वधूच्या रूपातील सेलिब्रिटी

* सोमा घोष

साडी आणि लेहेंगा चोळी हा भारतीय संस्कृतीशी निगडित एक अतिशय खास पोशाख आहे. विशेष प्रसंगी तो परिधान केल्याने तुम्ही एकाचवेळी ग्लॅमरस आणि पारंपरिक दिसू शकता. कोणत्याही मुलीची खास दिवसासाठी साडी ही पहिली पसंती असते. या लग्नसराईत तुम्ही नवविवाहित वधू होणार असाल तर घाबरण्याची गरज नाही. या ५ सेलेब्सच्या लुक्सवरून तुम्हाला चांगली कल्पना मिळेल. चला, ते लुक्स कोणते, ते पाहूयात :

आलिया भट्ट

आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांनी त्यांच्या लग्नासाठी अतिशय सौम्य रंग निवडला होता. बहुतेक नववधू लाल आणि मरूनसारख्या रंगांना प्राधान्य देतात, तर आलिया ऑफ-व्हाइट साडीमध्ये अतिशय सुंदर वधू दिसत होती. खरंतर लग्नाची संकल्पना पांढरी आणि सोनेरी होती. यामुळेच वधू-वर या दोन रंगांच्या सब्यसाचीच्या पोशाखात दिसले.

कानातले, गळयातले, बांगडया आणि बिंदीसह आलियाने तिचा वधूचा लुक पूर्ण केला. तिची केशरचनाही खूप खास होती. एका वधूने लग्नासाठी केस मोकळे ठेवल्याचे बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले. लग्नासाठी आलियाने अंबाडा किंवा हेअरस्टाइलऐवजी केस साधेच ठेवले होते. सुंदर बिंदीने तिची साधी केशरचना खास बनवली.

आलियाने तिच्या आयुष्यातील अतिशय खास दिवसासाठी विशेष मेकअप निवडला, जो तिच्या पेस्टल पोशाखाने परिपूर्ण दिसत होता. तिचा बेस ड्यूई होता. तिच्या गालांना किंचित गुलाबी रंग दिला गेला होता. तिच्या सुंदर लुकमागील रहस्य म्हणजे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट पुनीत बी. सैनी होते.

कतरिना कैफ

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न गेल्यावर्षी ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये झाले. त्यांच्या लग्नात पंजाबी लुक होता. त्यांच्या लग्नाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कतरिनाचा लुक एकदम वेगळा आणि सुंदर होता, जो आजच्या नववधूंना आवडतो. कतरिना कैफने लाल रंगाचा सब्यसाचीचा लेहेंगा घातला होता. कतरिनाचा संपूर्ण लुक राजा-रजवाडयांच्या वधूसारखा होता. तिच्या लेहेंग्याची स्वत:ची अशी वेगळी खासियत होती.

या लेहेंग्यावर सोन्याच्या धाग्यांनी भरतकाम केले होते. कतरिनाच्या लेहेंग्याचा ब्लाऊज आणि दुपट्टयानेही तिच्या लुकला रॉयल लुक दिला होता. भरजरी लेहेंग्यात सोनेरी धाग्यांनी कलाकुसर केलेले भरतकाम होते. हाताने विणलेला मटका सिल्क, वधूच्या लेहेंग्यात नजाकतीने केलेले नक्षीकाम आणि मखमली भरतकाम जरदोसी काठाने जोडले होते. यासोबतच कतरिनाचे वधूचे दागिने म्हणजे बांगडया आणि हातफूल खास होते. कतरिनाचा मेकअप आर्टिस्ट डॅनियल बाउर होते, जे मेकअपमध्ये डोळे हायलाइट करण्यावर अधिक विश्वास ठेवतात. कतरिना कैफने तिच्या डोक्यावर एक भरजरी दुपट्टा घेतला होता, त्यावर इलेक्ट्रो प्लेटेड सोने आणि पिटा चांदीने हातानी केलेल्या नक्षीकमासह कस्टमट्रिम केले होते.

आजकाल दोन दुपट्टा घेण्याचा ट्रेंड आहे. कतरिनाने लेहेंग्यासोबत २ दुपट्टे घेतले होते. दोन्ही जवळपास सारखेच दिसत होते. कतरिनाने सब्यसाची ज्वेलरी कलेक्शन निवडले. कतरिनाने २२ कॅरेट सोन्याचे दागिने घातले होते, त्यासोबत तिने गळयात अखंड हिऱ्यांनी बनवलेला भारदस्त हार घातला होता. याशिवाय तिने मोठी नथ आणि कपाळाला भारदस्त राजस्थानी बिंदी लावली होती.

दीपिका पदुकोण

दीपिका आणि रणवीर सिंह यांचा विवाह नोव्हेंबर २०१८ मध्ये झाला. त्या काळात तिने सर्वांना वेगळया वधूच्या लुकची ओळख करून दिली. लग्नात दीपिकाने पारंपरिक साडीला विशेष महत्त्व दिले. कोकणी लुकसाठी, तिने बर्नट केशरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती, जी कोकणी परंपरेला प्रतिबिंबित करते, ज्यामध्ये जरीचे धागे, ब्रोकेड सिल्क कांजीवरम होते. यासोबत तिने दक्षिणेकडील मंदिरातील दागिन्यांसारखे दागिने घातले होते.

याशिवाय दागिन्यांमध्ये तिने गुट्टापुसालू नेकलेस, कानातले, बांगडया, चोकर, बिंदी इत्यादी परिधान करून एक वेगळा लुक केला, जो तिच्या ऑन-स्क्रीन वधूच्या पोशाखापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. दीपिका पदुकोणचे दोन विधींनुसार लग्न झाले. तिने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. दीपिकाचा हा ब्रायडल लुक खूप लोकप्रिय झाला. लेहंग्याचे डिझाईनही तिच्या चाहत्यांना खूप आवडले. लग्नापूर्वी दीपिका पदुकोणच्या बंगळुरू या मुळ शहरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दीपिकाने मँगो कलरचा सूट परिधान केला होता. तो फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केला होता. दीपिकाची आई उज्ज्वला पदुकोणनेही सुंदर सिल्कची साडी नेसली होती.

मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉयने गोव्यात मित्र सूरज नांबियारसोबत लग्न केले. मौनी आणि दुबईतील व्यावसायिक सूरज नांबियार बऱ्याच दिवसांपासून एकत्र फिरत होते. त्यांच्या लग्नाचे विधी दोन प्रकारे पार पडले. पहिला विवाह मल्याळी रितीरिवाजांनुसार तर दुसरा बंगाली रितीरिवाजांनुसार पार पडला.

मौनीने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. मौनी रॉयचा ब्राइडल लुक खूपच ग्लॅमरस होता. तिच्या लेहेंग्याचा रंग लाल होता आणि तिचा दुपट्टाही खूप खास होता.

मौनी रॉयने तिच्या मेहेदी समारंभासाठी पिवळया रंगाचा लेहेंगा घातला होता, त्यावर सोनेरी जरीकाम केले होते. या लेहेंग्यासोबत तिने कुंदन असलेली बिंदी आणि कानातले घातले होते. मौनी रॉय तिच्या हळदीत पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात दिसली, सोबतच तिने फुलांचे दागिनेही घातले होते.

मौनीने तिच्या बंगाली लग्नात डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेला लाल लेहेंगा घातला होता. तिचे लग्न आणि ब्राइडल लुक खूप मस्त होता, जो लोकांना खूप आवडला. मौनीच्या वधूच्या दुपट्टयाच्या काठावर ‘आयुष्यमती भव’ असे लिहिले होते. मौनीच्या लेहेंग्याची किंमत लाखोंमध्ये होती.

मौनीच्या दागिन्यांबद्दल बोलायचे तर तिने पारंपरिक दागिने घातले होते, तिने तिच्या वधूच्या लुकसाठी हिरवे आणि सोनेरी छटा असलेले अखंड हिरे आणि पन्ना दागिने निवडले. पातळ नथीसह मौनीने कपाळाला भारदस्त बिंदी लावली होती. तिचा लेहेंगा लाल रंगाचा होता. पती सूरजने सौम्य सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती.

गोव्यात झालेल्या मल्याळी लग्नात मौनीने लाल काठ असलेली पांढरी साडी नेसली होती. लांब वेणी आणि महागडया दागिन्यांसह मौनीने तिचा लुक पूर्ण केला.

पायल रोहतगी

पायल-संग्रामने १२ वर्षे जुन्या नात्याला लग्न असे नाव दिले. लग्नासाठी त्यांनी गुजरात किंवा हरियाणा नव्हे तर आग्रा शहर निवडले. जेपी पॅलेसमध्ये त्यांचे लग्न झाले. पायल आणि संग्रामने आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये ७ फेऱ्या घेऊन त्यांच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू केला. पायल आणि संग्राम १२ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. इतकी वर्षे एकमेकांना चांगले ओळखल्यानंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायल रोहतगी लाल लेहेंग्यात अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर दिसत होती.

पायल नाकात नथ, बांगडया आणि बिंदीमध्ये खूप गोंडस दिसत होती. तिने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, तर संग्रामने तिच्या पोषाखला मिळतीजुळती पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. पायल आणि संग्रामची प्रेमकथा फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. पायलने ‘लॉकअप’ या शोमध्ये खुलासा केला होता की, ती कधीच आई होऊ शकत नाही. यामुळे ती संग्रामला दुसरीशी लग्न करण्यास सांगत होती, मात्र संग्रामने काहीही न ऐकता पायलशीच लग्न केले.

पायलच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास, मेकअप आर्टिस्ट चंदन भाटिया यांनी चमकदार हलका मेकअप केला होता, जो सर्व प्रकारच्या पोशाखांवर चांगला दिसतो. यासोबत पायलने क्लासिक रेड लिप्स आणि रोमँटिक वॉटरफॉल ब्रेडसला प्राधान्य दिले.

पायल आणि संग्राम यांनी एकमेकांशी मिळतेजुळते पोशाख घातले होते, ही आजकाल एक फॅशन आहे. दिल्ली आणि अहमदाबादच्या डिझायनर्सनी तिच्या लग्नाचे कपडे डिझाइन केले होते. पायलने लग्नाच्या दिवशी आजीने दिलेले दागिने घातले होते, कारण अशा दागिन्यांमुळे परंपरा जपण्यास मदत होते. तिच्या वधूच्या पोशाखासोबतच तिने तिच्या भावी पतीचा पोषाखही पसंत केला. पायलच्या वेडिंग लुकचीही खूप चर्चा झाली. पायलने हळदी समारंभासाठी पिवळया रंगाचा लेहेंगा निवडला होता, ज्यामुळे संपूर्ण वातावरण हळदीच्या रंगाने रंगलेले दिसत होते.

लग्नासाठी योग्य वय काय आहे

* रेणू गुप्ता

‘‘शेफाली, आजकाल तू खूप शांत आणि उदास दिसत आहेस. काही समस्या आहे का?’’ शेफालीची जवळची मैत्रीण, मनदीप, जिचे नुकतेच लग्न झाले होते, तिने शेफालीला विचारले.

‘‘नाही, नाही, काहीच नाही.’’

‘‘मला खरं वाटत नाही, काहीतरी आहे जे तुला त्रास देत आहे. तू आता पूर्वीसारखी बडबड करत नाहीस. नेहमीच कुठेतरी हरवल्यासारखी आणि उदास राहातेस. तू आता माझी ती पूर्वीची सतत बोलणारी आणि मोठ्याने हसणारी मैत्रीण राहिली नाहीस. मला सांग काय झालं? अगं, मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना?’’

मनदीपने शेफालीला थोडेसे चिडवत विचारले. तेव्हा ती मोठ्याने म्हणाली, ‘‘अगं, हेच तर दु:ख आहे, की मी असे काहीही केले नाही. हे माझे पीएचडीचे पहिले वर्ष आहे आणि माझी आजी माझे लग्न लावण्यासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागली आहे, पण सध्या मी लग्नासाठी अजिबात तयार नाही.’’

‘‘म्हणून मी माझ्या वडिलांना आणि आजीला स्पष्टपणे सांगितले की, आधी मी माझी पीएचडी पूर्ण करेन, नंतर चांगली नोकरी मिळवेन. त्यानंतरच मी लग्न करेन. लग्नापूर्वी मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि हेच कारण आहे की माझे वडील आणि आजी घरात नेहमीच वाद घालतात.’’

‘‘तुझे बरोबर आहे, लग्नानंतर मुलींवर इतक्या जबाबदाऱ्या येतात की, त्या स्वत:साठी काहीही विचार करू शकत नाहीत. माझ्याकडे बघ, पदवीनंतर मी इंटिरियर डिझायनिंगचा अभ्यास करावा आणि इंटिरियर डिझायनर व्हावे, स्वतंत्र व्हावे, माझी स्वत:ची ओळख असावी अशी माझी खूप इच्छा होती, पण माझे वडील हृदयरोगी असल्याने, मला वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लग्न करावे लागले.

‘‘आता आयुष्य घरकाम आणि स्वयंपाकापुरते मर्यादित आहे. माझा पती महिन्यातून २० दिवस कामानिमित्त घराबाहेर असतो, त्यामुळे मला कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. माझे वृद्ध सासरेही आमच्यासोबत राहातात. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी तुला इतक्या लवकर लग्नाच्या जाळ्यात अडकण्याचा सल्ला कधीच देणार नाही. स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्य फक्त एकदाच मिळते.

‘‘लग्नाचे वय झाले, म्हणून लग्न करू नकोस. मी माझ्या अनुभवातून शिकले की जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल तेव्हाच लग्न करावे.’’

शेफालीच्या घरी बसून त्या दोघी मैत्रिणी गप्पा मारत होत्या, तेवढ्यात अचानक त्यांची आणखी एक मैत्रीण, यंग इंडिया सायकॉलॉजिकल सोल्युशन्सची संस्थापक आणि संचालिका डॉ. सीमा शर्मा तिथे आली आणि त्यांची चर्चा सुरूच राहिली. डॉक्टर सीमा यांनी दोन्ही मैत्रिणींना काही प्रश्न विचारले आणि त्यांना सांगितले की जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात, असे निश्चितपणे समजू शकता.

तर आता आम्ही तुम्हाला डॉ. सीमा यांनी त्यांना कोणते प्रश्न विचारले ते सांगतो :

तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात का?

लग्नापूर्वी प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असले पाहिजे. तुम्ही आनंदी जीवन तेव्हाच जगू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा तसेच आरामदायी आणि सुंदर जीवनासाठी आवश्यक असलेल्या गरजा स्वत: पूर्ण करू शकाल. आजच्या सामाजिक रचनेत, लोक दिवसेंदिवस अधिकाधिक स्वार्थी होत चालले आहेत. प्रत्येकाला स्वत:साठी आणि स्वत:च्या आनंदासाठी जगायचे असते. म्हणूनच, मुलींना आनंदी आणि समाधानी जीवन जगावे, यासाठी आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पतीवर अवलंबून राहू नये.

डॉ. सीमा म्हणाल्या की, आजही पुरुषी अराजकता आणि स्वार्थी मानसिकतेमुळे अनेक पतीना त्यांच्या मालमत्तेवर आणि पैशांवर एकाधिकारशाही हवी असते आणि त्यामुळेच ते त्यांच्या पत्नीलाही त्यापासून दूरच ठेवतात.

म्हणूनच प्रत्येक मुलीने तिच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, जेणेकरून ती कधीही कोणावर अवलंबून राहाणार नाही आणि स्वत:च्या बळावर आनंदी जीवन जगू शकेल.

घराच्या आत आणि बाहेर तुमच्या बहुआयामी जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही तयार आहात का?

लग्नानंतर तरुणींवर अनेक जबाबदाऱ्या येतात. आजही, तथाकथित लिंग समानतेच्या या युगात, घर सुरळीत चालवण्याची जबाबदारी घरातील महिलेची मानली जाते. याशिवाय मुलांचे संगोपन, त्यांना शिक्षण देणे, सामाजिक बांधिलकी पूर्ण करणे इत्यादी जबाबदारी पत्नीवर असते. म्हणून, जेव्हा तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहात, तेव्हाच लग्नाला होकार द्या.

तुमचे आणि तुमच्या जोडीदाराची मूल्यं आणि स्वप्नं सारखी आहेत का?

लक्षात ठेवा, लग्न म्हणजे फक्त प्रेमसंबंध, मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण नाही. प्रत्यक्षात, लग्न ही अशी भागीदारी आहे ज्यामध्ये तुम्ही लग्नानंतर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे आर्थिक व्यवहार, ध्येये, मुलांचे संगोपन करण्याची पद्धत, जीवनाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन, जीवनमूल्ये समजून घेता. म्हणूनच, जेव्हा तुम्ही तुमच्या भावी जोडीदारासोबत हे सर्व चांगल्या प्रकारे समजून घेता तेव्हाच लग्न करा. या सर्व मुद्द्यांवर तुमचे तुमच्या जोडीदाराशी एकसारखे मत असणे गरजेचे नाही, परंतु तुमच्या स्वप्नांचा आधार एकच असणे महत्त्वाचे आहे.

जोडीदारासोबत सकारात्मक जवळीक साधण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

यशस्वी लग्नाची पहिली अट म्हणजे परस्पर मोकळेपणा आणि नातेसंबंधातील जवळीकता. जवळीकता म्हणजे केवळ निरोगी लैंगिक संबंध नसून, पती-पत्नीमधील खोल भावनिक जवळीक होय.

परस्पर भावनिक जवळीक हा यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया आहे. म्हणून लग्न करण्यापूर्वी, तुमच्या जोडीदारासोबत निरोगी सकारात्मक जवळीक साधण्यासाठी तुम्ही तयार आहात, याची खात्री करा.

तुमच्या आणि तुमच्या भावी जोडीदारामध्ये चांगली समज आहे का? तुम्ही तुमच्या जोडीदाराची जीवनमूल्ये, तत्त्वज्ञान, स्वभाव, चांगल्या प्रकारे समजून घेता आणि ओळखता का?

तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवावे लागते. अनेक आव्हानात्मक परिस्थितींना एकत्र तोंड द्यावे लागते. म्हणूनच, जर परस्पर समजूतदारपणा असेल तर जीवनातील कठीण आव्हानांना तोंड देणे तुमच्यासाठी तुलनेने सोपं होईल.

तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील कमतरतांबद्दल सहज चर्चा करू शकता का?

जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात, कारण अशा परिस्थितीत तुमच्या दोघांमध्ये एक बंध निर्माण होतो. समन्वय साधण्यात अडचण येण्याची शक्यता कमी असते.

तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला आरामदायी वाटते का?

तुमच्या भावी जोडीदारासोबत तुमच्या आरामदायकतेचे महत्त्व ओळखा. त्याच्यासमोर तुम्ही आरामदायी आहात की अस्वस्थ आहात? जर तुम्हाला त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटत असेल, त्याच्यासमोर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना येत असेल, तुम्हाला चिंता किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे धोक्याचे लक्षण आहे. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही आणखी थोडा वेळ घ्यावा.

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आवडते का?

जर उत्तर हो असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता त्याच्याशी लग्न केले पाहिजे, पण जर उत्तर नाही असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या नात्याला जास्त वेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा कंटाळा आला असेल, मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असेल किंवा चिडचिड होत असेल तर ते चांगले नाही. जर तुम्हाला या नात्यात कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. अशावेळी तुम्ही लग्न करण्याच्या तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.

लग्नाकडून तुमच्या अपेक्षा वास्तववादी आहेत का?

तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, तुमच्या भावी जोडीदारासोबतचा तुमचा वैवाहिक प्रवास नेहमीच आनंदी राहाणार नाही. या प्रवासादरम्यान, तुम्हाला काही कटू, अनुभव येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनाची चव काहीशी कडू होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात फक्त आनंदाचे क्षणच येणार नाहीत. कधीकधी, काही परिस्थितीत, तुमच्या जोडीदाराची वागणूक तुम्हाला निराश करू शकते.

अशावेळी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या आव्हानात्मक परिस्थितींना हसून आणि कोणतीही चिंता न करता तोंड देऊ शकता तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता लग्नासाठी पूर्णपणे तयार आहात.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मूल हवे आहे का?

जर तुम्ही आणि तुमचा होणारा पती सहमत असाल की, तुमच्या आयुष्यात योग्यवेळी एक मूल येईल, सोबतच जर लग्नानंतर तुमच्या दोघांनाही मुलाच्या संगोपनाची जबाबदारी वाटून घेण्यास काही हरकत नसेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता लग्न करू शकता. जर तुम्हाला मूल हवे असेल पण तुमच्या जोडीदाराला ते नको असेल तर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा लागेल.

लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात मोठा बदल होईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे का?

जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर ते चांगले लक्षण नाही. तुम्हाला तुमच्या भावी पतीला त्याच्या आहे त्या स्वभावासह स्वीकारावे लागेल, पण जर तुम्हाला वाटत असेल की, हे तुमच्यासाठी शक्य नाही तर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल. लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाचा मूळ स्वभाव, चारित्र्य आणि व्यक्तिमत्व बदलता येत नाही, पण जर तुमच्यामध्ये तुमच्या जोडीदाराला त्याच्या उणिवा, कमतरता आणि कमकुवतपणासह स्वीकारण्याची क्षमता असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता.

भारतीय देश सोडून का जात आहेत?

* मिनी सिंह

भारतात सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावर चर्चा जोरात सुरू आहे. सीएएच्या माध्यमातून भारत शेजारील ३ देशांतील गैर-मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देईल, पण एक सत्य असेही आहे की, एकीकडे भारत शेजारील देशांतील लोकांना नागरिकत्व देणार आहे तर दुसरीकडे दरवर्षी लाखो भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत.

अलीकडेच, केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले की, २०२१ मध्ये सुमारे १.६३ लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. २०२० मध्ये सुमारे ८५ हजार २५६ लोकांनी आपले नागरिकत्व सोडले. २०१९ मध्ये १.४ लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ९.२४ लाख भारतीयांनी देश सोडला आणि ते विदेशी नागरिक झाले. २१ डिसेंबर २०२३ रोजी, ३०३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान, ज्यात बहुतांश भारतीय होते, ते सर्व मानवी तस्करीचे शिकार असल्याच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. हे विमान संयुक्त अरब अमिरातीहून मध्य अमेरिकन देश निकाराग्वाला जात होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या विमानातील ६६ प्रवासी गुजरातचे तर इतर पंजाबचे होते. या प्रवाशांमध्ये ११ अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.

अवैध प्रवेश

यावरून असे दिसून येते की, पंजाब आणि गुजरातमधील गरीब खेड्यांतील हे प्रवासी बेकायदेशीरपणे अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्याच्या उद्देशाने निकाराग्वाला जात होते. ‘डंकी विमान’ भारतात परत पाठवल्यानंतर काही आठवड्यांनी, गुजरात पोलिसांनी निकाराग्वा सीमेवरून भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत हलविणाऱ्या १४ दलालांवर गुन्हा दाखल केला. यातील बहुतांश दलाल गुजरातमधील होते तर काही दिल्ली, मुंबई आणि दुबईतील होते. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी या दलालांनी प्रवाशांकडून ६० ते ८० लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले. प्रवाशांनी ते खलिस्तानी आहेत, असे सांगावे आणि पोलिसांनी सीमेवर पकडलेच तर त्यांनी अमेरिकेचा आश्रय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या होत्या.

त्या विमानातील सर्व गुजरातींना गुजरातला परतायचे नव्हते, असेही सूत्रांकडून समजले. येथून फक्त निकाराग्वाला जाणार यावर ते ठाम होते तर सुमारे १२ प्रवासी फ्रान्समध्ये आश्रय मागत होते.

आपल्या भारत देशाला एकेकाळी सोन्याचा पक्षी म्हटले जायचे. भारतातली कला, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय, राज्यकारभार इ. जगभर आदराने स्वीकारले गेले. भारताच्या प्रगत अर्थव्यवस्थेची आणि समृद्धीची जगभर चर्चा झाली. जगाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येथे येत, पण आज लाखो भारतीय देश सोडून विदेशात जात आहेत, असे का?

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीनुसार, दरवर्षी लाखो भारतीय देश सोडून नोकरी, रोजगार, अमाप पैसा, चांगले जीवन इत्यादींच्या शोधात विदेशात जात आहेत. २०२० पासून अमेरिकेत भारतीयांच्या अघोषित स्थलांतरात आश्चर्यकारक वाढ झाली आहे. भारतातील आर्थिक संधींचा अभाव, अल्पसंख्याकांचा धार्मिक आणि राजकीय छळ आणि अमेरिकेत कायदेशीर स्थलांतर साखळीचा अभाव, ही कारणे यामागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारत सोडून जाणाऱ्या लोकांची पहिली पसंती अमेरिका तर दुसरी कॅनडा आहे. याशिवाय लोक ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, न्यूझिलंड, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड आणि स्वीडन इत्यादी देशांमध्ये स्थायिक होत आहेत. हा आकडा दरवर्षी वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीने देश सोडून विदेशात स्थायिक होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात, पण प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय देश सोडून जाण्याचे मुख्य कारण काय असू शकते?

परदेशातील जीवन सोपं

मनीषा (नाव बदलले आहे) २००३ मध्ये नोकरीसाठी अमेरिकेत गेली आणि तिथेच स्थायिक झाली, तिचं म्हणणं आहे की, तिची मुलगीही तिथेच जन्मली, त्यानंतर तिने ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आणि तिथले नागरिकत्व मिळवले. इथलं जीवन खूप सोपं आहे. राहणीमान खूप छान आहे. मुलांचे शिक्षण चांगले होते. येथील संधीही भारतापेक्षा चांगल्या आहेत. याशिवाय कामाचे वातावरण खूप चांगले आहे. तुम्ही किती काम करता त्यानुसार मोबदला मिळतो. भारताला नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण किंवा ब्रेन ड्रेन (विदेशी स्थलांतर) नियंत्रित करायचे असेल तर अनेक पावले उचलावी लागतील. यामध्ये चांगल्या सुविधा, नवीन संधी, दुहेरी नागरिकत्वाचा विचार करणे गरजेचे आहे.

कॅनडामध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याने येथून आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता येथे काम करत आहे. तो आपले भारतीय नागरिकत्व सोडण्यास तयार आहे. येथे कामाचे चांगले वातावरण असल्याचे तो सांगतो. येथे तासांनुसार कामाचे नियोजन केले जाते आणि कामाच्या ठिकाणी नियम तसेच कायदे पाळले जातात. भारतात मात्र नियमांचे तितकेसे पालन केले जात नाही. त्यामुळे त्याला भारतात जायचे नाही.

जीव धोक्यात

२०१७ मध्ये सुमारे ३० भारतीय अमेरिकेसाठी डॅरियन गॅप (भौगोलिक क्षेत्र)मधून जात होते. थकवा, भूक, जंगली प्राणी, विषारी कीटक या आव्हानांची पर्वा न करता त्यांना कसं तरी अमेरिकेत जायचे होते. तहान लागली की ते शर्ट पिळून पावसाच्या पाण्यात भिजवत. खूप थकल्यासारखे वाटले की जंगलात कुठेतरी बसायचे किंवा झोपायचे. प्रचंड भूक लागल्यावर मनाला समजवायचे की, काही फरक पडत नाही, आता गंतव्यस्थान जवळ आले आहे, आपल्याला फार थोडे पुढे जायचे आहे.

ही कथा केवळ ३० लोकांची नाही तर विदेशात जाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या शेकडो भारतीयांची आहे.

शाहरुख खानचा ‘डंकी रूट’ हा चित्रपट ज्यांनी इतरांना स्वीकारले त्यांच्यावर आधारित आहे.

परदेशात विशेषत: पाश्चात्य देशात (अमेरिका, कॅनडा, युके) जाण्याची इच्छा जवळपास प्रत्येक भारतीयाला असते. हे देश भारतीयांना आकर्षित करतात, तरुणांनी विदेशात जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्तम रोजगाराच्या संधी आणि अधिक कमाईची इच्छा. पण, या देशांचे नियम आणि कायदे अतिशय कडक आहेत आणि त्यामुळे मर्यादित संख्येनेच भारतीय तिथे कायदेशीर मार्गाने जाऊ शकतात. तरुणांना कायदेशीर मार्गाने परदेशात जाणे शक्य नसल्याने ते बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब करतात, ज्याला ‘डंकी रूट’फ्लाईट म्हणून ओळखले जाते. ‘डंकी रूट’ हा पंजाबी शब्द आहे ज्याचा अर्थ उडी मारून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे असा होतो. ‘डंकी रूट’वरून पाठवण्यासाठी दलाल लोकांकडून लाखो रुपये घेतात.

यूएस कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोलच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये, सुमारे ९,००० भारतीय मेक्सिकोमार्गे बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले. २०१७ च्या तुलनेत ही संख्या जवळपास तिप्पट अधिक होती.

अमेरिकेच्या आयबीआय कन्सल्टंट्स फर्मचे इमिग्रेशन तज्ज्ञ आणि संशोधन समन्वयक कॅटलिनयेल्स सांगतात की, लॅटिन अमेरिकेत जाणारे बहुतेक भारतीय ब्राझिलमार्गे मेक्सिकोला पोहोचतात, कारण येथील व्हिसा कायदे कमकुवत आहेत. येथून हे लोक महामार्गाने उत्तरेकडे सरकू लागतात आणि कोलंबिया तसेच मध्य अमेरिका मार्गे अमेरिकेच्या सीमेवर पोहोचतात.

येल्स सांगतात की, यातील बहुतेक स्थलांतरित आर्थिक संधींच्या शोधात किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह राहण्यासाठी येथे येतात. पंजाब आणि हरयाणासारख्या राज्यांतील अनेक स्थलांतरितांचे म्हणणे आहे की, ते धार्मिक छळापासून वाचण्यासाठी येथे येतात तर काही लोक राजकीय दडपशाहीबद्दल बोलतात.

प्रश्न असाही आहे

कॅलिफोर्नियातील फ्रेंसो येथील इमिग्रेशन वकील दीपक अहलुवालिया यांनी माध्यमांना सांगितले की, भारतातील राजकीय असंतुष्टता तसेच अल्पसंख्याक आणि समलिंगी समुदायातील लोक इतर देशांमध्ये आश्रय घेण्याचा सर्वाधिक प्रयत्न करतात.

इथे एक प्रश्न असाही पडतो की, पंजाब आणि हरयाणातील लोकांना अमेरिका आणि कॅनडात का जायचे आहे? याच्या उत्तरादाखल आपल्याला २०व्या शतकाकडे पाहावे लागेल. २०व्या शतकाच्या सुरूवातीस, पंजाबमधील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील लोक अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये गेले. तेथे त्यांनी कठोर परिश्रम करून संपत्ती निर्माण केली. ते तिथून भारतात आणि त्यांच्या कुटुंबियांनाही पैसे पाठवत असत, त्यामुळे त्यांच्या गावाची आर्थिक स्थिती सुधारू लागली आणि हे सर्व पाहून तरुणांचे विदेशाकडे आकर्षण वाढले आणि मग कोणत्याही मार्गाने तिथे जाण्याची स्पर्धा लागली. तरुणांची मानसिकता समजून घेऊन कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची चांगली संधी दलालांना मिळाली.

करोडपतीचे पलायन

दरवर्षी हजारो भारतीय करोडपती परदेशात जाऊन स्थायिक होतात. एचएनआयच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये सुमारे ६ ते ८ हजार उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती देश सोडण्याची अपेक्षा होती. कोरोना काळात अनेक मोठे उद्योगपती देश सोडून कॅनडा, अमेरिका, यूके, यांसारख्या देशांमध्ये स्थायिक झाले. धनदेवता कुबेराचा देश सोडण्यामागे कोरोना हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे अतिश्रीमंत भारतीयांसाठी गंतव्यस्थान बनत आहे.

भारतातील वाढत्या कर दरांमुळे असे होत आहे का? त्या देशांतील कराचे दर भारतापेक्षा कमी आहेत का?

जगभरातील सर्व देशांचे कर तपासले असता असे आढळून आले की, करांच्या दरात झालेली वाढ, हे भारतीय श्रीमंतांनी विदेशात स्थायिक होण्याचे कारण आहे. एका सर्वेक्षणानुसार, व्यावसायिकांचा असा विश्वास आहे की, त्यांना भारतातील त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेची चिंता आहे. ही असुरक्षितता देशातील विविध कर आणि नियमांमध्ये दररोज होणाऱ्या बदलांमुळेही आहे. या असुरक्षिततेमुळे उद्योगपतींना देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. जर त्यांना भारतात त्यांच्या व्यवसायासाठी सुरक्षेची हमी मिळाली तर कदाचित स्थलांतर इतक्या मोठ्या प्रमाणात झाले नसते.

शैक्षणिक क्षेत्रात मागे पडत चाललेला देश

शैक्षणिक क्षेत्रात मुलभूत गरजांची कमतरता, हे देखील देशात घडत असलेल्या ‘ब्रेन ड्रेन’चे एक कारण आहे. सर्व प्रयत्न करूनही देशातील तरुणांना आरक्षण किंवा इतर कारणांमुळे कौशल्य विकसित करता येत नाही.

एकीकडे भारत इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या शर्यतीत आहे तर दुसरीकडे येथील तरुणांना भारतापेक्षा इतर देशांमध्ये अधिक संधी दिसत आहेत. भारतातील बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की, देश सोडून विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. तरुणांमध्ये निराशा दिसून येत आहे आणि सरकारी धोरणे अपयशी ठरत आहेत.

भारतातील शिक्षण व्यवस्था हे स्थलांतराचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारताची शिक्षण व्यवस्था अजूनही त्या देशांइतकी चांगली नाही जिथे भारतीयांना जायला आवडते. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यापैकी सुमारे ७०-८० टक्के विद्यार्थी त्यांच्या देशात म्हणजेच भारतात परतत नाहीत. करिअरची शक्यता आणि चांगले भविष्य लक्षात घेऊन ते विदेशात स्थायिक होणेच अधिक पसंत करतात.

आपल्या देशातील नागरिक आनंदाने आपले नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत, पण एक काळ असा होता जेव्हा जगभरातून लोक भारतात यायचे. ७व्या शतकात चीनमधून भारतात आलेला हेनसांग असो, ११व्या शतकात भारतात येणारा अल्बेरुनी असो किंवा इब्न बतूता १४व्या शतकात भारतात आला असो. आपल्या देशाचा वारसा असा आहे की, जगभरातून लोक येथे यायचे. भारतात राहाणारे लोक जसे श्रीमंत होतात तसे त्यांचे भारतावरील प्रेम कमी होत जाते आणि जेव्हा ते करोडपती आणि अब्जाधीश होतात तेव्हा ते भारत सोडून विदेशात स्थायिक होतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याच्या मार्गावर असताना, भारतीय तरुणांचे इतर देशांत होणारे स्थलांतर हे चांगले लक्षण नाही.

गुजरात विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ गौरांग जैन सांगतात की, विदेशात जाण्याची शर्यत खूप तीव्र आहे. इथले लोक अमेरिकेत पोहोचण्यासाठी कितीही रोख रक्कम खर्च करायला तयार असतात. ते सांगतात की, एकदा त्यांनी त्यांचे ध्येय गाठले की, त्यांना तेथील समुदायाकडून प्रचंड पाठिंबा मिळतो.

एचडीपीच्या मते, कोविड १९ ने भारत सोडण्याच्या प्रवृत्तीला आणखी गती दिली आहे. श्रीमंत भारतीयांमध्ये ‘जीवन आणि संपत्तीचे जागतिकीकरण’ करण्याची प्रवृत्ती लक्षणीय वाढली आहे.

भारतीय वंशाचे रिअल इस्टेट मॅग्नेट आणि कॅनडातील मॅग्नेट तसेच मेनस्ट्रीट इक्विटी कुरीचे सीईओ बॉब विलो हे याकडे भारतातून स्थलांतराची तिसरी लाट म्हणून पाहातात. ते सांगतात की, सुमारे १०० वर्षांपूर्वी पंजाबमधील गरीब तसेच शेतकरी पाश्चिमात्य देशांकडे वळले होते त्यानंतर, भारतीय व्यावसायिकांमध्ये भारत सोडण्याची शर्यत होती आणि आता भारतातील श्रीमंत तसेच तरुणांमध्ये देश सोडण्याची चढाओढ आहे.

ओसीआय कार्ड म्हणजे काय?

भारतात दुहेरी नागरिकत्वाची सवलत नसल्यामुळे विदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांना त्यांचा भारतीय पासपोर्ट जमा करावा लागतो. विदेशी नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांसाठी ओसीआय कार्ड ही एक खास सुविधा आहे. ओसीआय म्हणजे ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ विदेशात स्थायिक भारतीय ओसीआय कार्ड घेऊन मायदेशी येऊ शकतात. त्यांना व्हिसाची गरज भासत नाही.

मात्र, या सर्व समस्यांवर उपाय एकच आहे की, भारतीय इतर देशांत स्थलांतरित का होत आहेत, यावर सरकारने तोडगा काढावा. आपल्या देशातील कलागुण बाहेर गेले तर आपल्या देशाचा विकास कसा होणार? त्यासाठी देशातील तरुणांना योग्य संधी आणि रोजगार, चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील लोक बाहेर जाणार नाहीत.

चांगल्या आरोग्य सेवा देणे, नागरिकांना भयमुक्त वातावरण देणे आणि त्यांच्या चांगल्या जीवनासाठी तसेच उत्तम भविष्यासाठी जास्तीत जास्त सुविधा देणे, ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. देशातील नागरिकांनीही आपले कर्तव्य विसरू नये, थोड्याशा स्वार्थासाठी आपल्या देशापासून दूर जाणे योग्य नाही. भारताला समृद्ध बनवायचे असेल तर सरकारसोबतच देशातील नागरिकांनाही विचार करावा लागेल की, आपण आपली प्रतिभा आणि पैसा इतर देशांसाठी न वापरता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी वापरायला हवी.

अमेरिकेसारख्या मोठ्या देशात भारतीय आता सुरक्षित राहिलेले नाहीत. भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या नवीन वर्षात आतापर्यंत ५ भारतीय हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. ताजी घटना वॉशिंग्टन शहरातील आहे, जिथे एका संशयित अमेरिकन नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला केला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

जगभर लोकशाहीचा संदेश देणाऱ्या अमेरिकेचे वास्तव असे आहे की, भारतासारख्या देशातून जे लोक तेथे शिक्षण, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी गेले आणि तेथेच स्थायिक झाले, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास अमेरिका सक्षम नाही. वांशिक हिंसाचारावर नियंत्रण ठेवणे आजही त्यांच्यासाठी आव्हान आहे. अमेरिकन सरकारने या समस्येवर लवकरच तोडगा काढला नाही तर कुशल भारतीयांच्या योगदानापासून वंचित राहण्यासोबतच त्यांना फार मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल.

मैत्रीतील समस्या : जनरेशन झेडचा (Gen Z) जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवल्यामुळे मैत्रीत दुरावा निर्माण होत आहे

* रोहित

मैत्रीतील समस्या: शाळेतील शेवटच्या बाकापासून ते वसतिगृहाच्या कॉरिडॉरपर्यंत, जिथे एकेकाळी मैत्रीचे पडसाद उमटत होते, तिथे आता फक्त नोटिफिकेशन्सचा गोंगाटच उरला आहे. आजचे जनरेशन झेडचे विद्यार्थी एकमेकांचे व्हिडिओ पाहण्यात तासनतास घालवतात, पण त्यांना समोरासमोर बोलायला वेळच मिळत नाही. कदाचित स्क्रीनच्या या खोल महासागरात त्यांची मैत्री कधी विरून गेली, हे त्यांच्या स्वतःच्याही लक्षात आलेले नाही.

भारताची तरुण पिढी आज इतिहासाच्या एका अशा वळणावर उभी आहे, जिथे मैत्रीबद्दलचा सर्वाधिक आवाज ऑनलाइन आहे, पण सर्वाधिक शांतताही तिथेच आहे. भारतीय तरुण आपल्या दिवसातील अनेक तास मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या स्क्रीनवर घालवतात. भारतीय तरुण (वय १८-२५) दिवसातील जवळपास ३ तास केवळ सोशल मीडियावर घालवतात, जो त्यांच्या एकूण डिजिटल जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हे प्रमाण दरमहा ९० तास आणि दरवर्षी १,०९५ तास इतके होते. हा सतत वाढणारा स्क्रीन टाइम त्यांच्या मैत्रीच्या नात्यांनाही बदलत आहे.

भारतात वेगाने वाढणाऱ्या इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे तरुण पिढी पूर्वीपेक्षा अधिक जोडली गेली आहे, परंतु हे नाते सखोलतेपेक्षा ‘सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स’वर अधिक अवलंबून आहे. २०२४ मध्ये, भारतात ४६२ दशलक्ष सक्रिय सोशल मीडिया वापरकर्ते होते, म्हणजेच एकूण ४६० दशलक्षांपेक्षा थोडे अधिक. यापैकी बहुसंख्य १८-२४ वयोगटातील आहेत, म्हणजेच हीच ‘जनरेशन झेड’ (Gen Z) जी महाविद्यालयीन वयात आहे.

वास्तव विरुद्ध पडदा: मैत्रीचे एक नवीन स्वरूप

‘जनरेशन झेड’साठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मैत्रीचे एक प्रायोगिक मैदान बनले आहे, जिथे फॉलोअर्स, लाईक्स आणि व्ह्यूजवरून नात्याचे मूल्य ठरवले जाते. या पिढीचे दैनंदिन जीवन इतके ‘रील’ आणि ‘स्टोरी’ केंद्रित झाले आहे की, मित्र आता मित्रांपेक्षा केवळ संपर्क (कॉन्टॅक्ट्स) बनले आहेत—ज्यांना कधीही अनफॉलो किंवा ब्लॉक केले जाऊ शकते.

रील्सच्या वेगवान गतीने संभाषणांची गतीही बदलली आहे. एक किंवा दोन लांब, सखोल संभाषणांऐवजी, आता ५० छोटे चॅट थ्रेड्स असतात, जे बहुतेक करून मीम्स, ट्रेंड्स किंवा व्हायरल विषयांवर केंद्रित असतात.

स्क्रीनटाइम आणि एकटेपणा: सर्वांशी जोडलेले, तरीही सर्वात एकटे

भारतातील अनेक प्रमुख शहरांमधील तरुणांमध्ये एकटेपणा ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. तज्ञांच्या मते, सतत ऑनलाइन उपस्थित असूनही, दर्जेदार समोरासमोरचे संवाद अधिकाधिक दुर्मिळ होत चालले आहेत. मानसशास्त्रज्ञांना असे आढळले आहे की सोशल मीडियामुळे ‘FOMO’ (काहीतरी गमावण्याची भीती) आणि तुलना करण्याची भावना वाढते. जेव्हा Gen Z (जनरेशन झेड) आपल्या मित्रांचे निवडक आयुष्य पाहते, तेव्हा त्यांना न्यूनगंड वाटतो आणि ही असुरक्षितता त्यांना आणखी ऑनलाइन ढकलते, जिथे त्यांना केवळ प्रतिक्रिया मिळतात, खरा आधार नाही.

काही आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, जगभरातील सरासरी दैनंदिन स्क्रीन टाइम सुमारे ६.५ तासांपर्यंत पोहोचला आहे, तर ‘जनरेशन झेड’ (Gen Z) या सरासरीपेक्षा खूप पुढे आहे आणि अनेकदा ८-९ तास स्क्रीनवर घालवते. भारतीय संदर्भात, एका विश्लेषणानुसार शहरी ‘जनरेशन झेड’मधील लाखो तरुण दिवसातून ६-८ तास स्क्रीनसमोर घालवतात. जेव्हा दिवसाचा इतका मोठा भाग डिजिटल जगात जातो, तेव्हा कुटुंब, स्थानिक मित्र, परिसर, महाविद्यालये आणि कॅम्पसमधील कामाच्या संबंधांसाठी वेळच उरत नाही.

महाविद्यालये आणि शाळाही ‘स्क्रीन मोड’मध्ये

कोविडनंतर, भारताच्या शिक्षण प्रणालीनेही डिजिटल आणि मिश्रित शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणले आहे. अहवालानुसार, भारतातील ऑनलाइन शिक्षण बाजारपेठ वेगाने वाढत आहे आणि येत्या काही वर्षांत ती अब्जावधी डॉलर्सचा उद्योग बनण्याचा अंदाज आहे. विद्यापीठे यूजीसी-मान्यताप्राप्त ऑनलाइन पदव्या, दूरस्थ एमबीए आणि डिजिटल कौशल्य अभ्यासक्रमांना आक्रमकपणे प्रोत्साहन देत आहेत.

एका अंदाजानुसार, केवळ २०२३ पर्यंत, भारतातील ६० लाखांहून अधिक विद्यार्थी ऑनलाइन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतील, ज्यापैकी जवळपास निम्मे विद्यार्थी लहान शहरे आणि गावांमधून असतील. शालेय स्तरावरही, ऑफलाइन आणि ऑनलाइन यांचे मिश्रण असलेले ‘ब्लेंडेड लर्निंग’ हे भविष्याची प्रमुख दिशा मानली जात आहे. याचा परिणाम म्हणून, जो बराचसा वेळ पूर्वी कॅम्पसमध्ये, ग्रंथालये, वसतिगृहे, खेळाची मैदाने, चहाची दुकाने आणि कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत घालवला जायचा, तो आता स्क्रीनवर व्याख्याने, असाइनमेंट्स, क्विझ आणि रेकॉर्ड केलेले क्लासेस ऐकण्यात जातो, ज्यात अनेक ठिकाणी उपस्थित राहण्याचे कोणतेही बंधन नसते.

छोटे शब्द, छोटे शब्दप्रयोग

जनरेशन झेडची डिजिटल भाषा केवळ स्मायली आणि GIF पुरती मर्यादित नाही. ती एक संपूर्ण ‘शॉर्टकट संस्कृती’ बनली आहे. ASAP, LOL, BRB, TBH, IDK यांसारखे शेकडो संक्षिप्त शब्द रोजच्या चॅटिंगचा आधार बनले आहेत, ज्यामुळे विचार आणि भावना व्यक्त करण्याची भाषा मर्यादित होते. जेव्हा शब्दसंग्रह मर्यादित असतो, तेव्हा भावना व्यक्त करण्याची क्षमताही कमी होते. राग, प्रेम, द्वेष आणि दुःख या सर्व भावना एका इमोजीमध्ये किंवा दोन-तीन शब्दांच्या बोलीभाषेतील शब्दात सामावलेल्या आहेत. परिणामी, तरुण पिढीला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत, तसेच त्यांना भावना व्यक्त करणारे काहीही पाहायला किंवा वाचायला मिळत नाही.

संशोधनातून असेही दिसून आले आहे की, ‘जनरेशन झेड’चा (Gen Z) एक मोठा भाग आपला अर्ध्याहून अधिक स्क्रीन टाइम ‘रील्स’सारख्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या सामग्रीवर (user-generated content) घालवतो, जिथे भाषा जलद, मजेदार आणि तात्काळ असते, सखोल नसते. या सवयीचा प्रत्यक्ष संभाषणांवर (offline conversations) असा परिणाम होतो की, लांबलचक वाक्ये अस्वस्थ करणारी वाटू लागतात, शांतता असह्य होते आणि मैत्रीतील संयमाची जागा पटकन प्रतिक्रिया देण्याच्या प्रवृत्तीने घेतली जाते. जिथे मित्र बराच वेळ एकत्र बसून गप्पा मारायचे, तिथे आता दोन शब्द किंवा एक स्टिकरही मित्राला दूर पाठवण्यासाठी पुरेसे ठरते.

घटणारी विचारशक्ती

भारतातील एका अभ्यासानुसार, ९१ टक्के ‘जनरेशन झेड’ (Gen Z) सोशल मीडियावरून बातम्या वाचते. याचा अर्थ असा की, बातम्या, चर्चा आणि मुद्द्यांशी त्यांचा पहिला परिचय हा अशा अल्गोरिदमद्वारे ठरवला जातो, जे सहभाग वाढवण्यासाठी काम करतात. तरुणांची एक मोठी समस्या ही आहे की, ते अनेकदा विस्तृत मजकूर, पुस्तके किंवा सखोल लेख वाचणे टाळतात; ते सोशल मीडिया, छोट्या पोस्ट्स, प्रभावशाली व्यक्तींची मते किंवा मीम्सद्वारे आपली मते व्यक्त करतात.

जेव्हा मित्र गप्पा मारतात, तेव्हा त्यांच्या सध्याच्या टाइमलाइनवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर चर्चेसाठी त्यांची मते आधीच तयार असतात. विस्तृत पुस्तके आणि लेख अधिक सखोल माहिती देतात, तर दुसरीकडे ते आपली चर्चा थोडक्यात संपवण्याकडे झुकतात. परिणामी, चर्चा लवकरच ध्रुवीकरण पावते, ज्यात एकतर ते सहमत होतात किंवा पूर्णपणे असहमत होतात.

भावनांची जागा ट्रोलिंगने घेतली आहे

भारतातील ऑनलाइन ट्रोलिंग आता गुप्त राहिलेले नाही; ते संस्कृतीचा एक भाग बनले आहे; ट्रोलर्स आता गंभीर विषय न राहता, विनोदाचा विषय बनले आहेत. व्यंग, मीम्स आणि अपमानास्पद भाषेच्या या मिश्र प्रकाराचा परिणाम Gen Z च्या मैत्रीवरही झाला आहे, जिथे हलक्याफुलक्या गप्पा आणि चेष्टामस्करीची जागा ‘रोस्ट कल्चर’ आणि सडेतोड उत्तरांनी घेतली आहे.

अशा ऑनलाइन भाषेमुळे संवेदनशीलतेला फारसा वाव राहत नाही. ज्या मित्राला वैयक्तिक समस्या, मानसिक आरोग्य किंवा नातेसंबंधातील अडचणींवर चर्चा करायची असते, त्याला अनेकदा भीती वाटते की त्याच्या वेदनांची चेष्टा किंवा मीम बनवले जाईल, किंवा त्याच्या बोलण्याचे स्क्रीनशॉट ग्रुपवर फॉरवर्ड केले जातील. परिणामी, तरुण एकतर कमकुवत दिसू नये म्हणून स्वतःच ट्रोल बनतात किंवा गप्प राहतात. दोन्ही बाबतीत, मैत्रीतील भावनिक सुरक्षितता नाहीशी होते.

सिद्धांत नव्हे, टाइमलाइन

सोशल मीडियाच्या युगात, ‘काय ट्रेंडिंग आहे’ यावरून मित्रांचे संभाषण कशाबद्दल असेल हे ठरते. भारताची डिजिटल लोकसंख्या ८० कोटींहून अधिक आहे आणि लाखो Gen Z वापरकर्ते दररोज विविध प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. त्यांच्या टाइमलाइनवर होणारे वादविवाद त्यांच्या स्वतःच्या लहान वर्तुळात पुन्हा पुन्हा होतात.

जेव्हा राजकारण, लिंगभाव, समाज किंवा अर्थव्यवस्था यांसारख्या विषयांवरील सैद्धांतिक समज जवळजवळ नाहीशी होते आणि चर्चा केवळ एका वाक्यापुरती मर्यादित राहते, तेव्हा समस्या अधिकच गंभीर होते.

हे सर्व घटक कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘जनरेशन झेड’च्या मैत्रीवर परिणाम करत आहेत. ‘जनरेशन झेड’ एकमेकांशी विनोद करताना दिसते, जे त्यांच्या रील्समध्ये स्पष्टपणे दिसून येते, परंतु जेव्हा भावना व्यक्त करण्याची वेळ येते, तेव्हा ते स्वतःला व्यक्त करू शकत नाहीत किंवा एकमेकांच्या भावना समजू शकत नाहीत. ही परिस्थिती त्यांच्या मैत्रीला अधिक घट्ट होण्यापासून रोखते.

लॉस एंजेलिस एका नवीन जगात गेल्याचा अनुभव

* सोमा घोष

लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस हा एक चांगला पर्याय असू शकतो. आल्हाददायक हवामान, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि प्रवासासाठी विविध सुविधांमुळे हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ मानले जाते. येथे तुम्ही समुद्राच्या उंच लाटांसोबतच पर्वत चढण्याचा आनंद देखील घेऊ शकता. येथील सुंदर समद्रकिनारे, राष्ट्रीय उद्याने आणि मनोरंजन उद्याने यामुळे तुम्हाला एका पूर्णपणे नवीन जगात गेल्यासारखे वाटते.

लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात मोठे शहर आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. याला सामान्यत: एलए असे संबोधले जाते. त्याची लोकसंख्या अंदाजे ३.८ दशलक्ष आहे आणि ती ४६१.९ चौरस मैलांमध्ये पसरलेली आहे. येथे जगभरातील लोक राहातात आणि वेगवेगळ्या भाषा बोलतात.

लॉस एंजेलिस शहर हे लॉस एंजेलिस काउंटीचे प्रशासकीय मुख्यालयदेखील आहे, जे युनायटेड स्टेट्समधील सर्वात दाट लोकवस्ती आणि विविधतेने नटलेले काउंटी आहे. आज, लॉस एंजेलिस जगभरात संस्कृती, तंत्रज्ञान, मीडिया आणि व्यवसाय क्षेत्रात एक प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. येथे येणारे पर्यटक या ठिकाणाच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

जादूई अनुभव घ्या

लॉस एंजेलिस हे एक शहर आहे जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. येथे बघण्यासारखी अनेक रोमांचक ठिकाणे असल्याने प्रवासाचे नियोजन करणे आव्हानात्मक ठरते. तुम्ही पहिल्यांदाच भेट देणार असाल किंवा अनुभवी प्रवासी असाल, तरीही लॉस एंजेलिसमधील आकर्षणांच्या यादीत प्रत्येकासाठी काहीतरी नवीन आणि रोमांचक आहे, तुमच्या बॅगा भरून झाल्या असतील आणि हॉलिवूडच्या झगमगाट तसेच ग्लॅमरचा किंवा मालिबूच्या नितळ समुद्रकिनाऱ्यांचा शोध घेऊन झाला असेल तर आता तुम्ही अमेरिकेतील सर्वात चैतन्यशील आणि गतिमान शहरांपैकी एकाची जादू अनुभवा.

कॅलिफोर्नियातील हे सर्वात आवडते ठिकाण आहे. ते सर्व बाजूंनी पर्वत, दऱ्या आणि जंगलांनी वेढलेले आहे. पॅसिफिक महासागराव्यतिरिक्त त्याच्या जवळ एक वाळवंट देखील आहे. त्यामुळे तुम्ही येथे येऊन या दोन्ही ठिकाणी भेट देण्याचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्या सुट्टया संस्मरणीय बनवू शकता. याशिवाय, हॉलिवूडमुळे ते नेहमीच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. जगभरातील पर्यटक ते पाहाण्यासाठी वर्षभर येथे येतात.

येथील एक तृतीयांशपेक्षा जास्त लोक इतर ठिकाणांहून स्थलांतरित झाले आहेत. पण, येथील बहुतेक लोक लॅटिन अमेरिका, कोरिया, लिटल इथिओपिया, चायनाटाउन आणि टोकियो येथून स्थलांतरित झाले आहेत.

युनिव्हर्सल स्टुडिओ आणि हॉलिवूड साइन

जर तुम्ही कॅलिफोर्नियाला आलात आणि लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सल स्टुडिओला भेट दिली नाही तर तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखे वाटेल. खरं तर, हे येथील सर्वात जुन्या फिल्म स्टुडिओपैकी एक आहे. युनिव्हर्सल स्टुडिओ हा उत्तर लॉस एंजेलिसमधील सॅन फर्नांडो व्हॅलीमध्ये पसरलेला एक स्टुडिओ आहे, जो कुटुंबासाठी अनुकूल थीम पार्कसाठी देखील ओळखला जातो. चित्रपटप्रेमींसाठी हे एक आवडते ठिकाण आहे. त्यांना येथे भेट देऊन खूप मजा येते. ‘किंग काँग’पासून ‘वॉटरवर्ल्ड’पर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. येथे येऊन, पर्यटक चित्रपटांचे चित्रीकरण कसे केले जाते, हे देखील पाहू शकतात. या कॉम्प्लेक्समध्ये ‘युनिव्हर्सल सिटी वॉक’ शॉपिंग सेंटरदेखील आहे, जिथे पर्यटक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांचे तसेच चित्रपटांचे किंवा सेलिब्रिटींचे लाईव्ह परफॉर्मन्स पाहू शकतात. हॉलिवूड हे लॉस एंजेलिसमधील सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक मानले जाते आणि ते पाहाण्यासाठी लोक दूरदूरून येतात. येथे वर्षभर पर्यटकांचा ओघ सुरू असतो.

१९२० च्या दशकात मूकपटांच्या उदयापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मनोरंजनाचे केंद्र राहिले आहे. टिन्सेलटाउनमध्ये त्या काळातील अनेक टेलिव्हिजन स्टुडिओ आहेत आणि हॉलिवूडमध्ये येणारे पर्यटक टीव्ही शो पाहण्यासाठी त्यांचे तिकीट देखील बुक करू शकतात. इतकेच नाही तर ऐतिहासिक चायनीज थिएटरमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटवर हॉलिवूड स्टार्सच्या हाताचे आणि पायाचे मोठे ठसे छापलेले आहेत, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.

सांता मोनिका पियर

सांता मोनिका पियर हे अवश्य भेट द्यायलाच हवे असे लॉस एंजेलिसमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. हे क्षेत्र १९०९पासूनचे आहे आणि तेव्हापासून ते एक लोकप्रिय आणि आकर्षक ठिकाण आहे. येथे पर्यटकांना निळ्या प्रशांत महासागराचे आणि सुंदर कॅलिफोर्निया किनारपट्टीचे चित्तथरारक दृश्ये पाहाता येतात. येथील सूर्यास्त पाहाण्यासारखा आहे. या रोमँटिक वातावरणात रात्रीचे जेवण किंवा फिरायला जाणे खूप छान वाटते.

सांता मोनिका हे टेलिव्हिजन शो बेवॉचच्या चित्रीकरणासाठी देखील ओळखले जाते. दक्षिण कॅलिफोर्नियाला भेट देणाऱ्या पर्यटकांना पाहायच्या असलेल्या सर्व गोष्टी येथे आहेत. समुद्राच्या लाटांचा आनंद आणि समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे ही देखील येथे एक वेगळीच मजा आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ एप्रिल ते जून किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर असतो, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि गर्दी कमी असते.

बेव्हरली हिल्स

बेव्हरली हिल्स हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि जगातील सर्वात श्रीमंत ठिकाणांपैकी एक आहे आणि ते त्याच्या भव्य वाड्या आणि ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखले जाते. जगातील काही प्रसिद्ध फॅशन बँडच्या दुकानांचा शोध घेण्यासाठी पर्यटक रोडिओ ड्राइव्हवरून फिरू शकतात. येथे बांधलेली सर्व श्रीमंत लोकांची घरे त्यांची स्वत:ची अनोखी शैली आणि ऐश्वर्य दर्शवतात. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचेही बेव्हरली हिल्समध्ये एक घर आहे.

याशिवाय, पर्यटक बेव्हरली हिल्स फार्म्स मार्केटचा आनंद घेऊ शकतात, जे स्थानिकरित्या बनवलेल्या उत्पादनांसाठी आणि कारागीर उत्पादनांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

मालिबू

लॉस एंजेलिसच्या उत्तरेस वसलेले मालिबू हे एक किनारी शहर आहे जे त्याच्या नितळ समुद्र्रकिनाऱ्यांसाठी आणि मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक समुद्रकिनाऱ्याजवळून जाणाऱ्या पॅसिफिक कोस्ट हायवेवरून गाडी चालवू शकतात आणि समुद्रकिनाऱ्यांच्या खडकाळ किनारपट्टीचे नेत्रदीपक दृश्य पाहू शकतात. या शहरात अनेक समुद्रकिनारे आहेत ज्यात सर्फरमध्ये लोकप्रिय असलेला सफारी बीच आणि पांढऱ्या वाळूसाठी ओळखला जाणारा झामा बीच यांचा समावेश आहे. येथे भेट देण्यासाठी कुठलाही काळ नेहमीच चांगला असतो, परंतु वसंत ऋतू आणि शरद ऋतूमध्ये गर्दी कमी असते.

डिस्नेलँड

डिस्नेलँड रिसॉर्ट हे लॉस एंजेलिसमधील जादुई राईड्स, रंगीबेरंगी पात्रे आणि कुटुंबासाठी अनुकूल वातावरण यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. मुलांसह लॉस एंजेलिसला प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे मनोरंजन पार्क अवश्य भेट द्यावे, असेच आहे. येथे सर्व वयोगटातील लोकांसाठी काहीतरी आहे. जर तुम्ही डिस्नेलँडचे चाहते असाल तर डिस्नेलँड रिसॉर्ट लॉस एंजेलिसला नक्की भेट द्या, जिथे दररोज रात्री ९.३० वाजता फटाक्यांची आतषबाजी होते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ जानेवारी ते एप्रिल आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर आहे.

कोरोना डेलमार बीच

कोरोना डेलमार बीच हा एक अतिशय सुंदर पॅसिफिक महासागरातील समुद्रकिनारा आहे. येथील पांढऱ्या वाळूमुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पर्यटक येथे आराम करण्यासाठी येतात. येथे येणारे लोक संपूर्ण दिवस या समुद्र किनाऱ्यांवर अंघोळ करण्यात, स्कूबा डायव्हिंग करण्यात आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यात घालवतात. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ जून ते सप्टेंबर आहे.

पाम स्प्रिंग्ज

लॉस एंजेलिसच्या दक्षिणेस असलेले पाम स्प्रिंग्ज ही एक अतिशय सुंदर दरी आहे. कॅलिफोर्नियातील रिव्हरसाइड काउंटीच्या कोलोरॅडो वाळवंटातून येणारे हे ठिकाण पाहाण्यासारखे आहे. १०,८३४ फूट उंचीवर असलेल्या माउंट सॅन जॅसिंटो येथे असलेल्या कोचेला व्हॅलीमध्ये सुमारे ५० हजार लोक राहातात.

या दरीत मोठ्या पाइन आणि देवदार वृक्षांच्यामध्ये अनेक ट्रेकिंग मार्ग आहेत, जे अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहेत. ट्रेकिंग उत्साही याचा आनंद घेऊ शकतात. उन्हाळ्यात येथील तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस असते तर हिवाळ्यात, येथील तापमान शून्यापेक्षा काही अंशांनी कमी असते, त्यामुळेच येथे भरपूर बर्फवृष्टी होते, ज्याचा पर्यटक आनंद घेतात.

थक्क करणारी बँडेड घड्याळं

* प्रियंका यादव

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगातील शाही लग्नांपैकी एक आहे. या शाही लग्नात वराच्या म्हणजे अनंतच्या खास मित्रांना भेट म्हणून घड्याळं देण्यात आली. या मित्रांच्या यादीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, रणवीर सिंह आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचा समावेश होता. भेट म्हणून दिलेल्या या घड्याळाची किंमत रू. २ कोटी आहे.

वैशिष्ट्य

हे ९.५ मिमी जाडीचे मोठे घड्याळ आहे आणि त्यात ४१ मिमी १८ कॅरेट गुलाबी सोन्याची वीण, नीलमणी क्रिस्टल बँक आणि स्क्रू लॉक क्राउन आहे. ऑडेमार्स पिगेट बँडसह या घड्याळाचा एकूण व्यास २९ मिमी आहे. याशिवाय, त्याचा गुलाबी सोन्याचा टोन डायल ग्रांडे टॅपिसेरी पॅटर्नचा आहे. या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात एक कॅलेंडर आहे जे आठवडा, दिवस, तारीख, खगोलीय चंद्र, महिना, लीप वर्ष, तास आणि मिनिटे दर्शवते. याशिवाय, या घड्याळात ४० तासांचा पॉवर रिझर्व्ह आहे. याशिवाय, या घड्याळात एक एपी फोल्डिंग बक्कलदेखील आहे. याशिवाय यात निळा अॅलिगेटर स्ट्रॅपदेखील आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे घड्याळ खास बनते.

हे झाले अनंत अंबानीच्या लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेल्या घड्याळाबद्दल, पण तुम्हाला माहिती आहे का, की या जगात याहूनही महागडी लक्झरी घड्याळे आहेत जी कोणालाही आवडतील. ती कोणती? त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ती इतकी महाग का आहेत, चला जाणून घेऊया :

हॅलुसीनेशन घड्याळ

जगातील सर्वात महागडे घड्याळ बनवण्याचा मान ग्राफ डायमंड्सना जातो. त्यांनी ५.५ कोटी डॉलर्स (अंदाजे ४५५ अब्ज भारतीय रुपये) किमतीचे हॅलुसीनेशन घड्याळ बनवले, जे २०१४ मध्ये बाजारात आणण्यात आले. या घड्याळात विविध रंगांचे आणि कटचे ११० कॅरेट हिरे आहेत. ते प्लॅटिनम ब्रेसलेटवर सजवलेले आहेत.

फॅसिनेशन घड्याळ

ग्राफ डायमंड्स कंपनीचे फॅसिनेशन घड्याळ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची किंमत ४ कोटी डॉलर्स आहे म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे ३ अब्ज २८ कोटी रुपये आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात १५२.९६ कॅरेटचे पांढरे हिरे जडवलेले आहेत. हे घड्याळ २०१५ मध्ये बाजारात आले होते.

पाटेक फिलिप ग्रँडमास्टर

पाटेक फिलिप ग्रँडमास्टर चाइम घड्याळ हे जगातील लक्झरी घड्याळांच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची किंमत ३.१ कोटी डॉलर्स म्हणजेच २ अब्ज ५४ कोटी २० लाख रुपये आहे.

या घड्याळाच्या समोर आणि मागे दोन्ही बाजूंना डायल आहेत. या कंपनीने विकलेले हे सर्वात महागडे घड्याळ आहे. ते २०१९ मध्ये बनवण्यात आले होते.

ब्रेगेट ग्रांडे कॉम्प्लिकेशन मेरी अँटोइनेट

जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात महागडे घड्याळ ब्रेगेट ग्रांडे कॉम्प्लिकेशन मेरी अँटोइनेट आहे. त्याची किंमत ३० दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे २२ अब्ज आहे.

हे एक प्राचीन घड्याळ आहे. ते बनवण्यासाठी सुमारे ४० वर्षे लागली. ते १८२७ मध्ये बनवले गेले होते आणि १९०० मध्ये चोरीलाही गेले. पण, नंतर ते सापडले आणि आता ते संग्रहालयात सुरक्षित आहे.

जॅगर लेकोल्ट्रे जोएलरी १०१ मॅनचेटे

जॅगर लेकोल्ट्रे जोएलरी १०१ मॅनचेट हे जगातील पाचवे सर्वात महागडे घड्याळ आहे. त्याची बाजारभाव किंमत २.६ कोटी डॉलर्स आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २२ अब्ज ६५ कोटी रुपये आहे. हे घड्याळ २०१२ मध्ये खास करून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयसाठी बनवण्यात आले होते.

सहाव्या क्रमांकाचे सर्वात महागडे घड्याळ म्हणजे पाटेक फिलिपचे हेन्री ग्रेव्हज सुपरकॉम्प्लीकेशन्स. त्याची किंमत २.६ कोटी डॉलर्स आहे. भारतीय चलनात त्याची किंमत २ अब्ज ६५ कोटी रुपये आहे. हे घड्याळ १९३३ मध्ये बनवण्यात आले होते. ते बनवण्यासाठी सुमारे ७ वर्षांचा प्रदीर्घ वेळ लागला.

चोपार्ड २०१ कॅरेट

या घड्याळांनंतर, आता जगातील जे ७ वे सर्वात महागडे घड्याळ येते, त्या घड्याळाचे नाव चोपार्ड २०१ कॅरेट आहे. त्याची किंमत २.५ कोटी डॉलर्स आहे, जी भारतीय रुपयांमध्ये २ अब्ज ५० कोटी रुपये आहे. या घड्याळाच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यात ८४७ हिरे जडवलेले आहेत, जे एकूण २०१ कॅरेटपासून बनलेले आहेत. हे घड्याळ २००० मध्ये जगासमोर आणण्यात आले.

पॉल न्यूमन डेटोना घड्याळ

या यादीत आठव्या स्थानावर रोलेक्स कंपनीचे पॉल न्यूमन डेटोना घड्याळ आहे. बाजारात या घड्याळाची किंमत १.८७ कोटी डॉलर्स आहे. या किंमतीची बोलीमध्ये बोली लावण्यात आली होती. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत ८७ कोटी रुपये आहे. ते १९६८ मध्ये बनवण्यात आले होते.

एकीकडे लोक झपाट्याने लक्झरी लाइफस्टाइलकडे वाटचाल करत असताना, ही घड्याळे त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवत आहेत. जर तुम्हालाही यापैकी एखादे लक्झरी घड्याळ आवडले असेल, तर तुम्ही ते खरेदी करून सर्वांना थक्क करणारी स्टाईल दाखवू शकता.

अशी करा किचनची देखभाल

* भावना ठाकूर ‘भावू’

स्वच्छ आणि आधुनिक उपकरणांनी सजलेलं घर सर्वांनाच आवडतं. जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जातो तेव्हा सर्वप्रथम लक्ष घराच्या स्वच्छतेकडे जातं. जे घर छानपैकी सजलेलं असतं त्या घरामध्ये दोन तास आणखीन घालवावेसे वाटतात. असंच जेव्हा आपल्याला कोणी जेवायला बोलावतं, तेव्हा त्यांच्या घरातील स्वयंपाक बनवण्याची पद्धत आणि स्वच्छतेकडे आपल्या बायकांचं लक्ष जातच जातं.

धान्य स्टोअर करणारे कंटेनर, जेवण बनवणारी भांडी, गॅसस्टोवपासून डिनर सेट, हात पुसण्याचे नॅपकिन आणि किचन टॉवेल या सर्व गोष्टीं लक्ष आकर्षित करतात अशावेळी इकडेतिकडे पडलेलं सामान, स्टोर रूम जसं की फ्रिज, मळके नॅपकिन्स खासकरून जळलेल्या तेलाने भिजलेली भांडी आणि कढई पाहुण्यांच्या मनामध्ये अरुची निर्माण करते.

किचन आणि भांड्यांची स्वच्छता थेट आपल्या आरोग्याला प्रभावित करण्याचं काम करते. म्हणून याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे, कारण चमकसोबतच हायजीनदेखील कायम ठेवणे गरजेचे आहे.

किचन घराचा एक असा कोपरा आहे जो स्वच्छ आणि चमचमता राहिला, तर काम करण्यात वेगळीच मजा येते. स्वयंपाकघरात भांड्यांचं देखील तेवढंच महत्त्व आहे, जेवढं की हेल्दी खाण्याचं. जेवण कितीही मनापासून बनवलं तरी ते जर स्वच्छ चमचमत्या भांड्यांमध्ये ठेवलं नाही तर त्याची चव फिक्की पडते. म्हणून जुन्या भांड्यांची चमक कायम राखणं गरजेचं आहे. भांड्यांवर लागलेलं तेल आणि मसाल्यांचा पिवळेपणा गृहिणीचा आळशीपणा दर्शवितो. म्हणूनच हुशारीने किचनचा कानकोपरा स्वच्छ ठेवल्याने पाहुण्यांसमोर तुमची एक वेगळी छाप पडते.

असं ठेवा हायजीन

कढई, कळशी, स्पॅचुला, चमचासारख्या वस्तू दररोज काही दिवसानंतर गरम पाण्यात डिटर्जंट, लिंबू, मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून थोडा वेळ बुडवून ठेवल्यानंतर ब्रशने व्यवस्थित धुवायला हवीत, कारण जेवण बनवतेवेळी कितीही स्वच्छ केलं तरी छोट्याछोट्या कोपऱ्यांमध्ये तेल चिकटून राहतचं, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचे चान्सेस असतात. सोबतच करपलेली हंडी, पातेली आणि कढई दिसायला देखील वाईट दिसतात. जर नॉनस्टिक भांड्याचा वापर करत असाल तर धुतेवेळी प्रॉडक्टसोबत असलेल्या स्पॅचुलाचाही वापर करा आणि त्यासोबत दिलेल्या ब्रशने स्वच्छता करा, अन्यथा त्वरित नॉनस्टिकचा थर निघू लागतो आणि भांडं वाया जातं.

कोटिंग निघालेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवणं नुकसानदायक असतं. कोटींग निघालेल्या भांड्यांमध्ये अन्न कधीच शिजवू नका, कावीलता लागल्यामुळे हलकं हलकं कोटिंग निघून ते जेवणात मिसळतं.

दुसरं किसनीचा वापर केल्यानंतर काही लोक असंच पाण्याने धुऊन ठेवतात, ज्यामुळे अनेकदा त्यामध्ये गोष्टी अडकून राहतात आणि सुकल्यानंतर ते काढणं अधिक कठीण होऊन बसतं. अशावेळी टूथब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. धुतलेली भांडी स्टॅन्डमध्ये ठेवल्यामुळे त्यातून विचित्र दुर्गंधी येते आणि भांडी ठेवण्याच्या स्टॅन्डला जंग लागतं. म्हणून भांडी स्टॅन्डमध्ये स्वच्छ कपड्याने पुसून सुकवूनच त्यामध्ये भांडी ठेवा.

किचनमध्ये चिमणी लावा

अनेकदा काही घरांमध्ये एक विचित्र दुर्गंधी येत असते, जी किचनचीच देणगी असते. जेवण बनवल्यानंतर गृहिणी इतकी थकते की किचन स्वच्छ करावंचं वाटत नाही. म्हणून काही गृहिणी हातात येईल तो पोछा बनवून ओटा पुसतात, ज्यामुळे ओटा डागाळलेला, चिकट आणि चिपचिपित राहतं, ज्याची दुर्गंधी पूर्ण घराच्या वातावरणाला पर्टिक्युलर दुर्गंधीत बदलतते.

चिमणी स्वयंपाकघराला गरम, धूर आणि फोडणीच्या दुर्गंधीला बाहेर सोडते, ज्यामुळे स्वयंपाकघराची कोणत्याही प्रकारची चांगली, वाईट दुर्गंधी वा दुर्गंधी पूर्ण घराचं वातावरण खराब करत नाही. सोबतच सिंक, ओवन आणि काउंटर टॉप स्वयंपाकघराच्या सर्व भागांची स्वच्छता देखील गरजेची आहे. किचन काउंटर्स आणि फरशीवर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवले जातात आणि नेहमी तरल पदार्थ पडत असतात. कापलेल्या भाज्यांचे तुकडे, पडलेलं कणीक, दूध, काऊंटरवर पडलेले मसाले आणि मीठ, पाणी व तेलाचे थेंब यातून तरल पदार्थ निघणं सर्वसामान्य बाब आहे. परंतु यांना सुकणं आणि सडण्यासाठी सोडणं चुकीची सवय आहे. किचनमध्ये पडलेले सर्व तरल पदार्थ सुखणे आणि माशांना आकर्षित करण्यापूर्वी ते स्वच्छ करायला हवेत.

सर्वात महत्त्वाची स्वच्छता मिक्सर जारची असते, कारण ब्लेडच्या खालच्या भागांमध्ये खाद्यपदार्थ चिकटून राहतात आणि जिथे बोटं पोहोचत नाहीत ना ही ब्रश, म्हणून गरम पाण्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकून जारमध्ये भरून ठेवायला हवं. नंतर तासाभरानंतर जार बंद करून जोरात हलवा. कोपऱ्यातील सर्व घाण बाहेर पडेल.

जेवढी जागा तेवढीच सुविधा

अनहायजीनिक किचन, चिकट उपकरणे आणि घाणेरडी भांडी आजाराचं कारण बनू शकते. मसाल्यांचे डबे, काचेचे कप, प्लेट, बाउल, ग्लास, किचनमध्ये असलेल्या टाइल्स, मायक्रोवेव्ह आणि मिक्सर, ब्लेंडर इत्यादी वस्तूंची स्वच्छतादेखील तेवढीच गरजेची आहे. जेवढी डिनर सेट आणि इतर वस्तूंची. किचनमध्ये अनेकदा लोकं नको असलेल्या वस्तू भरून ठेवतात. यामुळे देखील किचन भरलेलं आणि घाणेरड दिसून येतं. बेकारचं सामान बाहेर फेका. किचनमध्ये जेवढी जागा आहे तेवढीच काम करण्यात सुविधा राहील.

काचेच्या भांड्यांबद्दल सांगायचं झाल्यास त्यांना नेहमी सावधपणे मॅनेज करायला हवं. थोड्या काळानंतर केलेली भांड्यांची देखभाल त्यांच आयुष्य वाढवते आणि स्वच्छ आणि चमकदार ग्लासांमध्ये सर्व्ह केलेलं ड्रिंक पिणाऱ्यांना देखील ताजतवाने बनवते. जे ग्लास व्यवस्थित धुतले वा सुकवले जात नाहीत, त्यामध्ये नेहमी दुर्गंधी राहते. जी तुम्ही मेहनतीने बनवलेल्या कोल्ड्रिंक्सवरदेखील परिणाम करते.

याव्यतिरिक्त दूध आणि पाण्याच्या डागाची काचेची भांडी स्वत:ची चमक हरवून बसतात, जी पाहुण्यांना देतेवेळी खूपच वाईट दिसतात. ग्लास धुतल्यानंतर उलट करून सुकवायला ठेवा. सुकल्यानंतर पाण्याचे डाग काढण्यासाठी मुलायम, कोरड्या कपड्यांचा वापर करा. यामुळे काचेच्या भांड्यांमध्ये चमक कायम राहील.

तांबा आणि पितळेची भांडी तसंही जुन्या काळातील आहेत, परंतु काही लोक छंद आणि फॅशन म्हणून स्वयंपाकघरात या भांड्यांना ठेवतात. त्यामुळे त्यांना देखील वेळोवेळी चमकवत रहा. पितांबरी पावडरने हे काम केलं जाऊ शकतं.

नेहमी कामी येते डिस्टंट कजिन्सशी मैत्री

* रेणू गुप्ता

‘‘अरे यार सायमी, आज शुक्रवार आहे. संध्याकाळी मूवी पाहायला जाऊया का? आज प्रिन्सिपल मॅडमनी ओरडल्यामुळे माझा मूड खूपच खराब झाला आहे. थोडसं चील करावसं वाटतंय. तिकीट बुक करू का?’’ कियाराने तिची फ्रेंड सायमीला विचारलं.

‘‘नाही यार. आज संध्याकाळी मला मूवीला अजिबात येता येणार नाही. संध्याकाळी माझ्या कजिंससोबत सिनेमा पहायला त्यांच्यासोबत जाणार आहे.’’

‘‘तुझे कजिंस तुझ्याशी एवढे क्लोज आहेत की तू एक पूर्ण संध्याकाळ त्यांच्यासोबत घालवणार? तू जरा विचित्रच आहेस. मौजमजेसाठी आउटिंगला फ्रेंड्ससोबत जायचं असतं; कुटुंबासोबत नाही.’’

‘‘अगं, माझे हे डिस्टंट कजिंस माझे फ्रेंड्सच आहेत. माझे कजिन माझ्या आयुष्यातील सर्वात फ्रेंडली आणि स्ट्राँग सपोर्ट सिस्टम आहे. त्यांच्यामुळेच मी आज या अनोळखी शहरात एकटं राहत आयुष्याच्या प्रत्येक चढ उताराला सहजपणे फेस करत आहे. तू इमॅजिन करू शकत नाहीस की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते मला किती सोबत देतात. तू तर आताच या शाळेत नवीन आली आहेस. कोणी असं नाही आहे की ज्याच्याशी मनातील गोष्टी शेअर करून मन मोकळं करेन. आम्ही तीन डिस्टन्ट कजिंस आहोत. लहानपणापासून एकत्र वाढलोत तिघे याच शहरांमध्ये आहेत. मला नव्या शहरात एकटं येण्याची परमिशन मिळाली तीदेखील या माझ्या कजिन्समुळेच.’’

निर्भरता खटकू लागली

‘‘माझं कुटुंब खूपच रुढीवादी आणि परंपरावादी आहे. आम्ही जयपूरच्या खैरथल नावाच्या एका भागामध्ये एकत्रित कुटुंबात राहतो. आमच्या घरातील सर्वात मोठे माझे काका आहेत. बाबांचा बिझनेस काही खास चालत नाही. त्यातून फक्त आम्हा पाच सदस्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठया मुश्किलीने चालतो. मोठ्या खर्चासाठी आम्हाला मोठ्या काकांचं तोंड पाहावं लागतं.

‘‘जेव्हापासून आम्ही भाऊ-बहीण मोठे झालो, प्रत्येक गोष्टीवरती काकांवर अवलंबून राहणं आम्हाला खटकू लागलं. माझे काही डिस्टन्स कजिन्स आमच्या इथून निघून इथेच जयपूरमध्ये जॉब करत आहेत. तिथे नव्या शहरात येण्याची परमिशन मला त्यांच्यामुळेच मिळाली. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर माझ्यासाठी नव्या आणि या अनोळखी जयपूरमध्ये नोकरी करण्याची इच्छा या तिघांमुळेच पूर्ण झाली.’’

‘‘अच्छा. अस आहे तर.’’

‘‘होय. चल आज मी तुला माझ्या डिस्टन्स कजिंससोबतच्या मैत्रीचे फायदे सांगते.’’

तर चला वाचकांनो, सायमीने तिची मैत्रीण कियाराला डिस्टन्स कजिंससोबत मैत्रीच्या जे जे फायदे सांगितले ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

तणाव होत नाही

प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव येतोच. कधी मोठ्या प्रकरणात, तर कधी दैनंदिन जीवनात साधारणशा गोष्टी वरती, परंतु हे केव्हा गंभीर रूप धारण करेल सांगितलं जाऊ शकत नाही.

तणावामुळे तुम्ही ऐग्जायटी, डिप्रेशन अथवा चिडचिड होऊ शकते. सतत तणावात राहण्यामुळे तुम्हाला अनेक हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते, तुम्हाला अनिद्रा, वाचन संबंधित तक्रारी, हृदयरोग, डायबिटिज व हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात, परंतु जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या रूपात तुमच्या कजिन्सशी चांगली सपोर्ट सिस्टम असेल तर तुमची ते केअर करतात आणि तुम्हाला मदत करू इच्छितात, तेव्हा अशा परिस्थितीत तणाव तुमचं काहीच बिघडू शकत नाही.

योग्य सल्ला

तुम्ही तुमच्या डिस्टन्स कजिन्सशी एका मित्राच्या रूपात बाहेरच्या लोकांपेक्षा अधिक सहजतेने खुलू शकता. कारण की तुम्ही लहानपणापासून त्यांना बघत आला आहात. त्यांच्यासोबत इंटरेक्शन करत आला आहात, ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत न संकोचता तुमच्या प्रत्येक प्रकारच्या अडचणीं सांगू शकता आणि ते तेवढ्याच सहजतेने तुम्हाला सल्ला देऊ शकतात.

भावनात्मक सपोर्ट

कोणत्याही प्रकारच्या आपलेपणाने भरलेले संबंध आपल्याला भावनात्मक शक्ती देतात. समस्या असेल तर कोणतीही समस्या ते ऐकतात. आपल्या फिलिंग्सना वॅलीडेट करतात. आपल्यासोबत चांगलं वागतात व आपल्याला मदत करतात, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. कारण ती मदत आपलं लक्ष, आपलं दु:ख, उदासीपणा वा खराब मूड वाटून घेतात.

व्यक्तिगत विकास

जर तुम्ही तुमच्या डिस्टन्स कजीन्सचं व्यक्तिमत्व पॉझिटिव्ह असेल तर ते तुम्हाला त्यांच्यासारखं बनवण्यात मदत करतात. तुमच्यासमोर त्यांच्या पॉझिटिव्ह वागण्याचं उदाहरण ठेवत तुम्हाला चांगल्या सवयी जसं की नियमितरीत्या व्यायाम करणं, जिमला जाणं, स्मोकिंग व ड्रिंकिंग सोडणं, चांगली लाइफस्टाईल अथवा एखाद्या हॉबीसाठी प्रेरित करू शकतात.

चांगल्या फ्रेंड्ससारखं तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी कायम प्रेरित करू शकतात. त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करण्यात यशस्वी होतात. विश्वासनीय मित्रांसारखं तुम्हाला पॉझिटिव्हिटीचा संकल्प मेंटेन करण्यात तुम्हाला मदत करू शकतात.

आपलेपणाचा भाव

कोणाशीही जवळची मैत्री तुमच्यामध्ये आपलेपणाची भावना प्रेरित करण्यास मदतनीस होते. याची गरज माणसाचं अन्न, आवास आणि सुरक्षेच्या मूलभूत आवश्यकानंतर येतं. डिस्टन्स कजिन्सच्या रूपात एक सपोर्ट नेटवर्क तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुरक्षेची जाणीव देतं.

आव्हानांचा सामना करण्यास मदतनीस

आयुष्यात पावलोपावली कठीण प्रसंग येतात. वाढत्या जीवनात ब्रेकअप अथवा डिवोर्स एखाद्या प्रियजनाचा मृत्यू, एखादा आजार, बेरोजगारी, कौटुंबिक समस्या इत्यादींचं आव्हान आहे. ज्याचा सामना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी करावा लागतो. या स्थितीमध्ये डिस्टन्स कजिन्स तुम्हाला या गोष्टींचा सामना करण्यास मदत करतात. यामुळे तुम्ही आनंदाने काम करता.

चांगली कंपनी

तुम्ही तुमच्या डिस्टन्स कजिन्सना सामाजिक, कौटुंबिक उत्सव, आयोजन आणि सणावारी लहानपणापासून भेटत असता, ज्यामुळे बाहेरचे मित्र, परिचितांपेक्षा तुमचं त्यांच्याशी इंटरॅक्शन अधिक होतं आणि प्रत्येक क्षणी तुम्ही त्यांची कंपनी एन्जॉय करू शकता. डिस्टन्स कजिन्सशी जवळच्या मैत्रीमुळे तुम्ही शॉपिंग, मूवी, पिकनिकसारख्या आउटिंगसाठी खास मित्र मिळतात, ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता आणि आनंद मिळवू शकता.

एकटेपणा दूर करण्यास मदतनीस

आजची आधुनिक जीवनशैली आणि आभासी मित्रांच्या प्रभावामुळे लोकं एकटेपणा आणि सामाजिक आयसोलेशनमध्ये वाढ होत आहे. डिस्टन्स कजिन्समुळे यापासून तुमचा बचाव होतो.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर तुम्ही आणि तुमच्या कजिन्सच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद, मतभेद वा वैमानस्य असेल तर त्यांच्याशी मैत्रीचा हात न वाढवणंच योग्य आहे.

डिस्टन्स कजिन्स तुमच्या खास मित्राच्या रूपात आयुष्यातील आव्हानांच्यावेळी तुमच्यासाठी धावत येवू शकतात, तुमच्यासाठी फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईडची भूमिका साकारू शकतात. इथे हे उल्लेखनिय आहे की वैज्ञानिकांनी डीएनए टेस्टद्वारा अनुमान लावले आहे की जेव्हा आपण नवीन मित्र निवडतो, तेव्हा कदाचित अनाहूतपणे डिस्टन्स नातेवाईकांच्या कंपनीचीच निवड करतो. ‘सेनडिएगो इनव्हर्सिटी ऑफ कॉलिफॉर्निया’चे मेडिकल जेनेटिक्सचे प्रोफेसर जेम्स फालोअर सांगतात की एक अनएक्सप्लेन्ड मेकॅनिझिम तुमच्या मित्रांची निवड करतेवेळी त्यांचे आणि आपले डीएनएच्या समानतेच्या आधारावर त्यांना निवडण्यास आपल्याला मदत करतात.

यावरून हा निष्कर्ष निघतो की आपले आणि आपल्या मित्रांचे डीएनए खूप साम्य दाखवतात.

या निष्कर्षाच्या आधारावर म्हटलं जाऊ शकतं की डिस्टन्ट कजिन्ससोबत मैत्रीचं नातं सहजपणे बनवलं जातं आणि साकारलंदेखील जातं तसंच त्यांच्यासोबत मैत्री नक्कीच मोठ्या कामाची सिद्ध होऊ शकते.

प्रवासात स्वच्छतागृहाच्या शिष्टाचाराकडे लक्ष द्या

* प्रतिभा अग्निहोत्री

प्रवासातील स्वच्छता : आपल्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्याबरोबरच, आपण सर्वजण प्रवासाचे नियोजन करू लागतो. आजकाल पालक वर्षभर सतत सहलींचे नियोजन करत असतात. आपण ट्रेन, बस, वाहन किंवा विमानाने प्रवास करत असलो तरी, आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी नेहमी स्वच्छतागृहाचा वापर करतो. प्रवासानंतर, आपण हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे किंवा नातेवाईकांच्या घरी राहिलो तरी, स्वच्छतागृहाचा वापर नेहमीच होतो. अनेकदा, आपण केवळ सोयीसाठी स्वच्छतागृहाचा वापर करतो आणि ते वापरताना इतर कशाकडेही लक्ष देण्याची गरज वाटत नाही. तथापि, स्वच्छतागृह कुठेही असले तरी, केवळ मुलांसाठीच नव्हे, तर प्रौढांनीही काही विशिष्ट स्वच्छतागृह शिष्टाचार पाळणे महत्त्वाचे आहे.

1. वापरानंतर स्वच्छतागृह फ्लश करा, जेणेकरून तुमच्यानंतर येणाऱ्या कोणालाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही.

२. प्रवास करताना, सॅनिटरी पॅड्स किंवा बाळाचे डायपर फेकून देण्याऐवजी कचरापेटीत टाका. बाथरूममध्ये कचरापेटी नसल्यास, ते कागदात गुंडाळा, प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा आणि अशा निर्जन ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा जिथे कुत्रे आणि इतर प्राणी ते उकरू शकणार नाहीत.

३. हॉटेलच्या बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर, फरशी, घाणेरडे पाय किंवा मुलांची शौचकुंडी पुसण्यासाठी दिलेले टॉवेल वापरू नका.

४. बाथरूममध्ये बाहेरची घाण येऊ नये म्हणून वेगळ्या चपला वापरा.

५. वेस्टर्न टॉयलेट सीट वापरताना, वापरण्यापूर्वी प्रथम सीट रिंग आणि कव्हर काढून टाका.

६. नातेवाईकांचे बाथरूम वापरल्यानंतर, बाथरूम कोरडे करण्यासाठी वायपर फिरवा.

७. टॉयलेट वापरल्यानंतर, टॉयलेट पेपर रोलने सीट रिंग पूर्णपणे पुसून घ्या, जेणेकरून तुमच्यानंतर येणारी व्यक्ती आरामात स्वच्छतागृह वापरू शकेल.

८. शॅम्पूचे सॅशे, केसांचे गठ्ठे, टूथपेस्ट आणि टूथब्रशचे रिकामे डबे व वेष्टने बाथरूममध्ये इकडेतिकडे फेकण्याऐवजी, कचरापेटीत टाका.

९. बाथटब वापरत असल्यास, वापरानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि घाणेरड्या पायांनी त्यात उतरणे टाळा.

१०. समुद्रकिनाऱ्यावरून आल्यानंतर तुमचे पाय अनेकदा वाळूने माखलेले असतात. थेट बाथरूममध्ये जाण्याऐवजी, आधी शॉवरने वाळू स्वच्छ करा आणि मग स्वच्छतागृहाचा वापर करा.

११. स्वच्छतागृहात बराच वेळ फोनवर बोलण्याऐवजी, वापरानंतर लगेच बाहेर या, जेणेकरून इतरांनाही स्वच्छतागृह वापरता येईल.

१२. शौचालय वापरताना, महिलांनी सीटवर आरामात बसण्याची खात्री करावी आणि पुरुषांनी सीटपासून जास्त दूर उभे राहू नये.

पूल पार्टीच्या ७ टीप्स

* प्रतिभा अग्निहोत्री

प्रसंग लहान असो वा मोठा आपण तो कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा करतो. आता उन्हाळा सुरू झालाय आणि गर्मीच्या लाटेपासून वाचण्यासाठी पूल पार्टीच सध्या फॅशनमध्ये आहे. पूल पार्टी करणं खूपच सोपं असतं कारण यामध्ये पार्टी एन्जॉयसोबतच पाण्यामध्येदेखील पाहुणे खूप चांगल्या प्रकारे पार्टीचा आनंद घेऊ शकतात.

अशी ठेवा सिटिंग

स्विमिंग पूलच्या आजूबाजूला विविधतेने भरलेल्या सिटिंगची व्यवस्था करणे योग्य असतं. यासाठी लांब आणि कमी हाईटच्या बोहो टेबल चेअर्स, रग्स वा रजईची व्यवस्था बसण्यासाठी करू शकता. दोन्हीवर कम्फर्टसाठी पिलो आणि तक्क्याचा वापर केला जाऊ शकतो.

ड्रेस आणि कलर कोड खास असावा

कोणतीही साधारण संधी तेव्हाच खास बनते जेव्हा तुम्ही त्यामध्ये एखादा ड्रेस व कलर सेट करता. महिलांसाठी साडी, सूट, शरारा सूट आणि पुरुषांसाठी कुर्ता पायजमासारखे ड्रेस कोड पार्टीच्या थीमनुसार ठेवू शकता. ड्रेस कोड कोणासाठी अडचणीचा ठरू नये यासाठी तुम्ही कलर कोडदेखील ठेवा, म्हणजे सर्व पाहुणे दिसायला एक समान दिसतील. ड्रेसच्या कलर कोडनुसारच पूलची सजावटदेखील करा वा मग सजावटीनुसार ट्रॉपिकल, ऑल व्हॉइट वा कलरफुल ड्रेस कोडदेखील ठेवू शकता.

सीजननुसार ड्रिंक ठेवा

समर पार्टीच्या ड्रिंकमध्ये फ्रूट पंच, मॉकटेल्स, ज्युसेस, उसाचा रस, बर्फाचा गोळा आणि कोल्ड्रिंक ठेवू शकता. ड्रिंकला सर्व्ह करण्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीचे डिस्पोजेबल ग्लास आणि नळवाले केन वा कंटेनरचा वापर करा. यामुळे पाहुणे स्वत: देखील घेऊ शकतील आणि हे हायजिनिकदेखील असेल.

गेम्स आणि म्युझिक खास असावी

गेम्सशिवाय तर प्रत्येक पार्टी अपूर्ण असते. रंगीबेरंगी पूल बलून पूर्ण फुलमध्ये विखरून हिट अँड कॅच गेम, चांगलं एन्जॉय प्रत्येक वयोगटातील लोकं करू शकतात. याव्यतिरिक्त तंबोला, तीन पत्ती, अंताक्षरीसारख्या गेम्सने पार्टीला अधिक आकर्षक बनवू शकता. पूलाच्या आतमध्ये डोनट्स, फ्लेमिंगो युनिकॉर्न आणि पाइनॅपल शेपचे फ्लोट पूलमध्ये खूप आरामात टाकू शकता आणि यामुळे पूलमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता.

उन्हाची काळजी घ्या

भलेही पूलमधील पाणी कितीही थंड असलं तरी सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचणं गरजेचं आहे. यासाठी पुलाच्या एका कोपऱ्यात टेबलवर ३-४ सन स्क्रीनची व्यवस्था ठेवा.

व्हरायटीचं फूड

कोणत्याही पार्टीचं प्रमुख आकर्षण तिथे सर्व्ह करण्यात येणारे फूड असतं. फूडमध्ये व्हरायटी आणि एज ग्रुप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मेन कोर्सच्या जागी असं फूड ठेवणं गरजेचं आहे जे ब्रेकमध्ये घेऊन आरामात खाता येईल. नूडल्स, पास्ता, व्हेजिटेबल सँडविच, मिक्स व्हेज भजी, सॅलड, बीटरूट आणि पालकने बनलेल्या सलादसोबतच साउथ इंडियन फूडदेखील ठेवू शकता.

चेंजिंग रूम आणि टॉवेल

चेंजिंग रूमच्या स्वच्छतेकडे खास लक्ष द्या. पाहुण्यांच्या संख्येनुसार काही टॉवेल्सची व्यवस्था तुम्ही स्वत:च करा, सोबतच पाहुण्यांना देखील त्यांचे टॉवेल आणायला सांगा. चेंजिंग रूममध्ये एक मग आणि बालदीची व्यवस्था देखील ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें