाही.

सीरम प्रोटेक्शन : दररोज सकाळी फेस क्लीन आणि लाइट स्क्रब केल्यानंतर वापरण्यासाठी आईला कोलोजन सीरम द्या. सीरम असल्याने ते फारच कमी प्रमाणात लागते. याचा नियमित वापर केल्याने ते त्वचेचे झालेले नुकसान भरुन काढून तिचे संरक्षण करेल, त्वचेला हायडेट करेल. सोबतच चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर करेल.

व्हॅल्युमायजिंग मस्करा / लेंथनिंग मस्करा : खोल गेलेल्या आणि थकलेल्या डोळयांच्या पापण्यांवर मस्करा लावता येईल. यामुळे डोळे लगेचच सुंदर दिसू लागतील. वाढत्या वयासोबतच मस्कराचा पॅटर्नही बदलायला हवा. गरजेनुसार व्हॅल्युमायजिंग मस्करा वापरण्याऐवजी लैंथनिंग मस्करा वापरावा.

एएचए म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड क्रीम : नेहमी रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्वचेवरील मेकअप किंवा धूळमाती चांगल्या प्रकारे निघून जाईल. चेहरा स्वच्छ केल्यानंतर एएचए क्रीमने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे सुरकुत्या पडणार नाहीत. हे क्रीम डोळयांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठीही उपयोगी आहे. याच्या वापरामुळे एक्सफॉलिएशन आणि नवीन सेल्स तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते. यामुळे त्वचा उजळलेली दिसू लागते.

फेशियल किट : वाढत्या वयामुळे त्वचा सैल पडू लागते. त्वचेवरील चमक कमी होते. अशावेळी ठराविक अंतराने फेशियल करत राहिल्यास चेहऱ्यावरील मसल टोन सुधारून सुरकुत्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

कलर करेक्शन क्रीम : रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, तासन्तास कॅम्प्युटरवर काम करणे आणि उन्हात फिरल्यामुळे डोळयांभोवती काळी वर्तुळे, एक्नेसारख्या समस्यांचा सामना करायला लागणे स्वाभाविक आहे. अशावेळी तुम्ही ही समस्या फाऊंडेशनऐवजी कलर करेक्शन क्रीम म्हणजे सीसी क्रीमच्या मदतीने लपवू शकता. कारण फाऊंडेशनमुळे चेहऱ्यावरील या खुणा पूर्णपणे लपू शकत नाहीत, पण सीसी क्रीम त्यांना पूर्णपणे लपवून चेहऱ्याला चांगला लुक देते.

मिरॅकल ऑइल : रोज केलेली वेगवेगळी स्टाईल आणि केमिकलच्या वापरामुळे वयानुसारच सर्वांचेच केस रुक्ष होतात. अशा केसांमुळे सौंदर्यात बाधा येते. अशावेळी केसांची चमक पुन्हा मिळविण्यासाठी तुम्ही या मिरॅकल ऑइलसारखे ऑर्गन ऑइल किंवा मॅकाडामिया ऑइल गिफ्ट म्हणून आईला देऊ शकता. हे तेल केसांना मुळांपासून पोषण देते, सोबतच त्यांना मजबूत करते, चमक मिळवून देते. हे सहजतेने पसरते. त्यामुळे त्याचे काही थेंब बोटांवर घासून नंतर संपूर्ण केसांवर फणी फिरवतो त्याप्रमाणे बोटांनी लावा. यामुळे चांगला परिणाम मिळतो.

ट्रिपल आर किंवा फोटो फेशियल : जर आईने ट्रिपल आर किंवा फोटो फेशियल केले तर ते जास्त चांगले होईल. ट्रिपल आर हे त्वचेची चमक पुन्हा मिळवून देत तिला टवटवीत ठेवते. वय जास्त झाल्याने आईची त्वचा सैल झाली असेल किंवा त्वचेतील लवचिकता कमी असेल तर ही ट्रीटमेंट खूपच उपयुक्त ठरेल. फोटो फेशियलमुळे वाढत्या वयाच्या खुणा जसे की, फाइन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात. त्वचेचा सैलसरपणा कमी होऊन ती घट्ट होते. या फेशियलमध्ये असलेल्या प्रोडक्ट्समुळे त्वचेत कोलोजन तयार होण्याची प्रक्रिया वाढते, जी त्वचेला सुरकुत्यांपासून दूर ठेवते. याशिवाय यामुळे एक्सफॉलिएशन आणि नवीन सेल्स बनण्याची प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे त्वचा उजळलेली दिसू लागते.

या ट्रीटमेंटमध्ये मायक्रो मसाजर किंवा अपलिफ्टिंग मशीनने चेहऱ्याला लिफ्ट केले जाते, ज्यामुळे सैलसर पडलेली त्वचाही अपलिफ्ट होते आणि घट्ट झाल्यामुळे सुंदर दिसू लागते.

सर्वात शेवटी या ट्रीटमेंटमध्ये एक विशिष्ट प्रकारचे मास्क लावण्यात येते, ज्याला यंग स्किन मास्क असे म्हणतात. या मास्कच्या आत ९५ टक्के कोलोजन असते. हा मास्क लावल्यामुळे त्वचेला आवश्यक पौष्टिक द्र्रव्ये मिळतात.

ग्लाईकोलिक पिल आणि डर्माब्रेशन टेक्निक : जर तुमच्या आईच्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशन असेल तर तिला एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये नेऊन तुम्ही तिला ग्लाईकोलिक पिल आणि डर्माब्रेशन टेक्निकच्या मदतीने पिग्मेंटेशनवरील उपचाराचे चांगले गिफ्ट देऊ शकता. बऱ्याच सिटिंग्स केल्यानंतर ही ट्रीटमेंट पूर्ण होते.

कशी मिळवाल सुंदर त्वचा

* सोमा घोष

वयाच्या प्रत्येक वळणावर स्त्रीची इच्छा असते की तिची त्वचा छान असावी. ती कुठेही गेली तरी सगळयांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या असाव्यात. पण ऊन, धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेचे सौंदर्य हरवते. अशावेळी त्वचेची नीट काळजी घेणे आवश्यक असते. त्वचेला सुरकुत्या, पिगमेंटेशन आणि डाग यापासून दूर ठेवणे गरजेचे असते.

याबाबत ‘क्यूटिस स्किन स्टुडिओ’च्या त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल सांगतात की त्वचा सुंदर ठेवण्यासाठी योग्य आहार व जीवनशैली, हार्मोन लेव्हल, स्ट्रेस लेव्हल वगैरे सर्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सहाय्यक ठरत असतात. म्हणूनच त्वचेचे वय वाढू नये यासाठी योग्य प्रमाणात संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, ताण कमी घेणे, शरीराची रोग प्रतिकारशक्ती कायम ठेवणे इत्यादींची गरज असते. यासोबतच गुड स्किन केअर रिजिम आणि स्किन ट्रीटमेंटसुद्धा आवश्यकतेनुसार करत राहायला हवी.

जर अँटीएजिंग ट्रीटमेन्ट घ्यावी लागली तर अनुभवी डॉक्टरकडे जावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आपल्या त्वचेत बदल करता येतील व चमकदार व सतेज त्चचा मिळेल. आजकालच्या आधुनिक तंत्रामुळे बहुतांश महिला व पुरुष मनाजोगते रूप मिळवण्यास समर्थ होत आहेत.

या गोष्टींकडे लक्ष द्या

त्वचा सुंदर राखण्याकरिता या गोष्टींकडे लक्ष द्या :

* तुम्ही नोकरदार असाल वा गृहिणी सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करा, कारण यामुळे त्वचा खराब होऊ लागते, ज्यामुळे लवकर सुरकुत्या पडू लागतात. यासाठी सनस्क्रीन एसपीएफ २५ वापरा. जर तुम्ही मेकअप करत असाल तर सनस्क्रीन लावल्यावरच मेकअप करा. याशिवाय उन्हापासून रक्षण करण्यासाठी स्कार्फ वा ओढणी यांचा वापर करा.

* पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज बहुतांश मध्यम वयीन महिलांना आपले भक्ष्य बनवतो. यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर केस उगवणे, अॅक्नेची समस्या, वजन वाढणे असे त्रास सुरु होतात, अशावेळी हार्मोन तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्या. जर चेहऱ्यावर केस उगवू लागले तर लेझरने नाहीसे करणे हा चांगला पर्याय आहे.

* व्हिटॅमिन्स आणि मिनरलच्या कमतरतेनेसुद्धा त्वचा निर्जीव दिसू लागते. तेव्हा अशावेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.

* त्वचेवर सूक्ष्म रेषा दिसू लागणे हे तुमची त्वचा कोरडी पडण्याचे लक्षण आहे. अशावेळी मॉइश्चरायझरचा वापर कमी करणे सहाय्यक ठरते.

* अँटीएजिंग क्रीम लावण्याची योग्य वेळ निश्चित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, कारण तुमच्या त्वचेनुसार अँटीएजिंग क्रीम लावायला हवे. काही क्रीम्स त्वचेवरील बारीक रेषा नाहीशा करण्याकरिता सहाय्यक असतात तर काही मॉइश्चराइझ करण्यासोबतच नाहीसे झालेले पोषक घटक परत आणण्यात सक्षम असतात.

* त्वचेचे फेशियल करून ती स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची त्वचा ऑयली असेल तर तिशी पार करताच मुरूम येऊ लागतात, अशावेळी फेशियल अजिबात करू नका. त्वचा केवळ स्वच्छ ठेवण्याचा प्रत्यन करा.

डॉ. अप्रतिम संगततात की तिशी पार केल्यावर तुम्ही कितीही व्यस्त का असेना त्वचेच्या निगेसाठी अवश्य वेळ काढायला हवा नाहीतर दुर्लक्ष केल्याने मुरूम, ब्लॅकहेड्स, सुरकुत्या वगैरे दिसू लागतात. असे झाल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने आधी सौंदर्य प्रसाधनांचा वापर बंद करा.

असे थांबवा त्वचेचे एजिंग

अँटी एजिंग कमी करण्याच्या काही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत :

* स्किन पॉलिशिंगने त्वचेतील हरवलेली आर्द्रता परत मिळते, कारण यामुळे मृत पेशी नाहीशा होतात आणि त्वचा पुन्हा चमकू लागते.

* मसल रिलॅक्सिंग बोटुलिनम इंजेक्शनने कपाळावर आलेल्या सूक्ष्म रेषा आणि सुरकुत्या कमी करता येतात.

* लेझर आणि लाईट बेस्ड टेक्नोलॉजीने त्वचेवरील बारीक सुरकुत्या कमी करण्यास मदत मिळते.

* रिंकल फिलर्ससुद्धा सुरकुत्यांना कमी करण्यासोबत प्लम्पिंग लिप्स, चिक लिफ्ट, चीन लिफ्ट वगैरे करण्यात सहाय्यक ठरते.

* केमिकल पील त्वचेचा वरचा थर काढून चेहऱ्यावरच्या बारीक सुरकत्या नाहीशा करते. मिल्क पील आणि स्टेम सेल पीलच्या वापराने त्वचा त्वरित चमकदार दिसू लागते.

* स्किन टायटनिंग आणि कंटुरिंगमुळे त्वचेत बारीक रेषा व कोलोजन दिसून येत नाही, ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य टिकून राहते.

या चुका करू नका

त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे त्वचेला काहीही लावल्यास ती छान दिसण्याऐवजी खराब होते. या चूका महिला अनेकदा करत असतात.

* बहुतांश महिला घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. कोणच्याही सांगण्यावर विचार न करता त्वचेला काहीही लावतात. ज्यामुळे नंतर समस्या उत्पन्न होतात. म्हणून घरगुती उपाय जरी करायचे असतील तरी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ल घेऊनच करा.

* असा समज आहे की ऑयली त्वचेवर मॉइश्चराझरची गरज नसते, जे चुकीचे आहे. त्वचेला हायडे्रट करण्यासाठी आर्द्रता असणं आवश्यक असते, जी मॉइश्चराइझारमधून मिळते.

* घरात राहणाऱ्या महिलांना सनस्क्रिन लावायचे नसते. जेव्हा की त्यांची त्वचा टॅन होते. म्हणून त्यांनी सनस्क्रिनचा वापर करायला हवा.

* मुरूम आल्यास बहुतांश महिला विचार करतात की थोड्या दिवसात हे आपोआप बरे होतील, पण असे होत नाही. मुरूम गेल्यावर डाग मागे राहतात, जे सहजासहजी जात नाहीत.

* महागडी प्रसाधने जास्त प्रभाशाली असतील असे जरुरी नाही. डॉक्टरांनी दिलेले औषधच चांगले असते.

सनस्क्रीन लावणे का आहे महत्त्वाचे

* मोनिका गुप्ता

सनस्क्रीन हे एक असे त्वचेची काळजी घेणारे उत्पादने आहे, जे आपल्या त्वचेसाठी दररोज वापरणे फार महत्त्वाचे आहे. बहुतेक स्त्रियांना असे वाटते की सनस्क्रीन फक्त उन्हाळयामध्येच लावले जाते, परंतु सनस्क्रीन सर्व हंगामात वापरले पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेला खराब होण्यापासून प्रतिबंधित करते.

उन्हाळयात सनस्क्रीन महत्त्वाचे का आहे?

त्वचा विशेषतज्ज्ञ डॉ. इंदू यांच्या या म्हणण्यानुसार जर एखाद्याला फ्रीकल्स, सनबर्नसारखी समस्या झाली असेल तर त्याने दिवसातून ३ वेळा सनस्क्रीन अवश्य लावावी. फ्रीकल्स ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा चेहऱ्यावर तपकिरी डाग दिसतात तेव्हा त्यांना फ्रीकल्स असे म्हणतात.

फ्रीकल्स टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. तथापि याचा सीवो २ लेसर उपचारदेखील आहे. बरेच लोक घरात राहतात तेव्हा आपल्या त्वचेची काळजी घेण्यात आळस करतात. जर आपण घरी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवत असाल तरीदेखील सनस्क्रीन अवश्य वापरा. सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफकडे नक्की लक्ष द्या.

सनस्क्रीन आणि एसपीएफ

वाढत्या वयाबरोबर त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेघा, त्वचा फाटणे, रंगावर परिणाम, प्रतिबिंब या सर्वांचे सर्वात मोठे कारण म्हणजे अल्ट्राव्हायलेट किरण. जेव्हा आपण उन्हात जास्त वेळ घालवतो तेव्हा त्वचा काळी होण्यास सुरवात होते आणि त्वचेशी संबंधित काही गंभीर समस्यादेखील उद्भवू शकतात.

सनस्क्रीन खरेदी करताना त्यामध्ये असलेल्या सन प्रोटेक्शन फॅक्टर म्हणजेच एसपीएफ या प्रमाणाचे योग्य ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. तसे तर एसपीएफ १५ चे प्रमाण असलेले सनस्क्रीन वापरणे चांगले असते. परंतु वाढती उष्णता आणि प्रदूषण दरम्यान, एसपीएफ १५ पासून एसपीएफ ३० पर्यंतचे सनस्क्रीन लोशन अधिक प्रभावी मानले जातात. आपण सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडल्यास आपली त्वचा उन्हात होरपळू शकते.

सनस्क्रीनमध्ये एसपीएफ खूप महत्वाचे आहे. एसपीएफचे प्रमाण जितके जास्त असेल तितकेच आपल्या त्वचेला संरक्षण जास्त मिळते. जर आपल्या सनस्क्रीनमध्ये ३० एसपीएफ असेल तर आपल्या त्वचेवरील संरक्षण ३० पटीने अधिक वाढेल.

त्वचेनुसार सनस्क्रीन निवडा

* बहुतेक स्त्रिया अशी तक्रार करतात की सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचा चिकट आणि काळी दिसू लागते. जर आपली त्वचा अधिक चिकट दिसत असेल तर आपण चुकीचे सनस्क्रीन निवडले आहे. सनस्क्रीन नेहमीच आपल्या त्वचेनुसार निवडा.

* जर तुमची त्वचा सामान्य असेल तर क्रीम आधारित सनस्क्रीन वापरा.

* आपल्या त्वचेवर पुरळ आणि मुरुमांची समस्या अधिक असल्यास तेल मुक्त सनस्क्रीन लावा आणि जर आपली त्वचा तेलकट असेल तर जेल सनस्क्रीन निवडा.

* कोरडी त्वचा असलेल्यांनी मॉइश्चरायझर आधारित सनस्क्रीन वापरली पाहिजे.

केव्हा, किती एसपीएफ आवश्यक आहे

त्वचेचे नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी ३० एसपीएफ पुरेसे आहे. परंतु जर आपण फार काळ बाहेर असाल, उन्हात जास्त वेळ घालवत असाल आणि वारंवार सनस्क्रीन लावू शकत नाहीत तर आपण एसपीएफ ५० चे सनस्क्रीन वापरावे.

आपण रोजच्या दिवसांसाठी एसपीएफ ३० चे वापरू शकता. घरात असल्यावरदेखील सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक, घरात असलेल्या कृत्रिम प्रकाशाचाही त्वचेवर परिणाम होतो. म्हणूनच, घरी आपण एसपीएफ १५ चे सनस्क्रीन वापरावे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें