‘गृहशोभिका’ ‘एम्पॉवर हर’

* नम्रता पवार

दिल्ली प्रेस पब्लिकेशन यांनी अलीकडेच गृहशोभिका ‘एम्पॉवर हर’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दिनांक २९ जून रोजी दादर, मुंबई येथील वनमाळी सभागृहात हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

महिलांचं आवडतं मासिक असलेल्या गृहशोभिका ‘एम्पॉवर हर’ कार्यक्रमासाठी मुंबई तसंच मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, बोरिवली, विरार, पालघरमधून अनेक महिला या रंगीबेरंगी पेहरावा कार्यक्रमासाठी उपस्थितीत होत्या. ११.०० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पाऊस असूनसुद्धा १०.०० वाजल्यापासून अनेक महिला उपस्थित होत्या.

होस्ट योगिता सकपाळ यांच्या जोशपूर्ण निवेदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगिता यांनी या कार्यक्रमाच्या रूपरेषेची सर्वांना ओळख करून दिली तसंच दिल्ली प्रेस प्रकाशनाची विविध मासिकं आणि प्रकाशनाची सुरुवात याचा एक छोटासा लघुपट दाखवण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रायोजकांचीसुद्धा ओळख आणि माहिती करून दिली.

सर्वप्रथम कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉक्टर प्रतिक्षा कदम यांनी डाएट का महत्त्वाचं आहे तसंच हार्मोनल प्रॉब्लेम्स, इंटरमिटेन्ट फास्टिंग, व्यायाम या सर्वांचे महत्त्व सांगितलं.

Banner_660x400_1

त्यांनी पुढे सांगितलं की, स्त्रीला एम्पॉवर केलं तर ती जगाला एम्पॉवर करू शकते. स्त्री एक शक्ती आहे. जेव्हा आपण शक्ती वगैरे म्हणतो त्याचाच अर्थ आपल्या हार्मोन्स. सर्वात पावरफुल हार्मोन्स आपल्या शरीरात आहे. कोणालाच इतरांना दिलेले नाहीत .

आज आपण प्रत्येक स्त्रीला बघतोय की जिच्यामध्ये हार्मोनल प्रॉब्लेम आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम एक्झिक्ट करत नाही. आपण मोठया हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतो, परंतु तिथे योग्य डायग्नोसीस होतं आणि त्यावर उपाय उपचारदेखील होतात. मोठमोठे हॉस्पिटल चांगले पॅकेजेस देत असतात त्याचा फायदा घ्या.

तुमच्यामध्ये जर हार्मोनल इशूज दिसून आले तर पॅकेज्ड फूड अजिबात खायचं नाही. त्यामध्ये प्रीजर्वेटिव असतं. त्यामध्ये सोडीयम अधिक असतं.

एकदा का तुम्ही हेल्दी लाईफचा स्वीकार केला की लठ्ठपणा, पीसीओडी, डायबिटीस या गोष्टी पूर्णपणे निघून जातात.

डॉक्टर प्रतीक्षा कदम यांनी सर्व महिलांना एक गुरु मंत्र दिला तो म्हणजे वेट लॉस. ही फ्रीमध्ये होणारी गोष्ट आहे. चालणं फ्री आहे फक्त इच्छाशक्ती आपल्या हातात आहे. वेटलॉस करण्यापूर्वी हेल्दी लाईफचा स्वीकार करा.

या सेशननंतर उपस्थित महिलांसाठी एक प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यात आला. विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

यानंतर डॉक्टर सुधा वर्मा होमिओपॅथी प्रॅक्टिशनर (एसबीएल होमिओपॅथी डॉक्टर ) यांनी मासिक पाळीच्यावेळी अनेकदा स्त्रियांना तसं तरुण मुलींना पाळी अगोदर येणं किंवा पाळी पुढे जाणं, पाळी आल्यानंतर पोटात दुखणे, उलटया होणं इत्यादी त्रास सतत सतावत असतात. आज ७० ते ८० टक्के स्त्रियांना पीसीओडीचा त्रास होत आहे हे त्यांना प्रॅक्टिस करताना आढळलं.

यासाठी योग्य डायट करणं महत्त्वाचं आहे. तसंच एसबीएलची ड्रॉप नंबर २ आणि डिसमेंट टॅबलेट हे मासिक पाळीच्या काळात पोट दुखीसाठी सर्वात महत्त्वाचं औषध असल्याची त्यांनी माहिती दिली. हे ३ महिने सतत घेतल्यानंतर पोटदुखी बंद होते. अॅलोपॅथी वाईट नाही आहे परंतु दुखण्यासाठी पेन किलर पुढे जाऊन तुमच्या शरीराचे प्रचंड नुकसान करतं.

योग्य आहार, योग्य औषधे आणि योगा करण्याचा त्यांनी सल्ला दिला.

आरोग्यावरच्या या दोन सेशननंतर योग्य गुंतवणूक, बचत यावर सीए आदित्य प्रधान यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. प्रधान हे टॅक्सेशन अँड कन्सल्टन्सीमधील एक्सपर्ट आहेत. त्यांनी एलएलबी न्यू लॉ कॉलेजमधून आणि त्यांचे ग्रॅज्युएशन आर ए पोद्दार कॉलेजमधून केलं आहे.

Banner_660x440_2

सीए प्रधान यांनी फायनान्शियल फ्रीडम नेमकं असतं काय? सेविंगचे महत्व काय आहे आणि ते सेविंग करायचं कसं? रिटायरमेंट प्लॅनिंग, घर खर्चाचं प्लँनिंग, मेडीक्लेम, टर्म इन्शुरन्स, एज्यूकेशन प्लँनिंग यावर मार्गदर्शन केलं. यासाठी पूर्ण वर्षभराचा चार्ट घरच्या घरी बनवायला सांगितला.

त्यांनी मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्ससाठी एलआयसी कशी फायदेशीर आहे तसंच एलआयसीच्या रिटायर्डमेंट पॉलिसीजबद्दल सांगितलं.

घरामध्ये योग्य ती इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला दिला. मुलांचं शिक्षण आणि लग्न यासाठी मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करण्यास सांगितलं. यासाठी फायनान्शियल कन्सलटन्टकडून सल्ला घेण्यास सांगितलं.

यांचा सत्कार एलायसी दादरच्या सिनियर ब्रँच मॅनेजर मिस शिल्पा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सेशननंतर उपस्थित महिलांसाठी एक प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यात आला. विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

हेल्थ का महत्वाची आहे आणि हेल्थ इन्शुरन्ससाठी एक डिस्ट्रिब्युटर म्हणून काय काय करू शकतो यावर मनिपाल सिग्नाकडून मार्गदर्शन करण्यात आलं. मनिपाल सिग्नाच्या फिमेल डिस्ट्रीब्यूटर अॅडव्हायजर निरूपमा कामदार यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. मुंबईत याच्या खूप संधी असल्याचं सांगितलं गेलं. तसंच स्त्रियांना डिस्ट्रिब्युटर होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. मनिपाल सिग्नाच्या फायनान्शियल, लाईफ इन्शुरन्स, म्युच्यूअल फण्ड्स, अॅडव्हायझर प्रिती कोचरिया यांचं उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आलं. हेल्थ इन्शुरन्स करोनामुळे अचानक का लोकप्रिय झाला याचं उदाहरण देत तो किती महत्त्वाचा आहे हे सांगितलं. गेल्या ५ वर्षापासून मणिपाल सिग्ना खूपच लोकप्रिय झालंय. याचे इन्सेन्टिव्हस लाईफ लॉन्ग आहेत तसंच यासाठी टिम तुम्हाला त्वरित मदत करते.

केसरी टूर्स हे पर्यटन क्षेत्रातील गेल्या ४० वर्षापासूनचं एक लोकप्रिय नाव आहे. माय फेयर लेडी फक्त महिलांसाठी, स्टुडन्ट स्पेशल टूर, सेकण्ड इंनिंग्स सिनियर सिटीझन स्पेशल टूर, छोटा ब्रेक कन्सेप्ट, हनीमूनर्ससाठी हनिमून कपल अशा अनेक विविध टूर्स ते करत असतात.

‘बाईपण भारी देवा’ या लोकप्रिय सिनेमाची संपूर्ण टिम या टूरवर आली होती. या सिनेमातील कलाकारांसोबत अनेक महिला परदेशात मंगळागौर खेळल्या होत्या. स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी तरी वर्षातून एकदा तरी केसरीसोबत फिरायला जायलाच हवं.

श्री. शेवडे हे गेली २४-२५ वर्षे एक फायनान्शियल अॅडव्हायझर म्हणून कार्यरत आहेत. लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स, म्युच्यूअल फंड्स, एमपीएस, रिटायरमेंट प्लॅनिंग या माध्यमातून ते कस्टमर सर्विस देतात.

प्रत्येक फॅमिलीला एका हेल्थ इन्शुरन्सची गरज असल्याचं तसंच रिटायरमेंट प्लॅनिंगकडे एका फोकसने बघणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

घरातील सर्व स्त्रियांचा पाठिंबा असल्यामुळे प्रत्येक पुरुष बाहेर मेहनतीने काम करू शकतो. सर्व स्त्रियांना याचं त्यांनी श्रेय दिलं.

फायनान्शियल प्लॅनिंग करताना प्रत्येक घरामध्ये करती स्त्री ही कमावती असो वा नसो ती बचत करतच असते.

कुटुंबातील गरजा, मुलांची शिक्षण, त्यांची लग्न त्यांचे रिटायरमेंट प्लॅनिंग या सगळया करता पैसा लागतो. यासाठी खूप पैसा लागतो तो तुमच्याकडे तर रेडी आहे का याचे प्लॅनिंग करणे खूप गरजेचे आहे.

तुमचे पैसे कुठे आणि कसे इन्वेस्ट करायचे जे भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो यासाठी कोणताही फायनान्शियल अॅडव्हायझर तुम्हाला मदत करू शकतो.

कार्यक्रमाच्या शेवटी खरंतर सर्वच महिलांना भूक लागली होती परंतु सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट ओजस राजानीने व्यासपीठावर येऊन आपल्या ओजस वाणीने जणू काही सर्व महिलांनाच मंत्रमुग्ध केलं.

सौंदर्यसोबतच आतील सौंदर्य महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या यशाचं श्रेय त्यांनी त्यांचे आई-वडील आणि गुरूंना दिलं.

गृहशोभिका ‘एम्पॉवर हर’ कार्यक्रमाचे प्रायोजक होते : गोल्डी मसाले, पारस घी, एसबीएल होमिओपॅथी, हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीजमधील नामवंत मनिपाल सिग्ना ग्रुप आणि सिग्ना हेल्थ इन्शुरन्स, एलआयसी म्हणजे विश्वास. भारतातील प्रथम क्रमांकाची इन्शुरन्स पॉलिसी एलआयसी. पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड.

सर्व निमंत्रित वक्त्यांचं स्वागत दिल्ली प्रेसचे मार्केटिंग रिजनल हेड दीपक सरकार आणि श्वेता रॉबर्ट्स, ईला यांनी भेटवस्तू देऊन केलं.

अनेक महिलांनी हा कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं तसंच नाश्ता, जेवण, भेटवस्तू यांचं त्यांनी कौतुक केलं. पुढील कार्यक्रम केव्हा आणि कुठे कुठे असणार याची त्यांनी उत्सुकतेने विचारणा केली.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें