* न्रमता पवार
पुन्हा एकदा तलावांचे शहर असलेल्या ठाण्यामध्ये ‘गृहशोभिका एम्पॉवर हर’ हा कार्यक्रम ३१ मे रोजी, क्रांती विसरिया हॉल, ठाणेमध्ये मोठया उत्साहात आणि महिलांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं आणि अनेक महिलांनी दिलेल्या नंबरवरून रजिस्ट्रेशन करून आपला प्रतिसाद नोंदवला.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासूनच महिला उपस्थित होत्या.
सकाळच्या नाश्त्यानंतर निवेदिका रुपाली सकपाळ यांच्या धमाकेदार संचलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सुपरवुमनचे स्वागत केले. तसंच ‘गृहशोभिका एम्पॉवर हर’सारखे कार्यक्रम मुंबई बरोबरच बंगळुरू, नोएडा, अहमदाबाद, लखनौ, भोपाळ आणि चंदीगडमध्ये होत असल्याचे सांगितलं.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रायोजक फायनान्शियल एज्युकेशन पार्टनर : एचडीएफसी म्युच्यूअल फंड * असोसिएट स्पॉन्सर : हायर * असोसिएट स्पॉन्सर स्वा * ब्युटी पार्टनर : ब्रिहंस नॅचुरल प्रोडक्ट्स द्वारा ग्रीन लीफ एलोवेरा जेल आणि दिल्ली प्रेस यांचे एव्ही दाखवण्यात आले.
खास अनाउन्समेंट
‘गृहशोभिका एम्पॉवर हर’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी या कार्यक्रमात कोणकोणती मस्ती, मौजमजा केली, कार्यक्रमाचा आनंद कशाप्रकारे घेतला त्याचे सेल्फी, फोटोज आणि स्टोरीज गृहशोभिकेच्या instagram पेजवर तसंच फेसबुकवर टॅग करण्यास सांगितलं. तसंच टॉप फाय धमाकेदार ५ एंट्रीजना गृहशोभिकेकडून गिफ्ट हॅम्पर्स देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित ५ महिलांना स्टेजवर निमंत्रित करून बॉलीवूड डान्सने झाली. उपस्थित पाहुणे तसेच सर्व महिलांनी या नृत्याचा आनंद घेतला.
या नृत्यासाठी थीम होती, हाताने कपडे धूऊन नृत्य करणे.
असोसिएट स्पॉन्सर हायर यांचा एव्ही दाखवण्यात आला. यामध्ये AI पॉवर्ड DBT सिरीज वॉशिंग मशीन दाखवण्यात आली, जी क्लिनिंगचं रेव्होल्यूशन आहे. या स्मार्ट टेक्नॉलॉजीची एक स्मार्ट झलक दाखवण्यात आली तसंच खास डिस्काउंटदेखील जाहीर करण्यात आलं.
स्त्रियांचं मानसिक आरोग्य आणि वेलनेस
कार्यक्रमाची सुरुवात ही ‘स्त्रियांचं मानसिक आरोग्य आणि वेलनेस’ या सेशनने झाली.
या सेशनमध्ये कोकीलाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळाचे कन्सल्टंट आणि नवी मुंबईतील मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कन्सल्टंट डॉक्टर पार्थ नागडा यांनी महिलांचे मानसिक आरोग्य, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि यावरचे उपाय याबाबतीत मार्गदर्शन केलं.